चंद्रशेखर कुळकर्णीपाटील { परमहंस नगर पुणे}
मित्रांनो आज हा माझा भयावह अनुभव आपल्या समूहावर विदित करीत आहे. हा अनुभव खरंतर गायत्रीमंत्रशक्तीची अनुभूती देणारा आहे. आम्ही तेंव्हा औरंगाबाद मधील हरसूल या गावी गेलो होतो. ते अॆक खेडेगाव होते तेंव्हा. तिथल्या जंगलात आम्ही रहात होतो.
वडिलांचे मित्र तिथे फॉरेस्ट ऑफिसर होते. जंगलातील इन्स्पेक्शन बंगल्यात आम्ही राहिलो होता. रात्री अतिशय शांत प्रसन्न असत. शहरातील आवाज गोंधळ सततची धावपळ यापासून दूर अॆकांतात.
या असल्या खेड्यात काही वेगळ्याच श्रद्धा भरपूर असतात.
आपल्याला त्या अंधश्रद्धा वाटतात, त्यामागे काही लॉजीक मात्र निश्चितच असते. आपल्याला माहित नसते, कळत नसते.
त्यातीलच अॆक म्हणजे भगत व त्याचे अंगात येणे.
आधी आम्हाला असे वाटत होते की ते दारु पिऊन असले काही करीत असतील. परंतू तसा प्रकार यात दिसून आला नाही.
अॆका संध्याकाळी जमिनीवर खड्डा करुन त्यात होळी सारखी लाकडे रचली. त्या सभोवती सुर्यास्त होत असतांना त्यांचे आदिवासी नृत्य सुरू झाले. माणसं जास्त नव्हती. १०/१२ माणसं व तेव्हढ्याच स्त्रिया होत्या. सगळे मिळून जास्तीत जास्त २२/२२ माणसं असतील.
त्यांचा जो मुख्य पुजारी होता त्याने मळवट भरला होता,केस मोकळे सोडले होते, अगदी मुलींसारखे भरगच्च दाट होते. मला आधी तो विग वाटला. पण तसे नव्हते ते खरे केस होते.
नृत्य खरच चांगले होते.
त्याला रंग चढला तो त्यांची वाद्य सुरू झाली ढोल तुतारी भैरी सारखी होती.
आता आपल्याला थोडं मागे नेतो.
याआधी काही दिवसांपूर्वी अॆक घटना घडली होती की अॆका आदिवासी ५ वर्षाच्या मुलाला सतत वांत्या होत होत्या. सगळे वैद्यकीय औषधोपचार सुरू होते, परंतू वांत्या थांबत नव्हत्या. नंतर रक्ताची वांती झाली व तो मुलगा बेशुद्ध पडला. नाडी लागत नव्हती, डॉक्टरांनी सांगितले की काही तासच जिवंत राहू शकेल. त्यानंतर या भगताला बोलवले होते, भगतांनी सर्व काही पाहिले, व सांगितले की हा करणीचा प्रकार आहे, बेशुद्ध व्यक्तीचे डोळे उघडून पाहिले, त्यात त्यांना कळले की हा करणीचा प्रकार असल्याचे , त्याप्रमाणे भगतांनी नाडीवर काही मंत्रोपचार केले, लगेच नाडी सुरू झाली. डॉक्टरांसमोरच हे घडले. डॉक्टर देखील गोंधळले, परंतू ते फक्त बघत होते. अॆक सायलेंट आॅब्झर्व्हर .
भगतांनी सांगितले की अॆका रात्री या मुलाने काही ओलांडले आहे, त्या ठिकाणी अॆका अतृप्त वृद्ध स्त्रीचा आत्मा होता, त्याने हा झपाटलेला आहे.
या वांत्या होण्या आधी काही दिवस हा मुलगा रोज रात्री १२ नंतर जागा होत असे , त्याच्यात संचार होत असे, व तो लहान मुलगा जो समोर असेल त्याला मारत होता, व कोणालाही आवरत नसे. अगदीं बेभान होवून त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वयाच्या मोठ्यांकडून आई वडिलांकडूनही आवरला जात नसे. आई-वडिलांना देखील मारत होता.
