( कथा थोडी मोठी असेल त्यामुळे भाग जास्त होईल सहकार्य करा !! मुक्ती कथेच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल क्षमस्व !! )
हॉस्टेल हे विद्यार्थी अवस्थेत असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येकाला परिचित असे स्थान आहे. ग्रामीण गरीब आणी गरजू मुलांसाठी याचाच आधार असतो. ही कथा एका शहराबाहेरील एकांतात असलेल्या मुलींच्या हॉस्टेल मधली आहे. अर्थातच अभियांत्रिकी महाविद्यालये सुद्धा जास्त करून शहराबाहेरच असतात (कँपसच्या जागेसाठी बर पडतात) , कथेतील महाविद्यालय सुद्धा शहरी वस्ती पासून थोड दूरच होते. हॉस्टेल कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यालाच लागूनच होते, कॉलेज चे विद्यार्थी सोडले तर तसे फार लोक काही त्या रस्त्याने येत जात न्हवते. कधी कधी मालवाहू एकदा ट्रॅक वगैरे गेला तर गेला... तसा रस्ता शांतच असायचा. आणि हल्ली जवळपास सर्वच मुलामुलींजवळ टू व्हिलर असतात..त्यामुळे कॉलेज ते हॉस्टेल हे अंतर त्यांना सहज वाटत होते.
हॉस्टेल थोड उंचावर होते त्यामुळे दर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तिथे सकाळी आणि संध्याकाळी दाट धुके दिसायचे...एखाद्या hill station सारखे. आजुबाजुला गर्द झाडी...त्यांची मधुर आणि शीतल हवा सतत मंद अवस्थेत सुरूच असायची...त्यामुळे उन्हाळा फार जाणवायचा नाही. सतत पाखरांची किलबिल असायची...
हॉस्टेल बद्दल सांगायचं झालं तर हॉस्टेल एका मोठ्या "C" आकारात डिझाईन केलेले होते. हॉस्टेल ची इमारत प्रशस्त होती. हॉटेलच्या आत प्रवेश करण्यासाठी एक भल मोठं get होत...त्या गेत मध्ये आणखी छोट प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वार ओलांडले की उजव्या हाताला एक स्टेशनरीशॉप आणि खानावळ होती आणि डाव्या बाजूला पार्किंग आणि ची व्यवस्था त्यामुळे मुलींच्या वाहनाची गैरसोय होत न्हवती...हॉस्टेल ची इमारत तशी चारही बाजूंनी सुरक्षित होती. हॉस्टेल ची इमारत तीन मजली होतील कदाचित तीस वर्ष जुनी असेल...माहिती नाही किती तरी पिढ्या इथे राहिल्या असतील...कित्येक मुलींच्या चांगल्या वाईट स्वभावाला या खोलीच्या भिंतींनी जाणवले असेल, स्वीकारले असेल...
हॉस्टेल चा पायरीवर पाय ठेवला की सर्वात प्रथम दर्शन होत ते म्हणजे "आशा" मॅडम. आशा मॅडम म्हणजे या हॉस्टेल च्या ...."वॉर्डन" अतिशय शिस्तप्रिय कडक स्वभावा च्या ...पण मनाने तिक्याच निर्मळ...मुलींनी शिस्तीत राहावं त्यांना योग्य वळण लागाव म्हणून हे कठोर पणाचे सोंग घेतले असावे...त्यांच्या बैठकीच्याच मागे त्यांची स्वतःची रूम होती...या आशा मॅडम जिथे बसायच्या तिथून hostel चां परिसर पूर्ण मॅडमच्या निरीक्षणात असायचा.
असो,
ऑगस्ट महिना लागला. कॉलेजच्या सर्व एडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्या, ईकडे हॉस्टेल मध्ये सुद्धा ज्यांनचा नंबर हॉटेलच्या लिस्टध्ये होता ते ते पटापट आपले सामान घेऊन हॉस्टेल मध्ये राहायला लागले. जवळपास हॉस्टेल भरत चाललेलं होत...एका खोलीत जवळ पास ३ मुली या पद्धतीने राहत होते.

