}
Latest Bhaykatha :
Home » » भिज ओल- Marathi Thriller Experience Story 4-6

भिज ओल- Marathi Thriller Experience Story 4-6

| 0 comments





भाग ::--चौथा
मि. मानेंनीच कधी तरी राष्ट्रीय महाविद्यालयात प्राध्यापक जागेचं आवेदनपत्र भरलं असेल त्यांचं मुलाखतीचं पत्र आलं.
अजंना मॅडमच तिथं प्राचार्या. मुलाखतीत आपली निवड झाली आपण ज्युनियर कॉलेज ला प्राध्यापक झालो. पण कागदपत्र चाळताना मॅडमांनी आपलं कागदावर सर्व ठिकाणी सरसोली गाव पाहिलं. निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करतच विचारलं "अरे आलोक तू तर आमच्या व्याह्याच्याच गावाचा निघालास रे!
माझी सून त्याच गावची. आपण नाव विचारलं व 'विधी'चिंधू... हे नाव ऐकताच नोकरी मिळाल्याचा सारा आनंद क्षणात गायब झाला. आपण आधी त्यांना सरसोलीहून आलो तेव्हा आपलं सातपुडा पर्वतातलं मूळगाव मोरचिडा सांगितलं होतं. त्यांना त्याचं काही नाही वाटलं उलट आनंद हा की आपल्या शेजारी राहणारा व आपल्या नातेवाईकाच्या गावाचा चांगला माणूस हाताखाली येतोय. पण विधीचं नाव ऐकताच या मॅडम विधीच्या सासू व शेजारी पण. म्हणजे पुन्हा विधी भेटेलच. काय करावं नोकरी नाकारावी का?
तूर्तास आपण स्विकारली. व विचार केला की मँडमची सेवा तीन चार वर्षे राहीली नंतर निवृत्ती आणि विधी आता तरी पुण्याला नाही. पाहू इथं आलीच तर आपण दुसरं घर पाहू. असा विचार करत आपण नोकरी स्विकारली.
आश्लोक स्पर्धा परिक्षेची पूर्वी चाचणी, मेनपरीक्षा, शारीरिक पात्रता, मुलाखत असे टप्पे पार करतच होता. माने सरांना पूर्ण विश्वास होता की लवकरच आश्लोक पण अधिकारी बनतोय.
ज्याची भिती होती तेच घडलं. एके दिवशी संध्याकाळी विधी अचानक समोर. क्षणात वीज चमकून सळसळावी तसचं. आपण पुरतं घाबरलो. ही इथं केव्हा आली ? नी घरात अचानक कशी? मॅडमांनी पाहीलं तर? आधीच सरसोलीत बभ्रा झालाय व आताच कुठं स्थावर होऊ पाहतोय आपण आणि ही?
विधीला आपण टाळत तीनं लवकर निघावं म्हणून विनवत रागावत होतो. ती काय बोलत होती काहीच सुधरत नव्हतं. दुसऱ्या दिवशीच आपण तिथला फुकट मिळालेला फ्लॅट सोडला व कात्रजला रहायला आलो. जातांना अजंता मॅमला फ्लॅट मालकानं खाली करायला लावला असं खोटच कारण सांगितलं.
गाव बदलवत होतो, घर बदलवत होतो. पण विधीची विधा की विधीलिखीत आमचं दोघांचं ते काही बदलण्याचं नाव घेत नव्हतं. सारखा पाठलाग सुरुच होता. जो जो दुर जात होतो तो तो ते फिरवुन पुन्हा परिघावरच आणत होतं. प्रित ओल..... भिज ओल....
विधी प्राध्यापक झालोय गं मी. मला का या गोष्टी कळत नसतील का? देह, मन, स्पृहा- लिप्सा, आकांक्षा हा सारा भावनांचा खेळ मला ही कळतोच गं. मनाच्या गाभाऱ्यात ओलच काय पण प्रितीचा झराच वाहत असेल! पण व्यर्थ. कारण संघर्षाचा, कष्टाचा व या नियतीच्या माराचा लाव्हाच मनात असा भरलाय की प्रित ओलीचा केव्हाच कापूर होतो.
आलोक....! किती संघर्ष! किती दुःख! कोवळ्या नादान वयापासून. आणि हा संघर्ष, हे दुःखच मला तुझी प्रितओल, भिज ओल कळू देत नाही. संघर्षमय जिवनाच्या गाथेला कुठून सुरुवात करू मी?
सातपुड्याच्या पायथ्याशी माघासलेलं मोरचिडा गाव. मोजून पन्नासेक उंबऱ्याचं गाव. हातावरचं पोट. उन्हाळ्यात धरण, रस्त्यावरचं मातीकाम करणारं किस्नाचं कुटूंब. नऊ वर्षाचा आलोक व पाच - सहा वर्षाचा आश्लोक. जवळच्याच वाडीला रस्ता बनत होता. त्याला लागणारा मुरुम, दगड खोदायचं काम सुरु.कालच्या वळवाच्या पावसानं उष्मा वाढलेला. आजही पाऊस पडणारच म्हणुन किस्ना मुरूम खोदण्याची घाई करत होता. कारण आता पावसाळ्याचे कामही बंद होणार होतं. म्हणून दोन चार दिवसात जितकं जास्त काम करता येईल तितकाच हातभार. या घाईत पावसानं भिजलेलं धपाडं सुटतच चाललंय हे त्याला व सुमीला ही लक्षात येत नव्हत. ही दोघं खणत होते व वर धपाड सुटतच होतं, उष्मा वाढतच होता. पाऊस सरकत होता तसा यमकाळही जिभल्या चाटत वेगानं सरकत होता. आणि क्षणात धडाड धडधूम धप्पssssकरत वरून मुरूम, दगडाचा खच पडला. डोंगरात आरोळ्या, किंकाळ्या घुमल्या. पण दोन किंकाळ्या ढिगाऱ्यातच गडप झाल्या. लोक धावली पडला ढिगारा पलटू लागला. कामाकडं पळणाऱ्या गर्दीत आलोक, आ श्लोकही पळत होते. गर्दीत काय झालं लक्षात येईना. गर्दी त्यांना सहानुभूतीने गोंजारत होती. एकजण वीस मैलावरच्या सरसोलीला सोनू मामाकडं सायकलीवर धावला. ढिगारा कमी होईना. वळीव गर्दी करू लागला. घामाच्या धारा. आता आलोक धडधडू लागला. तोच टिकाव पोटात घेतलेला किस्ना व घमेलीतच चेहरा मुडपलेली सुमी हळूहळू दिसू लागली. लोक चुकचुकु लागली. नभात ढग व धर्तीवर दोन निरागस जीव आकांत करू लागले. धो धो पाऊस व आसवाचा आकांताचा विलापाचा महापूर आला.
दोन्ही प्रेतं पडलेली.लोकं मामाची वाट पाहत होती. दिवेलागणीची वेळ झाली.तो पावेतो वळीव आपलं काम करून परतत होता. सोनू मामा आला. मामी आलीच नाही. अंधारातच किसना व सुमी दोन्ही लेकरांना अनाथ करून निघून गेली. आलोकनं आश्लोकला कडेवर घेत भो भो बोंब ठोकत पाठीवरचं मडकं सोडताच धप्प टिच्च आवाज आला. भडाग्नी व पाणी देताच सारी परतू लागली. .
सोनू मामाही आलोक व आश्लोकला घेत परतू लागला. तोच आश्लोक आकांत करू लागला. "दादा! आया आबा? आयाला ही सोबत घेना."
त्या सरशी मामानं टाहो फोडत "आश्ल्या गेली रं दोघं ती न परतणाऱ्या वाटेनं, आपल्याला सोडून! चल बाबा! " सांगताच आलोक चितेकडं धावू लागला.
"आया आबा या ना! कुठं चाललाय तुम्ही?"
काळीज चिरणाऱ्या या टाहोनं परतणारी गर्दी थबकली. सांगत सवरत पोरांना व मामाला घेत गावात परतली.
दुसऱ्या दिवशी पहाटे जाग येताच आलोक, आश्लोकनं 'आया', 'आया' करत परत हंबरडा फोडला. शेजाऱ्याकडं कडूमडू करत चहा घेऊन मामानं आलोकला सायकलच्या कॅरीवर तर आश्लोकला पुढं बसवत सरसोलीकडं पॅंडल मारला. आणि मोरचिडा हे नाव आधीच कोऱ्या असलेल्या आमच्या सातबाऱ्यावरनं कायमचच खोडलं गेलं.
दुपार कलतीला मामानं सरसोलीत आपल्या झोपडीसमोर सायकल उभी करून भाच्यांना उतरवलं. आभाळ कोसळलेली पोरं म्लान चेहऱ्यानं कावरीबावरी होत इकडं तिकडं पाहू लागली. तोच मामी घरातून संतापातच बाहेर आली.
"आलास ही बाचकं घेऊन! ती बया गेली नी यांना सोडून गेली माझ्यासाठी. पण मी यांचा सांभाळ करायला रिकामी नाही. मी चालली माहेरी. तुला कालच जातांना सांगितलं होतं की या बाचक्यांना आणायचं नाही. तरी घेऊन आलास".
"सरू काय बोलतेस हे. माझी बहिण गेली गं आणि वरून तू हे बोलतेस. त्यांना आपल्याशिवाय दुसरं कोण गं! "मामा रडतच गयावया करू लागला. तितक्यात आश्लोक मामीच्या पायाला मिठी मारत" आया!, आया! "म्हणत केविलवाण्या नजरेनं बिलगू लागला. मामीनं त्याला झिडकारत दूर भिंतीकडं ढकलताच भिंत लागून कपाळावर फरफर ठेंगूळ चालून येऊ लागलं. आश्लोक जोरात रडत मामाआड लपला व आया, दादा, मामा करत टाहो फोडू लागला.आलोकनं त्याला कडेवर घेत अंगणात आणलं. संतापातच मामीनं पिशवीत कपडे भरत माहेरचा रस्ता धरला. मामानं आलोकला आलोक इथंच थांब बाळा मी तिला माघारी फिरवून आणतो सांगत गल्लीतुन दूर पर्यंत रडत रडतच विनवण्या करत तिचा पिच्छा करू लागला.थोड्या वेळानं मामाच उंदरागत मरतुकडं तोंड घेऊन परत आला
मामी आलीच नाही.
