समय - ती एक अनाहूत वेळ ! (भाग १)
साधारण जुलै महिन्याचा काळ सुरू असल्यामुळे, पावसाने बऱ्यापैकी जोर धरलेला होता. त्याचवेळी, रात्रीचे 12 वाजल्यामुळे किर्रर्रर्र अंधार पडला होता. पाऊस काही ऐकायचं नाव घेत नव्हता, धो-धो पावसात रस्त्याच्या चिखलात पाय रोवत होते. मुंबईची ही झगमगती मायानगरी अंधाराच्या सावटाखाली निपचित पडली होती.
अशा काठी प्रसंगी क्षिती एकटीच घराकडे निघाली. सळसळत्या रक्ताने भरलेली, नव्या उमेदीने ल्यायलेली, पुस्तकांच्या दुनियेत हरवलेली, हि क्षिती म्हणजे, "सिटी लाईव्ह" या न्युज चॅनेलची सगळ्यात तरुण अँकर होती. तरुण असल्यामुळे काहीतरी वेगळं करून दाखवायच्या जिद्दीने ती सदैव पेटलेली असायची. अँकर असूनही, फक्त टीपीवर स्क्रोल होणारी वाक्य वाचणं तिला मंजूर नव्हतं. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक बातमीच्या तळाशी जाऊन त्यामागचं सत्य उजेडात आणणारा खरा पत्रकार!
याच तिच्या धडाडीपणामुळे ऑफिस मध्ये बसून हाती लागलेल्या एका विषयाचा अभ्यास करण्यात ती गुंग झाली होती. घड्याळात रात्रीच्या 12 चे ठोके पडले तेव्हा कुठे तिची तंद्री भंग झाली. क्षितीचं ऑफिस होतं अंधेरीला आणि ती राहायला होती बोरिवलीला. त्यामुळे, धावतपळत येऊन 12.30 ची लोकल तिने पकडली. त्या भयाण पावसात सुटलेल्या वाऱ्याने ओसाड पडलेल्या त्या लोकलच्या खिडक्या आणि दारं धडाधड एकमेकांवर आदळत होती. पण, धाडसी क्षितीला तिळमात्रही कसली भीती वाटत नव्हती. मरण आलं तरी भीती वाटणार नाही इतकं करारी जीवन तिला जगायचं होतं. त्यामुळे, पूर्ण रिकाम्या लोकलमध्ये न घाबरता पुस्तकात डोकं घालून क्षिती बसली होती. वाचन करता करता कधी बोरिवली स्टेशन आलं हे तिला कळलं देखील नाही. हातातलं पुस्तक बॅगमध्ये टाकत आणि कशीबशी बॅग सावरत ती लोकलच्या दरवाजात पोहोचली असताना अचानक जोरदार पावसामुळे लाईट चालूबंद होऊ लागल्या आणि बरोबर अलीकडच्या दरवाजाजवळ पूर्णत: काळ्या गडद रंगाची साडी नेसलेली, कमरेपर्यंत लांब केस सोडलेली बाई तिला दिसली. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे चेहऱ्यावर येत असल्याने क्षितीला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण, चालू- बंद होणाऱ्या त्या लाईटच्या उजेडात तिला त्या अनामिक बाईची एकच गोष्ट दिसली. त्या बाईच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावर नाव लिहिलं होतं "समय" !
अगदी काहीश्या सेकंदात सारं काही घडलं होतं. स्टेशन जवळ आल्यामुळे इच्छा असूनही ती त्या बाईशी बोलू शकली नाही. पण, क्षिती घरी पोहोचेपर्यंत हाच विचार करत होती की, ती बाई कोण होती?? इतक्या रात्री अशी एकटीच, ते सुद्धा असा अवतार घेऊन कुठे निघाली होती ?? तिच्या हातामधलं "समय" नावाचं पुस्तक नक्की काय सांगू इच्छित होतं?? प्रश्नांची घुसळण डोक्यात घेऊन क्षिती घराच्या दिशेने रपारप पाऊलं टाकत होती !
