जळगावहून परत येताच सजन बापुंनी परिवारासहीत पंढरपूर यात्रेची तयारी केली. किसन अप्पा, द्वारकाबाई, उमेश, रमेश,कल्याणी साऱ्यांचच जायचं पक्कं झालं. फक्त राधाबाई या अंजा आजीचं वय झाल्यानं त्यांना शक्य नव्हतं म्हणून त्यांच्या देखरेखीसाठी थांबणार होत्या. पण ऐन वेळेस कल्याणीच्या शाळेतील इतर जेष्ठ सहकारी ही वारीला गेल्यानं रजा मंजुर झालीच नाही मग नाईलाजानं कल्याणीला थांबावं लागल्याने राधाबाईंनी तयारी केली व त्याही गेल्या.घरी फक्त कल्याणी व अंजा आजीच थांबल्या.
गोकुळ चौधरीनं या संधीचं सोनं करायचं ठरवलं. आषाढ दशमीच्या रात्रीच बार उडवायचा व एकादशीची बोरवण ग्रामपंचायतीत जत्रा भरवायचीच.
दशमीला कल्याणी सहा सातच्या आसपास घरी आली. स्वयंपाक करत आजीला जेऊ घातलं. आभाळा घुरमट घालत खळ्या गाळत होतं तर कधी जोर पकडत थंड वाऱ्यासोबत धारा बरसत होतं.
कल्याणला शेजारच्या गावाहून यायला साडे नऊ वाजले. घरी येताच झब्बूनं गावातून आलेले फोन सांगितले. कल्याण पडत्या पावसात गावात फिरू लागला. तोच झब्बूचा त्यास मोबाईल वर काॅल आला की माडीवर बोलवलंय लवकर जाऊन या.
माडीवरचे सारे तर वारीला गेलेत.मग कोण आजारी? कदाचित अंजा आजी आजारी असावी असा विचार करत अकराच्या सुमारास तो मोठ्या आळीतून चौकात आला. दौलत चौधरीच्या ओट्यावर त्याला सामसूम दिसली.एरवी बारा वाजेपर्यंतही चार दोन टाळकी चकाट्या पिटत बसलेली त्याला आढळायचीच. त्यानं माडीसमोर बाईक उभी करत बॅग काढली व कमानीच्या फाटकाजवळ आला. मधुन कमानीचं फाटक बंद करण्यासाठी कल्याणी येतच होती. कल्याणला वाटलं बॅग घेण्यास येत असेल.त्यानं" राहू द्या" म्हणत मध्ये प्रवेश केला.
कल्याणी अवाक होत पाहतच राहिली.त्यानं अंगातून रेनकोट काढला व सरळ देवळीतून मध्ये निघाला. अंजा घाबरून बाहेर फाटकाजवळच उभी राहिली.
कल्याण अंजा आजीच्या खोलीत जात " बोला आजी! काय म्हणते तब्येत? "म्हणत नाडी ठोके, रक्तदाब पाहू लागला .वय फॅक्टर सोडला तर त्याला बाकी काहीच गडबड दिसेना. अंजा आजीनं नव्वदी पार केली होती तरी जुन्या काळातलं गावठी खाणं, घरचं दूधदुभतं व जात्यावर दळणं, ताक घुसळणं, नदीवरून पाणी भरणं असली अंगतोड मेहनत यानं काहीच त्रास नव्हता. अजुनही दाताची कवळी व नजर तशीच होती. आजीला वाटलं कल्याणीनं बोलवलं असावं म्हणून ती गपचिप पडून राहिली. कल्याणला आजीची तब्येत ठणठणीत आहे मग आजारी कोण? कल्याणी तर बाहेर ठणठणीत उभी. तरी त्यानं आजीला शक्तीचं इंजेक्शन दिलं व तो बाहेर आला.
कल्याणी अजुन ही बाहेरच उभी होती.
" आजीला दिलंय इंजेक्शन, काही विशेष काळजी नाही,येतो मी"
" डाॅक्टर थांबा! घरचे कुणीच घरी नाही माहीत होतं ना तुम्हाला ?घड्याळ पहा किती वाजले? काय गरज होती यायची? आलेत तर आलेत कारणं तरी नीट सांगावीत.वरुन 'दिलंय इंजेक्शन,काळजी करण्याची गरज नाही !' हे सांगतांना थोडीही लाज वाटत नाही! अहो डाॅक्टर आहात तुम्ही! मला भेटायचच होतं तर निदान सरळ सांगितलं असतं तर एकवेळ माफ करत हाकलंलं ही असतं.पण त्या साठी त्या ठणठणीत आजीला तपासण्याचा फार्स का! गरज नसतांना इंजेक्शन काय! थोडी ही लाज वाटत नाही?" कल्याणी फाटकाजवळच उभी राहत संतापानं लाल होत विजेसारखी कल्याण वर कोसळत होती. तिला अपरात्री कल्याणचं माडीवर येणं जिव्हारी लागलं होतं.त्यातल्या त्यात आजीचं तपासण्याचं नाटक तर बालीशपणा वाटत कल्याणची किव वाटत होती.
