'झटेतलं चांदणं'
🔖 भाग ::-- पहिला
धुळ्याहून निघालेली 'धुळे-चाळीसगाव' रेल्वे एक एक स्टेशन मागं टाकत चाळीसगावकडं धावू लागली. रेल्वेस्टेशन येताच सदा काका व पवन उतरायची तयारी करू लागले. खोपडी एकादशीला तुळशी विवाह झाला नी शाळा उघडल्या म्हणून खडकीहून सदा आबा पवनला घेत आर्डीकडं निघाले होते. पंधरा दिवस पुतण्यास खडकीत मस्त फिरवत, वाटेल ते खाऊ पिऊ घालत व नविन कपडे घेऊन देत त्याला त्याच्या मामाच्या गावास सोडण्यासाठी सदा आबा निघाले होते. पवन म्हणजे सदा आबांचा जीव की प्राण. मदन व माधवी गेल्यापासून ते त्यास जिवापाड जपत आलेले. म्हणून तो आर्डीस मामाकडं शिकत असला तरी उन्हाळी वा हिवाळी सुटी लागण्या अगोदर सदा आबा आर्डीस दाखल होत व पवनला खडकीस नेत. आता ही सुट्या संपल्या म्हणुन ते त्यास आर्डीस सोडावयास निघाले होते.
गाडी थांबली तसं दोघे उतरले फलाटावर जिकडे तिकडे पेरुच्या कॅरेटच कॅरेट पडलेल्या होत्या. पेरुचा आंबट वास सदाआबास जाणवला. धुळे ,सुरत मार्केटला या भागातला पेरू दूर दूर जाई.स्टेशन मास्तराच्या इंग्रज राजवटीतल्या बांधकाम असलेल्या कॅबीनमधून उंच पायऱ्या उतरत ते बाहेर आले. येथून चार किमी दूर आर्डीला त्यांना नाल्यातून व त्याच्या काठा काठानं पायी जायचं होतं. दिवाळी संपली तरी नाल्याला गुडघ्यापर्यंत नितळ थंडगार पाणी झुळझूळ वाहत होतं. स्टेशनवरून आर्डीत जायचा मुख्य रस्ता फेऱ्यातला असल्याने आर्डीतले लोक स्टेशनवर ये जा करण्यासाठी नाल्यातल्या या गाड वाटेचाच वापर करत. मळ्यांमध्येही हीच वाट जाई. कपडे वर आवरत चिबूक डिबूक आवाज उठवत काका पुतणे पिशवी धरत निघाले. पश्चिमेला सूर्यनारायण तांबडा होत परतत होता. नाल्याच्या दोन्ही काठावर केळी, पेरू लिंबूच्या बागाच बागा पसरलेल्या. गिरणामायचं या भागास वरदान लाभलेलं. नाशिकमधल्या सह्याद्री रांगेतून उगम पावत जळगाव जिल्ह्यात प्रवेश करत वाहणारी गिरणामाय पूर्व दिशा बदलत उत्तर मुखी होत तप्तीला मिळे.या प्रवासात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव करत जळगाव धरणगाव कडं वाहणाऱ्या गिरणामायच्या पाण्यानं केळी ,लिंबू, पेरूच्या बागा, कापूस - ऊसाची शेती फुलवत जिल्ह्यास समृद्धीच वाही. आर्डीच्या आसपासच्या गिरणा काठाची केळी व सरदार, जी विलास हा पेरू तर दूर दूर प्रसिद्ध.गिरणाईच्या पाण्याची गोडी पेरूत जणू उतरलेली.
जिकडे तिकडे पेरू तोडणी, कॅरेटमधून वाहणी चाललेली. वासानं मन धुंद होत होतं.पेरूच्या बागेत पेरू खाण्यासाठी येणारे पोपटाचे थवे नाल्याकाठावरील झाडावर गचका उठवत गिल्ला करत होते. तोच मळ्याकडून येणाऱ्या चिवय वाटेतून नाल्यात बैलगाडी उतरली.
उभ्या उभ्याच बैलं फुसकाऱ्या टाकत
पाणी पिऊ लागले.
" आबा राम राम ! पाचच्या गाडीतून येत आहात का? पमन महाराज तुम्हास पोहचवण्यासाठी आबा येत असतील?" गाडी हाकणाऱ्या मारुती नं विचारलं व गाडीत बसायला लावलं.
गाडीत पेरुचे खाली कॅरेट व चारा ठेवलेला.
सदा आबांनी मारूतीस राम राम करत " राम राम! शाळा उघडल्यात मग पवनला पोहोचवावं म्हणून आलोय!" म्हणाले पवनला गाडीत मागच्या बाजूला बसवत स्वत: मारुतीजवळ पुढे बसले.
पवन ने गाडीत मागच्या बाजुस बसलेल्या पद्माकडं पाहिलं व तिच्याजवळच मागे पाय लोंबकवळत बसला. पद्माकडं मिश्कील हसत पाहत नजरेनंच खुणावत 'काय ,कसं काय?' विचारलं.पद्मा त्याच्या मागच्या इयत्तेत नववीत. त्याचे सारे मित्र तिला पाहताच " पमन तुझी रास चालली रे!" म्हणत चिडवायचे.पवन व पद्मा नावाची एकच रास म्हणून. पद्मानं जीभ वेंगाळत तोंड फिरवलं.
