बोरवणात मेघांनी गच्चबुच दाटी केली असतांना दभाषी वाऱ्यांनी मेघ आणुन भर घालत श्रावण झड लावली. तापीकाठ व अनेरकाठाच्या घोशात तुंबाड घनघोफ होत पाऊस रतीब घालू लागला. लोकांना घराबाहेर पडणं मुश्कील झालं. चार पाच दिवसांपासून सूर्य नारायणाचं दर्शन नव्हतं. नुसती झगार पसरली होती. शेते रस्ते पाणी वगळू लागले. जुनी धाबी गळू लागली. मध्येच सुटलेल्या वाऱ्याच्या सुरकीनं मुर्दाळ सर्दाळलेल्या भिंतीना तडे जात ढासळू लागल्या. जणू आभाळाला फार मोठं दु:खं झालं असावं म्हणून ते रडत असावं. अशा झगारीत सातार हून गाडीनं कंजारला तट्ट फुगत नागिणीगत फुस्कार मारत वाहणारी अनेर नदी ओलांडत बोरवण गाठलं. गाडी माडीच्या अंगणात उभी राहताच अप्पा व रमेशनं हाताचा आधार देत कल्याणीस माडीत नेलं. नी भर पावसात दोन्ही वाड्यातल्या बायांनी गर्दी केली. नुसता आकांत..... पण त्या आकांतातही कल्याणी खांबास रेलून बसत माडीच्या आढ्याकडं पाहत मूक आक्रंदू लागली. ना रड, ना आक्रोश .पण आत ज्वालामुखी धगधगत असल्यागत.
दोन तीन दिवस बोरवणला दु:ख पालटवत पुन्हा कल्याणीस सातारला नेण्यात आलं. पण पुतळ्यागत स्तब्ध कल्याणीचं बोरवणात येऊनही दु:खं पलटलंच नाही.
अक्काला सुरेंद्र शहीद झाल्याचा फोन आला नी जो झटका बसला त्यानं ती दवाखान्यातच आय सी यु मध्ये होती. पण एक महिन्यातही रिकव्हर न होता अक्का ही मुलाच्या वाटेवर निघून गेली. अप्पा एक महिन्यापासून सातारलाच तळ ठोकून होते. फक्त चार दिवस बोरवणात कल्याणी सोबत दु: खं पालटवण्यासाठी आले होते तितकंच. त्यांनी भाच्याच्या दु:खातच बहिणीचं दु:खं पेलत बहिणीचं क्रियाकर्म आटोपलं. पण या दु:खापेक्षाही जास्त दु:खाचा डोंगर त्यांच्या पुढं होता तो कल्याणीचा! कल्याणीतर कोमात गेल्यागत मुकीच झाली होती. अक्काच्या सासऱ्यानं ,नवऱ्यानं गडगंज संपत्ती कमवली होती. पण आता तिचा काहीच उपयोग नव्हता. संपत्तीचा उपभोग घेणारं कुणी असलं तर तिचं महत्व ,अन्यथा संपत्ती ही वांझोटीच ठरते यानं अप्पास कढ दाटून आला. आपण इथं राहणं शक्य नाही व कल्याणीस ही इथं एकटं ठेवणं शक्य नाही. म्हणून अक्का गेल्यानंतर महिना झाला नी अप्पा व द्वारकामाईनं कल्याणीस समज घालत बोरवणला आणलं. अमाप संपत्तीची मालक होऊन ही सुन्या निटीलाच्या कंगाल प्रारब्धानं कल्याणी बोरवणला परतली.
रात्री माडीवरच्या मजल्यावर खिडकीतून ती अंधाऱ्या क्षितीजाकडं पाहू लागली. एकांतात आज सुरेंद्र गेल्यानंतर प्रथमच टचकन आसवे ओघळत गालावर आली नी तिनं जोरानं अप्पास टाहो फोडत साद घातली. अप्पा, काकी, रमेश व उमेश सारी धावत वर आली. अप्पानं पोरीस छातीशी लावत रडत समज घालू लागले. त्यांना पोर रडली याचं समाधानच वाटलं.निदान दुःखाचा निचरा होईल. द्वारकामाईनं कपाळावर थोपटत तिला झोपवण्याचा प्रयत्न केला. कल्याणी लग्न होऊन सातारला गेल्यापासूनचा पट आठवू लागली.
.
.
घरात आपली भाचीच सून म्हणून आली याचा नाही तरी अक्कास आनंदच झाला. आठ दहा दिवस कल्याणी बापूलाच आठवत राहिली. नी मग...................
.... पण सुरेंद्र....
बोरवणातून लग्न करून परतलेला सुरेंद्र दररोज पिऊन धुंद होऊ लागला. दोन तीन दिवस रिसेप्शन चाललं. नंतर मग रंग दिसू लागला.ती रात्र आलीच जिची कल्याणीस भिती होती. अनेरला बांध घालत तिचा मूळ प्रवाह बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पाणी लांब पर्यत तुंबेल किंवा बांधच फुटेल पण प्रवाह लगेच व सहजासहजी बदलेल? कदापि शक्य नव्हतं.
