लेखक :- अंकित भास्कर
" हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?"
' तिच्या ' मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनवर एका अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत ' ती ' म्हणाली.
" तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. "
" हा...! कोण बोलताय आपण.....? आई कुठे आहे.......? काय झालंय तिला......? "
समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ' ती ' आश्चर्याने विचारू लागली.
" हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या "
" पण........ "
बोलतच तिच्या हातात असलेल्या मोबाइलचा कॉल कट झाला. समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ती जवळच्या भिंतीचा आधार घेत खालीच बसली. तिच्या हातात असलेला मोबाईल खाली जमिनीवर आदळला. समोर एक अनोळखी व्यक्ती तिच्या आईची अवस्था दुरावल्याची सांगत होता. डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत न्हवते. खरतर ती एका अनोळखी शहरात आपल्या १२ बाय ८ च्या खोलीत एकटीच राहायची. घरची आर्थिक परिस्थिती दुरावल्याने कॉलेज सोबत एक छोटीसी जॉब करायची. एका अनोळखी शहरात अनोळखी ठिकाणी अनोळखी रूममध्ये एकटेच राहण हे तिच्यासाठी खूप नवीन होते. घरात फक्त ती व तिची आई हे दोघेच होते. कॉलेजचा पहिला महिना असल्या कारणाने ती आपल्या आईला सोबतीला आणू सकली न्हवती. तिची ही अवस्था ऐकून तिला रहाऊन राहत न्हवत. आपल्या रुमच्या एका कोपऱ्यात तीच रडण मुसमुसन सुरू झालं होत. काही क्षणात तिच्या मोबाइलच्या नोटिफिकेशन ट्यून ने तिचा लक्ष वेधून घेतलं. तशी ती थोडी भानावर आली. पांढऱ्या रंगाच्या बल्बच्या प्रकश्यात पूर्ण रूम पांढऱ्या रंगाच्या भिंतीने आणखीनच गडद वाटत होत. रूमच्या एकीकडे एक लाकडी कपाट, एक छोटंसं बेड, बाजूला असलेल्या टेबलावरील प्लॅस्टिकच्या भांड्यात असलेल्या फळांच्या बाजूला चकाकत असलेला प्यूर स्टेनलेस स्टीलचा चाकू जे बल्बचा उजेडात चमचम करत लकाकात होता. पण तिला ह्या कोणत्याच गोष्टीचा भान न्हवता. भान होता तो फक्त मोबाईलवर आलेल्या त्या बातमीचा.. मोबाइलचा पासवर्ड खोलून नोटीफिकेशन बघितल तर एक मेसेज तिथं आलेला. मेसेज वाचून आपल्या मैत्रिणीला कॉल केलं. तीन रींगच्या नंतर समोरून एक आवाज आला.
" हॅलो.. हा बोल ग ह्या वेळेला का बर कॉल केली सगळे झोपले आहेत. वेळ बघितली आहेस काय..? रात्रीचे दिढ वाजलेत. ह्या वेळेला काय झालं..? "
" अग माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मला कॉल आला होता. तू प्लीज माझ्या रूमवर येऊ शकते काय..? मला काय करावं हे समजत नाही आहे.. प्लीज ये न.."
" थोड नीट सांगशील का काय झालं ते...?"
" तू प्लीज ये न मला खूप भीती वाटायला लागली आहे.."
" भीती आणि तुला .... कधीपासून.....?"
मस्करीच्या स्वरात आलेल्या आवाजाला उत्तरत ती समोर बोलू लागली.
" प्लीज तू लवकर ये खरंच भीती वाटायला लागली आहे.."
" हम्म... ठीक आहे घरून निघतांना कॉल करते ठीक आहे...."
