ती काळरात्र 2 - शोध रहस्याचा...सुरुवात अंताची
लेखन : अभिषेक शेलारभाग : 1
टीप : या कथेचे सर्व हक्क लेखकाच्या अधीन आहेत. ही कथा व यातील पात्र ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही व तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच ही कथा कोणत्याही अंधश्रद्धा किंवा अफवांचे समर्थन करत नाही, केवळ मनोरंजन करणे हाच तिचा हेतू आहे.
नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो !! मी अभिषेक शेलार. “HAUNTED COLLEGE” व “ती काळरात्र” या माझ्या कथांना तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार !! माझ्या यापुढील कथांवरदेखील तुमच्या प्रेमाचा असाच वर्षाव होत राहील हीच अपेक्षा !!
सदर कथा ही माझ्या “ती काळरात्र” या कथेचा पुढील भाग आहे, त्यामुळेच ही कथा वाचण्यापूर्वी तुम्हाला या कथेचा पहिला भाग माहित असणे आवश्यक आहे… म्हणूनच या कथेचा पूर्वार्ध अगदी थोडक्यात तुमच्यासमोर मांडत आहे…..
कथेच्या पूर्वार्धातील घटना :-
महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातून दिपेश नोकरीनिमित्त मुंबईतील त्याच्या काकांकडे आलेला असतो… कालांतराने नोकरी मिळाल्यावर दिप्ती नावाच्या मुलीशी त्याचे लग्न होते… लग्नानंतर मुंबईतील एका सोसायटीत तो भाड्याने खोली घेतो…सोसायटीतील सर्वजण अगदी एका कुटुंबाप्रमाणेच राहत होते… काही दिवसांनी त्याच इमारतीत राहणाऱ्या सचिन नावाच्या व्यक्तीशी दिपेशची छान मैत्री होते...सचिनची पत्नी म्हणजेच सरिताही अगदी मनमिळावू व प्रत्येक कार्यक्रमात हिरीरिने सहभाग घेणारी अशी असते...सर्वकाही अगदी सुरळीत सुरु असते, परंतु अचानक एकेदिवशी खूप धक्कादायक अशी घटना घडते...सचिनची पत्नी सरिता स्वतःला राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या करते...परंतु तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्टच राहते...त्यानंतर एके रात्री घरी एकटे असताना दिपेशला खूप भयानक स्वप्न पडते...त्यात सरिताचे संपूर्ण शरीर आगीने पोळुन निघत असते आणि सचिन व त्याचे आई-वडील ते दृश्य पाहून मोठमोठ्याने हसत असतात...त्याच रात्री सरिताचा मृतात्मा त्याच्या दारावर येऊन तिचा जीव धोक्यात असल्याचे सांगते आणि तिला काहीतरी सांगायचे असल्याचेही सांगते…त्यामुळे सरिताने केली ती खरंच आत्महत्या होती की तिच्या घरच्यांनीच काही कट रचून तिला मारले?? तिला नेमके काय सांगायचे होते?? तिच्यावर इतके प्रेम करणारी तिची आपलीच माणसं तिला का मारतील?? असे एक ना अनेक प्रश्न दिपेशच्या पुढ्यात उभे राहतात...या सर्व रहस्यांचा उलगडा करू शकेल का दिपेश??