रात्री गल्लीतल्या एका बाईस कीव आली. तीनं खिचडी टाकुन तिघांना खाऊ घातलं. रात्री काळ्या ढगाआड उदास एकटाच पळणाऱ्या चांदकडं भकास नजरेनं आलोक कितीतरी वेळ पाहत रडत होता.
सोनू मामानं सकाळी उठताच दोघांना खळ्यात नेलं. गावात सदा अण्णाकडं मामा कामाला होता. त्याच वेळी सदा अण्णा व सावित्रीमाय आपल्या पोरी जावयासोबत महिनाभर भारत दर्शन साठी गेलेले.
मामा दिवसभर खळ्यात राबे. म्हशीचं दुध काढणं, गोठा झाडलोट करण, गुरांना चारापाणी करणं, साड्यांच्या भाकरी घेऊन जाणं गुरं चारणं अशी किरकोळ कामं करी. मामाला क्षयानं पोखरल्यानं दुसरी जड काम होतच नसत. म्हशीची धार काढतांना मामा हाफायला लागे. पण पर्याय नव्हता.
मामा दोन्ही भाच्यांना सोबतच फिरवू लागला. कधी म्हशीचं दुध पाजू लागला कोणी द्या येऊन कोर तुकडा दिला की भाच्यांना भरवू लागला.पण कोणी दररोजच देईल याची शाश्वती नसायची. नुसतं म्हशीचं दुध आश्लोकला जासे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात अजुन काहीच खायला मिळेना. मग मामा नऊ वाजता दोघांना अंगणवाडी घेऊन जाई. तिथं गोदामाय मदतनीस होती. तिला पोरांचे हाल पाहून द्या वाटे. ती पोरांना सुगीचा घाटा देई. कधी कधी कुणी पाहणार नाही या बेतांनं सोनू मामाला ही देई. मामा बळेच नाही म्हणे. "गोदा आक्का पोरांना मिळालं तरी माझं पोट भरतं गं"
पण गोदा मायेला मामाला क्षय व त्यातच बाई गेली माहेराला कोण देईल बिचाऱ्याला म्हणून द्या येई. तर कधी दुपारीसालगडी आपल्या डब्यातून कोर तुकडा देत. मामा तो ऐवजासारखा रात्री पर्यंत जपून ठेवत व रात्री भाच्यांना भरवत.
" पोरांनो थोडेच दिवस अण्णा व सावितरा माय गावाहून आली की आपले. आल थांबतील ती देव माणसं आपल्यास उपाशी मरु देणार नाहीत.
पावसाळ्याची झडी वाढली तसा मामाचा खोकला वाढला. मामा झडकनमध्ये रात्र भर खोकलू लागला. आता तो आलोक व आश्लोकला जरा लांबच झोपवे पण लगेच बहिणीची आठवण येताच झोपलेल्या पोरक्या भाच्याचे पटापट मुळे घेत रडे.
सदा अण्णा व सावित्री माय देवदर्शन करून परतले याचा सर्वांपेक्षा मामाला कोण आनंद झाला. सावित्रीमायला कळताच संध्याकाळी मामाला बोलवलं. मामा भाच्यांना घेऊन गेला. कोवळ्या पोरांना पाहून सावित्रीमायला गलबलून आलं. मायनं "सोनू काय आक्रीत झालं बाबा? निर्दयी देवाला पोरांची आई हिरावून नेतांना या कोवळ्या जिवाची पण दया नाही आली!" म्हणत दोन्ही पोरांना मायेनं जवळ घेतलं. महिन्यापासून मायेच्या स्पर्शास मुकलेल्या पोरांना ममतेची ओल कळताच कधीच न पाहिलेल्या सावित्रीमायला ती पाखरं "आया आया म्हणतच बिलगली" सदा अण्णानंही कुणाच्या लक्षात येणार नाही या अंदेशानं धोतराच्या सोंग्यानं पाणावले डोळे पुसले. सोनू मामा तर बहिण मेव्हणा गेल्याचं दुःख जणु आजच मोकळं करत होता. रात्री साऱ्यांना सावित्रीमायनं पोटभर जेवू घातलं.
दुसऱ्या दिवशी सदा अण्णानं सकाळी मास्तरला बोलवत मोरचिड्याहून दाखला मागवत आलोकला चौथीत घातलं तर लहाण्यास पहिलीत. पोरं खळ्यात राहत शाळेत जाऊ लागली. सदा अण्णाकडचं दोन्ही वेळचं हक्काचं मायेचं जेवणं पोरांना भेटू लागलं. पण देवाला हे ही मान्य नसावं.
श्रावण धो धो बरसत अर्धा झाला. नी पावसाच्या पडझड झडीत सदा मामाही चिमण्या पिलांना अधांतरीच सोडून क्षयाच्या लढाईत हारत निघून गेला. आलोकला कोवळ्या वयात आश्लोक ची जबाबदारी सोपवत.
मंग्या मांगाची हलगी ही त्या दिवशी रात्रभर वाजत होती की रडत होती हेच समजत नव्हतं.
क्रमशः.........
वासुदेव पाटील.



भाग ::--पाचवा
सोनू मामाच्या पिंडाला कावळा शिवेचना. जे दहा पंधरा लोक दशव्याला आले होते ते सारे कंटाळले. कावळे आजुबाजुला उडत पण पिंडाला शिवत नव्हते. मध्यान्हिचा सूर्य डोक्यावर येताच सदा अण्णा कातावून म्हणाला "सोन्या जो पर्यंत हा सदा अण्णाच्या कुडीत जीव आहे तोपर्यंत तुझ्या या अनाथ भाच्यांना मी उपाशी मरू देणार नाय.काळजी नगं. उगा आता उशीर नगं" तोच आकाशातून दुरून कावकाव करत एक कावळा आला नी पिंडाला शिवला.
दसवं होताच मामीनं कुणाचं काही एक न ऐकता माहेराला पुन्हा निघून गेली. मला व आश्लोकला अण्णानं त्यांच्याच घरी नेलं.
त्या दिवसापासुन सावित्रीमाय व अण्णाच्या मायेत वाढू लागलो. सकाळ ते दुपार शाळा करायची. मग दुपारी खळ्यातली कामं करायची. गाई गुरांना पाणी पाजा, दाणा वैरण करा, दुभत्या गाई म्हशींना पेंड खाऊ घाला, घोड्यांना चंदी खाऊ घाला,झाडलोट करा. सालदार गड्यांनी काढलेलं दूध घरी न्या... ,असली झेपावणारी काम शिकू लागलो. सदा अण्णांनी सालगड्यांना पोरांना मानवतील अशी वरकामच करू द्यायची जड काम अजिबात लावायची नाहीत अशी ताकीदच होती. पण का कुणास ठाऊक आपल्याला समज उपजतच होती की काय जे काम हाती घेतलं ते शिकायचं. त्यामुळे दोन तीन महिन्यातच सोनू मामा खळ्यात जी कामं करायचा ती आपण सहज करू लागलो. आश्लोक मात्र खळ्यात काहीना काही अभ्यास वा टिवल्या बावल्या करीत असे.
चौथी पाचवी करत करत सहावीत पोहोचलो तर आश्लोक तिसरीत. शाळेत हुशारीमुळे व अनाथ पोरं म्हणून सर्वच माया लावत. पोरं ही आता मिसळायला लागली. अगदी सुरळीत चालू होतं. पण नियतीला हेही मान्य नसावं. पुन्हा संचिताचे फासे उलटे फिरायला लागले.
सदा अण्णाचे एकुलती एक मुलगी व जावई मुंबई ला मोठी फर्म सांभाळून होते. त्यांनी त्या फर्मचाच दुसरा प्लांट दुबईत काढला. दोघांना दुबई लाच शिफ्ट व्हावं लागणार होतं व नातू एकच वर्षाचा होता. त्याचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अण्णा व सावित्रीमायला सोबत नेलं. अण्णांचा इथला सारा राबता वतन सोडून जायचा जीवच होईना. मायलाही ही चिमणी पोरं कुठं ठेवावीत हा सवाल पडलेला. तिकडनं जावई त्रागा करू लागले. शेवटी अण्णांनी विचार केला. आपला हा सारा राबता आपण कुणासाठी करतोय? तर मुलीसाठी ना. मग त्याच मुलीला आपण सहकार्य केलं नाही तर मग या राबत्याचा उपयोग काय?
अण्णांनी गावातल्या रघूला गुमास्ता म्हणून ठेवलं. सर्व बारदाना जसाचा तसा राहील तु सांभाळ. त्यातून वर्षाकाठी निम्मे उत्पन्न मला दे. प्रसंगी चाळीस टक्के दे हवं तर पण आलोक व आश्लोक या माझ्या काळजाच्या तुकड्यांना सांभाळ बाबा. राबत्याचं काही उणं दुणं झालं चालेल पण त्यांची आबाळ करू नकोस.
सारी निरवा निरव करून अण्णा व माय मुंबई ला व तेथून दुबई ला गेले. बस्स इथूनच आमची ससेहोलपट सुरु झाली.
सुरवातीला आठ-दहा दिवस रघू आम्हाला घरी घेऊन गेला पण नव्या नवरीचे नऊ दिवस संपताच त्यांनी रंग दाखवायला सुरूवात केली. त्याची कारभारी मंजी एकदम जहाल. तिच्या नजरेतच अशी जरब व आग होती की. आश्लोक तर तिच्या समोरच जाईना.ती सारखी हिडीस फिडीस करी.
संध्याकाळी खळ्यात काम करत असतांना "आलोक दादा आपण खळ्यातच राहू. मला भिती वाटते रे त्या मंजी मावशीची" आश्लोक कमरेला बिलगत किलावन्या करू लागला.
