कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- १६
( मी गिरीजाची मैत्रीन हिचा पुढचा भाग हा शेवटचा असेल )
.
सारिका बोलते हिला नवीन रूप भेटले, तरी हिची ऐकण्याची शक्ती कमीच आहे ना ग ऐकता. शेवटचे सांगते नुकुला रघुनाथ चाकण ऐकले का आणि तुला तिने काय सांगितले होते. तू काय केलेस रात्री ग आणि हो वाचलीस रात्री आम्ही होतो म्हणून नाही तर होते तुझे तिरडी. आम्हाला आमच्या आईने सांगितले आहे रूपात येऊ नका म्हणून.
.
गिरीजा सगळे एकूण हसत बोलते सारिका, ऐकता असे बोलायचे नाही मोठ्या ताईशी.
काय ग तुला ह्या रूममध्ये कोणी परवानगी दिली येण्यास ग.
.
सुरेखा बोलते गिरीजा मोठ्या ताईशी असे नाही बोलायचे.
.
गिरीजा बोलते हो का नकुला रघुनाथ चाकण.
.
सुरेखा मान वर करून बोलते परत दोघीना सांगते हे नाव परत तुमच्या तोंडात आले तर बघा समजले का.
.
गिरीजा बोलते काय करणार तू नकुला तू. काय ग मुग्धा काय भारी नाव आहे ना हे.
.
मुग्धा बोलते हो ना आणि हिला लाज वाटते हे नाव वापरायला ग.
.
सुरेखा दोघीनी हवेत उचलून बोलते, एकदा सांगितले ते समजले नाही का ग दोघीना बोलून खाली फेकत बोलते.
.
तशी गिरीजा उठून सुरेखा समोर उभी राहून बोलते ए नकुला आवर स्वतःला नाही तर माझ्या रूपात आली तर मी तुला सोडणार नाही.
.
पाठून खी खी हसण्याचा आवाज येत ऐकता बोलते, नकुला आता बोल.
सारिका बोलते नकुला येते आहे ती परत आपल्या रूपात.
.
सुरेखा बोलते मुग्धा बंद कर हे पहिले सगळे हे.
.
मुग्धा उठत बोलते मी कुठे काय करत आहे सुरेखा.
.
गिरीजा बोलते ती काही नाही करत आहे नकुला. ती लहान आहे असे बोलून तिच्याकडे हात करून तिला फेकत बोलते, ह्या पुढे परत माझा गळा पकडला तर लक्षात ठेव.
.
सुरेखा, मुग्धाला बोलते बाहेर जा लवकर पळ मुग्धा.
.
मुग्धा पळत बाहेर जाते.
.
तसा दरवाजा बंद होऊन गिरीजा बोलते, त्या माकडीनला बाहेर पाठवून काय फायदा ग. बोलून हसत बोलते, तुलाच ऍक्टनिंग येते का बोलून दरवाजा उघडत बोलते. ज्या कॉलेजची स्टुडंट आहे ना त्या कॉलेजची मी प्रिन्सिपल आहे ग बोलून बाहेर येत, बाहेर येऊन हात पकडत दोघींना बोलते पळायला तयार रहा समजले का दोघींना.
.
मुग्धा आत जाऊन, सुरेखाला हलवत बोलते अशी का शॉक लागल्या सारखी पडली आहे ग.
.
सुरेखा तंद्रीतून बाहेर येत बोलते. मेली त्या तिघी कुठे आहेत ग. बोलून बाहेर येत, मुग्धाला बोलते त्या मोठ्या घोडीला पकड, मी ह्या दोन माकडीनला पकडते.
.
असे घरात पकडा पकडी चालू होते. शेवटी दोघी सुरेखाच्या तावडीत भेटून, गिरीजाला बोलते थांब तिथेच, मुग्धाला बोलते काय ग तू पिशाच्च आहे ना आणि तिला पकडू शकत नाही तू .
.
