दंडक (थरारक भयकथा)
भाग- 3
भाग- 3
हे दोन-तीन आठवडे राघवचे मजेत गेले. राघव हळूहळू गावात रुळू लागला. त्याचा स्वभाव चांगला असल्याने, त्याच्या गावात पटापटा ओळखी होऊ लागल्या. परंतु एक गोष्ट होती, गावातील बरेच लोक त्याच्यावर नाराज होते. काहींनी तर त्याच्याशी भांडणेही केली. त्याला कारण म्हणजे त्याने खोललेला तो डाकबंगला. हेच कारण त्याच्या पाठीमागे होते. परंतु आता दोन-तीन आठवडे उलटून गेले होते, त्यामुळे ते सगळे आता मागे पडले होते. त्याचे पोस्टाचे कामही चांगले सुरू झाले होते. बंगल्यात त्याला आता करमु लागले. बंगला त्याला मनापासून आवडला होता.
आज पोस्टातून घरी यायला त्याला उशीर झाला. रात्रीचे आठ नऊ वाजले असतील. जेवण करून तो झोपायच्या तयारीत होता. परंतु आज झोपीचे काहीच चिन्ह दिसेना. अंथरुणात अंग टाकले की त्याला लगेच झोप लागायची, पण आज ती लागेना. डोळे उघडे ठेवून तो तसाच पडुन राहिला. आजचे आजूबाजूचे वातावरण कसेतरी जाणवत होते. बाहेर अंधारही घनघोर जाणवत होता.त्याच्या मनाची चलबिचल वाढू लागली. काहीतरी आपल्या नजरेतून सुटत आहे. आपल्याला काहीतरी करायचे आहे. काहीतरी काम आपल्या हातून बाकी राहिले आहे. अशी जाणीव त्याला सारखी होऊ लागली.पण काय? हा प्रश्न त्याला पडला.त्याने मेंदूला ताण दिला. पण काहीच बोध होईना.काहीच उत्तर सापडेना.आणि अचानक त्याला आठवले. त्या दिवाणी हॉलच्या पाठीमागील ती खोली. जिला ते विचित्र माकडाच्या पंजाच्या आकाराचे कुलूप आहे. ती खोली. त्या खोलीची त्याला उत्सुकता लागली होती. तो उठला. खाली आला. त्या बंद खोलीच्या दाराला, त्याने जोरात धक्का दिला. पण त्याच्या त्या धक्क्याचा दारावर कणभरही प्रभाव पडला नाही. ते अतिशय मजबूत असावे.
ते त्याची नजर त्या विचित्र कुलुपावर गेली.ते कुठल्यातरी विशिष्ट चावीने खुलत असावे,असा त्याने विचार केला. त्या कुलुपावर माकडाच्या पंजाच्या आकाराची, जी खोलगट निशाणी आहे, त्याला अगदी तशाच आकाराची चावी लागत असावी. म्हणजे पंजाच्या आकाराचे ते एखादे लॉकेट असावे. पण आता अशीच चावी एवढ्या बंगल्यात कुठे असेल? ती कोठे सापडेल?हा प्रश्न त्याला पडून गेला.