या घटनेच्या 2 महिन्यांनंतर…
आज त्या घटनेला 2 महिने उलटून गेले होते… जसजसा काळ पुढे सरकत होता, तशी ती घटना काळाच्या पडद्याआड धूसर होत चालली होती… दिपेश व दिप्ती बरीच मेहनत करून त्यांच्या संसाराचा गाडा हाकत होते…
इतके दिवस होऊनसुद्धा त्या रहस्यमयी घटनेचा व त्या भयानक स्वप्नाच्या आठवणी दिपेशच्या मनात आजही ताज्या होत्या...आजही सरिताच्या मृत्युचे गुढ कोणालाच उकलले नव्हते...काही दिवस असेच गेले आणि पुढे एकेदिवशी…
"Hello !! हा बोल सचिन" ऑफिसमध्ये बसून एका हाताने लॅपटॉपवर काम करत तर दुसऱ्या हाताने मोबाईल सावरतच दिपेश म्हणाला. "अरे दिपेश कामात व्यस्त आहेस का??" सचिनने त्याला विचारले. "नाही रे इतके काही urgent काम नाही करत आहे मी" दिपेश त्याला म्हणाला. "तुला उद्या थोडा मोकळा वेळ आहे का??" सचिनने पुन्हा विचारले. "हो !! उद्या तसाही रविवारच आहे… पण का रे तू असे का विचारतोयस?? काही काम आहे का?" दिपेशने कपाळावर आठ्या आणतच विचारले. "तू मला 2-3 महिन्यांपूर्वी म्हणालेलास ना की तुला मुंबईत स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे असं?? " सचिन म्हणाला. "हो हो !! त्यासाठी मी मागे एक-दोन ठिकाणी गेलोसुद्धा होतो, पण ते flats माझ्या बजेटच्या बाहेर होते...तुझ्या ओळखीत आहे का कोणी??" आजूबाजूला colleagues असल्याने काहीशा दबक्या आवाजातच दिपेशने विचारले. "अरे भावा म्हणूनच तर मी तुला call केला ना… माझ्या बाबांचे एक मित्र आहेत, त्यांचा अंधेरीला एक flat आहे 1 रूम किचन...त्यांना तो flat लवकरात लवकर विकायचा आहे...आता ते माझ्या ओळखीचेच आहेत म्हटल्यावर तुला इतर कसलीही चिंता करण्याची गरज नाही...तू फक्त तुझा निर्णय सांग" इतके बोलून सचिन थांबला. "हो अरे का नाही...तसेही माझे आणि दिप्तीचे स्वप्नच आहे की मुंबईसारख्या मायानगरीत आमचे स्वतःचे हक्काचे असे एक घर असावे...आणि त्यात आता तुझी ओळखच आहे म्हटल्यावर काही टेन्शनच नाही" सहमती दर्शवतच दिपेश म्हणाला.
"Ok then !! उद्या जाऊयात का मग??" सचिनने विचारले. "हो चालेल !! मी आता लगेचच दिप्तीला व माझ्या काकांना call करून याबद्दल विचारतो आणि तुला confirm सांगतो...ok?" दिपेशने विचारले. "ठीक आहे, मी तुझ्या कॉलची वाट पाहीन" एवढे बोलून सचिनने फोन ठेवला.
नोकरीसोबतच सचिन part time 'Broker' चे कामदेखील करत असे...दिपेशला जेव्हा हे समजले त्यावेळेस त्याने सचिनला flat घेण्याबाबत विचारले होते, परंतु त्यानंतर काहीच दिवसात घडलेल्या सरिताच्या त्या धक्कादायक प्रकरणामुळे दिपेशने याबद्दल सचिनला पुन्हा काही विचारले नव्हते…
सचिनला सांगितल्याप्रमाणे दिपेशने ऑफिसमधून कॉल करून दिप्ती व त्याच्या काकांशी याबद्दल बोलणे केले...दिप्तीने लगेचच होकार दिला परंतु त्याचे काका काही कारणास्तव गावी गेले होते व त्यांना पुन्हा मुंबईत परतण्यास जवळजवळ 2 आठवडे लागणार होते, त्यामुळे तूर्तास तरी तू जाऊन ये मग मी आलो की आपण जाऊन final करूयात असा सल्ला त्यांनी दिपेशला दिला… अशाप्रकारे त्या दोघांशीही बोलणे केल्यानंतर दिपेशने सचिनला कॉल करून जाण्याबाबत confirm सांगितले…
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघेही सचिनच्या कारने त्याठिकाणी पोहोचले...सचिनला सांगितल्याप्रमाणे रूमचे मालक म्हणजेच त्याच्या वडिलांचे मित्र "पानसरे काका" आधीच त्याठिकाणी येऊन उभे राहिले होते…
सचिन : नमस्कार काका !!
