' कितने बरस आये,बीत गये
प्यार की बाजी हम जीत गये
हमसे हाsssरा, हो हमसे हारा
ये जमाना!
साsssथी, मेरे जीवन साsssथी......'
प्यार की बाजी हम जीत गये
हमसे हाsssरा, हो हमसे हारा
ये जमाना!
साsssथी, मेरे जीवन साsssथी......'
मागच्या वर्षी अप्पाकडं दु:खाचा प्रसंग म्हणून सिताराम भरवाडनं पुनवचा कार्यक्रमच केला नव्हता. या वर्षी पुनव जवळ येऊ लागताच सिताराम भरवाड माडीवर येत आमंत्रण देऊन गेला.
पुनवेच्या रात्री अप्पा, द्वारकाबाई, कल्याणी, रमेश, उमेश, शालिनी- मालिनी(सुना) सारा परिवार जीपनं वाड्यावर गेला.गोविंद, लाखानं कल्याणी ताईचा हात धरत आधार देत वाड्यात नेलं.
राधेभाभी आता शालिनी मालिनीस उष्ट्या दुधाबाबत सांगत होती.
गोविंदने इशारा करताच राधा चपापली.
" गोविंद, सांगू दे रे तिला! प्रेमाचा प्यालाsssss ! " कल्याणीनं दिर्घ उसासा सोडला. ती गुंग झाली.
.
.
झब्बूनं कल्याणकडून आणलेला ग्लास तोंडास लावला बापू व अप्पा आपल्याकडं पाहत आहेत ये लक्षात येताच किती घारबलो होतो आपण. पण चांदण्यात बापू जवळ येत
" पोरी ओठ पुस!" म्हणत हसू लागले नी आपण बेधुंद होत कल्याणच्या ढोलावर.....
ती उठली.
पात्राकडे निघू लागताच गोविंद मागोमाग उठला व हात धरत नेऊ लागला.
" ताई दोन वर्षांपूर्वी कल्याण बाबा झब्बू सोबत आले होते. आपल्या आठवणीत....." गोविंदा बोलता बोलता थाबला. पुढे बोलताच येईना.
" गोविंद, सांग? कल्याण बाबा काय सांगत होता?"
" झब्बू , तू प्रेमाचा प्याला तुझ्या ताईस दिला पण मी तसाच उपाशी राहिलो रे! मला आता मुक्ती नाही!" गोविंद चा कंठ दाटून आला.
कल्याणीच्या डोळ्यांना धारा लागल्या ती थरथरू लागली व ती गोविंदाच्या आधारानं पात्रात धारेला समांतर निघाली.
सोबत चालणारा कल्याण आठवला नी रेतीतच कोसळली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा कल्याणीस धुळ्याला नेण्यात आलं. डाॅक्टरांनी औषधी देत आठ दहा दिवसात फरक नाही पडला तर मुबंईच्या तज्ञ प्रभुणे डाॅक्टराचा पत्ता देत मुंबईस घेऊन जाण्यास सुचवलं.
प्रभुणे डाॅक्टर मुबंईत मानसोपचार तज्ञ . शहा डाॅक्टर व ते सोबत शिकलेले. तेव्हा पासुन त्यांचे संबंध होते. शहा डाॅक्टर कडे हल्ली येणं जाणं कमी. यांची मुलगी कश्मिरा प्रभुणेनं ही एम. बी. बी.एस. करून याच वर्षी कल्याणच्या एम.जी. काॅलेजला एम.डी. करत होती. कल्याणला ज्युनीअर. शहा डाॅक्टराकडून ओळख होत कल्याण बरोबर ओळख व मैत्री झाली. सतत आपल्याच विश्वात असणारा ,अंतर्मुख कल्याण तिला आवडू लागला. डाऊट विचारणं, डिस्कस करणं या निमीत्तानं ती कल्याणच्या सहवासात राहण्याचं निमीत्त शोधे. कल्याणनं बोरवणला प्रॅक्टीस केली असल्यानं त्याचं निदान करणं, विचार करणं, एखाद्या टाॅपीकबाबत विस्तृत ज्ञान या गोष्टीमुळं ती कल्याणकडं ओढली गेली. पण कल्याण तिला शहा सरांकड येणारी व आपली ज्युनी .या पलिकडे फडकू देत नसे. कल्याण आपल्याच विश्वात भावशून्य संदर्भ शोधत जगत होता.
आठ दिवसात ही कल्याणीचं कल्याणला आठवत बेभान होणं सुरुच होतं. अप्पांनी रमेश शालिनी सोबत तिला मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला.
दुपारी जीपनं निघत धुळ्याला जात रात्री ट्रॅवल्सनं जायचं ठरलं.
जीप निघाली.वाटेत मळ्यात रमेश माणसांना काम सोपवण्यासाठी थांबला.
नाल्याकडच्या बोरी या वर्षी खूपच डवरल्या होत्या. हिरव्या पोपटी कोवळ्या पानात हरबऱ्याच्या आकाराची छोटी छोटी गर्द हिरवी बोरं लगडायला सुरूवात झाली होती. परतीच्या पावसानं बोरी झोडपल्या जाऊन ही नवीन बहरल्या होत्या. कल्याणी बोरीकडं निघाली.
" ताई कुठं चालल्यात तिकडं" मागं मागं जात शालिनी विनवत होती.
" शाले, या बोरी आड कुणी तरी उभं आहे गं! बोरं मागतोय खायला! थांब !" शालिनी हात धरत माग परतवू लागली.