बंगल्याची साफसफाई करताना बंगल्यातील सगळे सामान वरच्या एका खोलीत ठेवले होते. कदाचित त्या सामानात ती चावी कुठेतरी असावी. तो त्या वरच्या खोलीत आला. खोलीत सगळीकडे अडगळीचे सामान पडलेले होते. त्याने एकेक सामान शोधायला सुरुवात केली. पण चावी काही सापडेना. सगळीकडेच सामानाची अडगळीत पडलेली होती. सगळीकडे तो ती चावी किंवा चावी सारखे ते लॉकेट शोधु लागला. अचानक त्याला एक चौकोनी लोखंडी पेटी दिसली. त्याच्या डोळ्यात आशा चमकली. काळ्या पोलादी रंगाची ती पेटी खूपच पुरातन वाटत होती. मयूर पक्षाची निशाणी त्यावर कोरलेली होती. कुठल्यातरी हिरव्या रंगाच्या धाग्याने ती पेटी गुंडाळली होती. तो पुढे झाला. त्याने ती पेटी हातात घेतली. वजनाने चांगलीच जड होती पेटी. त्याने त्यावरचे ते हिरवे धागे बाजूला काढले. पेटी अलगद मोकळी झाली. त्याने त्यावरचे झाकण बाजूला काढले. त्याच्या डोळ्यात आनंद चमकला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. माकडाच्या पंजाच्या आकाराचे त्यात एक लॉकेट होते. म्हणजे तीच खोलीची चावी असावी. त्याने अलगद ते लॉकेट हातात घेतले. ते अतिशय जुने लॉकेट असावे. पोलादी रंगाचे ते लॉकेट दिसायला एकदम आकर्षक होते. एखाद्या कारागिराने ते हाताने बनवलेले असावे. कारण त्याच्यावर पंजाच्या आकाराची नक्षी अतिशय सुबक दिसत होती. त्यावर पाच बोटे कोरलेले होते. हुबेहूब माकडाच्या पंजाचा आकार त्यावर कोरलेला होता. त्याच्या प्रत्येक बोटावर बारीक जाळीदार नक्षी कोरलेली होती.
त्याने अलगद लॉकेटवरून हात फिरवला. एक विचित्र जाणीव मेंदुपर्यंत गेली. हाताला खरबड खरबड काहीतरी लागले. त्याने झटक्यात हात पाठीमागे घेतला
तो त्या दाराजवळ पोहोचला. बंगल्यात आल्यापासून, त्याला त्या दाराच्या आत काय असेल? याची उत्सुकता लागली होती. माणसाचे मन नेहमी आपल्या सभोवतालच्या गोष्टी सोडून, ज्या गोष्टी लपलेल्या असतात, त्यांच्याबद्दलच जास्त जिज्ञासू असते. पण प्रत्येक जिज्ञासा ही चांगली असेल, किंवा मग त्यापासून नेहमी सकारात्मकच लाभ होईल, असे नाही. कधीकधी ती जिज्ञासा तुमच्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकते. काही रहस्य हे लपलेल्या अवस्थेतच राहू द्यावे लागतात. त्यांना कधीही मुक्त करू नये. कधीकधी एखाद्या गोष्टीला मुद्दाम काहीतरी भेदक संरक्षणात गुंतून ठेवलेले असते. मग ते संरक्षण तोडून त्यातील एखादी गोष्ट मुक्ता का करावी? राघवही आता तेच करत होता. त्याच्या मेंदूचा एक भाग त्याला समजून सांगत होता,
'या खोलीचे एवढे मोठे प्रचंड दार आहे. त्या दारावर ते विचित्र आकाराचे कुलूप आहे. त्याची दुर्मिळ हाताने कोरलेली ती चावी आहे, हे एवढे मोठे संरक्षण कशाचे संकेत आहे? हे काही एकदम साधे सरळ दिसणारे प्रकरण नाही. या सगळ्या संरक्षणमागे काहीतरी प्रयोजन असावे. हे सगळे संरक्षण कोणीतरी गावाच्या संरक्षणासाठी लावलेले असेल. या दारामागे काहीतरी असेल. काहीतरी अतिमहत्त्वाचे! अतिसंवेदनशील! किंवा मग काहीतरी अमानवी! अनैसर्गिक! एकतर नक्की होते, ते चांगले निश्चितच नव्हते. ते वाईटच असणार. अति वाईट! टोकाचे अमंगळ!'
