डाग- Daag the Marathi Horror Story on the blog
नुकताच विजय आपली 8 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा भोगून बाहेर पडला होता.....जन्मापासून अनाथ असलेल्या विजय वर चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीचा डाग लागला होता अनेक छोटेमोठे गुन्हे करून अनेक वेळा त्याची जेलवारी घडली होती पण त्याने 8 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा खूप मोठा होता....बंदुकीच्या जोरावर त्याने एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता त्यात तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाशी झालेल्या झटापटीत त्याच्याकडून चुकून गोळी सुटून तो सुरक्षारक्षक जखमी झाला होता..... जबरी दरोडाच होता तो....आधीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड बघता कोर्टाने विजयला 8 वर्षे सक्तजुरीची शिक्षा सुनावली होती ह्या शिक्षेत विजय मधे बराच बदल झाला होता....लहानपणापासून गटाराच्या बाजूला राहून आपण कुणीतरी वेगळे आहोत आणि हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही अश्या आंतरिक भावनेने विजय गुन्हेगारी कडे वळला होता पण ह्या 8 वर्ष्याच्या कैदेत त्याला तिथले जेलर महादेव कांबळे साहेब भेटले त्यांच्या समुपदेशाने त्याला गुन्हेगारी सोडून दुसरं चांगले जग आहे आणि कांबळे साहेबांच्यासारखी चांगली माणसं सुद्धा ह्या जगात आहेत हा साक्षात्कार त्याला त्या कैदेत झाला आणि 8 वर्ष्याच्या कैदेनंतर त्याने कष्ठाने जगायचं ठरवले पण सुरवात अशी अचानक होणार नव्हती.....त्याचं या जगात कुणीच नव्हतं गुन्हेगारी मध्ये पैसा होता पण आता त्याने ती वाट कायमची बंद केली होती त्यामुळे आता सुरवातीपासून सगळी जमवाजमव करावी लागणार होती.....कैदेत असताना तिथे एक त्याचा मित्र झाला होता त्याची शिक्षा अजून बाकी होती.....त्याने विजयला आपल्या फ्लॅट मध्ये राहायची परवानगी दिली त्यानुसार तो गोल्डन अपार्टमेंट जवळ पोहोचला
गोल्डन अपार्टमेंट पूर्ण शहरात बदनाम होते.....शहरातले जवळपास सगळेच दोन नंबरवाले तिथे रहायला होते....विजयचा मित्र सुद्धा त्याच क्षेत्रात होता त्यामुळे तो गोल्डन अपार्टमेंट मध्ये राहत होता....विजयला तिथली सगळी परिस्थिती माहीत होती पण पर्याय नव्हता.....सेटल होईपर्यंत तरी त्याला तिथे राहणे भाग होते.....आणि ह्या 8 वर्षात तो बरच दुर्लक्ष करायला शिकला होता त्यामुळे गोल्डन आपर्टमेंट मध्ये जातानाच त्याने ठरवले होते की आपण तिथल्या त्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाशी काम ठेवायचे.....गोल्डन आपर्टमेंट 10 मजली होते आणि 9 व्या मजल्यावरची त्याची रूम होती.....ते आपर्टमेंट एका मोठ्या गँगस्टर ने बांधले होते त्यामुळे साहजिक तिथे गुन्हेगारी लोकांची वर्दळ जास्त होती जर सामान्य शहराला स्वर्ग म्हणायचे झाले तर हे आपर्टमेंट एक नरक होते पण विजयला काही फरक पडणार नव्हता कारण त्याला फक्त एक आसरा हवा होता.....जेल मधल्या मित्राच्या सांगण्याप्रमाणे तो आधी ज्याने गोल्डन आपर्टमेंट बांधले होते त्याच्या मुलाला जाऊन भेटला....आपल्या वडिलांच्या नंतर बॉबीने शहरातले सगळे काळे धंदे आपल्या ताब्यात घेतले होते विजय बॉबीला जाऊन भेटला आणि जेल मधील आपला मित्र सुधीरबद्दल सांगितलं आणि 50 हजार बॉबीच्या हातात ठेवून तिथे राहायची परवानगी मिळवली आणि तो गोल्डन आपर्टमेंट मध्ये आला.....