कल्याण जागेवरच थिजला. त्याला कल्याणीचं बोलणं जणू ज्वालामुखीचा लाव्हारस आपल्या अंगावर ओतला जातोय असंच वाटू लागलं. तरी तपासतांना आपल्याला आजीत गडबड वाटलीच नाही पण आपण म्हातारं माणुस म्हणून शक्तीचं इंजेक्शन दिलं.कारण फोन आला म्हणून. मग झब्बूला कुणी फोन केला मग? का झब्बूच्या ऐकण्यात गफलत झाली?दुसरं कुणी बोलवलं असावं व झब्बूनं घोळ करत आपणास माडीवर पाठवलं.
" एवढा इशारा काफी नाही का? का पायातली काढू? सटका इथनं नी यापुढे याद राखा बातम्या काढत पाठलाग करत गाडीवर बसवणं काय, बोलावलं नसतांना ही तपासण्या निमीत्त अपरात्री येणं काय असले फालतू नाटकं पुरे आता!"
कल्याण च्या डोळ्यात आसवं आली. त्याचा पाय ही उठेना. त्यानं मणाच्या बेड्या पेलत कमान पार केली व बाहेर येत गाडीला किक मारली. बाहेर अंधारात खुसफुस ऐकू आली पण त्याकडं त्याचं लक्षच नव्हतं.
" झब्बू माडीवर जायला लावलंस ना तू?"
" होय ,फोन होता!"
" कुणाचा होता?" कल्याण रागानं लालं होत असुनही धीरगंभीरपणे विचारता झाला.
" डाॅक्टर साहेब माझे हात पिठाचे भरले असल्यानं मी घाई गर्दीत व्यवस्थीत ऐकला नाही पण अनोळखी वाटत असला तरी थांबा मी आठवून सांगतो मी.पण का ? काय झालं?"
" यापुढे काही ही झालं तरी व्यवस्थीत ऐकत जा,पूर्ण ऐकत जा.नी विचारत जा कोण बोलतंय! खात्री करत जा" कल्याण बोलला नी काॅटवर आडवा झाला.
झब्बूनं जेवणाला उठवलं पण मला भूक नाही तू जेवून घे सांगत कल्याण जेवलाच नाही.म्हणून झब्बूही जेवला नाही.
कल्याण अंथरूणात आक्रंदू लागला.
" डाॅक्टर साहेब झालं काय,ते तर सांगा?" कल्याणचं काही तरी बिघडलं हे ओळखून झब्बूनं विचारलं.
" झब्बू काय झालं त्यापेक्षा पुढे असलं काही होणार नाही याची काळजी घेतलेली बरी!"
झब्बुला काहीच उमगलं नाही.पण माडीवर काही तरी झालं हे ओळखत तो फोन वरचा आवाज कुणाचा हे आठवू लागला पण ताण देऊन ही त्याला तो लॅण्डलाईनचा नवखा आवाज ओळखता येईना .
" झब्बू, लंपट माणूस कसा ओळखावा रे!" झोप येत नाही म्हणून कल्याण झब्बूला विचारू लागला.
" डाॅक्टर साहेब, तुमच्या सारखा निसंख पाण्यासारखा माणसाला जर कुणी लंपट गणत असेल तर या पृथ्वीवर कुणीच चारित्र्यवान नाही" झब्बूनं डाॅक्टराला कुणीतरी दुखावलं हे ओळखून उत्तर न देता थेट सात्वन केलं.
" झब्बू झोप बाबा, तुझ्यासारख्या तल्लख माणसास गबाळा म्हणणारी ही दुनिया ही गबाळीच आहे."
आपणास त्या दिवशी कल्याणी पायी जातेय याबाबत काहीच माहित नव्हतं आपण तर शिरपूरवरून सरळ येत होतो. अचानक दिसली नी आपल्या भोळ्या मनास वाटलं पाऊस, अंधार होतोय म्हणून बसण्याची विनंती केली तर त्याचं हे फळ? आजही झब्बूनं फोन म्हटल्यावर इतर पेशंटकडं जातो त्याच भावनेनं गेलो तर हा आळ? की आपण एवढ्या रात्री खरच जायला नको होतो. खरच आपण लंपट आहोत का? कल्याणी मॅडमला पाहताच धडधड वाढते, भितीनं गाळण उडते.म्हणजे त्या म्हणताहेत ते खरंच असावं का? जर आपण लंपट असू तर हा गुण आपल्या रक्तात कोणाकडून? आई?
?
?
त्याच्या पुढे मोठे प्रश्नचिन्ह नाचू लागले व नाचत नाचत त्याच्या मानेभोवती फास आवळू लागलं.

