"वेश्या"
लेखन - अक्षय शेडगे
ही कथा २००२ मधली आहे... माझ्या मित्राच्या आजीचं नाव शांता.. आणि त्यांची जिवलग मैत्रीण म्हणजे पारू.. सगळे त्यांना पारू आत्या म्हणायचे...
दोघींचं वय हे ७५ च्या पुढेच...
म्हणजे अगदीच खचल्या होत्या आता दोघी....
शांता आजी सकाळी उठून आवाजाचा कानोसा घेत होती ,. हा आवाज रडण्याचा होता.. तिने नीट ऐकले तर हा आवाज पारूच्या सुनेचा म्हणजेच ज्योतीचा होता.. तडक त्या उठून शेजारीच असणाऱ्या घराकडे गेल्या...
तिथं जाताच त्यांना कळलं की पारू आजी खूपच आजारी होत्या... डॉक्टर आलेले पण त्यांनी नातेवाईक बोलवून घ्या अस सांगितलं.. त्यामुळेच ज्योतीने टाहो फोडला होता.. छोटी सून आणि मुलगा मुंबईला होते.. त्यांना फोन करून कळवायच ठरलं... पण काहीच वेळात पारू आजी थोड्या उठून बसल्या... लागलीच ज्योतीने त्यांना चार घास भरवले... शांता आजी तिथेच होत्या..
" मला वाटलच होत भिण्यासारख काय न्हाय... हे बनावटी डॉक्टर असच सांगून पैसा लुटतात... " आपल्या मैत्रिणीला उठलेलं बघून शांता आजीने डॉक्टरच्या नावाने चांगलीच बोट मोडली....
म्हणून कोणत्याच नातेवाईकांना कळवल नाही... दुपारपर्यंत शांता आजी तिथेच बसल्या आणि मग जेवणासाठी घरी निघून गेल्या..
संध्याकाळी एक फेरी झाली त्यांची आणि मग त्या झोपी गेल्या .. रात्री २ वाजता...
ज्योतीच्या रडण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला...
यावेळी आवाज खूपच मोठा होता.. शांता आजी उठल्या आणि त्यांचा मुलगा सुनीलला घेऊनच शेजारच्या घरात गेल्या..
तिथं पोचल्यावर त्यांना समजलं की पारू आजी यांची प्राणज्योत मालवली होती... गावातले २-४ लोक आले होते.. पण गाव तास छोटच होत..
आता सगळ्या नातेवाईकांना फोन करण्यात आले.. आणि सकाळी लवकरच सगळे पोचतील आणि मग नंतरच अंत्यविधी सुरू होईल असा समज झाला म्हणून गावातले काही लोक झोपून सकाळी लवकर उठून यायला जमेल... म्हणून परत घरी जाऊन झोपले...
शांता आजीने सुनीलला झोपायला पाठवले.. आता त्या घरात फक्त ज्योती, शांता आजी, ज्योतीचा नवरा दीपक आणि त्यांची मुलगी स्वाती.. स्वाती झोपली होती कारण त्या छोट्या जीवाला काय चाललय हे माहीत नव्हत...
आणि पारू आजीच मढ.... एवढेच होते...
अस म्हणतात की रात्री अपरात्री जर कोणी मरण पावलं तर ते मढ
रात्रभर जागवायच असतं...
ते तिघे जागे होते...
ज्योती आणि दिपकला झोप अनावर झाली होती कारण आधीची रात्रपण त्यांनी जागून काढलेली... आणि रडल्यामुळे ज्योतीच डोकं भयंकर दुखत होते... शांता आजीची दुपारची झोप नव्हती झाली म्हणून त्यांच्या डोळ्यावर पण झापड होती...
पण त्यांनी पुढाकार घेऊन.. ज्योतीला थोडा वेळ पडायला सांगितलं..
डोक्याच्या वेदनेने ती बिचारी झोपली... आणि काहीच वेळात दीपक ....
शांता आजी जाग्या होत्या.. त्या त्यांच्या लाडक्या मैत्रिणीला न्याहाळून बघत होत्या... सगळ्या आठवणी आठवत होत्या... आणि काहीच क्षणात त्यांचा डोळा लागला...
सगळा अनर्थ इथेच घडला...
काहीश्या आवाजाने ज्योतीला जाग आली तर तिने पाहिलं की पारू आजी उठून बसल्या होत्या.. नाकातले कापसाचे बोळे काढून ठेवले होते .. आणि ज्योतीकडेच बघत होत्या...
हे बघून ज्योती जोरात किंचाळली... चक्करच येणार होती तिला.. तिच्या आवाजाने शांता आजी आणि दीपक उठले..
सगळे खूप चकित आणि हैराण झाले, कारण त्यांचा जीव तर गेला होता मग त्या जाग्या कश्या झाल्या?
त्यांनी पाणी वगैरे मागितले.. पाणी दिले... काहीच वेळात पहाट झाली.. सगळे नातेवाईक आले .. त्यांना जिवंत बघून सर्वानाच आनंद झाला.. तर काही जण लांबून आलेले म्हणून त्यांना थोडा रागही आला... वर्तमानपत्रातही बातमी आली ..
शांता आजींच्या मनात वेगळीच शंका होती पण त्या कोणाला काही बोलला नाहीत...
२-३ दिवसांनी त्यांची शंका त्यांना खरी वाटली... कारण नववारी साडी घालणाऱ्या पारू आजी आज सहावारी साडी घालून अंगणात बसल्या होत्या... आणि त्यांनी चक्क दिपकला गजरा आणायला सांगितला... त्यांचा राग बघून दिपकने आणून दिला...
