अनपेक्षित
किस्सा फार जूना वैगरे नाही.. कालचाच आहे.. बरेच दिवस काही लिहिलं नव्हतं.. खुप किस्से आठवत होते.. पण लीहीणं झालंच नाही.. कालची गोष्ट मात्र तुम्हा सगळ्याशी लगेच शेअर करावीशी वाटली..
कामाच्या व्यापात बरेच दिवस मालवणला जाणं झालं नव्हतं.. गेल्या मंगळवारी तो योग आला.. आणी आम्ही दोघं मोटरसायकल घेऊन मालवणला निघालो.. मस्त उनाडक्या करण्याचाच बेत असल्याने मुद्दाम कारला रजा दिली.. घरी माझ्या वडीलांना हे सर्प्राइज होतं..
संध्याकाळी चारला घरी पोहचलो.. हातपाय धुऊन पहीला समुद्रावर गेलो.. डोळे भरून दर्शन घेतलं.. मग मासे घेवून घरी पोहचलो.. रात्री मस्त जेवण झालं गप्पा टप्पा झाल्या.. दुसरा दीवस बाजारात फीरलो.. तळाशील मधील पुतण्याला बोलावून खाडीत मासेमारीची हौस पुरी केली.. संध्याकाळी कालावलीत माडीचा भरपुर आस्वाद घेतला.. हडीचे वडे आणी कांदाभजी खाल्ली.. परत मालवणात मित्रा ना भेटुन वैगरे रात्रीची जेवण आटपली आणी भावाची फायबर होडी घेवून रेवंडी वरून खाडी मार्गे कालावल पुलाखाली मासे गरवायला गेलो.. खुप खुप मज्जा केली.. तिस-या दीवशी पण पुतणीचा वाढदीवस साजरा केला.. राणे कोल्ड्रिंक मध्ये काॅकटेल खाल्लं.. आणी मोटरसायकल घेवुन अख्खा मालवण गल्ली बोळ फीरलो.. उगाचंच..
परतीचा नावडता दिवस उजाडला.. दुपारी निघायचं होतं.. वडीलांशी गप्पा करत बसलो होतो सकाळ पासुन.. बाहेर कुठेही गेलो नाही.. दुपारची जेवणं झाली.. बायकोची बॅग भरायची लगबग सुरू झाली.. आता निघतो आता निघतो करेपर्यंत साडे चार वाजले.. खरं तर पायच निघत नव्हता.. पण निघणं भाग होतं.. शेवटी पावणे पाचला निघालोच..
तशी मला मोटरसायकलवर प्रवास करायची सवय आहे.. आणी आवड सुद्धा.. पण आता वजन खुप वाढलंय.. आणी आधी दोन दिवस भरपुर भटकलो होतो.. त्यामुळे कंबरेने दगा दिला.. आचरा मार्गे निघालो.. ओझर च्या जरा पुढेच कंबर सरळ करायला थांबाव लागलं.. आता चाळीशी लागेल मार्च पासुन..
पुढचा सगळा प्रवास असाच पाच दहा किलोमीटर वर थांबत थांबत केला.. आणी शेवटी सव्वा नवु वाजता खारेपाटण ला पिंटु गायकवाड च्या चायनिज हाॅटेल मध्ये पोहचलो.. बस्स आता बारा तेरा किलोमीटर चा प्रवास शिल्लक होता.. एक सुप आणी राईस खाल्ला.. हाॅटेल मध्ये गर्दी होती.. सुमारे दिड तास लागला बाहेर पडायला..
बाहेर आलो तर डोळ्यावर प्रचंड झोप होती माझ्या.. लवकर घरी पोहचण्याच्या उद्देशाने आम्ही निघालो.. पावणे अकरा वाजले होते.. खारेपाटण पोलीस लाठी व त्याच्या पुढे असलेला पुल ओलांडून आम्ही मधुबन हाॅटेल कडुन वळुन गावचा रस्ता धरला.. समोरचा चढाव चढुन वर आलो आणी एकदम वातावरणच बदलंल..
काळा मिट्ट अंधार होता.. आणी एकदम सुनसान रस्ता.. चिटपाखरूही नाही.. वारा नाही.. झाडाचं पानही हलत नव्हतं.. आणी वातावरणात एक विचीत्र दमट आणी कुबट पणा जाणवला मला... मी काही लेचापेचा नाही.. रात्री अपरात्री अनोळखी गावं एकटा भटकणारा माणुस मी.. पण ते वातावरणच येवढ विचीत्र होतं की माझ्याही मनात कुठे तरी चरकलं जरा.. हे असं का वाटतंय याचाच विचार चालु होता डोक्यात.. आणी अचानक गाडीच्या इंजीन ने अचानक पिकअप कट केला.. आणी पेट्रोल संपल्यावर गाडी जसे आचके देते तसं करायला लागली.. जरा आरपीएम कमी झालं की हेडलाईट अंधुक होउ लागली.. मला काही सुचेना.. रोजचा रस्ता हा.. पण आज विचीत्रच अनुभव येत होता.. सारखं बाजुच्या झुडुपं.. झाडांच्या मागे कुणीतरी काहीतरी हालचाल करतंय असा भास होउ लागला.. वरती आभाळ पण काळं दिसत होतं.. इथुन मागे जावं असा पण विचार डोक्यात येवुन गेला.. हे होतंय काय काही कळायला मार्ग नव्हता...
अग तुला काय जाणवतंय का ? मी बायकोला विचारलं.. ती म्हणाली हो मघाशी चढाव चढल्यापासुनच जाणवंय मला.. चालत राहुया.. गाडी थांबवु नका.. मोठ मोठ्याने बोलत रहा... आपण गाणी म्हणुया म्हणजे माइंड डायव्हरर्ट होईल..
मग आम्ही तसा प्रयत्न पण केला.. पण गाडी अगदीच आचके देवु लागली.. आणी मागुन कुणीतरी ओढुन धरल्या सारखी जड चालु लागली...
आणी अचानक बायकोच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक.. तीने मोठ्या आवाजात भिमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारूती.. म्हणायला सुरवात केली.. मग मीपण तीच्या आवाजात आवाज मिसळून म्हणु लागलो.. काय आश्चर्य.. पहील्या तीन चार ओळी नंतर अचानक गाडी धरधरून चालायला लागली.. बिलकुल मोकळी झाल्यासारखी.. हेडलाईट चा लख्ख उजेड पडला.. आम्ही साधारण मोसम च्या घाटी जवळ आलो आणी एक गार मंद वा-याची झुळुक आली.. वातावरण हळुच मोकळं झालं.. आकाशात चांदण्या दिसु लागल्या.. घाटीच पहीलं वळण मारलं आणी समोर दुर रिक्षाचे टेल लँप दिसु लागले.. मग एक महिंद्रा टेंपो समोरून येवुन गेला.. वातावरणाला तो अनपेक्षित विचीत्र तणाव अचानक निघुन गेला.. आणी वातावरण मस्त मोकळं वाटलं...
विषेश म्हणजे आम्हाला ते भिमरूपी महारूद्रा पुर्ण पाठ असल्यासारखं आलं..आज दोन तीन वेळा म्हणून पाहीलं पण तीस-या चौथ्या ओळीच्या पुढे आठवत नाही.. काल मात्र धडाधड पुर्ण आठवलं...
कुणी काही म्हणा पण माझा देवावर विश्वास वाढला.. बजरंग बली की जय म्हणत आम्ही सुखरूप घरी पोचलो.
No comments:
Post a Comment