अघोर भाग 7
लेखक: कनिश्क हिवरेकर...
***
गावाच्याबाहेर त्या भयान जंगलात...त्या स्मशानशांततेमध्ये रातकिड्यांनी आपली किरर्र किरर्र माजवून ठेवली होती त्या सुकलेल्या वडाच्या झाडात त्या पारंबीच्या फांद्यावर ते बसलेलं घुबड सतत वाड्याकडे बघून “व्हुऊ व्हुऊ....” आवाज करीत घुत्कारत होत एक एक निशाचर जणू त्या वाड्यामध्ये घडलेल्या भयानक घटनावर त्याच्या परिसरात वावरणाऱ्या अतृप्त उप्द्र्वांवर अगदी एकटक नजर ठेवून होत वाड्याच्या कोपऱ्यातून पाचोळ्यातून सळसळ करीत साप आपल्या बिळात शिरत होती. अंधाराच्या भयान काळोखात तो दैत्यरुपी भयंकर वाडा उभा होता. वाड्याच्या एका कोपऱ्यातल्याच खोलीमध्ये खिडकीतून एक किंचितसा प्रकाश झळकताना दिसत होता. कंदिलाच्या उजेडात आतमध्ये एक इसम आणि एक स्त्री बसली होती. तो सखाराम होता डोक्यावर पांढरी टोपी मांडीवर संध्या आणि समोरच दिव्याच्या उजेडात सावित्री बसली होती. सखारामने आपल्या बहिणीची एक एक व्यथा ऐकून घेतली. त्याचे डोळे तिच्या शब्दागणिक पाणावून जाऊ लागले आणि त्या सोबतच मनात एक भीतीही दाटून येऊ लागली. आता पर्यंत त्याने पंताचा क्रूरपणा फक्त सावित्रीवरच पाहिला होता.त्याच खर रूप त्याला अजून समजलेच नव्हत.. “ताई माझ ऐक तू इथून निघून चल माझ्या सोबत नको राहू इथ या वाड्यात...” सखाराम सावित्रीची अवस्था पाहून तिला आपल्या सोबत येण्यास विचारत होता. पण सावित्री आपल्या नकारावर ठाम होती.
“ताई हा माणूस तुझ्यावर एवढ अत्याचार करतोय...मग या पोरीचा तरी विचार कर...” त्यावर सावित्रीने पाणावलेल्या डोळ्यांनी संध्याच्या डोक्यावर हात फिरवला... आणि नकार देत मान हलवली.. “ नाही जे काय आहे ते आता माझ्या पर्यंतच आहे. माझ्या पोरीच्या केसालाही धक्का लागणार नाही...” सावित्रीला ती रात्र आठवली जेव्हा त्या भयंकर उपद्रवाने तिला वाड्यात परत आणले होते. आपले संपूर्ण आयुष्य तिने पंताच्या गुलामगिरीच्या आगीत झोकून दिल होत. एक अलिखित करार केला होता. अट होती वचन होत. कि संध्यावर कसलीही हानी येणार नाही. पण गोविंदपंताच्या कुटील मनात वेगळाच विचार होता. “ ताई तू चल ग माझ्या सोबत मी हात जोडतो तुझ्यासमोर..” सखाराम तिला विनवणी करू लागला होता. त्यावर सावित्री म्हणाली...”तुझी ताई तर केव्हाच वारली रे सखा....हे मातीच शरीर या इवलुश्या जीवासाठी आहे माझा आत्मा तर त्याच्याचकडे गहाण आहे माझ्या मागच्या जन्मात केलेल्या कुठल्या तरी मोठ्या पापाची फेड मला मिळतेय...हा साधासुधा आसामी नाहीये रे सखा....पंडिताचा मुखवटा ओढलेला हा सैतान आहे एक सैतान...