फ्लॅट- A real horror story ,bhutachi gosht -9 to 10
A real horror marathi story
A real horror marathi story
फ्लॅट...भाग ०9 - A real horror marathi story
फ्लॅट...भाग 10 - A real horror marathi story
आणि त्यांच्यामध्ये दुर्गा पण होती…
मला जाग आली तेव्हां वैभव मला उठवत होता… सगळे अचंबित चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते…
"काय झालं प्रीती?… तू पाणी आणायला वरती आली होतीस ना?… मं तू अशी झोपलीस का?… आणि तू जर झोपलीस तर आम्हांला दार कोणी उघडलं?…"
म्हणजे?… त्या!…"
"काय झालं सांग तुला?… बरं वाटत नाहीये का?… चक्कर येतीये का?… आपण डॉक्टरांकडे जाऊया का?…"
"माझ्या मते तुम्ही जरा सगळे शांत व्हाल का?… मला जरा प्रीतीशी बोलायचंय… प्रीती आपण तुमच्या बेडरूममध्ये जाऊन बोलूया का?… आणि पिल्लूलोग तो पर्यंत मी तुमच्यासाठी कॅडबरी आणली आहे ती एंजॉय करा…" (दुर्गा)
मी आणि दुर्गा आमच्या बेडरूममध्ये आलो…
"प्रिती… नक्की मला काय काय झालं ते सगळं सांगशील?…"
"मी आज वरती आले ना…"
नाही!… हे नाही… त्या दिवशी मला मठात भेटली होतीस त्याच्यानंतर काय काय झालं ते सगळं सांग…"
त्यानंतर मी प्रीतीला घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या… सासऱ्यांना दिसलेली ती चंदी, प्लंबर आणि सासऱ्यांना आलेला चंदीचा अनुभव, सासू-सासरे आमच्या घरी येऊन राहिल्यानंतर सुरळीत गेलेला आठवडा, सासू-सासरे गेलेल्या दुसऱ्याच दिवशी रात्री रुद्रला पाण्यात खेळताना दिसलेल ते बाळ, बाथरूम पासून बेडरूम पर्यंत उठलेले ते दोघांच्या पावलांचे ठसे, वैभवला बाल्कनीत त्या बाळाबरोबर उभी दिसलेली ती बाई, वैभव चं आजारी पडण, तन्मय आणि मला ऐकू येणारं बाळाचं रडणं, सासऱ्यांना कुणीतरी अंगाई गायलेल्या चा आलेला आवाज, नळातून पडणारं ते स्वच्छ पाणी पण सिंक भरून ओव्हरफ्लो होणारं ते हिरवट शेवाळी रंगाच पाणी, वैभव च्या मानेवर उमटलेले ते चार बोटांचे ठसे, मी पाणी घ्यायला वरती आलेले असताना मला दिसलेली चंदी आणि तिच बाळ, चंदीच मला धमकावणं, चंदीच्या तावडीतून मला माईंच सोडवणं, माईंनी मला गळ्यात घालायला दिलेली ती रुद्राक्षाची माळ, ह्या सर्वातून दुर्गा ची होणार असलेली मदत आणि हे सर्व फक्त दुर्गा ला सांगायचं अशी माईंनी दिलेली ताकीद आणि सर्वकाही मी दुर्गा ला सांगितलं…
मी बोलत असताना दुर्गा माझ्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे सगळं ऐकत होती… माझं पूर्ण बोलून झाल्यावर दुर्गाने पद्मासन घातलं आणि ध्यानाला बसतो तसं दुर्गाने ध्यान लावलं… अगदी दोनच मिनिटाच ध्यान लागल असेल तिचं आणि झटका लागावा तशी ती ध्यानातून बाहेर आली… तिच ध्यान लागलेल बघून असं वाटत होतं की ती समोर नाहीच ए, तिचं शरीर तिथेच होतं पण ती तेथे नव्हती हे कळत होतं…
"मला आता तुझ्याशी आणि वैभवशी थोडं बोलायचंय… आपण वैभवला पण आत बोलूया का?…"
वैभव ही आता बेडरुममध्ये आला होता… बेडरूमचे दार घट्ट लावून दुर्गा ने मला आणि वैभवला तिच्या समोर बसवलं…
"आता मी काय सांगते ते नीट ऐका… तुमच्या या घरात दोन निगेटिव शक्तींचा वावर आहे…"
"असं कसं म्हणू शकतेस तू?…"
वैभव चा हा प्रश्न कदाचित तिला अपेक्षितच होता कारण तिच्या चेहर्यावर एक मिश्किल हास्य होतं…
"पहिली तर गोष्ट… मी जे काही सांगतीये ते माझं पूर्ण सांगून होत नाही तोपर्यंत कोणीही मध्ये बोलू नका… माझं पूर्ण बोलून झालं की तुम्हाला जे प्रश्न विचारावेसे वाटतात ते विचारा… माझी आजी ही खूप मोठी स्वामी भक्त होती… तिच्यावर स्वामींचा अनुग्रह होता… का आणि कसा माहिती नाही पण हा स्वामी सेवेचा वारसा मला तिच्याकडूनच मिळालाय… मी या सगळ्या साठी पात्र आहे की नाही हे ही मला माहिती नाही… तुमची मदत करण्यासाठी माझी निवड का करण्यात आली याचे ही उत्तर माझ्याकडे नाही…"