इतकं बोलून कॉल कट झाला. तशी तिची नजर पूर्ण रुमभर फिरू लागली. एक अनामिक भीतीने तिच्या मनात घर केलेलं. भीती... भीती कसली हे पण तिच्या समजण्या पलीकडचे झालेले. अचानक रूमचा बल्ब चरचर करत खाडकन फुटला. तस लकाकणाऱ्या रूममध्ये काळोख पसरला. सगळ काही शांत झालं होत. त्या भयाण शांततेत तिची वाढत चालणारी काळजाची धडधड मात्र तिला स्पष्ट ऐकू येत होती. भीतीने घश्याला कोरड पडलेली. अशातच ती पाणी पिण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी वडली. रूममध्ये भयाण काळोख पसरलेला असल्या कारणाने बाजूच्या लाकडी टेबलावर असलेल्या माचीसची काडी उगारली तशी ती जागेवरच स्तब्ध झाली. समोरच दृश्य बघून काळीज जोरजोरात धडधडू लागलं. एक काळीकुट्ट मानवी आकृती तिच्या समोर येऊन कुठेतरी काळोखात नाहीशी झाली. हातात पेटत असलेल्या कडीच्या फिक्कट नारंगी उजेडात ती मानवी आकृती स्पष्ट दिसत होती. तिचे लाल तांबूस रंगाचे डोळे माचीसच्या काडीच्या त्या फिक्कट नारंगी उजेडात आणखीनच गडद वाटत होते. तो दृश्य बघून ती दोन पाऊल मागेच सरकली. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी रूमची बेल वाजवली. तशी तिची भीती आणखीनच जोर पकडू लागली. तशी पुन्हा एकदा बेल वाजली. आता ती हळूहळू रूमचा दरवाज्याकडे निघाली. हळूच दार उघडल तर तिची मैत्रीण तिथं आलेली. तिला बघताच ' ती ' तिला कवटालीच. अश्रूंचा वर्षाव सुरू झाला.
" काय झालंय..? इतकी काय घाबरली आहे...? "
" आई.........."
धमसून रडत आपली परीस्थिती सांगत होती. तिला पकडताच तिची मैत्रीण रूमचा आत आली. ' सिमाच्या ' घशाला कोरड पडल्याकारणाने ती आपल्या मैत्रिणीचा हात सोडत आत किचन मध्ये गेली थोडंसं पाण्याचा घोट घेत मागे बघितल तर तिची मैत्रीण कुठेच दिसत नव्हती. तिला शोधत ती दरवाज्याच्या दिशेने निघाली तोच बाजूच्या मोबाईलची रिंग झाली. मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज आला.
" हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "
To be continue.......
भयभीत भाग 2
लेखक :- अंकित भाष्कर
मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज आला.
" हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "
आता पुढे
" हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "
समोरून येणाऱ्या आवाजाने ती पूर्ती हादरून गेली. तिची भेदरलेली नजर मिनिटापूर्वी आलेल्या आपल्या मैत्रिणीला शोधू लागली. ती कुठेच दिसत न्हवती पण समोर तिची तीच मैत्रीण रितिका रागातच बोलत होती. समोरच आपल्या मैत्रिणीच आवाज ऐकताच ती जागेवरच स्तब्ध झाली. काहीच न बोलता तिच्या हातातील मोबाईल खाली जमिनीवर पडला. तस रूमचा उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याच्या झोक्याने तिला स्पर्श केला. वाऱ्याच्या झोक्यासरशी रुममध्ये पेटत असलेल्या मेणबत्तीचा फिक्कट नारंगी उजेड कमी कमी होत बंद पडला आणि पुन्हा एकदा रूममध्ये काळोख पसरला. काय घडत आहे हे तिच्या समजण्या पलीकडचे झालेले. रूममध्ये पसरलेल्या गडद अंधारात काय करावं काय नाही समजत नव्हते. तस थंड वाऱ्याच्या झोक्याणे खिडकीचा दार जोरजोरात खिडकीवर आदळू लागल. तस खिडकीबाहेरच्या नितळ चांदण्यात एक वटवाखुड आपल्या पंखांची फडफड करत आपल्या चोचीने जोरात चित्कारन्याचा प्रयत्न करत होता. त्याची ती पंखांची फडफड आणि त्याचे ते भयानक चोचीतून निघालेले चित्कार त्या भयाण शांततेत तिला हृदय विकाराचा झटका देण्यासाठी पुरेसे होते आणि काही क्षणात ते वटवाघूळ आपल्या पंखांची फड फड करत समोर निघून गेलं. तस तिच्या रूमच्या दरवाज्यावर कुणीतरी जोरात थापा मारू लागला....