गणपती उठले. अनंत चतुर्दशी गेली .सजन बापू, राधाताई, उमेशला घेत महिंद्रा जीपनं सातारला निघाले.आता पाच सहा दिवसानंतरच ते परतणार होते. वर्षातून एकदा अप्पा किंवा बापू सातारला सखू अक्कास भेटायला हमखास जात असत. जातांना वर्षभरासाठी लागणारे धान्य, दाळदाणा, वा खानदेशातील ऋतूमानानुसार येणाऱ्या वस्तू हमखास नेत. सिझन असला तर बोराची गोण, कैऱ्या, तापीची कलिंगडं,तर कधी सातपुड्यातला मध. आता ही बापूनं गिमल्या नाईकाकडनं हंडा भर मध आधीच आणून ठेवलं होतं. बापू, अप्पा वर्षातून जात असले तरी ही बहीण लग्नानंतर बोरवणला अपवाद वगळता कधीच आली नाही.ही सल दोन्ही भावांना कायम वाटेच.
किसन अप्पा व रमेश टिश्यूची रोपं व नविन ठिंबकचा संच आणण्याकरिता सकाळीच जळगावला निघाले. घरी द्वारकाबाई होत्या. कालच्या परतीच्या पावसानं बोरवण पट्ट्याला चांगलच झोडपूनही आज नऊ नंतरच दमटपणा जाणवत होता.
साडेनऊ वाजता कल्याणीनं आपली पर्स व डबा घेत मोपेडजवळ आली. मोपेड स्टार्ट होईना म्हणून किक मारू लागली. एक दोन किक झाल्या तोच तिला सलवारच्या आत पोटरीच्या भागात काही तरी टोचलं. किक मारतांना फिस्स.. अशा आवाजाची जाणीव होताच तिनं खाली पाहिलं नी फणा काढलेलं जनावर मागच्या चाकाकडून निघत सरसर निसटलं. ती बोंब ठोकत घरात पळाली. कालच्या पावसानं बिळात पाणी गेलं असावं वा दमटपणानं ते गाडीच्या चाकाकडच्या भागात घुसून बसलेलं असावं.किक मारतांना आवाज व हालचालीनं त्यानं आपला निसर्गदत्त हक्क बजावत कल्याणीच्या पोटरीवर डसलंच.
द्वारकाबाई घाबरल्या आजुबाजुच्या एक दोन बाया माणसं आली. कुणीतरी अप्पाला फोन केला.अप्पा तर पाळधीच्या आसपास. त्यांनी तसाच डाॅक्टराला फोन केला. तो पावेतो गल्लीतला एकजण माई क्लिनीकवर पोहोचला.अप्पाचा फोन येताच कल्याणनं बाईक काढत माडी गाठली .
काॅटवर बसलेल्या कल्याणीस कोणी मिरची देत होत तर कुणी मिठ देत होत. कल्याण जाताच चावल्याची जागा विचारू लागला.आधी त्यानं गर्दी मागं सारत हवा येऊ द्यायला लावली.
कल्याणीनं पोटरीकडं हातानं इशारा केला.कल्याणनं सलवार खालून वर सरकवत खूण पाहिली. खूणा चक्राकार नव्हत्या.फक्त दोन दात गाढलेले दिसताच जनावर विषारी असल्याचं कल्याणनं ताडलं.पण त्यानं चेहऱ्यावर तसं भासू दिलं नाही.
" साप तुम्ही पाहिला का? कसा होता?"
" फणा....फिस्स...हात दिड हात...लांब.." कल्याणी तुटक तुटक व धाप लागल्यागत बोलली.
फणा ऐकताच व दोन खुणा पाहुन नागाची खात्री झाली. तो पावेतो तिच्या पापण्या जड झाल्यागत तिला जाणवू लागलं.ती द्वारका काकीस बिलगत रडू लागली.
" लवकर गाडी काढा व कंजारला प्राथ्. आरोग्य केंद्रात न्यावं लागेल"कल्याण बाहेर येत सांगू लागला.