त्याला जीव तोडून ढोलकी वाजवणारा आपला बाप दिसू लागला व तो जोरजोरात रडू लागला.
झब्बूनं उठवत त्याला पाणी दिलं व शांतपणे झोपावयास लावलं.
कल्याणला मग आपली तेजोमय मांगल्याची मूर्ती माई आठवली व त्याच्या काळजात एक वेगळंच तेज चमकत त्याच्या मूठी आवळल्या गेल्या. मग त्यानं निश्चय केला.आजपासून माडीवर सहसा पाय ठेवायचा नाही. कुणी स्वत: बोलवायला आलं तरच. नी कल्याणी मॅडमला टाळायचंच. एरवी असं ही आपण जात नव्हतोच पण आता समोर आल्यावर ही वाट वाकडी करायची.
सजन बापू परतले. नातेवाईक, गावातले भेटायला येऊ लागले. आठ दहा दिवस झाले तरी कल्याण गेलाच नाही.
एके दिवशी झब्बू फिरता फिरता गेला. बापू , अप्पाच्या पाया पडला.
" अप्पा काही म्हण शेणा मातीत खेळणाऱ्या आपल्या झब्बूस कल्याण डाॅक्टरांनी एकदम जंटलमन बनवून टाकलं!" झब्बूकडं पाहत बापू हसत म्हणाले.
" बापू डाक्टर साहेब देवमाणूस.ज्याला जवळ करतील त्याला माणसात आणतील!"
" अरे पण आठ दिवस होऊन गेले तरी भेटले नाही,डाॅक्टर? कुठाय ते?"
" झडीचे पेशंट वाढलेत.येणार आहेत भेटायला!" झब्बूनं परस्पर बाजू सावरली. तोच पाहुणे आले नी झब्बू उठला व घरात गेला.कल्याणी बंगळीवर बसली होती.
" काय ताई! बरंय ना?"झब्बू आजुबाजुला पाहत विचारू लागला.
" झब्बू दा, बरंच !"
" ताई एक विचारायचं होतं?"
" काय रे विचार ना!"
" दशमीला मीच पाठवलं होतं डाॅक्टरला.मलाच कुणीतरी फोन करून माडीवर पाठवायला लावलं होतं! पण कोणी फोन केला ते नाही समजत! कुणी पाहुणा वैगेरे आला होता का?"
" अरे कशाला?मी तर केला नव्हता,व कुणी आलंही नव्हतं त्या दिवशी. पण नक्की तुला फोन होता का? कोणी केला असेल?"
" तेच म्हणतोय मी?" सांगत झब्बू निघून गेला.
कल्याणी एकदम चमकली. म्हणजे डाॅक्टरांनी येण्याचं नाटक नव्हतं केलं? का झब्बूलाच पटवत सफाई म्हणून पाठवलं असावं? ती विचारात पडली.
झब्बूनं बापू विचारत असल्याचं सांगताच बापूला तर भेटलंच पाहिजे. पण माडीवर? नकोच. मग कल्याणनं दुपारून बापू व अप्पांना मळ्यातच गाठलं. दोघांचा पाया पडला.
" डाॅक्टर साहेब मळ्यात भेटणं बरोबर नाही.माडीवर यायचं ना!" बापु डाक्टराला छातीला लावत हसत म्हणाले.
" बापू ,अप्पा आपण माझे पांडुरंग आहात.आणि पांडुरगाला भक्तानं भेटायला पंढरपुरातच जायला हवं असं काही नाही!" कल्याण बाजू सावरत म्हणाला.
बापू भावूक झाले.
" पोरा आम्ही कसले पांडुरंग! गरीबांची सेवा करणाऱ्या तुझ्या रुपातच आम्ही विठ्ठल पाहतो!"
बऱ्याच गप्पा मारल्यावर डाॅक्टरांनी रजा घेतली.
पोळ्याला माडीवरचं आमंत्रण आलं . कल्याणला प्रश्न पडला. नकार कसा द्यायचा. त्या दिवशी जेवणाची वेळ होताच तो बाजूच्या गावात जाऊन थांबला. झब्बूला एमरजंसी असल्यानं मला जेवायला यायला उशीर होईल असं कळवलं.
झब्बू माडीवर गेला बापूंना निरोप दिला.
" बरं बाबा! पेशंट ही महत्वाचेच म्हणून डबा पाठवतो.आल्यावर जेवा दोघे!" सांगत बापूंनी घरात कळवलं.
आठला कल्याणीनं डबा तयार केला व झब्बूची वाट पाहू लागली. तिला बापूंनी रूमवर द्यायला लावला होता पण ती गेलीच नाही.बापूंनी डबा दिला का असं पुन्हा विचारल्यावर ती डबा घेऊन निघाली.