अशीच एक मुलगी "रजनी" नाव तिचे, स्वभावाने अतिशय चुणचुणीत दिसायला गोरी, डोळ्यांवर कळ्याफ्रेमचा चष्मा त्याला सतत नीट करण्याची ती सवय...आणि अल्लडपणा अजुनही गेलेला न्हवता अशी ती, विदर्भातील एका खेडे गावातून या शहरात अभियांत्रिकी पूर्ण करायला आलेली होती. ती येताच क्षणी सर्व मुलींचे आकर्षणाचे स्थान ठरली. त्याच असे झाले की, ही घरून येताना हॉस्टेल मध्ये आपले सामान एका मोठ्या आणि जुन्या ट्रंक मध्ये घेऊन आलेली होती. (आणली न्हवती तिला आई वडिलांनी सोबत घ्यायला सांगितली होती का तर तर सामान जास्त मावेल !! ) एका हाती पर्स आणि एका हाती ट्रंक... ती ट्रंक एवढी जड होती की तिला एका हाताने धरवेना कधी डाव्या हाताने तर कधी उजव्या हाताने ती ट्रंक पकडत कसरत केल्यासारखी दिसत होती..त्यात तो तिचा काळ्या फ्रेमचा चष्मा सतत नकावरून घासरत होता.. मध्येच त्याला सुद्धा नीट करत होती..मधून मधून ही जड ट्रंक सोबत पाठवली म्हणून आई च्या नावाने दूषणे देत जात होती.
" एखादी नवीन ट्रॅव्हल बॅग दे घेऊन म्हटलं तर कशाला खर्च म्हणाली नी जुनी ट्रंक दिली मला....
हिला काय जातंय सांगायला, मला किती भारी होतंय उचलताना..एक तर त्या रिक्षावाल्याने रिक्षा आत पण नाही घेतली, काय तर म्हणे वॉर्डन मॅडम गुस्सा करेगी..अरे त्या वॉर्डन च जाऊ दे पण माझे खांदे बोंबलतायेत त्याचे काय.."

मधे मधे ओढणीला सावरत कशी बशी हॉटेलच्या त्या पायऱ्या एक एक करून चढत होती...दोन जिने चढून झाल्यावर तिने मोठी धाप टाकली आणि आपल्या ओढणीने आपला घामाघूम झालेला चेहरा पुसत तिने तिला मिळालेल्या खोलीच्या दरवाज्यावर थाप मारली.
दरवाजा उघडला गेला, तिने खोलीत आत बघून खोलीचे निरीक्षण केले तर तिला दिसले की,
कुठे कोपऱ्यात खोलीचा रंग निघालेला आहे, कुठे मुलींनी भिंतीवर बदाम कोरलेला असून त्यात आपले नी आपल्या प्रियकराच्या नाव कोरले आहे, तर कुणी भिंतीवर गणिताचे फॉर्मुले लिहिले आहे आणि कुठे... डाईग्राम चे प्रात्यक्षिके उमटवीले आहे. या सगळ्या वरून तिची नजर त्या दरवाजा उघडणाऱ्या मुलीवर गेली आणि बाजूला असलेल्या एका मुलीवर गेली तिच्या लक्षात आले की त्या खोलीत तिच्या आधीच दोन मुली राहायला आलेल्या आहेत एक सानिका आणि दुसरी साक्षी...आणि आपण तिसरी मुलगी आहोत... तिने बघितले की खोलीत तीनच बेडस आहेत... तीसऱ्याची जागा रिकामी आहे...रंजना मोठ्याने बोलू लागली...

" घ्या म्हणजे आता मी खाली पण झोपायच..."
आधीच त्या ट्रंक मुळे तिचे हात दुखत होते आणि त्यात आता तिला झोपायला बेडच नाही त्यामुळे तिचा त्रागा त्रागा होत होता. त्या दोन मुलींपैकी ज्या मुलीने दरवाजा उघडलेला होता तिचे नाव "साक्षी" होते. ती मध्यप्रदेश राज्याची रहिवासी होती. हिला मराठी समजत होती...तिचे मामा महाराष्ट्राचे त्यामुळे त्यांच्या कडे राहून तिला मराठी समजायला लागली पण बोलता येत न्हवते त्यामुळे तिने हिंदीत बोलायला सुरुवात केली.
"अरे यार तेरा आते ही नाटक शुरू हो गया..ओर ये क्या है, इतनी बडी सुटकेस लेकें आयी तू ?”
तसही तिला आपल्या खोलीत बेड नसताना तिसरी मुलगी राहायला आली याचेच जास्त वाईट वाटत होते..