पण खळ्यात झोपायला माझीही हिम्मत होईना. मी त्याची समजूत काढली व दूधाची बादली पोहोचवायला पाठवलं.
तो घरी भित भित गेला. घरातनं मंजी मावशीनं त्यावर डोळे वटारून पाहताच घराच्या उंबरठ्याला ठोकर लागून दूधाच्या बादली समवेत आश्लोक घरात जाऊन पडला. दूध सांडलेलं पाहताच मंजी मावशीनं आश्लोकच्या कानशिलात सपासप दोन चार लगावल्या. आश्लोकनं जागेवरच चड्डीतनं ओहोळ सांडलेल्या दुधात सोडला. व जिवाच्या आकांताने बोंबलत खळं गाठलं. गालावर चारही लाल बोटं उमटून गाल टम्म सुजलेले. आश्लोक कमरेला बिलगत हमसून हमसून रडू लागला. तेवढ्यात रौद्ररूप धारण करत तीच खळ्यात आली व वरून तोंडाचा पट्टा चालवू लागली. रघूही कातावू लागला. तीनं सरळ धमकी देत "या किडलेल्या पिल्ल्यांना मी घरात अजिबात पाय ठेवू देणार नाही"हवं तर हा बारदाना ही नको, असं नवऱ्याला सुनावलं. तेव्हापासून आमचा खळ्यात मुक्काम पडला.
रात्री रघूच खळ्यात केळीच्या पानात जेवण घेऊन आला. ते कसं बसं खाल्लं व गोठ्यात तरठ टाकून झोपलो. आश्लोकनं गळ्यात हात टाकत मिठी मारून झोपू लागला. त्याक्षणी मला आया, आबा, मामाची आठवण आली व छातीत हुंदका दाटून आला. मामा गेल्यानंतर आज प्रथमच खळ्यात झोपत होतो. मामा नंतर नंतर आपला आजार पोरांना लागू नये म्हणून आम्हाला जरी दूर झोपवत असे पण त्यांचं सारं चित्त घारीसारखं आमच्या वरच असे झोपेतून उठल्याची चाहूल लागताच मामा लगेच धावतच जवळ येई. हे आठवताच मी 'आया! मामा!' म्हणून हमसू लागताच आश्लोकलाही जाग आली व तोही रडू लागला. दोघे एकमेकांना बिलगत भयाण अंधारात रडू लागलो. "दादा आया, मामाकडं चाल. मला भिती वाटते रे" आश्लोक रडतच विनवू लागला.
"आश्लोक रडू नको. मी हाय ना तुझ्या जवळ. मग का रडतोस? आणि मामा आपल्या जवळच आहे पण आजारी हाय म्हणून तो दिसत नाही. तू घाबरू नको. मामा आपल्याला काहीच होऊ देणार नाही. " मी रडतच त्याला छातीशी लावत समजावलं.
दुसऱ्या दिवशी गाल सुजून ताप भरल्यानंतर आश्लोक शाळेत गेलाच नाही. मला ही मग खळ्यातच थांबावं लागलं. सकाळची झाडलोट व इतर काम आटोपली. सालगड्यांना पोरं रात्री खळ्यात झोपली याचं वाईट वाटलं पण सारी हातावरचं पोट असणारी व रघूचं विचीत्र वागणं यामुळं सहानुभूती दर्शवण्याशिवाय काहीच करु शकत नव्हती. त्या दिवशी ना रघू खळ्यात आला ना जेवण. अकरा वाजले, दोन वाजले तरी जेवण नाही. भूक कडकडून लागली. गोठ्यात दुभत्या जनावरांना खाण्यासाठीकेळ्याची पिलपत्ती आणत त्यातच कच्च्या केळीचा घोडाही (घड)आणलेला होता. मी केळी तोडून तोडून सोलली व दोघांनी अधाशागत रडत रडत खाल्ली. संध्याकाळी रघू सकाळचं शिळंपाकं घेऊन आला. पण आश्लोकनं केळी खाल्ल्यी गेल्यानं व ताप चढल्यानं खाल्लंच नाही. रात्री पुन्हा तीच भिती, तेच रडणं, आपली माणसं आठवून एकाकी पडल्याची आठवणं व नंतर अण्णा
व सावित्रीमाय आठवणं. दुसऱ्या दिवशी मग मला गोदामाय आठवली. आश्लोकला घेत अंगणवाडी गाठली.
सुगीचा घाटा वाटला गेला होता. त्यामुळं तोंड हिरमुसलं. अंगणातून तसच परत फिरु लागलो. पण आश्लोक रडत"दादा मध्ये चल ना मला भूक लागलीय घाटा मागू." म्हणू लागला. त्याच वेळी गोदामायची व आमची नजरानजर झाली. ती तडक बाहेर येत "काय रं आल्क्या आज इकडं का आलात रं? शाळेत नाही गेलात?" विचारू लागली. मी जमिनीकडं पाहु लागलो. तोच आश्लोक "माय भूक लागली घाटा देना" म्हणत रडू लागला. गोदा मायेच्या पोटात गिड्डाच पडला. ती तोंडाला हात लावत "अरे देवा! काय केलंस रे तू" म्हणतच दोघांना वर नेऊ लागली. आश्लोकनं गोदामायला बिलगत
" माय आया गेली मामा गेला, सावित्रीमाय पण गावाला गेली. आता आमचं कसं होणार. विचारताच गोदामायला कढ दाटत डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. तीनं दोघांना मायेनं जवळ बसवुन गोंजारत
" पोरा त्याची काळजी ज्यानं जलम दिला त्या देवानं करायची. आपण नाही. आणि मी जिती हाय, तुझा ह्यो दादा हाय. तू का घाबरतोस" समजावलं. नंतर घरी नेत भाकरी करून खाऊ घातल्या. आश्लोकचे गाल पाहताच ती कळवळली. सारं समजल्यावर ती रघूला भेटली.
"रघूदा बघ अण्णा जाऊन दहा दिवस होत नाही तोच पोरांचे हे हाल. हे चांगलं नाही. अण्णानं तुझ्या वर जबाबदारी सोपवली शिवाय तुला मोबदलाही दिलाय. हाल नको करू पोरं अनाथ आहेत." त्याला कळवळून म्हणाली.
"गोदे ते सारं खरं पण मंजी यांना घरात ठेवण्याचं नाही म्हणतेय. यांनी खळ्यात रहावं हवं तर मी जेवण देत जाईन"
" का नाही म्हणतेय ती घरात ठेवायला? "
गोदामायनं विचारलं.
" गोदे तुला माहितच आहे या पोरांच्या मामाला टी. बी. होता. ही पोरं त्याच्याकडं झोपायची मग यांनाही संसर्ग झाला नसेल हे कशावरनं? या धाकानच मंजी नाही म्हणतेय. "
" रघा! बस्स! आगलागो तूझ्या जिभेला! तुला वागायचं नाही तर सरळ सांग. पण असलं वंगाळ काहीही सांगू नको. अरे अण्णा, सावित्री मायनं एवढं यांना घरात घालून वागवलं. त्यांना काही झालं नाही नी तुम्हालाच कसं रे?"
म्हणत तीनं काढता पाय घेतला.
नंतर मास्तरला भेटून आणि त्यांच्या जावयाशीही बोलणं केलं पण त्यांनी कामात असल्यानं मी रघूला समजवेन नंतर असं उत्तर देत अण्णा पर्यंत ही बाब जाऊच दिली नाही.
मग वर्षभर सुरू झाली कुतरओढ.वर्षानंतर अण्णा येणार होते तर जावई व मुलीनं येऊच दिलं नाही.
दिवसा खळ्यात मळ्यात राबणं. रघू कडून जे मिळेल ते खात राहणं सकाळी अंगणवाडीतील सुगीचा घाटा मजबूत खाणं. जंगलात जे उपलब्ध ते खाणं_मग कच्ची केळं, मक्याची भुट्टे, शेंगा, बोरं काहीबाही...
त्याच बरोबर नसलंच काही की हक्कानं गोदामाय कडं जाऊन बसणं. मग मायेच्या ओलाव्याने ती समजे की आज पोरं उपाशीच आहेत मग ती उठून काही तरी खाऊ घाले. झोपणं मात्र खळ्यात. सोबत कुणाकडं ही जायचं व त्याला छोट्या छोट्या कामात मदत करू लागणं. विधवा गोदामायची परिस्थितीही हलाखीचीच होती. अंगणवाडी सुटली की ती कुठंही कामाला जायची तिच्यासोबत मग शेंगा फोडणं, मिरची कांडणं, लगीन घरात पाणी भरणं, लाकडं फोडणं या कामात मदत करू लागलो व नंतर जसजसं वय वाढत गेलं तसं ही कामही करत गेलो. गोदामाय आश्लोकला दररोज शाळेत पाठवी. पण आपल्याला सकाळी खळ्यातलं सगळं आवरून मगच दुपारी शाळेत जाणं. तेही मळ्यात माणसाच्या भाकरी देणं, औताची बैलं चारणं असलं की मग शाळा बंद. काम नसलं की मग तसच शाळेत जाऊन बसायचं. पण मग जे शिकवलं जाई ते ध्यान देऊन ऐकायचं. सरांना सारं माहीत असल्यानं ते ही कधीच हजेरीची जबरदस्ती करत नसत. उलट राहिलेला अभ्यास करण्यास मदत करत. पुस्तकं देत. काही अडलं की मदत करत.शाळेत कसल्याही स्पर्धा असल्या की ते भाग घ्यायला लावत. आपणही रात्री तयारी करत भाग घ्यायचो. प्रसंगी तयारी करूनही ऐन स्पर्धेवेळीच काही काम असलं की मग दांडी पडे.