" आबा, काय म्हणतात आमचे पमन महाराज सुटीत!" मारुतीनं कॅरेटच्या माग बसलेल्या पवनकडं पाहत हसतच विचारलं.
" मारुती माझ्या पोराचं नावं पवन असतांना पमन का म्हणतात रे !आता तर माझ्याही ओठात तेच येतंय कधी कधी!" सदा आबानं मारूतीस दटावलं.
आबा मला ते नाही माहीत पण पमन महाराजाच्या पराक्रमांनी सारी आर्डी हैराण आहे मात्र!"
" का काय झालं?"
" तुम्हाला प्रतापराव व पारूताई सांगतीलच घरी जाताच !" म्हणत मारूती हसू लागला व दिवस बुडू लागला म्हणून बैलाच्या पायात लाथ घालत शेपटी मुरगळू लागला. हिवाळ्याचं लवकर झापट पडू लागलं.
'पवन मदन नकाशे' याचं लघुरुप करत पवनला 'पमन' नामकरण केलं होतं ढोले सरांनी. यामागे पमनचं हुल्लड - मिश्कील वागणं,कुरापती काढणं, दंगामस्ती करणं, खोड्या करत नामानिराळं होतं एकदम निरागस भाव आणत ' मी त्या गावाचाच नाही' दाखवणं कारणीभूत होतं. पमन म्हणजे एकदम इरसाल अवलिया
कांडी. काडी लावून कुरापत काढण्यात माहीर.पूर्ण शाळेतील शिक्षक ,आर्डी त्याचे पराक्रम जाणून होते. सारं करून सारून चेहऱ्यावर एकदम साळसूदपणा. चेहऱ्यावर निर्वीकारपणा आणत कुणासही उल्लू बनवे.
आताही काका व मारुती मामा गप्पा मारताहेत पाहून मागे त्याचे उद्योग सुरुच होते.
पद्माकडं असलेल्या पाटीत हिरवट पिवळे ताजे पेरू होते. त्यानं एक उचलत खायला सुरूवात केलेली. अर्धा खाता खाता तो तिच्या कडं पाहू लागला. पद्मा न विचारताच पेरू घेतला म्हणून रागानं त्याच्याकडं पाहत होती.
" घे, खाते का?" उष्टा पेरू पद्माकडं देत तो म्हणाला.
" तूच खा! तुला कमी पडेल!"
" मग तोंडाकडं का पाहतेय पुन्हा पुन्हा पोटात दुखल्यासारखं? मला वाटलं तुला ही हवा?"
" पम्या माझेच पेरू न विचारता घेतले नी मलाच देतोस लाज नाही वाटत!"
" तसं सांग ना मग ! पेरुचा काय तोटा पडला! मला वाटलं तुला खायचाय माझा उष्टा पेरू!"
हे ऐकताच पद्मा संतापली व तिनं पाटीतला एक हिरवाकच्च पेरू उचलत त्याच्या डोक्यावर मारला. त्यानं एका हातानं तिचे केस जोरात ओढले . पद्मा केस ओढले गेल्यानं एकदम आवाज करत ओरडली.
" काय झालं गं पद्मा, ओरडायला?" मध्ये कॅरेट असल्यानं मागचं काहीच दिसत नसल्यानं मारुतीनं बसल्या जागी विचारलं.
" मामा काही नाही, पद्माची पायाची चप्पल खाली पडली होती त्यामुळं ओरडली ती.पण मी उतरत दिली तिला.चालु द्या गाडी तुम्ही!" पमन मागून म्हणाला तोच पद्मानं त्याच्या तोंडावर पुन्हा पेरू हाणला. आता त्यानं तिचे गाल धरत ओढत लाल केले.
गाव आलं तसं दोघे उतरले. मारुतीनं गाडी पुढे नेली. सदा काका पुढं व मागून चालणाऱ्या पमननं जीभ काढत पद्मावर डोळा मिचकावला नी पद्मानं पुन्हा पाटीतला एक पेरू भिरकावला. पमननं तो अलगद झेलत मारुती नंमामाच्या गाडीवरच भिरकावला.
कॅरेटमध्ये पेरू पडताच आवाज आला.
आबा पायऱ्या चढताच प्रतापरावांनी नमस्कार केला.
" पमन ये! आलास! आता झाल्या सुरू उपाध्या!" प्रतापराव हसत म्हणाले. घरातून खाकरतच काठी टेकत भिका बाबा आले. तोच पमन घरात तारामामीकडं पळाला. मामीला तो बिलगला नी तारामामीनं त्याच्या डोक्यावरून बोटं फिरवत कडा कडा मोडले व त्याचे पापे घेत घट्ट छातीला धरलं. "पमन आलास बाबा! तुझ्या विना घर किती सुनं सुनं वाटतं रे! तू लाख खोड्या केल्यास तरी मला इथंच हवा! " आपल्या नणंदेचा मुलगा पण नणंद गेली नी पमन तारामामीच्या छातीस लागला.सारं आठवत तारामामीचा ऊर भरून आला. पण लक्ष्मीच्या येण्याची वेळ म्हणून तिनं ते आसवं आवरत घेत चहा ठेवला.