या वाड्यात त्या सैतानाने माझी आत्मा जन्मभरासाठी कैद करून ठेवली आहे या वाड्याच्या भिंती , सळया सर्व त्याचे हेर आहेत या वाड्यात वाहणारी एक न एक झुळूक विषारी आहे कधी कोणती येऊन श्वासात मिसळेल आणि जीव बाहेर काढेल सांगता येणार नाही.... “ ताई...? काय म्हणतेयस हे ? मला स्पष्ट सांग....” सखारामला संशय येऊ लागला त्याने सावित्रीवर जोर धरला कि नेमका प्रकार काय आहे तो एकदा त्याला कळूदे.... “ सखा तुला सांगितले तर यावर विश्वास बसणार नाही...हे पंडिताच्या वेशात एक अघो....” सावित्री पुढे बोलणार होतीच कि तेवढ्यात एक धाडsss असा आवाज झाला...सखाराम आणि सावित्री दोघांच्याहि नजरा त्या आवाजाकडे वळल्या... त्या दोघांच्या समोरच त्या खोलीचा दरवाजा एका सपाट्याने उघडला होता आणि उघडून हळू हळू पुढे मागे होऊ लागला होता...त्या उघडझाप होणाऱ्या दरवाज्याबाहेर वाड्याचा वऱ्हांडा दिसत होता...पण सबंध काळोख पसरलेला डोळे मीच मीच केले तरच बाहेरच काहीतरी दिसत होत. परंतु सावित्रीला मात्र समजले कि हा इशारा आहे. एक चेतावणी आहे कि माझ्याबद्दल एक शब्दही कोणाजवळ बोलू नकोस... दरवाजा धाडकन वाजताक्षणीच संध्याने आपल्या मामाच्या सदरयात आपले तोंड लपवून घेतले आणि एका डोळ्याने त्या दरवाज्याकडे पाहू लागली....सखारामने समोर आपल्या बहिणीकडे पाहिले तेव्हा ....दिव्याच्या उजेडात तिचा चेहरा अगदी घामाने चमकत होता “ ताई ? काय झाल ? अस का बघतेयस माझ्याकडे ?” सावित्रीच्या चेहऱ्यावर घामाचे ओस निर्माण झाले होते. भीतीने तिचे डोळे विस्फारून गेले होते... “ ताई काय झाल ? अस का पाहतेयस ?” परंतु सावित्री त्याच्याकडे नाही तर त्याच्या खांद्याहून मागे असलेल्या त्या भयंकर आकाराला बघत होती ज्याचे लांबसडक अनुकुचीदार नखांचे पंजे सखाराम च्या दिशेने वाढत येत होते.
सखारामने सावित्रीची नजर हेरली त्याला समजले सावित्री त्याच्या पाठीमागे पाहत आहे. सखरामने तसेच तिरकस नजर करत आपल्या मागे पहायला सुरुवात केली...आणि संपूर्ण मान मागे वळवली समोर फक्त शेणान सारवलेली भिंतच त्याला दिव्याच्या प्रकाशात दिसली... एव्हाना ते जे काही होत ते क्षणार्धात नाहीस झाल... “ ताये ?” सखारामने तिच्या हातावर हात ठेवला तसा त्याला जाणवले कि सावित्रीचा हात अगदी बर्फासारखा गारठून गेला होता. सखाच्या उबदार हाताच्या स्पर्शाने सावित्री दचकली... “हं ? काय ?”
“ तुला झोप आली असेल न ? चल तू झोपून घे मी पण काय घेऊन बसते..आण तिला इकडे...”सावित्रीने संध्याला साखाच्या मांडीवरचे उचलून घेतले आणि “झोपून जा तुला..अन सकाळी तुझा तू आपल्या मार्गाला लाग सखा...” सावित्रीने आपला हुंदका आवरला.... “ ताई....?” “काय रे सखा ?” दरवाजातच उभ राहून सावित्री हुंकारली...