"आपण हे आपल्या आजूबाजूला जे दृश्य जगं बघतोय त्याचबरोबरच आपल्या आजूबाजूला एक अदृश्य जगं ही वावरतय, ते आपल्या सामान्य मनुष्याच्या नजरेला पडत नाही पण ते असतं मात्र नक्की… ह्या जगात वावरणारे म्हणजेच ज्याला आपण भूत-पिशाच्च आणि वेगवेगळ्या नावाने ओळखतो ज्याला तुम्ही सायंटिफिक भाषेत नेगेटिव एनर्जी म्हणता… या प्रत्येक निगेटिव पॉवरचा एक एरिया ठरलेला असतो म्हणजेच त्यांची हद्द ठरलेली असते… या आपल्या हद्दीत येण्यासाठी ते सावज शोधत असतात… सावज आपल्या हद्दीत येण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारची लालूच दाखवतात… आणि एकदा का सावज त्यांच्या हद्दीत आलं की त्याच्यावर फक्त त्यांचाच अंमल चालतो… काय वाट्टेल ते झालं तरी ते त्याला सोडत नाहीत… आणि जर का त्यांच्या या हद्दीतला शिरकाव हा जर स्वतःहून केलेला असेल तर मग त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळं असतं… तुमच्या बाबतीत तेच झालय… तुमच्या घरात एकूण दोन निगेटिव शक्ती वावरतायत त्यांनी तुम्हाला बोललेलं नाहीये तुम्ही स्वतःहून त्यांच्या हद्दीत शिरकाव केलायत… आता फक्त ते तुमच्याशी खेळत आहेत, तुम्हाला घाबरवत आहेत… तुम्ही घाबरणे हीच त्यांची सगळ्यात मोठी शक्ती आहे… आपल्याला घाबरणाऱ्या माणसाला जसं आपण स्वतः घाबरवत राहतो, आपण मनुष्य असून आपल्यालाही हे कळतं मं ते तर पिशाच्च आहेत… तुमच्याबरोबर होणाऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हीटी मधून तुम्ही घाबरता ही त्याना मिळत असलेली शक्ती आहे… तुमच्या घरात वावरणारे चंदी आणि तिचं बाळ इथे कधीपासून आहेत?… ते का आले?… ते तुम्हाला का त्रास देत आहेत?… याचं आत्ता माझ्याकडे काहीही उत्तर नाही आत्ता मी एवढच करू शकते की यांचा तुम्हाला होणारा त्रास थोड्याफार प्रमाणात कमी करू शकते… चंदी आणि तिच बाळं अजूनही पिशाच्च योनीत का आहेत?… त्यांना मुक्ती का मिळाली नाही?… याची उत्तरं प्रीती तुला आणि मला मिळवून शोधायची आहेत आणि म्हणूनच कदाचित मला तुमच्या मदतीसाठी पाठवले असेल…"

दुर्गा ने तिच्या पर्समधून लाल पिवळ्या रंगाचे काही धागे काढले… असे धागे सहसा मंदिराच्या बाहेर वगैरे विकायला ठेवलेले असतात… तिने ते धागे तिच्या मुठीत पकडले आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटून त्यांच्यावर फुंकर मारली… वैभव कडे ते धागे देऊन घरातल्या सर्व व्यक्तींना बांधायला सांगितले… पण माझ्यासाठी त्यात धागा नव्हता…
"आणि मला धागा नाही?…"
"मी आहे नं तुझ्यासाठी…"
"म्हणजे?…"
"गंमत केली गं… मला ती माईंनी दिलेली माळ बघू जरा…"
ऋद्राक्षाची माईंनी दिलेली माळ मी दुर्गा च्या हातात दिली… तिने ती दोन मिनिटं हातात धरली आणि मला परत देत म्हणाली…
"जो पर्यंत ही रुद्राक्षाची माळ तुझ्या जवळ आहे तो पर्यंत तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही… इतकी पॉवर फुल माळ आहे ही… पण एक गोष्ट लक्षात ठेव… तुझ्या घरात वावरत असलेली ती निगेटिव्ह शक्ती ही माळ किंवा मी दिलेले धागे तुमच्या पासून लांब कसे होतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील… या गोष्टी तुमच्या शरीरापासून दूर होऊ देऊ नका… आता मी निघते उद्या सकाळी आपण दोघे बाहेर पडतोय चंदी आणि तिच्या बाळाचा इतिहास जाणून घ्यायला…"
"अग थांब पटकन चहा करते… पहिल्यांदा आलीस घरी आणि तुला साधं पाणीही विचारलेल नाहीये मी…"
"गैरसमज करून घेऊ नकोस प्रीती पण मी तुझ्या घरचे पाणीही पिऊ शकत नाही… एवढेच सांगेन की तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढायचं तर मला स्ट्राँग राहण गरजेच आहे… येते मी… आता सकाळी भेटू आपण आणि हो अजून एक गोष्ट… तुम्हाला बोलवण्यासाठी त्या निगेटिव्ह पॉवर कोणत्याही प्रकारच आमिष दाखवू शकतात… स्वामींवर विश्वास ठेवा ते सगळं करतील व्यवस्थित…"
दुर्गाच्या येऊन जाण्याने सगळ्यांच्याच मनात एक वेगळाच उत्साह आणि वेगळाच कॉन्फिडन्स तयार झाल्या सारखा दिसला… घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं… प्रत्येकाच्या मनात एक आत्मविश्वास होता की आता आपण लढू शकतो… रात्रीची जेवणं झाली आणि आम्ही कालच्या सारखेच न झोपता आमच्या बेडरूममध्येच सगळेजण झोपलो… मुलं आजी-आजोबा बेडवर आणि मी वैभव खाली गादी टाकून… त्या दिवशी रात्री आम्हाला काहीच जाणवलं नाही… सकाळी नॉर्मल उठलो… मुले शाळेला गेली… वैभवला आई-बाबांकडे थांबवून मी आणि दुर्गा निघालो… चंदीचा इतिहास शोधायला…
एकदा का डाव रचला की तो तुम्ही अर्धवट सोडू शकत नाही तो तुम्हाला पूर्ण खेळूनच संपवावा लागतो
क्रमशः………
फ्लॅट...भाग 10 - A real horror marathi story
एकदा का डाव रचला की तो तुम्ही अर्धवट सोडू शकत नाही तो तुम्हाला पूर्ण खेळूनच संपवावा लागतो...