तब्बल दोन वर्षांनी अण्णा व सावित्रीमाय दुबईहून परतले. सारा वृत्तांत कळताच त्यांनी रघू गुमास्ताची खरडपट्टी काढत हकालपट्टी केली. सावित्रीमायचं मात्र काळीज चर्र जळालं व ती संतापात रघूचा व मंजीच्या दहा पिढीचा उद्धार करू लागली. अण्णानं गोदामायला घरी बोलवत पोरांना सांभाळल्याबद्दल साडीचोळीचा आहेर करत इतर मदत ही केली.
आता मात्र शाळा नियमीत सुरु झाली. खाणं पिण्याची आभाळ थांबली.
पण तरी मात्र आपण अजाणत्या वयातच एक निश्चय पक्का केला की काम मग ते कोणतंही असो शिकायचं व करतच रहायचं.कारण पुन्हा भविष्यात अण्णा सावित्रीमाय कायम राहतीलच याची ग्वाही कोण देईल.
नववी झाली नी गावात चिंधू अण्णा आई वारल्यानंतर व गावकऱ्यांच्या आग्रहाखातर राजकारणात उतरण्यासाठी कोकणातून आपला उद्योगधंदा सोडून सरसोलीत रहायला आले. चिंधू अण्णानी विधीचं नाव माझ्याच तुकडीत दहावीत दाखल केलं
नी मग सुरू झाला एक अनामिक भिज ओलीचा कालानुगतिक प्रवास.......
क्रमशः.......

_______________________________________________________________________________


भाग ::--सहावा

चिंधू अण्णा कोकणात नोकरीला होते पण ती सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथेच त्यांनी स्वतःचं लाकडी खेळण्याचं दुकान टाकलं होतं व नंतर फळप्रक्रियाचा देखील धंदा सुरु केला होता. सरसोलीत आई वडील सारा राबता सांभाळत. त्यामुळे ते सहसा इकडे कामापुरतंच वर्षातून एखाद चक्कर येत. कारण सावंतवाडीत त्यांचा मोठा व्याप होता. भरपूर माया जमवून होते. सरसोलीची लोकं कधी गोव्याला गेले की त्यांच्याकडेच मुक्कामाला जात. त्यांची चांगल्या प्रकारे सरबराई चिंधू अण्णा करत. मग गावाचा विषय निघेच. "अण्णा तुझं इथं ब्येसच हाय पण गडा हेच तू गावाला कर. गाव तर गावच असतं. शिवाय आपली माणसं ती आपली माणसंच असतात. आणि आता म्हातारा म्हातारी पण थकत चालली. व तुझी पण मुलगी मोठी होतेय. पुढं ओघानं लग्न आलंच. आणि गावाच्या राजकारणात तुझ्या सारख्या वाघाची गरज हाय" असं लोक सांगतच. नेमकी म्हातारी मेली नी चिंधू अण्णांनी सारा उद्योग, दुकान विकत आपला जामानिमा सरसोलीत आणला. त्यामागं गावकऱ्यांचा म्हणण्यापेक्षा अण्णाच्या भाऊबंदकीचा छुपा
राजकीय अजेंडा पण होताच.
सरसोली गाव जरी तालुका नसला तरी तालुक्याहुन मोठं खेडंगाव होतं. मोठी बाजारपेठ होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय गावात होती. तापी काठावरची नांदत्या व समृद्ध संस्कृतीचं गाव. गावात महादेवाचे मोठं जागृत देवस्थान होतं महादेवाची मोठी यात्रा गावात भरे. नदीवर बांध, देवस्थान, लगतच सातपुडा यामुळं पर्यटनस्थळ म्हणून गावास दर्जा नुकताच प्राप्त झाला होता.
गावात सतरा सदस्यांची पंचायत. पण बऱ्याच वर्षापासून सदा अण्णा व इतर जाणत्या पुढाऱ्यांनी निवडणूक लागुच दिली नव्हती. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र बसत व बिनविरोध निवड करत शासनाचं बक्षिस मिळवत. ग्रामपंचायतीची पन्नास एकर जमीन होती तिचं ही उत्पन्न मिळे. शिवाय महादेवाची यात्रा भरे त्यातून लाखोंचा कर मिळे. उत्पन्नाबाबत अवघ्या जिल्ह्य़ात नंबर एकची ग्रामपंचायत.
पण जसजसे नवनवीन पुढारी उदयास येऊ लागले तसे बदलाचे वारे वाहू लागले. सदा अण्णा कधीच सरपंच बनत नसत पण त्यांच्या शिवाय सरपंच ही बनत नसे. एका कवडीची देखील अफरातफर होऊ देत नसत.फुकटाच्या दमडीचा देखील त्यांना सोस नव्हता.
सरसोलीत सारे रास्ते कुळाची भाऊबंदकी. पण सुतक वाढू लागलं तस दोन पट्ट्या पडल्या होत्या. एक सदा अण्णाची पट्टी व दुसरी चिंधू अण्णाच्या वडिलांची पट्टी. गावातून एक उत्तर दक्षिण रस्ता जात होता. जो गावाचे जवळपास समान दोन भागात वितरण करी. एका बाजूला सदा अण्णाचे सुतकी भाऊबंद तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुस चिंधू अण्णाच्या वडिलांची सुतकी राहत. काही घरं जरी इकडे तिकडे होती तरी त्यांची गणना वा संबंध मुळ भाऊबंदकीतच होई.
सदा अण्णा दोन्ही पट्टीतून आठ आठ सदस्य निवडत. मात्र सरपंच म्हणून जो सदस्य निवडत ती पद्धतच खरी साऱ्या जिल्ह्यात प्रसिद्ध होती. महादेवाच्या यात्रेत कुस्त्या होत. त्यात ज्या पट्टिचा पहेलवान कुस्ती जिंकेल त्या पट्टीचाच सरपंच एका वर्षासाठी होई. सदस्य मात्र पाच वर्ष राहत. त्यामुळं दोन्ही पट्ट्या लांब लांबून पहेलवान आणत व कुस्ती मारून आपलाच माणूस सरपंच बनवत. ही परंपरा चालू होती. चिंधू अण्णाचे वडील याबाबत जास्त खर्च करत नसत. म्हणून लोकांनी पटवून चिंधू अण्णालाच गावात येण्यास भाग पाडलं पण त्यांनाही कुठं माहीत होतं की चिंधू अण्णाच्याच पट्टीचा बिंद्रन एक नविन पुढारी म्हणुन तयार होत होता.
दहावीचं वर्ष म्हणुन अण्णांनी खळ्यातलं काम कमी करण्याची ताकीद दिली व अभ्यासाकडे लक्ष द्यायला लावलं. सुरुवातीस आपण ही नियमीत शा
ळेत जाऊ लागलो. पण देवानं प्रज्ञाच अशी दिली होती की पुस्तक एकदा वाचलं की डोक्यात फिट बसे मग केव्हाही त्यावर विचारलं तरी स्मरणात राही व वाचनानं सहज आकलन होई. मग वर्गात आताशी बोअर वाटू लागलं. पण वर्गात एक विधी नावाची नविन मुलगी आलीय जी हुशार व देखणी आहे हे लक्षात आलं होतं त्याआधी चिंधू अण्णाशी वा या मुलीशी आपला काहीएक संबंध नव्हता. आपण वर्गात पुन्हा
दांडी मारत खळ्यात, मळ्यात राबू लागलो. वर्ष संपेपर्यंत अण्णाचं ट्रॅक्टर शिक, मोटर सायकल शिक, तर कधी केळीच्या ट्रकवर जळगाव जा असले उद्योग चालूच होते. तर कधी गावात कुणाकडंही कामाला जा,गोदामाय सोबत लग्नात लाकडं फोडणं, पाणी भरणं असलं चालूच होतं. अण्णा, सावित्रीमाय संताप करत. इतर ठिकाणी कामाला जाऊ देत नसत. पण तरी त्यांचा डोळा
चुकवून जायचं मात्र जेवण कुठच न करता सावित्रीमाय सोबतच करावं लागे. हे सर्व उद्योग करून अण्णांचा बराच राबता सांभाळून ही शाळेत कोणत्याही स्पर्धा असल्या की सर बरोबर कल्पना देत व आपणही तयारी करून ऐनवेळी उपटसुंभ सारखं दाखल होऊन प्रथम क्रमांक मारायचोच.
इथंच स्पार्कींग होऊ लागली. विधी आधी ज्या शाळेत होती तिथं प्रत्येक बाबीत प्रथम क्रमांक ठरलेला होता. पण इथ उलटंच घडू लागलं. ती नियमित उपस्थित
राही सर्व अॅक्टिव्हिटीत हिरीरीने तयारी करी पण ऐनवेळी आपण जाऊन जिंकायचो. यानं ती चक्रावली व आपल्यावर डूख धरु लागली. पण याकडं मी कधीच लक्ष दिलं नाही. वा तिच्या कडं सारा वर्ग पाही पण आपण कधीच नाही. माझ्या दृष्टीनं इतर मुलामुलीप्रमाणंच ती माझ्या वर्गातील एक मुलगी होती.
दहावी पूर्व परिक्षेत ही आपण एक तर ती दोन नंबर आली. निरोपाच्या कार्यक्रमात सारे सवरून आधीच आलेले. मला कळताच तसाच मळ्यातनं धावतच गेलो. कपडे मळलेले, शरीर घामानं ओलं. प्रथम द्वितीय व तृतीय मुलांना फोटोसाठी मध्यभागी बोलवलं विधी जवळ उभी राहताच अत्तराचा सुवास व घामाचा दर्प भिडला. विधी आधीच डूख धरुन होतीच. विधीनं तृतीय आलेल्या गणास मध्ये उभं करून ती बाजुला झाली. मला एकदम हायसं वाटलं कि तिसरा आलेला गणा शेजारी उभा राहिलाय. तितक्यातफोटोग्राफर
"जवळ सरका,इकडे पहा,
रेडी"अशा सूचना देऊ लागला. मी समोर पाहत एकदम अटेंशनमध्ये उभा राहत जवळ उभ्या असलेल्या गणाचा हात पकडू लागलो. पण क्षणात माझ्या पायावर जोरात पायानंच गचकन लाथ मारली व "बांदर कुणीकडंच" म्हणत शिवी हासडली. फोटोग्राफरने तीच पोझ क्लिक केली. मी पाय चोळतच बाजूला झालो.
