गानू आज्जी आणि तिची अंगाई -Marathi Thriller story from the Andharwari Book
मागच्या वर्षी आलेला 'तुंबाड' हा चित्रपट इथल्या बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्या चित्रपटातील काही पात्रे, त्यांसंबंधीच्या कथा, पार्श्वभूमी, प्रसंग हे नारायण धारप यांच्या कथांवर बेतलेले आहेत. त्या गूढ, भयावह, किळसवाण्या आजीचे पात्रंही त्यापैकीच एक. प्रस्तुत कथा ही जरी ऋषिकेश गुप्ते यांची असली तरी कथेचा मूळ प्लॉट नारायण धारप यांच्या कथेचा आहे अस एके ठिकाणीं वाचलंय. श्री. गुप्ते यांनी धारपांच्या मूळ कथेवर काही संस्करण केलेले आहे. काही जणांनी कदाचित वाचलीही असेल. तरी कथा शेअर करावीशी वाटली. यापूर्वी कथा न वाचलेल्यांना किंवा 'तुंबाड' न पाहिलेल्यांना तर नवीन आहेच; पण 'तुंबाड' ज्यांनी पाहिलेला आहे त्यांनासुद्धा ही कथा आवडेल. स्वानुभव आहे. चित्रपटापेक्षा काहीसे वेगळे कथानक आहे. कथा दीर्घ असल्यामुळे इथे पोस्टमध्ये संपूर्ण मजकूर बसत नाहीये, त्यामुळे नाईलाजास्तव काही भाग करून टाकतो आहे...
"गानू आज्जी आणि तिची अंगाई"
त्या करकरीत तिन्हीसांजेला गानूआजींची अंगाई जशी मी ऐकली तशी ती दुसऱ्या कुणीही न ऐको,असं मला खुप वाटायचं; पण तसं घडायचं नव्हतं बहुदा.
जी भिती,जी काळीज गोठवणारी थंडगार भिती मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्यात गाडून टाकली होती,ती प्रचंड वेगाने सळसळत वर आली आहे. हजारो जहरी नागांनी एकावेळी दंश करावा असं काहीसं झालं आहे. सर्वांगाला कंप सुटतोय,हातपाय लुळावलेत आणि घशाला कोरड पडली आहे.
परवा मला गानू आजींची अंगाई आठवली.
गानू आजींची अंगाई !
भयंकर ! पण असं नको.आता लिहायचं असं ठरवलंच आहे तर सारं काही तपशीलवार ,मुद्देसूद आणि क्रमाक्रमाने लिहायला हवं.
परवा मला गानू आजींची अंगाई आठवली.
गानू आजींची अंगाई !
भयंकर ! पण असं नको.आता लिहायचं असं ठरवलंच आहे तर सारं काही तपशीलवार ,मुद्देसूद आणि क्रमाक्रमाने लिहायला हवं.
मी अविनाश मधुकर ताम्हाणे.
सध्या वास्तव्य-हिंदु जिमखाना,दादर,मुंबई.
सध्या वास्तव्य-हिंदु जिमखाना,दादर,मुंबई.
पण तेव्हा आम्ही सरपरणीत राहायचो.
सरपणी. वरच्या कोकणातलं एक शांत गाव. खेड्याकडून छोट्या नगराकडे झपाट्याने विकसीत होणारं. गर्द वृक्षाराईने नटलेल्या डोंगररांगांच्या अगदी कुशीत वसलेलं गाव. गावाला वळसा घालत भलं थोरलं पात्र असणारी नदी पुढे पुढे वाहात असे. गावात वस्तीही विपुल आणि संमिश्र. गाव सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन सुखानं नांदणारं. पण गावावर सामाजीक,राजकीय वर्चस्व मात्र गानुंचेच होते. गानुंच्या नावाची वाडीही गावात होती.
गानु वाडी !

सरपणीत असताना आम्ही गानुवाडीत राहायचो.