" कल्याण त्या झाडाची नको खाऊ! तिकडच्या झाडाची बघ!" कल्याणी बरळू लागली तसं
शालिनीनं हात धरत तिला परत आणलं.
' कल्याण बोर लगडलीय रे!' कोण बोलतंय मेलं कुठलं चावट बांदर!'
मग बोरवणातल्या बोरवनात धुंदाळ गंधभारला वारा वाहत जावा व टपटप बोरं पडावीत तसे मधुर बोल घुमले.
" सांभाळ बोरीला काटे आहेत!"
तोच आलेल्या रमेशला शालिनी 'ताई तिकडं जात असल्याचं' सांगू लागली.
" रमा खरच बोरीला काटेच निघाले रे! तरी मी त्याला दुसरं झाड दाखवत होते!बघ आता कल्याण बाबा भेटला की त्याला मी दुसऱ्या बोरीवरच पाठवेन!"
ताई बडबडतेय हे पाहताच त्याला बोरीच्या खोडाला बिलगून हंबरणारा कल्याण बाबा आठवला नी त्यानं आसवे पुसत मळ्यातून गाडी काढली.
प्रभुणे डाॅक्टराची अकराची अपाॅईंटमेन्ट होती. कुर्ल्याला भव्य हाॅस्पिटल. रमेश - शालिनी, कल्याणी ताईस घेऊन दहालाच वेटींग रूम मध्ये बसले.
कल्याणीस बसल्या जागी मृद् गंध भासू लागला. तसा सकाळपासूनच तिला जाणवत होता. बालपणी मळ्यात अप्पा बापूबरोबर ती जाई. मृग जवळ आला की शेतकऱ्यांची लगबग सुरू होई. दुपारून दूर सातपुड्यात काळा ठिपका वाढत वाढत जाई. मग बोरवणला वळीव नसला तरी दूर कुठंतरी पडणाऱ्या वळिवाचा उठलेला मृद् गंध जाणवत राही. कधी तो कमीकमी होई त्या दिवशी बोरवणात तो येईच ना. पण कधी मृद् गंध वाढत जाई मग पाऊस येईच येई.
आज तिला सकाळ पासून तसाच मृद् गंध जाणवत तो वाढतोय असंच जाणवत होतं. दवाखान्यात आल्यापासून अगदी जवळच येतोय असंच जाणवू लागलं.
कल्याण, कल्याण बाबा! ये ना! का सतावतोय!
प्रभुणे डाॅक्टरांनी वरून खाली दवाखान्यात येण्याची तयारी केली तशी कश्मिरा जवळ आली. तसं तिनं रात्रीच सारं सांगत डॅडला कनविन्स केलंच होतं. त्यांची इच्छा नव्हती पण कश्मिरा सांगतेय तर एक वेळा पहावा तरी. म्हणून त्यांनी
"बोलवून घे दवाखान्यात पण मी आधी थेट भेटणार नाही वा बोलणार नाही. आधी पाहू दे मग विचार करेन!" सांगत तिला परवानगी दिली होती.
डाॅक्टर येण्याआधी एकट्या कल्याणीलाच आधी कॅबीनला पाठवण्यात आलं.रमेश मध्ये जाऊ लागताच
" सर आपणास नंतर बोलवतील!" सांगत थांबवण्यात आलं.
कल्याणी मध्ये गेली. आधीच्या पेशंटच्या नातेवाईकाशी सर बोलत होते.
ती कॅबीनला बसली. डाव्या हाताच्या भिंतीवर टि.व्ही.च्या पडद्यावर दवाखान्यातील सर्व फुटेज दिसत होतं. डाॅक्टर मध्येच तिकडं पाहत होते. तोच कश्मिरा मागच्या डोअरनं आत आली.
" डॅड तो येतोय!"
" कोण?" पेशंटच्या नादात त्यांनी विचारलं.
तिला राग आला. आपण रात्री सांगून ही डॅड कोण विचारताय, म्हणून ती रागानं रिपीट करू लागली.
कल्याणीस आता पाऊस पडेलच इतका जवळ मृद् गंध जाणवू लागला.
" डॅड, कल्याण गायकवाड. ज्याच्यावर मी प्रेम करतेय. जो मला सिनीअर अाहे एम. डी करतोय. माझं त्याच्यावर प्रेम आहे. व आपण आज पाहून संमती दिल्यास लवकरच लग्न करू!" काऊंसिलींग करता करता आपलंच काऊंसिलींग करायची वेळ आलीय डॅड, ती रागात म्हणाली.
' कल्याण गायकवाड, एम. डी. ,प्रेम, लग्न ऐकताच कल्याणी थरथरली. ' तो येतोय. पहा व संमती द्या' आणि तिला मृद् गंध का येतोय ते स्पष्ट झालं. तिला दवाखानाच आपल्या सभोवती गरगर फिरतोय वाटू लागलं .ती घाम पुसू लागली.
" कश्मिरा त्यानं तुला प्रपोज केलंय का?"
कश्मिरा घुटमळली.
" डॅड प्रपोज केलंय म्हणून तर तुम्हास सांगतेय!"
" मग बाहेर जा व भेट. मी पाहतो इथून . मग संध्याकाळी मी शहा कडं त्याला भेटतो!" ती खुश होत बाहेर निघाली
डाॅक्टर पेशंटच्या नातेवाईकाशी बोलण्यात गुंग असले तरी पडद्यावर पाहतच होते.
कल्याण दवाखान्याच्या गेटजवळील कॅमेऱ्यात आला. पडद्यावरच्या एकेक फुटेजवर तो पुढे सरकत वेटींगरूममध्ये आला.कश्मिराला भेटत सोबत आणलेली बुक्स व नोट्स देऊ लागला.
