दंडक (थरारक भयकथा)
भाग - 2
भाग - 2
शंभर सव्वाशे वर्षांनंतर प्रथमच तो डाकबंगला खुला झाला. कितीतरी वर्षांनी त्याचे ते प्रचंड मोठे दार किलकिले झाले. एक मोठा मोकळा श्वास त्या बंगल्याने घेतला. कितीतरी वर्षांची त्याची घुसमट अखेर सैल झाली. अखेर त्या बंगल्याला वारस मिळाला. त्याची कितीतरी वर्षांची प्रतीक्षा संपली होती. त्या बंगल्याच्या अंगाखांद्यावर खेळायला राघव आला होता. डाकबंगला आता मुक्त होता. अगदी निर्धास्त, स्वतंत्र होता. दाराचा मोठा कर्कश आवाज झाला. बर्याच प्रयासाने ते दार खुलले गेले. बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने ते जाम झाले असावे. मजूर मागेच थांबले होते. 'आधी तुम्ही पुढे जा, मग आम्ही पाठीमागून येऊ.' या अटीवर ते मागून आत येणार होते.
हळूहळू संपूर्ण दरवाजा राघवणे मोकळा केला. दाराआडचा तो विशाल बंगला खुला झाला. आत लांबपर्यन्त तो पसरलेला होता. काहीसा अंधार आतमधे जाणवत होता. कोंदट वासाचा एक मोठा भपकारा त्याच्या नाकात शिरला. तो ओलाओला आणि उबग वास त्याच्या मेंदूला चांगल्याच झिणझिण्या देऊन गेला. त्याने बराच वेळ नाक बंद करून ठेवले. हळूहळू त्या वासाची तीव्रता कमी झाली. त्या वासाची थोडी सवय झाल्यावर त्याने नाक मोकळे केले. त्या अंधारात त्याने आत पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या नजरेत काहीच पडले नाही. थोडी नजर सरावल्यावर, त्याला आता एकेक वस्तू अस्पष्ट स्वरूपात दिसू लागली. बंगला आत बराच लांब असल्याने, थोडे अस्पष्टच दिसत होते. कुठल्याच वस्तूचा काही बोध होईना. त्याने एकेक वस्तूवर नजर फिरवली. पण त्या अस्पष्टच दिसत होत्या. धूळ, कोळ्यांचे जाळे, वाळवी, ओल्या वातावरणाची बुरशी सगळीकडे पसरल्याने, त्याच्या आत त्या वस्तू गडप झाल्या होत्या. त्यात हा आतला मंद मंद अंधार, त्यामुळे बाहेरून कोणत्या वस्तूंचा काही मेळ लागेना. अखेर त्याने आत जाण्याचा निर्णय घेतला.
थोडीशी भीती त्याच्या मनाला स्पर्शून गेली. हिकमत चाचाचे 'देवाच्या विरोधी शक्ती अस्तित्वात असते.'
हे वाक्य नेमकेच त्याच्या मनःपटलावर उमटून गेल्याने त्याला थोडी आत जायची भीती वाटली. पण हलकेच हसत त्याने, त्या दरवाजाचा तो भला मोठा उंबरठा ओलांडला. त्याचे उजवे पाऊल त्या बंगल्यात पडले. कितीतरी काळानंतर त्या बंगल्याला मानवी स्पर्श झाला. त्या बंगल्यात कोणीतरी इतक्या वर्षानंतर, पहिल्यांदा पाऊल टाकत होते. त्या जाणिवेने राघवच्या अंगावर एक सरसरून काटा उमटला. एक भयप्रद जाणीव त्याच्या मेंदूतून आरपार झाली. आयुष्यात प्रथमच अशी जाणीव त्याच्या शरीराला झाली.तो क्षणभर तसाच जाग्यावर थांबला. एक पाऊल बंगल्याच्या हात,आणि एक पाऊल बंगल्याबाहेर. आत जावे की मागे फिरावे? हा प्रश्न त्याला पडला. त्याच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली. ते दोन मजूर, त्याच्याकडे तोंड वासुन बघत होते. आता हा काय करेल?हा प्रश्न त्यांना पडला असेल.