पावलं वाजली. धडधड, थरथर वाढली. उंची मद्य रिचवलेला महागडी अत्तरं मारलेला सुरेंद्र आला. त्या अत्तराच्या घमघमाटात तिचा जीव घोटू लागला. त्यात तिला हवा असणारा मृद् गंध जाणवतच नव्हता.
" कल्याणी सजन चौधरी सांप्रत कल्याणी सुरेंद्र.... उर्फ चौधरी मॅडम काय म्हणू मी? जाऊ दे चौधरी मॅडमच बरं! तर कसं आहे मॅडम, आठ दिवस होऊन ही मी आपल्या या सजवलेल्या महालात फिरकलो नाही.तुम्हास तर 'चला बरं झालं सुटका होतेय ' असंच वाटत असावं!" सुरेंद्रनं बोलता बोलता कपाट उघडत दुसरी बाटली फोडत ग्लास भरला.
बुचाचा आवाच येताच व ग्लासात फेसाळणारं मद्य पाहून ' मामा मला मनासारखी मुलगी मिळाली नी कालपासून मी दारू सोडली, वचन दिलं होतं ना आपणास! मी वचनाचा पक्का!' हे सुरेंदंच वाक्य आठवलं.वचनं पाळणारी ठराविकच जन्मास येतात याची तिला जाणीव झाली.
" हं, कुठं होतो मी? .....तर पहा मला काही प्रश्न पडलेत. त्याची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत मला चौधरी मॅडम!" ग्लासातली घोटत सुरेंद्र तिच्या पलंगासमोर खुर्ची ओढत बसत बोलला.
कल्याणी खाली मान घालत शांत बसली.
" चौधरी मॅडम मला मूकपट पाहण्यात स्वारस्य नाही.माझे साधेसे प्रश्न आहेत.
मी तुमचा हात मागितल्यावर बापूमामास झटका का यावा?." पुढचं ऐकण्या आधीच बापूंचा नामोल्लेख होताच सुरेंद्र कडं पाहत कल्याणीच्या डोळ्यात पाणी तरारलं.
तिच्या गालावरील आसवे बोटावर घेत टिचकीनं त्यानं हवेत उडवले.
" आसवाच्या आड प्रश्न वाहणार नाहीत मॅडम! दोन वर्षात किती आसवांचे पूर वाहिलेत हे मी अनुभवले. पण त्यानं प्रश्न सुटत नसतात" त्यानं पुन्हा ग्लास भरत तोंडास लावला.
" बापू मामा गेले. एकर एकर वतनासाठी एक मेकाचा जीव घेणारी माणसं खेड्यातली! तरी हरीचंद्र होत अप्पासाहेब आपल्या पुतणीसाठी सारी जमीन द्यायला तयार होत पुतणीचं लग्न कुणाशी लावणार होते? खरंच आप्पू मामा, यु आर सिम्पली ग्रेट! पण मामा म्हणून नाही तर काका म्हणून. सुरवातीस मला ही पोकळ धमकीच वाटली. म्हणून मी निगर गट्ट होत राहिलो त्यांच्याच घरी.पण मला खरा धक्का तेव्हा बसला या आमच्या बिलंदर मामानं खरच बोजा उतरवत जमिनीचे खरेदी पत्र तयार केले. मला ' 'तो कोण?' की ज्याला पुतणीला देता यावं म्हणून अप्पा जमीन देऊन आपल्या पोटच्या पोरांना उघडं पाडून वचन पूर्ती करायला निघाले. तो कोण? तो कोण या प्रश्नानं धिंगाणा घातलेला असतांना मी निघायची तयारी केली. कारण गडगंज संपत्ती असतांना मामाची जमीन घेण्या इतपत लाचारी आमच्या रक्तात नाहीच. एरवी फकिरा बाबा देत असतांना माझ्या आजोबा वडिलांनी लाथाळली नसतीच. म्हणून परत निघण्याचं ठरवत असतांनाच रात्री तू भेटली नी 'लग्नास तयार असून उद्याच महादेवासमोर लग्न करू!' सांगितलं. मला पुन्हा धक्का. नाशीकला बापुंची विधी करायला गेले नी काही तरी चाकं फिरली हे मी ओळखलं. लग्न झालं नी तो कोण हा सवाल अनुत्तरीत राहिला. त्याचंच उत्तर मला हवं आहे! मी तुला अवधी देतो! मला माहितीय प्रश्न अवघड व जिव्हारी लागणारे आहेत. तुला उद्या पर्यंत उत्तर देण्यास अवधी आहे" कल्याण बोलला व बाहेर पडला.
कल्याणीनं तो जाताच दरवाजा लावला नी ढसाढसा रडू लागली.
दुसऱ्या दिवशी तेथूनच सुरूवात.
" बोला चौधरी मॅडम! अप्पा कुणासाठी एवढं दान देत नकार देत होते मला! बापूंनी ही कल्टी मारत कातडी बचाव धोरण स्विकारत स्वर्ग गाठला? थोडक्यात तो कोण?" कल्याणी समोर बसत तो तिच्या डोळ्यातून काळजात उतरून गोताखोरी करू लागला.
" सौभाग्यवती स्त्री सौभाग्यवती होतांना कपाळावर जेव्हा गर्का लावते वा कुंकू लावते तेव्हा त्या कुंकवाखालीच तिचा भूतकाळाचा सागर ती गाडते. ती त्यात पुन्हा डोकावणं म्हणजे गटांगळ्या खाणचं.खानदानी मुलगी ते पातक करतच नाही. शहाण्या मर्दानंही त्या कुंकवाखालील भूतकाळात न शिरणंच हिताचं!"