रात्री जेवण आटोपल्यावर भिका मामानं आपला भाचा असणाऱ्या सदा आबास जवळ बसवत काकुळतीनं समजावलं." आबा, मदन व माधवी गेली नी या लेकाचं छत्र गेलं .तरी आमच्या तारानं पोटच्या लेकीकडं- मायाकडं दुर्लक्ष करत त्याला जवळ केलं. तिकडं तु ही सुटीत त्याला कधीच पारखं करत नाही. पण आपल्या साऱ्यांच्या लाडानं पोरगं लाडावत उंडारत चाललंय!"
" मामा, माझा लेक आहे तो! वय अल्लड,करतंय खोड्या.त्यात काय एवढं! नी तुम्हास जड होत असेल तर उद्या नेतो मी माझ्यासोबत! मला माझा पोर जड नाही!" आबा बोलले नी भिका मामाचा जीव तुटला.
" आबा तुझा लेक असला तरी आमचं ही आतडं आहेच रे! पण याचाच फायदा घेत तो लबाड शेफारत चाललाय. बाल लिला आता बदलत उपद्व्याप होत आहेत.तू सुटी लागली तेव्हा घेऊन गेलास त्या आदल्या दिवशीच यानं दलपतच्या पोराच्या घरी कापसाच्या ढिगालाच आग लावली.बरं ओला कापूस म्हणून थोडक्यात निभावलं!" भिका मामा सांगत होते.
पण दलपत पोवाराचं नाव ऐकलं नी सदा आबाच्या चेहऱ्यावर अंगार फुलू लागला. त्यांचे डोळे अंधारात ही लाल चमकू लागले.
" मामा, काय केलं पवन्यानं? कापूसच पेटवला ना? आणि तो ही ज्यांनी लोकांच्या संसारात आग लावली अशा लोकांचाच ना! कळू देत त्यांना ही ,आगीची धग काय असते ती!"
" आबा त्यांनी जे केलं ते चुकच.पण त्या नावाखाली पमनची चूक पोटात घातली तर आपलं ही नुकसानचं!"
" ठिक आहे सकाळी विचारतो मी त्याला व समजवतो!" आबा मामापुढं संताप आवरत माघार घेऊ लागले.
सकाळी आबांनी निघतांना पवनला साऱ्या समोर बोलवलं.पवन येताच आपल्या काकाच्या मांडीवर बसत त्यांच्या मिशांना हातात धरत निरागस पणा दाखवू लागला.
" पमन बाबा व्यवस्थीत बस!तू आता लहान आहेस का!" तारामामीनं दटावलं. पण आबांनी आता आपण निघणार म्हणून उलट त्यास घट्ट जखडलं.
ते बघताच ताराबाईच्या डोळ्यात ही आसवे टचकन तरळली.
" पमन सुटीच्या आधी तू वरच्या आर्डीत त्या सोमा पवाराच्या घराकडे गेला होतास?" भिका बाबानं दरडावून विचारलं.
आबांच्या मिशांची खेळणारे हात थांबले.त्याला काल मारूती मामाचं सांगणं आठवलं नी सुटी आधी चंदू व सुऱ्याच्या बुडाखाली लावलेली आग आठवली.
" बाबा, गेलो होतो!" तो बापडा चेहरा करत उत्तरला.
" का? त्या सोमा पोवाराचा कापूस पेटवायला?" भिका बाबा आता वरच्या स्वरात विचारते झाले.
" पवन का गेला होता बेटा? नी खरच तू कापूस पेटवला का?" आबा त्याला प्रेमानं विचारू लागले.
" काका, त्या चंदू, सुऱ्यानंच आधी मला..." नी पमननं सारं सांगितलं.
.
.
