रेल्वेचा बंगला
रेल्वे क्वॉर्टरस मधून जाता येताना त्याला नेहमी ती बंगल्यांची रांग दिसायची. ब्रिटिश कालीन एक एक मजली छोटे छोटे पण दगडी बांधकाम असलेले बंगले. बाहेर छोट्या छोट्या बागा आणि त्याच्यात लावलेले घनदाट मोठी झाडं लहानपणापासून त्याला त्या बंगल्यांचे आकर्षण हो ते. आत मधून कसे असतील हे पहायची तीव्र इच्छा होती पण ना तिथे कोणी ओळखीचं होतं न तिकडे आत मध्ये जाता येत होत. त्याच्या घराकडून दुसऱ्या भागात जाण्यासाठी इतर रस्ताही होता पण हा मुद्दाम रेल्वे क्वॉर्टरस रस्त्यातून जात असे. त्यातल्या त्यात नऊ नंबरचा बंगला त्याला जरा जास्तच आवडायचा एका कोपऱ्यात तिथून पुढे दूरवर पसरलेली झाडी आणि त्यांच्यातून जाणारी रेल्वे लाईन. त्या बंगल्यात राहणारे किती नशीबवान असते हा विचार त्याच्या मनात नेहमी येत असे.
शेवटी तो मोठा झाला शहराच्या दुसऱ्या भागात राहायला गेला पण ते बंगले आत मधून बघायची इच्छा मात्र काही पूर्ण झाली नाही.
कोरोना जगामध्ये धुमाकूळ घालत होता आपल्याकडेही दुसऱ्या दिवसापासून लॉकडाऊन जाहीर केले गेले होते आज शेवटचा दिवस त्यामुळे आज काही कारणाने तो पुन्हा त्यांच्या जुन्या भागामध्ये आलेला होता. येताना मुद्दाम तो त्या बंगल्यांच्या रस्त्याने आला.आता पाहिलं तर सगळे बंगले बंद होते. त्यांच्यावर Abandoned म्हणून बोर्ड लावलेला होता. एकेकाळी सुंदर असलेले बाग-बगीचे जाऊन आता तिथे रानटी झाडे माजलेली होती एकूण रेल्वे क्वार्टर चा तसा तो पूर्ण भागच निर्मनुष्य झालेला होता.
आतातरी आत मध्ये जाऊन ते बंगले पहावे अशी त्यांची तीव्र इच्छा झाली पण वेळ नव्हता म्हणून तो तसाच निघून गेला.
परत यायला त्याला रात्रीचे ९-९.३० झाले. जुन्या सवयी प्रमाणे त्याने तो रेल्वे क्वार्टर चाच रस्ता घेतला. आधीच निर्मनुष्य असलेला रस्ता त्यातले काही दिवे उडालेले असल्यामुळे आणि आसपासच्या अवांतर वाढलेल्या झाडांमुळे थोडा भयानक दिसत होता पण लहानपणापासून तो या रस्त्याने जाता येत असल्याने तसं काही त्याला जाणवलं नाही.
आणि शेवटचं वळण घेता घेता समोर तो नऊ नंबर चा बंगला आला. का कोण जाणे पण त्याने गाडी थांबवली आणि दोन मिनिटे त्या बंगल्यासमोर विचार करत उभा राहिला.
इतकी वर्ष हे बंगले आतुन कसे असतील हाच विचार करत राहिलो आज पाहूनच घेऊ असा विचार त्याच्या मनात आला . इतर काही विचार न करता तो तडक आत शिरला.
बाहेरच्या दरवाजाच्या भिंतीवर त्याने हात फिरवून पाहिला. दगडांचा थंडगार स्पर्श त्याला जाणवला आणि अंगावर एक शिरशिरी उठली. त्याने आत पाऊल टाकलं. थंडगार ओला गडद अंधार जणू अंगावर धावत आला. मुख्य दरवाजा, दोन्ही बाजूला खोल्या मध्ये जिना आणि वर पुन्हा दोन्ही बाजूला खोल्या अशी एकूण त्या बंगल्याची रचना होती. मुख्य दरवाजातून आत आल्यावर त्यांनी आधी दोन्ही बाजूच्या खोल्या पाहिल्या. आत काहीच राहिले नव्हतं. भिंतींची पडझड झालेली होती खिडक्या तुटून गेल्या होत्या आणि काही ठिकाणी लाकडं मारून ती पोकळी पॅक केलेली होती. डाव्या बाजूच्या खोलीतून दूरवर जाणारी रेल्वे लाईन दिसत होती पण झाडांच्या उजवीकडच्या खोलीमधून गार्डनच्या पलीकडे शेजारच्या बंगल्याची भिंत आणि समोरचा रस्ता दिसत होता थोडं फिरून झाल्यावर तो पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाला खोलीतून बाहेर आला तेव्हा तिच्या लक्षात आलं की मुख्य दरवाजा बंद झाला आहे. त्याला आठवले की त्यांनी तो काही बंद केलेला नव्हता झालं असेल हवेने असा विचार करून त्यांनी तो पुन्हा उघडला व वर जाण्यास निघाला. जिन्याने वरती पोहोचला तेवढ्यात पुन्हा धाडकन मुख्य दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज आला . आता खाली गेल्यानंतरच उघडू असा विचार करून त्याने दुर्लक्ष केलं. वरच्या खोल्या बऱ्यापैकी सुस्थितीत होत्या जाळे जळमटे लागलेले होते पण कोणाचातरी वावर असावा अशी जाणीव तिथे होत होती. त्याने आसपास पाहिलं अंधारात काही दिसत नव्हतं मोबाईलच्या उजेडामध्येही जास्त काही पाहणं शक्य नव्हतं शेवटी त्याने त्याच्या आवडत्या खिडकीकडे धाव घेतली . बाहेर पाहिलं. त्याने विचार केला होता तसंच ते दृश्य अंधारातही छान वाटत होतं.
