खेकडा
भाग क्र -- २
पहिल्या भागाची लिंक
https://marathighoststories.blogspot.com/2021/02/blog-post_6.html
तो दिवस अनिलच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा दिवस होता....कारण त्याने आयुष्यभर जीची स्वप्ने बघितली होती ती त्याच्या बाहुपाशात होती......आणि त्याची कित्येक दिवसाची कामवासना शांत झाली होती....एवढा आनंद त्याला कधीच झाला नव्हता.....सुमसान सुंदर स्वर्गही फिका पडेल असा समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्यावर हे दोघेच.....अगदी दिवसभर त्या दोघांनी विवस्त्र त्या बीच वर अनेक प्रणय क्रीडा केल्या......रत्नमाला त्याच्या सगळ्या कामेच्छा पुरवत होती.....रात्रीची तर मजाच निराळी जेव्हा तो त्या समोरच्या वाड्यात गेला तेव्हा तिथले दृश्य बघून तो थक्क झाला.....अगदी सगळं सोन्याचं होतं.....सगळा राजेशाही थाट.....ते दोघे जेव्हा त्या वाड्याजवळ आले तेव्हा चार पाच नोकर त्यांच्या अवती भवती फिरू लागले.......ते मोठ्या आदराने वाकून सलाम करू लागले.....अनिलला हे अनपेक्षित होत.....रोज लोकांच्या शिव्या खाऊन जगणारा आज राजेशाही जगत होता.....रत्नमाला त्याला घेऊन तिथल्या स्नान गृहात गेली.....सोन्याचा बाथटब त्यात भरून ठेवलेले दूध आणि त्याचे अंग चोळायला रत्नमालाचे कोमल हात......सगळं काही स्वर्गसुख होतं......ही अंघोळ झाल्यावर नोकरांनी त्याला उंची वस्त्रे दिली....काही सोन्याची आभूषणे धारण करून तो निघाला.....डायनिंग टेबल वरील भोजन बघून अनिल थक्क झाला.....असले पदार्थ त्याने जन्मात पाहिले नसतील......त्याने आपल्या गावठी अंदाजात त्या खान्यावर ताव मारायला सुरुवात केली.....एकदम चविष्ठ भोजन कधी तोंडात जात होते......कधीही न मिळालेल्या आवेगात कधी कधी त्या उंची कपड्यावरही सांडत होते....पण बाजूला बसलेली रत्नमाला त्याच्या अंगावर पडलेले डाग रूमालाने प्रेमाने पुसत होती......अनिल अगदी स्वर्गसुखात होता.....लोकांनी झिडकरलेल्या शिव्यांचा धनी असलेला कुणी जर अश्या राजेशाही वातावरणात अचानक आला तर त्याच्या आनंदाची कल्पनाही करू शकत नाही.....आता रात्री त्या वाड्याच्या सुंदर खोलीत मखमली पलंगावर परत ह्या दोघांची प्रणयक्रीडा चालू झाली......सकाळी जेव्हा अनिलला जाग आली तेव्हा रत्नमाला त्याच्या बाहुपाशात होती......आणि दुसऱ्या बाजूला सुंदर खळखळणारा समुद्र आणि त्यावर पडलेली सोनेरी किरणे......अनिल बेड वर बसला त्याने त्या समुद्राकडे बघितलं मागे वळून रत्नमाला कडे बघितलं.....खरंच इथून जाऊच नये असं त्याला वाटत होतं....सकाळ उठून परत तो राजेशाही थाट आणि त्याच्या सोबत फिरणारी ती रत्नमाला.....दुपारचे स्वादिष्ट जेवण आजूबाजूला त्याचा हुकूम मानणारे त्याचे ते नोकर.....तो दिवसही अगदी आनंदी गेला......रात्री परत रत्नमाला त्याच्या बाहुपाशात होती.....त्यांचा प्रणय रंगला होता.....अचानक अनिलला काहीस अंधुक अंधुक वाटू लागलं.....डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली.....समोरची सुंदर रत्नमाला अंधून आणि काहीशी निस्तेज होत होती.....अचानक त्याच्या खोलीच्या दारावर थाप पडली तसं त्याने कपडे सावरत त्या दरवाज्याकडे जाऊ लागला....काहीसा अशक्तपणा जाणवत होता.....अनिलचे पाय लडखडत होते.....अंगाला दरदरून घाम फुटला होता.....अनिलने दरवाजा उघडला बाहेर एक नोकर हातात चिठ्ठी घेऊन उभा होता.....अनिलने ती चिठ्ठी हातात घेऊन उघडली