" चौधरी मॅडम मला धडा नका शिकवू किंवा प्रयोगातून निष्कर्ष काढायला नका लावू! उत्तर द्या.तो कोण? की ज्या साठी मला सारेच ठोकरत होते?"
" पाया पडते आपला, या घराच्या उंबऱ्याबाहेर जराही वाकडं पाऊल दिसलं तर शूट करा पण भूतकाळात का उगाच गोतेखोरी!"
" ठिक आहे नका उत्तरं देऊ मी पाहतो काय करायचं ते!"
कल्याणीस वाटलं नवीन राग निघेल. आपल्या वागणुकीनं आपण करू बदल.
दुसऱ्या दिवशीच सुरेंद्र राव सिमेवर परतले. कल्याणीस कल्पना न देता , न भेटता. नंतर फोनवर बोलणं तरी अक्काशीच.पण कल्याणीशी कधीच नाही. कल्याणी फागातल्या होळीगत दररोज जळत राहिली. पण हे जळणं कुणासाठी हे तिला ही कळेना. दिवस जाऊ लागले. सातारला काम काहीच नाही. साऱ्या कामास कामवाल्या बाया. अक्कासोबत बोलणं, वाचन, मंदिर यात ती आला दिवस घालवू लागली. तोच आई गेली व ती बोरवणला आली. सुरेंद्रराव येतोय सांगत आलेच नाही. पंधरा दिवस बोरवणला थांबले असतांना दोनेक वेळा कल्याण दिसला ओझरता.पण दु:खाचा प्रसंग म्हणून तीला बोलणं शक्य नव्हतं. पण तो ही टाळतच होता. रमेशनं कल्याण मळ्यात आला व बोरीच्या झाडाजवळच बेभान होत कल्याणी कल्याणी ओरडत असल्याचं सांगत "ताई कल्याण बाबा वेडाच होईल गं!' समजंव त्याला! "म्हणून विनवलं. झब्बू भेटल्यावर तर त्यानं अनेर काठावर रात्रभर केव्हाही उठून फिरत असल्याचं सांगितलं. सातारला परतण्या आधी बोलवत समजवण्यासाठी प्रयत्न केला. पण कल्याणीचाच ताबा सुटला.कसला उंबरा नी कसलं काय? करकचुन मिठीत घेत या जगालाच आग लावावी ठरवत तिनं त्याला बिलगण्यासाठी झेप घेतली.पण पुन्हा तेच . तापी काठानं अनेरच्या पाण्यास थोपवावं तसाच कल्याण माडीबाहेर पडला.
कल्याणी सातारला परतली व काही दिवसांनी सुरेंद्र राव बोरवणला गेले व तेथून सातारला आले. त्यांना पाहताच कल्याणीला वाटलं की आईच्या जाण्याचं सांत्वन करतील ,ती रडू लागली. पण सुरेंद्र राव कडाडले.
" अहो चौधरी मॅडम पुरे! मामी गेल्या पुरे! किती दिवस दु:खं उगाळत बसणार! चला पुन्हा तोच सवाल जवाबाचा कलगीतुरा खेळूयात" सांगत त्यानं कल्याणीला खोलीत नेलं व दार धाडकन बंद केलं.
" चौधरी मॅडम, मी बोरवणला मामीसाठी गेलोच नव्हतो. माझं दुसरंच काम होतं.बरं हा कल्याण सदा गायकवाड उर्फ डाॅक्टर,उर्फ कल्याण बाबा कोण हो? " कल्याणचं नाव ऐकताच कल्याणी थरथरत भिंतीच्या आधारानं उभी राहिली.तिचं सर्वांग लाल होतं कापरं भरलं.
" अहो मॅडम तुमची ओळख असल्याशिवाय का बिदाईच्या वेळी तुम्ही त्यास बिलगल्या होत्या. मला तेव्हाच खरं तर प्रश्न पडत नस तडकली होती.पण भावनाप्रधान परिस्थीती असल्यानं मी खोलात विचार केला नाही." सुरेंद्र लाल तांबारल्या नजरेनं तिच्याकडं पाहत बोलत होता.
" पाया पडते, प्लिज नका हो!"
" तुम्हास काय वाटलं होतं? 'तो कोण' हे मला समजणार नाही? अख्ख्या देशातल्या, परदेशातल्या शत्रूची माहिती आम्ही यू काढतो. पण मला तुमच्याच प्रेमाची कहाणी तुमच्याच मुखातून ऐकायची होती.पण नाही ऐकवली तुम्ही.मग काय मिळवली आम्ही . फक्त तरी एक बाब तुमच्याच तोंडून ऐकायची उत्कट इच्छा आहे! सांगाल ना?"
" .,.........." कल्याण हुंदके देत भिंतीच्या आधारानेच खाली सरकत बसली.
" कल्याणबाबा व तुमचं होतं हे त्या महाशयांनी कबूल केलं! पण कुठं पर्यंत होतं हे तुम्ही सांगा मला!"