एकंदरीत फोटोग्राफरच्या सूचनेकडं लक्ष देत असतांनाच मागवून सांगळे सरांनी पोरं चुकीच्या जागी उभे आहेत हे पाहत मागून क्षणात गण्याला बाजुला करत विधीला पुन्हा मध्ये उभं केलं होतं हे मी न पाहतात गणाच शेजारी उभा आहे समजून फोटोग्राफर 'जवळ उभे रहा व अटेंशन 'बोलताच विधीचाच हात गच्च पकडला होता. म्हणून विधीनं संतापात पायानंच आपल्या पायावर गचकन दणका दिला.त्या दिवसापासून पूर्ण परीक्षा होईपर्यंत ती दिसली की माझा थरकाप होऊन नजर खाली झुके.
दहावीत ग्रामीण भागात जिल्ह्यात प्रथम आलो.
विधी जास्तच चिडली. बदला घेण्यासाठी मी कला शाखेत प्रवेश घेताच तीनही विज्ञान शाखेत न जाता कला शाखेतच प्रवेश घेतला.पण आपल्याला याचं काहीच सोयर सूतक नव्हतं.
पुढचे दोन्ही वर्ष ती धूसपूसतच राहीली. पण मी अजिबात लक्ष देत नसे. आपलं काम करत रिकाम्या वेळेत काॅलेज करायचं हे एकच ध्येय. मित्रांकडून या गोष्टी कानावर येत पण मी लगेच उडवत विषय बदले.
बारावीलाही दहावीचीच पुनरावृत्ती झाली . निकालाच्या दिवशी विधी दिवसभर रडतच होती. विज्ञान सोडून कला शाखेत प्रवेश घेऊन ही आपण हरलो याचचं दुःख.खरी मेख हा आपणास कवडीची किंमत देत नाही. मग याला हरवायचं जेणेकरून याचं आपणावर लक्ष जाईल. जेव्हा एखाद्यावर आपण जिवापाड प्रेम करतो व तो आपल्याला किंमत देत नसेल तर मग त्याचा आपण द्वेष करायला लागतो. नाही प्रेमानं तर द्वेष केल्यावर तरी पाहील. असा तो प्रकार. पुन्हा बी.ए. ला प्रथम वर्षात सोबत. पण आता या बाबी समजू लागल्यावर आपण ठरवलं की आपल्या मुळं कुणी नाहक अजाणतेपणी का असेना पण दुखलं जातंय हे चांगलं नाही मग मी मुद्दाम विधी ज्या स्पर्धेत भाग घेई त्यात भाग घेण्याच टाळू लागलो. जेणेकरून तिचाच नंबर येईल. पण त्यानं तीचा अधिकच जळफळाट होऊ लागला. तिला आपणास हरवून समाधान हवं होतं.
इकडं मी अभ्यासक्रम पाहून संदर्भ ग्रंथाची सूची बनवून लायब्ररीतून काढून खळ्यात अभ्यास करू लागलो. सोबत गावातील मुलांचे खळ्यात क्लास घेऊ लागलो.
त्याच वेळेस चिंधू अण्णांनी गावातलं घर जुनं व पडकं असल्याने आमच्या सदा अण्णाच्या खळ्यालगतचीच रस्त्यापल्याडची जागा सदा अण्णाच्या मध्यस्थीनं विकत घेतली व बांधकाम सुरु केलं. चिंधू अण्णाचा खळ्यातील वावर वाढला. त्यांना आपल्या बाबत कळू लागलं. अनाथ असूनही आपण कसं जगतोय, मेहनत घेतोय, क्लास चालवतोय, इतरांना कामात मदत करतोय व शिकतोय या साऱ्या बाबीचं त्यांना अप्रुप वाटू लागलं. मग सतत बोलणं चालणं सुरु झालं. त्यांच्या बांधकामासाठी आपणही मदत करू लागलो. पाणी मारणं, साहित्य उतरवणं. काही संपलं की त्यांनी आधीच ठरवलेल्या दुकानातून आणून देणं या गोष्टी वेळ मिळेल तेव्हा करू लागलो. बांधकाम सात आठ महिने चाललं तो पर्यंत त्यांची पूर्ण माया आम्हा दोघा भावंडांवर जमली. आता महिन्याभरात ते या नव्या घरातच रहायला येणार होते.
गावात दरवर्षी यात्रेत कुस्त्या होत. त्यामुळं कुस्त्यांचा लईच नाद होता. दोन्ही पट्टीचे स्वतंत्र आखाडे होते. चिंधू अण्णाकडील आखाडा बिंद्रन पहेलवान सांभाळी. तो स्वतः पहेलवानकी करे व मुलांनाही शिकवी. सदा अण्णा आपणास सतत आखाड्यात जाण्याबाबत तगादा लावी. पण आपण आश्लोकला पाठवत जाण्याचं टाळत असू.त्याला कारण ही होतं.
लहान असतांना वडिलांच्या मांडीवर बसण्याचं भाग्य फारच कमी काळ मिळालं. रात्री जेवणानंतर अंगणात वडिल आपणास पोटावर बसवत कुस्तीच्या गंमती सांगत. त्यावेळी आई संतापे व आपणास घरात फरफटत घेऊन जाई. आई हे असं का वागते याचं त्यावेळी आपणास कोडं उलघडेना. पण आई- वडील गेल्यानंतर मामाकडनं ते उलघडलं. आपले वडिल त्या काळी गाजलेले पहेलवान होते पण खेडेगावात तेही आडरानातल्या गावात तिथं कसलं आलंय कुस्तीचं शिक्षण? तरी वडिल अंगच्या वकुबानं डाव शिकले. मेहनत करून तालुक्यात कुस्ती असली की जात व जिंकत. लग्न झालं, संसार अंगावर पडला. दारिद्र्यात भर पडू लागली. अशीच कुणाकडून बातमी लागली की मध्यप्रदेशातील पहेलवान येतोय. जिल्ह्याला पाच हजाराची खुली कुस्ती आहे. पैशाची तर अडचण. लोभापायी किस्ना पहेलवान गेला. पहेलवान आला पाहून कुणीच कुस्ती खेळेना. तिथल्या आखाड्याची इज्जत जाऊ लागली. किसनानं आगा पिछा काहीच न पाहता आपल्या पेक्षा कितीतरी पटीनं बलवान पहेलवानाशी पाच हजाराच्या लोभापायी पंगा घेतला. किस्नाच्या गावठी व आडमुठ्या डावानं पहेलवान जेरीस आला. एकतर आपलं चॅलेंज यानं स्विकारलंच कसं? यातच त्याची सटकली होती. त्यात किस्ना त्याला जेरीस आणू लागला ही भर पडली. तो चवताळला. त्याच क्षणी नवरा नको त्या पहेलवानाशी पैशासाठी जिवाशी खेळायला गेलाय हे कळताच आईही मागोमाग निघाली होतीच. नेमक्या त्याच क्षणी ती तिथं आली. क्षणासाठी
' सुमी इथं कशी?' या विचारानं किस्नाचं अवधान विचलीत झालं व त्याच क्षणी घात झाला. त्या पहेलवानाला मोका सापडताच त्यानं किस्नावर असा डाव मारला की त्याचा पायच कमरेतून अधू केला. किस्ना कायमचा अधू झाला. तरी पण पहेलवानानं आपली आज जाता जाता इज्जत वाचली म्हणून बक्षिस व दवाखान्याची खर्च ही भरला.
आईला वाटणारी चिड आपण अनुभवली असल्याने कुस्तीला आपण टाळत जरी होतो पण वडिलांकडून रक्तात उतरलेली कुस्ती व हुनर उफाळून आल्याशिवाय राहिलीच नाही. आश्लोक आखाड्यात भल्या भल्यांना लोळवू लागला. नी मग आपण ही आखाड्यात उतरू लागलो. हे पाहुन अण्णांनी आणखी एक आखाडा खळ्यातच तयार केला. रात्री उशीरा पर्यंत अण्णांनी हरीयाणातून आणलेला पहेलवान आम्हास कुस्ती शिकवू लागला. पण परतताना त्यानं सदा अण्णाला सांगितलच"अण्णा तन्ने मतलब की बात बतला रिह्या हू मै यहा इन बच्चोको शिकाने आया था पर असल मे ये दो बच्चोसेच मै कुछ शिक के जा रिह्या हू, अनमोल रत्न है ये क्या बात है इनकी कुस्ती मे की अलग ही पेंच मारते है ये लडके"
सरसोलीच्या आगामी राजकारणासाठी तिकडं बिंद्रन तयार होत होता तर इकडं अजाणतेपणी व रक्तातल्या कुस्ती मुळं आम्ही.
विधीला हळूहळू कळून चुकलं की आपल्या कडंन आलोक हारणं शक्यच नाही. आपण विचार करतो त्याच्या कैक पटीनं तो पुढं पळतोय. याच्याशी लढण्यापेक्षा आपण याला वेगळ्याच पद्धतीने ट्रिट केलं तर......?
विद्यापिठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत काॅलेज कडून जनरल नॉलेज क्विज काॅम्पीटिशन मध्ये विधीचा संघ निवडला गेला होता. पुढचा राऊंड जळगावला होता. चार जणांच्या चमूत एक स्पर्धक बदलायचं ठरलं. त्यात कुणीतरी कालेजला जर जिंकायचं असेल तर आलोकला यात सामिल करा असं सुचवलं. आपण तर आता कालेजला जाणं कमीच केलं होतं. आखाडा, क्लास व इतर काम यातच वेळ जात असे.
स्पर्धेत पाच संघात आमचा संघ होता क्विज चालू असतांना दोन जागा सोडत मध्ये मित्राला बसवत मी कोपऱ्याची जागा सांभाळली पण नंतर आलेल्या विधीनं मला बाजूला सरकवत जवळच बसली. आजपर्यंत मायेचा स्पर्शास आसुसलेला मी गोदा माय सावित्रीमायच्या मातृस्पर्शानं तृप्त झालो होतो. कधी कीव दयेचा स्पर्श तर कधी आकस आसूड रुपी स्पर्श ही अनुभवला होता पण हा....