"प्रिय यात्री....तुम्ही जो रक्ताचा साठा आम्हाला देऊ केला होता त्यानुसार आम्ही तुम्हाला इतकीच सेवा देऊ शकतो.....आम्हाला खात्री आहे की आमच्या सेवा तुम्हाला आवडल्या असतील....आपण परत याल अशी आशा आहे........धन्यवाद"
काय....माझा इथला प्रवास संपला....नाही नाही....मला इथून जायचं नाही
अस बोलत तो बेड वर निवांत झोपलेल्या रत्नमाला कडे धावू लागला अचानक सगळं अंधूक होऊ लागलं अनिल चे डोळे जड होऊन बंद झाले....तो खाली कोसळला.....हलकेच डोळे उघडू लागला....पण ह्यावेळी मात्र त्या खोलीतील सुगंधी अत्तराची जागा कुबट वासाने घेतली होती....त्याने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा वरती त्याच्या खोलीचं गळकं फाटकं छप्पर होतं..…..आता खोलीतील वातावरण अजूनच दुर्गंधीने भरलं होतं.....अनिलला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता त्याला उठताही येत नव्हतं....घसा तर पार कोरडा पडला होता.....अनिल हळूहळू उठू लागला त्याने बघितलं की त्याची पॅन्ट ओली झाली होती.....त्याची दुर्गंध सगळीकडे पसरला होता.....अनिलला काही समजेना त्याला उठायची ताकत नव्हती.....पोटात तर नुसती आग पडली होती.....थरथरता हात त्याने आपल्या साध्या मोबाईलजवळ नेला.....त्याला काही चेक करायचं होतं आणि मोबाईलची स्क्रीन बघून तो हसला.....तारीख तो जेव्हा इथे झोपला होता तेव्हा पासून दोन दिवसा नंतरची होती.....म्हणजे तब्बल दोन दिवस तो त्या दुनियेत पोहोचला होता.....आपली सगळी ताकत एकवटून अनिल उभा राहिला.....एका डब्ब्यात ठेवलेली वाळलेली भाकरी तो आधाश्या सारखी खाऊ लागला....ती वास मारणारी कुबट भाकरी खाताना त्याला किळस वाटत होतं कारण दोन दिवस त्याने अगदी मनसोक्त राजेशाही जेवण जेवले होते....तरी ती दीड दोन भाकरी पोटात सारून कसाबसा तो उठून आपल्या छोट्याश्या बाथरूम मध्ये गेला.....प्रथमच ह्या सगळ्याचा अनिलला किळस वाटत होता.....हे जीवन कायम त्याच्या अंगवळणी पडलं होतं पण ह्या दोन दिवसांच्या राजेशाही आयुष्याने आता त्या घाण बाथरूम मध्ये अंघोळ करण्याचा त्याला तिटकारा वाटत होता.....पण काही इलाज नव्हता.....अंघोळ करताना त्याने आपल्या हाताकडे छातीवर बघितले.....रत्नमालाच्या नखांचे ओरखडे.....तो सारखं त्यावरून हात फिरवत होता....तिच्या आठवणीत अंघोळ करायला त्याला तासभर तरी लागला होता.…..ते दोन दिवस निघून गेले होते आणि आता परत हे सामान्य आयुष्य होतं......कामावर जायचं होतं.....त्याने आपल्या खोलीकडे बघितले आणि अस्ताव्यस्त पडलेले समान....तो कुबट वास सगळ्यांचा प्रथमच तिटकारा येत होता.....पण काही इलाज नव्हता.....तिथे जमीन उकरली तरच रात्री पोटाची खळगी भरली जाणार होती.....अनिल तसाच कामावर निघाला वाटेत त्याच्या डोक्यात अजूनही त्या प्रणयक्रीडा सुरू होत्या.....त्याला कामावर जायला उशीरच झाला त्याने कामावर जाऊन हातात कुदळ घेतले तसा त्याला बघून ठेकेदार बोलला