आता मात्र तिचा संयम सुटला.ती रडता रडता क्रुद्ध झाली.संतापत ती कडाडली.
" सुरेंद्रराव तुम्ही पती म्हणून नालायक आहात हे मी आठ दिवसातच ओळखलं होतं पण माणूस म्हणुनही नीचच आहात हे ही आज सिद्ध केलंत! "
लाव्हा आपल्या अंगावर उडताच सुरेंद्रनं टेबलच उचलत समोरच्या आरशावर फेकला. आरशाची बिलोर फुटत काचाच काचाचा पसारा मातला. कल्याणी सुन्न होत तशीच बोलू लागली.
"अहो,अल्लडतेनं व बालसुलभ वयात चुका होत असतात तशा माझ्याकडून ही झाल्यात . पण तरी त्यानं वेळोवेळी मला सावरत शाश्वत, पाक प्रेमच केलं. ते ही वडिलांचा विश्वास संपादन करत...."
" बस्स! हे शाश्वत, शुद्ध, देशी नकली हे बंद कर! फक्त ... कुठं पर्यंत ते सांग" कल्याणीला मध्येच तोडत तो चेकाटला.
" अहो केलं आम्ही प्रेम! मग का पडलात मध्ये? पडलात मध्ये तर आम्ही त्याग करत प्राप्त परिस्थिती स्विकारली तसं स्विकारायची मर्दानगी दाखवा.प्रेम करणं पाप नाही. पण सप्तपदी चालल्यावर परत माघारी फिरणं पाप.तसलं काही दिसलं ना तर त्याच दिवशी खांडोळी करा."
" ऐक .तुझं बंद कर!का मध्ये पडलो ऐक! तु जसं प्रेम केलं, तसंच मी ही उरतोड प्रेम तुझ्यावर यशदाला पाहिल्यापासून केलं. दोन वर्ष रात्र दिवस तीळ तीळ तुटलो.पण तरी त्या विरहाच्या दाहकतेत ही सुख होतं. तु सापडली नी बोरवणला आलो.ते परम सुख. पण ज्या वेळेस मला लाथाळलं तेव्हा एवढी गडगंज संपत्ती, देवानं मुक्त हस्तानं बहाल केलेलं सौंदर्य, चांगला हुद्दा व सरळ नातं तरी नकार हा मला माझ्या मर्दानकीचा अपमान वाटला.आणि जेव्हा त्याही स्थितीत निगरगट्ट सारखा तुझ्या घरी सात आठ दिवस राहिलो तेव्हा तर पौरुषत्वं नपुसक झाल्यागतच झालं .नी त्याच वेळी तू होकार दिला. पण तो होकार तू भावांची जाणारी जमीन वाचवण्यासाठी आहे हे मी ओळखलं. नी मला बदला घेण्याची संधी मिळाली.तेव्हाच मी ठरवलं की माझं पौरुषत्व नपुसक करणाऱ्या तुला मी बरबाद करेन!"
हे ऐकताच कल्याणीनं भितींला डोकं आपटत टाहो फोडला.आतापर्यंत तिला सुरेंद्र संशयाच्या संतापात असा वागतोय असंच वाटत होतं पण सुरेंद्रच हे बोलणं ऐकताच तिच्या संवेदनाच गारठल्या.
" मला नाकारून तू माझं प्रेम एकतर्फी ठरवलंस .आता तुला स्विकारुनही माझ्याकडून काहीच मिळणार नाही.आयुष्यभर तुला कापुरासमान जळतांना पहायचीय मला! मी मरेपर्यंत तुला मरू देणार नाही. जाळत राहीन !पाहत राहीन! माझ्या पौरूषत्वास नपुसंक ठरवण्याचा बदला घेत राहील!" कल्याण थंडपणे म्हणाला व खोलीबाहेर पडला.
ती थिजत आकांत करत तिथंच रडत राहिली.
कल्याण गोदाकाठी गोदेत सामावण्याचं सांगत होते ना? का ऐकलं नाहीस. प्रेमास पापाचा शिक्का नको म्हणून ना? पण तरी बदनामीचा शिक्का येऊ पाहतोय रे! पण मी सारं सहन करेन, जळत राहीन आयुष्यभर मग कुणासाठीही असो पण जगेन...
नंतर सुरेंद्र तिला घेऊन लगेच सिमेवर परतला. कुटूंब सोबत आणणार म्हणून त्यानं आधीच चंदीगडला बदली करून घेतली. तिथं कल्याणीच्या छळास खरी सुरुवात झाली. रात्री कसल्या ना कसल्या कारणा वरून दररोज लाथा बुक्क्यानं सुरेंद्रचा मार हा कल्याणीचा रतीबच झाला. दररोज नशेत मारणं नित्याचच झालं.
त्याचं जाळणं व पाहणं तर तिचं जळत राहत, प्रमाण देणं सुरूच होतं.
दिवसा पडल्या पडल्या ती विचार करी.
' कल्याण बदलत्या परिस्थितीत नवीन संदर्भ जाळू लागले तर जुन्या भावशून्य संदर्भाच्या सोबत नाही का रे जगता येणार?' हे विचारलेलं आठवे. पण इथं तर सुरेंद्र तसंही जगू देत नव्हता.