सगळे जण तो आवाज ऐकून बाहेर येत. आई बोलते काय ग सुरेखा तू लहान आहेस का पकडा पकडी खेळायला.
.
सुरेखा बोलते तू जरा शांत रहा पहिली, काय ग काय बोललीस तू ज्या कॉलेजची स्टुडंट आहे ना त्या कॉलेजची मी प्रिन्सिपल आहे काय.
अग तू ज्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे ना, मी त्या कॉलेजची ट्रस्टी आहे. ये जवळ नाही तर ह्या दोघीना मी रात्री जेवण नाही देणार. तुला सांगितले ते नाव नको घेऊ तरी घेत होतीस.
ये जवळ नाही तर ह्या दोघीना धपाटा देणार.
.
तशी सारिका बोलते, इस चुडेल के सामने मत झुक तू दीदी हम ईसकी मार खा लेंगे मगर हमारी बडी बहिण नही झुकेगी, इस चुडेल के सामने, असे बोलून आपली जीभ बाहेर काढून खाली पडते.
.
तशी सारिका का बोलते हे काय केले तू ऐकता. कुठे फेडणार तू हे पाप हडळ आणि तू आमच्या आई-बाबा काय उत्तर देणार ग सुरेखा, त्यांनी तुझ्या हवाली सोडून गेले होते ते. ऐकता थांब मी पण येते बोलून ती पण खाली पडते.
.
गिरीजा त्यांच्या जवळ जाऊन बोलते थांबा मी पण येते. काय केले सुरेखा हे, किती वर्षा नंतर माझ्या बहिणी भेटल्या होत्या आणि तू बोलून ती त्या दोघीना उचलून आपल्या खोली जवळ उभी राहत बोलते.
अग ज्या कॉलेजची ची ट्रस्टी आहे ना.
.
तेवढतात सारिका बोलते त्या कॉलेजच आम्ही तिघी मालकीण आहे समजले का.
.
ऐकता बोलते मालकीण नाही ग मालक बोल नाग ताई.
.
अग ती आजून ती लहान आहे.
.
सुरेखा चिडत बोलते, खुशी, साची, मुग्धा पकड त्या चिरकूटला, ए बाई राहूदे तू लांब रहा.
साची आणि मुग्धा पकड त्यांना आणि समोर उभे करा.
.
आई मला पाणी आणि कॉफ़ी दे ना ग थकली मी.
.
दोघी, तिघांना ना पकडून उभी करत बोलतात बोल आता काय करायचे, तिघींचे ग.
.
सारिका हसत ऐकताला बोलते ही बघ काय बोलते. मी थकली आहे बोलते आई ही नाव खराब करणार.
ऐकता बोलते अग ही आपले नाव खराब करणार.
.
सुरेखा बोलते गप्प बसा, ती रक्षा कशी ह्या दोघींना सांभाळते काय माहिती.
.
सारिका बोलते आई आम्हाला नाही सांभाळत आम्ही तिला सांभाळतो ग .
.
आई, सुरेखाला कॉफी देत बोलते, ह्या म्हणजे ही जी मान खाली घालून उभी आहे हिला,, हत्तीच्या खाली द्या महाराणी जी आणि ह्या दोघीनी सोडून द्यावे.
.
तशी सुरेखा आई कडे बघून हात जोडून बोलते सगळे ऍक्टर आहेत.
.
रुपाली बोलते ते हसतात आहेत ना ते डायरेक्टर आहेत.
.
गिरीजा आईला बोलते आम्हाला पण कॉफी आणि खायला काही मिळेल का ग.
.
सारिका बोलते ती उठली ग आणि गिरीजाची हात पकडून ऐकताला बोलते चल ग पाठी.
.
सुरेखा बोलते खुशी, साची, मुग्धा तयार व्हा पण रूपात येऊ नका.
सगळे पाठी राहा आमच्या, आई तुला काय वेगळे सांगायचे का.
.
आई बोलते ते कोण आहे खालून वर येते आहे, खूपच वेगळे वाटते आहे.