मेंदू असे घातक संकेत देऊ लागला. पण त्याचे ऐकणार कोण? जिज्ञासा, उत्सुकता स्वस्थ बसू देणार नाही. त्या बंद दाराआड काय आहे? हे पहावे लागणार होते. नेहमी नेहमी लागून राहिलेली उत्सुकता शमवावी लागणार होती. एखादा छोटा काटा पायात खोलवर रुततो, तेव्हा त्याला काढून टाकावे लागते, नाहीतर तो सारखा टोचत राहणार. तशीच ही जिज्ञासा असेल, तिला एकदाच शांत करावे लागणार होते.
त्याने ते लॉकेट हातात घेतले. त्या कुलुपाच्या खोलगट भागावर त्याने ते लॉकेट लावले. चुंबकाचा S ध्रुव आणि N ध्रुव एकदम जवळ आल्यावर, ज्याप्रकारे ते एकमेकांना लगेच स्वतःकडे ओढून घेतात. अगदी त्याप्रमाणे ते लॉकेट त्या कुलुपाच्या त्या खोलगट भागाकडे आकर्षिले गेले. त्या कुलुपात ते लॉकेट पूर्णपणे घट्ट बसले. त्या कुलपात काहीतरी यंत्रणा असावी. काहीतरी छोटेसे चक्र, पुल्लि, गियर त्याच्या अंतरंगात असावे. आत काहीतरी मोठा कट् असा आवाज झाला. हळूहळू काहीतरी चक्र फिरण्याचा आवाज येऊ लागला. काहीतरी गोल गोल फिरत फिरत होते. क्षण दोन क्षण गेले. आणि जोरात खट्ट असा आवाज होऊन ते कुलुप उघडले गेले. ते कडीपासून आपोआप विलग होऊन खाली जमिनीवर पडले. तो पटकन पाठीमागे सरकला.
खाली पडलेल्या, निर्जीव वाटणाऱ्या त्या कुलपाकडे तो नुसताच बघू लागला. तो भानावर आला. त्या समोरच्या खोलीचे कुलूप उघडले होते. आता केवळ हे मोठे दार उघडले की, तो त्या खोलीत जाणार होता. रात्र चांगलीच वाढली होती. मध्यरात्र उलटून रात्रीचा उत्तरार्ध लागला होता. रात्रीची ती दाहकता गडद होत होती. अशा या रात्री ही खोली खरंच खोलावी का? हा प्रश्न त्याला पुन्हा एकदा पडला. पण त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देणार होती का? त्याने दोन्ही हाताने जोर लावत, दाराला मोठ्याने ढकलण्याचा प्रयत्न केला. पण दार मोठे असल्याने, त्यात ते खूप दिवसांपासून बंद असल्याने ते जागचे हलले नाही. त्याने आता दाराला जोरात धक्के द्यायला सुरुवात केली. त्या धक्क्यांचा आवाज वातावरणात घुमू लागला. त्याचे अंग आता धक्के मारून मारून गरम झाले. तो पुन्हा जोरजोरात त्यावर धक्के मारू लागला. दरवाजा हळूहळू मागे सरकू लागला. त्याच्या बिजागरी सैल होऊ लागल्या. त्याने आता दाराला आत ढकलायला सुरुवात केली. दार हळूहळू संथ गतीने आत सरकू लागले. दार मोकळे झाले. ती खोली सताड उघडी झाली. खोली आतमधे चांगलीच मोठी होती. सगळीकडे मोठी अडगळ पसरलेली होती. बाहेरच्या हॉलचा हलकासा प्रकाश त्या खोलीत पडत असल्याने, थोडासा मंद उजेड त्या खोलीत पडत होता. सगळीकडे धूळ, जाळे झाले होते. त्याने खोलीत पाऊल टाकले. त्या मंद उजेडात तो सगळीकडे नजर फिरवू लागला. पण त्या खोलीत पाहण्यासारखे काहीच दिसून आले नाही. मोडलेल्या