पण क्षणातच ते घडले. कुठलीतरी आंतरिक शक्ती त्याच्या आत निर्माण झाली.आणि त्याने दुसरे पाऊल पुढे टाकले. तो बंगल्यात प्रवेश करता झाला. त्याने पूर्णपणे त्या बंगल्यात प्रवेश केला. मघाशी वाटणारी भीती आता पूर्णपणे नाहिशी झाली. आता सर्व काही नैसर्गिक वाटत होते. पाण्यात उडी मारण्या अगोदर काही क्षण वाटणारी कुडकुडीत थंडी, नंतर नाहीशी होते. तसा हा प्रकार घडला होता. पण ती थंडी नाहीशी होत नसते. ती शरीरात कोठेतरी रुतून बसलेली असते. तुम्ही पाण्याबाहेर निघालात कि, ती वेगाने वर उफाळून येते. पाण्यात आहात तोपर्यंत ती जाणवत नाही. आता कदाचित इथेही तसेच असावे. बंगल्यात आहे तोपर्यंत ती आंतरिक शक्ती जाणवणार नाही. पण बंगल्याबाहेर पाऊल टाकले कि, ती वेगाने बाहेर उफाळून येणार.
बंगल्याने त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले. बंगल्यात तो इकडेतिकडे फिरू लागला. बंगल्याचे आतील, बाहेरील सगळे काम गॉथिक पद्धतीचे होते. जुन्या ब्रिटिश काळात सगळ्या इमारतींचे बांधकाम हे गॉथिक पद्धतीनेच बनविलेले असायचे. मुंबईतील जुने व्हिक्टोरिया स्टेशन, मुंबई महानगरपालिकेची इमारत, शाळा, मुंबई पोलिस कमिशनर ऑफीस, म्हैसूर येथील फिलोमीना चर्च, सरकारी कचेऱ्या, राहण्याच्या इमारती, सरकारी बाबूंना राहण्यासाठी बांधलेले घरे अशा कितीतरी इमारती या पद्धतीच्या होत्या. भारतातील बऱ्याच ठिकाणी या इमारती अजूनही दिमाखात उभ्या होत्या. ही ब्रिटिश लोकांची आवडती पद्धत होती. आता बरेच अशे बंगले खितपत पडलेले आहेत. बऱ्याच घडामोडी अशा ठिकाणी घडत असल्याने, अनेक विकृत शक्ती तेथे वास करून असतात. हा डाकबंगलाही अनेक वर्षांपासून बंद होता. त्यामुळे कदाचित इथेही काही शक्तींचा वास झाला असावा.
डाकबंगला बाहेरून,आतून उत्तम कलाकृतीचा एक नमुना होता. दरवाजातून आत गेल्यावर, एक मोठा दिवाणी हॉल होता. पण अनेक वर्षांपासून खितपत पडल्याने, सगळीकडे धूळ, कोळ्यांचे जाळे, आजूबाजूचा वाढलेला कचरा, पावसामुळे आलेले ओलेपण, त्याने सगळा बंगला विद्रुप दिसत होता. हॉलच्यावर एक काचेचे मोठे झुंबर,अलगद झुलत होते. कदाचित दरवाजा उघडल्याने, हवेचा झोत आला असावा. हॉलमधून दोन जिने वर गेले होते. एक उजव्या बाजूचा आणि दुसरा डाव्या बाजूचा. वर चारी बाजूंनी सात-आठ खोल्या होत्या.
त्यावर सगळा बंगलाभर पसरलेला माळा होता. आणि त्यावर टेरिस होते. हॉलच्या पाठीमागे एक गोदामासारखी मोठी खोली होती. एका मोठ्या आकाराच्या दाराने ती खोली बंद होती. त्याला आश्चर्य वाटले. हॉलच्या अगदी पाठीमागच्या बाजूला एवढे मोठे दार का असावे? पण त्याला त्याचा काही उलगडा झाला नाही. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
चोहोबाजूंनी नजर फिरवून त्याने बंगला पाहिला. वरचे झुंबर अजूनही हलत होते. त्याचा किलबिलाट त्या कोंदट वातावरणात भेसूर वाटत होता. मजुरांनी सायंकाळपर्यंत बंगल्यातील मोठा हॉल, वरच्या दोन तीन खोल्या नीट केल्या. हॉलमधून वर जाणारे दोन्ही जीनेही साफ केले.
