पिशाच्च पर्व
पर्व पहिले – अघोर कालींजर
भाग १ – धडा – २
मागील धड्याची लिंक –
स्वानंदचे डोळे आता पाणावले होते. नाक सुर्सुरायाला लागले होते. आजोबांची खूप आठवण येत होती. आजोबा आणि माई म्हणजे स्वानंदच विश्व होत. अस वाटत होत की अर्ध जागच संपून गेल. मिटलेल्या डोळ्यांसमोर लहानपणापासून चे अण्णांच्या सहवासातले दिवस एखाद्या चित्रपटासारखे दिसत होते. आणि अचानक स्वानंदला मागच्या महिन्यातला तो प्रसंग आठवला.
१७ जून २००८
संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते. माईंनी स्वानंदला अण्णांसाठी मऊ भात देऊन यायला सांगितलं. स्वानंद ताट घेऊन वर गेला. मधल्या खोलीत अण्णा काहीतरी वाचत पडले होते. “हे ड्यूड काय चाललय” अस म्हणत अण्णांच्या कडेला जाऊन बसला.
अण्णा – आज ऑफिस मधून लवकर आलास का रे डीम्ब्या
स्वानंद – हो सध्या फार काही काम नाहीये आणि आता एक नवीन स्टाफ पण घेतलीय, हुशार आहे, शिकवतोय सगळ.
अण्णा – ठेव ते ताट कडेला घेईन मी नंतर ,आधी मला तुझ्याशी काही बोलायचंय.
ताट समोरच्या टेबलावर ठेऊन स्वानंद अण्णांच्या शेजारी जाऊन बसला.
अण्णा – हे बघ मागे आपलं बोलण झाल होत. आणि सांगितल्या प्रमाणे तो दिवस जवळ आलाय. पुढच्या महिन्यातलाच आहे. सुलोचानेला मी सांगेन. पण त्याधी तुला एक महत्वाची गोष्ट द्यायचीय. एक काम कर पुस्तकांच्या खोलीत जा आणि माझ्या कपाताटला उजव्या बाजूचा खालून तिसरा कप्पा उघड ,त्यात एका लाल पिशवीत एक पेटी आहे ती घेऊन ये, जा पटकन.
विनायकरावांच्या त्या खोलीत स्वानंद शिवाय कोणालाही यायला परवानगी नसायची. वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वानंद ह्या खोलीत यायला लागला. बऱ्याचदा माईना हा प्रश्न पडायचा पण त्यांना ही हे माहित होत की जे चाललाय ते त्याच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे त्या कधीही स्वानंद आणि विनायकराव यांच्या कार्यक्रमात आड येत नसत.
स्वानंदनी तो कप्पा उघडला आणि त्याला अगदी आत जुनाट लाल कापडाच एक बोचक दिसलं. ते घेऊन तो विनायकरावांसमोर आला.
स्वानंद – अण्णा हीच पिशवी का हो.
अण्णा – हो हो, आण ती इकडे. अस म्हणत ती कडेला ठेवली.
ही खोली मोठी प्रशस्त होती. वाडा जरी बाहेरून जुनाट वाटला तरी आत सगळ्या अत्याधुनिक सोयी केल्या होत्या. अण्णा याच खोलीत झोपत असतं. पहिल्या वळवाच्या पावसात जरा सर्दी सारख वाटत होत म्हणून डोक्याला उबदार हिरव्या रंगाची कानटोपी घालून अंगाभवती दुलई लपेटून अण्णा पडले होते. सहा फुटाची उंची, घारे डोळे आणि भेदक नजर. गोऱ्या पेक्षा गुलाबी म्हणता येईल असा वर्ण, व्यायामानी कमावलेलं शरीर. एखाद्या गोऱ्या साहेबाला लाजवेल असा रुबाब. पण हे भारदस्त व्यक्तिमत्व आता नव्वदीला झुकल होत. पांढरी शुभ्र वाढवलेली दाढी आणि मानेपर्यंत वाढलेले केस यांमुळे विनायकराव एखाद्या ऋषीमुनी सारखे दिसत होते. शरीर थकल असलं तरी चेहेऱ्यावर अजूनही विलक्षण तेज होत. आवाजही तितकाच धारदार.