ही साक्षी बोलायला थोडी फटकळ होती...जे आहे ते डायरेक्ट बोलायचं कोणाची ही तमा मनात बाळगायची नाही...आणि म्हणूनचं ती तिच्या मामाकडे जास्त दिवस रहली नाही कारण मामी आणि साक्षी चे पटायचे नाही. रंजना तर बघायलाच नको...तिने पण आपल्या येत नसलेल्या हिंदीत तिला सूनवायला सुरुवात केली.

"अरे ये कोण्ये मतलब रंजना हैं मै, विदर्भ की हू .."
त्या दोघींचे आल्या आल्या भांडणे होत असलेले पाहून खोलीतली ती आधीच राहायला आलेली पहिली मुलगी पुढे आली. या मुलीचे नाव सानिका. अतिशय रेखीव चेहरा, गोरी, शांत धीर गंभीर स्वभाव, निरागस, समजूतदार, चेहऱ्यावर सतत स्मित हास्य ठेवणारी, वेळेला मदतीला हजार असणारी, आणि मुख्य म्हणजे कमी बोलणारी, आपले काम बरे नी आपण असा विचार करणारी होती. ती त्यांचे भांडणे सुरू असताना मध्येच बोलायला लागली. त्यांचे भांडण थांबवत मध्येच ...
" हाय !! im सानिका " आणि तू?"
तिचा तो निरागस आणि सात्विक चेहरा बघून आणि तो तेजस्वी "औरा" अनुभवून रंजना भांडायचच विसरली, आणि लगेच आपला साक्षीकडे बोट रोखून धरलेला हात तिने, सानिकाने मैत्रीसाठी पुढे केलेल्या हाताला पकडून जोऱ्याने हलवून ...
" हाय मी रंजना...from विदर्भ !!" अस म्हणाली.. आणि लगेच आपल्या तो काळ्याफ्रेमचा चष्मा नकावरच सावरला. पुढे सानिका म्हणाली...
" हाय मी रंजना...from विदर्भ !!" अस म्हणाली.. आणि लगेच आपल्या तो काळ्याफ्रेमचा चष्मा नकावरच सावरला. पुढे सानिका म्हणाली...
"काय ग साक्षी ती एवढी दमून आली आहे आल्या आल्या दरवाजाच्या पुढे काय भांडत्येस तिच्याशी... साक्षी सनिकाची खूप चांगली मैत्रीण होती. ती पण सानिका सोबतच राहायला आली असल्यामुळे त्या दोघी चांगल्या मैत्रीनी झाल्या होत्या. आणि ती सनिकाचच ऐकायची त्यामुळे ती जास्त वादात पडली नाही आणि आपल्या पलंगावर जाऊन बसली...रंजना पण आता आली ती भली मोठी ट्रंक भिंतीला लाऊन खाली चटई टाकून बसली...पाणी वगैरे पिली आणि सानिका ला विचारू लागली...
" सानिका...इथला पलंग कुठे आहे ग, नाही म्हणजे तू आधी पासून राहते म्हणून "तुला" विचारले..."
रंजना पलंगावर बसलेल्या साक्षीला उद्देशून बोलली.
"आपल्या आधी काही सीनिअर मुली इथे राहत होत्या... इथे होता आधी एक पलंग पण तो एका बाजूंनी मोडल्या सारखा झालेला होता तर त्याला दुरुस्तीला नेला होता, होईल एक दोन दिवसात नीट...dont वरी तू मझ पलंग share करू शकतेस तो पर्यंत."...
सनिकाचे ते बोलण ऐकून साक्षी मात्र तिला डोळ्यानेच इशारे करत होती... ”लेकीन क्यू क्या जरुरत है ?”
सानिका ने पण तिला डोळ्यांनीच, जरा धीराने घे असे म्हटले...
सानिका ने पण तिला डोळ्यांनीच, जरा धीराने घे असे म्हटले...
सानिका आल्या पासून बडबड करत होती...तिची ती बडबड ऐकून साक्षी तिला म्हणाली...
" कितीनी बोलती हैं यार रज्जो तू..."
" कितीनी बोलती हैं यार रज्जो तू..."
"रज्जो.. अरे वा !! मस्त नाव आहे शॉर्ट but स्वीट" ..सानिका रंजनाकडे हसत म्हणाली..
रंजना ला पण ते आवडले होते पण साक्षीने आपले नाव ठेवले आहे म्हटल्यावर तिला उगाच काहीतरी क्रॉस करावं म्हणून म्हटले..