“ काळजी घे ग...तुझी...अन एक न एक दिवस मी तुला इथून या नरकातून घेऊन जाईन...” सावित्रीने एक नजर त्याच्याकड पाहिले आणि संध्याला घेऊन तशीच चौकटीतून बाहेर पडली...सखा आपल्या बहिणीची अशी अवस्था पाहून आपले रडू आवरू शकला नाही...सदऱ्याने आपले डोळे पुसतच तो दरवाजा लावण्यासाठी उठला तसा त्याने पाहिले कि वरच्या मजल्यावरच्या एका खोलीजवळ हातात कंदील घेऊन अंगात घोंगडी पांघरून अगदी मान पुढे झुकवून गोविंदपंत विस्त्वासारखे लालभडकडोळे अन डोळ्यात आग घेऊन सखारामकडे एकटक पाहत होते. त्या नजरेनेच सखारामचे मात्र अर्धे अवसान गळून गेले...दरवाजा बंद करून सखाराम अंथरुणात पडला...दिव्याचा प्रकाश त्याने झोप यावी म्हणून कमी केला...रात्रभर त्याचा डोळ्यालाडोळा लागेनासा झाला होता विचारांनी एका धास्तावलेल्या मनाने त्याची झोपच उडाली होती. आणि शेवटी थकून त्याने डोळे बंद केलेच होते कि थोड्याच वेळात त्याला अगदी सडका दर्प नाकात घुमलेला जाणवला...अंगाखाली असलेली गोधडी देखील वेगळी जाणवत होती खाली जमीन म्हणून मात्र नव्हतीच आता त्या सडक्या वासासकट काहीतरी जळत असल्याचा देखील त्याला वास येऊ लागला धूर नाकात शिरू लागला अंगाला चटके बसू लागले...कानावरती किंचाळी ऐकू येऊ लागली एकामागे एक त्या किंकाळ्या वाढतच गेल्या...अचानक त्याला पाठीला काहीतरी भाजू लागले तडफडत सखारामने ताडकन डोळे उघडले आणि उठून बसला तर आजूबाजूचे भयान दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला...डोळ्यासमोरच चारी बाजूना अवतीभवती असंख्य चिता जळत होत्या काही जळून खाक झाल्या होत्या...आणि काहींवरती तर जिवंत शरीर जळत होते भाजत होते काही काही तर चितेलाच बांधलेले होते.सखारामची तर बोबडीच वळली आता तर त्यालादेखील खाली भाजल्या सारखे जाणवले आणि जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा मात्र त्याला दुसरा धक्का बसला यावेळी आता तो स्वतःच एका ज्वलंत आगीने धगधगनाऱ्या चितेवर बसला होता. त्याने उठण्याचा प्रयत्न केलाच कि त्याला जाणवले त्याचे दोन्ही हात कोणीतरी साखळीने बांधून ठेवले होते चितेला...आणि तिथे जळत्या प्रत्येक प्रेताप्रमाणे त्याची देखील चिता जळू लागली आणि एकच आर्त किंकाळी त्याची त्या स्मशानात घुमली...
आणि तसाच झोपेतून सखाराम उठून बसला...घाबरत थरथरत त्याने आजुबजुला पाहिले तर त्याला आपण घरातच आहोत याची खात्री झाली आणि ते जे काही होत ते स्वप्न होत. सखाराम आपले दोन्ही हात टेकवून उठू लागला कि क्षणीच तो वेदनेने विव्हळला...तो आपले हात जमिनीवर टेकवू शकत नव्हता त्याने दोन्ही हात त्याने कंदिलाच्या प्रकाशासमोर आणून पाहिले...ते पाहून सखारामचे रक्त जागच्या जागी गोठून गेले...त्याचे संपूर्ण तळहात होरपळून निघाले होते म्हणजे ते स्वप्न स्वप्न नव्हते...
***
वर्तमान...