.
जरा वेळाने ती वर येत ती घुरघुरात सगळ्या कडे बघते आणि गिरीजकडे बोट दाखवत तीच्या जवळ जाते.
.
तसे दोघे आपल्या रूपात येणार, गिरीजा त्यांच्या हात घट्ट पकडते.
.
ती गिरिजा जवळ जाऊन तिच्या अंगावर पडून बेशुद्ध होत बोलते ताई तू.
.
दोघी तिच्याकडे बघून एक मेकांकडे बघुन हसतात.
.
गिरीजा तिला पकडून आईला बोलते चादर आणते का लवकर.
.
आई धावत जाऊन चादर तिच्या अंगावर घालून, सुरेखाला विचारते हिची खोली कुठली ग.
.
सुरेखा बोलते गिरीजाच्या खोलीत घेऊन जा.
स्वाती जा आईला मदत कर.
आई तुम्ही जरा मुग्धाला घेऊन तिच्यासाठी कोंबडीचे बारीक तुकडे करा. ए बाई स्वतःहा वर कंट्रोल ठेव काय.
खुशी आणि आई खाली जा आणि आवरा सगळे ते. नंतर सांगते खुशी ती कोण आहे, आत्ता जा.
.
ऐकता बाहेर येत बोलते सुरेखा, ती येते आहे आणि तिच्या बरोबर एक पिवळी आकृती पण येते आहे.
.
साची लवकर जा तिला बाहेर नको येउदे समजले का.
तुम्ही दोघी पण बाहेर येऊ नका समजले का जा आतमध्ये.
.
लेखा आत येत बोलते, कोण नवीन आले आहे ग.
.
सुरेखा बोलते तुला काय करायचे आहे ते बोल. तू कुठल्या कामाने आली आहेस ते सांग.
.
काही नाही तिला आणि आईला कधी पाठवणार ते बोल असे बोलून वर बघते.
.
सुरेखा बोलते बघू नंतर आपण जा तू आता.
.
लेखा बोलते हा घुर घुरण्याचा आवाज गिरीजाच्या खोलीतून येतो आहे ग.
.
तू जाते की, मी घेऊन जाऊ ते बोल.
.
लेखा बोलते जाते ग बाई मी कष्ट घेऊ नकोस ग.
असे बोलून अदृश्य होते.
.
थांब तू का आलीस आहे, तिच्या पाठी ईथे.
.
ती पिवळी आकृती आपल्या रूपात येत बोलते. काही नाही तिला का या युगात आणले आहे तू. ती या युगातली नाही आहे, तू सगळे लिखित बदलते आहेस समजले, तिला परत सोडून ये, वा ही पण इथेच आहे का.
.
सुरेखा बोलते जातेस का, खुशी वर येण्या अगोदर. जर ती वर आली तर ती तुला सोडणार नाही समजले का.
.
हो जाते मी, तीची धमकी देऊ नकोस मला. असे बोलून ती अदृश्य होते.
.
खुशी आणि आई वर येतात.
.
तशी खुशी बोलते देवयानी आली होती ना. काय आई तू तिला पण वाचवते आहे. तू समजत नाही शी बाई बोलून आपल्या खोलीत जात वर बघून बोलते.
तुम्ही काय बाल्कनीतून बघतात आहे, असे बोलून वर जात मयूरला घेऊन अदृश्य होते.
.
आई बोलते ती मुलगी कोण आहे.
.
सुरेखा बोलते चल आत, आई झाले का कापून. तर गिरीजाच्या खोलीत आना ते. असे बोलून ती गिरीजाच्या खोलीत जाते.
.
जरा वेळाने मुग्धा आणि आई गिरीजाच्या खोलीत येत. आई ते तुकडे सुरेखाला देत बोलते हे घे.
.
सुरेखा तिघींना बघत बोलते आवरा स्वतःला.
हे घे सुद्रा खा.
.