सोमा पोवाराचे चंदू व सुऱ्या त्याला कायम पाण्यात पाहत व हा ही दोघांना त्याच्या कचाटीत सापडले की बुकलेच. आता त्यांचीच चुलत बहिण मंगा पोवाराची मुलगी शिल्पा पोवार दहावीला नाशिकहून त्याच्याच वर्गात सहा महिन्यांपूर्वी आलेली. दिवाळीच्या सुट्या लागल्या नी तिच्या मागोमाग पमन निघाला वरच्या आर्डीत. तो सहसा वरच्या आर्डीत जातच नसे. पण जेव्हा समजलं की त्यांच्या घरी दिवाळीस वा सुटीत येणारी बाई आपली काकू होती; म्हणून तिला पाहावी व तिचा जाडजूड मुलगा त्याला ही पाहावं असं वाटे. त्या दिवशीही ही काकू आलीच असेल म्हणून शिल्पाच्या मागोमाग तो निघाला. गल्लीत एकट्या पमनला पाहताच नुकतीच घरी पोहोचलेली चंदू, सुरेस व अंजा काकूचा तो मुलगा तिघांनी याला घेरलं. शाळेत कायम दादागिरी करणारा आज गल्लीतच एकटा सापडला म्हणून तीन चार बोकांच्या तावडीत उंदीर सापडावा तसंच. चंदू, प्रशांत, सुरेशनं त्याला धरत बुकलत घराच्या ओट्यावर नेलं. हंगाम असल्यानं घरातली शेतात व घराच्या मागच्या खळ्यात कामात गुंग. त्यांना मदतीला त्यांच्या गॅंगमधली पोरं ही जमली. त्यांनी पमनचा शर्ट फाडत ओट्यावर चढवला. त्यातही पमननं जाडजूड प्रशांतच्या कमरेत जोरात लाथ घालत ओट्याखाली भिरकावला. त्यानं तो तिरमिरला व उठत "याला घरात न्या रे मागे यानं तुमच्या शाळेत मला अशीच कानात मारली होती."
साऱ्यांनी पमनला धरत वर ओट्यावर नेत घरात नेऊ लागली. तोच प्रशांतनं नाशीकहून दिवाळी साठी आणलेले फटाके काढून आणले साऱ्यांना धरायला लावत त्यानं फटाक्याच्या लडीच्या लडी दोरीत बांधल्या व दोरी पमनच्या कमरेस गुंडाळली. पमन समजून चुकला की आता आपलं खरं नाही. ही सारी मिळून आपला बाजा वाजवतील. तोच घरातून शिल्पा बाहेर निघाली. नी साऱ्यांनी मानगुटीत पकडलेलं पमनला तिनं पाहिलं. आपल्या इज्जतीचा फालुदा होतोय पाहताच पमननं आजुबाजुला पाहिलं. ओट्यावर दोनेक गाळ्यात अर्ध्यावर कापूस रचलेला त्याला दिसला. त्यानं शिल्पाकडं पाहीलं व मनात काही ठरवलं. चंदूनं सुरेशनं व मित्रांनी याला गच्च धरलेलं. प्रशांत फटाक्याची लड कमरेत बांधत पेटवणार तोच पमननं सारी ताकद एकवटत मुसंडी मारली व कमरेची दोरी धटकन तोडत फटफट फटाके फुटत असतांना ती कापसावर फेकली. ते पाहताच पोरं घाबरली व बोंबलत पळू लागली. मागच्या खळ्यातून बाया माणसं पळतच आली पमन शिल्पाकडं पाहत
" या रे साल्यांनो आता का पळत आहात!" म्हणत चुरचुरत पेटू पाहणाऱ्या कापसाकडं व शिल्पाकडं पाहत धूम ठोकली. कापूस पहिल्याच वेच्याचा व पावसात भिजलेला असल्यानं पूर्ण ओलसर होता व सारीच धावत पळत येत पेटलेला कापूस लगेच बाजूला केला. तरी दोनेक क्विंटल कापूस पेटलाच. साऱ्यांना आधी घरच्या पोरांनी फटाके फोडले असतील म्हणून घरच्यांनाच दटावलं.
.
.
पमननं सारं सांगितलं. व सदा काकाच्या मिशांना पिळ देत तो वरच्या दिशेनं फिरवू लागला.
पुढचं प्रताप व भिका बाबास माहीत होतंच.
रात्री पोरांनी मार पडताच पमनच नाव सांगितलं नी सोमा, मंगा,व पाहुणी म्हणून आलेली बहिण अंजा साऱ्यांचीच आग झाली. दुसऱ्या दिवशी सोमा मंगा नदीतून खालच्या आर्डीत आले पण तो पर्यंत काहीच खबरबात नसलेल्या भिका बाबाच्या घरातून पमनला सदा आबा खर्डीत घेऊन गेले होते. दम देणाऱ्या सोमा मंगास प्रतापनं " माझा भाचा गावास गेलाय.तो परत आल्यावर पाहू काय झालं ते.आणि समजा त्याची चूक असेल तर नुकसान भरपाई देईन मी पण इथनं आवाज न करता सटका."अशी धमकी देत त्यांना उडवून लावलं.
सदा आबास हसू आलं.
" पमन ,कुणाच्या शेपटीवर आपणहून पाय द्यायचा नाही बेटा.पण कुणी पाय दिलाच तर कापूसच नाही तर सारी लंकाच जाळून आला तरी तुझा हा सदा काका पुढचं निपटायला समर्थ आहे!" सदा आबा आपला मागचा इतिहास आठवत पोरास सांगत होते व भिका बाबा कपाळाला हात मारत होते. भिका बाबा उठू लागताच पमन जीभ काढत घरात जाणाऱ्या बाबाकडं वाकुल्या दाखवत होता.
सदा आबा खडकीस परतण्या साठी स्टेशनवर आले. गाडीत बसताच त्यांना तपाच्याही पूर्वी लागलेल्या झटा, खस्ता आठवू लागल्या.
.