अपेक्षेप्रमाणे तिथे वातावरण होतं....खाली काही मुली शॉर्ट कपडे घालून खुणावत होत्या कुणी कुणाच्या गळ्यात पडुन मोलभाव करत होते.....खाली सिगरेट ओढत खिशातून कसल्यातरी हिरव्या पुड्या दुसऱ्याच्या हातात टेकवणारे लोक होते....विजयकडे एकटक बघत काहीजण आपल्या तोंडात भरलेला गुटख्याचा तोबरा खाली थुकुन त्याच्याकडे रागाने बघून त्याला जणू आव्हानच देत होते.....एक अनोळखी माणूस समान घेऊन आपर्टमेंट मध्ये शिरतो आहे हे बघून सगळ्यांच्या नजरा विजयवर खिळल्या होत्या पण त्या भेदक नजराशी हुज्जत न घालता विजय खाली मान घालून निमूटपणे चालू लागला आत जाता जाता कुणी आजूबाजूला दारू पिऊन पडलं होतं कुणी तिथल्या एका मुलीच्या अंगावर हात फिरवत तिथल्या रूम मध्ये घेऊन जात होतं एकदोघांनी विजयची वाट आडवली पण तिथल्या एका मॅनेजरने सगळ्यांना तंबी दिली
"अरे बॉबी भाई का आदमी है वो.....समझा क्या??"
बॉबी भाई नाव ऐकताच त्या भेदक नजरा खाली झाल्या आणि सेकंदात लोक तिथून चालते झाले.....गोल्डन आपर्टमेंट तसे 40 वर्षे जुने होते....थोडे जुन्या पद्धतीचे बांधकाम होते काळवंढलेली ती इमारत फक्त तिथल्या गुन्हेगारांना ऊन वारा पावसापासून वाचवण्याचे काम करत होती त्यामुळे त्या बिल्डिंगची अवस्था जैसे थे होती....लिफ्ट मधून विजय 9 व्या मजल्यावर पोहोचला व्हरांड्यात उभं राहून तो आपली रूम शोधू लागला.....तिथे काही कॉलगर्ल राहत होत्या त्या आपल्या गिर्हाईकाबरोबर चाळे करत उभ्या होत्या दारू सिगारेट च्या सततच्या वापराने एक कुबटसा वास त्या तिथे पसरला होता.....भिंतीवर स्प्रे पेंटने कुणाची नावे,शिव्या,अश्लील चित्रे काढली होती त्याच्याकडे एक चोरटी नजर मारत विजय आपल्या रूम जवळ पोहोचला रूमला कुलूप होत जे चावीने विजयने उघडलं आणि तो आत शिरला....गोल्डन आपर्टमेंट बांधताना 80 च्या काळात बॉबीच्या वडिलांनी ते खास आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी बांधले होते त्यामुळे ते एखाद्या सुरक्षित किल्ल्यासारखे मजबूत बांधले होते दारे खिडक्या मजबूत लोखंडी होत्या एकप्रकारे प्रत्येक खोली म्हणजे एक बंकर होते....खोलीचे दार उघडताच कित्येक वर्षे बंद असल्याने कोंडलेला सगळा वास बाहेर आला आपल्या नाकावर हात ठेवत विजय आत शिरला....जुने बांधकाम असल्याने फक्त 1bhk टाइप ती रूम होती.....भिंतीला पोपडे धरले होते भिंतीला ओल आल्यामुळे थोडासा गारवा खोलीत जाणवत होता.....विजयने एकनजर त्या खोलीकडे बघितले आधी दिलेला लाईट आईस्क्रीम कलर आता मातकट झाला होता विजय ने आत येताच लाईट ऑन केली....अंधुक उजेडात ती खोली थोडी भयानकच वाटत होती....भिंतीला आलेली ओल आणि निघत चाललेले भिंतीचे पोपडे थोडेसे नकारात्मक वाटत होते पण विजयला सगळ्याची सवय होती.....तसा तो त्याच्या झोपडपट्टी मधील घरात राहू शकला असता पण ते वातावरण त्याला नको होतं पण इथे आल्यावर तर चित्र वेगळं होतं.....