सकाळी साधारण १० वाजता दुर्गा आली आणि आम्ही निघालो… रस्त्याने चालतांना दुर्गा शांत होती… तीच्या मनातलं नव्हत कळत, पण माझ्या मनात मात्र खूखूखूप प्रश्न होते… दुर्गा नक्की कोण असेल?… आपल्या मदतीला हिलाच का पाठवलं असेल?… सगळ्यांनां दिसणारी चंदी ही नक्की कोण?… तिचा नक्की भूतकाळ काय असेल?… तिच्या अंगावर झालेल्या जखमा आणि गळ्यावर असलेली चिर बघून कळत होतं की तिला कोणीतरी मारलं… तिचा खून झाला एवढं नक्की… तिचा ही आणि तिच्या बाळाचा ही… कुणी मारले असेल त्यांना?… का मारलं असेल?… आणि जर कोणी मारलं असेल तर त्याचा बदला ती आमच्यापासून का घेतीये?… कोण सांगू शकेल आपल्याला नक्की चंदी बद्दल?… नक्की कोणाकडे जावे लागेल की जो आपल्याला चंदीचा एक्झॅक्ट इतिहास सांगेल?…
"अग हो हो हो!… किती बोलशील?… मी इथे असताना तू तुझ्या मनात एवढी बडबड करतेस मं मी नसते तर अजून किती बडबड केली असतीस?… सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच तर बाहेर पडलो ना आपण?…"
"दुर्गा… तसं नाही गं!… पण… ए एक मिनिट!… तुला कसं कळलं मी काय विचार करतीये ते?…"
"अगं एवढ्या मोठ्याने बोलशील ना तर कोणालाही ऐकायला येईल…"
"दुर्गा म आता नक्की कुठे जायचं गं?… कोण आपल्याला त्यांच्याबद्दल सांगू शकेल?… मला वाटतं आपण आत्ता जिथे राहतो ना तिथलाच कोणीतरी जुना जाणकार शोधावा लागेल…"
"हो!… म्हणून मी कालच आईशी बोलले होते…"
"तू तुझ्या आईला सगळं सांगितलस?…"
"नाही गं!… पण तिने सांगितलं की आपल्याकडे येणाऱ्या पोस्टमन काकांना ती तिच्या कळत्या वयापासून बघत आलीये जेंव्हां हा एरिया सगळा ओसाड आणि गावरान होता ना तेव्हांपासून तेथे पत्र टाकायचं काम करतायत ईथे… त्यांना कदाचित माहिती असेल…"
"ठीक आहे… चालतंय… आपण तिथेच जाऊ आधी…"
आम्ही दोघे आमच्या एरियातल्या पोस्ट ऑफिस ला पोहोचलो… पोस्टात गेल्यावर कळलं ते जे पोस्टमन होते ज्यांच नाव पंढरी, ते सकाळीच पोस्टातून निघालेले होते… पोस्ट मास्तरांनी साधारण कुठल्या एरियात असतील याचा अंदाज दिला आणि आम्ही निघालो… पोस्टमन काका ना शोधत शोधत आम्ही तिथल्याच एका एरियातल्या शंकराच्या मंदिरा पर्यंत पोहोचलो… बघितलं तर ते पोस्टमन काका की आजोबा… हो!… कारण एकंदरीत त्यांच्या वयावरून त्यांना काका म्हणायचं का आजोबा म्हणायचं हा मला तरी प्रश्न पडलाच होता… मनात ठरवून टाकलं की त्यांना आजोबा म्हणायचं… जन्मतारखेच्या दाखल्या अभावी एवढं वय होऊन सुद्धा ते पोस्टात कामाला होते अस दिसत होतं…
"तिकडे ते बसलेत ना!… तेच पोस्टमन काका… आणि हो आपण त्यांना नाना म्हणणार आहोत कारण लहानपणापासून मी त्यांना तेच म्हणत आलीये…"
च्यामारी हिला सगळं कसं काय कळतं असा विचार करतच आम्ही त्या पोस्टमन नानां जवळ पोहोचलो…
”अरे वा वा वा वा वा!… दुर्गाबाई चक्क तुम्ही?… आणि इथं?…"
"काय ओ नाना तुम्ही परत मला दुर्गाबाई म्हणालात… म मी पण तुम्हाला पोस्टमन काका म्हणून आवाज देईन हं नाना वगैरे काही म्हणणार नाही…"
"नको ग पोरी!… नानाच म्हण… तुझ्या तोंडून नाना म्हणून घ्यायला छान वाटतं… बोल काय काम काढलसं…"
"नाना तुमच्याशी थोडं आम्हाला खाजगीत बोलायचंय…"
"ये चल देवळात बसू आणि बरोबर कोणाला आणलयस?… बाई कुठलं पत्रबित्र हरवल असेल तर आत्ताच सांग?… एकतर आजकाल काय डोक्यात राहत नाही उद्या शोधून आणून देतो…"
"नाही ओ नाना… पत्रबित्र काही हरवलेलं नाही… पण आम्हाला काही विचारायचय… एका व्यक्तीबद्दल माहिती हवी आहे…"
"कोणाबद्दल?…"
"नाना तुम्ही या एरियात चंदी नावाच्या कुठल्या बाईला ओळखत होतात?…"
"काय नाव म्हणालीस?…"
"चंदी!… चंदी!…"
नाना चंदीचं नाव आठवत होते… नानांना नाव आठवलं ही आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला..