गावात चर्चा सुरु झाली...जो तो संध्या विश्वास आणि अनुच्या गावात परतन्यावरून कुजबुज करू लागला... तोंडात तंबाखू ठेवण्याएवढस गाव होत ते. पण गावात असे काही घडल होत कि एके काळी आर्धा गाव उठला आणि आपली घरे सोडून निघून गेला...ज्यांना जमू शकत नव्हत त्यांनी भीती बाळगूनच घर सांभाळले...असो सरपंचाच्या घरी सकाळची न्याहारी उरकून सखारामने सरपंचांकडून निरोप घ्यायचं ठरवल... विश्वासने सरपंचाचे एक रात्र पाहुणचार करण्यासाठी आभार मानले...सरपंचानी संध्याकडे पाहिले... “ सखाराम तुला त्या रात्री गावातून जो घेऊन गेला तेव्हाच त्याच रात्री पाहिलं होत तुला त्या नंतर आता पाहतोय...वाडा आजपासून तुमच्या स्वाधीन आहे. या आहेत त्याच्या किल्ल्या...गावचा सरपंच म्हणून त्याची जबाबदारी माझ्यावर होती पण आता तुम्ही लोक आले आहात तर मी काय करणार यांना ठेऊन...घे..” असे म्हणत सरपंचाने त्या किल्ल्यांचा गुच्छा संध्याच्या हाती ठेवला...किल्ल्या हाती येताच संध्याच्या मेंदूतील एक न एक तार संकटाच्या आहुतीने तरारून गेली...कदाचित कोणेकाळी त्या चाव्याना त्याचा स्पर्श होता. आणि आता तर संध्या स्वतःच चालून येत होती. संध्याने विश्वासकडे पाहीले...विश्वासच्या हि मनात आता स्वतःच्या निर्णयावर विश्वास निर्माण झाला...आपण एवढ्या दूर येऊन काहीच चूक केली नाही संध्याच्या त्रासामागे असणारे मूळ त्याला समजणार होते. “ चला आम्हाला निघायला हव सरपंच...” विश्वास पुढे येत म्हणाला बकुळाने छोट्या अनुला कंबररेवर बसवून घेतले...आणि तिला गाडीत बसवायला निघाली...तसे विश्वास आणि संध्या दोघेही गाडीत बसण्यास निघाले... सखारामने एकवेळ शेवटच सरपंचाकड पाहिले....इकडे सरपंचाच्या मागे जखोबा उभा होता व सरपंच दोन्ही हात मागे बांधून सखारामला त्यांनी मान हलवत एक नकारार्थी इशारा केला...तसे सखाराम म्हणाला... “गरज पडली तर या मदतीला...” एवढच म्हणून सखारामने तिथून काढता पाय घेतला...
“जखोबा...! डाव मांडला गेलाय...! जाळे विणल गेल! तो आता चाल करायला काही कमी करणार नाही...”
“होय मालक !”
“देवा महाराजा रक्षा कर रे...!आता तूच वाली....!”
इकडे सखाराम गाडी जाईल त्या मार्गाने त्यांना वाड्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला होता. सखाराम पुढे जाता जाता जागेवरच थांबला कारण वीस वर्षानंतर तो त्या वाड्याच्या समोरासमोर आला होता वाड्यची एक सुद्धा वीट एक सुद्धा दगड जागचा हलला नव्हता...दिसायला फक्त तो एक मोह होता एक माया होती गाडीसाठी जाणारा रस्ता संपला आणि तिथून पुढे पायवाट सुरु झाली... तसे विश्वासने गाडी बंद केली आणि तो स्वतः संध्या आणि मागून बकुळा छोट्या अनुला घेऊन बाहेर निघाली...बाहेर निघताच विश्वासला असे जाणवले जसे कोणीतरी झाडामागे दडून त्यांना पाहतय...विश्वासने ते दुर्लक्ष केले इकडे सखारामने मागे पाहून विश्वासला म्हणाला “ इथून पुढ आपल्याला चालत जाव लागेल जावईबापू...” विश्वास काही बोलणार होताच कि तोच...संध्या विश्वास आणि सखारामच्या तिघांच्याही कानावरती एका लहानगीची किंचाळी पडली...तो आवाज संध्याला जणू तिच्या काळजातूनच निघाल्यासारखा वाटला...सर्वात आधी संध्या मागे वळली आणि तिने पाहिले कि बकुळा जमिनीवर खाली पडली कण्हत होती. विश्वास हि तसा मागे वळला बकुळा खाली एकटीच पडली होती परंतु अनु तिच्या जवळ नव्हती… विश्वास आणि संध्या दोघेही अनु जवळ नाही हे पाहून हादरून गेले विश्वासने इकडे तिकडे झर झर नजर फिरवली आणि पाहिले कि एक व्यक्ती अनुला उचलून खांद्यावर टाकून धावत सुटला होता...
“एsss थांब...ए “ विश्वास ओरडला आणि वाट सोडून काट्या कुट्यातून चिखलातून त्या माणसाच्या मागे मागे धावत सुटला अनु त्याच्या खांद्यावर होती आणि रडत होती. आणि तो माणूस धावता धावता एकच नाव ओरडत धावत होता...
“ माझी ...छ्की ...सापडली....!माझी... छ्की... सापडली....ए माझी !छ्कीsss...!”
क्रमश:

No comments:
Post a Comment