खोलीत मंद पिवळसर प्रकाश पसरला होता. आता अण्णा थोडे उठून बसले. आणि स्वानंदला पलंगाच्या एका कडेला बसवल.
“हुं... हे बघ याच वर्षापासून तुझी गुरूची महादशा चालू होतीय. ह्या पुढच्या १६ वर्षात आपण जी इतके वर्ष तयारी केली त्याचा उपयोग करावा लागेल. आता माझा कार्यभाग संपला माझे जायचे दिवस जवळ आलेत.” हे वाक्य उच्चारताना अण्णांच्या आवाजातला कंप जाणवत होता.
बसल्या बसल्या स्वानंदनी अण्णांचा सुरकुतलेला हात हातात घेतला. आणि दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवला.
अण्णा पुढे बोलू लागले. – “तुझा शनी उच्चीचा आहे त्याचा वेळोवेळी फायदा घे. संयम सोडू नकोस. तुला अजून बरच पहायचय. मी नसलो तरी संपूर्ण कालभैरव तुझ्या पाठीशी आहे. तुला त्याची वेळोवेळी मदत मिळत जाईल. अशोकवर विश्वास ठेव त्याच ऐक. कुठलाही निर्णय घाईत घेऊ नकोस. आणि ज्या वेळी असं वाटेल की आता पुढचे सगळे रस्ते बंद झाले आहेत त्या वेळी ही पेटी उघड. तुला पुढचा रस्ता दिसेल.”
असं म्हणत अण्णांनी पडल्या पडल्याच ते लाल वस्त्र अलगद काढून बाजूला ठेवलं. आणि त्या वस्त्रात गुंडाळलेली एक जुनाट लाकडी पेटी काढली. स्वानंदला हात पुढे करायला सांगितल आणि ती लाकडी पेटी त्याच्या हातावर ठेवली.
त्या पेटीचा जसा स्वानंद च्या तळहाताला स्पर्श झाला तसा स्वानंद चटका बसल्यासारखा ओरडला आणि पेटी अण्णांच्या गादीवर पडली.
“अर्रेच्चा अचानक काय झालं” असं म्हणत अण्णा ती पेटी हातात घेऊन निरखू लागले. त्या पेटीवर काही इजिप्शियन प्रकारची चित्र होती. आणि त्यांच्या कडेला काही सांकेतिक खुणा होत्या. जसं अण्णांनी ती पेटी हातात घेतली तसं त्यावरची चित्र एखाद्या अनिमेशन सारखी बदलू लागली. अण्णा मनांतल्या मनात काहीतरी पुटपुटायला लागले.
“हार न्बावा चस्तहुआ”
आणि अचानक त्या लाकडी पेटीवरची चित्र 3d दिसायला लागली आणि खटकन ती पेटी उघडली. त्या पेटीच ते छोटस झाकण उघडताच अख्या खोलीभर कस्तुरीचा घमघमाट सुटला. हा वास इतका तीव्र होता की स्वानंदच्या नाकातून पाणी यायला लागलं.
३१ जुलै २००८
मागच्या महिन्यात घडलेला हा प्रसंग स्वानंदच्या डोळ्यासमोरून एखाद्या फास्ट फाँर्वर्ड फिल्म सारखा झळकून गेला आणि अचानक स्वानंदला अण्णांच्या त्या पेटीची आठवण झाली.
इतक्यात सतीशरावांनी विषय काढला. “माई माझ्याकडे ना डीम्ब्यासाठी एक चांगल स्थळ आलंय आणि मुलगी काय देखणी आहे म्हणुन सांगू . बर चांगल्या पागारची नोकरी आहे. दोनदा यु एस ला पण जाऊन आलीय. काय रे स्वानंद ओळख करून देऊ का तुझ काही वेगळ कुठे जमवलयस. अरे आता माईंच वय विचारात घे जरा. किती दिवस त्या तुझ करणार.”
एवढ्यात माई जरा वैतागूनच म्हणाल्या , “सतीशराव त्याची काळजी घायला मी समर्थ आहे आणि लग्ना बिग्नाच म्हणाल तर तो सर्वस्वी स्वानंदचा निर्णय असेल.” मालतीताई पण तेवढ्यात बोलून गेल्या, “अहो शांत रहा की जरा वेळ काळ बघा की जरा आणि तुम्ही लाख अप्सरा आणाल हो पण ती टिकली पाहिजे ना ह्या चेटक्यांच्या घरात. त्या वरच्या खोल्यातून काय काय प्रकार चालतात ना माहितीय मला. तीस वर्ष ह्या वाड्यात काढलीयत मी. ती विचित्र लोकं , ते प्रयोग. निदान आता तरी थांबेल सगळ असं वाटत होत पण युवराज त्याच पवलांवर पाउल टाकून चाललेत.”