"नाही मी कुठल्या चंदिला ओळखत नाही… दुपार झाली आहे तुम्ही पण आता घरी जा… आणि असे दुपारच भटकत जाऊ नका कुठे पण… चला निघा!…"
"नाना नक्की काय झालं?… तुम्ही लपवताय आमच्यापासून काहीतरी?… मला सांगा ना?…"
"सांगितलं ना पोरी एकदा?… कळत नाही का तुला?… चंदी आणि तिच्या पोरा बद्दल मला काहीच माहिती नाही…"
"नाना आता तर तुम्ही लपऊच नकात आमच्यापासून…"
"का?… काय झालं?…"
"मी तुम्हाला फक्त चंदी बद्दल विचारलं?… तिच्या बाळाबद्दल नाही?… याचा अर्थ तुम्हाला नक्कीच खूप काहीतरी माहिती आहे नाना…"
"नाही!… नाही!… मला काही माहिती नाही आणि तुला ही काही न कळलेलच बरं… आणि तुला कशाला हवीये ती चंदी आणि तिचं बाळ… आई-बाबांना माहितीये का हे सगळं?… शहाणी असशील तर या सगळ्या पासून लांब रहा… बाळा ऐक या म्हाताऱ्याचं… हे केस उगीच नाही काळ्याचे पांढरे झाले… त्या चंदीन आतापर्यंत लई लोकांच वाटोळं केलंय, तिच्या पायात किती लोकांनी जीव गमावले, किती जणांचे संसार उध्वस्त झाले आणि कितीतरी लोकांचे संसार तिने जीवानिशी संपवलेत…"
"नाना आणि आता ती माझ्या संसारावर उठली आहे…"
"म्हणजे?…"
"म्हणजे नाना… ती आता आमच्या सगळ्यांच्या जीवावर उठली आहे…"
"मला तुम्ही नीट काही सांगा बाबा… काही कळत नाही तुमचं…"
दुर्गा ने माझ्याबद्दल नानांना थोडक्यात सर्व काही सांगितलं… पण फक्त मला होणाऱ्या त्रासाबद्दल आणि ती माझी एक चांगली मैत्रीण म्हणून मला मदत करतेय एवढेच कारण तिने नानांना दिलं… माझी एकंदरीत सर्व राम काहाणी ऐकल्यावर नानांच्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की त्या म्हातार्याला पण ती गोष्ट खूप लागली होती की मला त्रास होतोय… सगळं ऐकून झाल्यावर का कोण जाणे नानां जागेवरून उठले शंकराला नमस्कार केला आणि परत आमच्या समोर येऊन बसले…
"पोरी तू अडचणीत आहेस म्हणून फक्त तुझी मदत करतोय पण शहाणे असाल तर कुठल्या बाबा भगताला दाखवा आणि तिथून बाहेर पडा…"
”नाना मला चंदी बद्दल सगळं ऐकायचं…”
"सांगतो!… सगळं सांगतो!…"
""ही गोष्ट साधारण एक पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वीची असेल… माझ्या आईच्या अचानक मृत्यूमुळे मला माझ्या मामाकडे या गावात यावं लागलं… गाव तसं खूप छान होतं… सर्जेराव पाटील हे या गावातलं बडं प्रस्थ होतं… शेती, जमीन जुमला, गाई म्हशी, दूध दुभतं आणि त्यामुळे येणारी श्रीमंती असं सगळं एकदम भरलेलं घर… पाटलांना गावात इज्जतही तशीच होती… पाटील देव माणूस होता… गावातलं असे एक घर शिल्लक नव्हतं त्या वेळेला, की पाटलाने कुठल्या घराच भलं केलं नसेल… पाटलाचे गावकऱ्यांवर एवढे उपकार होते की घरात काम करायला पाटलाला कधी घरगडी ठेवायची गरजच पडली नाही… अख्खा गावं पाटलाच्या घरात राबायला यायचां आणि तेही पाटील नको नको म्हणत असताना… अख्खं गाव पाटलांच देणं लागत होतं जणू काही… पाटलाला एकुलता एक मुलगा होता त्याचं नाव आबा पाटील… सर्जेरावांचा एकुलता एक मुलगा म्हणून जसे आबा पाटलांचे घरात लाड होत् होते तसेच गावकऱ्यांकडून ही होत् होते आबा पाटील एक चांगलं व्यक्तिमत्त्व होतं… पण ते काय म्हणतात ना जनरेशन गॅप की काय तसं बाप आणि पोरात होतं… आबा पाटील त्यावेळेच्या प्रगत विचारांचा आणि सर्जेराव पाटील हे थोडेसे जुन्या खायालांचे… सर्जेराव पाटलांनी गावावर जे उपकार केले त्याचा कधी मोबदला गावकऱ्यांकडून मागितला नाही… पण आबा पाटलाचं म्हणणं, आपण गावावर उपकार करतोच आहोत तर आपण त्याना सावकारा प्रमाणे नको लुटूया पण थोडाफार मोबदला आपणही कमावला तर काय हरकत आहे?… आबा पाटलाला बाप दादाकडून आलेल्या जमीन जुमल्यावर आणि पैसा अडक्यात काही रस नव्हता… त्यातल्या त्यात पोरगं थोडं शहरात शिकून आलेलं… शहरात शिकून आल्यामुळे थोडीफार त्याला व्यसनं पण होतीच… मनाने चांगला असणाऱ्या माणसाला व्यसनं नसतात असं थोडी ना असतं?… आबा पाटलाला थोडाफार दारूचा नाद होता, बाईचा नाद होता आणि भविष्य सांगणार्या बुवा बाबांचा नाद होता… कोणीतरी आपलं भूत-भविष्य आणि वर्तमान सांगणारं वाईट नसतं… पण आबा पाटलाचा हा नाद सात्विक नव्हता… स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवायचं स्वतःचं असं कर्तुत्व करून दाखवायचं आणि कमी वयात फार मोठं नाव कमवायचं या नादात त्याने चुकीच्या माणसांकडे आणि अघोरी शक्तींच्या आहारी जायला लागला… सर्जेराव पाटलांना ही सगळं कळत होतं पण आपला पोरगा मनाने चांगला आहे त्याच्यामुळे ते कोणाचं वाईट करणार नाही म्हणून ते पण त्याच्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्षच करत होते…"