सिमेवर वातावरण गढुळलं तशी परिस्थिती तंग झाली. सैन्यास सिमेवर पाठवलं जाऊ लागलं. सुरेद्रनं कल्याणीस सातारला परत पाठवलं व तो चंदीगडहून सिमेवर गेला.
पुढच्या आठच दिवसात सातारला फोन खणाणला. अक्कानं फोन उचलला नी अक्का कोसळली ती कोसळलीच. सुरेद्र शहीद होत अनंतात विलीन झाला.
.
.
कल्याणी भानावर आली. बोरवणात पहाट फुटत होती. कोजागरी गेली दिवाळी गेली अक्षयतृतीया ही . पण कल्याणीनं स्वत:स माडीवर वरच्या खोलीतच कोंडून घेतलं. कुणाशी बोलणं नाही, फिरणं नाही , द्वारका काकीनं आग्रहानं दिलेले दोन घास ढकलनं , झोपणं , उठणं बस्स.
सुरेंद्र जायला एक वर्ष झालं. कुंकू पुसला गेला. कपाळ उघडं पडलं नी आत दडवलेला भूतकाळाचा सागर भरती येत उचंबळत होताच पण कल्याणी वर्षभर त्याला थोपवत आली होती. पण कुंकूच पुसल्यावर तो भूतकाळाचा उंचबळणारा सागर कुठवर थांबणार! वादळानं खवळलाच.
मध्यंतरी एका वर्षाची बिन पगारी रजा संपताच शिरसाठ सरांनी तिला हजर करत पुन्हा वर्षभर तशीच रजा टाकावयास लावली. सुरेंद्र हयात असतांना तिनं राजीनामा द्यावा यासाठी कितीदा तरी बुटासहीत लाथांचा मार खाल्ला होता. पण त्या वेळेस तिला सातारलाच आंतरजिल्हा बदली करू असं वाटत होतं. पण अक्का ही तिला कशाला नोकरी गं! आपल्या घरी गडी राबतात नी तू नोकरी करशील, कशाला.
आता अप्पाही शिरसाठ सरांना राजीनामाच सांगत होते. पण शिरसाठ सरांनी पाहू पुढे सांगत रजा वाढवली. अक्षय तृतीयेच्या आसपास द्वारकाबाई थकल्या व पोरंही वयाची झाले म्हणून पोरांची लग्न उरकत घरात सुना आणल्या. त्यामागं कल्याणीस सोबत हा ही उद्देश होताच. दोन्ही सुना ही सच्छील, सोज्वळ व मनमिळाऊ मिळाल्या. त्या कल्याणीची सर्व सेवा करू लागल्या. कल्याणी आताशी कुठं वहिणींशी दिवसातून एखाद वेळा बोलू लागली.
श्रावण झडला. गाव शेवाळलं शेवाळल्या गावात साथीच्या आजारांनी डोकी वर काढली. गावात आता कल्याणच्या जागी कन्नडचे चव्हाण म्हणून नवीन डाॅक्टर आले होते ते गावात फिरत. लोकांनी त्यांना कल्याण राहत होता तेच अप्पांचं घर सुचवलं नी अप्पांनी ही तितकीच कल्याणची आठवण येत राहिल म्हणून रहायला दिलेलं. त्या गोष्टीस आता पाचेक महिने होत आलेले.चव्हाण डाॅक्टर गावात रूळले असले तरी कुणालाच उधार उपचार करत नसत व रात्री कुणीही आलं तरी घरी जात नसत.असेल गरज तर पेशंटला घेऊन या हीच भाषा. उपचारा आधीच पैसे रोख आहेत का? हा पहिला सवाल . हो म्हटलं तरच पेशंटच्या अंगास हात लावणार. गावाला पदोपदी कल्याण बाबा आठवू लागला. पण पावसाळा असल्यानं नाक धरून त्यांच्याकडं जावंच लागे.
कल्याणीस ताप चढला. रात्रीची वेळ म्हणून तात्पुरतं गावातल्याच चव्हाण डाॅक्टरास बोलवण्याचा विचार करत अप्पानं उमेशला पाठवलं. डाॅक्टर शब्द कानावर पडताच कल्याणीच्या डोळ्यात टपोरे थेंब तरारत त्याची उष्णता तिला गालावर तापातही जाणवू लागली. तिनं अप्पास डाॅक्टरास बोलावण्याचं नाकारलं. पण उमेश निघून गेला होता तो परत येत अप्पांना खाली बोलवलं
" अप्पा ते चव्हाण माकड रात्रीचं कुणाकडं जात नाही मी, पेशंटला इथं घेऊन या!" असं म्हणतंय.
अप्पाला नुसत्या फोनवर तिन्ही खेड्यात पाण्या पावसात, रात्रीं अपरात्री फिरणारा, स्वत:हून कधीच पैसे न मागणारा कल्याण आठवला. त्यांच्या डोळ्यात आग संचारली. कारण बऱ्याच लोकांनी डाॅक्टराची गाऱ्हाणी त्यांच्याकडं केली होती पण अप्पा दुर्लक्ष करत होते. आता येत नाही म्हटल्यावर ते संतापले. त्यांनी छत्री घेतली. गल्लीतल्या दलपत तात्यासही सोबत घेतलं.