खुर्च्या, टेबल, सोफा तसेच इतर काही हलके फुलके सामान सगळीकडे पडलेले होते. एक मोठा लोखंडी पेटारा एका कोपऱ्यात ठेवलेला होता. एवढ्या मोठ्या खोलीत केवळ तेवढीच एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या पेटाऱ्यावरून नजर फिरवली. त्यावर मोठे लोखंडी झाकण होते. ते केवळ वर अलगद ठेवलेले असावे. त्याने द्विधा अवस्थेत त्या पेटाऱ्याकडे नजर टाकली. ते झाकण काढू की नको हा प्रश्न त्याला पडला. प दुसर्याच क्षणी, त्याने त्यावरचे ते लोखंडी झाकण, जोरात ओढून बाजूला काढले. पेटारा आता मोकळा झाला होता. त्याने पेटाऱ्यात नजर टाकली. त्या पेटाऱ्यात एक मध्यम आकाराचे मडके ठेवलेले होते. तसेच त्याच्या बाजूला एक प्राचीन ग्रंथांची रद्दी पडलेली होती. त्या मडक्यावर लाल रंगाचे कापड बांधलेले होते. त्याने ते मडके हातात घेतले. त्यावरचे ते लाल रंगाचे कापड, एका हिरव्या धाग्याने बांधलेले होते.
आता या मडक्यात काय असावे? असा प्रश्न त्याला पडला. त्याला आश्चर्य वाटले. या मडक्यात काय असावे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. रात्र बरीच पुढे सरकून गेली होती. दोनचा सुमार झाला असावा.रात्रीचे ते आजूबाजूचे वातावरण एकदम सुन्न झाले होते. जंगल निपचीत पडले होते. कमालीची शांतता सगळीकडे पसरली होती. एवढी घनघोर शांतता कधी त्याला जाणवली नव्हती. एकाच वेळी हजारो माणसांनी आपला श्वास काही क्षणांसाठी रोखून धरावा, त्याने आजुबाजुला कमालीची शांतता पसरावी ,तशी काहीशी घनघोर शांतता सगळीकडे जाणवत होती. काहीतरी बाहेर पडण्याची हजारो डोळे वाट पाहत आहेत, असे वाटत होते. कोणाच्यातरी स्वागताची जंगलाने तयारी केली असावी, असे ऐकून वातावरण तयार झाले होते. जंगलाच्या आजूबाजूचा सगळा परिसर तसाच श्वास रोखून कोणाच्यातरी आगमनाची वाट पाहत होता. पण ते चांगले नक्कीच नसावे. कारण ती शांतता भीतीची होती. संकटाची होती! अपशकुनी होती!
त्याने त्या मडक्यावरचा हिरवा धागा खोलला. तो लगेच खाली गळून पडला. ते लाल रंगाचे कापड त्याने हळूच बाजूला केले, आणि क्षणात ते घडले. एखाद्या मोठ्या फुग्याला टाचणी लावावी आणि त्यातून भसकन हवा बाहेर पडावी, अगदी त्याप्रमाणे त्या मडक्यातून, ते लाल कापड काढले की घडले.काहीतरी त्यातून बाहेर पडून लगेच हवेत अदृश्य झाले. जेव्हा एखाद्या पसरट भांड्यामध्ये गरम पाणी झाकून ठेवलेले असते, आणि अचानक त्यावरचे झाकण काढल्यावर, जी दृश्य स्वरूपातली वाफ दिसते, तशी काहीशी वाफ हवेत विरून जाताना त्याच्या नजरेस पडली. त्या वाफेसोबत एक दुर्गंधीही वेगाने बाहेर आली. एखाद्या घाण द्रव्याने भरलेल्या कापडाला आग लागल्यावर जसा घाण दर्प येतो, अगदी त्यासारखा घान दर्प त्याच्या नाकात शिरला.