मी,ताई,आई आणि बाबा. बाबा पाटबंधारे खात्यात इंजीनीयर होते. ते दिवसभर कामानिमित्ताने बाहेरच असायचे. रात्री कधीतरी उशीरा घरी परतायचे. तेव्हा आम्ही झोपी गेलेलो असायचो किंवा झोपेला आलेले असायचो.
त्यावेळी आजच्यासारखं नव्हतं. संध्याकाळी सातलाच सर्वांची जेवणं उरकायची. तोवर चिडिचुप अंधारही पसरलेला असायचा. आठ वाजेपर्यंत अर्ध्याहून अधिक गाव झोपेच्या आधिन झालेलं असायचं. रात्र झाली की दिवसा देखणं वाटणारं गाव कुरुप आणि भयावह वाटे.

सरपणीतला अंधार होताच तसा. काळाठिक्कर !
त्यातून गानूवाडी तर अंधाराचं साम्राज्यच. एखाद्या अनभिषक्त सम्राटाप्रमाणे गानूवाडीतला काळोख कायम पाय सोडून सुस्तावलेला असे.वाडीत काजू,फणस,आंबा,चिकू,पेरू,नारळ यांची दाट गर्दी. कधी आभाळ पाहायला जावं तर काही दिसतच नसे. सारं आकाश झाडांच्या पानांनी आणि फांद्यांनी झाकून गेलेलं. उजेडही कसा त्या पानांच्या गाळणीतून यावा तसा,हिरवट ,शेवाळी आणि थंड. काळोखाचं एक जुनाट अस्तर कायम ल्यालेला. पानांच्या चाळणीतून कित्येकदा गोलाकार,त्रिकोणी,चौकोनी अगदी हरेक आकाराचे उन्हाचे ठिपके जमिनीवर पडायचे. त्या पिवळट ठिपक्यांतून कुणी कधी चालत आलंच तर ओळखूच यायचं नाही. जमिनीवर पडलेले हे उन्हाचे रोगट ठिपके मी कधीकधी मोजू पहायचो;पण गणित कायमच चुकायचं.
गानूवाडीत गानूंचा भलाथोरला वाडा होता. रुंद आणि अजस्त्र. भक्ष्य गिळून सुस्त पसरलेल्या अजगरासारखा. दगड,माती,चुना आणि लाकडाचं जूनं बांधकाम. राकट आणि भक्कम. का कोण जाणे पण गानूवाडा मला कधीच आवडला नाही. तसं पाहता गानूवाडीत राहाणारी आम्ही सारी मूलं आत वाडयात जायचो,लपंडाव खेळायचो;पण एके प्रकारच्या अनिच्छेने. नानासाहेब गानूंचा थोरला मुलगा सुनंदन माझा वर्गमित्र असल्याने माझा वाड्यातला वावर इतर मुलांच्या तुलनेत थोडा जास्त होता. पण वाड्यात वावरताना मनात कायम भितीचे सावट असायचेच. कधीही गेलं तरी वाडा काळोख गिळून सुस्तावल्यासारखा वाटे. दिवे लावल्यावरही वाड्याच्या सांदीकोपर्यातून काळोखाच्या असंख्य भयंकारी जिभा लपलपत असत.