" डाॅक्टर आहेत का घरात?" बाहेरूनच त्यांनी आवाज दिला. अप्पांचा आवाज ऐकताच गल्लीतले ही अंधार पाऊस असुन गोळा झाले.
" या अप्पा, आणलं का पेशंट? कोण आहे?" उमेशला परत पाठवलं म्हणून अप्पा पेशंट घेऊन आले असतील वाटत डाॅक्टर विचारू लागले.
" पेशंटचं राहू द्या, आमचं पेशंट आम्ही कंजारला पाठवलं! पण माझं घर आताच खाली करायला आलोय मी!"
आपण गेलो नाही म्हणून हा खेडवळ अप्पा धमकी देतोय हे चव्हाणनं ओळखलं व तो संतापात अप्पावरच उखडला.
" एवढ्या रात्री पावसात कोण घर सोडतो का? हा काय व्यवहार आहे? सकाळी या, तुमचं घर खाली करतो"
" अय चव्हाण! मला व्यवहार शिकवतो! सकाळी घर खाली करायला तू काय घरात भाड्यानं राहत नाही? चला फेका रे याचे डबळे!"
आपण आलो तसं भाडं दिलं नाही हे डाॅक्टरच्या लक्षात आलं.
" अहो तरी भाडं काय सोडणार आहात का तुम्ही? कधी तरी घेणारच ना? नी एवढ्या रात्री घराबाहेर काढतांना माणुसकी नावाची चीज आहे की नाही?"
" मी भाडं घेणार की सोडणार हा भाग नंतर .आधी मुकाट्यानं सामान काढ! मला माणुसकी शिकवतो रे तू आताच मिसरूड फुटलेला.पेशंटला पैसे नाहीत म्हणून परत पाठवतांना तुझी माणुसकी कुठं जाते चरायला. बाया बापड्यांना, म्हाताऱ्या कोताऱ्या आजारी पेशंटला इथेच बोलवतांना नाही आठवत माणुसकी? काढारे याचा सामान फेका" गर्दीला अप्पा गरजले.सर्वच एकदम गर्दी करू लागले. कारण सहा महिन्यांत प्रत्येकाशीच चव्हाणनं डोकं लावलं होतं. त्यानं गर्दी व अप्पाचा अंदाज घेतला व पावसात त्याला घाम फुटला.तो अप्पाच्या पाया पडू लागला.
" अप्पा आताच येतो पण मला माफ करा!"
" तुला अप्पाचंच काय पण गावात कुणाचंच घर मिळणार नाही. तू दहा दिवस जरी फिरला तरी घर मिळणार नाही.नी दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही भाड्यासाठी कधीच घर देत नाही नी दिलं तर भाडं घेत नाही.लक्षात ठेव"
" अप्पा चुकलं माझं मी लगेच येतो माडीवर!"
" माडीवर नाही आला तरी चालेल पण आजपासून कोणी केव्हा ही आला तरी बॅग घेऊन लगेच उठायचं. आधी पैसे विचारायचे नाहीत. हा कुणी उधारी बुडवत असेल तर मला सांग वर्षभराची साऱ्या गावाची उधारी मी देईन. भल्या माणसा कोणत्याही गावात आठ दहा अशी इरसाल असतातच जे उधारी देत नाही पण त्यांच्यासाठी साऱ्या गावाला वेठीस धरतांना लाज नाही वाटत तुला! सेवा करतोस की व्यापार?"
चव्हाणनं हातानं बॅग उचलत माडी गाठली. सारं गावं अप्पाच्या दणक्यानं आनंदलं. बापूसमोर एक शब्दही न बोलणाऱ्या अप्पाचा नवा अवतार गाव पाहत होतं.
वरच्या खोलीत थरथरत त्यानं बॅग ठेवली. बॅग पाहताच कल्याणीस मांडीवर बॅग घेत गोड गोड बोलत पेशंट तपासणारा कल्याण आठवला. चव्हाण डाॅक्टर "ताईस ताप असल्यानं इंजेक्शन देता येणार नाही. मी औषधी देतो त्यानं ताप उतरेल मग सकाळी हवंतर इंजेक्शन देईन "म्हणत होता. तर कल्याणच्या आठवणीत ती दंडावर इंजेक्शन घेण्याची तयारी करत होती व हातानंच दंड चोळत गालातल्या गालात हसत होती. चव्हाण तर केव्हाच निघून गेला. कल्याणी मात्र जुन्या संदर्भात घुटमळत रात्रभर जागली.
चतुर्थीला गणपती बसले. मागच्या वर्षी दौलतराव ऐन गणपतीत गेल्यानं गणपतीत गोकुळ अर्जुन यांनी भाग घेतलाच नव्हता. तर बापू सुरेंद्र राव गेल्यानं अप्पानी पण नाही. म्हणून साधेपणानं गाववाल्यांनी विसर्जन केलं होतं.पण यावर्षी गोकुळ अर्जुन यांनी दोन वर्षांपूर्वीचा वचपा घ्यायचं ठरवलंच.
विसर्जनाला अप्पा गेलेच नाही. आरती झाली व उमेश अर्जुनचे ढोल कडाडले. ढोलाचा आवाज कानावर पडला नी वरच्या खोलीतून न उतरणारी कल्याणी खाली उतरू लागली. अप्पा व द्वारकाबाईस एकदम धक्का बसला. द्वारका बाई तिला धरत "ताई कुठं निघालीस गं?" विचारू लागली.