पोळा असल्यानं गोकुळ, अर्जुन फुल टल्ली झाले होते. जाधव डाॅक्टर त्यांच्याकडेच जेवायला होते. अंगणातून कल्याणीला जातांना पाहताच जाधव डाॅक्टरांनी विषय काढला. गोकुळचं तिच्यावर लक्षच नव्हतं. तोच पुढे जाताच झब्बू येतांना दिसला. तिनं डबा दिला व माघारी फिरली. गोकुळ नशेत जाधव डाॅक्टराकडं बरळत होता. आपला उल्लेख ऐकताच तिनं चाल मंदावली व आडोशाला थांबली.
" डाॅक्टर साहेब! दशमीला फुल फिल्डींग लावली होती.एकादशीची जत्रा ग्रामपंचायतीत भरलीच असती.पण...
पण...
शेजारच्या गावच्या पोराला रूमाल तोंडाला बांधून फोन करायला लावला. झब्यानं उचलला व त्या कल्याणला माडीवर पाठवलं. आम्ही आठ दहा ठोले बाहेर अंधारात बसलो. ते येडं सेवाभावी कल्याण अकराला आलं बॅग घेऊन. आम्हाला वाटलं ते कल्याणीला आजारी समजेल.पण ते त्या थेरडीलाच उपचार करू लागलं.त्यात घोळ ती कल्याणी फाटकाजवळच उभी राहिली.मध्ये गेली की सर्वांनी घरात घुसत कल्याणची गचांडी पकडत धुवायचा व ग्रामपंचायतीत आणायचा व त्या सजन चौधरीच्या पोरीच्या इज्जतीचा फालुदा करायचा प्लॅन.पण सारं फिसकटलं.ते बेणं कल्याणनंही काहीच गडबड केली नाही.थोडी जरी गडबड केली असती तर आम्ही तयारच होतो. पण काही म्हणा तो पक्का सुध्धर आहे!"
गोकुळ बरळत होता व नेमकी अंधारात थबकलेली कल्याणीनं हे ऐकलं. ती घरी आली.
आपण नाहक त्या डाॅक्टरावर संताप केला याची तिला जाणीव झाली. म्हणजे झब्बू सांगत होता ते ही खरंच. या गोकुळनं फोन केला म्हणून डाॅक्टर आले होते. आपण किती किती पाणउतारा केला! जर दुसरं कोणी राहिलं असतं तर उलट बोलानं घायाळ केलं असतं पण सारं ऐकून ही डाॅक्टर एक शब्द ही बोलले नाहीत. त्या दिवशी ही गाडी पंक्चर झाली म्हणून आपणास उशीर झाला. म्हणजे त्यात ही योगायोग होता नी भेट झाली. आपण उमेश येतोय म्हटल्यावर ते चालते ही झाले.पण काळजीनं पुन्हा फोन करून उमेशनं सांगितलं म्हणून गाडीवर बसवलं. गोकुळची जिरवण्यासाठी आपण त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तर लगेच खांदा हलवत पुढे थेट टाकीवर सरकले पण साधा स्पर्श ही नाही.नी आपण किती खालच्या थराला जात बोललो. तिला तिचीच लाज वाटू लागली. ती रात्रभर झोपलीच नाही.
गणेश चतुर्थी येऊ लागली तशी बोरवण गावातली सारी मंडळी कामाला लागली. अर्जुन, गोकुळ ढोल बांधू लागली.लहान चौधरी वाड्यातही तयारी होत होती पण त्याला कढ, सल बोच याची किनार होती.
बोरवण गावाच्या गणेश उत्सवाला तीसेक वर्षाची परंपरा होती. गणपती सातव्या दिवशी उठे. त्यासाठी आजुबाजुच्या तीन गावातली माणसं येत. साऱ्यांना सजन बापूकडून भंडारा असे. गर्दीचं कारण म्हणजे इथल्या ढोल व लेझीम पथकाची चुरस व स्पर्धा. मोठ्या चौधरीवाड्याचं नेत्तृत्व दौलतराव तर लहान वाड्याचं नेत्तृत्व किसन अप्पा करत. दोन्ही उत्तम ढोल वाजवत. गणपती विसर्जनाला जी पार्टी विजयी होई त्या वाड्यालाच पुढच्या वर्षीचा पहिल्या व शेवटच्या दिवशी आरतीचा मान मिळे. खर्च मात्र हरणाऱ्या पार्टीला करावा लागे. किसनरावानं दौलतरावास सहसा जिंकूच दिलं नव्हतं. किसन अप्पा एरवी वर्षभर कधीच कुणाशी बोलत नसत .आपलं शेतातलं काम भलं नी आपण भलं. सजन बापूची री ओलांढायची नाही. पण गणपती विसर्जनाला त्यांच्या अंगात येई जणू. ढोल बांधलेला किसन अप्पा वेगळाच भासे.पण मुलं मोठी झाली नी दौलतरावानं गोकुळ, अर्जुन ला तर किसन अप्पांनी उमेश रमेशला तयार केलं.पण गोकुळ अर्जुन ढोल वादनाच्या कलेत बापापेक्षाही उजवे निघाले. तर उमेश रमेश बापाची कला घेऊन ही तोकडेच राहिले. मागच्या दहा वर्षात उमेश रमेश चा निभाव लागेना म्हणून जळगाव, पुण्याहून ही ढोलपथकं मागवलीत पण गोकुळ अर्जुन नं धूळ चारत प्रत्येक आगामी गणपतीच्या आरतीचा आपल्या वाड्याचा मान अबाधितच ठेवला.