रेल्वे धुळ्याकडं धावत होती तसे आबा मागं मागं भूतकाळात जात होते. ते धुळ्याहून बसने खडकीत परतले तरी मागे मागेच जात होते.
.
.
खडकीत दुलबा नकाशेंना सदा व मदन दोन मुलं. दुलबा नकाशे सदा कर्ता होण्या आधीच गेले. आईचा एक डोळा जन्मजात बसलेला. दुसऱ्या डोळ्यातही फुल झालं व तो ही हळूहळू बसु लागला. सदानं ट्रकच्या साहायानं आपलं कुटुंब चालवत भाऊ मदनचं बीपीएड पर्यंतच शिक्षण केलं. भिका मामानं आपल्या वरच्या आर्डीतीलच दलपत पोवाराची अंजनास सदासोबत उजवली. अंजना त्या काळातही दहावी शिकलेली. सदाकडं असलेली सात आठ एकर जमीन व स्वत:ची ट्रक पाहून दलपत पोवारानं मुलगी दिली. त्यावेळेस त्याची परिस्थिती हलाखीची होती.
सदाचं लग्न झालं नी परिस्थीती अचानक पालटू लागली. आईच्या डोळ्यासाठी त्यानं जळगाव नाशीक मुंबईपर्यंत नेलं. त्यात व स्वत: च्या लग्नातील खर्चानं त्याच्या डोक्यावर बोजा वाढला. त्यात अंजना म्हाताऱ्या सासुचं करण्यास का कु करू लागली.व सदास आर्डीस राहण्यास मनवू लागली. एक वर्ष झालं तरी मुलबाळ नाही. त्यातच मदनचं भिका मामाचीच मुलगी माधवी बरोबर जुळवत सदानं मदनचं लग्न उरकलं. तो ही खर्च. आईचा डोळा साफ बसला व ती पूर्णत: आंधळी झाली. माधवी घरात येताच अंजनाबाई आता इथं सपशेल राहणार नाही. आपण आर्डीतच जाऊ सांगत सदाशी झगडू लागली. तोच आर्डीतील अप्पा सरदेसायाच्या हायस्कुलात बी. पी. एड ची जागा निघाली. भिका मामा व सदा मदनला घेत नाशिकला अप्पा सरदेसायांना भेटले.सौदा ठरला. भिका मामा बाकी देत असतांना सदास मामाकडून मदत घेतल्यास आपल्या भावावर कायमचा दाब राहील म्हणून त्यानं नकार देत डोक्यावरचं कर्ज व डोनेशन भरण्यासाठी शेत विकलं. मदन सासरवाडीअसलेल्या मामाच्या गावात आर्डीत आला. हे पाहताच अंजना भडकली व तिनं आपलं सामान उचलत मदन आधीच आर्डी गाठलं. सदास वाटलं दोन दिवसाचा राग निघून जाईल नी मग येईल अंजना परत. नी आता भावाचा पगार सुरू झाला की मग काय तिकडं तो सुखी तर ट्रक व उरलेली जमीन यात आपण सुखी असा विचार करत अंजनास एक दोन महिने राहू देत आर्डीला असं ठरवलं.
तिकडे मुलगी परत येताच व मदन हायस्कुलात लागताच दलपतराव ही संतापले. त्यात ते अप्पा सरदेसायांना भेटले.अप्पांना आर्डीचा इतिहास माहित होता. वरची आर्डी ही रामजी पोवाराची तर खालची आर्डी ही लहान भाऊ शामजी पोवाराची. पाच सहा पिढ्यानंतर दोन स्वतंत्र गावं झालेली. यो दोन्ही आर्डीवरच त्यांचं हायस्कूल चाललेलं. पूर्ण गाव तेरा-पंधरा हजार लोकवस्तीपर्यंत.गावात इतर कुळांची ही वस्ती. पण दबदबा या पोवारांचाच. म्हणून शामजी पोवाराच्या खटल्यातील भिका पोवारांच्या जावयाचं काम केलं तर रामजी पोवाराच्या वस्तीतील दलपत पोवारास नाराज करून चालणार नाही. म्हणून त्यांचाही एक उमेदवार भरण्याचं कबूल करत दलपत पोवारास स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन ही केलं.
दलपत पोवारांनी चिंतामण कदम म्हणून आपल्या नात्यातला माणूस लावला. नेमक्या त्याच वेळी अंजना पण आर्डीत होती. अंजना व चिंतामण कदम याचं सूत जुळलं.
सदाला वाटलं राग निघाला असेल म्हणून तो भिका मामांच्या मदतीनं अंजनास घ्यायला गेला तर दलपत पोवारानं त्यास उडवून लावलं.
सदा विनवू लागला. " मामा क्षुल्लक कारणासाठी नका वाद वाढवू! चुलीतलं लाकुड चुलीतच जळणार!"
" अंजाचीच इच्छा नाही नांदायची तर तर त्याला मी ही काय करणार!"
आता मात्र सदा संतापला.
" मामा, असं असेल तर मग मी पण पाहतोच ती किती दिवस माहेरात राहते!" म्हणत सदा उठला.
