आमच्या सोबत घडलेली ही घटना कितपत खरी आहे,,, हे तुम्हीच ठरवा...
चकवा
१५ जून २०१८ रोजी घडलेली ही घटना .... वेळ संध्याकाळची पावणे सात वाजले असतील,,, रिमझिम पडणारा पाऊस... सुमो गाडीतून आम्ही अकरा जण सुक्रेवाडीला चाललो होतो.... बदलापूर पासून सुक्रेवाडीला जाण्यासाठी साडे तीन ते चार तास लागतात आणि शक्य होईल तितक्या लवकर आम्हांला तिथे पोहचायच होतं..१५-२० मिनिटांनी नानांचे(बाबा) फोन येतच होते... ते एकच बोलायचे, कुठे आहेत तुम्ही? लवकर या... आम्हांला पण पोहचण्याची घाई होतीच... त्या मागे कारणही तसंच होतं...मी,, माझ्या दोन लहान बहिणी आणि भाऊ घरी होतो,, बाकी सगळे गावी होते... त्या दिवशी दुपारी चार वाजता मला चुलत भावाने कॉल केला आणि रडतच म्हणाला... दिपे,,, आपली आत्या गेली ग.... त्याचे हे शब्द ऐकून धक्काच बसला कारण आठवडा भर आधी ती बेशुद्ध पडली म्हणून तिला पुण्यातील YCM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं,, त्या नंतर पाच दिवस तिने डोळे उघडले नसल्याने डॉक्टरांना पण उपचार कसे करावे हे समजत नव्हतं.. ती कोमात गेल्या सारखीच होती.. कारण ती काही प्रतिसाद देत नव्हती.... डॉक्टरांनी मामांना तिच्या आजारा विषयी काही प्रश्न विचारले.. पण आत्याला काहीच आजार नव्हता... चार-पाच वर्षांपूर्वी तिचा अपघात झालेला.. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तिच्या डोक्याला टाके पडले होते हे मामांनी त्यांना सांगितलं... रिपोर्ट मध्ये पण असंच होतं... डोक्यातली शीर तुटल्याने रक्तस्रावचालू होता... आत्या ICU मधेच होती,,, त्याच अवस्थेत... त्या दिवशी डॉक्टरांनी तिला पूर्ण चेक केलं आणि म्हणाले ह्यांच्या डोक्याच ऑपरेशन करावं लागेल... मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत असल्याने ह्यांची ही अवस्था झाली आहे... पण ऑपरेशन नंतर काय होईल ते आम्हालाही माहीत नाही... त्या तुम्हांला ओळखतलीच हे ठामपणे सांगू शकत नाही... हे ऐकून तर मामा आणि त्यांची मुलं रडायलाच लागली... आईची अशी अवस्था बघून,, कोणाला रडू आवरेल.. डॉक्टरांनी सर्वांना विचार करायला थोडा वेळ दिला... शेवटी सगळ्यांच एक मत होऊन ऑपरेशन साठी हो म्हणाले... १४ जून २०१८ ला म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजता माझ्या आत्याच ऑपरेशन सक्सेस झालं.. तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटलं पण माझे नाना आणि काका अजूनही टेंशन मध्ये होते... डॉक्टरांनी त्या दोघांना सांगितलं होतं की ४८ तास काहीच सांगू शकत नाही.. तो दिवस तर गेला आणि रात्री ३ ला आत्याचा श्वास वाढला... तो दुपारी २ पर्यंत तसाच आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसात तिने एकदाही डोळे उघडले नव्हते,, पण शेवटच्या क्षणी डोळ्यांतून जीव सोडला होता... तिचे डोळे सुजलेले आणि पांढरे पडले होते.माझ्या ह्याच आत्याच शेवटचं मुख दर्शन घेण्यासाठी आम्हांला लवकर पोहचायच होतं कारण तिकडे पण सगळी लोकं आमच्यासाठीच थांबली होती... आम्ही खालापूर एक्सप्रेस ने गावी जायला निघालो... पाऊणे नऊ वाजत नाही तर आम्ही तळेगावला पोहचलो... म्हणजे २:३० तासांच अंतर आम्ही पावणे दोन तासात पार केल होतं... तळेगाव नंतर आम्ही चाकणला पोहचलो... तेव्हा सव्वा नऊ किंवा ९:२० झाले असतील..... चाकण ते सुक्रेवाडी हे अंतर पाऊण किंवा एक तासाच आहे... म्हणजे सुक्रेवाडीला सव्वा दहा वाजेपर्यंत पोहचणार होतो आम्ही,, हे नक्कीहोतं... कारण चाकण ते चौफुला सरळ रस्ता लागतो... त्यासाठी कुठेही वळावं लागत नाही... आमची गाडी त्याच रस्त्याने वेगाने पुढे जात होती,, नानांना पण सांगितलं की आम्ही थोड्या वेळात पोहचू म्हणून त्यांनी पण तिकडे सगळी तयारी करायला घेतली.... गाडीमध्ये आत्या विषयीचं बोलणं चालू होतं... आमच्या शेजारी राहणारे मामा, काका आणि भाऊ पण आमच्या सोबत आले होते...