पानसरे काका : नमस्कार !!
सचिन : काय म्हणता काका कसे आहात??
पानसरे काका : अरे मी अगदी मस्त !! तुझे कसे चालू आहे?? आणि घरी सर्व कसे आहेत??
सचिन : हो, आई-बाबा दोघेही बरे आहेत...आणि माझेही सर्व व्यवस्थित सुरु आहे… By the way हा माझा मित्र दिपेश आणि ही त्याची पत्नी दिप्ती..
दिपेश : नमस्कार !!
पानसरे काका : नमस्कार !! सचिनने मला तुझ्याबद्दल आधीच सर्व सांगितले आहे...म्हणजे एका लहानशा खेडेगावातून मुंबईत येऊन स्वबळावर इतके सर्व करायचं म्हटल्यावर काही सोपी गोष्ट नव्हेच...खरच तुझ्या मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडीच आहे…
दिपेश : धन्यवाद !! परंतु या सर्वांत मला माझ्या काकांची तसेच माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ लाभली आहे… या स्वप्ननगरीत जेव्हापासून आलोय तेव्हापासून उराशी एकच स्वप्न बाळगून आलो होतो ते म्हणजे या शहरात माझे स्वतःचे हक्काचे एक घर असावे.
पानसरे काका : Ohh Great !! पण तुला माहितीय का तू तुझ्या त्या स्वप्नातील घरापासून फक्त काही पावलेच दूर उभा आहेस… So !! Are you excited to see your dream house??
दिपेश : Yes off course !!
पानसरे काका : चला मग, चांगल्या कामासाठी जास्त उशीर नको.
दिपेश : हो हो !! अगदी बरोबर.
अशाप्रकारे पानसरे काका त्या सर्वांना घेऊन मार्गस्थ झाले… तब्बल 5-10 मिनिटांनी ते एका 12 मजली इमारतीसमोर आले. "याच इमारतीत 9 व्या मजल्यावर माझा flat आहे." पानसरे काका त्या इमारतीकडे हात दाखवतच म्हणाले. प्रथमदर्शनी पाहता ती इमारत अगदीच आकर्षक दिसत होती… तिचे उत्कृष्टरीत्या केलेले बांधकाम तसेच सुबकपणे केलेले रंगकाम अगदी डोळ्यात भरेल असेच होते...इमारतीच्या प्रशस्त अशा गेटमधून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूलाच लिफ्ट होती… लिफ्टने 9 व्या मजल्यावर आल्यानंतर उजव्या बाजूकडील दोन खोल्या सोडून त्यांचा flat होता… पानसरे काकांनी त्यांच्याकडे असलेल्या किल्लीने खोलीचे दार उघडले तसा भपकन एक कुबट वास त्या सर्वांच्या नाकात शिरला...एखादा प्राणी मरून तो कुजून राहावा अगदी तसाच वास होता तो… "खूप दिवस रूम बंद होता, त्यामुळे असा वास येतोय" पानसरे काका दिपेश व दिप्तीकडे पाहतच म्हणाले. "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही काका" सचिन त्यांना दुजोरा देतच म्हणाला…
खोलीत आल्यानंतर दिपेश व दिप्ती चोहोबाजूंनी खोलीचे निरीक्षण करू लागले… पानसरे काकांनी renovation चे काम केलेले असल्याने ती अजूनच आकर्षक वाटत होती. "बघ दिपेश !! सर्व renovation work मी आधीच करून घेतलेले आहे, त्यामुळे तुला त्यावर जास्त काही खर्च करण्याची गरज भासणार नाहीय" पानसरे काका म्हणाले. "हो खरंच !! अगदी नजरेत भरेल असेच काम केले आहे तुम्ही हॉलचे, हो ना दिप्ती?" दिपेशने दिप्तीला विचारतच म्हटले. "हो अगदीच...म्हणजे नाव ठेवायला जागाच नाही कुठे" दिप्तीने दिपेशच्या मताला दुजोरा देतच म्हटले. "हाss हाss !! अजून तर तुम्ही हा view नाही पाहीलायत" खिडकीच्या काचा उघडतच पानसरे काका म्हणाले… खिडकी उघडताच हवेचा एक वेगवान झोत खोलीत शिरला व थोड्याचवेळात त्या फणफणत्या वाऱ्याने अखंड खोलीचा ताबा घेतला. "वा !! काय मस्त हवा आली" दिप्तीने म्हटले. "अहो वहिनी तुम्हाला तर पंख्याचीसुद्धा गरज लागणार नाही इथे" सचिन तिला म्हणाला. "या ना !! इथे येऊन view तर पाहा समोरचा" पानसरे काका दिप्ती व दिपेशला बोलावंतच म्हणाले.