त्याच्यासोबत आजूबाजूच्या हवेत चित्रविचित्र आकृत्या उमटू लागल्या. त्या आकृत्यांनी सगळे वातावरण भारून गेले. मडक्यातून काहीतरी बाहेर आले होते. काहीतरी अमानवी मुक्त झाले होते. कित्येक वर्षांपासून बंद होते, ते मुक्त झाले होते. कदाचीत हा भासही असू शकतो. असे त्याचे मन त्याला सांगू लागले. पण हा भास नक्कीच नव्हता. कारण त्या आजूबाजूच्या हवेतल्या चित्रविचित्र आकृत्या यावेळी तो अनुभवत होता. काय होत आहे? हे काय घडत आहे? त्याला काहीच समजेना. पण एक मात्र आहे, हे जे काही घडत आहे, ते चांगलं नाही. ते वाईट आहे. हळूहळू त्या आकृत्या गडद होऊ लागल्या. त्यांचे आकार वेडेवाकडे दिसू लागले. आता त्या आकृत्या भेसूरपणे हसू लागल्या, हेल काढून रडू लागल्या, क्रोधाने गुरकु लागल्या. दुर्गंधी वाढू लागली. त्याची घुसमट वाढू लागली. त्याला चक्कर येऊ लागली. आणि तो मूर्च्छित होऊन खाली जमिनीवर पडला.
किती वेळ गेला, काळ गेला, हे काही कळालेच नाही. कोणीतरी बंगल्याबाहेर जोरजोरात आवाज देत होते.
' राघवss राघवsss' असा जोरात आवाज त्याच्या कानात शिरला. तो गोंधळून जागेवरून उठला. इकडेतिकडे बघू लागला. तो त्या खोलीत होता. बाजूला तो पेटारा होता. ते मडके,लाल कापड, हिरवा धागा असे सगळे काही होते. रात्रीचा सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर चमकून गेला. तो घाबरून गेला. तो गडबडीने त्या खोलीबाहेर पडला. त्याने खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. बंगल्याच्या बाहेर गावातील कोतवाल अब्दुल उभा होता. तो आज पोस्टात न आल्याने, त्याला बोलवायला इकडे आला होता.आंघोळ करून तो अब्दुल बरोबर पोस्टात पोहोचला.
दोन दिवस उलटले असतील. रात्रीच्या दहाच्या सुमारास त्याला जंगलाच्या बाजूने काहीतरी गलका ऐकू आला. अनेक माणसांच्या बोलण्याचा आवाज रात्रीच्या नीरव शांततेत त्याच्यापर्यंत आला होता. तो गडबडीत उठला. आवाज वाखारीच्या खालच्या बाजूने येत होता. बंगल्यापासून वखार जवळच असल्याने तो आवाज स्पष्टपणे कानावर येत होता. तो गडबडीने उठला. वखारीच्या दिशेने जाऊ लागला. वखारीवर माणसांची गर्दी जमली होती.सगळ्यांचे चेहरे काळवंडलेले होते. तो गर्दीतून पुढे जात काय झाले ते बघू लागला. पुढचे ते दृश्य पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडून गेला. पुढे कोणाचातरी अस्थिपंजर झालेला मृतदेह पडला होता. अंगावरचे सगळे मास ओरबाडून काढलेले होते. शरीराचे सगळे अवयव बाजूला काढलेले होते. सगळे लोक त्या देहाकडे बघून घाबरून गेले होते. त्या गर्दीच्या बाजूला अब्दुल होता. त्याने अब्दुलला बाजूला बोलवले.
"अब्दुल काय प्रकार आहे? हा समोर अस्थिपंजर देह कोणाचा आहे?"
तो गोंधळून म्हणाला.
"पोस्टमन साहेब, हा अंबर खोत आहे. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने, गावातील काही लोक त्याला पाहायला वखारीवर आले, तेव्हा त्यांना अस्थिपंजर झालेला खोताचा हा मृतदेह दिसला. ते तसेच गावात धावत आले. सगळा गाव त्यांनी गोळा केला. आणि इकडे घेऊन आले. आम्ही आत्ताच आलो आहोत."