ती पूर्ती दचकून गेली. तशी पुन्हा एक भीतीची लहर अंगाला स्पर्श करून गेली. भीतीमुळे अंगातून माथ्यावर घाम येऊ लागला. दारावरच्या थापा सुरूच होत्या. ती दरवाज्याकडे निघाली. दोन पावलं समोर निघालीच होती की सारकाही एकदम शांत झालं.. सारं काही... जोरात खिडकीवर आदळणार खिडकीच दार, त्या भयाण वटवाघुलाची पंखांची फडफड, त्याच्या चोचितून निघणारी भयानक चित्कार, दरवाज्यावर पडणारी जोराची थाप......सार काही......आवाज होता तो फक्त वाढत जाणाऱ्या तिच्या काळजाच्या ठोक्याचा.. काळीज जोरजोरात धडधडत बाहेर येत असल्याचं जाणवत होत. डोक्यात विचारांचा काहूर माजलं होत. तिची नजर आता काळोखाने माखलेल्या गाहऱ्या अंधाऱ्या खोलीत चौफेर फिरू लागली. काळोख असल्यामुळे गहऱ्या अंधाऱ्यात दाट पांढऱ्या रंगाच्या मेमबत्तीच्या शोधात चाचपडू लागली. शेवटी मेणबत्तीचा शोध लागलाच. मेणबत्ती हातात घेऊन मेणबत्तीच्या बाजूला असलेली माचीशची एक काडी घाईघाईतच उगारू लागली. काडी उगरताच पांधऱ्या मेणबत्तीचा फिक्कट नारंगी उजेड गहऱ्या अंधाराला चिरत पूर्ण रूमभर पसरला. मेणबत्ती हातात घेऊन बाजूच्या टेबलावर ठेवली. तशी पुन्हा एकदा दरवाज्यावर थाप पडली. आता तिच्या अंगातील उरल सुरल अवसानही गळून पडलं. आश्चर्याने मागे बघत ती जागेवरून उठली आणि जागेवरच बेशुद्ध पडली......पण दरवाज्याच्या थापा मात्र सुरूच होत्या.......
दुसरा दिवस
" हे बघा, तुम्हाला त्यांच्या सोबत काय घडले हे मला सांगायलाच हवे नाहीतर आम्हाला त्यांची मानसिक स्थिती जाणून घ्यावी लागेल."
फाईलमध्ये असलेल्या एकएक कागदांना चाळत एक वयस्कर इसम आपल्या समोर बसलेल्या एका तरुणीला आपल्या रुग्णाच्या विषयी पुर्ण माहिती विचारून घेत होते.
" डॉक्टर.. तिच्या विषयी मला पुरेपूर्ण माहिती तर नाही पण काही दिवसा अगोदर तिच्या आईने एका कार एक्सीडेंटमध्ये देवाला नमस्कार केला. त्या प्रसंगानंतर ती पूर्ती हादरून गेली होती. घरची आर्थिक परिस्थिती खूप दुरावली असल्या कारणाने नातेवाईकांनी सुध्दा तिचा हाथ सोडून दिलं पण तिची मानलेली लहान बहिणीला ती आवडत नसे. श्याळेत सर्वात हुशार आणि गुणी मुलगी म्हणून शहराच्या कॉलेजमध्ये तिथल्या शिक्षकांनी तिचा प्रवेश करून दिला. पण तिला तिच्या आईचा खूप लडा लागलेला. तिच्या आईच्या आठवणी काही केल्या तिच्या डोक्यातून जात न्हवत्या. आईच्या आठवणी विसरायला हवेत म्हणून शहरात एक छोटीशी जॉब लाऊन तिथं काम करू लागली. गेले 2 महिने सगळ काही सुरळीत चाललं होत पण काल रात्री दीडच्या सुमारास तिचा मला कॉल आल आणि........"
समोर काही बोलणार तोच बाहेरून कुणी आत येण्यासाठी परवानगी मागितली तस डॉक्टर साहेबांनी मानेवरूनच खूनावल आणि एक तरुण डॉक्टरांच्या समोर टेबलावर एक फाईल मांडून निघून गेला.