तितक्यात त्यानं अप्पांना फोन करत लवकर परत यायला लावलं. तिकडनं अप्पांनी तो पावेतो तुम्ही दवाखान्यात न्या असं सांगत ते माघारी फिरले. गावातील चार ही जीप नेमक्या आज बाहेर केलेल्या. गलका होत वेळ जाऊ लागला.वेळ दवडणं धोक्याचं असल्यानं लगेच बाईकचा सल्ला दिला. वाड्यातल्याच गणानं बाईक आणली. द्वारकाताईला ही तयारी करायला लावली. बाहेर कल्याण व गणाची बाईक उभी. कल्याणीला बाहेर आणताच ती कल्याणच्याच बाईक वर बसली. द्वारकाबाई गणासोबत बसल्या. तो पावेतो तिचा श्वास जड होऊ लागला व पापण्या ही जडावल्या .कल्याणनं विष चेतासंस्थेवर परिणाम करतंय ओळखत तशीच गाडी पळवली.कल्याणीनं त्याला मागून हाताची मिठी घालत गच्च धरलं पण तीन चार किमी जात नाही तोच तिची शुद्ध हरपतेय हे ओळखत कल्याणनं तिची ओढणी घेत आपल्या कमरेभोवती तिला गच्च गुंडाळत गाडी पळवली. कंजारला दवाखान्यात येताच तिथं ही इंजेक्शन नसल्याचं कळताच तिथल्या गाडीनं तात्काळ त्यानं शिरपूरला न्यायचं ठरवलं.तत्पूर्वी तिथं त्यानं निओस्टिग्मीन द्यायला लावलं. त्यानं तिला श्वास घेण्यास थोडा फरक पडला. गणाची बाईक बरीच मागे असल्यानं त्याची वाट न पाहताच त्यानं कल्याणीला पि.एच.सी च्या गाडीनं नेलं. फोनवर गणास शिरपूर ला यायला लावलं. गाडीत कल्याणी कल्याणवर मान टाकत गच्च धरत
"कल्याण बाबा! कल्याण बाबा " म्हणत झोपू लागली. पण त्या ही स्थितीत थरथर दाबत तो तिला जागतं ठेवण्याचा कसोशीनं प्रयत्न करू लागला. ड्रायव्हरनं ही पेशंटची स्थिती पाहत गाडी बेफान पळवत आणली. दवाखान्यात पटापट सुत्रे हालत ताबडतोब इंजेक्शन देत ट्रिटमेंट सुरू झाली. त्यांना साप कोणता हे समजल्यानं लगोलग उपचार सुरू करता आले. गणा व द्वारका माई आले. नंतर बऱ्याच वेळानं दोन तीनच्या आसपास धावपळ करत अप्पा व रमेश आले .तो पावेतो धोका टळला होता.
कल्याणनं अप्पाची रजा घेत निघायची तयारी केली. सारे वेटींग रूम मध्ये बसलेले.त्यानं रूम मध्ये येत कल्याणीस पाहिलं व द्वारकाताईस "ताई मी निघतो" म्हणाला. तोच कल्याणीनं त्याचा हात पकडत इशाऱ्यानं थांबायला लावलं . दिवसभराच्या धावपळीत नाही पण आता मात्र कल्याणची धडधड थडथड ,थरथर वाढली. तर कल्याणीस टाकीवर सरकणारा, कल्याण, ओढणीनं गच्च बांधुन आणणारा कल्याण.,कंजारला उचलून गाडीत टाकणारा कल्याण आठवला .तप्त उन्हान कोळलेल्या रानास वळीव सरीचा स्पर्श व्हावा अगदी तसंच! ती त्याचा धरलेला हात गच्च गच्च दाबू लागली.द्वारकाताईस मात्र हे लक्षात आलंच नाही.
" काकी! डाॅक्टरांना ही थांबवायला लाव ना! मला भिती वाटतेय!" कल्याणी विनवू लागली.
तोच अप्पा ही मध्ये आले.
कल्याणबाबा सकाळी डिस्चार्ज देणारच आहेत. नी तुमची गाडी पण कंजारला.थांबा ना .मला ही अनायासे थांबलो आहोत तर चेक अप करायचंय!"
अप्पांचा रक्तदाब वाढतो हे कल्याणनं बऱ्याचदा सांगितलं होतंच.ते आठवलं. कल्याणीचा इशारा, अप्पाचा आग्रह कल्याणला थांबावंच लागलं.रमेश गणा द्वारकाकाकी परतले. त्यानं अप्पांना आपल्या ओळखीच्या एम. डी. मित्राकडे नेलं.
अप्पांचं नाव नोंदवून कल्याणनं फोन करताच डाॅक्टरांनी लगेच मध्ये बोलवलं. चेकअप नंतर इसीजी काढत रक्तदाबाची कायम स्वरुपी गोळी व इतर काही औषधी दिल्या. कल्याणसोबत गप्पा व चहा घेत डाॅक्टरांनी निरोप दिला. बाहेर मेडिकलवरुन गोळ्या घेत ते कल्याणीजवळ आले.