अब्दुल कोतवाल भितभित त्याला म्हणाला.
"कोणी मारले पण त्याला?"
राघवने त्याला अधिरतेने विचारले.
"अजून ते काहीच माहित नाही. पण असं हालहाल करून कोण मारेल? काहीतरी जंगलातील जनावर आले असावे. त्यानी हे कृत्य केले असावे. एखादा माणूस एवढा क्रूरपणे कोणाची हत्या करेल का? हे एखाद्या जंगली प्राण्याचेच काम असावे. पण एवढ्या क्रूरपणे कोणते जनावर असे मारू शकेल. चिंताग्रस्त चेहऱ्यानी अब्दुल म्हणाला.
हळूहळू गर्दी वाढू लागली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आसपासचे लोक भयंकर घाबरले होते. अंबर खोताला कोणी मारले असेल? हाच प्रश्न सगळ्यांना पडू लागला.
" हे माणसाचे काम नाही. वाघ नाहीतर एखादा हिंस्र प्राण्याचे हे काम असावे."
एक गावकरी त्या अस्थिपंजर देहाकडे पाहत म्हणाला.
"असं मरण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. एखादे जंगली जनावर रक्त, मांस खाईल आणि निघून जाईल. पण इथे तर सगळ्या शरीरावरचे मास झडलेले होते. कोणीतरी ते मास हाडापासून विलग केलेले असावे, असे वाटत आहे. शरीरावरचे हात,पाय,बोटे धडापासून वेगळे केलेले आहेत. एखादे जंगली जनावर, असे हात,पाय, बोटे का वेगळे काढेल?"
गर्दीतून दुसरा एक गावकरी म्हणाला.
अनेकांचे अनेक मते झाले. कोणी माणसाला तर कोणी जंगली जनावरला खुनी समजत होते. पण राघव चिंतेत झाला. त्याला एका गोष्टीची जाणीव झाली. हे माणसाचे किंवा एखाद्या जंगली श्वापदांचे काम नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळे आहे. आणि त्याच्या मनात अचानक तो विचार चमकून गेला. दोन दिवसांपूर्वी त्या मडक्यातून काहीतरी बाहेर पडले होते. त्या हवेतल्या चित्रविचित्र आकृत्या, त्यांचा तो विचित्र आवाज,ती दुर्गंधी त्याचा तर इथे काही संबंध नसावा. भीती सरसरत त्याच्या शरीरात शिरली. त्याचा तो विचार जर खरा असेल तर, पुढे खूप मोठे संकट उभे राहील. त्याच्यापासून गावाला मोठा धोका होऊ शकतो. त्याला एक विचित्र हुरहुर लागली. याचा काहीतरी शोध घ्यावा लागणार होता. पण शोध तरी कोणाचा घेणार? कुठे घेणार? कसा घेणार? अंबर खोताच्या मृत्यूने सगळा गाव घाबरून गेला. दोन-चार दिवस गावात चर्चा झाली. पण हळूहळू दिवस ओलांडत होते, तसे गावकरी अंबर खोताला विसरून गेले. हळूहळू सगळे काही पूर्वपदावर येऊ लागले. खोताचा मृत्यू पचनी पडला होता .त्याला आता सगळे विसरले होते.
गावात मध्यभागी महादेवाची मंदिर होते. त्या मंदिराच्या पाठीमागे महंत गोपालदास महाराजांचा आश्रम होता. ते हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराचे मुख्य पुजारी होते सकाळ-दुपार-संध्याकाळ मंदिरात पूजा, हवन, भजन-कीर्तन चालायचे. मंदिर जुने असल्याने लोकांची महादेवावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे सहाजिकच महंत गोपालदास महाराजांना गावात मोठा मान सन्मान मिळत असे.