हिटलिस्ट वरचे आरोपी,वेश्या,स्मगलर हे तर त्या झोपडपट्टी मधल्या भुरट्या चोरांच्या पेक्षा भयानक होते पण विजय ने इथे राहून स्वतःला आजमवायचे ठरवले जेलात कांबळे साहेबांच्या शिकवणीची ही परीक्षाच समजून विजयने आपले समान खाली ठेवले आणि दार बंद करून थोडी साफसफाई करू लागला.....तस तर त्याच्याजवळ काही काम नव्हतं त्यामुळे त्याने एक आणि एक कोपरा स्वच्छ करून घेतला पण बेडरूम मधील सिलिंग वरचा काळा डाग काही केल्या निघत नव्हता.....त्याने खूप प्रयत्न केले पण तो डाग काही हटेना..त्या डागातून एक सडका वास येत होता...शेवटी विजयने सगळे प्रयत्न सोडून दिले.....त्याच्याजवळ काही पैसे शिल्लक होते त्यामुळे त्याच्या जेलवारी नंतर थोडा निदान आठवडा भर तरी आराम करून तो कामाच्या शोधत निघणार होता.....कांबळे साहेबांनी एक दोन कॉन्टॅक्ट दिले होते तिथे त्याच्या कामाची गॅरंटी होतीच त्यामुळे विजय आठवडाभर तरी निर्धास्त होता.....दुसऱ्या दिवशी सकाळी जो विजय बाहेर निघाला तो पूर्ण शहर फिरून आला....वेगवेगळ्या जेवणावर त्याने ताव मारला मस्त सिनेमा वैगेरे बघून तो रात्री गोल्डन आपर्टमेंट मध्ये आला.....रात्री ह्या आपर्टमेंटमध्ये वातावरण काही औरच होत.....ड्रग्स,बाई,बाटली ह्यांचे मुख्य केंद्र हे आपर्टमेंट असायचं वाटेत दारू पिऊन पडलेले लोक,लाल निळ्या लाईटी,दारुड्या लोकांच्या मारामारी,शिवीगाळ करणारे गुन्हेगार कपडे खाली घेऊन खुनावणार्या वेश्या ह्यातून वाट काढत विजय आपल्या रूम मध्ये आला....व्हरांड्यात तोच गोंगाट सुरू होता सिगरेट चे धूर सगळं वातावरण अंधुक करत होते विजयने ते लोखंडी दार ढकलले तसे सगळे आवाज बंद झाले.....खोलीत कमालीची शांती होती....खोलीतल्या त्या अंधुक उजेडात तो आपल्या बेडरूम मध्ये आला आणि बेडवर आडवा झाला....सिलिंगवर जो काळा डाग होता तो कालपेक्षा अजून मोठा दिसत होता....एक मंद कुबट सडका वास त्यातून येत होता.....तो डाग घालवण्याचे सगळे प्रयत्न विजय करून बसला होता त्यामुळे त्या डागाकडे विजयने दुर्लक्ष केले दिवसभर इकडे तिकडे फिरता प्रवास केल्याने विजय कमालीचा थकला होता त्यामुळे बेड वर पडताच त्याला झोप लागली.....बाहेरून ते हसण्याखिदळण्याचे ओरडण्याचे मंद आवाज येत होतेच.....अचानक भिंतीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला विजय खडबडून जागा झाला.....ठक ठक असा आवाज येत होता कुणीतरी काहीतरी आवाज करत होत विजयला राग आला रात्रीचे 2 वाजले होते विजय दार उघडून बाहेर आला बाहेर तर कुणीच नव्हतं तरी तो ठक ठक असा आवाज येत होताच विजयने सगळं घर फिरून बघितलं पण तो आवाज कुठून येत आहे ह्याचा अंदाज विजयला येत नव्हता.....कदाचित तो आवाज बाजूला असलेल्या कॉल गर्लच्या घरातून येत असावा ह्या विचाराने विजयने भिंतीला कान लावले पण तो सततचा ठक ठक आवाज दुसरीकडूनच येत होता आता दुसऱ्यांदा हार मानून विजय परत बेडवर येऊन पडला....