" बापू या वर्षी मीच पुन्हा ढोल बांधतो!" चिंतेत बसलेल्या बापूस अप्पा म्हणाले.
" अप्पा तू ढोल बांधशील पण कितीक वर्ष ? कधीना कधी नवा माणूस शोधलाच पाहिजे!"
" बापू नवीन ढोल वाजवणारा येईल तेव्हा येईल पण या वर्षी तरी मीच बांधतो!"
गोकुळ अर्जुन नवीन दमाची पोरं!उगाच या वयात नामुष्की नको म्हणून बापू अप्पास ढोल बांधू देत नव्हते.पण अप्पास सांगायचं कसं?"
" बघू विसर्जनाला!" सांगत बापूंनी तो विषय टाळला.
गणपती बसले. पहिली पूजा दौलतरावांनीच केली.खर्च आपण करायचा, भंडारा आपण द्यायचा.ते ही काही नाही देवानं भरपूर दिलंय आपणास.पण मानाची पूजा ? बापूंना आत कळ जाणवली. सात दिवस झाले.या वर्षी उमेश रमेश नेच वाजवायचे व पुढच्या वर्षी याबाबत काही तरी करायचंच ठरवत बापू भंडाऱ्याच्या तयारीस लागले.
गणपती विसर्जनाला बोरवण मधली आबालवृद्ध सारी सकाळपासूनच हजर होती.बाजुच्या गावाची मंडळी नऊ वाजता जमू लागली. चौकात दौलतरावांनी मानाची पूजा केली.
अर्जुननं ढोल घेतला नी घाई लावताच सारी एकच गिल्ला करत " गणपती बाप्पा मोरया...." राळ उठवली.
सारा चौक बाया माणसांनी फुल्ल.नाचायचं रिंगण सोडलं तर बाकी कडं नुसती दाटीवाटी. डाॅक्टर आज विसर्जन असल्यानं पेशंट नव्हतंच जणू, म्हणून घरीच थांबलेले.
ढोलाचे आवाज कानावर घुमले नी कल्याणनं कान टवकारले. त्याच्या ह्रदयात धडधड वाढली. यात्रेत जीव तोडून ढोलकी वाजवणारा आपला सदा बाप त्याच्या डोळ्यापुढं तरळला. त्यानं कानावर हात ठेवला. लहानपणी आश्रमशाळेतल्या पेट्या वाजवणारा कल्याण.... बाप आठवला की त्याला जे सापडेल ते तो वाजवी.शाळेत मुलांची पेटी, पुढे तबला , ढोलकी, ढोल, ताशा काहीच बडवायचं सोडलं नाही.कानावर आवाज आला की बाप....नी मग जीव तोडून बडवणं.कल्याण इच्छा नसुनही आपसूकच चौकात आला. अर्जुनपुढं उमेशचं तोकडं वाजवणं कल्याणनं लगेच ओळखलं.त्यानं हलगी बडवणाऱ्या रंगाकडनं हलगी घेतली.नी अर्जुन पुढं येत हलगी वाजवू लागला. सारी जमलेली डाॅक्टर हलगी वाजवतोय म्हटल्यावर जोशात येत नाचू लागली. भंडाऱ्याजवळ थांबलेले व चौकात जायची इच्छा नसलेल्या किसन अप्पाच्या कानावर अर्ज्याच्या ढोलात ही नविन अदाकारी कोणाची? रंगा? छे! किसन अप्पा झपाटल्यागत चौकात आले. हलगी वाजवणाऱ्या डाॅक्टराला पाहताच पाच मिनिटे तल्लीन होत ते हलगी ऐकू लागले.
" उम्या ढोल सोड नी डाॅक्टरांकडे दे!" अप्पा गरजले.
डाक्टरांना त्यांनी स्वत: ढोल बांधला.
" कल्याण बाबा हा ढोल सायंकाळी न फुटता तापी पात्रातच उतरायला हवा!" अप्पा बेफान होत गरजले.
' कल्याण बाबा!'......
' कल्याण बाबा!'
अगदी सदा बाबा ही कोवळ्या कल्याणला अशीच साद घालायचे. एरवी अप्पा नेहमी डाॅक्टरसाहेबच म्हणायचे.बापूच काय ते एकट्यात 'पोरा' म्हणून प्रेमळ साद घालायचे.
थेट बाबा ऐकताच कल्याणनं हातानं किसन अप्पाच्या चरणास स्पर्शं केला.
