गर्भवती भाग 2
लेखन अनुया सावंत हुद्दार
लेखन अनुया सावंत हुद्दार
शंकर शाळेतील काम आटपून घरी येतो. पण मनात सतत त्या झाडाचा आणि त्या बाईचा विचार चालू असतो. “आज कसही करून हिम्मत करतो आणि जातोच. एवढी वर्ष फक्त भिंदूगिरी केली पण असली भूत काय असत याची जाणीव त्या झाडाने आणि त्या बाईने दिली. वही वाचली नसली तरी काय झालं आपल्याला जे जे काय लक्षात आहे त्याने काम चालवूया”, हा विचार चालूच असतो की एक गावकरी दाराशी येतो. “रामराम शंकरबाबा. गावात पोटूश्या बायांची हालत ठाव हाय न्हवं? मंग त्याच साठी सरपंचांनी बोलावणं धाडलया. चला मंग बिगी बिगी. ते डागटर पण बसलेत समजना काही त्यांना”.
मग तो गावकरी आणि शंकर दोघेही चावडीवर सरपंचांना भेटतात. बाकी गावकरी ही जमलेले असतात. सरपंच शंकरला उद्देशून बोलतात “शंकरबाबा गावाच्या बायांची हालत तुम्हासनी ठाव हाय म्या येगळ सांगाया नगं, काय उपाय हाय त्यो सांगा बकरी कोंबड समदं हानतो बगा पैशाची ची बी फिकीर नको”, सरपंच अजून काही बोलणार तोच शंकर त्यांना थांबायची खून करतो आणि बोलतो “आज एवढी वर्ष मी या गावात काढली आहेत या गावाच ऋण हाय माझ्यावर. पण हे प्रकरण माझ्या कुवतीच न्हाय”. मग तो आतापर्यंत झालेली सगळी हकीकत गावसमोर मांडतो पण जाणून बुजून तो त्याच्या रात्रीच्या योजनेबाबत मौन ठेवतो.
सगळे गावकरी घाबरून जातात कोणाला काहीच मग सुचत नसतं फक्त वाटत असते ती भीती आणि नशिबाने पुढे काय वाढून ठेवलाय याची चिंता. सगळे निराश होऊन आपापल्या घरी निघून जातात.
शंकर मग घरी येऊन रात्रीची तयारी सुरू करतो सर्व प्रथम तो पोतडीतून मंतरलेली राख काढतो, मग रक्षा धागा मनगटाभोवती गुंडाळतो. त्याच्या गुरूंनी डिलेला ताविज गळ्यात घालतो आणि मंत्रीत पाणी एका बाटलीत भरून ठेवतो. हुश्श झाली तयारी त्या बाईला मी हरवेन की नाही माहीत नाही, पण स्वतःचा जीव तरी नक्की वाचविन.
तो घड्याळ बघतो अजून 11 वाजत आहेत म्हणजे वेळ आहे अजून अस मनाशी बोलत तो जरा झोप काढायचं म्हणून आडवा पडतो आणि त्याला गाढ झोप लागते. असा चांगला 2 तास तो झोपतो आणि अचानक त्याला दारावर टकटक ऐकायला येते आणि मागून येतो तो त्या बाईचा आवाज “शंकऱ्या, उठ मला भेटायला येणार होतास न्हवं? मंग झोपलयास का मुर्दावानी? उठ का उठवू. तुला.”
शंकर धडपडतच उठतो आणि घाबरत दार उघडतो आणि समोरचं दृश्य बघून त्याची बोबडीच वळते. एक विशीतली बाई जिचा चेहरा मार खाऊन सुजला आहे जागोजागी ओरबडल्याच्या खुणा आहेत जी कमरेत वाकली आहे जिचे केस कोणीतरी ओढून काढल्यासारखे पिंजरलेल्या अवस्थेत आहेत.डोळ्याखाली काळी वर्तुळे आहेत आणि मुख्य म्हणजे जी पोटुशी आहे.
घोगऱ्या आवाजात ती शंकरला बोलते “शंकऱ्या चल मला भेटायचं होत न्हवं, कवाधरन एवढी तयारी चालवलीया, मला काय ठाव नाय अस वाटलं होय रे तुला. मागल्या खेपेस तुला अडविल कारण माझा पिलान येगळा हुता आता समदं किलीअर हाय तवा वाट बघितली रात व्हायची. आता रात झाली तशी आली तुला न्यायला चल हो म्होरं मी येते मागन. ईथुन सरळ झाडाकडे जायचं आवाज केलास तर मानगूट पिळेन तिथच. गपगुमान चलायचं माझ्यासंग”.