त्याची नजर वर गेली आणि त्याचे डोळे विस्फारले सिलिंगवर असलेला तो काळा डाग अचानक गायब झाला होता.....विजय ताडकन उठून बसला त्याने बेडरूममध्ये नजर फिरवली तर तो डाग कुठेच दिसत नव्हता.....शेवटी खूप विचार करून तर्क लावून अखेर त्याने मेंदूची कसरत थांबवली आणि तो झोपी गेला......सकाळी त्याला जाग आली सकाळचे जवळपास 10 वाजत आले होते....पण त्या बंकर स्वरूपाच्या खोलीत उजेड नव्हताच......काळ्या लोकांची अंधारी खोली होती ती.....विजय उठण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्या पायत हलक्याश्या मुंग्या जाणवू लागल्या....उठून तो अंघोळीला गेला अंघोळ करता करता परत त्याला दुसऱ्या धक्का बसला.....त्या सिलिंगवर जसा डाग होता तसाच डाग आता त्याच्या पायावर उमटला होता....विजय चपापला त्याने पाय रगडायला सुरवात केली कदाचित काहीतरी लागले असेल पण तो डाग काही हटत नव्हता.....कित्येकवेळा घासून झाले तरी तो डाग जागचा हलत नव्हता....विजय ताडकन दवाखान्यात गेला डॉक्टरांनी चेक करून इन्फेक्शन सांगून गोळ्या,मलम असे प्रथमोपचार केले तेव्हा कुठे विजय थोडा सामान्य झाला......परत त्याने काहीवेळ फेरफटका मारून बाहेर जेवून थोडा एन्जॉय करून रात्री गोल्डन आपर्टमेंटकडे पाय वळवले दिवसभर त्या डागाची सूद त्याला नव्हती पण जसा तो त्याच्या रूम मध्ये आला आणि दार लावले खोलीत येताच परत त्याचा तो पाय जडजड वाटू लागला.....पायात मुंग्या आल्यासारखं भासू लागलं विजयने खिशातील गोळ्या खाल्ल्या आणि त्या डागावर मलम फासले....मोठासा लेप लावून त्याला आता बरं वाटू लागलं.....विजय परत बेड वर आडवा झाला....तो सिलिंग वरचा डाग गायब झाला होता.....रात्री परत कसलातरी जोरदार आवाज झाला.....विजय खडबडून जागा झाला.....आता त्याला प्रचंड राग आला होता बाहेर जो कुणी असेल त्याला सोडायच नाही ह्या विचाराने तो उठणार इतक्यात त्याला कांबळे साहेबांची शिकवण आठवली परत तो शांत झाला त्याला घाम फुटला होता.....पाणी पिण्यासाठी तो उठायला निघाला पण त्याचा तो पाय जागचा हलेना त्याने घाबरून पायावरची चादर बाजूला केली.....त्याचा श्वास वाढला त्याचा पाय पूर्णपणे काळा झाला होता....सकाळी बारीक असलेला तो काळा डाग त्याच्या पूर्ण पायावर पसरला होता....विजयला अजिबात हलता येत नव्हते...खोलीत सगळीकडे कुबट सडका वास पसरला होता..तो काळा डाग हळूहळू वर सरकत होता विजयचे गुडघ्यापर्यंतचे शरीर काळे पडले होते सडत होते त्यातून आळ्या बाहेर पडून पूर्ण बेडभर पसरल्या होत्या....तो डाग हळूहळू विजयच्या छाती पर्यंत आला होता त्याच्या पोटात जाम दुखत होतं....त्या आळ्या त्याची आतडी आतून कुरतडत आहेत अस त्याला वाटत होतं.....प्रचंड वेदनेने विजय तडफडत होता....समोरच्या भिंतीवरचे पोपडे आकार बदलत होते.....विजयच्या अंगावर चढलेला डाग तसाच एक डाग भिंतीवर चढला होता.....तो डाग त्या मातकट भिंतीवर आकार घेत होता.....विजयचे छातीच्या खालचे सगळे शरीर जणू सडून मृतच झाले होते.....