हा स्पर्शच वेगळा होता.
मी उठण्साठी धडपडत असतांनाच "उगामुगा बस खाली आज ही स्पर्धा जिंकून दाखव मग तु खरा हुशार. अन्यथा हारण्याचं दुःख काय असतं ते माझ्यासोबत भोगायला तयार रहा. आणि हो मला खात्री होती की आपली टिम नक्कीच हरणार म्हणून मीच तुझं नाव सजेस्ट केलं होतं मुद्दाम हून" हे ऐकुन मी गारच झालो. पहिल्या दोन फेरीत उत्तर येत असुनही मी बोलणार तोच पुन्हा स्पर्श. मी बावचळलो. तोच टिममधल्या मुलांनी दोन्ही फेरीत उत्तरे चुकवली. आमची टिम माघारली. टिमची भिस्त विधी व माझ्यावरच. तर मी भांबावलेला व विधी मुद्दाम हरवायला टपलेली.
मी सावरलो. हार काय असते विधी तु कुठं अनुभवलंय. या वरवरच्या हारीचं दुःख काय उगाळतेय. इथं मी जिवनात काय काय हरलो हे तुला कळणार नाही. मग भानावर येत पुढच्या साऱ्या फेऱ्या जिंकल्या. विधीच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य विलसलं. बक्षीस स्विकारताना मी मागंच उभा अंतर राखून तर विधीनं हाताला गच्च दाबत पुढे ओढत खेटून उभी राहात पोझ दिली. विधीच्या याच स्पर्शाच्या व हास्याच्या बरसातीनं कदाचित माझ्या परिस्थितीनं कोळून वाळवंट झालेल्या दिलात भिज ओल झिरपायला सुरूवात झाली होती. पण याची मला जाणच त्यावेळी नव्हती वा आतील द्वंद्वावर आपण निग्रहानं मात करुच हा विश्वास होता.
.........
(भिज ओलीच्या प्रवासासोबत राजकीय द्वंद्वांचा प्रवास पुढील भागात)
क्रमशः......
Share this article :

No comments:

Post a Comment

stories

! (1) !!!.......कथा एका जन्माची....!!! (1) ...सत्य भयकथा : रक्ताच्या नात्याची! (1) .पैज.....-Challenge -kalpanik katha (1) 'झटेतलं चांदणं-भाग ::-- दुसरा (1) 'झटेतलं चांदणं' (1) " किल्लेदार "- Bhitidayak katha (1) " व्हास व्हिला " (1) "गहिरे पाणी" (1) "फेरा" (1) "विरोचन" (1) “हौसा अन भैरी पहिलवानाच भूत” – गावाकडच्या भुताच्या गोष्टी (1) #काल्पनिक कथा (2) #काळ्या दरवाज्या मागिल रहस्य..-(भयकथा) (1) #तात्या (1) #ती #खोली (1) #पाठराखण* (1) #मोहिनी# (1) © कोणीतरी आहे (1) Aai-A true story (1) Annexes - भाग :- १ (1) Annexes- महाअंतिम_भाग :- १० (1) Annexes-भाग :- २ (1) Annexes-भाग :- ३ (1) Annexes-भाग :- ४ (1) Annexes-भाग :- ५ (1) Annexes-भाग :- ६ (1) Annexes-भाग :- ७ (1) Annexes-भाग :- ८ (1) Annexes-भाग :- ९ (1) Assal Marathi sms (1) Assal Marathi sms Story (1) Bhayanak kissa mintrancha - Marathi Horror Stories (1) bhitidayak katha (1) bhutachi gosht (6) bhutachi gosht -11 to 13 (1) bhutachi gosht -14 to 15 (2) bhutachi gosht -16 to 18 (1) bhutachi gosht -9 to 10 (1) Bhutachi Gosht In Marathi (1) bhutachya goshti (4) bhutachya navin goshti (1) bhutkatha (1) bhutpret (1) comedy sms (2) DENIAL-Bhaykatha-भयकथा (1) Ek Chotishi bhaykatha (1) Ek Chotishi Marathi Bhutachi Gosth (1) Gajara -Marathi Thriller Story (1) ghost story in marathi (1) Haunted College -(Part 2) (1) HAUNTED COLLEGE-भाग 3 (1) haunted house (1) haunted stories in marathi (2) Highway- Part 3 Marathi horror story-हायवे - भाग तीन (1) Highway- Part1 Marathi horror story-हायवे - भाग एक (1) Highway- Part1 Marathi horror story-हायवे - भाग दोन (1) Hindi Horror Stories (1) Hindi Horror Story (1) Horror Experience shared by Chandrashekhar Kulakarni Patil (1) Horror Incident with Me-Horror story (2) Horror Marathi stories (40) Horror Rain Story- in Marathi (1) Horror stories In Marathi language (1) indian horror stories in marathi (1) Jatra { bhag 1 } -Marathi Horror Story (1) Kalpanik Horror story (1) Latur -Bhkuamp -Horror Seen (1) Maharashtra Horror marathi stories -gavakadachya goshti (1) Majhgaon (1) marathi bhaykatha (10) marathi bhaykatha pratilipi (1) marathi bhootkatha (1) Marathi Bhutachi Gosht (13) Marathi bhutachi gosht-ratra shevatachi (1) Marathi bhutkatha (1) Marathi Chawat katha (8) Marathi Full horror story -DharmSankat (1) Marathi Horror Novel (9) Marathi Horror Stories (31) marathi horror stories pdf (1) Marathi Horror story (1) Marathi Horror Story गहिरा अंधार (1) Marathi Horror Story basis on true story (1) Marathi Horror Story Books (1) Marathi Horror story-Missed a road (एक चुकलेला रस्ता) (1) Marathi Horror Suspense thriller Complete Novel (1) Marathi Kadambari (1) Marathi Kalpanik Katha (2) Marathi Pranay katha (2) Marathi rahasykatha (1) marathi romantic story (7) marathi sexy stories (2) Marathi Short Horror story - (1) Marathi Shrungarkatha.- Bendhund (1) Marathi Tips (1) Mitra -Ek bhutkatha (1) Morgue(भयकथा) लेखिका-निशा सोनटक्के (1) My Horror Experience -Marathi Story (1) N.H.4 (एक भयकथा) -NH4-A Horror Story (1) New Marathi Chawat story (1) Newyork Horror Story (1) One of Great Marathi Horror Story (3) Ouija Board ( विजी बोर्ड ) (2) pratilipi marathi horror stories (1) Rahasykatha (1) satykatha (1) SCI-FI HORROR-Story (1) sexy stories (2) Shivadi (1) Short Marathi horror story (2) SOME OF THE BEST SINGLE HORROR STORIES (43) Suspense (1) The End -Marathi horror story (1) The mama (1) the skeleton key (1) The vampire (1) Thriller (1) UrbanHorrorLegends-Bhutkatha-Real Horror-Vadala (1) अकल्पिता.... एक शापित रहस्य....!!! - By दिपशेखर.. (1) अघोर भाग १२ (1) अघोर भाग ३ (1) अघोर भाग ५ (1) अघोर भाग ६ (1) अघोर भाग 7 (1) अघोर भाग ८ (1) अघोर भाग अकरावा.... (1) अघोर भाग चौथा *** (1) अघोर भाग दुसरा... (1) अघोर भाग सोळावा..-Aghor Part-16 -Marathi Horror Story (1) अघोर अंत-Marathi Horror Story Aghor-Part 18 -End of the story (1) अघोर भाग 13-Marathi Horror Story (1) अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht (1) अघोर भाग 15-Marathi Bhutachi gosht (1) अघोर भाग ९ (1) अघोर भाग दहावा (1) अघोर-Marathi Horror Story (17) अघोर. भाग पहिला... (1) अघोर.. अंतारंभ-Aghor Marathi Horror Stories Part-17 (1) अघोर...एक प्रकांड भय. (1) अतर्क्य (काल्पनिक कथा ) (1) अंतर्मनाची शक्ती... (1) अंधारकोठडी (7) अंधारकोठडी भाग ७ (1) अंधारकोठडी -भाग ६ (1) अंधारकोठडी भाग 1-Marathi Katha-Horror (1) अंधारकोठडी भाग 2-Marathi Katha-Horror (1) अंधारकोठडी भाग 3-Marathi Katha-Horror (2) अंधारकोठडी भाग 5-Marathi Katha-Horror (1) अधुरी प्रेम कहाणी (1) अनपेक्षित -The real horror experience story (1) अनाकलनीय- Marathi satykatha (1) अनामिका- Marathi Romantic Story (1) अनाहूत (भयकथा) (1) अनुत्तरित -by ✍️ दर्शना तावडे (1) अनोळखी ओळख (1) अनोळखी चाहुल -A Terror Story -Read on your risk (1) अनोळखी_ती (1) अभया (1) अमावस्येचा थरार (1) अमिबा-marathi kalpanik katha (1) अर्धनारी – सुहागरात्रीच सरप्राईझ | शृंगार कथा (1) अलवणी (1) अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -12 (1) अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग ९ (1) आई विना भिकारी (सत्यकथा)-True story (2) आगंतूक - The Man From Taured (1) आंगारा (1) आघात (भयकथा) निशा सोनटक्के लिखित (1) आता तुझा नंबर (1) आत्मदाह- Marathi Kalpnik Katha blog (1) आत्मा -bhay katha (1) आत्याची माया - सत्यकथा -marathi satykatha (1) आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकन--marathi romantic sexystory (1) आरशातील_नजर_भयकथा -The mirror horror story (1) इथं...! (1) ईपरित -Read marathi horror katha online (1) उतारा... (का ओलांडू नये...) (1) उतारा... (का ओलांडू नये...) Marathi Ghost Horror story (1) उंदरांचा डोह (गूढकथा) (1) एक अघटीत-bhootkatha (1) एक अनुभव : -Marathi horror experience stories (1) एक_अनूभव.. (1) एक_कळी_सुखावली ! (1) एंटिक पिस-सत्यघटना (1) ओढ.-By Sanjay Kamble..