मुख्य दरवाज्यातून आत शिरलं की एक भली मोठी ओसरी लागायची. शेणानं सारवलेली. त्या हिरव्यागार सुकल्या शेणाचा वास मनाला सुखावत असे. ओसरीच्या दोन पायर्या वर चढून गेलं की पडवी. पडवीतल्या लोखंडी पलंगावर गानू आजोबा कायम माळ जपत बसलेले किंवा काहीतरी पोथी पुस्तक वाचत असलेले दिसायचे. पडवीच्या दारातून आत माजघर. चांगलंच प्रशस्त,चारी बाजूंनी वाटेल तेव्हढं फोफावलेलं. माजघराच्या डाव्या बाजूला मोठं देवघर आणि त्या देवघरात तेहेतीस कोटी देवांच्या प्रतिमा. निरनिराळ्या रंगाच्या,रुपांच्या,आकारांच्या प्रतिमा. देवघरात नेहेमीच अंधुक पिवळट प्रकाश मिणमिणत असे. दिव्याच्या ज्योतीसोबत हलणार्या, डचमळणार्या त्या उजेडात गानुंचे देवघर अंगावर शहारा आणी. कधी त्या हेलकावणार्या पिवळसर प्रकाशात मंद लालसर प्रकाश देणारा विजेचा दिवाही जळत असायचा. पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचे ते फिकट मिश्रण देवघराला एक वेगळीच गुढ आणि भितीदायक पार्श्वभुमी पुरवी. त्या प्रकाशात देवघरातील देवांच्या प्रतिमा एखाद्या हिंस्त्र श्वापदासारख्या अंगावर धावून आल्यासारख्या वाटत. तांडवनृत्य करणारा शंकर, रक्ताळलेली जीभ बाहेर काढून साऱ्या जगाला गिळू पाहणारी काली आणि इतरही न जाणो कित्येक अज्ञात देवांच्या प्रतिमा. देव्हार्याच्या मध्ये भल्याथोरल्या चौरंगावर हळद कुंकवात माखलेल्या नानावीध देवांच्या मुर्त्या. कित्येकदा कुंकवाचे थर त्या फसव्या प्रकाशात रक्तासारखे भासत आणि देवांच्या मुर्त्या शेतातल्या बुजगावण्यासारख्या ओबडधोबड आणि भयंकर ! गानुंच्या त्या माजघरात एरवीही मला वावरताना थोडी भीतीच वाटायची. एकट्यानं तर मी तिथे फिरकतच नसे. नवरात्रात नऊही दिवस त्या माजघरात रात्रीच्या जेवणाच्या पंगती उठत. आप्त,नातलग अगदी सर्वांचा या नऊ दिवसांत तेथे राबता असे. आम्ही गानुंचे भाडेकरू,त्यातनं जरा जास्त जवळचे. त्या नऊ दिवसांत आमच्या घरी रात्रीचे जेवण बनलेले मला तरी आठवत नाही. आजही आठवते; जेवणाच्या पंगतीत मी देवघराजवळ बसायचे अगदी हटकून टाळायचो. पुढल्या आयुष्यात मी पराकोटीचा नास्तिक झालो;पण गानुंचे देवघर आठवले की हमखास अंगावर काटा येतो.
काय होतं एवढं घाबरण्यासारखं तिथं !
आज विचार करू लागलो तर कधीकधी नवल वाटतं.
पण मनातून कुठंतरी त्या भीतीचं कारण ठाऊक आहेच की मला.
काय होतं एवढं घाबरण्यासारखं तिथं !
आज विचार करू लागलो तर कधीकधी नवल वाटतं.
पण मनातून कुठंतरी त्या भीतीचं कारण ठाऊक आहेच की मला.
गानू आज्जी !
देवघरालगतची त्यांची ती खोली !!
आणि त्यांची ती हिडीस, भेसूर अंगाई !!
देवघरालगतची त्यांची ती खोली !!
आणि त्यांची ती हिडीस, भेसूर अंगाई !!
क्रमशः
- श्री ऋषिकेश गुप्ते ('अंधारवारी' या त्यांच्या गूढकथासंग्रहातून)
कथा क्रोमवरून कॉपी-पेस्ट.
छायाचित्रे : 'तुंबाड' मधील संबंधित दृश्ये
छायाचित्रे : 'तुंबाड' मधील संबंधित दृश्ये
प्रणव कुलकर्णी.
पुढील भागाची लिंक :-https://marathighoststories.blogspot.com/2019/08/marathi-thriller-story-from-andharwari_3.html
पुढील भागाची लिंक :-https://marathighoststories.blogspot.com/2019/08/marathi-thriller-story-from-andharwari_3.html
No comments:
Post a Comment