त्या आधीच रमेशला फोन आल्यानं त्यानं शालिनीस 'बोलवलं तर मला सांग' सांगत तो बाहेर येत समोरच्या मोकळ्या पॅसेजमध्ये फोनवर बोलू लागला.
मृद् गंध पाहताच " कल्याण बाबा, कल्याण बाबा पुटपुटत कल्याणीचं भान थोडं थोडं हरपायला लागलं. ती जिवाचा आकांत करत उठत बाहेर निघू लागली. पण पायात , अंगात इतकी थरथर वाढली की तिला उठताच येईना. ती टि. व्ही पडद्याकडं पाहत मृद् गंधास नजरेन पित रोमा रोमात श्वासानं भरू लागली. डाॅक्टरही कश्मिरास भेटणाऱ्या कल्याणला स्क्रीनवर पाहतच होते. तोच पुस्तकं देत त्यानं कश्मिराची रजा घेतली व तो निघू लागला. एकेक स्क्रीन पार करत मृद् गंध पडद्यावरून गेला. नी कल्याणीचा आसवाचा बांध फुटला. आता धूसर आसवात रमेश फोन कट करून वळत वेटींगरूम मध्ये येतांना पडद्यावर दिसत होता. शिवारात येऊन ही रमेशला पावसानं हुलकावणीच दिली. शालिनीच्या जवळ वेटींग रूममध्ये कल्याण बाबा उभा. पण ना शालिनी त्याला ओळखत होती ना तिला कल्याण!
पेशंटचं नातेवाईक बाहेर पडलं नी कश्मिरा आत येत डॅडकडं पाहू लागली.
" मुलगा चांगला आहे मी शहाला संध्याकाळी भेटतो" डॅडनं सांगताच कश्मिरा डॅडला बिलगली.तोच डाॅक्टरनं तिला रजा देत बेल वाजवत रमेशला आत बोलवलं.
कल्याणीच्या डोळ्यात आसवे वाहत होती पण ती आनंदाची की दु:खाची हे तिला ही समजत नव्हतं. डाॅक्टर तिला वेगवेगळे प्रश्न विचारत काऊंसिलींग करत होते.पण ती... ती.. उत्तर देत होती की..?
संदर्भ बदलले की होणारा जाळ, दाह जगणं असह्य करतो मग माणसानं एकतर नवीन संदर्भ शोधावेत किंवा जुन्या संदर्भांना पुन्हा कवटाळत भावशून्य जाणिवात जगणं सुसह्य करावं. कल्याण नवीन संदर्भ शोधतोय. त्याला प्रेमाचा प्याला न मिळताच मुक्ती मिळतेय. तर आपणास प्रेमाचा प्याला मिळूनही आता मुक्ती नाही. त्यानं आपल्या संसारात कधी दखल दिली नाही तर आपण का दखल द्यावी म्हणून तिनं कल्याणचा पाठलाग करण्याचा वा रमेशला सांगण्याचा सवालच निर्माण झाला नाही. जुन्याच संदर्भांना कवटाळत भावूशून्य जाणीवांसोबत जगण्याचा तिने निर्णय घेतला.
डाॅक्टरांचं काऊंसिलींग संपलं, औषधी घेत ते परतले.
साऱ्यांना प्रभुणे डाॅक्टरांचा गुण लागला म्हणून आनंद झाला. पण मनाचा अजब खेळ कुणास कळला. मात्र औषधांनी कल्याणीस ताकद मिळत ती पंधरा दिवसात चालू फिरू लागली.
महिन्यातच कल्याणी शाळेत रूजू झाली. गडगंज संपत्ती नावावर , शिवाय आपणास ही काही कमी नाही म्हणून अप्पा नोकरीच सोडण्यास विनवत होते. पण पगार गौण असुन मुलांमध्ये मन गुंतवता येईल म्हणून ती रूजू झाली.अवखळ कल्याणी, वेडी कल्याणी रूप बदलत नवीन रूप सारे अनुभवू लागले. अनेरचा पूर ओसरून नितळ पाणी वाहू लागावं तशीच शांत अबोल गंभीर कल्याणी बनली. वावरतांना संदर्भाचं आत दडवलेलं दु:खं खोल खोल दडवत ती शाळा करू लागली.दिवस महिने जाऊ लागले.
कल्याणनं एम. डी. करताच शहा सर कश्मिराशी लग्न करत मुंबई लाच सेटल व्हायचा सल्ला व मदत देत होते. त्यानं नम्रपणे नाकारत ज्या पांझराथडीनं आपणास मायेनं वाढवलं त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चिखलीलाच परतायचा निर्णय घेतला.
चिखलीला झब्बूनं निवृत्त माईची काळजी घेत गावातच एका व्यापाऱ्याकडं लागला होता. त्याला आपला बाबा येताच आनंद झाला. कल्याणनं दिना व इतर डाॅक्टर मित्राच्या सहायानं नाशीक धुळे व अहवाच्या सिमेवरील चरण माळ घाट परिसरातील लोकांच्या सोई साठी 'कल्याणी सेवा सदन' नावाची मोठी ट्रस्ट काढली. शहा सरांच्या मदतीनं पैसा उभारायचं ठरलं. माईनं आपल्या निवृत्तीनंतर व आयुष्याची सारी जमापुंजी त्यास दिली. मोठं मल्टी सुपरस्पेशालिस्ट डाॅक्टरांची सहज सेवा मिळेल असं इस्पीतळ उभारलं जाऊ लागलं. डाॅक्टर मित्रांनी आधी होकार देऊनही नंतर पैसा टाकायची वेळ येताच अंग काढून घेत आपापल्या सेवेत गुंग झाले. पण दिनानं सारी पुंजी देत त्याला साथ व हिम्मत दिली. वर्षभर ते मुंबईच्या चकरा मारत प्रोसेज करू लागले. पैसे संपले पुन्हा काम बंद.