शंकराने कठपुतल्या बाहुलीसारखी मान हलवली आणि तो आणि ती बाई झाडाच्या दिशेने चालू लागले.
शंकर आणि ती बाई रात्रीच्या काळाकुट्ट अंधारातून वाट काढत चालत असतात शंकर सतत मनात विचार करत असतो की ह्या बाईचा चेहरा त्याने आधी कुठेतरी पाहिला आहे पण आठवत नसतो कुठे तो. जगलो वाचलो तर विचारुया हिलाच. आणि अस विचार करत करत ते एकदाचे त्या झाडापाशी पोचतात. रात्रिच्या अंधारात ते झाड एकदम भेसूर दिसत असत त्यात त्याला लागलेली रक्ताळलेली अर्भक त्याची भीषणता अजूनच वाढवत असतात.
“तर शंकऱ्या तुला हीत बोलवायचं नव्हत मला पण तू त्या दिस हित आलास या झाडाचं गुपित फकस्त तुला पहिलं कळल अन तू शिव्या पण हाणल्यास म्हनून तुलाच मला हानायला लागलं. अन त्यात तू गावचा मांत्रिक म्हणजे मला जे हवं ते तू गावकाऱ्याकडून करून घेशील हे पण पक्क. तवा मला पाहिजे असलेला बकरा असा आयता हातात मिळाला. ओळखलस की न्हाय मला म्या लक्षूमी तुमच्या दलपत शेठची बायकू” ती बाई (लक्ष्मी)
“पण तू तर 10 वर्षांपूर्वी पळून गेलेलीस ना तुज्या यारसंग मंग आता का मागे लागलीस या गावाच्या” शंकर घाबरत बोलला.
“दलपत”, तिने दात ओठ खाल्ले, “असं खोट सांगितलंस होय रे. त्या चंपा रंडीच्या मागे तो दलपत होता. 7 महिन्याची पोटुशी होती मी तिच्यापायी मला हाल हाल करून मारलं आणि हे बघ इथे या झाडाखाली पुरल”.
शंकर भीतीने थरथरू लागला पण त्याही परिस्थितीत तो बोलला “मग गावातल्या बायांच्या मागे का लागली आहेस त्या दलपत लाच धर ना”
“त्यालाच धरणार होते पण त्याला असं मारून त्याने केलेली पाप बाहेर नसती आली तेव्हा पिलान केला हा मला जस हाल हाल करून मारलं ना तस हाल हाल करून त्याला शिक्षा भोगाया लावणार म्या.अन त्यासाठी तू मला मदत करायची. गावातल्या सगळ्या लोकांना उद्या सकाळी झाडाकडे जमा करायचं खोटी पूजा मांडायची आणि मला बोलवायचं मग मी सांगेन सगळ्यांना की दलपत ने काय केलं ते. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्याला मारायचं पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आणि जबानी बी द्यायची त्याच्याइरुद्ध हे सगळं केलं की थांबेल त्या बायांची पोटदुखी”.
“खूप अन्याय झाला ग तुझ्यावर मी करेन हे सगळं आणि गावकऱ्यांसोबत पोलिसांना पण बोलवेन दलपत आणि त्याच सगळं कुटुंब उद्या जेल मध्ये जाईल चिंता नको करुस तू. पण त्या सगळ्या बायांना सुखरूप ठेव” शंकर हळहळत बोलतो.
शबुद दिलाय म्या मागे फिरणार न्हाय पण उद्या काही चूक नको सगळं कसं खरं वाटलं पायजेल जा तू घरी आता अस बोलून ती अदृश्य होते. शंकर मग घरी येतो.
सकाळी तो पहिले जाऊन सरपंचांना वर्दी देतो की सगळ्या गावकऱ्यांना झाडापाशी बोलवा म्हणून, मला एक उपाय भेटलाय सोबत 2 कोंबड आणि 1 बकरा हाना. बाकी तयारी मी केलीय मी पहिलेच.
शंकरचा निरोप मिळताच सगले गावकरी झाडाकडे जमा होतात शंकरने आधीच तिथे पूजा मांडलेली असते आणि हे सगळं बनाव करण्यात तो आधीपासूनच तरबेज असल्याने लोकांना सगळं खरंच वाटतं. अशीच काही वेळ पूजा चालते आणि शंकर त्या बाईला येण्याचं आवाहन करतो. आवाहन करताक्षणीच सोसाट्याचा वारा वाहू लागतो अचानक अंधारून येते आणि ती बाई त्या ठिकाणी म्हणजेच लक्ष्मी तिथे सगळ्यानाच दिसू लागते. तीच भयानक रूप पाहून सगळे घाबरतात पण सर्वात जास्त घाबरतो तो दलपत. तो तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण लक्ष्मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तिथंच जखडून ठेवते.