" डाॅक्टर, काही तरी घोटा आधी.नशेशिवाय माणूस टिकत नाही आमच्या समोर! तुम्हास तर दिवसभर वाजवायचंय!" अर्जुन डिवचत म्हणाला.
तोच समोरून कल्याणी पुजेचं ताट घेऊन जवळ आली.
" अर्जुन राव आमच्या रक्तातच वाजवायची, बडवायची नशा मुरलीय! या प्रेमाची वा क्षुल्लक पदार्थांची नशेची गरज तुम्हास लागते.आम्हास दु:खाचीच नशा पुरेशी.वाजवा तुम्ही. पाहू यात कोण टिकतं नी कुणाचं फुटतं!"
कल्याणनं ढोल वाजवायला सुरुवात केली नी अर्धा तास बेभान होत वाजवत राहिला .त्याच्या नादात आला तो बेभान नाचू लागला. अप्पा तर दहा वर्षात नाचले नव्हते ते आज नाचले. अर्जुन्याची दुधातल्या घोट्याची नशा घामात जिरू लागली. तो कमजोर होतोय दिसताच त्याच्या वाड्यातली माणसं त्याला दुधाचा ग्लास वर ग्लास देऊ लागली. पण कल्याणच्या ढोलात मोठ्या वाड्याचा ढोल दहा वर्षानंतर फिका वाटत होता.
कल्याणी आपल्या अप्पा काकांना व वाड्यातल्या माणसांना कल्याणच्या ढोलावर खुशीनं झुमतांना आनंदानं बेभान होत कल्याण समोर दिसेल अशी उभी राहिली.
कल्याण बाबास आज आपला सदा बाप व समोर स्टेज वर ढोलकीच वाजवणारी अस्पष्ट आकृती दिसत होती व तो आणखी चेवानं वाजवत होता. आजच्या दिवशी कोणीच कुणाची मुर्वत न ठेवता बोरवणात नाचायचं .त्याला अधिकच उधाण आलं.
एक वाजे पर्यंत अर्जुन घोटा पिऊन पिऊन डोळे फिरवू लागला. पण दौलतरावास माहित होतं आपलं बारकं डाॅक्टराच्या ढोलात ऐनवेळी टिपरू घालत फोडेलच. नाहीच बारकं तर आपला ठाण्या वाघ गोकुळ अजुन उतरायचा बाकीय! पण अर्जुननं केव्हाच ओळखलं की हे चरणमाळ घाटातलं पाणी वेगळं दिसतंय. त्यानं आपल्या माणसाकरवी गोकुळला लवकर बोलवायला लावलं.
नाचणारी गर्दी कोणाच्या ढोलावर जास्त यावर स्पर्धा जिंकली जायची. इथं अर्जुनची गर्दी कल्याणनं खेचली पण सायंकाळ पर्यंत ढोल फुटू न देणं हे ही महत्वाचं होतं.कारण गर्दी खेचून ही ज्याचा ढोल फुटला तो हारला.
एकच्या सुमारास डोळ्यात लाली उतरलेला आडदांड गोकुळ चौकातून काहीच अंतर पुढे आलेल्या मिरवणुकीत आला.त्यानं ढोल बांधला.तसं मोठ्या वाड्यातल्या लोकात जोश आला व सारे " गणपती बाप्पा मोरया! " जोशात ओरडली.
गोकुळनं टिपरू ढोलावर घुमवलं नी पुन्हा मोठ्या वाड्याच्या पार्टीत जोश संचारत गर्दी फिरली. अप्पाच्या पथकाने जेवनाचा ब्रेक घेतला पण कल्याणनं उभ्या उभ्या चौकातच भंडाऱ्याचा प्रसाद घेतला. पाणी घेऊन धावतच कल्याणी आली.पण नेमकं त्यावेळी अप्पा गोकुळच्या वादनाबाबत त्याच्या कानात काहीतरी सांगत होते. कल्याणनं पाण्यासाठी हात पुढं केला तर ग्लासच तोंडाला लागलेला होता तो धुंदीत तसाच घटाघटा पाणी पिऊ लागला.ग्लास संपताच त्याचं लक्ष स्वत: पाणी पाजणाऱ्या कल्याणीकडं गेलं नी त्याची तीच थरथर धडधड वाढली. नी मग थरथरत्या देहानं ढोलकी बडवणारा सदा बाप आठवला.किक बसली नी कल्याण बाबा गोकुळ पुढं आला. गोकुळ त्याला पाहून ग्लासातल्या दुधाची गुळणी हवेत उडवत हसला.
दोन नंतर गोकुळ व कल्याण बाबामध्ये जुगलबंधी सुरू झाली. गोकुळ च्या वादनात कमालीचा आक्रमकपणा होताच पण नजाकत ही तशीच. जोशात समोरच्याला वर चढवायचं नी वर चढलेला जोर हळूवार कसा खाली आणायचा याचं कसब त्याच्याकडूनच शिकावं. उमेश रमेश नेमके इथेच कमी पडत. जोशात वर वर चढत जात व खर्दी खेचूनही गोकुळच्या बहकाव्यात ढोल फोडून हारत.