सुद्रा त्या वर तुटून पडले. इथे सगळे आपल्या ओठावर जीभ फिरवत, त्या प्लेटकडे बघत असतात.
.
तशी सुरेखा रागात बोलते बाहेर जा सगळे.
.
सारिका बोलते चला बाहेर आपल्या साठी बाहेर असणार बोलून सगळे बाहेर येतात.
.
गिरीजा बाहेर जाणार, तेवढतात सुद्रा तिचा हात पकडते आणि मानेने तिला खुणावत बोलते तू मको जाऊ.
.
गिरीजा तशीच थांबून आपल्या आईकडे बघते.
.
सुरेखा बोलते ही लेखाची मुलगी आहे. हिला मी २०२३ मधून साहिलला सांगून आणले आहे.
चंद्रकांतच्या तावडीतून, काम झाले की परत हिला त्या युगात पाठवणार आहे.
एक समजत नाही हिच्या जवळ जाऊन, कशी बेशुद्ध पडली.
ही काही तरी बोलली हिला.
.
तू ऐकले काय ग आई.
.
आई बोलते नाही ग. गिरीजा काय बोलली ग ती तुला.
.
मला नाही आठवत आहे ग.
.
तेवढ्यात बाहेरून आवाज येतो सोड मला का मला वापर केला आणि मेलो असतो तर.
.
खुशी घोगऱ्या आवाजात बोलते मेला का तू नाही ना.
.
गिरीजा पुढे जाणार तेवढ्यात सारिका तिचा हात पाजडून थांबवत बोलते ताई थांब काही होणार नाही.
.
खुशी, गिरीजाला बघत बघते आहेस, असे बोलून तीच्या जवळ जाणार तेवढ्यात समोर ऐकता येत बोलते पाठी हो नाही तर.....
.
सारिका बोलते ऐकता सांभाळ स्वतःला ती काही करणार नाही. ती आपली ताई आहे.
.
तशी खुशी पाठी जात बोलते, आई गेली ती संपवले ह्याने, मी नाही.
.
बोल रे मयूर कोणी संपवले.
.
आई बोलते जा तुझ्या खोलीत आणि अवतार नीट कर जा.
मयूर उठ जा वर फ्रेश हो जा कॉफी पाठवते तुला.
मुग्धा जा कॉफी बनाव आणि गिरीजा ह्याला घेऊन जा वर.
मुली जा सुरेखा बरोबर तिच्या खोलीत. तुम्हाला पण काही तरी पाठवते.
स्वाती आईला पाठव जरा जा गिरीजाच्या खोलीत तू बस हिच्या जवळ.
रुपाली तू पण जा वर मुलांन बरोबर बस जा.
.
आई बाहेर येत बोलते बोलवले का.
.
आई बोलते हो जा तुम्ही आराम करा.
.
आई, सुरेखाला बोकते जा ह्यांना सोडून ये दोघांना साहिलकडे जा.
.
सारिका पाठी वळून बोलते आम्ही जाऊ शकत नाही आजी, कारण आम्ही आमच्या रूपात नाही आलो आहोत आणि आईने सांगितले आहे. आम्ही ईथेच रहायचे म्हणून आमचे काम संपल्यावर ती स्वतःहून ती येणार आहे आम्हाला घ्यायला.
देवयानीला खूप उशिरा मारले खुशी ताईने, पहिलेच मारायला पाहिजे होते.
.
सुलेखा तिने बाहेर खूप पिशाच्च तयार केले आहे.
.
मुग्धाची आई बोलते लहान असून ह्यांना एवढे कसे ग माहिती.
.
सुरेखा बोकते एक मागचे बघू शकते आणि दुसरी भविष्य बघू शकते.
पण कोणी विचारले तर ते सांगू शकत नाही आई.
.
ती बोलली की तिने खूप पिशाच्च बनवले ह्याचा अर्थ लावण्याच्या युगात, लेखा बरोबर. म्हणजे हरिहरेश्वरला.