"आबा पाटलाचं लग्न झालेलं होतं… आबा पाटलाच्या बायकोच माहेर हे कुठेतरी मुळशी-पौड त्या साईडला होतं… ती पण लोकं खानदानी होती… आबा पाटलाच्या बायकोला अख्ख गाव अक्कासाहेब म्हणायचं… अक्कासाहेब ही खूप सोज्वळ गुणी श्रद्धाळू घरंदाज स्त्री होती… तिच्या प्रेमळ स्वभावा समोर सगळेच नरमाईने घेत असत… आबा पाटील आणि अक्कासाहेब यांना एक मुलगी होती… नंदिनी… मी गावात आलो होतो त्या वेळेला ती साधारण माझ्याच वयाची असेल… साधारण एक दहा-बारा वर्षाची… मुळशी पौड बाजूच्या असलेल्या जमिनीच्या व्यवहारांसाठी आबा पाटलांच वरचेवर तिथे जाणयेणं होत् होतं… सहाजिकच सासुरवाडी जवळ असल्याकारणाने आबा पाटील तिथेही चक्कर मारत… आबा पाटला सारखा तरणाबांड गडी ज्या वेळेला त्यांच्या फटफटीवरून गावात नं निघायचा त्यावेळेला रस्त्यात एकही बाई अशी मिळणार नाही की जिने आबा पाटलाकडे कधी वळून बघितलं नाही आणि त्याचाच थोडा फार गर्व आबा पाटीलाला होता… पण आबा पाटील चोखंदळ माणूस… समोर आलेली प्रत्येक बाई त्यांन अंगाखाली घेतली नाही… त्याच्यामुळे त्याच्या या व्यसनाचा कोणाला जास्ती त्रासही झाला नाही… त्याला आवडणाऱ्या एखाद्या बाई बद्दल तो मनात इच्छा ठेवायचा पण कधी त्याने त्या बाईवर जबरदस्ती केली नाही… पण त्याची इमेज त्याचं रूप एवढे छान होतं की ती बाई स्वतःहून तयार व्हायची…"
"आबा पाटील सासुरवाडीला गेल्यावर एक-दोन दिवस मुक्काम करूनच परत यायचा कारण परत महिनाभर त्याचं कधी जाणं व्हायचं नाही… शेतातला सगळा हिशोब संपवूनच तो परत यायचा… आणि तिथेच त्याच्या सासुरवाडीत त्याची ओळख चंदीशी झाली…" "दुपारची कामं उरकून एकदा आबा पाटील त्याच्या सासुरवाडीत आला… सासऱ्यांनी आगत-स्वागत करून त्याला बसायला सांगितलं आणि जेवणाची तयारी करण्यासाठी म्हणून आत निरोप द्यायला गेले… तेवढ्यात आबा पाटलाला तांब्या भरून पाणी आणून दिलं गेलं… रणरणत्या उन्हातनं आल्यामुळे आबा पाटलाला तशी ही तहान भरपूर लागली होती… त्याने झटक्यात ते पाणी प्यायला आणि आबा पाटलाला ठसका लागला…"

"दाजी जरा दमानं घ्या की… असं हातघाई वर येऊन काहून पाणी पितायसा?… तुम्ही घरातलं जावई मानूस… तुमच्या जीवावर बेतलं तर आमच्या नोकरदार मानसाचा जीव जायचा…"
इतक्या गोड आवाजात कोण बोललं म्हणून आबा पाटलांनी झटकन मागे वळून बघितलं आणि आबा पाटील पहिल्या नजरेतच घायाळ झाला… आबा पाटलाच्या समोर साधारण एक वीस बावीस वर्षांची तरुण देखणी मुलगी उभी होती… चापूनचोपून नेसलेली तीची नऊवारी साडी चंदीच्या शरीरावरचा प्रत्येक उंचवटा अगदी उठावदार पणे दाखवत होती… काळी सावळी असली तरी दिसायला खूप सुंदर आणि गोड होती चंदी… आबा पाटलाच्या हातातला तांब्या घेऊन चंदी तिथून निघून गेली… जातानाचा मागून दिसणारा तिचा तो कमनीय बांधा आणि तिचं ते दिसलेलं रूप याने आबा पाटील घायाळ झाला… खूप दिवसांनी आबा पाटलाला जवानीने मुसमुसलेल हे पाखरू मनात भरलं होतं… कुठेतरी चंदीच्या मनालाही हा तरणाबांड आबा पाटील आवडला होता…"
"आणि नकळत आबा पाटलाचं सासुरवाडीत येणं-जाणं वाढलं… जावई माणूस म्हंटल्यावर आबा पाटलाच्या येण्याजाण्यावर तशी कोणी शंका घेतली नाही… आबा पाटलांनी चंदीची माहिती काढली त्यावेळेला त्याच्या असे लक्षात आले की ही अनाथ पोरगी आहे… सासुरवाडीत काम करणाऱ्या कुठल्या तरी गड्या ची मुलगी पण आईबाप गेल्यामुळे तिचा सांभाळ या लोकांनी केला… ज्या ज्या वेळी आबा पाटील सासुरवाडीला यायचा त्या-त्यावेळी नकळत चंदी आबा पाटलाची काळजी घ्यायला लागली… घरातल्या गडी माणसाने केलेली सेवा म्हणून कोणाला शंकाही आली नाही… हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढलं आणि प्रत्येक प्रेमाचा अंत जसा शरीर सुख या विषयावर येऊन संपतो तसाच हा ही संपला…"