कल्याणनं मुंबई गाठत शहा सरांना भेटला.
" सर सारं करून अजुन दवाखाना ही उभा नाही. इक्विपमेंट, स्टाफ, वाहनं इतर बाजुलाच. काय करावं!"
" कल्याण मार्ग निघेल. हिम्मत नको सोडू. " सांगत त्यांनी प्रभुणेला बोलावलं.
प्रभुणे आले. त्यानी कल्याणला पाहताच त्यांची नस तडकली.
" शहा मला का बोलवलंस?"
" प्रभुणे समाजसेवेचं काम करतोय तो. वेडेपणा करू नको.इतरांना मदत करतो मग याला का नाही?" शहानं मित्राच्या नात्यानं प्रभुनेस बजावलं.
" शहा यांना मी अजुनही सारा पैसा द्यायला तयार आहे. पण अट एकच यांनी कश्मिरास स्विकारावं!"
" प्रभुणे, तो विषय नको आता पुन्हा, त्यानं नकार दिलाय ना!"
" मग मदतीचा विषय तुम्ही का पुन्हा काढताय? मी पण नकार दिलाय ना!"
" सरजी, इच्छा नसेल तर आग्रह नाही.पण मनात राग आणू नका!" कल्याण हात जोडत म्हणाला.
" राग तर तुमच्यावर राहिलच .प्रपोज करून ही कश्मिरास नकार का देतायेत ते कळत नाही तो पर्यंत!" प्रभुणे रागात बोलले.
" सरजी मी आपणास पुन्हा पुन्हा सांगतोय मी कश्मिरास प्रपोज केलंच नाही. तिनं तसं का सांगावं हे तिलाच माहीत. राहिला नकाराचा प्रश्न तर कश्मिरास कुणीच नाकारू शकत नाही. चांगला मुलगा पहा व ..."
" तु का नाही हे सांग आधी!" प्रभुणे संतापत त्याला मध्येच थांबवत विचारू लागले.
" सरजी मी! मी वणव्यात सापडलेलं पेटतं झाडं आहे, पेटत्या झाडावरून आधीच पाखरे उडून गेलेत.शहाण्यांनी त्यावर हट्ट करत नवीन घरटं बांधू नये!"
एवढं बोलला नी तो चालता होत शहा सरांच्या घरी आला.
संध्याकाळी शहा सरांनी
"सहस्रबुद्धे म्हणून अॅडवायझर आहेत. ते प्रत्यक्ष साईटवर येऊन पाहणी करणार आहेत मग मदत करण्याबाबत ठरवणार. तो पावेतो काम सुरू ठेवण्यासाठी मी काही रक्कम पाठवतो उद्या!" सांगत धीर दिला. व कल्याण परतला. परततांना त्याला कश्मिराबाबत कणव दाटून आला. वणव्यात पेटणाऱ्या झाडाशेजारी ही वेलीच्या रूपात वाढू पाहत होती. आपल्याला खबर लागताच आपण वेळीच खडसावलं. पण तिनं वडिलांकडे खोटं का सांगाव की आपण प्रपोज केल? हा प्रश्न त्याला सतावू लागला व त्याला प्रवासात झाडातील लाकडातली उष्णता आठवू लागली. लाकडात आग असतेच पण दिसत नाही. आगीची ठिणगी पडली की लाकडातली आग हळूहळू सुलगू लागते. आगीला आग दिसताच मूळ रुपातील तत्वाची ओळख होते. मगं उभं ओलं झाड बघता बघता पेट घेत. मग झाडाच्या नशिबी उडून जाणाऱ्या पारव्यांना पाखरांना पाहत राहणंच उरतं व ते पेटत राहतं, धुमसत राहतं आपल्या अस्तित्वाची राख होई पर्यंत. नी उडालेली पाखरं त्यास कोसत राहतात आमचा निवारा उध्वस्त केला म्हणून. पण तरी जमिनीतलं खोड काही अंशी उरतंच. मग त्याला विनंती करत रडणारा झब्बू, मूक रुदन करणारी माई , सांत्वन करत सल्ला देणारे शहा सर, दिना आठवले. सारेच राखेला नविन नविन धुमारे फोडत झाडानं बहरावं असेच विनवणारे.
सहस्त्रबुद्धे आपलं तुंदिल पोट सांभाळत आपल्या क्लायंटला भेटण्यासाठी साताऱ्याहून धुळ्याला व तेथून बोरवणला आले. धुळीचे रस्ते पाहून या सुरेंद्र ला इतक्या कोपऱ्यात येण्याची काय गरज म्हणून वरती पाहत मनातल्या मनात शिवी हासडली. अप्पापेक्षा जास्त वयाच्या सहस्त्रबुद्धेनं कल्याणीची भेट घेतली. कुडाळची सारी जमीन अप्पा व तिच्या सांगण्यावरून विकली असल्याचं व महाबळेश्वरचं हाॅटेल, काही शेअर्स सारं विकलं असल्याची कल्पना दिली. त्यानंतर चॅरीटेबल संस्थेची पेपर दाखवत अनाथालय, वृद्धाश्रम यांचे ही पेपर दाखवले. कुणा कुणाकडून मदतीचे पेपर आलेत तेही समजावलं.