विनायकराव हयात असतना हे अस काही बरळायाची बिशाद नव्हती आणि ही भाषा. पण माईना हे अपेक्षितच होत.
माई आराम खुर्चीवरच जरा ताठ बसल्या आणि म्हणाल्या, “मला वाटतय आपण इथेच थांबलेलं बर. पुढच्या आठवड्यात वकील येणारेत त्यावेळी फोन करेन. मला निघायला हव आता.”
स्वानंद ही उठला. मालती आणि सतीश चरफडतच उठले. आणि वर जाता जाता, “कोणालाही काही सांगायची चोरी या घरात” असा शेरा मारत खोलीच्या बाहेर पडले.
“ए माई मी जरा वर जाऊन आलो. आणि आज सुट्टी आहे पण संध्याकाळी संतोषबरोबर गाडी टाकायला जाईन”. बर म्हणून माई उठल्या.
स्वानंद खोलीतून बाहेर आला आणि समोरच्या जीन्यानी अण्णांच्या खोलीकडे निघाला. चार पाच पायऱ्या चढतो तोच फोन वाजला. स्वानंदनी फोन बाहेर काढला. त्यावर नाव दिसलं बाबायागा आणि खाली चेटकीणीचा फोटो. ...रागीणीच्या आईचा फोन होता. स्वानंदला रागिणीची आई कधी फारशी आवडत नव्हती. त्यामुळे कपाळावर आठ्यांच जाळ झालं होत. फोन घेत स्वानंद म्हणाला,
“नमस्ते चाची, कैसे हो आप”
“बेटा स्वानंद ! कहां हो तुम. बेटा तू आता आमचे घरला एसील का लगेच. बेटा खूप गहजब झालय रे. रागिणीचा काँल आला होता. आता १० मिनिट पहिले होगा. वो बहोत रो राही थी बेटा, और उसने जो बयान किया वो मै ऐसे नाही बता सकती. बेटा तुरंत यहा आओ आप. मै हाथ जोडती हुं.”
“अरे चाची क्या हुआ. मै एक आधे घंटेमे आता हुं संतोष को लेके, गाडी नही है ना मरे पास अभी.”
“ठीक है देख लेना बेटा पर जरा जल्दी आना”
उमादेवी चौहान. रागिणी चौहान ची आई फोनवर बोलताना इतकी रडत होती की स्वानंदला आता त्यांचाकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.
वास्तविक त्याला काकू खूप डोक्यात जायच्या ...फार कट कट करायच्या... पण दोन वर्षांपूर्वी रागिणीच लग्न झालं आणि मग स्वानंदचा आणि चौहान कुटुंबियांचा संपर्क जवळ जवळ तुटलाच. रागिणी आणि स्वानंदचा अधुन मधुन एखाद दुसरा फोन झाला असेल या दोन वर्षात पण फक्त ख्याली खुशाली पुढे फार काही बोलण झालं नव्हत. स्वानंदलाही त्यात अडकायचं नव्हत.
स्वानंदनी लगेच संतोषला फोन केला.
स्वानंद - बाबा सुकाडोजीपंत कुठे आहात आणि भाड्या सकाळपासून आला का नाहीस रे. माई पण भडकलीय तुझावर.
संतोष - अरे हो. दम धर जरा, मी विकिला आणायला गेलो होतो रे. बिचारा खूप खचलाय रे
स्वानंद – तरी मी सांगत होतो ह की आता नको जाऊ म्हणून. अरे तयार नाहीये अजून तो. म्हणजे मला त्यातल फार काळात नाही पण बॉडी अजून थोडी फॉर्ममध्ये आली असती तर कदाचित क्वालिफाय तरी झाला असता. असो पण पुढच्या वर्षी पुन्हा एकदा संधी आहेच की आणि त्याला पण सांग की रात्री भेटू पुलावर.