"आबा पाटलाच्या मनात चंदी बद्दल प्रेम वगैरे काही नव्हतं… त्याला फक्त ती वापरूनच सोडायची होती… पण चांदीने मात्र आपल फक्त शरिरच नाही तर मन आबा पाटलाला दिलेलं होतं… जन्मभर अनाथ असलेल्या मुलीला आबा पाटलाकडे मिळालेलं सुख, त्याने घेतलेली काळजी, त्याने केलेलं प्रेम, यामुळे सनाथ झाल्या सारखं वाटलं… ती पोर सुखावली होती… आपल्याला या जगात कोणीच नाही याचा तिला विसर पडला होता… सासुरवाडीत असल्यामुळे चंदी बरोबर तशी मजा मस्ती करायला आबा पाटलाला मिळत नव्हती… चंदी बरोबर मजा करता यावी म्हणून आबा पाटलांनी आपल्या तिथल्याच एका जमिनीच्या तुकड्यावर छोटंस एक बंगाली वजा घर बांधलं… आपल्या मर्जीतल्या एका कुटुंबाला त्या घरावर राखण्यासाठी म्हणून ठेवून चंदी ला ही कोणीतरी विश्वासाचं माणूस असावं शेतावर असा अक्का साहेबांना शब्द टाकून त्या शेतावरच्या घरावर बोलावून घेतलं… लहानपणापासून चंदी ला बघितल्याने आणि चंदीवर विश्वास असल्यामुळे अक्का साहेबांना पण त्याच्यात काही वावगं वाटलं नाही… शेतावर ठेवलेला कुटुंब हे आबा पाटलाच्या मर्जीतल असल्यामुळे त्यांनी कोणाकडे चंदी बद्दल काय बोलायचा संबंधच नव्हता… आता मात्र आबा पाटलाचं शेतावरच्या बंगल्यावर येणं जाणं खूप वाढलं… आबा पाटलांनी आपले कुठलेच शारीरिक संबंध जास्ती काळ टिकवले नाहीत… पण चंदी बरोबर तो एवढा का रमला याचं कारण आबा पाटलाला ही माहिती नव्हतं… शेतात बांधलेल्या बंगलीत आता दिवस-रात्र फक्त शरीर सुखाचे चित्कार घुमत होते, आणि जे घडायचं नव्हतं ते घडलं… आबा पाटला पासून चंदी ला दिवस गेले…"
"चंदी साठी ही खूप छान बातमी होती… आपल्याला दिवस गेलेत त्याच्यामुळे ती एकदम मोहरून गेली होती… कधी एकदा आबा पाटील येतात आणि मी त्यांना ही गोड बातमी सांगते असं तिला झालं होतं… त्या दिवशी रात्री आबा पाटील आले थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आबा पाटील जसा चंदीच्या शरीराला झोंबूलागला तसा चंदीने त्याला अडवलं… आडवण्याचं कारण विचारताच चंदीनं आपल्याला दिवस गेले ते सांगितलं… चंदीची अपेक्षा होती की आबा पाटील खुश होईल, पण झालं भलतंच… आबा पाटलांनी चंदीच्या सणसणीत एक कानाखाली वाजवली आणि तिलाच विचारलं की हे बाळ कोणाचं ए ते? चंदीच्या डोक्यावर जसं आभाळच कोसळलं… ज्याच्याशी ती एकनिष्ठ राहिली होती तोच तिचा प्रियकर तिच्या बाळाचा बाप कोण? हे विचारत होता… आबा पाटीलही रागाच्या भरात तडक तिथून निघून गेला… चंदी कडे ही आसवं गाळण्या शिवाय काही शिल्लक राहिल नव्हतं… आबा पाटील असे का वागले याचं उत्तर कदाचित ती स्वतःला विचारत होती… इथे आबा पाटील घरी तर निघाला होता पण शरीरसुखाच्या हव्यासापोटी आपण काय करून बसलो याचा त्याला पछतावा होत होता… आता या पोटुशी राहिलेल्या चंदीच नक्की काय करायचं? शेती पासून सासुरवाडी काय फार लांब नव्हती… आपणच चंदी ला तिथे घेऊन गेलो होतो… तिने जाऊन जर सासरी बोंबाबोंब केली तर आबा पाटलाला स्वतःच्या इज्जतीची रिस्क घेऊन चालणार नव्हतं… आबा पाटलांनी तशीच गाडी वळवली… हे प्रकरण प्रेमाने हातावेगळं करणं गरजेच होतं, जोर जबरदस्ती करून अंगलट आलं असतं…
"आबा पाटील परत शेतावरच्या बंगली वर आला त्याने शेतावरच्या गड्याला मस्त कोंबडा कापायला सांगितलां… आबा पाटील एवढा खुशीत परत आलेला बघून चंदिला हायसं वाटलं…

"मला माफ कर चंदे… काहीही झालं तरी मी एक लग्न झालेला पुरुष आहे… आणि आपल्या मध्ये जे चालू आहे ते अनैतिक ए हे तुलाही माहिती ए आणि मलाही… पण मी फक्त तुझ्या शरीरावर प्रेम केलं नाही गं… माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे… खूप खुश आहे मी तू पोटुशी आहेस ते ऐकून… आपल्या मुलाला नक्की जन्म देऊ आपण…"
असे धादांत खोटे बोलून त्यांनी चांदीची तात्पुरती वेळ मारून नेली…
"माझा बी तुमच्यावर लय जीव हाए…" असं म्हणत चंदी आबा पाटलाच्या कुशीत शिरली…
चंदिला पुरता शांत करून आबा पाटील परत गावात आला खरा… पण आता त्याला लवकरात लवकर चंदी हा विषयही संपवायचा होता… चंदीला जिवे मारून तिला हातावेगळं करावं अशा विचारांचा आबा पाटील नव्हता… गोडीगुलाबीतच तिला त्याला हातावेगळं करायचं होतं… पण कसं याचा मार्ग त्याला काही मिळत नव्हता आणि एक दिवस त्याला असा मार्ग मिळाला ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता…