त्याचे फक्त मुंडकेच हलत होते....बेडवरच्या काही आळ्या त्याच्या नाकातोंडात जाऊन त्याला नरक यातना देत होत्या.....आपली मान फिरवून तो त्या आळ्या झटकत होता त्याची नजर समोर खिळली होती....त्या डागातून काही मजकूर त्या भिंतीवर उमटत होता....विजयच्या डोळ्यातुन वेदनेने पाणी येत होते दोन दिवसात त्याने खूप सारे अमानवी प्रकार इथे बघितले होते.....भिंतीवर त्या काळ्या डागातून काहीतरी मजकूर उमटत होता त्या नरक वेदनेतूनही विजय तो मजकूर वाचत होता....त्या मजकुराने पूर्ण भिंत रंगली होती तो उग्र वास तीव्र झाला होता अखेर तो डाग वर वर सरकू लागला आणि त्याने विजयला पूर्ण गिळून टाकले....त्याचे डोळे मिटले.....पूर्ण सडून त्याच्या हाडाचा सांगाडा बेडवर होता आपली ही अवस्था बघून तो जवळपास ओरडतच उठला.....त्याने आधी स्वतःला चाचपले.....तो अगदी ठीकठाक होता....भयानक स्वप्न होते ते.....विजयची छाती धडधड उडत होती....त्याने आपल्या पायाकडे बघितलं तो काळा डाग तेवढाच होता.....आपले सगळे विधी आवरून तो खुर्चीत बसला....रात्रीच्या स्वप्नात त्या काळ्या डागातून त्याने जो मजकूर वाचला होता त्यावर विचार करत करत तो रूम मधून बाहेर पडला आणि पायऱ्या चढून वरती 10 व्या मजल्याकडे जाऊ लागला.....10 व्या मजल्यावर जाण्याचे मुख्य द्वार एक मोठं कुलूप लावून बंद केलं होतं.....तो मजला 3,4 वर्षे पूर्णपणे बंदच होता अशी माहिती विजयने मॅनेजर कडून मिळवली होती.....कुलूप बघून विजयने आपल्या खिशातील एक स्टीलची पिन काढली विजयने आधीपासूनच सगळी तयारी केली होती त्याने त्या पिनचा आकडा करून ते कुलूप उघडलं.....ह्या कामात तो तरबेज होताच पण आताच्या कुलूप उघडण्याचा उद्देश तसा वाईट नव्हता.....विजय त्या मजल्यावर पोहोचला 10 व्या मजल्याच्या व्हरांड्यात सगळीकडे कचरा,धूळ आणि कोळ्यांची असंख्य जाळी वाढली होती त्यातून वाट काढत तो त्या रूम जवळ पोहोचला...ती रूम बरोबर त्याच्या रूम वरती होती.....एक दीर्घ श्वास घेऊन त्याने त्या खोलीचा दरवाजा उघडला आत शिरताच एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला .....असाच कुबट वास त्याच्या खोलीच्या डागातून येत होता आपल्या नाकावर हाताचा पंखा घेत विजय त्या रूमच्या बेडरूम जवळ पोहोचला ती बेडरूम बरोबर विजयच्या बेडरूमच्या वरती होती तिथले दृश्य बघून त्याला जराही आश्चर्य वाटलं नाही कारण इथे काय घडलं आहे हे त्याला माहीतच होते त्याने ते वाचले होते विजय समोरच दृश्य बघून सुन्न झाला आणि तावातावाने चालू लागला बाहेर पडताच तो एका फोन बूथ वर पोहोचला आणि त्याने तिथून फोन लावला