५ वर्षांचा मुलगा ३६/३७ वर्षांच्या दोन दोन दणकट पुरुषास आवरला जात नव्हता.
हे सर्व भगताने देखील विचारले की असे काही घडले होते का?
हे सर्व काही आमच्या समोर घडले होते.
त्यांनी सांगितले की या आत्म्यास मी सर्वांसमक्ष बाहेर काढीन.
कारण जरी डाॅक्टरांच्या समोर जरी बंद पडलेली नाडी मंत्रोपचारांनी सुरू झाली तरीही त्यांचा वर सांगितलेल्या पुजेवर विश्वास नव्हता, डॉक्टर बोलत होते की मुलाला लगेच नाशिकमध्ये जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. संध्याकाळ होत आली होती, भगताने सांगितले संध्याकाळ झाली आहे मला फक्त अॆक तास द्या, त्यात मुलाला व्यवस्थीत उभा करतो. डॉक्टरांना मार्केटमधून अॆक मोठा लाल भोपळा आणायला सांगितले.
भगताने त्याची पुजा त्या होळी समोर सुरू केली.
तशी साधीच पुजा होती.
पुजेत वापरलेले सर्व काही सात्त्विक वाटत होते.
गुलाल कुंकू व अबिर व दहीभात.
त्यानंतर भगताने सर्व लहान मुलांना त्यांच्या झोपडीत पाठवले.
{चंद्रशेखर कुळकर्णीपाटील { परमहंस नगर पुणे}}
सुर्यास्त झाला तसे त्यांच्या संगीताची लय वाद्यांचा आवाज नृत्याचे ताल वाढत गेले.
तसे तसे भगत घुमू लागला, नंतर नंतर तोही अत्यंत बेभान झाला.
त्या लहानग्या मुलाला आणले व भगतासमोर बसवलं. त्यावेळी मुलगा बेशुद्ध होता. डाॅक्टरांना भोपळा होळी व भगत यांच्या मधल्या जागेत ठेवायला सांगितले, व त्यासमोर भगताने मंत्र उच्चारण सुरू केले. होळीत भात गुलाल, भात कुंकू, भात अबीर , व भात काळ्या तिळाच्या आहुती देणे सुरू केले.
त्याक्षणी मुलगा शुद्धीवर आला व त्या मुलाने कोकणी/मालवणी भाषेत अत्यंत अर्वाच्य शिव्या देणे सुरू केले व तो भगतावर धावून जायला लागला. नंतर अगदी भगताशी भिडलाच.
भगताने श्री गोरक्षनाथांची शपथ घातली व नाव विचारले की कोण आहेस आणि का या लहान बछड्याला छळत आहेस. सोडून दे , पुन्हा गोरक्षनाथांची शपथ घातली. व मंत्र सुरू केले. त्यावेळी स्पष्ट मंत्र कळला. तो गायत्रीमंत्र पठण करीत होता. फक्त आधी व नंतर काही संपुट लावत होता ते कळत नव्हते.
तद्नंतर सुरू केला
गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च .... हा मंत्र.
त्याचवेळी समोर ठेवलेला भोपळा आपोआप फुटला व त्यातून लाल काळा धूर बाहेर आला.
त्याक्षणी ते मुलही अतिशय नॉर्मल झाले. शिव्या देणे बंद झाले.
मुलगा शांत झाला.
डॉक्टर आश्चर्यचकित झाले, त्यांच्या समोर घडत होते, भोपळा त्यांनीच आणला होता. अविश्वास कसा दाखवायचा.
हे सर्व काही आमच्या समोर घडले.
आश्चर्य वाटले ते यासाठीच की गायत्री मंत्रात व नवनाथ मंत्रात ही अशी शक्ती आहे.
तेंव्हा लक्षात येते आपला वारसा किती समृद्ध आहे पण आपण विसरलो आहोत.
ही अनुभूती गायत्री मंत्राची, नवनाथ मंत्राची.
चंद्रशेखर कुळकर्णीपाटील { परमहंस नगर पुणे}