त्याने एकेक खोली उघडून पाहिली. वीस बाय पंचवीसच्या त्या मोठ्या मोठ्या खोल्या चांगल्या ऐसपैस होत्या. त्यातील दोन खोल्या त्याने वापरासाठी निश्चित केल्या. पण हॉलच्या पाठीमागची ती खोली, खूप प्रयत्न करूनही खुली झाली नाही. तिचे ते मोठे जाड दार, कितीही प्रयत्न करून इंचभरही जागचे हलले नाही. त्यावर माकडाच्या पंजाच्या आकाराचे एक विचित्र कुलूप होते. बरं ते कुलूप होते हे केवळ ते कडीला अडकवले असल्यामुळेच कळत होते. नाहीतर ती काहीतरी विचित्र प्राचीन वस्तू आहे असेच वाटले असते.
चावी लावायला त्याला कुठे छिद्रही दिसेना. केवळ पंजाच्या आकाराचा खोलगट छापा त्यावर होता. त्याने दोन तीनदा त्या कुलुपाला हात लावून पाहिला. पण ते कसे खोलावे हे त्याच्या ध्यानातच येईना. ते कुलूपच भयप्रद वाटत होते. माकडाच्या पंजाच्या आकाराचे कधी कुलूप असते का? त्याला त्या कुलुपाकडे पाहण्याची इच्छाच होईना. पण त्या खोलीच्या आत काय आहे हे पाहण्याची त्यांची इच्छा तीव्र होत होती.
त्या खोलीचा नाद त्याने सोडून दिला. सायंकाळ झाली. सूर्यास्ताचा शेवटचा किरण लुप्त झाला. दोन्ही मजूर गावात निघून गेले. आता तेथे फक्त तो उरला होता. आणि त्याच्या सोबतीला तो प्रचंड बंगला. तो डाकबंगला. सूर्यास्त झाल्याने आजूबाजूची भेसूरता वाढू लागली. आता तो थोडा घाबरला. गावापासून दूर जंगलाच्या कडेला त्या बंगल्याजवळ आपण एकटेच आहोत, ही जाणीव त्याला झाली.
एक एक गोष्ट त्याला आता आठवू लागली. केशव, मजूर, हिकमत चाचा यांचा तो विरोध, त्याच्या मनात उमटू गेला. भीतीचा एक तरंग चेहऱ्यावर सरसर करून उमटून गेला. हॉलच्या पाठीमागील त्या बंद खोलीचे दार, त्यावरचे ते माकडाच्या पंजाच्या आकाराचे ते कुलूप त्याच्या डोळ्यापुढे आले. मनात भीतीची एक काहूर माजून गेली. एक हुरहुर लागून गेली. ती हृदयाच्या एका कोपर्यात घट्ट रुतून बसली. तो बंगल्यात गेला. बंगल्यात वीज उपलब्ध होती. जुनी जोडणी अजूनही चांगली होती. त्याने साफसफाई केलेल्या दोन्ही खोल्यातील, हॉलमधील दिवे लावले आणि तो झोपेच्या आधीन झाला.

अंबर खोत आपल्या लाकडाच्या वखारीवर पोहोचला. गावाच्या उत्तरेला जंगलाच्या आत, त्याच्या मालकीची मोठी वखार होती. आजूबाजूला असणारे मोठे जंगल, त्यात पुष्कळ प्रमाणात असणारे उंच आणि मोठमोठाले वृक्ष. त्या साधनसंपत्तीवर, त्याच्या वखारीचा तो अवैध धंदा सुरू होता.
रोज अनेक झाडे कापून, ते अवैध मार्गाने मोठ्या शहरात तो पाठवत असे. रोझवुड, नागचंपा, सिडार, किंडल, शिसव, कदंब, बांबू, आंबा, जांभूळ असे मोठमोठाले वृक्ष आजुबाजूच्या जंगलात मुबलक असल्याने, त्यांच्या मऊ, टणक लाकडाची अवैध कटाई करून, खोताने गडगंज संपत्ती कमावली होती. पुष्कळ पैसे त्याला या धंद्यातून मिळायचे. विनासायास असा गडगंज पैसा मिळाल्याने, तो मग्रूर बनला होता.