" कल्याणी बेटा, आठ दिवसांपासून मुंबई चे शहा डाॅक्टर तगादा लावत आहेत! तेवढ्यात अप्पांना काही कामा निमित्त बाहेर जावं लागलं.
" एक नविन ट्रस्टसाठी मदत साठी सांगत आहेत!"
" शहा, माणूस कसे आहेत? पूर्वी त्यांच्याशी काही संबंध? ते सांगत आहेत मग ट्रस्टची मागणी का नाही?" कल्याणीनं विचारलं
" शहा हे मुंबई तील नामांकित व्यक्ती असून गरिब मुलांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी झटत असतात. त्याच मुलांना मागास भागात वैद्यकीय सेवा पुरविण्यास प्रोत्साहन देतात व मदत करतात! पुर्वीही सुरेंद्र रावाकडं त्यांनी मदत मागितली होती पण सुरेंद्र रावांनी नकार दिला होता! ट्रस्टमार्फत सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल उभारलं जातंय. काम अर्धवट पडलंय पण मी त्यांना आधी साईट पाहून कळवतो असा निरोप दिलाय.आपली इच्छा असेल तर याच भागात चरणमाळ परिसरात साईट आहे पाहता येईल!"
म्हणत त्यांनी शहानं मोबाईल वर पाठवलेलं ट्रस्टचं लेटरपॅड वरील मदती मागणीचा पेपर दाखवला.
कल्याणीनं लेटरपॅड वरील ट्रस्टचं नाव पाहिलं नी धक्का बसत ती झूम करुन वाचू लागली.
' कल्याणी सेवासदन' या नावावर ती थबकली. सरसर खाली नजर गेली. माई सर्जेराव..., दिनेश... .. .नावं ओळखीची वाटू लागली. शेवटी 'कल्याण सदा गायकवाड' नावावर तिची थरथर वाढली. बाकी टस्ट्रीची नावं तिनं वाचलीच नाही.
लोगो पाहिला. पाठमोरा डाॅक्टर एका तरुणीस खांद्यावर घेत पळतोय. व दूर दवाखाना दिसतोय. खांद्यावरील तरुणीचाही चेहरा दिसत नाही. पण ती बेशुद्ध असावी हे तिचे लोंबकळणारे हात विस्कटलेले केस यावरून दिसत होतं.
तिला कंजार आठवलं, कंजारच्या आरोग्य सेंटरमध्ये इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं शिरपूरला न्यावं लागणार होतं. खांद्यावर उचलत धावत पळत आरोग्य केंद्राच्याच गाडीत टाकणारा कल्याण .... कल्याण बाबा आठवला.वेळेत पोहोचता यावं, आपली शुध हरपत आपण झोपू नये म्हणून हातानं मांडीवर थपका मारणारा कल्याण बाबा, आपला जीव वाचावा म्हणून तीळ तीळ तुटणारा कल्याण बाबा.....तिच्या डोळ्यातील आसवे मोबाईलवर पडली. कल्याण बाबा अजुनही सेवेसाठी धावतच आहे.
" काकासाहेब, आपणास काय वाटतं? कुणास मदत करावी?" तिनं विचारलं.
" कल्याणी बाळा मुंबईतील अनाथालय, वृद्थाश्रम यांनाच!"
" आणि शहा डाॅक्टर ?"
" बाळा माणूस गरिबांसाठी व त्यांच्यासाठी धडपडणाऱ्यांसाठी धडपडणारा आहे. दिलेल्या पै पै चा उपयोग करेल! पण त्यांनी सुचवलेली ट्रस्ट नवीन आहे म्हणून विश्वास नाही. एक वेळ तू स्वत: चल व साईट पाहून घे!"
" काकासाहेब, तुम्ही केव्हा पासून आमच्याकडं लीगल अॅडव्हायझर आहात? यांनी आपणास काय काय दिलं?"
या प्रश्नानं सहस्त्रबुद्धे भांबावले.
" बाळा चाळीस वर्षांपासून! भरपूर केलंय . जमीन वाढवून दिली, शेअर गुंतवले, हाॅटेल्स. नी काही वर्षांपासून कुठं मदत द्यायची ते ही करतोय!"
" तुमच्या साठी यांनी काय केलंय?"
सहस्त्रबुद्धे गहिवरला.
सुरेंद्र, त्याचे वडिल हे उर्मटच. नाही म्हणायला अक्का होती म्हणून फी तरी मिळे.
" काकासाहेब आपणास कल्याणी सेवासदनलाच मदत करायचीय. मी नाही येत पण तुम्ही जा! पहा . त्यांना जास्तीत जास्त सुविधेसह चांगल्यात चांगलं,भव्य हाॅस्पीटल उभारावयास लावा. त्यासाठी लागणारा सारा पैसा आपण ओतू हा विश्वास द्या! इस्टीमेट काढत रक्कम कळवा. तितका चेक मी तुमच्या खात्यात जमा करते!"
सहस्त्रबुद्धे अवाक होत आताच्या पोरीकडं पाहत राहिले.
" पण माझ्या खात्यात कशाला.सरळ ट्रस्टच्या खात्यात जमा करा!"
" ट्रस्टला मी नाही तुम्ही मदत करणार! तुमच्या मदतीनं ही कल्याणी सेवासदन उभी राहिल.माझं नाव कुठंच येणार नाही ही खबर दारी घ्या!"