माधवी खडकीलाच राहत आत्याची व्यवस्था करत होती तर मदन आर्डीत .हायस्कूल अनुदानीत असलं तरी तुकड्यांना मंजुरी नव्हती. अप्पा सरदेसायांनी पैशासाठी आधीच उमेदवार भरून घेतलेले.
मदन पगार सुरू होईल तेव्हाच खोली करू या विचारात.पण सदानं आर्डीतून मदनला घेतलं व माधवीलाही त्याच्या सोबत आर्डीला पाठवू लागला. मदन व माधवी साफ नकार देऊ लागले. कारण सदाची ट्रक तीन चार दिवस दुसऱ्या राज्यात जाई. तो घरी तीन तीन- चार चार दिवस परतेना. अशा वेळी आंधळ्या आत्याकडं कोण पाहील म्हणून माधवी आर्डीला जायला नकार देऊ लागली. कारण बहिणीस सोडून लेक माहेरास आली हे वडिलांना आवडणार नाही हे तिला माहीत होतं. पण सदानं त्यांना समजावत " मी आता ट्रक इथंच जवळपास लावतो व ड्रायव्हर ठेवतो. मी आईकडं पाहत शेतीही करतो."
मदन सोबत माधवीला आर्डीला पाठवतांना त्याला माधवी व अंजनातल्या स्वभावातला फरक समजला व त्याच्या डोळ्यात आसवे वाहू लागली. तरी मदन माधवी आठ पंधरा दिवसात सुटी पाहून परतत सदाआबा व आईसाठी सारं घराचं काम करून जात.
मदननं विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत चमकावयाचं असेल तर तात्पुरतं नियोजन न करता दूरगामी नियोजन करावं लागेल हे ओळखत शाळेमागील जागा श्रमदानातून विद्यार्थ्याकरवी तयार करत भव्य क्रिडांगण आखलं. विद्यार्थ्यांसाठी त्यांनं स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन मार्फत अप्पाकडं खेळ साहित्याची मागणी केली. पण दलपत पोवारांनी ती मागणी अप्पाकडं पोहोचू दिलीच नाही. मदन सरांनी पोरांमध्ये व्यायामाचं महत्व वाढावं खेळात नैपुण्य प्राप्त करावं म्हणून शास्त्री सरांना साथीला घेत मेहनत करायला सुरुवात केली. पहाटेच पोरांना क्रिडांगणावर बोलवत त्यांना धावणे, सूर्यनमस्कार ,पोहणे हे व्यायाम प्रकार घेऊ लागले. खेळाबाबत शाळेत एकदम नैराश्य होतं. म्हणून त्यांनी आधी पायाभूत गोष्टी वर भर देत कामास सुरूवात केली. टेकड्यावर चढणं- उतरणं, गिरणेपर्यंत धावायला लावणं ,तलावात पोहावयास लावणं अशा गोष्टीत ते विद्यार्थ्यांना तयार करू लागले. एक दिड वर्षात गावात पहाटे व्यायामाचं वातावरण तयार झालं. शिकलेली पोरं ही व्यायाम करत शरीर कमवत पोलीस भरती, सैन्य भरतीत प्रयत्न करू लागले.
चिंतामण कदम व अंजनाबाईस दलपण पोवाराकडून जी सूट मिळाली त्याचे नको ते परिणाम झाले. मदनला कळताच तो खडकीत आला व आबास सांगितलं. आबा एकदम पेटून उठला. आज पावेतो त्यास वाटत होतं की दोन दिवसाचा राग असतो निघून गेला की चुलीतलं लाकुड चुलीत जळतंच. म्हणून तो फारकत न देता वाट पाहत होता. पण हे ऐकताच तो आर्डीत आला. वरच्या आर्डीत मामा सोबत जात त्यानं दलपत पोवारास स्पष्ट सुनावलं.
" सदाजीराव, आम्ही फारकत मागणारच नाही .तुम्हास वाटलं तर घ्या फारकत!" दलपत पोवार खोडा घालत बोलले
सदा रागानं लाल होत फुत्कारला.
" दलपत राव! आम्ही संसाराला भरीत समजतो. कारण संसार म्हटला की सुख, दु:खं राग लोभ झटा यात माणूस वांग्यागत पिचतो व भरीत होतं. पण भरीत होण्यातही एक सुख असतं. पण लक्षात ठेवा या भरतासाठी भले आम्ही एक वेळ पक्कं झालेलं पिवळं वांगं वापरू पण किड लागलेलं वांग कदापि नाही. किड लागलेल्या वांग्यास आम्ही उचलून फेकून देतो.तुम्ही काय फारकत घेणार ! मीच तुमच्या किड लागलेल्या वांग्यास फारकत देतो!"
तोच तरणीबांड सोमा, मंगा सदाच्या अंगावर धावून आले. सदानं जवळ नजरेत आलेलं दांडकं उचललं नी एकच डरकाळी फोडली तोच रामजी बाबाच्या आर्डीतल्या एकाची ही ताकत झाली नाही सदास अडविण्याची.