शंकर मग अजून बनाव करून बोलतो, “बोल बाई काय पाहिजे तुला?”.
“मला ह्यो दलपत आणि त्याचं कुटुंब हवंय” लक्ष्मी उत्तरते
“ते कशाला पाहिजे बोल?” शंकर विचारतो
“त्यांनी माझा खून केलाय मला पोटुशी असतानाच मारलंय म्हणून मला ते हवे आहेत”. लक्ष्मी सांगते
“त्यांना दिलं तर तू गावातल्या बायांना सोडशील का?” शंकर विचारतो
“व्हय सोडिन म्या. पण मला गावकाऱ्यांकडून शबुद हवाय की ते दलपत आणि त्याच्या कुटूंबविरुध जबानी देतील पोलिसांना आणि त्यासनी जेल मंदे डांबतील” लक्ष्मी बोलते.
“दिला शबुद” सगळे गावकरी एकसाथ बोलतात.
“या झाडाखाली माजी बॉडी सडून गेली माजा अंतिम संस्कार सर्व गावाने करायचा आणि श्राद्ध पण घालायचं बोला हाय कबूल” लक्ष्मी बोलते.
“हो कबूल हाय आम्ही करतो पण आमच्या लेकरा सुनेची अशी हालत नको करुस त्यांना सोड ग तुझ्या दयेने पोटुशी राहिल्या पोरी त्यांचं आईपण हिराऊ नकोस”, सरपंच लक्ष्मीला विनावतो.
“आता जा समदं घरी मोकळ्या केल्या सर्व बायांना. आता जातेय पण शबुद पाळलं तर समदं ठीक होईल नाहीतर मी हाय अन हे गाव हाय”, अस बोलून लक्ष्मी तिथून गायब होते.
नरसु तिकडून तेवढ्यात पोलिसांना घेऊन येतो पोलीस मग दलपत आणि कुटुंबाला ताब्यात घेतात आणि सर्व गावकऱ्यांची जबानी लिहून घेतात.
गावात सर्व काही आलबेल होतं. शंकर मग अंतिम संस्कार आणि श्राद्ध ब्राह्मण आणून सर्व गावकर्यांसोबत उरकून घेतो. पोलीस पंचनामा करण्यासाठी ते झाड तोडून टाकतात तेथे त्यांना लक्ष्मीचे उरले सुरले हाडांचे तुकडे भेटतात जे मग शंकर विसर्जीत करतो.
शंकर मनोमन खुश असतो कारण आता गावकरी त्याला अजूनच नावाजायला लागलेले असतात.त्यात सरपंच सगळं आलबेल झालं म्हणून गावात तमाशा ठेवतो रात्रभर नाचगाणं आणि पिणं सुरू असत शंकर पण खूप मजा करत असतो मग रात्री 2.30 वाजता सगळं संपतं आणि सगळे गावकरी आपापल्या घरी जायला निघतात. शंकर पण निघतो काही अंतर गेल्यावर तो एकटाच दारूच्या नशेत झिंगत त्याच्या घराच्या दिशेने जात असतो वाटेत त्या झाडाची जागा येते तिच्या कडे तो बघतो हसतो आणि पुढे जातो. तितक्यात मागून आवाज येतो
“शंकऱ्या”.

शंकर थांबतो ती हाक ऐकून पण दारूच्या नशेत असल्याने त्याला वाटते त्याचे कान वाजाताहेत. मग तो एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडतो आणि परत त्याला आवाज येतो शंकऱ्या थांब कुठे चाललास ? मग तो हात जोरात हिसका देऊन शंकरला पूर्ण मागे वळवतो. आणि शंकरची पूर्ण नशा उतरते कारण त्याच्या समोर उभी असते ती लक्ष्मी.
“तू परत आलीस? आता काय राहिलंय तुझं?” शंकर विचारतो

“अजून एकाबरोबर हिसाब राहिलाय तो पूर्ण करायचा आहे तो झाला की मी मुक्त कायमची”, लक्ष्मी बोलते
“उद्या बोलू मी स्वतः येईन आज मला जरा जास्त झालीये” शंकर बोलला
“त्या दिवशी पण जास्तच झालती तुला, म्हणून हाच तो दिवस अन हीच ती वेळ मला दुसरी वेळ नको”, लक्ष्मी बोलते
“काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल इथे उभे राहायचे वांदे” शंकर बोलला
“दारुबरोबर बदामाचा चकना नाय दिला वाटतं तवाच तुला काय आठवना” लक्ष्मी बोलली.