" पण बाळा एवढी रक्कम माझ्या खात्यात कोणत्या विश्वासानं टाकणार!" सहस्त्रबुद्धे तिच्याकडं अविश्र्वासाने पाहू लागले.
" काका ज्या विश्वासानं तुम्ही चाळीस वर्षापासून राबत आलात त्या विश्वासानं.व तुमच्या नावानं मदत जातेय म्हटल्यावर तुम्ही स्वत:चे टाकणार पण काढणार नाहीत.
सहस्त्रबुद्धे चमकला. त्यांनी खेड्यातल्या मास्तरणीस वेडपट ठरवत जे मानस चित्र तयार केलं होतं ते सरर्कन फाडलं व त्यानं निरोप घेतला. निरोप देतांना याबाबत कल्याणी , सुरेंद्र, बोरवण हा उल्लेख येणार नाही याची खबरदारी घ्यायला लावली. अप्पासही तूर्तास काहीच कळू न देण्याबाबत सुचवलं
सहस्त्रबुद्धे कडून मदत मिळताच हाॅस्पिटलचं काम जोमानं सुरू झालं.
सारं पार पडताच आधुनिक लॅब तयार झाल्या .साधनं ,मशनरी आल्या सुरतकडुन काही सुपर स्पेशालिस्ट डाॅक्टरांना वार ठरवत येण्याबाबत नियोजन झालं. पेशंटना निम्म्या खर्चात उपचार मिळतील अशी योजना कार्यान्वीत झाली.
कल्याण दिना रात्रंदिवस थांबत चरणमाळ, कोंडाईबारी, अहवा डांग व बागलाण कडच्या पेशंटचा विश्वास संपादन करू लागले. मोठ मोठी शिबीरं आयोजित करून वेगवेगळ्या दुर्धर आजाराचं निदान उपचार होऊ लागले. त्यासाठी नंतर सामाजिक संस्था, राजकीय नेते, सरकार यांच्याकडून मदत घेण्यात येऊ लागली. अवघ्या दोन वर्षात कल्याणी सेवासदन कल्याणनं आपल्या हिकमतीनं नावारूपास आणलं. त्याच्या कॅबीनमध्ये टेबलावर कल्याणीनं दिलेली ढोल वाजवतांनाची त्याचीच मूर्ती त्यानं ठेवली. तर एका पात्रात अनेर नदीच्या पात्रातली त्यानं आणलेली वाळू ठेवली. त्याला उदासवाणं वाटलं की तो त्या वाळूस स्पर्शतो. कल्याणीच्या स्पर्शाचा मृद् गंधाची त्याला अनुभूती होते. व त्याच्या चित्त पालवी टवटवीत होतात. झब्बू दुपारी त्याचा स्वयंपाक करून माईस जेवण दिलं की डबा घेऊन दवाखान्यात येतो. किती ही गर्दी असली तरी दुपारी दिड वाजता झब्बू व तो सोबत जेवण करतात. मग दिवस भर झब्बू दवाखान्यातली कामं करतो.
२०१९ साल उजाळलं. कल्याणी मॅडमांनी संवर्ग एकची सवलत घेतलीच नाही. म्हणून संवर्ग चार मध्ये त्यांनी भरलेली गावं मिळालीच नाही व कल्याणी मॅडम विस्थापीत झाल्या. रॅण्डम रांउंडमध्ये समायोजनात त्यांना शिरपूर तालुक्यातील एकही गाव खाली नव्हतं. पडद्यावर दिसणारी गावं कधीच पाहिली नाहीत. चरणमाळ घाटातली नावं होती. काय वाटलं कुणास ठाऊक तेच एक गाव त्यांनी मांगितलं व मिळालं.
आदेश आले. अप्पा संतापत हजर व्हायला नकार देऊ लागले. पण तिला ही आता मुलांचीच सेवा दिसत होती. द्वारका माईस सोबत घेत ती निघाली धुळे जिल्ह्यातलं नाशीक व गुजरात सिमेवरचं टोकाचं गाव. ती तिथेच खोली करत राहू लागली. अप्पास समजावत राग काढला. व नंतर द्वारका काकीस ही ती बोरवणलाच टाकून गेली.
नविन वर्ष उजाळलं ते जगावर महाकाय संकट घेऊनच. जगावर छाया पसरत असतांनाच भारतातही हातपाय पसरू लागले. सारेच हादरले व लाॅकडाऊन जाहीर झालं. कल्याणी बोरवणला परतली.
आकडे वाढू लागले तसा प्रशासनावर ताण पडू लागला. कल्याणनं आपली ट्रस्टमधील एक बिल्डीगमध्ये पार्टीशन करत क्वारंटटाईन सेंटर व ज्यात दवाखाना होता तिथेच कोरोना वार्ड करत प्रशासनाकडे सेवेस तयार असल्याचं कळवत मंजूरी मागितली. सारे नियम पाळत मंजूरी मिळाली .
माई त्यास भले वैद्यकीय सेवा सुरू ठेव पण ....सेंटर नको म्हणत त्यास विनवू लागली.
" माई सारा देश संकटात आहे सारे पोलीस , सफाई कामगार, डाॅक्टर देवदूत बनत सेवा बजावत आहेत मग मी का रणछोडदास व्हावं!"
" अरे तू ही सेवा देण्याचं पुण्य तर करत आहेसच ना! नी देव ना करो. पण उद्या काही भलाबुरा .... तर मी या वयात कुणाकडं पहावं!या साठी तु नारायणगावास माझा पदर पकडला होता का!" माईला पुढे बोलवेना.