गावा जवळ असलेल्या शेत जमिनीतून भरपूर उत्पन्न मिळावे, जमिनीचा कस वाढावा आणि आजूबाजूचे शेतकरी घेतात त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळे उत्पन्न घेऊन दाखवाव आणि त्यातून भरपूर फायदा व्हावा याकरता आबा पाटलांनी त्या जमिनीवर खूप मेहनत घेतली होती… पण आजूबाजूच्या एरियात पाणी असं कुठे लागतच नव्हतं… त्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या पाणक्यांना बरोबर घेऊन पाण्याच्या शोधात विहीर खाणायचा प्रयत्न केला होता… पण प्रत्येक वेळेला विहीर खणायला गेल्यावर त्याच्या नशिबात अपयशच येत होतं पाणी कुठेच लागत नव्हतं… आणि अशातच बाजूच्या गावाच्या स्मशानात आठवड्याभरापासून एक आघोरी बाबा येऊन राहतोय अशी त्याला खबर मिळाली… त्याला ही खबर मिळताच पाटील पिसाळल्या सारखा त्या बाबा च्या शोधात निघाला… जाताना बाबासाठी भरपूर मांस आणि फळ घेऊन तो बाबाच्या स्मशानातल्या झोपडी जवळ पोहोचला… आणलेलं मांस आणि ती फळ बाबाच्या झोपड्या समोर ठेवून त्या बाबाला विनंती केली…

"महाराज मी आबा पाटील… तुम्हाला भेटायची इच्छा आहे… दर्शन घडलं तर उपकार होतील…"
असं म्हणून आबा पाटील हात जोडून नतमस्तक झालाच होता की त्या फळांच्या टोकरी ला कोणीतरी जोरात लाथ मारली आणि आवाज आला…
"चल निकल हरामखोर!... शेतातल्या बाईला घाल खायला!… चल निघ!…"
"महाराज खूप आशेने आलोय मी तुमच्याकडे…"
भडव्या मी काय ईथे तुझी सेवा करायला बसलोय का?… मी माझ्या कामासाठी इथे आलोय… तुझ्या नाही…"
आबा पाटील जाण्यासाठी म्हणून वळलाच होता की बाबांनी त्याला परत आवाज दिला…
"रुक जा!… दो दिन बाद अमावस है।… रात्री बकर शिजऊन आण आणि भात… माझ्यासाठी आणलेलं बकर कोणी खाणार नाही याची काळजी घे नाहीतर जीवानिशी जाईल तो आणि नंतर तू ही…
असं म्हणून तो बाबा परत झोपडीत निघून गेला… शेतावरच्या चंदी बद्दल बाबाने अचूक सांगितलं म्हंटल्यावर आबा पाटील तर येडाच झाला… आता त्याला बाबा वर पूर्ण विश्वास वाटत होता… पण तो स्मशानात आलेला बाबा हा अघोरी सिद्धी प्राप्त करण्यासाठी आला होता… त्याच्याकडे असलेल्या तोडक्या-मोडक्या ज्ञानावर त्याने आबा पाटलाचं थोडाफार भूत-भविष्य जाणलं आणि आबा पाटलाला खिशात टाकला… आता आबा पाटील आणि तो बाबा दोघेही अमावस्ये ची वाट बघत होते… अमावस्येच्या रात्री आबा पाटील बाबा साठी एक बकर कापून ते शिजवून टोपलं भर भात घेऊन गेला… परवा दिवशी आबा पाटलाच्या अंगावर खेकसणारा तो बाबा, आबा पाटलाच्या हातातंल बकर्याचं कालवण आणि भात बघून त्याच्याशी एकदम प्रेमानं बोलायला लागला… आबा पाटलांच्या ही लक्षात आलं की बकरं आणि भात बघून बाबा विरघळला… रात्री बाराच्या सुमाराला बाबाच्या झोपड्यात असलेल्या कुठल्यातरी देवीच्या मूर्तीसमोर ते मटण आणि भात ठेवून बाबा ने मुर्तीला नैवेद्य दाखवला आणि स्वतःही जेवायला बसला… स्वतःसाठी आणलेले ते मटण आणि तो भात बाबाने एकट्याने संपवला… जेवताना मध्ये मध्ये बाजूला असलेल्या कवटीत नं तो दारू पीत होता… भरपूर दारू पिऊन आणि पोटभर जेवून बाबा एकदम सुस्त झाला… आबा पाटील तिथेच कोपर्यात हात जोडून बसला होता… पिण्याचा आणि जेवणाचा प्रोग्राम उरकल्यावर आबा पाटलाला घेऊन तो बाहेर जळत असलेल्या एका चितेच्या उबेला जाऊन बसला…
"बोला पाटील काय सेवा करू?…"
कालपर्यंत शिव्या घालणारा हा महाराज आज एकदम एवढा गोडीत का आला हे आबा पाटलाला कळलं नाही त्याला वाटलं आपण दिलेलं बकरं आणि भात यावर खुश होऊन महाराज आपल्याशी प्रेमाने बोलतात…
"काय नाही महाराज, काम होतं थोडं तुमच्याकडे…"
"सांगा ना पाटील… आजच्या दिवशी तुम्ही म्हणाल ते…" पण बाबाच्या मनात जो वेगळाच खेळ चालू होता त्याचा अंदाज पाटलाला नव्हता…
"महाराज माझी गावा जवळ जमीन आहे… काहीतरी शेतीत नवीन करायचं म्हणून मी प्रयत्न करतोय…" त्याला मध्येच तोडत बाबा बोलला…
"आता पाणी लागत नाहीये त्याला तुम्ही तरी काय करणार पाटील?…"
"अगदी मनातले ओळखलंत महाराज… मला त्याच्यावर उपाय पाहिजे म्हणून आलो होतो तुमच्याकडे…"
"काय ना पाटील!… मी काय देव धर्म करणारा माणूस नाही आम्ही पडलो स्मशानात वावरणारे… प्रेतं भूतपिशाच्च यांच्या बरोबर आम्ही जगतो…"
"महाराज काही करून थोडी धंद्याची शेतीची भरभराट होऊ दे…"
"आम्हाला काय मिळणार या सगळ्यातून?…"
"तुम्ही म्हणाल ते देतो महाराज… माझ्याकडे शेकडो एकर ची जमीन ए… त्यातला एखादा तुकडा तुमच्या नावावर करून टाकू…"
"पाटील अघोरी समजलात का भिकारी?… मला काय करायचंय तुमच्या त्या पैशाच आणि जमिनीचं?…"