"काय रे अन्या दोन दिवस कुठं उलथला व्हतास.....मला वाटलं तिकडच कुठं पिऊन पडून खपला की काय??".....चल सोड कामाला लाग
तसा अनिल कामाला लागला......उन्हाचा तडाखा जाणवत होता.....त्या दुनियेप्रमाणे सौम्य आल्हाददायक ऊन नव्हतं.....इकडे हे ऊन घाम काढणार होतं......रत्नमालाने त्याच्या अंगावर जे ओरखडे दिले होते ते बघून स्मितहास्य करीत अनिल काम करत होता.....रात्रीही तेच विचार.....एकदा राजेशाही भोगून आलेला हा.....आता इथली दुनिया त्याला नरक वाटू लागली.....पण त्या स्वर्गात जायला मोठी किंमत मोजावी लागणार होती.....महिना असाच गेला.....झोपताना रत्नमालाचा फोटो त्याच्या समोर असायचा......तिला बघितलं की परत तो तिकडच्या आठवणीत रमयचा.....पण तिथे जाण्यासाठी त्याला नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीचं ताजे रक्त हवं होतं.....नियम तर तसा होता.....जेवढं जास्त रक्त तेवढ्या दिवसाची मजा.....एखाद्याचा खून करणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते.....अनिलची परत तीच कंटाळवाणी लाईफ सुरू होती......आता तर त्याच्या कामेच्छा अजूनच भडकल्या होत्या......तिथले दिवस त्याला परत आठवत होते......डोळे बंद केले की समोर ती रत्नमाला.....ह्याचा प्रत्येक आदेश मानत होती आणि ह्या युगात अनिल सडलेलं शरीर घेऊन लोकांच्या शिव्या खात फिरत होता......काय माहीत त्याचा मालक त्याला खूप शिव्या द्यायचा.....कधी कधी रागाच्या भरात त्याला मारून त्याच रक्त खेकड्याचा देऊन त्या दुनियेत मजा करायचे विचार अनिलच्या मनात येत होते.....पण तो स्वतःला सावरत होता....."ह्याला मारलं तर आपल्याला आयुष्यभर जेल मध्ये रहावं लागेल" असाही सावध विचार त्याच्या मनात येत असे.....पण नंतर नंतर ती रत्नमाला आणि तिथली ती राजेशाही दुनिया त्याच्या सारख्या डोक्यात फिरू लागली.....पण त्यासाठी कुणाचा तरी खून करायला पाहिजे......हे करणे अनिलला मान्य नव्हते.....एके दिवशी न राहवून परत तो त्या वेश्यालयात गेला.....जास्तीचे पैसे देऊन विनवण्या करू लागला......पण तिथल्या लोकांनी त्याला अगदी हाकलून लावले....त्याच्या जखमातुन येणाऱ्या उग्र वासाने सगळा परिसर दुर्गंधीने भरला होता....एका दोघांनी ह्या रागात त्याला खाली पाडून एक दोन काठीचे तडाखेही दिले.....एक काठी डोक्यात बसल्यामुळे डोक्यातून भळाभळा रक्तही वाहत होतं.....ती जखम तशीच पकडून तो रात्रीचा रस्त्यावरून जात होता......त्याने अंगावर चादर घेतली होती......रस्त्यावरून तो रागाने चालला होता.....एकाठिकानी तो एका पायरीवर विश्रांतीसाठी बसला.....त्याने आपल्या अंगावरची चादर थोडी बाजूला केली आणि बाजूला पडलेल्या कागदाने डोक्यावरचं रक्त पुसू लागला.....चादर बाजूला होताच त्याच्या अंगातील दुर्गंधीने बाजूला झोपलेल्या भिकार्याला जाग आली आणि त्याने अनिलला शिव्या हसडायला सुरवात केली
"ये भिकार्या......ही जागा माझी आहे....xxxx कुठून येतात काय माहीत.....चल निघ इथून"
अस बोलून तो 60-65 वर्षाचा भिकारी परत झोपी गेला.....आता मात्र अनिल प्रचंड चिडला......तो रागाने लालभुंद होत होता......