अप्पाची फाईल पाहतांना अप्पाचं नाव चुकल्याचं कल्याणच्या लक्षात आलं.
" अप्पा तुमचं किसन भिकाजी' नाव चुकवून 'किसन फकिरा चौधरी' केलंय वाटतं?"
"नाही कल्याण बाबा,माझं नाव तेच आहे ना!"
" अप्पा कसं?"विस्मयानं कल्याण विचारू लागला.
" बाबा ती ही एक मोठी कहाणी आहे!"
" काय अप्पा नेमकं?"
अप्पा सखु अक्काच्या विचारात गुंग झाले.कल्याणी ही भिंतीला पाठ टेकत बसली. अप्पा सांगू लागले....
.
.
.
फकिरा व भिकाजी दोन भाऊ. मोठ्या भिकाजीस सजन व किसन दोन मुलं.फकिरास मुलगा झालाच नाही. भिकाजी ला दारू, पत्ते, मटका याचं व्यसन. भिकाजीनं एकरा एकरानं शेत विकत आपली व्यसनं राखली, वाढवली. अंजाबाई तीळ तीळ तुटू लागल्या. सजन दहा वर्षाचा होत नाही तो पावेतो भिकाजीनं आपली सारी जमीन विकली. पण त्यानं आपली सारी जमीन फकिरालाच विकली. दुसऱ्या कुणास घुसूच दिलं नाही. सारं विकलं नी दारूच्या नशेत भरल्या अनेरमध्ये अंग टाकलं. दोन्ही पोरांना घेत अंजाबाई माहेराला निघाल्या. लहान दिरानं आईसमान आपल्या भावजईस ' पोरास सांभाळणं माझी जबाबदारी' असं वचन देत गावातच रहायला लावलं. सजन ,किसन जसजशी मोठी होऊ लागली तशी काकाच्या शेतातच राबू लागली. पोटाला मूलबाळ होत नाही म्हणून मंजाबाईनं आपल्या बहिणीची मुलगी सखूला बोरवणला आणलं. सात आठ वर्षाची सखू लग्नापर्यंत बोरवणातच राहिली. सजन किसन नी काकाकडे राबत आणखी जमीन वाढवली. फकिरा काकानं सखूचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं.सातारचे जयसिंग सुर्वे व मुलगाही सैन्यात मोठ्या हुद्द्यावर.काकांनी लगेच सजन किसनचं ही लग्न केलं.
जावई व व्याह्यांना सारी परिस्थिती सांगत सखूस काही जमीन नावे करून देतो म्हणून विचारलं तर मानी सुर्व्यांनी आम्हास फक्त सून हवी,तुमचं चासभर ही नको म्हणत नकार दिला. काकांना आनंद झाला. काकांनी किसनला दत्तक घेत सारी जमीन किसन व सजनच्या नावावर केली. मंजाकाकीस ही बाब खटकली. तिला निम्मे जमीन सखूच्या नावावर हवी होती. पण व्याह्यांनी नकार दिला नी दुसरी गोष्ट निम्मे जमीन अशीही भिकाजीचीच होती. त्यानं किंमत न पाहता आपणास विकली ही जाण फकिरा काकांनी ठेवली.शिवाय मुलांनी राबत वाढवली.काका व काकूत खटके उडाले. त्यातच फकिरा काकास झटका आला व काका गेले. दसवं आटोपलं नी काकी जावयाकडे निघून गेली. सजन बापूनं स्वत: जात काकीस निम्म्या जमिनीचा उतारा दिला .
" काकी खरेदीला मी आताच तयार आहे. हवंतर किसन दत्तक राहिल व ती ही देतो. आम्हाला मोठं केलं हेच मोठे उपकार. पण परत बोरवणला चल. पाया पडतो."
काकी व सखू बोरवणला आल्या. सजन, किसन चोपड्यास गेले व खरेदीची सारी कागदपत्रे तयार केली.
सारी जमीन परत सखूच्या नावावर होत होती. पण तोच काकू ढसाढसा रडत बाहेर आली. काकुनं सजनची नियत ओळखली.
" सजन तू नावाप्रमाणंच सजन आहेस पोरा! तुझी तुझ्या काकानं बरोबर पारख केली पण मी चुकले. मात्र आता तुझ्या काकाच्या नावास बट्टा लावण्याचं पातक मी करणार नाही.नको मला जमीन!"