चार वाजले तशी गर्दी कल्याणबाबापुढंच वाढू लागली. गोकुळही आता घामानं निथळू लागला. तो संतापत कल्याणला डोळ्यानं चिथावणी देऊ लागला. पण कल्याण बाबाची नजर स्थीर धूंद वर्षानुवर्ष स्टेजवर ढोलकी बडवत नाचणाऱ्या अस्पष्ट आकृतीकडं स्थिरावल्यागत.पण ढोल वादनात एक धुंद करणारी कसक. दहा वर्षांपासून अप्पाच्या घरची मंडळी सहसा थांबत नसत फक्त उमेश रमेश व अप्पा. बापू तर कधीच थांबत नसत. आरती झाली की घरी भंडाऱ्यात लोकांना प्रसाद देत. पण यावर्षी अप्पांना चेव आला म्हटल्यावर राधाबाई, द्वारकाबाई साऱ्या जणी अंगणात येत उभ्या होत्या. कल्याणी तर चौकातच होती.
मिरवणूक दौलतरावाच्या अंगणात आली. चार पाच वाजेपर्यंत लहान वाड्यावर हारणार ही सुतकी कळा पसरलेली असायची पण यावर्षी उलटं चित्र दिसत होतं. अनुभवी दौलत रावांनी गोकुळला जोश भरण्यासाठी अंगणात आरोळी ठोकत नाचावयास सुरूवात केली नी सारी केकाटली. कल्याणनं ओळखलं. त्यानं वाजवता वाजवताच शर्टाची बटण तोडत शर्ट काढला व बनियनवर दौलतरावापुढं जात ढोल बडवायला लागला. त्याच्या वादनाच्या जादुत दौलतराव त्याच्या ढोल समोरच नाचू लागले. घाई हळूहळू करत दौलतरावाला खेळवत तो मागं मागं सरकू लागला. दौलतराव ही सरकला नी तोंड फिरवत कल्याण बाबानं जोरानं हसत ढोल दणकावला. गोकुळला आपला बाप फसला व त्यांच्या पथकात जात नाचतोय म्हटल्यावर त्यानं कल्याणला समोर घेतला. जुगलबंदी पुन्हा रंगली. गोकुळला केव्हा कोणता पेतरा अजमावयाचा ही पुरती जाण होती.त्यानं खूण केली. तोच त्याच्या घरातून नाचणाऱ्यांवर पाणी फेकलं जाऊ लागलं. धुंदी चढलेली नाचणारी पोरं ओलं होण्यासाठी गोकुळकडं वळली.गर्दी खेचली गेली.
एव्हाना बापूंच्या कानावर आपल्या पथकाचा किल्ला डाॅक्टर लढवतोय हे गेलंच होतं.पण त्यांना दहा वर्षांपासून माहित होतं की गर्दी तर उमेश रमेश पण खेचतात मात्र शेवटी ती पोरं ढोल फोडण्यास मजबूर करतात व जिंकतात. म्हणून ते मिरवणूकीकडं गेलेच नाही.
मिरवणूक माडीजवळ आली. गोकुळचा ढोल सांभाळत त्याला पुरतं भिजवलेलं. पण कल्याण तसाच कोरडा. माडीजवळ येताच गोकुळ संतापला व आपली ठेवणीतली वादनाची कौशल्ये वापरत तो कल्याणला माडीसमोरच फिकं करण्याचा प्रयत्न करू लागला.दौलतराव थकला होता तरी अप्पाला टक्कर देत नाचतच होता. बापू बाहेर आले. कल्याणचं जीव तोडून वाजणं ऐकलं. त्यांच्या कडा पाणावल्या. हारलो तरी चालेल पण या पोरांनं टक्कर तरी दिली. त्यांनी इशारा करत कल्याणीला बोलवलं व हंडा भरून आणायला लावला. कल्याणीनं पळतच जात हंडा भरून आणला तिला वाटलं बापू स्वत: टाकतील. पण बापूंनी तिलाच टाकायला लावला.कल्याणी गर्दीत शिरली व कल्याणच्या जवळ जात ढोल वाचवत कल्याणच्या अंगावर पाणी ओतलं.
कल्याण बेभान उधानला. पण गोकुळच्या अंगात पायापासून मस्तकापर्यंत सणक गेली. व त्यानं आपलं ढोल बडवण्याचं टिपरूच तोडलं. ढोल वाचवला त्यानं.
बापूं स्वत: पाच पावलं नाचला नी साऱ्या पंचक्रोशीनं कधीच न नाचणारा बापू पाहिला.
दौलत राव आता गोकुळवर खवळले.