गावातील काही शिकलेल्या व्यक्तींना त्याचा हा धंदा खटकत होता. त्यांनी बराच वेळा त्याची तक्रार वन अधिकाऱ्यांना केली. पण काही फायदा झाला नाही. पैसा, गुंड प्रवृत्ती यांमुळे अंबर खोत गावावर वचक ठेवून होता. एकंदरीत अंबर खोताचा धंदा जोरात सुरू होता.
सायंकाळचा सुमार झाला होता. दिवसभराचे काम पाहायला खोत वखारीवर आला. वखार जोरात सुरू होती. झाडाची कटींग मशीनद्वारे सुरू होती. कटिंग मशीनचा आवाज आजूबाजूची शांतता भंग करत होता. तास दोन तासात अंधार पडायला सुरुवात झाल्याने, मजुरांनी काम थांबवले. मशीन बंद झाल्या. मजूर घराकडे निघून गेले. खोत तिथेच शेडमध्ये बसून, आज झालेल्या कामाची पाहणी करत होता. त्याचा हा रोजचाच दिनक्रम असल्याने, तो निर्धास्त होता.
पण आज जरा लवकरच अंधार दाटून आला होता. त्याला आश्चर्य वाटले. आजची अवतीभोवतीची भयानकता जरा जास्तच भेसूर वाटू लागली. त्याने मनगटावरील घडीवर नजर टाकली. सायंकाळचे सात वाजून गेले होते. वखार गावापासून दूर जंगलाजवळ असल्याने, तेथील अंधार जरा जास्तच तीव्र वाटू लागला. झाडांवरचे पक्षी कधीच घरट्यात निपचीत पडले होते. दिवसा बाहेर पडणारे जीव आप आपल्या निवाऱ्यात कधीच परतले होते. निशाचर सरपटणारे जीव आजूबाजूला फिरत होते. त्यांचे वळवळणे, सरपटणे, सळसळणे यांनी आजूबाजूची शांतता आणखीनच भितीदायक भासत होती. रातकिड्यांची किर्र गुंजारण, जंगलाच्या गाभ्यातून कोल्ह्याच्या कळपाची येणारी कोल्हेकुई, शिकारीला निघालेल्या हिंस्र श्वापदाची प्रचंड डरकाळी यांनी वातावरण अजूनच घनगर्द बनले होते.
त्याच्या मनाला भीतीच्या स्पर्श झाला. त्याचे हे नित्याचेच काम होते. तो रोज यावेळेला वखारीवरच असायचा. पण अशी भीती त्याला आज प्रथमच वाटत होती. आजूबाजूचे सगळे वातावरण त्याला त्याच्या विरोधी झाल्यासारखे वाटू लागले. आजूबाजूला काहीतरी आहे, ते संथ गतीने खरडत खरडत आपल्याकडे येत आहे अशी जाणीव त्याला होऊ लागली. काहीतरी भीतीदायक संकेत त्याच्याकडे येऊ लागले.पण ते संकेत नेमक्या कोणत्या दिशेने येत आहेत याचा बोध त्याला होईना. त्याने स्वतः भोवती गोलाकार फेरी मारून चोहोबाजूंनी पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु काळोखाशिवाय तिथे काहीच दिसेना. त्याची भीती हळूहळू वाढू लागली. तो प्रचंड भयग्रस्त झाला.