दलपत पोवारालाही घाई करावीच लागली. चिंतामण कदम सर व अंजना यांचा विवाह झाला.
दलपत पोवार व चिंतामण कदम मदनला पाण्यात पाहू लागली. अंजना बाईस मुलगा झाला. प्रशांत नामकरण करण्यात आलं सहा महिन्यातच मदनला ही मुलगा झाला. पवन..
पवन मदन नकाशे...सदा आबास आपला मदन बाप झाला याचा कोण आनंद झाला.
मदनच्या कामानं व मेहनतीनं अख्ख्या शाळेत व गावात नाव झालं.पुढच्या एक दिड वर्षात गावात गवगवा झाला.
आर्डीच्या वरच्या अंगास दोन नाले वाहत येऊन आर्डीस संगम होत होता. संगमानंतर जी नदी तयार होई तिच्या एका अंगास वरची आर्डी तर दुसऱ्या अंगास खालची आर्डी. नदी खाली वाहत जात तिलाच अडवत तलाव ही नाही व धरण ही म्हणता येणार नाही असं धरण बांधलेलं. तेथून नदी पूर्व मुखी होत गिरणास समांतर वाहत पाच सात मैलावर गिरणेत सामावे. धरणाचं पाणी पावसाळ्यात आर्डी पर्यंत तुंबे. संगमाच्या वर दोन्ही नाल्याच्या बेच्यात अप्पा सरदेसायाचं हायस्कूल होतं. तिथेच ग्रामपंचायत व सरकारी दवाखाना.
मदन विद्यार्थ्यांना या धरणात पोहणं शिकवू लागला. पोहता येणाऱ्या पोरांना पोहण्याचा व्यायाम करावयास लावू लागला. अप्पा खेळ साहित्य मंजूर करतीलच तो पावेतो पोरांना ते सुदृढ करू लागले.
याचाच फायदा दलपत पोवार व कदम सरांनी उठवायचा ठरवला.भाद्रपद लागला व धरणाचं पाणी नितळ होऊ लागलं व आर्डीकडचा तळ उघडा पडू लागला.
आठ दिवसांपूर्वीच आढावा बैठकीत जबर वाद झाले. दलपत तात्यानं अप्पाच्या नावानं मागच्या सत्रातील दहावीचा घसरलेल्या निकालाबाबत साऱ्यांना धारेवर धरलं. दहावीला इंग्रजी शिकवणाऱ्या कदमानं दोन तीन लोकांना साथीला घेत मदन नकाशेवर खापर फोडलं.
" तात्यासाहेब, विद्यार्थ्यांना सतत क्रिडांगणात नेत क्रिडा शिक्षक पोरांना अभ्यासापासुन दूर नेत आहेत. दुसऱ्याच्या तासिकांना ही ते विद्यार्थ्यांना वर्गात परतू देत नाही. शिवाय विद्यार्थ्यांना धरणावर व्यायामाच्या नावाखाली पोहण्यास नेतात. उद्या उठून काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार?"
मदन संतापला. तो भर मिटींग मध्ये कडाडला.
" कदम राव तुमच्या कोणत्या तासिकेस मी पोरांना मैदानावर थांबवलं ते सांगा आधी?"
" माझ्या नसल्या तरी इतराच्या तासिका घेतात व गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो."
" तात्या, मी कुणी रजेवर असेल तरच त्यांची तासिका घेतो. एरवी अशा तासिकेला शिक्षक दालनातून कुणी बाहेर पडत नाहीत व मुलं मस्तीच करत राहतात. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना मी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त व्यायाम करावयास लावतो"
" पण मग धरणात पोहोतांना काही धोका झाला तर?"
" पावसाचं चार महिने पोहणं बंदच आहे. नी काही झालं तर ती मी माझी जबाबदारी समजेन! कदम राव तुम्ही का उगीच काळजी करता?" मदन बोलला तसं शास्त्री सरांनी पण मदन सरांची बाजू उचलून धरली. मिटींग संपली.
भाद्रपद चालू असल्यानं सकाळी दहा वाजताच गावातल्या बाया बापड्या डबे घासणे, गोधळ्या धुणं यासाठी धरणावर गर्दी करत. सकाळी आठलाच वरच्या आळीतल्या मुलांना नकाशे सरांनी आजपासून धरणावर पोहोण्याचा व्यायाम सुरू करायचा म्हणून सुचना मिळाली. रविवार असल्यानं चार पाच पोरं निघाली. धरणात पावसाळ्याचा सारा गाळ वाहून आलेला. त्यात मागच्या वर्षी शेतात गाळ टाकण्यासाठी काही धरणातला गाळ नेत ते खड्डे जागो जागी.पाणी नितळ असलं तरी खोलीमुळं हे लक्षात येत नव्हतं. चार पाच पोरं धरणावर पोहोचली त्यांनी नकाशे सर आले नाहीत अजुन म्हणून एकास बोलावयास पिटाळलं व बाकी पोहू लागली. पोरगं भिका बाबाच्या घरी जात सरांना " सर सारी धरणावर जमलीत व तुमची वाट पाहत आहेत!"