इमारतीच्या अगदी समोरच असलेले गार्डन… त्या गार्डनमध्ये खेळत असलेली लहान मुले… गार्डनला खेटूनच असलेले महादेवाचे मंदिर… त्याच्या आसपास थोडी लोकवस्ती आणि त्यामागे असलेला हायवे असे एकूणच खूप सुंदर दृश्य बाल्कनीतुन नजरेस पडत होते. "Wowww !! किती सुंदर view आहे, हो ना दिपेश??” समोरील दृश्य पाहून भारावलेल्या दिप्तीने विचारले. "हो !! मीसुद्धा आता तेच म्हणणार होतो" दिपेश म्हणाला. "पावसाळ्यात तर याहूनसुद्धा मनमोहक दृश्य दिसते येथून… या तुम्हाला किचन दाखवतो" किचनच्या दिशेने जातच पानसरे काका म्हणाले… जितक्या उत्कृष्टरीत्या हॉलचे काम केले होते, तितकेच सुंदर किचनचेही काम झाले होते. संपूर्ण किचनला आकर्षक अशा टाईल्स लावल्याने ते अजूनच उठावदार दिसत होते. "खूपच सुंदर काम करून घेतले आहे तुम्ही खरंच… म्हणजे नाव ठेवायलाही जागा नाही असेच अगदी" संपूर्ण खोलीची पाहणी करून झाल्यानंतर दिपेश म्हणाला. "Ohh !! Thank You So Much !! … so !! काय मत आहे मग तुम्हा दोघांचे या तुमच्या स्वप्नातील घराबद्दल?? तुमच्या बोलण्यातून तर कळतेच आहे की तुम्हाला ही खोली आवडली आहे" पानसरे काका म्हणाले. "अहो काका, खोलीबद्दल तर काही प्रश्नच नाही...ती तर अप्रतिमच आहे; परंतु मी मुंबईत आल्यापासून माझे प्रत्येक महत्त्वाचे निर्णय माझ्या काकांचे मत विचारात घेऊनच करत आलो आहे. त्यामुळे मी त्यांनाही येथे घेऊन येणार होतो, परंतु काही कारणास्तव त्यांना अचानक गावी जावे लागले...त्यांना पुन्हा मुंबईत परतण्यास 2 आठवडे लागतील… so तुमची हरकत नसेल तर मी त्यांना घेऊन त्यावेळेस पुन्हा रूम दाखवायला घेऊन येईन आणि तेव्हाच आपण पुढील बोलणी करू" दिपेशने सविस्तररीत्याच म्हटले. "Ok then !! Take your time… माझी तशी काही हरकत नाहीय, परंतु जितक्या लवकर हे deal होईल तितके चांगले कारण माझाही थोडा financial problem आहे." पानसरे काका म्हणाले. "हो नक्कीच !! मला तुम्ही फक्त दोन आठवड्यांचा वेळ दया." दिपेश विनंती करतच म्हणाला. "अरे माझी काहीच हरकत नाहीय, शेवटी तुलाही तुझा वेळ द्यायलाच हवा आणि त्यात तू सचिनचा मित्र आहेस म्हटल्यावर मला तितकी काही काळजी करण्याची गरज नाही" पानसरे काका दिपेशला म्हणाले. "काका, मी दिपेशला खूप चांगले ओळखतो… तो दिलेल्या शब्दाचा अगदी पक्का आहे" पानसरे काकांना विश्वासात घेतच सचिन म्हणाला. "हो रे सचिन !! तू जेव्हा त्याच्याबद्दल पहिल्यांदा मला सांगितलेस ना त्याचवेळी मला समजले की दिपेश एक माणूस म्हणून किती चांगला आहे ते" दिपेशची स्तुती करतच पानसरे काका म्हणाले. "धन्यवाद काका !! आपण जर समोरील व्यक्तीची अडचण समजून घेतली तर ती व्यक्तीही पुढे आपली अडचण समजून घेते असे मला वाटते" दिपेश चेहऱ्यावर स्मितहास्य आणतच म्हणाला. "हो !! हे मात्र अगदी खरे बोललास बघ तू दिपेश" दिपेशच्या वक्तव्याला सहमती दर्शवतच पानसरे काका म्हणाले…