त्यानं माईचे डोळे पुसले.
" माई, तुला सोडून मी कुठं जातोय गं! अगं तिथं ही प्रत्येक जण आपल्या जिवाची काळजी घेतच सेवा बजावतात. नी तरी समजा काही झालंच तर हा झब्बू मरे पर्यंत तुझी सेवा करेनच तु कशाला काळजी करते!"
झब्बूच्या डोळ्यात मात्र आसवे होती. त्याला बोरवणातील ती पावसाळी रात्र आठवत होती, ज्या रात्री तो बापूच्या ओट्यावर आश्रयाला गेला होता .नी त्या दिवसापासून बाबानं हात धरला तो धरलाच. बाबा असला की आपणास मरणाची पण भिती वाटत नाही. काही झालं तरी बाबा आपली विल्हेवाट लावेलच हा विश्वास वाटतो. नी आता बाबाच माईची जबाबदारी आपणावर सोपवतोय म्हटल्यावर तो रडू लागला.
" झब्ब्या तूच ना अनेर काठातल्या त्या अंधारातून मला बाहेर काढणारा! मग ? " झब्बूनं अश्रू पुसले.
लाॅकडाऊन शिथील झालं नी स्वयंसेवक म्हणून कल्याणीनं अर्ज केला होता. ती शाळेच्या गावात परतली. बाहेरून गावात परतलेल्या लोकांचं सर्वेक्षण करण्याचं काम आलं. ती काळजी घेत सर्वेक्षण करू लागली. आताशी तिला कल्याणी सेवासदनला एक वेळा भेट देऊन कल्याण बाबास भेटावं असं आतून जीव तुटेपर्यंत वाटे. पण पुन्हा भावशून्य संदर्भांना सोडून नविन संदर्भात परतणे नकोच! शिवाय कश्मिरा सोबत तो सुखी असेल. मग का आपण डोकावत त्याला भूत काळात डोकावयास लावण्याचं पातक करावं. नकोच.
अजून फक्त क्वारंटटाईन सेंटर सुरू होतं. रात्री झब्बू बरोबर कल्याण बसलेला.
" झब्बू,!"
" काय बाबा?"
" तुला बोरवणात जावंसं नाही वाटत का कधी?"
" बाबा चालायचं का?"
" निदान अप्पा,द्वारका काकी, उमा,. रमा, गोक्या अर्जुन यांना एकदा पुन्हा भेटावं, करकचून मिठी मारावी असं वाटतंय रे!"
" बस्स! आणखी दुसऱ्या कुणालाच नाही का?"
" अनेर काठावरील सिताराम भरवाडच्या वाड्यावर फिरावं, अप्पाच्या मळ्यातया बोरी तोडाव्यात, कंजारपासून भर पावसात पावसात भिजत मृद् गंध प्यावा असं भरपूर वाटतं रे!"
" बाबा! आणि माझ्या ताईला भेटावं असं नाही वाटत का तुला? बाबा बदलला तू फार!"
" झब्ब्या कुणाच्या संसारात डोकावणं पातक असतं रे!"
" मग कॅबिनमधल्या त्या पात्रातील रेतीला का पुन्हा पुन्हा हात लावतो?"
" झब्बू तेव्हा त्यात जी शाश्वतता होती त्या शाश्वततेचा मृद गंध दडलाय त्यात. त्यापासून आम्हास कुणीच दूर करू शकत नाही. तोच तर जगण्याचा आधार आहे बाबा!"
" बाबा, ऐक! लग्न कर. का उगाच हे जळणं जाळणं!"
" झब्बू तू पण जळतोयच ना ? मग तु का नाही करत?"
" हे लाॅकडाऊन संपतंय आता! एकदाचा कोरोना संपू दे,मग धुमधडाक्यात करतो मी लग्न!" झब्बू संतापात बोलला नी कल्याण हसायला लागला. हसता हसता त्यानं झब्बूला मिठी मारत हंबरायला सुरूवात केली.
" झब्बू आता मरणाशीच आमचं लग्न.पण प्रेमाचा उष्टा प्याला मिळाल्याशिवाय व साथीनं मरणा शिवाय मला लाथाडणाऱ्या चंद्रभागेच्या काठावरील विठ्ठल मुक्ती देणार नाही.
आषाढ वारीच नसल्यानं बंदीस्त विठ्ठलानं त्याचं मागणं कबुल केलं.
कल्याणीनं सर्वेक्षण केले त्यात मुंबईहून परतलेले काही जण होते. त्यांनी माहिती लपवली. कल्याणीनं सोशल डिस्टनसींग पाळूनही माहिती देतांना
एकानं घरातून पाणी आणत कल्याणी बाईस पिण्यास दिलं. देतांना अनावधानानं ते जवळ आलेच.
