Ek Chotishi Marathi Bhutachi Gosth
सुमारे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ..
माझी बहिन डेलिवरी साठी घरी आलेली ..
दीवाळी चा प्रसंग ..
बहिनीला मुलगी होऊन जेमतेम 20 दिवस झाले असतील,
त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या घरी रहात असु ..
तीथे धनगरांच्या कळपातील एका गरोदर स्त्री ने त्याच झाडाला लटकुन आत्महत्या केली होती ..
तो लक्ष्मीपूजन चा दिवस होता ..
मी एक हॉटेल व्यावसायिक..त्यामुळे सहाजिकच लक्ष्मीपूजन करून घरी येईपर्यंत रात्रीचे 10 वाजलेले ..
आईने दिवालीमुळे मस्त पूरणपोळ्यांचा बेत केलेला ..
वडील आणि मला आई बोलली की तुम्ही गरम गरम पोळ्या होत आहेत जेवायला बसा ..
दमल्यामुळे आम्ही जेवायला बसलो ..
गरमागरम भजी जेवणाला अजूनच स्वाद देत होते ..
बहिन बाळाला दूध पाजत होती ..तशी आईने एक भजीची प्लेट तिच्यासमोर सरकावली ,
दाजी आणि बहिन दोघेही आईटी मधे उच्च पदावर होते ..
रात्री त्यांचे उशिरापर्यंत कॉल्स चालत असत ..
दिवाळी असल्याकारणाने लोक उशिरापर्यंत फटाके वाजवत होते ..
आमच्याबाजुला काही भय्ये मुल रहात होती ..ते खुप मोठ्या आवाजाचे फटाके वाजवत होते ,त्यामुळे बाळ पण दचकत होते ..
वैतागुन बहिन त्यांना सांगण्यासाठी तशीच भजी खात खात गॅलरी मधे गेली.
त्यांना बोलण्याचा आवाज आमच्या कानी आला होता ,नंतर बराच वेळ काही ऐकायला आले नाही ..
आमचे जेवण झाले , मस्त बडिशेफ खात खात आम्ही बातम्या पहात होतो ..
आईने बहिनीचे आणि तिचे जेवण लावले ,व तिला जेवनासाठी 5-6 वेळा आवाज दिला,तिचा तिकड़ने कहिहि एक रिप्लाई आला नाही ,
आम्हाला वाटले कदाचित ती दाजींसोबतच बोलत असावी म्हणुन आईने पण जेवायला घेतले .. पण न राहून आई तिला बघायला गैलरीत गेली !!
5-10 मिनिटे काहीच कुणाचा आवाज नाही ..मग अचानक गैलरीतून धाड़ धाड़ असा दरवाजाचा ापटनयाचा आवाज आला ..
तसा मी गैलरीत धावत गेलो अणि पहातो तर काय ?? अजुनही ते दृश्य आठवले की अंगावर शहारे yeतात ..
माझी बहिन माझ्या आईच्या छातीवर बसलेली आणि दांत ओंठ खात तिला शिव्या देत वेगळ्याच भाषेत बोलत होती ..
माझ्यासाठी हे वेगळेच आणि नविन होते ,
हे दृश्य बघून मी जोरात बहिणीवर ओरडलो आणि आईची सुटका करण्यासाठी धावलो ,तर बहिनीने एका झापडितच मला उल्टा केला ,
पण मी कशे बसे आईला तिच्या तावडीतून सोडवले, आणि ारडाओरड करुण बिल्डिंग मधल्या लोकांना बोलवले ..
बहिणीच्या डोळ्यांची बुबुळे मोठी झालेली ,चेहेरा लालभड़क झालेला .. हिम्मत करुण वरच्या आजी पुढे आल्या त्यानी बहिनीला विचारले काय झाले बाळा? तर ती दांत ओठ खात वेगळ्याच भाषेत बोलु लागली ..मला भुक लागली मला पालात जायचय मेथिची भाजी आणि भाकरी मागु लागली ..
आमच्या तर बत्याच गुल झाल्या हे सगळे पाहून..बाळ पण रडू लागले आता करायचे काय तेच समजना..
ती एकीकडे हसायची काय !दांत काय खायची आम्ही सगळे घाबरे झालेलो ..
मग कुणीतरी जाऊन मशिदितील मौलाना ना घेऊन आले ..तशी बहिन ारदा ोरडा करू लागली चित्र विचित्र आवाज काढू लागली,मग त्याने काही मंत्र पुटपुटत मोरपिसाचा झाड़ा केला ..तशी ती काही वेळाने शांत झाली ..मौलाना मंत्र पुटपुटत चली जा चली जा ओरडत होता ..
1-2 तासाने ती शुद्धीवर आली आणि जनु काही झालेच नाही अशी ती वागत होती .. भीतीने रात्रभर आम्ही काही झोपलो नाही ..दुसर्यादिवशी सगळे काही नॉर्मल होते .. रागाने मी 4-5जुड्या मेथीच्या तिला आणून दिल्या आणि खा म्हणालो अजूनही प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो आणि मेथिची भाजी खायचीच सोडली कायमची
लेखक
प्रसाद हांडे
No comments:
Post a Comment