" अप्पा!.... ढोल कोण वाजवतोय? "
अप्पांनी तिचा हात धरला व तिला कमानी जवळ आणलं. तितक्या चालण्यानंही तिचे पाय लटपटू लागले.उजेडात तिच्या पाठीवरील सुरेंद्रच्या माराचे व्रण दिसताच अप्पांना ढवळून आलं. अप्पांनी अंगणात खुर्च्या आणावयास लावल्या व तिला बसवलं. कल्याणी समोरच्या चौकाकडं पाहू लागली. ढोलाच्या आवाजानं तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलू लागले. पण तिला हवा असलेला आवाज ऐकू येईना तो आवाज ऐकण्यासाठी ती पुढं सरकू लागली. अप्पांनी तिचा हात पकडत चौकात नेलं. अप्पांनी ट्रॅक्टरकडं गणपतीजवळ नेत तिला पुजा करावयास लावली व स्वत: पुजा करत " हे विघ्नहरा मला उचल हवंतर पण माझ्या मुलीस या विरहाच्या वेदनेतून मुक्त करत चांगलं कर!" आसवाच्या धारात विनवलं. दर्शन होताच तिला माई क्लिनीक असलेलं घर दिसलं. ती पायात त्राण नसतांनाही वेगानं झेपावली. घर उघडच होतं चव्हाण डाॅक्टराची बाई ओट्यावरून विसर्जनाची गंमत पाहत होती.
कल्याणी उघड्या घरात घुसू लागली. अप्पा तिचा हात मागे परतवू लागले.
" अप्पा कल्याण बाबाला भेटारचंय? कुठं आहे तो?" ती भांबावल्यागत इकडे तिकडे पाहू लागली.अप्पा काही न बोलता तिला धरत उतरवू लागले. तितक्यातपावसासही सुरूवात झाली. तिकडं गोकुळ घोट्याचे ग्लास वर ग्लास रिचवत आखाड्यात मल्ल उतरावा तसा उतरला व मोठ्या वाड्यातील लोकांनी अर्जुनाचा ढोल सोडत त्याच्या कमरेस बांधला व त्यानं ढोल गुंगवला. तशी मोठ्या वाड्यातील मुलं जल्लोश करू लागली.
इकडं उमेशकडंनं रमेशनं ढोल घेतला.
दोन वर्षांपूर्वी गोकुळचा ढोल फोडल्यानंतर दोन महिने कल्याणनं रमेशला ढोल कसा वाजवायचा, आक्रकमतेत नजाकत कशी आणावी. चेहऱ्यावर आक्रमकता दाखवावी पण ढोल नजाकतीत कसा वाजवावा हे शिकवून तयार केलं होतं. आपल्या वादनातले बारकावे त्यानं रमेशला तंतोतंत पढवले होते.
गर्दीत रमेश घुसला व गोकुळ समोर ढोल बांधत उतरला या वर्षीचा रमेश वेगळाच भासू लागला. जुगलबंदी रंगली. कल्याणी गणपतीकडनं ढोल वाजवणाऱ्या कडं सरकली. एक पोरगं गोकुळ समोरच उड्या मारत नाचत होतं त्याकडं पाहत कल्याणी अप्पाचा हात धरत नेऊ लागली त्या नाचणाऱ्या पोरात तिला झब्बू दिसला.
" झब्बू...! तिनं जोरात आरोळी ठोकली! पण ढोलात कुणालाच ऐकू जाईना. तशी ती पुढं पुढं सरकू लागली. नाचणाऱ्या पोरास धरत
" झब्ब्या तुझा कल्याण बाबा कुठाय!"
ते ऐकताच घोट्यानं तर्र असलेल्या गोक्याचं पाषाण ह्रदय ही फाटलं! तांबारलेल्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या.
" अप्पाssss ! कल्याण बाबास बोलवाना!" ओरडत ती पडणाऱ्या पावसात भिजू लागली. ते पाहताच रमेशला स्फुरण चढलं.
"ताई !नाही कल्याण बाबा तरी हा तुझा भाऊ हरणार नाही! तुझ्यासाठी!"
पण टाहो फोडणाऱ्या कल्याणीला पाहताच व कल्याणमधला खरा ढोलकीया अनुभवलेला गोकुळ जोरानं हंबरला
" तायडे आग लागो त्या दुश्मनीला नी खड्ड्यात गेली स्पर्धा. आजपासून तुझ्या कल्याणबाबांचीच पार्टी कायम जिंकेल" म्हणत त्यानं स्वत:च स्वत:चा ढोल फोडला व अंगावरचा शर्ट काढत भिरकावला
" रमा वाजव ! तुमचीची पार्टी जिंको पण या ताईला आपला बाप्पा लवकर चांगलं करो!" सारेच जलोश करत नाचायला लागले. पण गोकुळनं अंगावरचं शर्ट फाडताच कल्याण आठवत ती शुद्ध हरपत अप्पाच्या अंगावर पडली.
सायंकाळी तिला बरं वाटू लागलं.चव्हाण डाॅक्टरानं येत इंजेक्शन देऊन गेले होते.