रात्रीची वेळ होती. रात्रीचे भजन नुकतेच संपले होते. सर्व गावकरी आपापल्या घरी परतले होते. गोपालदास आपल्या आश्रमात आले.आरामकक्षात आराम करायला निघून गेले. रात्रीचा प्रहर उलटून गेला होता. रात्र हळूहळू गहिरी होत चालली होती.
गाव निपचिप पडला होता. गोपालदास महाराजआपल्या कक्षात आरामशीर पहुडले होते. मनातल्या मनात कसलेतरी नामस्मरण चालले होते.अचानक त्यांच्या कानावर घंटेचा स्वर पडला. त्या रात्रीच्या शांत वातावरणात त्या घंटेचा आवाज सर्वदूर पसरला. गोपालदास महाराजांना आश्चर्य वाटले. एवढ्या रात्री मंदिरात कोण आले असावे? हा प्रश्न मनात उमटून गेला. पण दुसर्याच क्षणी त्यांच्या कानावर एक मानवी आवाजातला ,
'" मरा- मरा- मरा- मरा- मरा '"
असा एक जप आला. त्यांना पुन्हा आश्चर्य वाटले. "राम राम" ऐवजी '" मरा- मरा- मरा- मरा- मरा '" असा अपवित्र जप कोण करत असेल? ते त्यांच्या कक्षातून बाहेर मंदिराकडे आले. अशा मध्यरात्री असा अपवित्र जप कोण करत असेल? त्याला पाहिलेच पाहिजे. ते मंदिरात आले. पण मंदिरात कोणीच नव्हते. त्यांनी इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीच दिसेना. मंदिरातील घंटी संथपणे इकडून तिकडे हलत होती. म्हणजे मंदिरात कोणीतरी आले होते. ते मंदिराच्या बाहेर आले. बाहेर सगळा अंधार होता.अचानक त्यांना मंदिरापासून थोड्या अंतरावर कोणीतरी खरडत खरडत जंगलाकडे जातांना दिसले. पाठोपाठ तिकडूनच '" मरा- मरा- मरा- मरा- मरा '" असा जपाचा आवाज येऊ लागला. म्हणजे हाच माणूस असा अपवित्र जप म्हणत आहे. असे स्वतःशीच म्हणत गोपालदास त्या माणसाच्या पाठीमागे जाऊ लागले. पुढचा माणूस खरडत खरडत चालत होता. तो जंगलाच्या आत बराच पुढे निघून गेला. गोपालदास त्याच्या मागे चालत आले. त्याच्या तोंडातून तो अपवित्र जप सुरूच होता. केवढा अपवित्र जप! तोही अशा खर्जातल्या आवाजात! एखादे श्वापद गुरगुरत असावे, असा भास त्याच्या तोंडून तो अपवित्र जप ऐकताना होत होता. गोपालदासांना आश्चर्य आणि त्याचबरोबर मोठा संताप आला. असा अपवित्र जप करणारा हा माणूस वेडाच असला पाहिजे. नाहीतर कोणीतरी राक्षस असला पाहिजे. त्यांच्या मनात असेच विचार चालले होते. आणि एकदम तो पुढचा माणूस जाग्यावर थांबला. गोपालदास ही त्यापाठोपाठ जाग्यावर थांबले.

अंधार असल्यामुळे त्यांना तो माणूस स्पष्ट दिसेना. परंतु एवढ्या लांबूनही, एवढ्या अंधारात त्याची ती नजरेत भरणारी उंची त्यांना जाणवली. सात फुटाच्या आसपास तो उंच असावा.
"हे मूर्ख माणसा! राम नामाचा जप असा उलटा का म्हणत आहेस. '" मरा- मरा- मरा- मरा- मरा '" असा अपवित्र जप म्हणायला, तु राक्षस योनीतील एखादा पापी पामर आहेस का?"
गोपालदास त्याला क्रोधित होत म्हणाले.