.
देवयानी कुठे पण जाऊ शकत होती. खुशीने का मारले त्यांना कारण तिच्या परिवाराला तिने मारायला, शास्त्रीना मदत केली होती. का तर त्यांचे रक्त एकच होते की ते वापरून. हिच्या मार्फ़त ते ईथे त्यांना आणू शकतात.
पण ते आताच्या युगात आणू शकत नाही. त्यांना आणायचे असेल तर रक्षाला त्यांना मारावे लागेल आणि तिला मारणे अवघड आहे.
खुशी ने तिला नको मारावे होते.
.
मुग्धाची आई बोलते मग आता तू काय करायचा विचार केला आहेस.
.
काही नाही पर्व संपले आमचे की आम्ही झोपणार. आई सांगायला गेले तर खूप अवघड होईल मला. ए तुम्ही काय ऐकत बसलात आहे, तुमचे खाणे ती हावरत मुग्धा ताई खाऊन बसेल.
.
ऐकता बोलते असे कसे ती खाणार, चल ग सारिका बघूया कशी खाते ती. खालले तर आपल्या ताईला सांगू आपण.
.
आई त्यांच्याकडे निरखून बघत असते.
.
तशी सुरेखा बोलते विचार पण करू नकोस आई, ते अशक्य आहे, तू किती वेळ जाऊन आलीस काय फायदा झाला का.
सांगितले ना मी मला नाही आठवत ती कुठे आहे ती.
.
ए बकासुर आमच्या वाटणीचे का खाते आहेस तू, उठ तिथून चल नाही तर दरवाजा बंद होईल मग समजून जा, कोणीच शोधू शकत नाही तुला.
.
खुशी पाठून बोलते, मी जर बाहेरून दरवाजा बंद केला तरी हिला फेकून याल का कुठे पण.
.
पण एक आहे, जो दरवाजा बंद करणार आमच्या व्यतिरिक्त, ती पण तीच्या बरोबर जाणार .
.
मुग्धा बोलते कर ना बंद कर, आली मोठी मला गायब करायला.
.
ए म्हणजे खुशी काय ग, चिल्लर पार्टी तुम्ही कुठल्या युगातले ग.
.
माहीत नाही आमचे युग आणि आम्ही सांगत पण नाही. तुझ्या डोक्यात काय कुरापती चालू आहे ते समजले आम्हाला, जाते कुठे ते ठेव तिकडे आणि जा गुमान.
.
खुशी ताई तुला काही पाहिजे का.
.
खुशी बोलते नको खा तुम्ही मी बाहेर खाते असे बोलून वळणार तेवढ्यात सुरेखा आत येत दरवाजा बंद करते.
.
मुग्धा बोलते मला बाहेर जाऊदे, मग तूला काय करायचे ते कर.
.
सुरेखा बोलते अग टवाळी काय तुझ्या डोक्यात चालू आहे ते मला समजते.
.
जा चल बाहेर.
.
मुग्धा दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवणार तशी ओरडत पाठी वळत बोलते. सांग ना पहिलेच जीव गेला असताना.
.
खुशी काय बोलते आहे तू बोलून ती पण पाठी वळत बोलते, ए बायानो परत चला की.
.
आम्ही नाही आणले इथे, आम्ही फक्त तुम्हाला घाबरवण्या साठी फक्त बोललो.
.
सुरेखा बोलते मी आणले ईथे, मी सांगितले होते ना की मला माहिती नाही. मग का शोध घेतात आहे तिचे तुम्ही तिघी. मुग्धा ढकलुका तुला असे बोलून तिला ढकलते. तू ग जास्त सेफारली आहेस, तुला काय सांगितले होते, का मारले देवयानीला आणि त्या मयूरला का त्यामध्ये खेचले तू.
.
खुशी बोलते तिला कधी पासून शोधत होती आणि परत शास्त्री निसटले तिच्या मुळे म्हणून मी मारले तिला.