"माxxxx .....भिकारी नाही रे मी.....राजा आहे राजा....तुला दाखवतो राजा काय असतोय ते"
अस बोलून त्याने समोरचा मोठा दगड आपल्या पूर्ण ताकतीने उचलला....ह्या कामातच त्याचं पूर्ण आयुष्य गेलं होतं 25-30 किलोचा दगड त्याने सहज उचलला आणि सरळ त्या झोपलेल्या भिकार्याजवळ जाऊन इकडे तिकडे बघून त्याच्या डोक्यात घातला.....त्या भिकार्याला ओरडायचीही संधी मिळाली नाही....त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता......त्याच्या पायाची झटपट होत होती इकडे अनिलने आपली पाण्याची बाटली काढली आणि त्याच्या अंगातून वाहणारे रक्त त्या बाटलीत जमा करायला सुरुवात केली.....ओंजळीने तो रक्त भरत होता.....अस विकृत काम करूनही त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं.....जवळपास पूर्ण बाटली त्याने भरून घेतली आणि धापा टाकीत तो चालू लागला.....12 वाजत आले होते आजूबाजूला कोणीही नव्हते......4,5 कुत्री मागे लागली होती त्यांना हाड हाड करीत अनिल पुढे चालला होता......त्याच्या मनात विचार आला की अर्ध्या बाटलीने तो तिथे 2 दिवस राहू शकतो तर मग पूर्ण बाटलीत
आता त्याला काही सुचेना ....त्या दुनियेतून परत आल्यावर त्याच्या पोटात आग पडली होती तो अशक्त झाला होता.....कारण तो मनाने तिकडे आणि शरीराने इकडे होता......त्याचं जिवंत शरीर इथे मृतवत होतं पण ते जिवंत होतं.....त्याला जिवंत ठेवणं गरजेचं होतं.......समोर एक मोठं मेडिकल सुरू होतं......तिथून त्याने पाच बाटल्या सलाईन घेतलं......त्याला लागणाऱ्या सलाईन पाईप एक adult डायपर.....अस घेऊन तो घराकडे आला.....त्याने आधी आपल्या घराला बाहेरून कुलूप लावलं आणि तो मागच्या बाजूला गेला.....त्याच घर पत्र्याचं होत तो मागच्या बाजूने घरावरती चढला आणि जरासा पत्रा उचकटून आत शिरला......त्याने सगळ्या वस्तू नीट ठेवल्या....त्याच्या घरात एक मोठं पाण्याचं कॅन होत त्यात त्याने त्या सलाईनच्या बाटल्या रिकाम्या केल्या......आणि ते कॅन एका ठराविक उंचीवर ठेवले......त्याची पाईपलाईन जोडली.......सगळी तयारी झाली होती.....पण आता मुख्य गोष्ट.....तिथे गेल्यावर काय काय करायचं......आधी तर रत्नमाला त्याचा डोक्यात होती तो राजेशाही वाडा आणि ह्यावेळी मात्र त्याने एका छोट्या गावाची कल्पना केली.....जिथे सुंदर सुंदर स्त्रिया असतील.....तो गालात हसला.....त्याने आधी त्या सलाईन पाईपची सुई आपल्या नसेत घुसवली.....डायपर तर त्याने घातले होतेच सगळी तयारी झाली होती.....एक दीर्घ श्वास घेऊन त्याने ती रक्ताची बाटली घेतली आणि आपल्या गळ्यावर जिथे ते छिद्र होतं तिथे ते रक्त ओतायला सुरवात केली.....रक्त मान्य झालं.....त्याच्या गळ्यावरचे छिद्र आता मोठं होऊ लागलं......त्यातून त्या सोन्याच्या खेकड्याची एक नांगी वर आली.......तो खेकडा एखाद्या स्पंज प्रमाणे सगळं रक्त आपल्यात शोषून घेत होता.....बाटली हळूहळू रिकामी होत होती......पूर्ण बाटली रिकामी झाल्यावर तो खेकडा छोटा होऊन परत त्या गळ्याच्या छिद्रातुन आत गेला तो सरळ अनिलच्या मेंदू पर्यंत पोहोचला....ते मोठं छिद्र परत लहान झालं......आता अनिलचे काम होत.....त्याला आतून आदेश आला
"तुमचं पुढील प्रवासाचं तिकीट कन्फर्म झालं आहे....आता प्रवास सुरु होईल आता डोळे बंद करून तुम्हाला जे जे हवं आहे त्याचा विचार करत रहा....."