" गोक्या कोल्ह्यास उगाच खेळवून हरण्यापेक्षा वेळीच फडशा फाड.नाहीतर बाजी पलटेल!" अनुभव बोलत होता. पण गोकुळ गर्दीत शिरत हंडा ओतणारी कल्याणीला पाहून चेकाळला व आता डाॅक्टराला पुरता लंबा करायचाच यावर ठाम होत ढोल बडवू लागला. साऱ्या गावात टॅक्टरनं गणपती फिरले व तापीच्या वाटेनं निघाले. ही वाट रुंद नसल्यानं मिरवणूक सरळ घाईत निघे. पुढे काठाच्या आसपास घसरणीचं मैदान होतं. इथेच उमेश रमेशचा घात होई.ग़ोकुळ त्याच तयारीत होता. तो पावेतो अर्जुनची धुंदीही थोडी उतरली. गोकुळच्या मदतीला तो ही आला दौलतरावांनी 'दोन्ही भावांनी मिळून याचा ढोल फोडा' सुनावलं.
नदीवाटेला मिरवणूक लागली की साऱ्या बाया गावातच थांबतच. साहजिकच कल्याणीही मागेच परतली.
किसन अप्पानं भंडाऱ्याच्या जवळ थांबलेल्या झब्बू झिप्परला माडीपासूनच सोबत घेतलं.
" झब्बू इभ्रतीचा प्रश्न आहे.जे सांगितलं तेवढं कर!"
" अप्पा, आपल्या वाड्या बरोबर माझ्या डाॅक्टराच्या इभ्रतीचाही सवाल आहे.निवांत रहा! या गोक्यानं फोनवर मला ही फसवलंय!"
मैदान आलं तसं गोकुळनं दोन तीन ग्लास घोटले. तोंडात चाॅकलेट टाकल्या नी गरजला
" चल डाॅक्टर, आता नाचायचं, कोण कोण नाचणार!"
कल्याणबाबास मात्र काही तरी हरवलंय हे खटकू लागलं. तो मागं मागं वळून पाहू लागला. त्याच्या ढोलातली नजाकत कमी होऊ लागली. पण गोकुळ अर्जुननं जोडी जमवत त्याचं अवसान चढवू लागले. जोर जोरात ढोल बडवू लागले.
"कल्याण बाबा अवसान नको, नजाकत आण!" अप्पा जवळ येत खुणावू लागले. पण गोकुळची हूल त्याचा ढोलाची घाई वाढवू पाहत होता. कल्याणलापला सदा बाप ढोल वाजवता वाजवता आपल्याला खांद्यावर उचली हे आठवू लागलं. त्यानं जवळच तरतरीत नाचणारं लहान पोर हेरलं व त्याला खांद्यावर घेतलं. डाॅक्टरानं उचलताच पोरास चेव चढला व ते वरच नाचू लागलं. वरचं ओझं कल्याणच्या टिपरेचा जोर कमी करू लागलं.
झब्बू मैदानात उतरला. त्यानं बोटानं जीभ दुमडत शिटीनं नदीकाठ घुमवला. मांड्यावर हात मारत तो गोकुळला हात वारे करू लागला व त्याच्या डोळ्यात डोळा घालत त्याला चेतवू लागला.
" झब्या झिपऱ्या मातला का? बाजुला सर , नाही तर डोक्यात ढोलच घालीन!"
"झब्बू उलट चेकाट्या मारत त्याला हूल भरू लागला. कल्याणचं नजाकतीत वाजवणं सुरूच होतं. मैदान जवळ आलं आता गणपती विसर्जन होणार तरी कल्याणचा ढोल फुटला नाही व त्यात हे झिप्पर डिवचतंय यानं गोकुळच संतापला व ढोलावरील जोर वाढला. बस्स तिथंच झब्बू प्याल्यागतवेडं वाकडं नाचत त्याला आणखी चढवू लागला.त्याच वेळी गोकुळचा, दौलतरावाचा, मोठ्या वाड्याचा दहा वर्षांपासून न फुटणारा ढोल संतापात बडवला गेला नी खेळ खल्लास.... गोकुळची चूक झालीच.त्यानं कल्याणला उमेश रमेश समजत आवाज वाढण्याच्या जोशात आपल्या च ढोलाचा बार उडवला नी अप्पा, रमेश उमेशनं एकच गलका केला.
काठावर विसर्जन करत सारी माडीवर परतली नी एकच गलका, जल्लोष...
अप्पानं कल्याणबाबास पुन्हा उचललं नी द्वारकाबाई आरतीचं ताट घेऊन बाहेर आल्या.
कल्याण खाली उतरला.द्वारकाबाईचा पाया पडत अप्पानाच ओवाळावयास लावलं.बापू च्या डोळ्यात आसवांचा पूर आला.
पण
पण बापूंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . इतकं बहारदार, नजाकतदार हलगी ढोल वाजवणारा डाॅक्टर ,कल्याण नेमका कोण?

क्रमश:
✒ वा...पा...
8275314774
8275314774
No comments:
Post a Comment