" ओह सॉरी, प्लिज आपण सुरू ठेवा.."
" डॉक्टर काल रात्री मला दीडच्या सुमारास कॉल आला आणि तिने मला रूमवर बोलावलं. बोलतांनी ती थोडी अस्वस्थ वाटत होती. तब्बल 2 तास मी तिला कॉल करत राहिले पण तिचा कॉल लागत न्हवता. शेवटी तिचा कॉल लागला पण ती समोरून काही बोलण्याचा आत कॉल कट झालं न राहून मला तिची काळजी वाटत होती. शेवटी काय झालंय हे बघायला मी तिच्या रूमवर गेले. रुमची बेल वाजवली पण काम करत न्हवती. शेवटी दरवाज्यावर थापा मारायला सुरुवात केली. ती काही प्रतिसाद देत न्हवती आणि नाईलाजाने मला तिच्या दरवाज्याची कडी मोडावी लागली. आत बघितल तर ' ती ' बेशुद्ध पडली होती. हाताजवळ एक धारदार चाकू जमिनीवर पडला होता. त्या नंतर मला काही समजण्याच्या आत मी अंबुलेन्सला कॉल केला आणि तिला इथे घेऊन आले. "
" हम्म... हे बघा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.. आणि तुमच्या सांगण्याच्या अनुमानाने त्यांना कोणताच मेंटल स्ट्रेस दिसत नाही आहे.."
डॉक्टरांच्या रुग्णाची अवस्था दूरावल्याचे कारण ऐकून ती थोडी रडतच बोलू लागली.
" डॉक्टर प्लिज तिला लवकर बर करा ती माझी एकुलती एक मैत्रीण आहे. "
तस बाहेरून एक कर्मचारी डॉक्टरांच्या केबिनकडे धावत आले.
" साहेब बेड नंबर 46 च्या रुग्णाची अवस्था खूप बिघडली आहे. "
तसे डॉक्टर आणि ते कर्मचारी धावत केबिनच्या बाहेर पडले. तशी ती सुध्दा बाहेर पडली. दरवाज्याबाहेर फिक्कट पांढऱ्या रंगाच्या काचेच्या आत लक्ष गेलं आणि काही क्षणात डॉक्टर खोलीच्या बाहेर आले.
" I Am Sorry, आम्ही आमचा खूप प्रयत्न केला पण सीमाला वाचवू शकलो नाही. पण त्यांच्या ब्लडमधून जास्त प्रमाणात अमल आणि काही मेंटल स्ट्रेस औषध्या सापडल्या आहेत. ज्यांना घेऊन एक सर्व सामान्य व्यक्तीला मेंटल स्ट्रेस किव्वा कुणी असल्याचा भास होण्याची शक्यता असते. हे तेव्हा होते जेव्हा त्या औषधीची सुरुवात झाली असते आणि हळूहळू ती औषधी त्या व्यक्तीच्या जीवाशी खेळायला लागते आणि शेवटी तो व्यक्ती आत्महत्या, जीवघेणी, इत्यादी प्रकाराने आपला जीव गमावून बसतो. ही पण तशीच केस आहे. पण तुमच्या सांगण्यानुसार सीमा काही अमल आणि औषधी घेऊ शकत नाही तर त्यांना कुणीतरी दिली असणार..."
बोलतच डॉक्टर आपल्या केबिणकडे निघाले. रितिका रडतच सिमाच्या खोलीकडे निघाली. तिच्या बेडजवळ जात तिला म्हणाली.
" सॉरी पण मी तुला वाचवू शकले नाही ताई....."
आणि एक गुड स्मितहास्य करत रुग्णालयाच्या बाहेर निघू लागली. पण सीमाच निष्प्राण झालेलं शरीर भयभीत नजरेने रीतिकाकडे पाहत बसला.........
समाप्त
कथेचे © सर्व लेखकाच्या स्वाधीन
कथा कशी वाटली आणि कथेत काही सूचना असल्यास नक्की कळवा . काही नवीन प्रकाराने कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे. कथेविषयी आपले मत नक्की मांडावे. जास्त काही विचार न करता आपण कथेचा आनंद घ्यावा
No comments:
Post a Comment