चार पाच दिवस झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागताच ते कल्याणी सेवा सदनला आले. नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. ज्यांना लक्षणं नव्हती त्यांना होम क्वारंटाईन केलं. कल्याणीचा जीव भांड्यात पडला. कल्याणी सेवासदनला जावं लागणार नाही म्हणून ती खोलीतच क्वारंटाईन झाली.. तिनं बोरवणला काळजी करतील नाहक म्हणून कळवलंच नाही. आठ दहा दिवस.त्यानंतर तिला ताप... घसा... नी मग शेवटी सेवासदनलाच आणण्यात आलं. क्वारंटाईन सेंटरला दोन दिवस राहिली. रिपोर्ट आला नी तिला आयसो लेट करण्यात आलं. कोरोना वार्डात आणतांना कल्याणचं लक्ष गेलं नी कल्याण उभ्या उभ्याच कोसळला. दिना धावत आला. कल्याणनं किट ग्लोज चढवत कोरोना वार्डात घुसला. सुनं कपाळ पाहताच त्यानं टाहो फोडला. अंतरावरूनच दोन मुक्या जिवांच्या रुदनानं कल्याणी सेवासदनास हादरे बसू लागले. त्या हादऱ्यांनी पाझरा थडीही हादरली. पाच दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही कल्याणीत रिकव्हर होण्याची चिन्हे दिसेनात. माई हादरली. झब्बू तर ठार वेड्यागत धावत आपल्या ताईस भेटण्यासाठी हंबरू लागला. दिनानं साऱ्या सुरक्षिततेसह दुरूनच त्याची भेट घडवली. कल्याणीला बेडवर पाहताच त्यानं दिनास एका दमात ढकलत " मी मेलो तरी चालेल पण मला ताईस भेटू द्या!" म्हणून दरवाजा उघडण्यास विनवू लागला. पण दिनानं काचेतून च त्याला दाखवत थोपवलं
" झब्बू, कल्याण बाबा आहे ना! तो नाही जाऊ देणार तिला! ती लवकर बरी होईल !" दिना भकासपणे खोटा धीर देत त्याला समजावू लागला. झब्बू परतला नी कल्याण भिंतीला डोकं आपटत आकांत करू लागला.
कल्याणीस व्हेंटीलेटर लावून ही साऱ्या आशा मावळल्या. दुपारी दिनानं 'नविन पेशंट वाढत आहेत व्हेंटीलेटर कमतरता म्हणुन.." सांगितलं. तिकडं कल्याण दुर्लक्ष करू लागला. कल्याणनं विचार केला.
तो किट काढत सारी दक्षता घेत घरी परतला.
त्यानं माईस कल्याणीबाबत समजावलं. माईकडं त्यानं भरल्या नजरेनं पाहत ह्रदयात साठवून घेतलं.पण बाकी माईस काहीच सांगितलं नाही. झब्बूस एकांतात बोलवलं. दूर दूर कुणीच नाही.
त्याच्या नसा ताठ होऊ लागल्या. श्वास फुलू लागला. तो धीरोदात्त पणे बोलू लागला.
" झब्बू, तुला माणसात आणलं, वागलं. आजपर्यंत काहीच मांगितलं नाही. आज मला तुझ्याकडून काही तरी हवं."
" बाबा, एक शब्द सांग .हा झब्ब्या जीव ही देईल!"
" मला जीव नको तुझा. पण तू माईसाठी मोठा मुलगा म्हणून ..."
" बाबा बोल? पुढे काय?"
" तु माझ्या मागं येणार नाहीस असं वचन दे!"
" बाबा कुठं निघालास....?नी तुला तर वचनाची चीड आहे ना ? मग मला का अडकवतोस!"
"झब्बू ऐक ना!"
" आधी तू कुठं निघालास ते सांग मला!"झब्बू भकास भेसूर उदासवाण्या चेहऱ्यानं त्यास विचारू लागला.
" झब्बू तुझी ताई वाचणं शक्य नाही आता. नी तिला वचन दिलंय मी गोदाकाठी...साथीनं नाही जगता आलं तरी साथीनं मरण्यासाठी मी थांबेन! म्हणूनच त्या अनेरच्या अंधारातून मी बाहेर पडलो होतो.अन्यथा तिथंच...!"
" बाबा..............!" झब्बू आक्रंदू लागला.
" झब्बू आता पर्यंत मी नियतीला कायम कोसत आलो पण आयुष्य भर नियतीनं माझ्याशी दगा करूनही शेवटी उपकार केलाच. माझ्या कल्याणीस साथीनं मरण्यासाठी माझ्या जवळ आणलंच. आणि या एका क्षणासाठी मी हजार जन्मही बरबाद करीन. उष्टा प्रेमाचा प्याला मला प्यायचाय रे! मुक्तीसाठी!"
झब्बूनं कल्याणच्या छातीवर हातानं मारत "तुम्ही दोघे लबाड निघालेत रे! माझी साथ सोडून चालले; मला सोडून!"
कल्याणनं त्याला छातीला लावत
" भावा माईसाठी रे..... एवढे उपकार करं!"
दोन्ही परतले. कल्याणनं रात्रीची ड्युटी मुद्दाम लावून घेतली.
" त्यानं काढ्या ऐवजी गरम दुधाचा ग्लास केसर टाकून आणावयास लावला. कोरोना वार्डात तो गेला. त्यानं कुणीच फडकणार नाही ही खबरदारी आधीच घेतली होती.
त्यानं आत जाताच किट ग्लोज सारं काढून फेकलं. तो कल्याणी जवळ जाऊ लागताच ती धापा टाकत उठू लागली. कल्याण आपणास मिठी मारतोय हे पाहताच त्राण नसतांनाही ती त्यानं जवळ येऊ नये म्हणून हाफू लागली.
" कल्याणी, तू नसल्यावर मी काय करु जगून. म्हणून शांत रहा. मला साथीनं.....ती समजून चुकली. तिला क्वारंटटाईन सेंटर मध्येच कल्याणनं लग्नच केलं नाही हे कळालं होतं. तिला आता जगावंसं वाटत होतं आपल्या कल्याण बाबासाठी. पण नियती... कल्याणनं तिला मिठीत घेतली. मृद् गंधात मृद गंध मिसळला. आता ना जगणं, ना मरणं... �

No comments:
Post a Comment