“काय आठवू सगळे उपाय तर केले तू सांगितलेले, अजून काय राहील तर सांग करतो मी” शंकर बोलतो
“ त्या रात्री मला दलपत ने नाही तर मला कुणी दुसर्यानेच ठार मारलं हुत” लक्ष्मी बोलते
“तू नाव बोल फक्त हजर करतो बघ तुझ्यासमोर”, शंकर बोलतो
“त्याच नाव शंकऱ महादेव महाडिक”, लक्ष्मी बोलते
“नाव ऐकल्यासारखं वाटतंय. ए हे तर माझं नाव आहे. काय बोलतेस तू दारू पिली मी आहे आणि चढली तुला आहे का? ती पण कशी चढणार म्हणा त्यासाठी शरीर असावा लागतं”, शंकर बोलला

आता लक्ष्मी त्याची कॉलर पकडते “पांचट विनोद नको आठव मुदर्या, मला त्या रात्री दलपतने मार मार मारले त्यात माझी शुद्ध हरपली. मला त्याने मेलेली समजली अन इथे येऊन त्याने मला जिवंतच गाडली. कितीतरी येळ म्या त्या मातीखाली होते पण एक आवाजाने मला जाग आली मग कशीतरी म्या ती माती बाजूला सारली अन खड्यातून बाहेर आली दलपतने माजा डोळा चांगलाच सुजवला होता त्यामूळे मला समोर कोण उभा हुता समजलाच नाही. मी मदतीसाठी हाक मारली तर त्याने मला हिसका दिला मला परत खाली पाडले मग माझ्या कमरेत ही जोरात लाथ घातली की मी परत उठुच शकले नाही मग माजे केस पकडून मला बाजूच्या दगडावर आपटले त्यात माझा प्राण गेला मग परत मला खड्यात टाकलं वरती दगड ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी दलपत ने त्यावर आंब्याचा कलम लावला आणि वरून खत घातलं म्हणजे कोणी कुत्रं माती उकरू नये. पण जेव्हा तुला बायांची पोटुशी होण्याची गोष्ट कळाली तेव्हा रात्री दारूच्या नशेत तू सगळं खरं बोलून गेलास की तू कसं त्या रंडी चंपेला माझ्या दलपतच्या पैशांसाठी मागे लावलस अन मग त्याला मला मारायची idea दिलीस. आणि तो माणूस तूच होतास ज्याने मला त्या रात्री कमरेत लाथ घातली अन दगडावर चेचुन ठार मारलं. शंकऱ्या तुला काय वाटलं तुला असाच सोडिन व्हय म्या तुलाबी तशीच मारेन जस तू मला मारलस” अस बोलून लक्ष्मी त्याच्या कमरेत लाथ मरते त्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडते आणि तो खाली कोसळतो. मग लक्ष्मी त्याचे केस पकडते आणि त्याच दगडावर त्याचं डोकं आपटते. शंकर जोरात ओरडतो पण त्याची किंकाळी अंधारात दडपून जाते. लक्ष्मी त्याच डोकं त्या दगडावर आपटतच राहते जोपर्यंत त्याचा जीव जात नाही. शेवटी शंकर त्याचे प्राण सोडतो. मग लक्ष्मी त्याला त्याच खड्यात पुरते आणि त्यावर बाभळीचे झाड लावते आणि जादूने त्याला मोठं पण करते. शेवटी तिथे चांगली मोठी मोठी दगड ठेवते.
“आता हिथ कुत्रच काय माणसं बी येणार नाहीत नाहीत दुसऱ्याच्या आयुष्यात काटे ठेवलेस ना तू आता मेल्यावर बी तेच कर अस” म्हणून लक्ष्मीचा आत्मा अनंतात विलिन होतो.

सकाळ होते सगळे आपापल्या कामाला लागतात. नरसु नेहमी प्रमाणे शंकरच्या घरी येतो पण तिथे त्याला शंकर दिसत नाही. मग तो सगळ्या गावात त्याला शोधतो तो कुठेच दिसत नाही. तो सलग दोन दिवस त्याचा शोध घेतो मग संध्याकाळी पोलीस ठाण्यात जातो आणि शंकर हरवला असल्याची तक्रार नोंदवतो. रात्री झोपताना तो त्याचाच विचार करतो आणि झोपतो तोच त्याच्या दारावर टकटक होते. नरसु घाबरतच दार उघडतो आणि त्याला दिसतो तो शंकर.
नरसु काही बोलणार इतक्यात तोच त्याला बोलतो “शोधू नकोस मला. मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली आहे. कोणी विचारलं तर सांग तो गाव सोडून गेला”. अस बोलून शंकर अदृश्य होतो नरसु धाय मोकलून तिथेच रडू लागतो.
समाप्त
No comments:
Post a Comment