सारे बोरवणला आले.सजननं सखू आक्कास थोडी तरी जमीन घेण्यास विनवलं.
" बापू, मावशी घेत नाही तर मी कशी घेऊ!"
" अक्का ! स्वखुशीनं देतोय!"
" नको मला!"
" अक्का नाही जमीन तर दुसरं काही तरी माग ते देईन!"
" बापू आता मला काही नको .हे उधार राहील तुमच्यावर. भविष्यात काही अडलं तर मागेन मी!"
" अक्का! हा बापू-अप्पा वचन देतो आम्ही तुला,केव्हा ही काही माग, ते द्यायला आम्ही बांधील राहू! आमचे प्राण ही तुझ्या वचनात राहतील." अप्पानं भरल्या दिलानं देव्हारातल्या पिंडीवर बिल्वपत्र वाहत वचन दिलं"
सखू अक्का परत गेली.काकू मरेपर्यंत बोरवणलाच राहिली. अप्पा बापू दरवर्षी गाडी भरून भरून वाणवळा पोहचवत राहिले. अक्का गेली ती बोरवणला परत आलीच नाही. काकी गेली तेव्हा आली व लगेच परतली.
बापू अप्पा दरवर्षी सर्व काही पोहोचवून ही अक्का अजुन काही मागत नाही व आपण तर वचनात अडकलोय ही सल उरात घेऊनच जगत आहेत.
.
अप्पांनी सुस्कारा सोडला.कल्याण ऐकून स्तब्ध झाला. गावगाड्यातली ही माणसं देवानं कोणत्या मूशीत घडवली असावीत? माईही अशीच. कल्याण विचार करू लागला.
" कल्याण बाबा! त्याच अक्काचा मुलगा सुरेंद्र - आजोबा, वडिल प्रमाणंच सैन्यात मोठ्या हुद्द्यावर आहे पण कधी व्यसन न करणारा तो दोन वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेलाय. त्याचीच समजून काढण्यासाठी बापूंना दिवाळीच्या आधीच जावं लागलं.
रात्री दिनाचा मित्र जेवण्यासाठी बोलवायला आला. आधी अप्पांना पाठवत कल्याणनं दवाखान्यातच डबा आणावयास लावला.
अप्पा व दिना गेले.दवाखान्यातल्या
रूमवर कल्याण व कल्याणी दोघेच.
आता कल्याणीस बऱ्यापैंकी आराम वाटत होता.
" डाॅक्टर साहेब एक विचारू?"
" बोला मॅडम?"
" त्या रात्री माडीवर आलात, मी नको ते बोलली.तरी आज धावपळ करून ....?" तिच्याकडंनं पुढचं विचारलंच गेलं नाही.
" मॅडम , अपरात्री कुणी नवखा पुरुष उंबरा ओलांडतोय पाहून ती तुमची स्त्रीसुलभ प्रतिक्रिया होती.तशी पेशंटची स्थिती पाहता एक डाॅक्टर म्हणून आजची धावपळ माझं कर्तव्य होतं!" कल्याण शांतपणे बोलला.
" म्हणजे आजच्या धावपळीत दुसरा काहीच हेतू नव्हता?"
" दुसरा काय हेतू असणार?"
"........"
"का? काय वाटलं तुम्हास?"कल्याणकडुन अचानक विचारलंच गेलं.
" कल्याण......."
आता मात्र कल्याणच्या छातीत धडधड थडथड वाढत ठोके वाढू लागले.
" एका शब्दानं थांबायला सांगताच का थांबला मग?"
" अप्पा आले वाटते!" कल्याण विषय बदलत उठला.
दिनानं आणलेला डब्यात जेवण उरकलं.
रात्री झोपतांना कल्याणला सोडून जाणारी अस्पष्ट आकृती, नंतर स्टेजवर आपल्या बापाशी कलगी तुरा रंगवणारी आई, आपल्याला खांद्यावर घेऊन जीव तुटेपर्यंत पर्यंत ढोलकी बडवणारा बाप दिसला. ही सारी सोडून जातांनाचे प्रसंग आठवले. नंतर मात्र त्याला मायेनं जवळ घेणारी माई दिसली.हल्ली आपल्या माणसाच्या यादीत झब्बू ही दिसत असे. काळजी घेणारा इतरांना नोकर पण कल्याणला तो मित्र, मोठा भाऊ वाटे. एका बाजूला सदाबाबा,आई जे सोडून गेले.दुसऱ्या बाजूस माई व झब्बू. आणि मध्यरेषेवर ही उभी कोण? कल्याणी मॅडम? कल्याणी?