संतोष – हो पण मला आता का फोन केलायस
स्वानंद – अरे हो तू जरा लवकर ये ना मला रागीणीच्या घरी जायला लागणारे. चेटकीणीची अलका कुबल झालीय. आणि करिझ्मा परत झोपलीय सो तुलाच मला तिकडे सोडायला लागेल. येतोयस का पटकन प्लीज.
हो म्हणून संतोषनी फोन बंद केला.
धाड धाड लाकडी जिन्याच्या पायऱ्या उतरत स्वानंद परत खाली आला. विधी साठी आलेली सर्व मंडळी मार्गस्थ झाल्याने वाड्यातली गजबज शांत झाली होती. समोर माई कुंड्यांना पाणी घालत होत्या. स्वानंदनी ओरडूनच सांगितलं, “ए माई, मी जरा रागिणीच्या आईला भेटून येतो गं .”
पाण्याचा पाईप तसाच वाहता सोडून माई म्हणाल्या .. “अरे हो ! मी सांगायचीच विसरले बघ या आजच्या गडबडीत, त्यांचा कालही दोनदा फोन आला होता. अण्णा गेल्याचं सांगितलं नव्हतस का तू त्यांना. सारखं म्हणत होत्या की अण्णांना भेटायचय पण मग मीच म्हणाले की उद्या स्वानंदला पाठवते. जा जाऊन ये आणि काय म्हणतायत बघ.”
हो तो एक शिंगी घोडा येतोय ना, मग जाईन.
संतोषच्या होंडा युनिकॉर्नला स्वानंद एक शिंगी घोडा म्हणायचा.
संतोष अगदी जवळ चिमण्या गणपती शेजारीच रहायचा. .. स्वानंद पटकन कपडे बदलून वाड्याच्या दरवाज्यात उभा राहिला. लांबूनच साचलेलं पावसाचं पाणी फर्रर्र कन उडवत एक गाडी येताना दिसली.
डोक्यावरची टोपी आणि प्रचंड मोठा रेनकोट यात कुठेतरी संतोष होता.
सहा फूट उंच पण जितका उंच तितकाच हडकुळा. रंग सावळा पण चमकदार कांती , बारीक लुकलुकणारे डोळे आणि धारधार नाक, चेहेऱ्याचा वरचा भाग कायम केसांनी अछ्छांदलेला. अंगात जेवढी चपळता तेवढाच भर भर बोलायचा. त्यामुळे वाक्याची सुरवात आणि शेवट फक्त कळायचा बाकी आपलं आपण समजून घ्यायचं.
संतोष च्या मागे बसून स्वानंदची कुर कुर सुरु झाली.
“अरे खर तर ना माला आज जायचा कंटाळा आलाय रे. म्हातारी फार बोर करते. तुला माहितीय ना मागच्या वर्षी येऊन माईला आणि अण्णांना काय विचारत होती. म्हणे की रागिणी अजूनही माझ्याशी लग्नाला तयार आहे. आता मला सांग ही रागिणी जीच लग्न ह्यांनीच मोठ्या थाटामाटात लाऊन दिल, जी आज जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस कोटींची मालकीण आहे ती परत इथे आता का येईल आणि समजा जर तसं काही असतं तर तिनंच मला नसता का फोन केला. हे म्हणजे ना ह्या म्हातारीला काहीतरी पर्सनॅलीटी डीसॉरडर असावा अस वाटायला लागलाय मला.”
“पण स्वांड्य़ा तुला ती खूप आवडायची की नाही ,खर सांग.” स्वानंदच्या विषयाला बगल देत संतोष म्हणाला.
“साल्या गाडी चालव ना समोर बघून ;..... आधीच मगाशी सतीश काकांनी आणि मालू आत्यानी डोक फिरवलय. आता जास्त काही बोलशील ना तर सरळ रिक्षा करून जाईन” स्वानंद वैतागून म्हणाला.
जीव लावणारे २ / ३ मित्र आणि माई.. सध्या हेच स्वानंदच विश्व होत.
काही काळापुरत सगळ्याना अस वाटलं होत की रागिणी आणि स्वानंदच लग्न होईल पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळच घडलं.
(क्रमशः)
पुढील भाग २ दिवसांनी
******************************************************************
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि भरपूर शेअर करा.. धन्यवाद
© रघुनंदन कुलकर्णी
No comments:
Post a Comment