अनिलच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.....त्याचे डोळे जड झाले......परत ती आल्हाददायक हवा कोवळ ऊन त्याच्या अंगाला लागत होतं.....त्याने आपले डोळे उघडायच्या आधी एक स्मितहास्य केले....आणि डोळे न उघडताच उठून बसला....जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा समोर रत्नमाला उभी होती तशीच सुंदर मादक.....पण आता त्याने पूर्ण गावाची कल्पना केली होती.....पूर्ण गाव त्याच्या स्वागतासाठी उभे होते त्याच्या हातात एक एक जण फुल देऊन स्वागत करत होते.....कल्पना केल्याप्रमाणे सुंदर सुंदर मुलीही दिसत होत्या.....अनिल परत एकदा हरकून गेला.....अस आदरातिथ्य त्याला सात जन्मात मिळालं नसतं पण आता तो तिथला राजा होता.....त्याने परत रत्नमालाला आपल्या बाहुपाशात ओढले......तो आपल्या वाड्यात गेला......आधी आपल्या कामेच्छा तृप्त करून घेतल्या......मस्त पंचपक्वान्न जेवण केले आणि तो आता बाहेर पडला.....आता कमीत कमी पाच दिवस तो तिथला राजा होता.....प्रत्येक गोष्ट तो उपभोगत होता....त्याने मागितलेल्या गावातील तरुणी पण सुंदर होत्या रोज एक एक सुंदर तरुणी त्याच्या सेवेला असायची.......पाच दिवस कधी गेले कळलेच नाही.....तो बरोबर 5 दिवसांनी परत आपल्या युगात आला.....ह्यावेळी मात्र कमालीचा अशक्त झाला होता.....त्या कॅन मधील सलाईन कधीच संपलं होतं.....ती रुम तर त्याने घाण केलीच होती.....5 दिवस एकाच ठिकाणी पडून असल्यामुळे त्याला उठताही येत नव्हतं...….तो बाजूच्या मोडक्या टेबलचा आधार घेऊन उभा राहिला एवढा शारीरिक त्रास होऊन देखील त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.......त्या दुनियेत सुंदर सुंदर स्त्रिया त्याच्या सेवेला होत्या.....आता ह्या नरक दुनियेत तो एकटा आणि दरिद्री होता.....हातावरचे पोट असलेला....तो परत कामावर गेला पण त्या दुनियेची चटक काही जाईना.....इकडे खुनाचे सत्र वाढत होते....पोलीस हवालदिल झाले होते पण अनिल मात्र ते खून करून दर महिन्याला परमोच्च आनंद ग्रहण करीत होता......एखाद्याचा जीव त्या स्वर्ग सुखापुढे किरकोळ वाटू लागला.....शहरात 5-6 हत्या झाल्या होत्या....अनिल दर महिन्याला एकाचा मुडदा पाडत होता.....दर महिन्याला तो वेगवेगळ्या जगात वावरत होता.....ह्या महिन्यात तर त्या दुनियेत त्याने आपल्या ठेकेदार ला आणलं होतं आणि भर चौकात फाशी देऊन आपला राग शांत केला होता....दर महिन्याला येणाऱ्या अभिनेत्री बदलत होत्या......त्याच्या बरोबर प्रणय करण्याची चटक अनिलला लागली होती.....त्यासाठी खून करणे त्याला अगदी किरकोळ वाटत होते......जवळपास 12 खून त्याने केले होते....आणि बेवारस गरीब लोकांचे खून पडत असल्यामुळे पचतही होते....पोलीसही सिरीयस घेत नव्हते
(चालू दिवस)