.
सारिका बोलते सुरेखा नशीब तुझे हिच्या हाती नाही लागले ते. नाहीतर तुझ्या शब्दला कोणी त्या युगात मान दिला नसता. फेक हिला पण नाही तर आम्ही फेकतो, ती खाली पडली आहे तिला कोणी मदत करायला नको का खाली, असे बोलून तिला खाली फेकतात. आता मजा येणार.
.
सुरेखा बोलते अरे हे काय केलं तू, ये जाऊदे मला सांगा तिच्या बद्दल कोणाला सांगितले कोणाला.
आजून एक तुम्ही दोघी रूप बदलायचे नाही. एकावंती आणि सिप्रा आली तरी. पुढच्या अमावास्येला समजले तुम्हाला. मी आहे तिथं पर्यंत, पुढचे तुम्हाला माहिती आहे सगळे काय घडणार आहे ते.
.
नाही आम्च्यावर ते चालून आले तर तुला पण माहिती आहे आम्ही कोणाचे पण ऐकत नाही. ती आई असो या बाबा.
.
सुरेखा बोलते कसे सांभाळतात दोघींना रे, चला.
.
ऐकता बोलते थांब आजून, बोलणे संपले कुठे आहे ग.
ती अगोदर कशी येते आहे ग सुरेखा.
.
सुरेखा बोलते कोण ग मला नाही माहिती.
.
ऐकता बोलते आम्ही लहान आहे. याचा अर्थ आम्हाला नको सांगू कोण.
त्या दिवशी आई बोलत होती, तू मला वचन दिले आहेस. तेंव्हा तू पण होती ना तिथे.
.
सुरेखा बोलते आई आणि मी त्यांना घाबरवण्या साठी तसे केले ग.
.
सारिका बोलते अग तू त्यांना सांग आम्हाला नको , समजले का काशी येते आहे ना.
हे युग तिचे होते, तुमचे नाही ना. त्याने तुम्हाला उठवले पहिले बरोबर ना जा आता तू पण, खाली बोलून धक्का मारतात आणि जीभ काढून तिला चिडवत असतात.
.
मुग्धा उठणार तेवढ्यात तिच्यावर खुशी पडते.
दोघी उठणार तेवढ्यात सुरेखा त्यांच्यावर पडते.
.
गिरीजाची आई बाहेर येत बोलतात, हे काय चालू आहे तुमच्या तिघांचे.
एक मेकांनवर का पडत आहेत तुम्ही, उठा पहिले.
तिघी उठणार तेवढ्यात मुग्धावर सारिका पडते आणि दोघी उठणार त्यावर ऐकता पडू रडायला लागतात.
.
त्यांचा आवाज ऐकून गिरीजवरून धावत येत, दोघींना उचलत बोलते, काय झाले दोघींना कोणी ढकलले ना आणि तुम्ही जमिनीवरून उठा पहिले.
.
सुरेखा बोलते तू गप्प बस, तुला नंतर बघते.
.
मुग्धा उठत बोलते तिला नंतर बघ, मेली कंबर मोडलीस माझी.
ये म्हशीं, तुला मी दिसली नाही का. खाते काय ग दिसतें झिरो फिगर आणि वजन म्हशी एवढे.
.
ए गप्प बस मेली त्या दोघी कुठे आहेत. तू ग आम्ही दिसलो नाही का पडली आमच्या वर आणि हिचे वजन आहे की काय.
ए तू ह्यांना कसे उचलते ग. आई गरम पाणी दे जरा शेकते कंबर.
लेकेश पिशाच्च्यांची पण कम्बर दुखते येऊ का वर.
.
मुग्धा बोलते त्याचा पासून दूर रहा समजले का. त्या दोघीना पकड, ए गिरीजा कुठे गेल्या त्या .
.
आम्ही आजीकडे आहोत या हिंमत असेल तर.
सुलेखा काशी येतेय बघ.
क्रमशः
No comments:
Post a Comment