कल्याण उठला त्यानं कल्याणीच्या अंगास हात लावत ताप पाहिला. हात हातात घेत नाडी पाहिली. तोच कल्याणीनं त्याचा हात हातात घेतला. धडधड वाढू लागताच त्यानं तिच्या अंगावर चादर टाकत निवांत झोपायला लावलं. व तो ही अप्पा जवळ झोपला. पण कल्याणी पाठमोरा झोपलेल्या कल्याणला पाहत रात जागवू लागली.
.
. सकाळी सारे बोरवणात परतली. पान लागल्याचं कळताच बापू व राधाताई काल रात्रीच लगोलग निघाले होते. आल्या आल्या पोरीस सुखरूप पाहून ते गहिवरले.
रात्री अप्पानं सुरेंद्र बाबत विचारलं.
" अप्पा, ही हल्लीची पोरं उडत्याच्या पाठीमागं लागून आयुष्यच डावावर लावतात. त्यानं तीस पस्तीस पोरी पाहिल्याय पण एकही पटत नाही. व दारू ही सोडत नाही. अक्का रडत होती. आपण काय समजवणार. त्याला विचारलं तर ' मामा मनासारखी मिळाली की त्याच दिवशी दारू कायमची बाद! हवंतर तसं वचन देतो मी!'
पण अक्का म्हणत होती ; त्याच्या मित्राकडनं समजलंय की पुण्यात यशदा ला त्यानं एक मुलगी पाहिली होती. तिच्यामुळं इतर मुली नाहीच म्हणतोय तो!
आता तिला नेमकं कसं शोधायचं.
पडून पडून कल्याणी हे ऐकत होती. तिनं सुरेद्रला पाहिलंच नव्हतं. तो कधीच बोरवणला आला नव्हता व ती ही सातारला गेली नव्हती. पण यावरून तिला यशदाला ट्रेनिंग ला गेल्याचा किस्सा आठवला.
तिथंही अशाच एक मिलीट्रीतल्या अधिकाऱ्यानं त्यांच्या गटास गाडीतून यशदाला सोडलं होतं. तो सारखा आरशातून तिच्याकडं पाहत होता. उतरतांना. तिनं उतरतांना त्याबाबत त्याला झापत सुनावलंच. पण नेमकं आपला गट उशीरानं पोहोचला म्हणून प्रशिक्षणाला न घेता आपल्या गटास त्यांनी परत पाठवलं होतं.
माई भेटण्यासाठी बोरवणला आल्या. कल्याणची प्रक्टीस पाहून त्यांना समाधान वाटलं. कल्याणला वेळोवेळी जेवण बनवून देणारा, कपडे धुणारा झब्बू माईला भावला. झब्बूलाही माईत आपली आईचच रूप दिसलं. माडीवरचं माईस आमंत्रण आलं. सारे सोबत जेवायला बसले. जेवणं आटोपल्यावर बापूंनी मनातली गणपती विसर्जनापासुनची रूखरूख विचारायचं ठरवलं.
" माई, आमचे डाॅक्टर म्हणजे आमच्या गावास देव माणूस लाभले!"
" बापू ! माझा कल्याण बाबा गुणाचा आहे पण त्याला तुमच्या सारख्या प्रेमळ माणसाची साथ लाभली हे ही महत्वाचं!"
"माई, त्यांच्या हाताला गुण आहे म्हणून लोक बोलवतात मानतात.आमचं काय त्यात!"
बापूंना नेमकं विचारायचं कसं सुचेना.
पण माईंनीच बोलता बोलता उलगडा केला.
" बापू ,चार पाच वर्षाचं निमावतं पोरकं पाखरू होतं माझा कल्याण बाबा!"
" म्हणजे कल्याण बाबा तुमचा मुलगा नाही?" बापूंनी विषयाला हात घातला.
" बापू मुलगा नसला तरी मुलापेक्षाही..." त्यांच्या डोळ्यात आसवे तरळली.
त्या भूतकाळात शिरू लागल्या.वर्षाच्या उतरंडीतील सर्वात खालच्या थरापर्यंत त्या पोहोचल्या.
.
.
क्रमशः

✒ वा...पा...
No comments:
Post a Comment