माझे_रडगाणे (लघुकथा) लेखन-- शशांक सुर्वे
गरिबीत वाढलेला मी...काबाडकष्ट करून शिकून मोठा अधिकारी झालो...लग्न केलं...दोन मुलं झाली...सगळं अगदी व्यवस्तीत चालू होतं...हमाली करून शिक्षण पूर्ण केलं...आता हे भोग माझ्या पोरांच्या वाट्याला नकोत म्हणून त्यांना चांगल्या शाळेत घातलं, ट्युशन दिली..अगदी सांगेल ते हट्ट पुरवले...मुलं गुणी आणि हुशार निघाली...थोरला डॉक्टर तर धाकटा इंजिनियर झाला...थोरला अहमदाबाद मध्ये तर धाकटा चेन्नईत जॉब करतो...पाच अंकी पगार सगळं व्यवस्तीत चालू होतं...लग्नाचं वय झालं मग लावून दिली लग्न...आता ते तिकडे मी इथे मुंबई मध्ये....आता मी रिटायर्ड झालो होतो..30 हजार पेन्शन येत होती माझी बायको आणि मी ह्यांची उपजीविका ह्या पैशात होत होती...मुलं येत होती....2 एक वर्षात मी आजोबा झालो होतो...खूप गोंडस होती माझी नातवंड...आमच्या हिला तर लळा लागला होता.. त्याना बघण्यासाठी सोसत नसताना सुद्धा एवढा प्रवास करून आम्ही तिथे त्याना बघायला जात होतो....
हा झाला पहिला पार्ट....दुसरा पार्ट अजून भयानक....माझी बायको आजाराने गेली...माझा आधार गेला...पुढे काय हा प्रश्न नेहमी मला सतावायचा...मुलांकडे ही तळमळ बोलून दाखवली...आता आम्ही केलेल्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ त्यांची होती....त्या दिवशी बाथरूम ला जात होतो...दोन्ही मुलांची आणि त्यांच्या बायकांची मिटिंग चालू होती....माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते..मी त्यांना नको होतो...शेवटी हाथ थकले की नाती संपतात...झालं तसच....मुलगा आला आणि सरळ म्हणाला "बाबा त्या तिकडंच हवामान तुम्हाला नाही सोसणार..शिवाय आमच्या बायकांना ही त्रास.."
मग काय...काय बोलणार होतो...गेले ते परत आपल्या गावी...मी राहिलो इथे...त्या दिवशी खूप रडलो...सारखी हिची आठवण यायची...एकटाच तिच्या फोटोशी बोलायचो....मग स्वतःला धीर दिला...घरकामासाठी एक नोकर ठेवला...तो आणि मी त्या घरात राहू लागलो...आणि परत सगळं सुरळीत चालू होतं..माझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाची एक टीम तयार केली त्यांच्याबरोबर वेळ जात होता
एकदा रामरावांनी आपल्या नातवंडांना बागेत आणलं..त्याना बघून मला माझ्या नातवंडांची आठवण झाली...अजून 2 दिवसांनी घरगडी 15 दिवसासाठी गावाला जाणार होता..म्हंटलं 15 दिवस जाऊन यावे मुलांकडे...सगळी तयारी केली...खाऊ वैगेरे घेतले आणि निघालो अहमदाबाद कडे ....तिकडे पोचल्यावर सुनबाई चिडल्या...मुलांबरोबर भांडण..."हा म्हातारा इथं राहणार असेल तर मी माहेरी जाते" असा दम दिला तिने...मग काय नाईलाजाने नातवाचा एक पापा घेऊन निघालो चेन्नई ला...खूप दमछाक झाली...पोटात अन्न नव्हते...मुलाला फोन करून सांगितलं होतं "मी येतोय"
पण तिथे पोचल्यावर घराला कुलूप.....काही वेळात त्याचा फोन आला...."बाबा तुम्ही घरी जा आम्ही देवदर्शनाला चाललोय" तिथेच पायरीवर बसलो....प्रचंड राग आला होता...पण करणार काय?? शेवटी नाती ला बघायचं राहूनच गेलं...आलो परत घरी रात्रीचा....डोकं सुन्न झालं होतं...विचार करत होतो...काय चुकलं माझं?...मुलांना शिकवलं ते चुकलं का? माझी चूक शोधत जुन्या आठवणीत रमून गेलो...डोळ्यात अश्रू होतेच....हातात माझ्या नातवंडांचा फोटो....
सकाळी जरा अंग हलकं वाटलं....डोळे उघडले...माझं शरीर तिथंच निपचित पडलं होतं...मी त्याला बघू शकत होतो....काय झालं हे? नंतर शरीरावर हाथ फिरवून उठवण्याचा प्रयत्न केला पण तो शरीरातून आरपार जाऊ लागला....मग समजलो "मेलोय मी" पण मी इथं कसा??मला तर स्वर्गात किंवा नरकात असायला पाहिजे होत...मग लक्षात आलं की...अपुऱ्या इच्छा असणारा माणूस असाच भटकत राहतो...मग काय भटकू लागलो इकडे तिकडे...2,3 दिवसांनी हा वास कसला म्हणूंन शेजारी घरात आले...त्याना माझी डेडबॉडी दिसली...मग काय लावला त्यांनी माझ्या दोन्ही लेकांना फोन...एरव्ही फोन सुद्धा न उचलणारे...आज धावत आले...चालू झाला नकली आसवांचा खेळ....पण जाऊ दे त्यांना...अरे माझी नात कुठेय???
शोधू लागलो तिला....अरे ती काय तिथे खेळतीय....उडत गेलो सरळ...डोळे भरून बघितलं..शक्य नसलं तरी मिठीत घेण्याचा प्रयत्न केला....तृप्त झालो...आता मुक्ती मिळणार मला....चला निघतो मी....स्वर्गात आमच्या मालकीण बाई वाट बघत असतील....नेहमी प्रमाणे त्याना सगळा हिशोब द्यावा लागेल मला.......(काल्पनिक)
No comments:
Post a Comment