तेरावा खून पडला होता....आता सगळीकडून पोलिसांवर दबाव होता.....अनिल तर आता ह्या गोष्टीच्या आहारी गेला होता....एखाद्याच्या डोक्यात दगड घालताना आपण जणू एखाद्या पर्यटन स्थळी जायचं तिकीट काढत आहोत असं त्याला वाटे.....ह्या वेळी मात्र त्याचे हे सनकीपण त्याच्या मुळावर उठले.....एका दुकानाच्या cctv कॅमेऱ्यात अंगावर चादर घेऊन त्या रस्त्याने जातानाचा एक इसम दिसला....पोलिसानी शहरातील सगळ्या खबर्यांना बोलावून घेतले.....त्यातल्या एकाने अनिलच्या चादरीवरून त्याला ओळखले.....एका दारू अड्ड्यावर अनिल आणि ह्याचा सामना झाला होता.....अनिल काहीसा संशयित वाटत असल्यामुळे त्या खबर्याने अनिलचा घरापर्यंत पाठलाग केला होता.....आताही तो खबरी पोलिसांना अनिलच्या घरापर्यंत घेऊन आला.....पोलिसांची एक टीम तातडीने अनिलच्या घराला घेरून त्याला पकडायला तयार होती....घराला बाहेरून कुलूप होते.....मोडक्या दाराच्या एका छिद्रातून एका पोलिसाने आत डोकावले.....अनिल आत झोपला होता.....हे बघून पोलिसांनी दरवाजा वाजवला आतून काहीच उत्तर आले नाही....अनिलच्या गळ्याभोवती रक्त दिसत होतं....पोलीस घाबरले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.....आतले दृश्य बघून पोलिसांना धक्काच बसला...…अनिल झोपला होता वरून एका कॅन मधून त्याला सलाईन सप्लाय सुरू होता आणि त्याच्या गळ्याभोवती रक्त होतं.....बाजूला लाल बाटली होती.....उजवा हात रक्ताने माखला होता....एका पोलिसाने चेक केले अनिल जिवंत होता......पोलिसांना काही कळेना नेमका हा आजारी आहे की अजून काही....पोलिसांनी त्याला उचलले आणि सरळ बाजूच्या सरकारी दवाखान्यात नेले.....अनिलची अवस्था बघून डॉक्टर हैराण होते.....कारण तो एकदम ठणठणीत होता त्याचं सगळं शरीर नीट काम करत होत......पण त्याला काही केल्या जाग येत नव्हती.....कसल्यातरी अवस्थेत तो गेला होता.....डॉक्टरांना अनिलच्या मानेच्या मागच्या बाजूला कसली तरी हालचाल जाणवली पण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.....अनिल काही केल्या शुद्धीत येत नव्हता.....पण एक स्मितहास्य कायम त्याच्या चेहऱ्यावर असायचं कधी कधी उसासे घ्यायचा कधी कधी त्या अवस्थेत काहीतरी हसून बडबडायाचा.....कोम्यात गेलेल्या माणसाची अशी अवस्था नसते.....ही केस पहिल्यांदा आली होती....ज्यात एक माणूस गाढ झोपेत आहे....झोपेत काहीतरी विचित्र बडबडत आहे....पोलीस आणि डॉक्टर हैराण होते....2,3 करत पाच दिवस उलटले.....पोलिसांनी पाच दिवस अनिलवर नजर ठेवली....पाच दिवस झाले शेवटी तो त्या दुनियेतून परत आला.....स्वतःला दवाखान्यात आणि समोर पोलीस बघून अनिल घाबरला आयुष्यात त्याने काबाडकष्ट केले होते पण कधी वाईट काम केले नव्हते.....पोलिसांना बघून तिथून उठून पळून जायचा प्रयत्न करू लागला पण अंगात अशक्तपणा असल्यामुळे अनिलला ते शक्य झालं नाही.....डॉक्टर आले....त्यांनी अनिलला परत चेक केलं तो एकदम ठणठणीत होता त्याला काही खायला घालून त्यानी अनिलला पोलिसांच्या हवाली केलं...."हे सगळं मी नाही केलं ते त्या खेकड्यामुळे झालं" असं तो डॉक्टरांच्या समोर बडबडू लागला......आता पोलिसांची वेळ होती....पोलिसांनी त्याला सरळ रिमांडमध्ये घेतलं....अनिल रडत होता त्यात एक दोन पोलिसी फटके बसताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.....आता कारण.....पोलिसांनी ह्या खून सत्रामागचे कारण विचारले....अनिल थरथरत होता....एका हवालदाराने त्याला पाणी पाजलं