आणि हळूहळू तो क्षण जवळ आला. तो तिथे आला. हो तोच! दंडक! मानवी योनी बाहेरील राक्षस! दंडक! खरडत खरडत पाय घासल्याचा आवाज वेगाने अंबर खोताच्या कानात शिरला. त्याने गर्रकन त्या आवाजाच्या दिशेने मान फिरवली. त्या घनघोर अंधारातून कोणीतरी एका पायाने लंगडत येत होते. अगदी संथ! हळूहळू! त्याची आकृती दृश्यमान होत होती. तो मन:पटलावर उमटत होता. तो अंधारातून थोडा पुढे आला. अंबर खोत एकदम सुन्न झाला. त्याच्या मनाने भीतीचा परमोच्च बिंदू गाठला. त्याचे सगळे शरीर खालच्या जमिनीत रुतून बसले. त्याचे डोळे दुप्पट आकाराने मोठे झाले. त्याच्या डोळ्यात प्रचंड प्रचंड भय दाटून आले. आपण काय पाहत आहोत? याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. समोरच्या अंधारातून सात फूट उंचीचा तो येत होता. हो तोच! दंडक! खरडत खरडत चालत तो त्याच्या दिशेने येत होता. सगळ्या अंगावर काळे केस. अगदी अस्वलासारखे. एवढ्या लांबूनही त्याच्या हातावरचे टणक आणि धारदार नखे त्याला दिसू लागले. डोळे विस्तवासारखे लाल. तोंडातले ते दोन पांढरे सुळे. त्या घनघोर अंधारातही ते स्पष्ट दिसत होते. अंबर खोताच्या अंगावर क्षणात काटे उभे राहिले. परमोच्च भीती काय असते, हे सध्या फक्त तोच अनुभवत होता. पुढून येणारे हे महाभयानक संकट आहे तरी काय? हिंस्र श्वापद की एखादा क्रूर राक्षस? तो काहीही असो, पण तो साक्षात मृत्यूचा पाहुणाच होता, यात यत्किंचितही शंका नव्हती. तो अगदी काही फुटांच्या अंतरावर आला. आता तो स्पष्ट दिसू लागला. अगदी स्पष्ट. त्याच्या नजरेतील त्या हिंसक भावाने खोत लटलट कापू लागला. आपल्यासमोर आपला मृत्यू उभा आहे हे त्याला जाणवले. काळ एवढ्या जवळ आला होता की त्याच्यापासून दूर जाण्याची कल्पना मेंदूत उमटेना. पण प्रयत्न करावा लागणार होता. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. जीव वाचावाच लागणार होता. याच भीतीने त्याचे पाय कसेतरी उचलले गेले. तो पळायचा प्रयत्न करू लागला. एक दोन पावले पुढे टाकलेही, पण अचानक पाठीत काहीतरी घुसल्याची जाणीव त्याला झाली. त्याची वेदना सरसर मेंदूपर्यंत गेली. त्याने मागे वळून पाहिले. त्याच्या पाठीवर त्या धारदार आणि टणक नखांचा वार झाला होता. खोत वेदनेने विव्हळु लागला. तो पाठीवरचा वार एवढा खोल होता की, आतल्या हाडापर्यंत जखम गेली होती. पाठीच्या हाडांच्या अगदी सीमेपर्यंत तो वार गेला होता. खोत पुन्हा पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण पुढे काही पावले टाकताच, तो खाली पडला.
दंड खरडत खरडत त्याच्या जवळ आला. त्याच्या पायावर आपला पाय ठेवत, त्याच्याकडे क्रोधाने पाहिले, आणि सपकन त्याच्या मांडीवर वार केला. खोत गुरासारखा ओरडू लागला. त्याची मांडी अक्षरशः चेंदामेंदा झाली होती. मांडीवरचे मास जमिनीवर लोंबू लागले. तो वार एवढा भीषण होता की, अर्ध्या मांडीवर खड्डा पडला. त्या जागेवरचे मास बाजूला झाले होते. त्या मांडीचे ते मोठे हाड स्पष्ट दिसू लागले. खोत तडफडू लागला. खोताची ती धडपड, वेदना पाहून दंडक मोठ्याने हसू लागला. त्याला तसे हसताना पाहून खोत अजूनच घाबरून गेला.
"मला का मारत आहेस. कोण आहेस तू? काय अपराध केला आहे मी?"
खोत वेदनेने कण्हत त्याला म्हणाला.
दंडक एकदम हसायचा थांबला. झटकन तोंड खोताच्या तोंडाजवळ नेत, तो त्याच्या घोगर्या, खर्जातल्या आवाजात म्हणाला,
"तुझा अपराध खूप मोठा. अपराध नाही.तू तर मोठे पातक केले आहेस. आणि या पातकाला एकच दंड आहे. मृत्युदंड! तू काय पातक केले आहे, हे तुला नरकात गेल्यानंतरच कळणार."
