हल्ली आई सारखी बागेत का जाते हे समजेनासे झालय ,म्हणजे सकाळ संध्याकाळ बागेकडे जाण्याचा ध्यास लागल्यासारखं होतंय तिला असं वाटतंय . आमच्या समोरच बाग आहे ,म्हणजे आम्ही पिढ्यान पिढ्या इकडे राहतोय ,आमच्यासमोर ही बाग निर्माण झाली असेल आधी मोकळ मैदान होत . मी आणि आई च राहतो घरात ,म्हणजे आम्ही दोघीच आहोत कित्येक वर्ष ,आईची सत्तरी उलटून गेली असेल कदाचित आणि मी अशी राहिले अनमॅरिड ,आम्हीच दोघी एकमेकांना ,पण हल्ली आई सारखी बागेत जायला लागली होती ,कित्येक वर्ष बागेसमोरची खिडकी उघडली नव्हती ,म्हणजे लोक बघत बसतात विचित्र नजरेनी खिडकीकडे ,तेंव्हापासून बंदच ठेवली आहे . आई कुठे जाते हे रहस्य मला खिडकीतूनच समजले ,म्हणजे आठवडाभर ही सकाळी उठून कुठे जाते ह्याच कुतूहल,बरेच वर्ष मी कुठेही बाहेर जातच नाही त्यामुळे बाहेरच्या जगाशी तसा आमचा संबंध नाही पण आई अचानक जायला लागली त्यामुळे मी सहज खिडकीची खिट्टी उडण्याचा प्रयत्न केला तर काचच निखळली खिडकीच्या फ्रेममधून ,का आधीच नव्हती काच मला काही आठवत नाही ,पण मी खिडकीतून बघितलं तर आई बागेच्या दिशेनी जात होती . बराच वेळ झाला आई बागेत बसली होती म्हणजे मला दिसत होती स्पष्ट ,कोणीतरी होत बरोबर पण मला दिसत नव्हतं,मी निरखून बघितलं तर आई खरंच कोणीतरी समोर आहे असे हावभाव करत होती ,मधूनच हसत होती . मी दचकले आई अशी का करतीये काही समजत नव्हतं . मला कोणीच दिसत नव्हतं आजूबाजूला पण कोणीतरी नक्की होत तिच्या बरोबर ,पण कोण असावं ?इतके वर्ष कधी आई अशी बाहेर गेली नव्हती आणि असं कोणाशी ,म्हणजे कोणीच दिसत नव्हतं मला तरी ,आज विचारायचंच आईला ह्याबध्दल घरी आल्यावर ..
आई आली ,अगदी आनंदात होती . कोण होत बागेत तुझ्याबरोबर ?आई काहीच बोलली नाही .
हल्ली गेले आठवडाभर बबलू सारखा बागेत जातो ,म्हणजे त्या दिवशी न सांगता हळूच घरातून निघून गेला ,शोधल्यावर बागेत सापडला . नुकतंच सहावं पूर्ण केलं होत त्यानी ,हल्ली हरवल्यासारखाच वाटतो मला ,त्याचे बाबा गेल्यावर मी आणि तो फक्त ,म्हणजे त्याची दुपारची शाळा त्यामुळे सकाळी शाळेत आणि दुपारपासून मी आणि तोच फक्त घरात ,गेले काही दिवस सारखा खिडकीत उभा राहिला लागलाय असं मला जाणवलं ,कोणाशी तरी हातवारे करताना वाटत होता पण मला वाटलं लहानपणाचे खेळ असतील काहीतरी पण नंतर मला जरा हे सीरिअसच वाटलं ,कारण सकाळी उठला की सरळ माझ्याशी सुद्धा न बोलता खिडकीत जाऊन उभा राहायला लागला होता . त्यादवशी इतका गुंग झाला होता मी मागे उभी आहे हे सुद्धा त्याच्या ध्यानात नाही आलं ,मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर दचकला . "बबलू काय रे बागेत बघून काय हातवारे करतोस ?" बबलू आधी गोंधळला पण नंतर निष्पाप पणे म्हणाला "आई त्या समोरच्या बाकावर आजी असते बसलेली ,ती बोलते माझ्याशी "मी दचकले ,पण असेल कोणीतरी म्हणून माझीच समजूत काढून घेतली कारण कित्येकदा कोणी नसताना बबलू समोर हातवारे करून काहीतरी बोलत असे .