-Real Marathi Horror Stories Online (1) कथचे नाव- भिंत (1) कथा - #वैष्णवी (1) कथा - #सहचरणी भाग २ रा (1) कथा - संचार (1) कथा :- अफझल विला (1) कथा :- अफझल_विला - Part 2-11 All (1) कथा :- नकळत सारे घडले (6) कथा :- नकळत सारे घडले -2 -Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -4-Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -5-Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -6- Marathi Roantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले -Marathi Romantic Story (1) कथा :- नकळत सारे घडले भाग-3- Marathi Romantic Story (1) कथेचं नाव :- मी गिरीजाची मैत्रीन भाग ;- ७ (1) कथेचे नाव - अकल्पिता एक शापित रहस्य -भाग - ४ By दिपशेखर (1) कथेचे नाव - अकल्पिता.. एक शापित रहस्य- भाग 3 -By दीपशेखर (1) कथेचे नाव - टेलीव्हिजन_सिग्नल. - Horror Story -Television Signal (2) कथेचे नाव : HAUNTED COLLEGE-भाग 1 (1) कथेचे नाव : अकल्पिता एक शापित रहस्य -भाग : ५-By #दिपशेखर (1) कथेचे नाव :- (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन -भाग ११ (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन -भाग १२ (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -2 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -3 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -4 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -5 (1) कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha -6 (1) कथेचे_नाव_अकल्पिता....एक शापित रहस्य....!!!- By दिपशेखर..-2 (1) करिष्माची पहिल्या लेस्बियन सेक्सची मजा... अनुभव ... (1) कर्म #By_Sanjay_Kamble (1) कळत-नकळत- real pranay stories (1) काठीवाला म्हातारा.....-Marathi horror stories online (1) कारखान्या तील भुत (1) काळ-marathi suspense story (1) काळरात्र (1) काळाची झडप (1) कुन्दनबाग हॉन्टेड हाऊस (1) कॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स (1) के. सिवन (1) कोकणातल्या भूतकथा (3) कोकणातल्या भूतकथा भाग १-" वांझल्यातला गिरा " (2) कोकणातल्या भूतकथा भाग 3 " वांझल्यातला गिरा "- Marathi horror story- (1) कोकणातल्या भूतकथा-भाग २ " यव काय " ( येऊ का? ) (2) कोणाला सांगशील (1) क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज (1) खजिना-The Real Horror Marathi story (1) खरा स्पॉट ) (1) खारीबुंदीवाल भूत (1) खुर्ची..भयकथा (2) खुर्ची..भयकथा-भाग - १ (1) खुर्ची..भयकथा-भाग - 2 (1) खुर्ची..भयकथा-भाग - 3 (1) खेकडा भाग क्र - १✍️लेखन - शशांक सुर्वे (1) खेकडा भाग क्र -- २✍️लेखन -- शशांक सुर्वे (1) खेकडे (काल्पनिक भयकथा) -Khekade- marathi kalpanik bhaykatha (1) गजू एक हास्य परंतू सत्यभयघटना- Comedy Marathi horror story (1) गणेशभक्त (1) गधेगळ (1) गंमत अशी ही जीवघेणी... (1) गर्भवती भाग 2 (1) गर्भवती भाग 1 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book Part 2 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 3 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part 4 (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग ५ (1) गानू आज्जी आणि तिची अंगाई...-Marathi Thriller story from the Andharwari Book Part भाग 6 (1) गिर्हा- Sweet children horror story (2) गुणाक्का ( पार्ट 2) (1) गुणांक्का ( पार्ट 3) (1) गुणाक्का( पार्ट 1 ) (1) गुपित भुयारी मार्ग (1) गुलाम-काल्पनिक Story (1) गॅरेज -Marathi Handy Horror story (1) गेस्टहाऊस (1) गोरेगांव पूर्व (खरी घटना (1) घर नंबर १३- New latest Marathi horror Story (1) घुंगरु भाग ८ वा (1) घोस्ट रायटर - a writer of ghost (1) घोस्टवाली लवस्टोरी- Ghost Wali Lovestory (1) चकवा -True Horror Story (1) चकवा की मृतात्मा -(सत्यकथा) (1) चिरतरूण- A Real Horror Story - Marathi (1) चिलापी रेंज-Marathi Bhaykatha (1) चेटूक - एक सत्यकथा - A True Horror Story (1) जखीण (repost) (1) जगातला मोठा आणि रहस्यमयी प्रश्न (1) जत्रा - एक भयकथा-Written By - Shrikant Sabale (1) जत्रा एक भयकथा भाग 2 (2) जत्रा एक भयकथा भाग 3 (1) जळका वाडा-Horrible marathi story (1) जीवंत विहीर (1) जीवनरस - Marathi Romanchak goshti (1) जुल्मी संग आख लडी.... (1) जेव्हा भुताची भेट होते. (1) झपाट्लेला वाडा: (1) झोपाळा. - By सुरेखा_मोंडकर (1) टास्क... भय कथा Task -Marathi horror story By Sanjay Kamble (1) डरना मना है ! (1) डाग- Daag the Marathi Horror Story on the blog (1) डिनर (1) डिलेव्हरी-Thriller Gosht (1) डिस्ट्रॉय ग्रेव यार्ड (आयरलैंड) -Some the horror moments (1) तंबाखू (4) तंबाखू - Part 2 (1) तंबाखू -Part1 (1) तंबाखू भाग 3 रा (1) तंबाखू भाग 4 (1) तर... (1) तळघर एका पिशाच्याचा वावर-marathi bhutachi story (1) तळघरातील रहस्य ( गणेश चतुर्थी स्पेशल ) (1) तिची_हाक... (1) तिढा Part 1 - to Part 4 (1) तिढा भाग ८ (1) तिढा भाग Part 5-Part 7 (1) तिरंगा (1) ती आईच होती (1) ती काळरात्र (The Unsolved Mystery) (1) ती काळरात्र (The Unsolved Mystery)-2 (1) ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची-भाग : 1 (1) ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची...-भाग : 2 (1) ती__कोण__होती.. (1) ती__थरारक__रात्र (1) ती_भुतिन-marathi horror stories blogs (1) तु ??? - A Hostel Horror story by Marathi ghost stories blog (1) ते कब्रस्थान ......-Horrible story (1) तो परत उठला आहे (1) दंडक (थरारक भयकथा) भाग - 2 (1) दंडक (थरारक भयकथा) भाग- 3 (1) दंडक (भयकथा)- Dandak Marathi bhaykatha online (1) दत्तक (काल्पनिक कथा) (5) दत्तक (काल्पनिक कथा) भाग २ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ३ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ४ (1) दत्तक (काल्पनिक कथा) भाग ५ (1) दत्तक (काल्पनिक कथा)-1 (1) दबंग - bhutakhetachya goshti (1) दरवाजे -Door Horry Story in Marathi (1) दराक्षी- Read online new marathi stories on this blog (1) दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी (1) दिपु -Small Marathi bhutachi gosht (1) दुसरा अनुभव (1) दुसरे जग-Horror Stories (1) दैवी संपदा लाभलेली झाडे... भाग २ (1) दैवी संपदा लाभलेली झाडे.... (1) नरपिशाच्च - भाग एक-marathi bhutachi gosht (1) नवी जन्मेन मी... भाग 2 (1) नवीन भयकथा-नशा- Navin bhutachi gosht -nasha (1) ना कलंक लग जाए। (1) निरंत (काल्पनिक भयकथा) (1) निरोप -marathi bhutachya goshti (1) निळावंती-Marathi bhutachi gosht (1) निष्प्राण By Ankit Bhaskar ( अंकित भाष्कर) (2) नूरमंजिल कॉलनी -New Marathi Horror Story (1) नूरमंजिल कॉलनी- A Real Horror Series (1) पंगत (1) परिपूर्ण संभोग कसा करावा? (1) पहिला पगार (भयकथा) (1) पाऊस (1) पाऊस -Rainy House story in Marathi (1) पाठराखण (1) पाणेरी... (1) पानाचा बटवा (1) पायवाट -भाग: दुसरा (1) पिंडदान-Marathi bhutachi gosht (1) पिशाच्च (2) पिशाच्च - भाग 01 (1) पिशाच्च - भाग 02 (1) पिशाच्च - भाग 03 (1) पिशाच्च पर्व -Marathi Great Histry (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – १ (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – २ (1) पिशाच्च पर्व -पर्व पहिले – अघोर कालींजर -भाग १ – धडा – 3 (1) पॅरानॉर्मल इन्व्हिस्टीगेशन अँट हॉन्टेड फोर्ट (राजस्थान) (1) पेन्सिल (1) पेन्सिल (भाग दोन)- PENCIL A HORROR TERROR STORY (1) पेन्सिल- PENCIL A HORROR TERROR (1) पेस्ट कंट्रोल....-लेखक - अक्षय शेडगे. (1) पेस्ट कंट्रोल....-लेखक - अक्षय शेडगे... (1) पोलीस चौकी-Marathi Horror Story (2) प्यार तुने क्या किया....-This is a horror story. Sensitive people be careful. (1) प्रपोज – मराठी भय कथा (2) प्रपोज – मराठी भय कथा-2 (1) प्रेमळ भूत -Lovely ghost Marathi Story (1) प्लॅटफॉर्म नं 7 - (भयकथा) - Platform 7 -bhaykatha marathi (2) फक्त पिता- bhutkatha (1) फायनलड्राप्ट (लघुकथा ) (1) फ़ार्म हाउस 😱 ( भाग -१ ) (1) फिरूनी (1) फिलिप-Marathi Horror Novel (1) फ्लॅट- A real horror story (4) बळी-part1 (1) बाभूळभूत.. (1) बायंगी एक सत्यघटना (1) बारीची पारी-Marathi Best story (1) बारीची पारी-Marathi Best story -Part3 (1) बारीची पारी-Marathi Best story -Part4 (1) बिंद्रा नायकिण (1) बिननावाचीगोष्ट.