तो पुढचा माणूस जप म्हणायचा थांबला. क्षणभर शांतता पसरली. आणि अचानक त्याने हसायला सुरुवात केली.हास्य कसले? ते तर नरबळी देण्यापूर्वी वाजवतात तसे काहीसे वाद्य वाजत आहे, असा भास त्याच्या हस्याचा होत होता. "ढोंगी महाराज! पवित्र जप म्हण्याला, मी मानव आहेच कुठे? मी तर अपवित्र राक्षस दंडक आहे. दंडक! मानवी योनी बाहेरील राक्षस! दंडक!"
असे म्हणत पुन्हा जोरजोरात तो हसू लागला. गोपालदास महाराजांच्या कानात त्याचे ते शब्द बाणासारखे शिरले. ढोंगी महाराज या शब्दांनी त्यांना अपराधीपणा वाटला. त्याच्या त्या हास्याने भीतीचा शहारा अंगभर दाटून गेला. ते मुळापासून घाबरून गेले. हे काहीतरी वेगळे आहे. हे प्रकरण नैसर्गिक नाहीच. इथे मानवी मर्यादा आहे.आपल्या शक्ती बाहेरचे इथे काहीतरी घडणार. येथे काहीतरी वेगळेच आहे. येथे क्षणभरही थांबायला नको. येथे थांबलो तर काहीतरी अपशकुन घडेल. कदाचित आपला मृत्यूही घडेल. त्यांनी पाठीमागे पळायला सुरुवात केली. पण पळायला पायांनी साथ तर द्यायला हवी ना? एखाद्या शक्तिशाली गमात पाय चिटकून बसावे, तसे खाली जमिनीत पाय चिटकून बसले होते. अचानक काहीतरी घरघर त्यांच्या कानात उमटली. पुन्हा त्या खर्जातल्या आवाजात तो
'" मरा- मरा- मरा- मरा- मरा '" असा अपवित्र जप त्यांना ऐकू आला. आता तो जप खुपच जवळून ऐकायला येत होता. खूप जवळून! अगदी कानापासून दोन तीन इंचावरून. त्यांनी पाठीमागे वळून बघितले. आणि त्यांच्या शरीरातले सगळे रक्त जाग्यावर गोठून बसले. धमन्या, शिरा स्तब्ध झाल्या.शरीराचा एक एक अवयव गलितगात्र झाला. मूर्तीमंत भीती चेहऱ्यावर दाटून आली. एवढा बीभत्स,क्रूर अवतार ते पहिल्यांदाच पाहत होते. त्याचे केस, नखे, दात सगळे काही महाभयंकर होते. त्यात मानवी असे काहीच नव्हते. तो खरोखरच राक्षस होता. तो कोण? दंडक! हो दंडकच! क्षणभर गोपालदास महाराजांना, काय होतंय काहीच कळेना. कुठल्या कृतीचा, भावनांचा बोधच होईना. फक्त शरीराला काहीतरी टोचत आहे, खुपसत आहे, चिरत आहे, काहीतरी गरमगरम, ओलेओले शरीरभर पाझरत आहे असे वाटत होते. आपला शेवटचा क्षण जवळ आला आहे अशी त्यांना जाणीव झाली. पण जाताजाता ती गोष्ट त्यांना जाणवली, आपल्या शरीरावर त्याच्या नखांचे असंख्य वार होत आहेत, शरीरभर गरमगरम रक्त पसरत आहे. त्यानेच सगळे अंग ओलेओले लागत आहे. त्यांची शेवटची घटिका जवळ आली. शेवटचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांना ते शब्द ऐकू आले. '" मरा- मरा- मरा- मरा- मरा .'"
गोपालदास संपले होते. दंडकचा दुसरा बळी पूर्ण झाला होता.त्याच पद्धतीने. अगदी अंबर खोताला मारले त्याच पद्धतीने.

(क्रमशः)
वैभव देशमुख.
No comments:
Post a Comment