ह्यांच बोलणं चालू होतं तेच मामा म्हणाले आपण अजून पोहचलो कसं नाही... इतक्या वेळात तर चौफुला यायला पाहिजे होता... कारण ते आमच्या गावी खूप वेळा आले होते म्हणून त्यांना सगळे रस्ते माहीत होते... ड्रायव्हरने तर त्याच रस्त्याने गाडी घेतली होती मग आम्ही चुकलो कसे?? आम्हांला चौफुल्याला जायचं होतं तर आम्ही आळंदी मार्गे गेलो... ते ही 3 किलोमीटर पुढे... आधीच उशीर झालेला त्यात ही चुक... आपलं लक्ष बोलण्यात होतं म्हणून आपण रस्ता चुकलो,, सगळ्यांना असच वाटलं.. ड्रायव्हरने गाडी मागे घेतली आम्ही पुन्हा रसिका हॉटेल जवळ आलो.. आता तिथे दोनच रस्ते होते,,, एक चौफुल्याला जाणारा आणि दुसरा आळंदीला... आम्ही चौफुल्या मार्गी निघालो... वीस ते पंचवीस मिनिटं झाली परत तेच... तोच रस्ता... दोन्ही बाजूला झुडूपआणि रस्त्याला काळाकुट्ट अंधार... आम्ही परत त्याच रस्त्याला आलो होतो कारण चौफुल्याला जाताना हायवे सारखा रोड लागतो हे मला पण माहीत होतं.. चौफुल्याची ओळख ही तिथे असणाऱ्या हनुमानच्या मंदीरामुळे होते जे टेकडीवर आहे... ते मंदिर दिसलं की समजायचं चौफुला आला... पण इथे तर फक्त आणि फक्त झाडी आणि अंधारच होता... आता सगळ्यांना टेन्शन आलं... रस्ता तर बरोबर होता मग परत हा रस्ता लागतो कसा..?? ड्रायव्हरने परत गाडी मागे घेतली आणि रसिका हॉटेल जवळ आले... कोणाला विचारावं तर तिथे पण कोणीच नाही... पुढे फक्त एक बोर्ड होता,, मोहिते पाटील वाडी... त्या पलीकडे काही नव्हतं.. दादाने मोबाईल मधला map चालू केला... रस्ता तर सरळच दाखवत होते... मग चुकतोय कसं...? मामा एकच बोलत होते,, हाच रस्ता बरोबर आहे.. दुसऱ्या रस्त्याला जाऊ नका... जिथे आम्ही पंचवीस मिनिटात पोहचणार होतो तिथे आम्हांला पोहचायला आणखी एक-दिड तास लागणार होता.... ड्रायव्हरने गाडी त्याच रस्त्याने नेली आणि परत जे व्हायचं नव्हतं तेच झालं.. तोच रस्ता,, तीच झाडी आणि तो भयानक काळाकुट्ट अंधार... नानांना कॉल करणार तर रेंज पण नाही..... आत्याला बघायची इच्छा अपूर्णच राहणार असच वाटलं आणि रडायला आलं... मनातच म्हणाले हे देवा,, आत्याच शेवटचं दर्शन होऊ दे... तिच्यासाठी इतक्या घाईत आलोय आणि हे असं घडतंय... सगळे वैतागले होते... आत्याला बघायला भेटणार नाही,, असंच सगळ्यांना वाटत होतं... कारण आम्हाला खूपच उशीर झालेला... आमच्या सोबत असणारे भाऊ बैठकीला जातात,,, त्यांच्या घरात अधिष्ठान आहे... त्यातला एक दादाच म्हणाला काही होणार नाही... आपण पोहचू वेळेतच.. त्याने पण देवाचं नाव घेतलं आणि आम्ही परत मागे आलो.. ड्रायव्हरला पण समजत नव्हतं हे काय होतंय.... त्या सगळ्यांनी एकमेकांना काही तरी खुणावले आणि आम्ही चौफुल्याला निघालो.. मला तर काही करून आत्याला बघायचं होतं,,, तिच्या पर्यंत पोहचायच होतं.... आता जर आम्ही चुकलो असतो तर आमचं काही खरं नव्हतं.... सगळेजण शांत बसले होते.. कारण आपल्या सोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे सगळ्यांनाच समजलेलं बहुतेक... पण आम्ही घाबरू म्हणून कोणी काही बोलत नव्हते... मोहिते पाटील वाडी गेली,,, पुढे काय येतंय तेच सगळे बघत होते.... आणि देवाची कृपा म्हणा नाही तर आत्याची कृपा म्हणा आम्हांला साबळे वाडी लागली जी चौफुल्याला जाताना लागते.... ह्याचा अर्थ आम्ही त्या चुकीच्या रस्त्यातून बाहेर पडलो होतो.. तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद दिसला,,, आणि थोड्याच वेळाने आम्हांला टेकडीवर असणार हनुमानाच मंदिर दिसलं म्हणजे आम्ही चौफुल्याला पोहचलो होतो... मंदिराकडे बघून आम्ही लांबूनच हात जोडून नमस्कार केला.... पंधरा मिनिटात आम्ही सुक्रेवाडीत असणाऱ्या स्मशान भूमीत पोहचलो... सगळे आमचीच वाट बघत होते... मी मोबाईल मध्ये पाहिलं तर साडे अकरा वाजायला दहा मिनिटं बाकी होती,, म्हणजे इतका वेळ आम्ही तिथेच फिरत होतो... तितक्यात नानांनी आवाज दिला... दिपा इकडे ये,,, आत्याला बघून घे... आत्या गेल्याचं दुःख नानांच्या आवाजा वरून आणि डोळ्यांतुन दिसून आलं... आत्याला सारणावर ठेवलेली,, शांत झोपली होती ती... खूप सुंदर नटवलं होतं तिला... तिच्या आयुष्यातला शेवटचा शृंगार होता तो... तिचा तो सुकलेला आणि काळवंडलेला चेहरा बघून रडणं आवरलंच नाही.... तिच्या पाया पडून चेहऱ्यावरून हात फिरवतच मी नानांकडे (बाबा) पाहिलं आणि ते म्हणाले,, आताच बघून घे तुझ्या आत्याला... परत बघायला भेटणार नाही आणि ते रडायला लागले
No comments:
Post a Comment