मुसळधार पाऊस,त्यात रस्त्यावरच्या चालू बंद होत असलेल्या स्ट्रीट लाईट्स रस्त्यावरून इतकं पाणी ओथंबून वाहत होतं की तिची जिन्स भिजत होती..आजच तिला उशीर झाला अशातला भाग नव्हता पण एरवी यावेळेस एखाद दुसरी कार किंवा मोटरसायकल अशी तुरळक वाहतूक असायची पण आज रस्ता अगदी सामसूम होता चिटपाखरू ही नव्हतं...सोसाट्याचा वारा वाहत असल्याने पावसाचे थंडगार थेंब तिला चिंब भिजवत होते...छत्री, खांद्यावरची बाॅग एरवी ऑफिसात असणारा लॅपटॉप आजच सोबत घेऊन आलेली..असं हे बोचकं सावरत ती चालत होती..आज वातावरण वादळी होतं पण त्यात एक वेगळीच निरव शांतता होती...सतत कोणी तरी पाठलाग करतय असं वाटत होत तिला पण थकव्यामुळे भास असेल म्हणून ती चालत राहिली..पण त्यातल्या त्यात खात्री करून घ्यावी म्हणून तिने गांधी चौकातून उजवीकडे वळताना एकदा मागे वळून पाहिलं..मागे कोणीही नव्हतं..ती आता झप झप पावले टाकत घरी पोहचली...
गांधी चौकातून पुढे वीस मिनिटांच्या पुर्नवसू अपार्टमेंट्स अशी पाटी असलेल्या बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर होतं...एरवी तिला स्टेशनवरून घरी पोहचायला वीस -पंचवीस मिनिट लागायची पण आजच्या वादळी वातावरणामुळे तिला तब्बल पाऊण तास लागला होता..लिफ्टने ती पटकन वर आली..किल्लीने दरवाजा उघडून तिने आत शिरून हातातलं सामान आणि बॅग सोफ्यावर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि बाथरूम मध्ये पळाली.अंगावरचे ओलेते कपडे बादलीत टाकून तिने गरम पाण्याचा शाॅवर चालू केला..गरम गरम पाणी अंगावर पडताच तिला जरा बरं वाटलं...
ती आवरून हाॅल मध्ये आली..ऑफिस मध्ये राहिलेलं काम आपण घरी पुर्ण करू असं तिने ठरवलेलं पण आता दोन वाजत आले होते तसही दुसर्या दिवशी ती दुपार नंतर ऑफिसला जाणार होती..म्हणून सकाळी जरा लवकर उठून करू असा विचार करून ती किचनमध्ये गेली..जेवायचा तिचा मुड नव्हता..म्हणून ती थोडसं थंड दुध प्यायली अन् रूममध्ये आली.रूममधला छोटा बल्ब तिने पेटवला आणि मंद निळा प्रकाश रूमभर पसरला फॅन लावून ती बेडवर आडवी झाली..पडल्या पडल्या ती दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत होती...तेव्हा तिला त्या बाईची आठवण झाली..तिच्या हातात असलेलं ते पुस्तक आठवलं..."समय" असचं होतं त्या पुस्तकाचं नाव...तिने थोडा विचारांवर जोर दिला पण तिच्या वाचनात हे पुस्तक कधी आलं नव्हतं..आणि पुर्वी कधी ऐकण्यातसुध्दा नव्हतं.तिला तिचा तो अवतार आठवत होता.गदड काळ्या रंगाची साडी,कमरेपर्यंत लांब सोडलेले केस.. एवढ्या रात्री कुठे गेली असावी ती??? कोण होती ती.विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलचं नाही...उद्यापासून तिचं आयुष्य एक वेगळं वळण घेणार होतं..एक नवीन अध्याय सुरू होणार होता..याची पुसटशी कल्पना ही नसलेली शरीराने थकलेली क्षिती गाढ झोपली होती..
