मी पण यातलाच एक कसाबसा आलो गावी. आल्या आल्या ग्रामपंचायतीने नियमांची यादी दिली आणि 14 दिवस विलगीकरणारणात आमच्या शेतातल्या घरी राहायची ताकीद मला देण्यात आली.
तिकडे मी एकटाच (तस तिथे एकट राहायचा अनुभव होता मला पण असं कैद्या सारखं नाही), घरून नास्ता जेवण सर्व वेळेवर यायचं, नशिबानं मोबाईल नेटवर्क ने साथ दिली होती, दिवसभर मोबाईल, लॅपटॉप वर थोडं वर्क फ्रॉम होम आणि जेवल्यावर झोपण हा दिनक्रम ठरला होता. तिथे माझं लक्ष सारखं वेधून घेत होते ते अंगणा समोरील तात्यांच्या आमराईत दिसणारे रसाळ केशरी तांबूस रंग चढलेले आंबे.
पण भीती होती ती तात्याची जाणू जिता जगता 65/70 वयचा राक्षस माणूस तो, 6 फूट उंच, सावळा रंग, रागीट लालभडक डोळे, पिलदार मिश्या, बंडीवर कब्जा, धोतर, पायात कोल्हापूर चप्पल, हातात काठी असा पेहराव अक्खा गाव टरकून असायचा तात्याला.
मुलं परदेशी शिकायला गेली ती तिथेच स्थायिक झाली, बायकोच्या मृत्यू नंतर तात्या जवळ उरली ती फक्त ही जंगलातील आमराई, या एकटेपणाला कंटाळून आणि आमराईची मशागत, राखण करता यावी म्हनून तात्याने गावात राहणं सोडलं आणि या आमराईतील घरी ते गेलं 8/10 वर्ष राहत होते.
हे सर्व असं असताना देखील मला काय आंब्यांचा मोह आवरला नाही, मी ठरवलं कि रात्री 12 नंतर तात्या झोपी गेले कि आमराईत शिरून आंबे चोरायचे. तस ही 2 दिवस झाले तात्या दिसले नव्हते, बाहेर गावी कुठे तरी गेलं असतील असा माझा अंदाज होता.
ठरल्याप्रमाणे रात्री आमराईत शिरलो काळकूट अंधार हातात एक टॉर्च झाडाखाली एक आंबा पडलेला दिसला तो उचलण्या करता खाली वकलो तोच एक घोगरा आवाज कानी पडला "कोण हाय र तिकडं"
हातात कंदील घेऊन तात्या रागात लालबुंद डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते, मी लगेच त्यांची माफी मागितली पडलेलं फळ दिसलं म्हणून उचलत होतो अशी सावरासावर केली. तात्यांनी मला ओळखल, कधी आलास विचारपूस ही केली, थांब तुला थोड आंब देतो असं बोलत ते घराकडे वळले, मी आश्चऱ्याच्या धक्यात होतो, एवढा खावीस वृत्ती चा म्हातारा आज विचारपूस करतोय (कदाचित ऐकट राहावं लागत असल्यामुळे स्वभावा त बदल आला असेल असं वाटल).
मी पण आंबे भेटणार म्हणून त्याच्या मागोमाग चालू लागलो, घर येताच
तात्या :- बाहेरच थांब आत यायची गरज नाय. माझ्या परवानगी शिवाय यायचं ही नाय. लालबुंद डोळ्यांच्या भयानक नजरेचा कटाक्ष टाकत तात्या घुरघुरले ( कदाचित आंब्याची साठवण दाखवायची नसेल त्यांना )
मी अंगणातच थांबलो. विलक्षण थंडी होती आणि एक विचित्र दुर्गंध पसरला होता त्यांच्या अंगणात, ( जाऊदे ना आपल्याला आंबे भेटणार आहेत )
तात्याने अर्धा डझन आंबे दिले ते घेऊन मी रात्री च्या 1 च्या सुमारास घरी आलो.
सकाळी आंबे खायचे या बेताने आंबे घराच्या कोपऱ्यात ठेवले. दुसऱ्या दिवशी जेवताना मला त्या आंब्याची आठवण झाली तसे ते घ्यायला गेलो बघतो तर कालचे सर्व रसाळ पिवळसर तांबूस आंबे एका रात्रीत काळे पडून त्यावर किडे रेंगाळत होते.
मला राहवलं नाही, बाहेर आलो तात्यांना या बाबत विचारेन या हेतूने घरी जायचं ठरवलं. अंगणात पोहचलो दार उघड होत. तात्यांना हाक मारली काहीच उत्तर आलं नाही. थोडा वेळ बाहेर थांबलो. तात्यांनी बजावलं होत घरात यायचं नाही. खूप वाट बघून राहवलं नाही म्हणून घाबरतच घरात शिरलो, पुन्हा तीच दुर्गंध, काळोख, आंघुकसा उजेड, जिकडे तिकडे धूळ, पालापाचोळा, कोळ्यांची जाळ, बाहेरून एवढी सफाई आणि घरात असं मला काहीच समजत नव्हतं.
मी तात्या तात्या अशी हाक मारत आतल्या खोलीत गेलो.
समोरच दृश्य बघून छातीत धस झालं, भीतीचा शहारा संपूर्ण अंगातून गेला, क्षणार्धात संपूर्ण अंग घामाच्या धारा वाहू लागल्या आणि पाय लटपटू लागले.
समोर तात्या लाकडी खुर्चीत बसले होते, बुबळ नसलेल्या पांढऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे पापणी न हलवता माझ्याकडे बघत होते, डोक्यातून रक्त वाहून चेऱ्यावर येऊन सुकल होत, गाल, ओठ, मानेच मांस ओरबाडून टाकल्या प्रमाणे बाहेर गळत होत, त्यावर किडे रेंगाळत होते, संपूर्ण शरीर पांढर पडलं होत, कपडे जागोजागी फाटले होते.
मी धडपडत बाहेर पडण्यासाठी मागे वळलो, माझ्या मागे तात्या उभे होते खांद्यावर हात ठेवला त्यांनी माझ्या, आणि एक कर्कश आवाज घरभर ऐकू आला बोललो होतो आत येऊ नगस..... मी तिथेच बेशुद्ध पडलो,
जशी जाग आली उठलो आणि गावाकडे पळत सुटलो, वाटेतच तात्याचं घर लागत अंगणात खूप गर्दी होती तिथे, गावची दोन जाणते म्हातारे कुजबुत होते,
तात्या सडला हाय त्या वरण वाटताय मरून महिना झाला असलं. तात्या गेला त्याच जायचं वय व्हतं. पण त्या तरण्या-ताठ्या पोराचं वाईट झालं.
त्या गर्दीतुन बाहेर पडून घराची वाट धरली तर एक शव यात्रा चालली होती. एक दोन जणांना विचारलं कोणी लक्ष द्यायला तयार नाही. तिरडी वर डोकावून बघितलं तर मी निपचित पडलो होतो.....
समाप्त.....
खरच भयानक
ReplyDelete