अस रोजच घडत होत.. दिपकला आणि ज्योतीला काही कळत नव्हतं.. त्याचा मुंबईचा भाऊ आणि त्याची बायको दोघेही काही दिवस गावाला राहायला आले होते...
एक दिवस तर हद्दच झाली...
स्वातीची लिपस्टिक लावून , गजरा घालून पारू आज्जी दारात बसल्या होत्या.. आणि काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इशारे करू लागल्या... त्यात त्यांचा लहान मुलगाही होता ..
त्याने ही बातमी दिपकला कळवली..
आणि बघता बघता ही बातमी सगळ्या गावात पसरली...
पारू आजीच शरीर खूप थकल होत म्हणून तिला जास्त हालचाल करायला जमत नसे.... ती फक्त तसा वेष घेऊन दारात बसायची...
शांता आजींचा संशय खरा निघाला... त्यांनी दिपकला सांगून एक मांत्रिकाला बोलावून घेतलं...
मांत्रिक घरी आला त्याने झालेलं प्रकरण पाहिलं... आणि त्याला काय झालं माहीत नाही ... तो काहीच न करता घराबाहेर निघून गेला...
२ दिवसांनी खबर मिळाली की त्याने डोंगरावरून उडी मारून जीव दिला... सगळेजण खूप घाबरले होते .. समोर काहीच उपाय दिसत नव्हता..
अशातच गावच्या एका माणसाने... त्यांचं नाव हरीश .. ते दत्तसंप्रदायातील होते.. त्यांनी शांता आजींना सांगितलं की... पारू आजींना घेऊन तुम्ही गाणगापूरला जावा.. तिथं नक्कीच तुमची मदत होईल...
तर ठरल्याप्रमाणे दीपक, ज्योती, शांता आजी, दिपकचा लहान भाऊ आणि पारू आजी सगळे गाणगापूर येथे निघाले..
जाताना पारू आजी खूप त्रास देत होत्या... पण देवाची साथ म्हणून ते गाणगापूरला पोचले...
तेव्हा सकाळचे ९ वाजले होते...
तिथे जाताच त्यांना एक गुरुजी दिसले.. त्याच्या चेहरा खूप तेजस्वी होता.. त्यांनी हे प्रकरण बघून लगेच त्यांना "त्रिवेणी संगम" येथे जाऊन अंघोळ घाला, त्या नंतर औदुंबर झाडाला प्रदिक्षणा घालून मग भस्माच्या डोंगराला नेऊन शेवटी मंदिरात आणायला सांगितलं.. आणि ते निघून गेले..
हे सगळेजण त्रिवेणी संगमावर पोचले.. सर्वांनी अंघोळ केली.. पारू आजी जरा शांत झालेल्या.. थोड्याशा रडत होत्या ...
काही वेळात त्यांनी प्रदक्षिणा संपवून .. भस्माच्या डोंगराकडे गेले...
तिथं पोहचातच पारू आजी यांनी आकांड तांडव सुरू केला... जोरजोरात किंचाळी लागल्या.. ज्योतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला पण त्यांनी तिला जोरात धक्का दिला म्हणून ती लांबच थांबली...
त्यांना २-४ माणसांनी पकडून शेवटी मंदिरात आणल... तेव्हा आरती चालूच होणार होती... जश्या त्या मंदिरात पोचल्या.. नगारे वाजायला सुरुवात झाली... आणि पारू आजी इथेही सुरू झाल्या..
त्या दत्त महाराजांच्या मूर्तीकडे बघून जोरजोरात शिवीगाळ करू लागल्या ..
ए दत्त्या ... ए दत्ता.. म्हणत शिवी देऊ लागल्या ..
काही वेळाने त्यांनी जोरजोरात डोकं आपटायला सुरुवात केली... मंदिरात आरती तशी मोठीच असते ...
एवढ डोकं आपटून तिथं काहीच जखम नव्हती... शेवटी असच डोकं आपटून झाल्यावर आरती संपली... आणि पारू आजी जोरात ओरडू लागल्या...
काही वेळात ते गुरुजी तेथे आले आणि त्यांनी जे काही सगळ्यांना सांगितले ते ऐकुन सगळे खूप अवाक झाले...
जेव्हा पारू आजी वारल्या तेव्हा त्याचं मढ जागवताना तुम्ही सगळे झोपले म्हणून एका आत्म्याने यांचं शरीर धरल... त्या तर केव्हाच मरण पावल्या होत्या, इतके दिवस तो आत्मा त्यांना हे करायला भाग पाडत होता....
आणि मुख्य म्हणजे तो आत्मा एका वेश्येचा होता..
आता काहीच वेळात यांचं शरीर पूर्ण निकामी होईल.. मग तुम्हाला त्यांचे अंत्यसंस्कार इथेच करावे लागतील...
काहीच वेळात त्यांचं शरीर निकामी झाले... त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.. शांता आजींना आपल्या मैत्रिणीच अस झालेलं बघून वाईट वाटल...
पण जे व्हायचं ते झालं होत...
जाताना त्यांना गुरुजींनी एक बांधणी करून दिली आणि ती घरात बांधायला सांगितली... सगळे घरी आले..
आणि तेव्हापासून वर्षातून एकदा ते गाणगापूरला न चुकता जातातच...
समाप्त
No comments:
Post a Comment