"रंजू" काय वाईट आहे... माझी आहे रंजु म्हणून हाक देते मला..." रंजना आपल्या कपड्याची घडी करत बोलत होती.
तिघी बोलून शांत झाल्या, संध्याकाळ होत आली होती त्यामुळे पाखरे आपल्या घरट्यात परत जात होती...ते दृश्य सानिका आपल्या रूमच्या खिडकी मधून न्याहाळत होती...आणि मनात एक गाणं गुणगुणत होती...
"सांज ये गोकुळी .. सावळी सावळी
सावळ्याची जणू सावली सावली..."
सावळ्याची जणू सावली सावली..."
तीच ते गाणं गुणगुणने रज्जो आणि साक्षी बसून निवांत डोळे बंद करून ऐकत होते....मावळत्या सूर्याची ते सोनेरी किरणे खोलीत येत होते... या शांत खोलीत फक्त सानिकाच्या गुणगुणन्याचा आवाज आणि फिरणाऱ्या पंख्याचा आवाज एवढंच येत होता...
सानिका गुणगुणता थांबली ...रंजना तिला म्हणाली..
सानिका गुणगुणता थांबली ...रंजना तिला म्हणाली..
"सानिका का थांबलीस गाना...काय सुंदर गुणगुणते तू..."
साक्षीला ते गाणे ठाऊक न्हवते पण तिला सानिका जे गुणगुणत होती ते आवडले होते तिने पण सानिकाला तेच म्हटले..
त्या दोघींचे बोलणे ऐकून सानिका म्हणाली...
" माझी आई गुणगुणते हे गाणे .. मी तिच्याकडून ऐकले होते... तिला परत म्हण म्हटले तर म्हण्याची की अस म्हण म्हटल्याने थोडीच येतं ते...त्यासाठी निसर्गाने साथ द्यायला हवी...आत्ता हे गाणं मला या मावळत्या सूर्यामुळे म्हणावे असे वाटले.."
एवढ बोलून सानिका परत निसर्ग न्याहाळत होती. पुढे साक्षी म्हणाली,
"चलो ना हम हॉस्टेल का चक्कर लगा कर आते है !! ”
सानिका आणि रज्जो पण यायला तयार झाल्यात. त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला..आणि हॉस्टेल फिरायला निघाल्या.
सुरुवात खालच्या मजल्या पासून केली सर्व रूम्स पॅक होत्या...मोठमोठाले कॉरिडॉरस होते...आणि कॉमन बाथरूम आणि टॉयलेट्स...आणि प्रत्येक फ्लोर च्या एका कोपऱ्यात पिण्याच्या थंड पाण्यासाठी cooling मशीन होती...खालचा मजला बघून झाला, खूप मस्ती सुरू होती मुलींची तिथे...कोणी धावत पळत होत कोणी गॅलरी मध्ये उभे राहून कानात हेडफोन्स घालून गाणे ऐकत वाहणाऱ्या हवेचा आस्वाद घेत उभे होते ... सेकंड फ्लोरला या तिघी राहतच होत्या त्यामुळे हा फलोर पण बघितला होता...

आता टेरेस वर जावे म्हणून त्या तिघी वर जाऊ लागल्या तर वॉर्डनम्याम तिथून जात होत्या..त्यांनी त्या तिघींना तिकडे जण्या पासून रोकले आणि परत या मार्गाने येताना दिसल्या तर गाठ माझ्याशी आहे असे बजावले आणि निघून गेल्या...
आणि झा ssssल.... यांच्या मनांत प्रश्नाचं थैमान सुरू झाले...!! काय असेल तिथे...? वॉर्डन मॅडम ने का रोखले असणार आपल्याला तिथे जन्या पासून...? तिसऱ्या मजल्यावर एकही मुलगी का नाही...सर्व रूम्स खाली का आहेत ?
या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मॅडम ल विचारावं तर साक्षात अपमानालाच निमंत्रण होते ....तिघी ही तिसऱ्या मजल्यावर न जाता आपल्या रूम मध्ये
प्रश्नार्थक नजरेने शिरल्या...आपणच ते शोधूयात अस साक्षी ने ठरवले...
प्रश्नार्थक नजरेने शिरल्या...आपणच ते शोधूयात अस साक्षी ने ठरवले...
क्रमशः
©हिमांशू तरार.
©हिमांशू तरार.
No comments:
Post a Comment