"मं तुम्ही सांगा महाराज?… काही देऊ मी तुम्हाला?…"
"बघा हं पाटील!… नंतर परत शब्द फिरवाल…"
"महाराज पाटलाची जबान ए… दिला शब्द!… तुम्ही मागाल ते!…"
"पाटील आम्हाला कळलं… तुम्ही ते शेतात बाई ठेवली आणि तुमची मजा मस्ती करून झाल्यावर आता ती बाई पोटुशी ए आता…"
"होय महाराज… तुम्हाला सगळं माहिती आहे की…"
"पाटील… शरीरसुखासाठी बाई ठेवलीत शेतावर… आता ती पोटूशी ए तुमच्यापासून, ही खबर गावभर पसरली तर काय बोभाटा होईल माहितीये का?…"
"महाराज… ते ही डोक्याला दुखणच आहे बघा तीला कशी घालवायची काही कळना झालय… आता चार महिन्याची पोटूशी झाली ए ती…"
"म्हणजे अजून पाच महिन्यांनी नाव देणार तर तुम्ही तिच्या पोराला…"
"काय शेण खायला लावता का महाराज?…"
"आहो ते तर तुम्ही खाल्लंच ए…"
"तिचं एक काय करायचं मला काही कळत नाही महाराज?…"
"पाटील… तुम्ही म्हणत असाल तर माझ्याकडे एक उपाय आहे… ज्याने तुमचा शेतीचा अडकलेला प्रश्न सुटेल, ती बाई पण तुमच्या रस्त्यातून दूर होईल आणि थोडीफार माझी पण दक्षिणा देऊन टाकाल… काय?…"
"नाही समजलो महाराज?…"
" म्हणजे असं बघा पाटील तुम्हाला शेतात पाणी लागलं पाहिजे, शेतातल्या बाईपासून आणि तिच्या होणाऱ्या बाळा पासून सुटका पाहिजे आणि मी काहीतर स्मशानात सुट्टीसाठी आलो नाही हो मला पण काहीतरी पाहिजे
"महाराज जे आहे ते स्पष्ट बोला…"
"तुमच्या शेतातल्या जमिनीच्या विहिरीला पाणी लागावे म्हणून आपल्याला एक बळी द्यावा लागेल आणि मला माझी सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक बळी द्यावा लागेल आणि या दोन्ही कामाकरता लागणारे बळी तुमच्याकडे आहेत आणि जर ते बळी दिले तर तुमचा दुसरा प्रश्न ही निकालात निघणार आहे…
"म्हणजे?… महाराज जीव घ्यायचा?… महाराज तिचा जीव घेऊन शांत करायची असती तर केव्हाच केली असती… जमणार नाही कोणाचा जीव घेणं… येतो मी…"
"ठीक आहे पाटील, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा… आज ती एक प्रेयसी आहे म्हणून हे सगळं सहन करतीये… पण ज्या वेळेला ती आई बनेलं त्यावेळेला ती पहिले फक्त त्या मुलाचा विचार करेल आणि जर त्या वेळेला तिच्या मुलासाठी च्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तिच्या मुलासाठी ती तुमची समाजातील इज्जत सगळं धुळीला मिळवेल… त्यावेळी तुम्ही काहीही करू शकणार नाही तुमच्याकडे जे काय करायचं त्याला वेळ आत्ताच आहे…"
आबा पाटलांनी स्मशानातून गाडी काढली… तो थेट शेतावरच्या बंगल्यावर गेला… रस्त्यात जाताना त्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त चंदी आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा विचार होता… तसं बघायला गेलं तर पाटलांनी कधी चंदीवर प्रेम केलं नाही… पण आज त्या मांत्रिकाच्या गोष्टी ऐकून आबा पाटलांना चंदीची खूप काळजी वाटायला लागली… एकीकडे आबा पाटलाला आपली समाजातली इज्जत प्यारी होती पण त्याला चंदिला पण सोडायचं नव्हतं… चंदी सहजासहजी त्याच्या आयुष्यातून गेलेली त्याला हवीच होती… पण म्हणून तिचा आणि तिच्या बाळाचा जीवघेणं त्याला मान्य नव्हतं… बंगल्यावर पोहोचल्या पोहोचल्या पाटलांनी पहिलं काम काय केलं असेल तर चंदी ला आपल्या मिठीत घेऊन ते बराच वेळ बसले होते… चंदिला ही आज पाटलांच वागणं थोडंसं वेगळं वाटत होतं… पाटलाला मिठीतली चंदी हवी होती पण तिच्या पोटात वाढत असलेला तो जीव नको होतां… नकळत का असेना पाटील चंदी वर प्रेम करायला लागला होता… त्या वेळचा समाज, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या चालीरीती यात कोणीही त्या बाळाला स्विकारलं नसतं… आणि लाडका असला तरी सर्जेराव यांची भीती होतीच पाटलांना… आपण बाहेर लफडी करतो याबाबत आपल्या वडिलांना माहिती आहे हे आबा पाटलाला माहिती होतं पण म्हणून शेतावर बंगला बांधून तिथे बाई ठेवणं हे त्यांनी कधीच मान्य केला नसतं…
विचार करता करता, चंदिला कुशीत घेऊन त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही… कोणत्यातरी विचारांनी त्याला पटकन जाग आली, चंदिला अलगद तिथेच बेडवर झोपवून पाटलांनी आपल्या फटफटीला किक मारली आणि निघाले…
पाटील काहितरी विचार करून निघाला होता… परत त्याच स्मशानात… त्या अघोरी बाबाला भेटायला…
क्रमशः………
No comments:
Post a Comment