त्याचे दोन तीन इंचावरचे ते काळेभिन्न तोंड पाहून खोत गर्भगळीत झाला. एवढा बीभत्स क्रूर चेहरा, एवढे घाणेरडे रूप तो प्रथमच पाहत होता. एवढा क्रूर चेहरा त्याने कधीच पाहिला नव्हता. आपला मृत्यू अशा बीभत्स माणसाकडून, नाही! नाही ! अशा राक्षसाकडून व्हावा याचे प्रचंड दुःख त्याला वाटून गेले. एवढ्या बीभत्स मृत्यूची कल्पनाच त्याने कधी केली नव्हती. आता दंडक पुन्हा जोरजोरात हसू लागला.त्याने खोताला अलगद दोन्ही हातावर धरले, झटक्यात वर उचलले आणि वर हवेत फेकले. आणि तो हवेत असतानाच त्याच्या शरीरावर तो त्या धारदार नखाने सपासप वार करत गेला. एखादा हवा भरलेला फुगा वर हवेत फेकावा आणि त्याला हाताने वरच्या वरच खेळवावे, तसा तो खोताला हवेतल्या हवेत खेळवत होता.त्याच्या शरीरावर सपासप वार करत होता. त्याच्या शरीरावर त्या वाराचे असंख्य वर्ण उमटले. त्याचे सगळे शरीर रक्ताळून गेले.अक्षरश खाली त्या जमिनीवर रक्त, मासांचा चिखल साचला होता. आजूबाजूची सगळी माती नुसती लालेलाल झाली होती. रक्ताच्या, मासाच्या तांबड्या रंगाचे ते दृश्य घृणास्पद दिसू लागले.ते दृष्यच एवढे भयानक होते, की घट्ट हृदयाचा माणूसही मूर्च्छित होऊन पडावा.

अजूनही त्या रक्ताचे थेंब खाली जमिनीवर गळू लागले. पाणी बंद झाल्यावर, नळातून टपटप पाणी पडावे, तसे त्या रिकाम्या झालेल्या शरीरातून खाली रक्त गळू लागले. खोताचा तो अस्थिपंजर देह हवेतून खाली पडला. त्याच्या शरीरावर केवळ हाडांचा सापळा शिल्लक होता. सगळे मास, रक्त खाली गळून पडले होते. शरीरावर असंख्य जखमा झालेल्या होत्या. शरीराचा एक एक अवयव तोडून टाकलेला होता. सगळे शरीर कित्येक भागात विखरून गेले होते. एवढा विकृत मृत्यू! मृत्यू प्रत्येकाला येतो. तो ठरलेलाच असतो. जन्माला एकच मार्ग असतो, पण मृत्यूला अनेक वाटा असतात. तो कोणत्या वाटेने कधी येईल हे सांगता नाही येत. आजारपण, अपघात, आत्महत्या, भांडण, अग्नी, पाणी, रोग, हृदयविकार, मानवी हत्या, मृत्यूदंड, वीज, आशा कित्येक कित्येक वाटा मृत्यूच्या आहेत. या सगळ्या नैसर्गिक वाटा आहेत. पण खोताचा मृत्यू नैसर्गिक होता का? तो क्रूर अमानवी , पाशवी, अनैसर्गक मृत्यू होता.
अंबर खोत संपला होता. तंग झालेले वातावरण थोडे सैल झाले. पूर्वीसारखे नैसर्गिक वातावरण तयार झाले. दंडक कधीच गायब झाला होता. वखारीवर खोताचा मृतदेह पडला होता. शरणपूर मधील पहिला मृत्यू झाला होता. दंडकचा पहिला बळी अंबर खोत ठरला. शरणपूरमधील त्या मृत्यूच्या सत्राला सुरुवात, खोताच्या मृत्यू पासून झाली होती.

(क्रमशः)
अभिप्राय नक्की सांगा.
वैभव नामदेव देशमुख.
No comments:
Post a Comment