कुन्दनबाग हॉन्टेड हाऊस
साल 2002 मधे हैदराबाद मधे घड़लेली एक पैरानॉर्मल घटना,ज्या घटनेने पोलिस दल ही चक्रावून गेले आणि आज वर ति घटना एक अनसॉल्वड मिस्ट्री बनून राहिली.
हैदराबाद च्या कुन्दनबाग नावाच्या पॉश एरियातील एका बंगलो मधे एक फॅमिली रहात होती.
नवरा,बायको आणि त्यांच्या दोन लहान मुली.
ही फॅमिली खूप विचित्र स्वभावाची होती,
ते नवरा बायको कुणाशी बोलत नसत ना कुठे बाहेर जात येत असत.
पण रात्रि अपरात्री त्यांच्या घरातून ओरडण्याचा,किंचाळण्याचा आवाज येत असे.
काही दिवसांनी तो नवरा घर सोडून निघून गेला तो परत कधी आलाच नाही.आता त्या घरात ति बाई आणि तीच्या दोन मुलीं सोबत रहात होती,दिवस भर ति बाई त्या मुलीं सोबत खेळत असायची..घरात कोणी कमावत नसताना त्यांच,राशन,लाइट बिल,मेंटनन्स इत्यादि चा खर्च कसा निघत होता हे एक कोड होत....
असेच दिवसामागुन दिवस जात होते पण त्या तिघिनचा खर्च कसा निघत होता हे कळत नव्हतं.
एक दिवस एक चोर रात्री त्या बंगल्या मधे चोरी करायला गेला असता त्याला तिथे एका रुम मधे तीन डेड बॉडीज दिसल्या,त्या तिन्ही बॉडीज फिमेल च्या होत्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या....
लागलीच चोराने पोलिस स्टेशन ला कॉल करून सदर हकीकत सांगीतली.आधी पोलिसांना त्या चोरावर संशय होता,चोरिच्या उद्धेशाने त्या तिघीनचा मर्डर करून बनाव रचल्याचा.....
पण हा संशय खोटा ठरला कारण पोस्टमार्टम रिपोर्ट मधे त्या तिघिना मरून 6 महीने झाले होते.
आता पोलिसांनी इंवेस्टिगेशन सुरु केली असता अजून एक चकित करणारा धक्का बसला तो म्हणजे जेव्हा त्या फॅमिली बाबत पोलिसांनी आजुबाजूच्या रहीवासियांकड़े त्या तिघीनच्या 6 महिन्यानपुर्वी झालेल्या डेथ ची चौकशी केली असता त्यांच एकच म्हणन होत की कस शक्य आहे हे...... काल परवा पर्यंत त्या बाई ला तीच्या दोन्ही मुलीं सोबत बंगल्याच्या लॉन मधे आम्ही खेळताना पाहीलय इतकच नाही तर त्या बाईच्या हातात एक काचेची बॉटल होती ज्यात लाल रंगाच पाणी होत बहुदा ते रक्त असाव आणि सेम तेच पाणी तीच्या मुलीच्या हातात असलेल्या प्लास्टीक bag मधे ही होत.
त्या रोज बंगल्यातून अवघ्या 2 मिनीटाच्या अंतरावर असलेल्या कचरा कुंडित कचरा टाकायला कार मधून येत व कचरा डंप करून कार मधून जात असे...
त्या अवघ्या 2 मिनीटाच्या अंतरावर यायला ही कार का यूज़ करत व क़ाय कचरा कुंडित टाकून जात हे कोणासही कळत नव्हते......
पोलिसांनी त्या बंगल्याची झड़ती घेतली असता त्यांना तिथे black magic करीता जे तांत्रिक लोक सामान वापरतात ते मिळाल होत सर्व सामान जप्त करून तो बंगला सील करण्यात आला..
पण काही दिवसांनी परत त्या बंगल्यातून त्या तिघीनच्या हसण्या खेळण्याचे,भांडणाचे किंचाळण्याचे आवाज येऊ लागले.
पुढे पुढे लोकांना ति बाई बंगल्याच्या फर्स्ट फ्लोर वर टेरेस वर मेणबत्ति हातात घेऊन आपल्या मुलींसोबत फिरत असताना दिसे........
काहीना त्या बंगल्या जवळ गेल्यावर अनामिक भीति व निगेटिविटी जाणवते....
तो बंगलो सील केल्यावर प्रशासनाने त्या बंगल्याच विज कनेक्शन कट करून टाकल,तरीही त्या बंगल्या च्या पाहिल्या मजल्या वरील रुम मधे असलेला बल्ब पेटत असे,अश्या अनेकोनेक विचित्र गोष्टी घडायला लागल्या मुळे हळू हळू त्या बंगल्याची वार्ता सर्वदूर पसरु लागली लोक कुतूहलवश त्या बंगल्यात घडणाऱ्या पैरानॉर्मल एक्टिविटी पाहण्यासाठी येऊ लागले.परंतु घटनेचे गांभीर्य ओळखता पोलिसांनी तिथे प्रवेश निषिद्ध केला असून रात्री अपरात्री तिथे पेट्रोलिंग ही होते आणि त्या बंगल्या भवती कोणी घुटमळताना दिसल्यास त्याला अटक केली जाते ..
हैदराबाद मधील मोस्ट हॉन्टेड प्लेस पैकी सगळ्यात हॉन्टेड प्लेस म्हणून 'कुन्दनबाग' ओळखली जाते...
(रिपोस्ट)
प्रथम वाडकर
No comments:
Post a Comment