"म....माझ्या अंगात एक सोन्याचा खेकडा आहे....त्याला रक्त हवं असत....तो ताज्या रक्ताच्या बदलात मला मी सांगितलेल्या दुनियेत घेऊन जातो....तिथे कपडे न घातलेल्या सुंदर बायका असतात.....तिथले लोक मला राजा मानतात....मला ती दुनिया खुप आवडते म्हणून तिथे जाण्यासाठी मी हे खून करत होतो"
हे ऐकून पोलीस हादरले.....कुणी मनोरुग्ण आहे का हा??.....मनोरुग्णच असेल....इतके खून ते ही फालतू न पटणाऱ्या कारणासाठी.....हे सगळं प्रकरण विचित्र होतं......अनिलला पोलिसांनी एका वेगळ्या सेल मध्ये ठेवलं....त्याचे चेकप करायला एक डॉक्टर यायचे....पण डॉक्टर आले की तो
"माझ्या अंगातला खेकडा बाहेर काढा....काढा नाहीतर मी मरून जाईन"
अस ओरडत डॉक्टरांवर हावी व्हायचा 10-12 दिवस झाले होते तो एकदम नॉर्मल होता......पोलिसांनी ह्या सिरीयल किलिंग प्रकरणावर पडदा टाकला होता.....पण जसे जसे जास्त दिवस होऊ लागले अनिल वेदनेने तळमळू लागला.....जेल मध्ये जोरात ओरडू लागला
"खेकडा आतून पोखरत आहे नांगी मारत आहे....त्याला रक्त पाहिजे आहे मला रक्त द्या आआआह........"
अस जोरजोरात ओरडू लागला.....कधी पोट कधी पाट कधी मान कधी डोकं धरून जोरात तेच तेच ओरडू लागला.....डोकं जेलच्या सळ्यावर आपटू लागला....आता मात्र पोलीस जाम घाबरले.....अनिल सारखा "रक्त रक्त" अस बडबडत होता.....तिथले डॉक्टर आले आणि त्याने अनिलला बेशुद्ध केलं.....त्याला परत चेक करू लागले.....तो एकदम नॉर्मल वाटत होता......
"हा येडा खरबुड्या नाटकं करतोय"
अस बोलून एक दोन पोलिसांनी त्याला उचलून आत टाकलं....तशी अनिलला हात लावायची कुणाची हिंमत होत नव्हती कारण त्याच्या अंगावरचे फोड....त्यातून वाहणारा तो द्रव आणि तो उग्र वास....सगळं किळसवाने होते....आता पोलिसांनी अनिलच्या पायात बेड्या घातल्या.....पण वेदनांनी तडफडत असे....
"खेकड्या सोड....बाहेर पड माझ्या अंगातून आआह आई ग"
ह्या अश्या वेदनांनी पूर्ण जेल शहारून जायचं.....अनिल ह्या सगळ्याला वैतागला होता....त्याने मनाशी काहीतरी ठरवले होते....एकदा त्याची वाढलेली दाढी करत असताना त्याने कुणाच्या नकळत तिथून एक ब्लेड उचलले होते......त्या रात्रीही तो वेदनांनी तडफडत होता....त्याचे हात थरथर कापत होते.....अनिल त्या वेदना सहन करीत शांत झाला.....त्याने वेदनेने आपल्या शरीराला ओरबडले होते......त्या अवस्थेत तो डोळे बंद करून बडबडत होता
"एक धारदार तलवार....रत्नमाला....ते गाव.....हे....हे मला पाहिजे ....देतो मी तुला रक्त.....कंटाळलो आहे मी.....माझ्या सुखासाठी त्या गरिबांना मारले मी......"