डोळे उघडले तेव्हा नऊ वाजत आले होते..ती बेडवर उठून बसली..आळस देत उठत तिने खिडकीचे पडदे बाजूला केले...पडदा बाजूला होताच सोनेरी किरणं तिच्या चेहर्याला स्पर्शून गेली..खोलीभर लख्ख प्रकाश पसरला...अस्तव्यस्त झालेले केस बांधत ती बाथरूम मध्ये गेली..फ्रेश होऊन ती किचनकडे वळली..रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्तामुळे मळमळत होतं..तिने साधेसे गुळपोहे केले..आणि वाफाळलेला मस्त आल्याचा चहा होताच....!!!
खाऊन झाल्यावर तिने रात्री राहिलेलं काम करायला घेतलं होतं..अकरा वाजता तिला बाहेर जायचं होतं म्हणून ती भरभर काम करत होती.साडेदहा वाजता ती बाहेर पडली.रिक्षात बसून तिने स्वरूप कॅफे गाठलं..अजून तो आला नव्हता..ती नेहमीच्या जागी बसली..तेवढ्यात तिथे राजु आला."काय ताई आज लवकर का..??".."अरे मी वेळेवर आलेय..तोच नेहमी उशीर करतो माहित आहे ना तुला.." राजु हसत हसत गेला..
तर ती थांबली होती शरद साठी..शरद साठे तिच्या आयुष्याचा भावी जोडीदार तिचा प्रियकर..शरदच्या हाताला कला होती तो एक उत्तम चित्रकार होता.पण चित्रकला त्याचा छंद होता ..तो संगीत अकॅडमीत संगीत प्रोफेसर होता..काॅलेज मध्ये असताना त्यांचं प्रेम जुळलं होतं..तीन वर्ष ते सोबत होते..दोघांच्या घरच्यांना त्यांनी त्यांच्या नात्याची कल्पना दिली होती...दोघेही आपापल्या करिअर मध्ये बर्यापैकी स्थिरावले होते आणि लवकरच लग्न करणार होते..
तेवढ्यात शरद पळत पळत येऊन तिच्या समोर बसला."काय हे शरद किती उशीर तब्बल अर्धा तास वाट बघतेय मी..अरे आपलं भेटायचं ठरलं म्हणून मी हाफ डे जायचं ठरवलं मला लवकर निघायचय.बोल काय अर्जंट काम होतं का..??" "अरे हो हो थांब जरा..थोडासा उशीर झाला की सुटली लगेच तुझी ट्रेन धाड धाड..ट्राफिक होतं अगं."असं मिस्किल बोलत त्याने काॅफीची आॅडर दिली.राजू काॅफी ठेवून गेला."अगं काही खास नाही म्हटलं बरेच दिवस झाले भेटलो नाही म्हणून म्हटलं भेटावं..तुला भेटायला मला काही ठोस कारण नको." "हो ते तर आहेच.." जरा गप्पा झाल्यावर क्षिती ऑफिसला निघाली..
ती बॅग आणि लॅपटॉप सोबत घेऊन आलेली..तिने बाराची लोकल पकडली.चढताना तिला कालचा प्रकार आठवला..पुन्हा ते विचार तिच्या मनात डोकावू लागले..तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं..त्यासाठी सगळ्यात आधी तिला त्या पुस्तकाविषयीची माहिती मिळवण गरजेचं होतं..आणि मग ती बाई कोण आहे इथे कोणत्या शोधात आली आहे हे समजलं असतं..ती पत्रकार असल्याने ती बऱ्याच प्रकाशक,लेखक,तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींशी संपर्कात होती..तिने त्यांची मदत घेण्याचं ठरवलं..