"चला, आता आम्ही निघतो, कारण मला घरी गेल्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमाला जायचे आहे...माझे काका मुंबईत परतल्यानंतर लगेचच मी तुम्हाला आमच्या येण्याबद्दल कळवेन...तेव्हा आपण सविस्तर पुढील बोलणी करू...ok ना?" दिपेशने विचारले. "हो...No Problem !! I will wait for your call" काका म्हणाले. "हो नक्कीच !!" दिपेश उत्तरला… आणि ते सर्व काकांचा निरोप घेऊन घरी जाण्यास मार्गस्थ झाले…
अशाप्रकारे दिपेश व दिप्तीने त्यांच्या स्वप्नातील घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते…
एकीकडे दिपेशच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतं असताना दुसरीकडे मात्र सचिनच्या आयुष्यात नियतीने पुन्हा एकदा तिचा क्रूर डाव खेळण्यास सुरुवात केली होती…
कारण त्याच रात्री…
सचिनची आई म्हणजेच शकुंतलाबाईंना कमरेचा त्रास असल्याने त्या बेडवर झोपल्या होत्या… तर सचिन व त्याचे वडील म्हणजेच "प्रतापराव" खाली झोपले होते… दिवसभराच्या थकव्याने काही क्षणातच सचिनला गाढ झोप लागली…
काही तास उलटले असतील अचानक शकुंतलाबाईंना जाग आली… त्यावेळेस त्यांना खूप तहान लागली होती… घड्याळात पाहिले असता मध्यरात्रीचे 3 वाजून गेले होते… उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी खिडक्या उघड्याच ठेवल्या होत्या, परंतु आज खिडकीतून हवेची साधी झुळूकही येत नव्हती… सचिन व प्रतापरावांची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी लाईट लावण्याची तसदी घेतली नाही… सर्वत्र भयाण शांतता पसरली होती… दुरूनच कुठूनतरी कुत्र्यांच्या भेसूर रडण्याचा आवाज त्या शांततेचा भंग करत होता… काहीशा चाचपडतच त्या बेडवरुन खाली उतरल्या व त्या मिट्ट अंधारातून वाट काढत किचनच्या दिशेने चालू लागल्या… किचनमध्ये असणाऱ्या देव्हाऱ्यातील लाल रंगाच्या बल्बमुळे तिथे किंचितसा प्रकाश होता…
किचनमध्ये पाऊल ठेवताच त्यांना हवेत एक विशिष्ट प्रकारचा गारवा जाणवला व अत्यंत कुबट असा वास येऊ लागला… अगदी एखाद्या सडलेल्या मांसासारखा… परंतु त्यांच्या घशाला कोरड पडली असल्याने त्यांनी या सर्व गोष्टींकडे काहीसा कानाडोळाच केला….
क्रमशः
No comments:
Post a Comment