शहराच्या टोकाला असलेला तो बंगला आणि दूरवर जाणारी ती रेल्वे लाईन आसपास फक्त झाडी आणि झाडीच.
अचानक बाहेरचे वातावरण बदलले. धुके पसरले, आत मध्ये देखील काही बदल होत होते. वातावरणात प्रचंड दबाव जाणवायला लागला. इथून लगेच बाहेर निघून जा असे त्याचे मन त्याला सांगायला लागले. आणि तो खरोखर बाहेर जाण्यासाठी निघाला. पण आतापर्यंत समोर दिसणारा दरवाजा त्याला आता कुठेच दिसत नव्हता थोडा मोबाईल घेऊन चाचपडल्यानंतर त्याला तो डावीकडच्या भिंतीकडे दिसलात अरेच्चा आता खिडकीच्या समोरच होता इथे कसा आला असा विचार करून तो त्या दिशेने निघाला अवघे चार सहा फुटांचे अंतर संपता संपत नव्हतं. पंधरा-वीस मिनिटं तो चालतच होता. गलीतगात्र होऊन जेव्हा तो खोलीच्या दरवाजापर्यंत पोहोचला तेव्हा लक्षात आलं की दरवाजा तिथे नाहीच तो त्याच्या मूळ ठिकाणीच आहे. तो पुन्हा दरवाज्याच्या दिशेने निघाला. पुन्हा तीच स्थिती.
खोलीतलं वातावरण बदलत होते कधी अचानक सुगंध येत होते तर कधी अतिशय घाणेरडा दुर्गंध. त्याला आता कसेही करून या बंगल्याच्याच्या बाहेर पडायचं होतं. पूर्ण जोर एकटाऊन शेवटी तो दरवाज्याच्या दिशेने धावला आणि झटक्यात दरवाज्याला लाथ मारून तो बाहेर पडला. जिन्याच्या तोंडाशी आल्यावर त्याच्या लक्षात आलं की बंगल्यात आता कसले कसले चित्र विचित्र विव्हळण्याचे, रडण्याचे असे आवाज यायला लागले होते. तो जिन्याने धडपडत खाली उतरायला लागला पण कितीही मजले उतरला तरी पुन्हा तो पहिल्या मजल्याच्या जिन्याच्या तोंडाशीच पोहोचत होता. तो रडकुंडी आला. किती वाजले काय वाजले काहीही लक्षात येत नव्हतं. शेवटी कुठल्यातरी एका क्षणी त्याला जाणवलं की आपण ग्राउंड फ्लोअर ला आलेलो आहे आणि तो तसाच मुख्य दरवाज्याच्या दिशेने पळाला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण कुठल्यातरी प्रचंड विहिरीत आहोत ज्याला कुठलाही दरवाजा नाहीये ज्या जिन्यावरून तो खाली आला होता तो बऱ्याच फूट वरती आधांतरी लोंबकळत होता. त्याने जोरजोरात आवाज दिले पण कुठे काहीही नव्हता आसपासच्या आवाजाचा जोरात यायला लागले होते दुर्गंधी वाढलीआपली आता इथून सुटका नाही ही जाणीव त्याला झाली आणि तो डोकं धरून विमानास्कपणे त्या ओलसर चिकट भिंती आणि लादी वरती बसून गेला.
लॉकडाऊनमुळे त्याच्या शोध घेण्यावरती बंधन आली तरीही घरच्यांनी त्यांच्या परीने दवाखाने, रस्ते अपघात यांचा तपास केला पण तो पुन्हा कुठेही आढळला नाही.
दोन वर्षानंतर जेव्हा मजूर पुढील तोड काम करण्यासाठी पुन्हा साइट वरती आले तेव्हा त्यांना बंगल्याच्या बाहेर एक गंजकी सडकी बाईक उभी दिसली फक्त सांगाडा शिल्लक होता बाकी कुठली ओळख त्या बाईक वरती नव्हती त्यांनी उचलून ती शेजारी फेकून दिली आणि पुन्हा तोड काम सुरू करायला लागले. दोन दिवसात त्याही बंगल्याचे नामोनिशान मिटले व बंगल्यासोबत 'त्याचेही'.....
------- अमोल पाटील-------
No comments:
Post a Comment