अस बोलून अनिलने आपल्या गळ्याच्या वरच्या बाजूला कट मारला हळूहळू रक्त वाहू लागलं.....गळ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या छिद्रात जाऊ लागलं......ताज्या रक्ताचा गंध येताच ते छिद्र मोठं होऊ लागलं......त्यातून तो खेकडा थोडा बाहेर आला त्यांची नांगी दिसत होती.......ती नांगी दिसताच
"माझी वाट लावलीस तू.....मला खुनी बनवलंस अस ओरडत अनिलने त्या खेकड्याचा नांगी ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.....त्याला आपल्या शरीरापासून दूर केलं पाहिजे.....पण खेकड्याचे त्याच्या गळ्याच्या हाडाला आपल्या एका नांग्याने घट्ट पकडलं होतं.....त्यामुळे तो जागचा हालत नव्हता.....इकडे रक्तस्त्राव सुरू होता रक्त छिद्रात जात होते.....हळूहळू अनिलचे डोळे जड होऊ लागले......परत ते कोवळे ऊन गार वारा समुद्राच्या लाटांचा आवाज......अनिलने खाडकन डोळे उघडले........समोर रत्नमाला स्मितहास्य करीत त्याचे स्वागत करीत उभी होती......अनिलच्या हातात एक तलवार होती..अनिलच्या डोळ्यात आणि डोक्यात प्रचंड राग होता...हातातली धारदार तलवार त्याने रत्नमाला वर फिरवली.....त्याने तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली
"तुझ्या मोहामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.....फसवलं तुम्ही मला....माझ्या हातून खून करायला लावले....सोडणार नाही मी कुणाला"
अस किंचाळत अनिल रत्नमाला वर सपासप वार केले....तलवार धारदार होती.....रत्नमालाचे तुकडे झाले होते आणि त्या तुकड्यांची माती माती होत होती...ती माती बघून अनिल अजून चिडला..ती माती तोंडाला फासून त्याने त्या गावकऱ्यावर तलवार चालवायला सुरवात केली.....कुणीही जगाचे हालत नव्हते ओरडत नव्हते.....धारदार तलवारीने वार झाल्यामुळे त्यांचे तुकडे पडत होते आणि माती होत होते...
"सगळं सगळं खोटं आहे.....खेकड्या वाट लावलीस तू माझी.....खोटे जग दाखवून खरे खून करवून घेतलेस तू"
..शेवटी ते एक मायावी काल्पनिक जग होतं.......आता रागाच्या भरात अनिलने त्या वाड्यावर दगडफेक करायला सुरुवात केली.....अनिल रडत रडत दगड मारत होता.....हळूहळू त्याच्या डोळ्याला अंधारी मारू लागली अशी अंधारी त्याला ह्या दुनियेतून बाहेर पडताना मारायची.......त्याने आपल्या शरीराकडे बघितले......त्याच्या शरीराचीही माती होत होती.....इकडे जेल मध्ये अनिलच्या गळ्याच्या छिद्रातून तो खेकडा बाहेर आला त्याचा आकार आधीपेक्षा किंचित वाढला होता......अनिल जेल मध्ये निपचित पडला होता.....एका हवालदाराची नजर रक्ताळलेल्या अनिल वर पडली.....तो धावत इन्स्पेक्टर जवळ गेला.....पोलिसांनी डॉक्टरांना बोलावले त्याला चेक करून डॉक्टरांनी खाली मान घालून आपल्या कानातला स्टेट्सकोप बाहेर काढला
"माय गॉड....ही इज डेड"
अनिलच्या गळ्याला मोठं छिद्र पडलं होतं....वरती ब्लेडचा कट होता....हे सगळं कसं झालं हे मोठं छिद्र कस पडलं?? पोलिसांना चक्रावून सोडणारे होते.....अनिलवर हावी झालेला खेकडा बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याने आपले प्राण गमावले होते....आणि तो खेकडा मात्र शेकडो वर्षाची आपली रक्ताची भूक भागवून परत आपल्या पेटीजवळ आला होता.............(कथा समाप्त)
लेखन -- शशांक सुर्वे
(सहज विषय सुचला लगेच लिहून काढला....हा विषय पकडून पुढेही लिहण्याचा प्रयत्न करीन...ही कथा कशी वाटली त्याबाबत आपले बहुमूल्य अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद
No comments:
Post a Comment