आज ह्यांना सांगायचंच हे ठरवलं होत बबलू बद्धल ,दुपारी बबलूच्या बस चा आवाज ऐकला म्हणून दार उघडून ठेवलं ,पहिला माळा आमचा ,बबलू आला की खालूनच हाका मारत येतो वरती आई आई करून ,पाच मिनिट झाली तरी बबलूची चाहूल लागली नाही म्हणून मी दारातून जिन्यात डोकावले ,बबलू दिसला नाही . म्हणून खिडकीत गेले तर मला धक्काच बसला माझ्या जीवाचा थरकाप उडाला ,बबलू समोर बागेत त्याच बाकड्यावर बसला होता आणि हातवारे करून कोणाशी तरी बोलत होता . माझी वाचाच बसली म्हणजे मला काय करावं तेच सुचलं नाही ,मी जीव एकवटून हाक मारली "बबलू आधी वरती ये "बबलूच लक्षच नव्हतं . मी गलितगात्रच झाले ,मी परत हाक मारली ,बबलूनी त्या बाकावरून माझ्याकडे निर्विकार नजरेनी बघितलं ,मी धसकले ,काय झालं माझ्या बबलूला ?मी धावतच खाली गेले ,बागेच्या गेटमधून आत त्या बाकाजवळ गेले ,बबलू दचकला मला बघून ,"बबलू 'मी त्याचा गच्च हात धरला ,चल आधी घरी ". कोणाशी बोलत होतास ?" "आजीशी "बाप रे काहीतरी अगम्य वाटलं मला एकदम ,बबलू किती लहान आणि हे असं का ?मी खोदून खोदून त्याला विचारलं "अरे कोण आजी ?मला तर कोणच दिसलं नाही तुझ्याबरोबर ,कुठे राहतात त्या आजी ?मला तर रडायलाच आलं एकदम ,"अरे कुठे राहतात त्या आजी ,कश्या दिसतात ,तुझ्याशी काय बोलतात ?" बबलू सुद्धा कावराबावरा झाला ,त्यासुद्धा काय बोलावं सुचेना ,"त्या बागेसमोरच्या घरामध्ये राहतात त्या आजी ,पहिल्या माळ्यावर "चल मला दाखव कुठे ते ,मी तरातरा बबलूला घेऊन रस्त्यावर आले ,बबलूनी समोरच्या खिडकीकडे बोट दाखवले ,मी समोर बघितले अरे ही खिडकी तर कायम बंद असते ,त्याची एक काच फुटलेली आहे ,येता जाता लक्ष जात कधी कधी त्या खिडकीकडे ,मला तरी अजून कोणी दिसलं नव्हतं ...
आज आईला विचारायचंच ,"आई तू बागेत कोणाशी बोलत असतेस ग ?"आई सांग ना,कोण असत तिकडे तुझ्याबरोबर बागेत ? सांग ना मला ,"अग एक गोड़ मुलगा असतो ,तो येतो माझ्याशी गप्पा मारायला ,"कुठे राहतो तो मुलगा ?समोरच राहतो बागेच्या ,माझ्याशी येऊन गप्पा मारतो ."आई मला का दिसत नाही ? अग तुला कसा दिसणार ? तू कुठे ह्या जगात आहेस ?मीच दचकले, म्हणजे ?मला एकटीला सोडून गेलीस ना दुसऱ्या जगात . मला नातू हवा होता ,तू अकाली गेलीस ग ,"आई रडायला लागली हंबरडा फोडून ....
अहो आपला बबलू कोणाशी तरी बोलतो ,"कोणाशी बोलतो ?"बागेत कोणीतरी आजी येतात त्यांच्याशी बोलतो ,"कुठे राहतात त्या आजी ?"त्या समोरच्या घरात राहतात ,"ग सावर स्वतःला ,आपला बबलू ह्या जगात आहे का ?अहो असं काय बोलता ?माझा बबलू आहे ना ,सकाळी रोज तो जातो त्या आजींना भेटायला ,आज दुपारीं सुद्धा गेला होता भेटायला त्यांना . "तू इकडे ये सावर स्वतःला ,हे बघ काय आहे ,आपल्या बबलूचा फोटो ,मागच्या वर्षी गेला आपला बबलू ...
त्यादिवशी त्या बंद खिडकीच्या घरातली ती अनमॅरिड बाई भेटली ,मी तिला थांबवलं ,म्हणाली तिची आई मागच्या वर्षीच गेली ...
हल्ली त्या दोन्ही घरांबद्धल कुजबुज असते ,गेल्या वर्षांपासून ती दोन्ही घर बंद होती ,ह्या घरातले आई बाबा आणि त्यांचा लहान मुलगा ऍक्सिडंट मध्ये गेले होते ,आणि त्या घरामधील अनमॅरिड मुलीनी आपली आई जायच्या अगोदर जीव दिला होता फास लावून .
अनिरुद्ध

No comments:
Post a Comment