रात्री तिला आईच्या वेळेस आलो तेव्हा झब्बू येऊन सांगितलेलं आठवलं.
' ताई तू सातारला गेली नी कल्याण बाबा वेड्यागत अनेर काठ धुंडाळतोय'.
मी नसतांना तू काठ धुंडाळत होतास आता तू नसतांना मला अनेर काठ धुंडाळत बदललेले संदर्भ शोधत वेड लागेल!

. अप्पांनी रमेशला जीप काढावयास लावत धुळ्याला तिला मानसोपचार तज्ञाकडं नेलं. त्यांनी एक दिड तास कल्याणीचं काऊंसिलींग केलं. पण ज्या ठिकाणी संदर्भ लगडलेत त्याच ठिकाणी जाळ दाह व्हायचा .एरवी भावशून्य संदर्भात जगण्याची कला कल्याण कल्याणी शिकलेच होते. डॉक्टरांना कल्याणी एकदम नाॅर्मल वाटली. त्यांनी अशक्तपणाकरीता व झोपेसाठी औषधोपचार करत परत पाठवलं.
कंजारहून जीप मध्ये येतांना नदी ओलांडताच परतीच्या पाऊस झोडपू लागला. आधीच थंड जमीन तरी तिला मृद् गंध भासू लागला. नेमकी जीप पंक्चर झाली. गाडीत स्टेपनी ही नव्हती रमेशनं उमेशला फोन करत घरी पंक्चरवाल्याकडं पडलेली स्टेपनी आणावयास लावली. कल्याणी गाडीतून उतरत भिजू लागली. रमानं हात धरत मध्ये बसवलं.
" अप्पा, सांगानं याला.मला भिजू द्या! अप्पा तिला गाडीत बसवत छातीशी लावू लागले. त्यांना संदर्भांच्या जाणिवा लक्षात आल्या.
" पोरी महाचूक केली तू!गेली असती जमीन तर व्यापार करून जगलो असतो, दुसऱ्याकडं राबून जगलो असतो. पण आज ही वेळ आली नसती!"
उमेश आला.त्यानं स्टेपनी दिली व बाईक फिरवली. तोच ती त्याच्या बाईक वर बसली.
" दादा चल आपण बाईक वरच जाऊ! एकदा कल्याण बाबानं असंच मला नेलं होतं पडत्या पावसात!"
उमेशला आपण कल्याण बाबास फोन वरून सांगितलेलं आठवलं. अप्पा नाही म्हणत असतांना त्यानं बाईकला किक मारली
" या ताईसाठी गोक्या वैर विसरत बाप्पाकडं मागणं मागतो अप्पा तर माझ्या ताईला मी बाईकवर नाही नेऊ शकत! वेडेपणाची का असेना पण फिटू द्या तिची हौस!"
उमेश शांत गाडी चालवू लागला. गाडीच्या टाकीकडं सरकणारा कल्याण , पाऊस, मृद् गंध यानं ती भान हरपत कल्याणला आठवत साठवू लागली. पण ताई पडू नये म्हणून उमेशनं गाडी थांबवत तिचे दोन्ही हात आपल्या कमरेस धरावयास लावले नी ती झर्रकन भानावर आली.
धरणी पाणी पडून ही गारव्याच्या आगीत होरपळत राहिली.
"उमा मला घेऊन चल ना रे कल्याण बाबास भेटायला! फक्त त्याला डोळे भरून पहायचं एकदा!" ती लहान पोरासारखा हट्ट करू लागली नी उमेश ही हंबरला.
" ताई गाव आलंच बघ!" तो आसवं लपवत हुंदका दाबू लागला.
" उमा सारा बदलत्या संदर्भाचा खेळ बाबा! कसला मानसोपचार नी कसलं काय! अप्पा आपले खुळे आहेत! एवढ्या जहरी नागाच्या डंखातून गावातल्या कल्याण डाॅक्टरानं वाचवलं नी साध्या तापासाठी अप्पा मला वेडी ठरवत धुळ्याला घेऊन गेले!" ताईच्या या वाक्यानं उमा पुन्हा गदगदला.
ज्या मृद् गंधासाठी ती भान हरपत धावू पाहत होती तो मृद् गंध मात्र संदर्भ बदलवत जुन्या भावशून्य संदर्भात आपल्या डाॅक्टरकीचं मास्टर डिग्री चं शिक्षण मुंबई ला आटोपत होता.
मुंबईतल्या सिद्धी विनायक समोर संध्याकाळी तो " एकदंता! माझा
मृद् गंध जेथे ही असेल तेथे त्यास सुखी ठेव, हिम्मत देत नव्या संदर्भात झगण्याची ताकद दे त्यास!" मागणं मागत होता.
सिद्धिविनायकानं त्याचं मागणं ऐकलं असावं त्या रात्री तिला झोपेच्या गोळीनं म्हणा, मृद् गंधानं म्हणा किंवा कंजार ते शिरपूर गाडीत जातांना साप चावल्याच्या आठवणी आठवत म्हणा पण कल्याणीस शांत झोप लागली.
.
.
पण तिचा अनेरकाठ धुंडाळायचा अजुन बाकीच होता.
.
क्रमशः

✒ वा......पा....
नंदुरबार.
8275314774
नंदुरबार.
8275314774
No comments:
Post a Comment