-काल्पनिक भयकथा (1) बेबी (Marathi)-मराठी चावट कथा (1) बेबी (Marathi)-मराठी चावट कथा- Part 2 (1) ब्लड रिलेशन्स (1) ब्लडी मेरी-भाग 1 (1) भयकथा (1) भयकथा-गुप्तधन Bhaykatha-Guptdhan (1) भयकथा: न जन्मलेली बाळं-bhutachi story (1) भयभीत- लेखक :- अंकित भास्कर- Bhaybheet Marathi horror story (1) भयानक गोष्ट-Bhayanak Gosht (1) भावकी- Marathi Pranay katha (1) भासातले_जग ( गुढकथा ) (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 1 -3 (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 4-6 (1) भिज ओल- Marathi Thriller Experience Story 7-9 (1) भुतांचा बाजार (1) भुताचा माळ-Marathi Thararak katha (1) भुताची_कोंबडी- Bhutachi komdi -marathi bhutkatha (1) भूक लागलीय त्यांना -Marathi Horror Stories Website (1) भूषण मुळे सातारकर (1) भेट-Marathi hrudyasparshi katha (1) मंतरलेली_रात्र (1) मदत (1) मदतीचे हात - Bhutachi gosht (1) मनोरमा ......... - Marathi new stories from Marathi writers (1) मनोरुग्ण (1) मनोरुग्ण - भाग आठ (1) मनोरुग्ण - भाग एक (1) मनोरुग्ण - भाग दोन (1) मनोरुग्ण - भाग सात (1) मनोरूग्ण - भाग चार (1) मनोरूग्ण - भाग तीन. (1) मनोरूग्ण - भाग पाच (1) मनोरूग्ण - भाग सहा (1) मयत... (1) मर्यादेच्या आत (1) मला.... बोलवतात -ऐक भयानक कथा (1) मसणवाट! (1) महिला विवाह सल्लागाराने दिला मला आणि माझ्या बायकोला (1) माघारपण- Marathi bhutachya goshti (1) मांजर..-Marathi bhutachi gosht (1) माझी अभया. (1) माझी शेवटची कथा..! ( friendship day spacial) (1) माझे बोन्साय (1) माझे_रडगाणे (1) माझे_रडगाणे (लघुकथा) लेखन-- शशांक सुर्वे (1) माझ्या मुलांना एवढा डबा द्याल का (1) माताराणी (Marathi Chawat Katha) (1) माध्यम..... (1) मानसीचा चित्रकार तो (1) मामा-Marathi karani katha (1) मायकल -भाग क्र -१ -लेखन -- शशांक सुर्वे (1) मायकल भाग क्र - २ (1) माया- ek marathi romanchak gosht (1) माया- Marathi bhutkatha (1) माया-EK Marathi Romanchak Katha (1) मित्र-भयकथा (2) मिरा दातार बाबा - एक सत्य कथा (1) मी गिरीजाची मैत्रिण -अंतिम (लवकरच भेटू) (1) मी गिरीजाची मैत्रीन -भाग :- ९ (1) मी गिरीजाची मैत्रीन -भाग १० (1) मी गिरीजाची मैत्रीन- (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १३ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १४ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १५ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- १६ (1) मी गिरीजाची मैत्रीन-भाग :- ८ (1) मी येऊ का- Horror Blog from maharashtra (1) मी_तुमची_वाट_पहाते- Marathi Stories Portal (1) मुडदा_घर.. (1) मु्त्युचा_जबडा (माझ्या गावी घडलेली पिशाच्चा ची सत्यकथा) (1) मृत्यूचा दिवा (रहस्यकथा) - Marathi Rahasykatha (2) मृत्यूची देवता- Marathi Information about death (1) मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास-गरुडपुराण-Marathi Best Stories on the blog (1) मृद् गंध भाग::-- पहिला -By Vasudev Patil-Nandurbar (1) मृद् गंध -🔖 भाग ::-- आठ-By Vasudev Patil (1) मृद् गंध -🔖 भाग ::-- तिसरा -By vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग ::- सातवा-By Writer Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग ::-- दुसरा- By Vasudev Patil Nandurbar (1) मृद् गंध 🔖 भाग ::-- नववा.-By Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- चौथा-By vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- पाचवा -By Vasudev Patil (1) मृद् गंध 🔖 भाग::-- सहावा-Vasudev Patil (1) मॅडम तुंम्ही बरोबर होता-भयकथा (1) मेनका - भयकथा- Menaka Marathi horror story -bhaykatha (1) मैत्री -A Freind Story (1) मॉल - पार्ट -5 (2) मॉल ( पार्ट 3 ) (1) मॉल ( पार्ट 4 ) (1) मॉल ( पार्ट 6) (1) मॉल ( पार्ट 7) (1) मॉल (पार्ट 1) (1) मॉल (पार्ट 2 ) (1) मोहिनी -Marathi Horror story blog story (1) मोहिनी-EK Marathi bhaykatha (1) यौवन ज्वर.marathi chawat katha (1) रक्षाबंधन(भयकथा)-Marathi bhyakatha (1) रखवालदार-Marathi Bhutachi gosht (1) रखेल... शोकांतिका... (1) रत्नदिप सोसायटी- Marathi Gudhkatha (1) रहस्यकथा (1) रहस्यकथा - Marathi pratilipi (1) रहस्यमयी गुफा....-Bhutakhetachya Goshti (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 3) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 4) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 5) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 6-7) (1) रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 8)- End (1) राखणदार सलामत तो -Marathi Reading blog stories (1) राखणदार-काल्पनिक भय?? (अतृप्त आत्म्याची कथा ) (1) राजकारण- Marathi Pranay Katha (1) रावण संहिता माहिती-Asali Raavan Sahinta (1) रूममेट-Collage time horror story (1) रेल्वेचा बंगला (1) रोमांचकथा (1) लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (भाग १) - (1) लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो (भाग २) (1) लेकीची_फी (1) वय फक्त एक अंक आहे..! - - Marathi Sexy Story online (1) वाड्यातील खिडक्यांचे महत्व. (1) वासनांध- Horror Story marathi (1) विकल्प-Marathi bhaykatha (1) विजय_कुमार- Marathi Bhaykatha (1) विपरीत -Marathi bhutachi gosht (1) विपरीत भाग -१ (1) विपरीत भाग -२ (1) विळखा (2) विळखा - भाग 2 (अंतिम भाग) (1) विळखा - सत्य घटना - MArathi horror story Part1 (1) विवाहित नवरा बायकोची प्रेम कथा. (1) विसावा विहीर - आरे कॉलनी (1) विहिर (1) वेड लावी बावरी नजर-भाग::- एक (1) वेड लावी बावरी नजर-भाग::-- दुसरा (1) वेड लावी बावरी नजर-भाग::---तिसरा (1) वेश्या -लेखन - अक्षय शेडगे Story by Akshay Shendage (1) वेश्यागमनातील त्रूटी आणि धोके... (1) शिकार भाग क्र - १- लेखन :- शशांक सुर्वे (2) शिकार.........(भाग क्र - २) (2) शिघ्रपतनवर उपाय start stop start (1) शृंगारिक कथा - संगीताची धुलाई- (लेखक गंगाधर पाटणकर)- भाग पहिला (1) शृंगारिक कथा - सरिताच्या नवऱ्याची मैत्रीण - भाग १ (1) शेकोटी (लघुकथा) -लेखन :- शशांक सुर्वे (1) शेकोटी.-Romanchak Katha (1) शेवटची लोकल (लेखक -K sawool ) (1) संगणक दुरुस्ती येते कामाला - Marathi pranay katha stories (1) संगम_लॉज (1) संगम_लॉज (भाग तिसरा)- 3 (1) संगम_लॉज - Part 2 (1) संगीत.. - एक सुरमयी भयकथा (1) सत्य कथा.....-True Story (1) सत्यकथा : #प्रेमम.. (1) सत्यातील असत्यता लेखक : अमृता राव (1) समय - ती एक अनाहूत वेळ ! (भाग १) (1) समय-ती एक अनाहूत वेळ..!(भाग २) (1) समुद्र योगिनी (प्रकरण एक ) (1) समुद्र__किनारा (1) सरदेसायाची गढी (1) सरदेसायाची गढी-भाग :-दुसरा (1) सरदेसायाची गढी-भाग:- तिसरा (1) सवाष्ण ********* (1) सहचरणी भाग १ ला (1) सावट भाग -२ (1) सावट💀 भाग -१ (1) सासूमाँ (1) सीता भवन - Marathi Story - Part 2 (1) सीता भवन - Marathi Story - Part 3 (1) सीता भवन - Marathi Story - Part 4 (1) सीता भवन - Marathi Story -Part 5 (1) सीता भवन - Marathi Story -Part 6 (1) सीता भवन-bhutachi gosht (1) सीमा लॉज... (1) सुटका... (1) सुडाचा प्रवास... (1) सुनीताचे धाडस -Marathi love story (1) सुपरफास्ट_भोकाडी. (1) सुलेखाचा टाक (1) सुसाईड... वी.............काल्पनिक लघुकथा (1) सूडकथा-गूढकथा (1) स्त्रियांचे हस्तमैथुन (1) स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद... (1) स्मशानातील पैसे (1) स्वप्न -(लघुकथा) (1) स्वप्न-पार्ट... 2. (1) स्वप्न... पार्ट 1...- Kalpanik katha (1) हातजोडी-देवा धर्माचे गूढ आणि विज्ञान (अधिकृत) (1) ही ओढ रक्ताची (1) ही ओढ रक्ताची-Bhag 2 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 3 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 4 (1) ही ओढ रक्ताची-Bhag 5 (1) हॉस्टेल !! भाग : १- Hostel !! Horror story online Marathi -Part1 (1)