ती विचारात असताना कधी स्टेशन आलं तिला ही समजलं नाही..पटकन उतरून तिने "सिटी लाईव्ह" या तिच्या चॅनल ऑफिसची वाट धरली..ऑफिसमधे येताच तिने काहीतरी कामाचा मेल तिच्या बाॅसला पाठवला आणि ती कॅफेटेरियात शिरली..तिथे तिची मैत्रीण निना बसलेली दिसली..लंच ब्रेक सुरू होऊन काहीच मिनिटं उलटली होती त्यामुळे बहुतेक सगळेच तिथे होते..ती निनाजवळ आली..."अगं आज उशिर का झाला."निनाने विचारलं. "अगं आज हाफ डे होत.शरदला भेटायला गेले होते.." अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तिने काल घडलेला सारा प्रसंग तिला सांगितला.पण तिने ते हसण्यावारी नेलं आणि म्हणाली,"अगं एवढ काय त्यात हल्ली नेसतात बायका काळ्या रंगाच्या साड्या..इट्स फॅशन यार..आणि त्यात त्या पुस्तकाचे म्हणशील तर असेल एखादा जुनं..जास्त लक्ष नको देऊस.." असं म्हणून ती उठून निघून गेली..
पण इतकं ऐकुन ही क्षितीचं समाधान काही होत नव्हतं..ती विचार करत होती त्या बाईचा तो अवतार फॅशन नक्कीच नव्हता..मगाचपासून त्या दोघींची सुरू असणारी चर्चा ऐकणारा समीर त्याचा टेबलावरून क्षिती समोर येऊन बसला आणि बोलला,"तु नक्की त्या बाईचा विचार करत असशील नाही का..तु सांगितल्या प्रमाणे त्या बाईच वर्णन हे नक्कीच फॅशनेबल नव्हतं.." त्याने आपल्या मनातील विचार अचूक कसे काय हेरले हा विचार करत ती त्याच्या कडे आश्चर्याने पाहू लागली.तो परत म्हणाला," अगं अस थक्क व्हायला काय झालं हे सगळं ऐकल्यावर तुझ्या चेहर्यावरचे भाव कोणीही सहज ओळखेल...आणि असं बघ तुझ्या वर्णनावरून तरी हा प्रकार थोडा वेगळा वाटतोय.." "हो अरे मला ही तसचं वाटतयं.या रहस्याचा पडदा उठवायला करशील मला मदत..??" क्षिती.."हो ऑफ कोर्स..आताच मी माझ्या एका प्रकाशक मित्राला फोन करून या पुस्तकाविषयी विचारतो..चल निघूया लंच ब्रेक ओवर.." क्षिती आपल्या डेस्कपाशी आली...आणि कामात गुंतली..तास दोन तासांनी समीर तिच्या कडे गेला आणि म्हणाला,"साॅरी यार मी खूप जणांना काॅल केले पण कुणालाच त्या पुस्तकाविषयी काही माहित नाही." "ओह असो..बघु कळेल काही..प्रयत्न करू आपण.." क्षिती म्हणाली आणि परत कामाला लागली..
आज ती लवकर निघाली..नऊची लोकल पकडली तिने.पाऊस काल पासुन सतत पडत होता..ती आत जाऊन खिडकीपाशी बसली..तिला जरा वेगळ वाटलं कारण नऊ वाजता तो डब्बा खाली होता..बहुदा ती पुर्ण लोकल खाली असावी असा तिने अंदाज बांधला..ती जिथे चढली तिथेही कोणी चढलं नव्हतं..पण असेल काही असा विचार करत तिने पुस्तकात डोकं खुपसलं...पाऊस कमी झाला होता तरीही हवेत कमालीचा गारवा वाढला होता..आता खिडक्यांची उघडझाप होत होती.लाईट चालु बंद होऊ लागल्या..क्षितीने पुस्तक मिटलं..आणि आपण कुठं पोहचलोय हे पाहाण्यासाठी बाहेर पाहू लागली..पण बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता...
.
.
.
.
क्षिती नेमकी पोहचली कुठे हे पुढच्या भागात...
वाचकहो, भयकथा लिहिण्याचा आणि या समुहावर पोस्ट करण्याचा पहिलाच अनुभव...कथा कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद....

No comments:
Post a Comment