म्हणाला.
नकाशे सर घाबरले. आपण सांगितलं नाही मग मुलांना कुणी पाठवलं धरणावर? ते घाई गडबडीत उठले. त्यांना भिती वाटू लागली व ते पळतच धरणाकडं निघाले. पण तो पावेतो धरणात उतरलेली पोरं मनसोक्त डुंबत होती. डुंबता डुंबताच एक पोरगं गळात रुतलं नी पोरांनी गलका केला. धरणाच्या काठावर आलेल्या मदननं ऐकलं व तो कपड्यासमवेत पाण्यात झेपावलं. दुसरं पोरगं पहिल्याच्या मदतीला गेलं. बाकी कपडे उचलत घाबरून घराकडं पळाली. मदन सरांनी गाळात रूतलेल्या दोन्ही पोरांना काढत पाण्यावर तोंड काढलं. पोरांनी जोरानं पाणी फेकत श्वास घेतला, सोडला. मदनला हायसं वाटलं. एक दोन मिनीटांनी जरी उशीर झाला असता तरी पोरं हातची गेली असती. त्याचे खाली पाय टेकले गेले. पोरांचे केस सोडत त्यानं दोन्ही पोरांना वर केलं पण तोच उन्हाळ्यात गाळ काढण्याचा खड्डा लागताच तो अचानक खाली गेला. हातात पोरं असल्यानं ती पुन्हा पाण्यात जाताच घाबरली. पोहण्याचं सोडून ती सरांच्या अंगास झपटू लागली. त्याच गडबडीत खड्ड्यात नविन वाहून आलेल्या गाळात त्याचे पाय रूतू लागले. ते झटकत जोर देत काढण्याच्या प्रयत्नात अधिकच फसू लागले. पोरांची झटापटी, गाळात रूतणं यातच त्याची दमछाक झाली. त्या ही स्थितीत त्याला जबाबदारी आठवली . त्यानं झपटणाऱ्या एकास पायाच्या केचीत दाबलं व दोन्ही हातांनी एकास खांद्यावर उचललं.लगेच पायातल्या कैचीतल्या दुसऱ्यास उचलत दुसऱ्या खांद्यावर उचललं. पोराची तोंड वर निघाली. पण तरी पोहत काठावर जायची त्यांची हिम्मत झालीच नाही. पोराच्या ओझ्यानं मदन सर गाळात खोल खोल रूतू लागले. दम तुटू लागला. तोच गावाकडं पळालेल्या पोरांनी कल्ला करत डबे व गोधळ्या धरणावर पोहोचवायला येणाऱ्या माणसांना आणलंच. पण तो पावेतो खांद्यावरच्या पोरांना हातानं वर वर तोलत मदन सरांनी जल समाधी घेतली. काळी डोकी व हात पाहताच धडाधड उड्या टाकत लोकांनी खाली पाय न टेकता कमी वाटणाऱ्या पाण्यात पोहत पोहत पोरांना काढलं. पोरं वाचली पण गाळात रुतत दम तोडलेले मदन सर आपली जबाबदारी पार पाडत गेलेच. पवन पोरका झाला. सदा माधवी यांनी हंबरडा फोडला. डोनेशन घेऊन एक ही पगार न घेतलेल्या व पोरासाठी जल समाधी घेतलेल्या मदनच्या जागी अप्पानं माधवीस लावण्याचं आश्र्वासन दिलं. पोरांना ज्या पोरानं निरोप दिला होता. त्या पोराला कोपऱ्यात घेत कदमसर व दलपत तात्यानं नवीन पढवलं. ते पोर नकाशे सरांनीच मला निरोप द्यायला पाठवलं होतं हीच कॅसेट वाजू लागलं. पण नकाशे सरच राहिले नाहीत म्हणून प्रकरण शांत झालं. व शाळेत उठलेली व्यायाम व खेळाची चळवळ ही शांत झाली. महिन्याचा पितर जेऊ घालून त्याच रात्री माधवी त्याच धरणात मदनला शोधण्यासाठी पवनला तारा वहिणीकडं सोपवत निघून गेली. दिड वर्षाचं पवन पोरगं आईच्या मायेसही पारखं होत मामीलाच माय समजत चिपकलं. मामीनंही पोटच्या त्याच्याच वयाच्या मायास दूर करत त्याला पोटच्या गोळ्यागत वाढवलं. .
अप्पा सरदेसायानं शास्त्री सर चिंतामण कदम यांची नाशिकच्या वेगवेगळ्या संस्थेत बदली केली.
दलपत पोवाराकडून चेअरमन पद काढलं. पण या तीनेक वर्षात बरेच गफले करत त्यांनी बरेच पैशे
कमवत आपल्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणली.
सदाला सारं आठवलं व गाडीतच तो हंबरू लागला.
" पमन बेटा कापूसच काय पण त्या घरालाच तुला पेटवत आपल्या बापाचा बदला घ्यायचाय."
खडकी आली व आबा उतरले.

क्रमशः
✒ वा.....पा.....
No comments:
Post a Comment