"हॅलो बॉबी भाई.....मी विजय बोलतोय.....हो हो तोच विजय तुम्हाला दोन दिवसांपूर्वी भेटलेला.....हा...हा बरोबर ओळखलं......काही नाही एक डील होती......म्हणजे माझ्याकडे थोडा माल आहे त्याच्यापासून मला सुटका हवी आहे......20 लाखाचे ड्रग्स आहे पण 5 लाखात देईन.....हो हो कडक आहे एकदम.....तुम्हाला फसवून कस चालेल भाई......नाही नाही.....मी नाही येऊ शकत......मला परत जेल मध्ये नाही जायचं......परफेक्ट तुम्ही पेमेंट घेऊन या......मी फक्त तुमच्या हातात माल देईन हा.....बाकी कुणावर विश्वास नाहीय माझा.....ठीक....ठीक आज रात्री 2 वाजता या......नाही नाही.....मला परत अडकायचे नाही....समजून घ्या......आणि तुम्ही सुध्दा कुणाला न कळू देता या.....ठीक"
रात्रीचे जेवण वैगेरे करून विजय रूम मध्ये आला.....बेड वर पडून शांत झोपी गेला....रात्रीच्या त्या ठक ठक आवाजाने त्याला जाग आली.....पण ह्यावेळी तो दचकला नाही कारण हा आवाज दारातून येत होता....विजय दाराजवळ पोहोचला आणि त्याने दार उघडले....तसा बॉबी धावतच घरात आला....विजयने दार लावले....विजय कडे बघत बॉबी म्हणाला
"म...म....माल कुठेय??"
विजय त्याच्याकडे बघत स्मितहास्य करू लागला....त्याने आपला हात पुढे केला त्याचा पुढे आलेला हात बघून शेक हॅन्ड करण्यासाठी बॉबीने हात पुढे केला....बॉबीचा हात घट्ट पकडून विजय म्हणाला
"फिल्मलाईन मध्ये काम देतो म्हणून त्या गरीब कावेरीवर अत्याचार करून तूच मारलं ना वरती??"
कावेरीचे नाव ऐकून बॉबी चपापला ते नाव त्याला कित्येक वर्षांनी आता आठवलं आणि हात सोडवून घेऊ लागला.....पण विजयची पकड मजबूत होती.....अचानक विजयच्या पायावरचा डाग हळूहळू सरकत सरकत विजयच्या हातावरून बॉबीच्या हातावर आला बॉबीच्या हातावर तो डाग येताच बॉबी जागेवर स्तब्ध झाला एखाद्या स्तब्ध पुतळ्या सारखा तो उभा होता विजयने आपला हात सोडवून घेतला
"तिच्यावर अत्याचार करून तिला तिथेच मारायला सोडून तू निघून आलास....तुला ती आठवते तरी का??.....नसेल कदाचित.....जा वरती आहे ती....भेटून ये तिला.....तुझी डील आता तिच्याबरोबर आहे "
बॉबीचे डोळे सताड उघडे होते.....तो काहीच न बोलता यांत्रिक पद्धतीने चालू लागला.....विजय त्याच्या मागे चालू लागला अखेर बॉबी आणि मागे चालणारा विजय 10 व्या मजल्यावर त्या खोलीत आले......बॉबी त्या बेडरूम मध्ये उभा होता.....बेडवर एक हाडाचा सांगाडा पडला होता....त्यावरचे स्त्री देहाचे कपडे सडून गळत चालले होते.....किड्या मुंग्यांनी खाल्लेला तो देह सडून खाक झाला होता त्याची काळी राख पूर्ण खोलीत पसरली होती त्या फरशीवर सगळीकडे काळे डाग पसरले होते तेच डाग खाली पाझरून विजयला आपली करुण कहाणी सांगून गेले होते.....विजयने बॉबीला तिथे आणले होते त्याचे काम झाले होते एका वेगळ्या समाधानाने विजय त्या बेडरूम मधून चालू लागला बॉबी अजूनही तिथेच स्तब्ध उभा होता कावेरीच्या देहाची जी राख झाली होती ती हळूहळू बॉबीच्या देहाभोवती जमू लागली.....विजयने त्या खोलीचे लोखंडी दार बंद केले गेटला कुलूप लावले आणि त्या गोल्डन आपर्टमेंटमधून तो समान घेऊन बाहेर पडला.........(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे
No comments:
Post a Comment