💃बारीची पारी💃
भाग:-चौथा
किसनाला सद्या दोन गोष्टी खूप छळत होत्या.एक ढोलकीचं स्वप्न व दुसरी सनाची पलटवार नजर.लेक्चरला तो सहसा मागेच बसे तर सना पुढुन दुसऱ्या रांगेत.मध्येच कधी तरी ती मागे पलटून पाही नी मग किसनास आषाढ-श्रावणसरी बरसायला सुरुवात झाल्यागत वाटे.सना येऊन तीन चार महिने झाले पण बोलायला त्याची छाती धडधडे व सनाचं फक्त आपलं पलटवार पाहणं बस्स एवढंच.याची ढोलकी बहरतच होती.पण सनाचं मात्र ऐकणं व शिकणं सुरु होतं. कधी कधी ती मणचेकर व जोशी मॅमकडं एकांतात भेटून येई.
उन्हाळा सरला व पावसाला सुरुवात होताच पारोबाईंचा फड नारायणगावास आला.कलाकार आपली शेती आवरण्यासाठी गावाला परतले.हा काळ पारोबाईचा आरामाचा असे.पण पुढच्या मोसमात ऑर्केस्ट्रा सुरु करत सनाला लाॅंच करायचं जवळपास निश्चित झाल्यानं त्या दृष्टीनं बाईंनी तयारी सुरू केली.मोठ्या तंबूची कनात, संगीत संच ,लाईट्स खरेदी सुरू झाली.सारा लवाजमा वाहुन नेण्यासाठी आणखी जास्तीचे ट्रक खरेदी झाले.पावसाळा दोन महिने बाकी असतांनाच काही कलाकारांना बोलावून व काही नवीन भरती करत त्यांना रंगबाजीसाठी नवनवीन सिनेमाची गाणी बसवण्याची तयारी सुरु झाली.काॅलेज संपायच्या आधीच पारोबाईंनी मणचेकर सरांची भेट घेत किसनास सनाचं मोठं होर्डींग्ज बनवण्यासाठी व काही पेंटींग्ज बनवण्यासाठी पाठवण्यास सांगुन आल्या.मणचेकर सरांनी सांगताच किसना तयार झाला.सुटी लागण्या आधी एक दिवस सनानं थांबत तसं त्याला कळवलं.
"आईनं उद्या माझ्यासोबत नारायणगावास बोलवलंय"सना खाली पाहत म्हणाली.
आभाळात सोनसरी बरसत आहेत असंच किसनास जाणवू लागलं व दुसऱ्या दिवशी ठाण्यास मामाला मी सुटी लागत असुन काही कामासाठी नारायणगावास जात असल्याचा निरोप देत तो सनासोबत निघाला.पाच वर्षापुर्वीच मामानं रामलिला बंद करत स्टुडिओत काम धरत ठाण्याला आपला मुक्काम हलवला होता.आईनं महाराष्ट्रात परतण्यास मना करूनही मामानं तिला मनवत ठाण्याला आणलं होतं.मामा कधी सेट लावणं कधी लाईट योजना तर कधी ज्युनीअर आर्टीस्टची कामं करत गुजराण करत होता.
नारायणगावात फडावर येताच पारोबाईजीचं राणीगत वावरणं,आब व कलाकारांचा लवाजमा पाहुन तो थक्क झाला.तिथं चालणारा सराव तो जीव एकवटून पाहू लागला.
"पोरा पावसाळा संपताच थिएटर सुरू करायचंय.त्यासाठी आमच्या सनाचं मोठं होर्डींग्ज बनवण्यासाठी तुला बोलवलंय.मणचेकर सरांनी तुझं खुप कौतुक करतांना तुझ्या बोटात जादू असल्याचं सांगत होते ती जादू पहायचीय मला."
"बाईजी अवश्य .मला येतं तसा प्रयत्न मी करीन.पण आपणास काय हवंय ?"
"काय म्हणजे !सनाचं चित्र जे थिएटरच्या दर्शनी गेटवर व ट्रकावर लावलं जाईल."पारोबाई म्हणाल्या.
"ठिक आहे उद्या काढुन दाखवतो आपणास" म्हणत किसना कामास लागला.
दुसऱ्या दिवशी त्यानं आठ दहा कट-आऊट काढुन पारोबाईस दाखवले.पाहुन पारोबाई खुश होत सनास बोलवत दाखवले.सना नेहमीप्रमाणं खाली पाहत 'छान'म्हणाली व मध्ये निघाली.पण मध्ये जातांना तीच पलटवार नजर टाकत नाकाचा शेंडा किंचीत मुरडत नापसंती दर्शवली.हे पाहताच पारोबाईंजीपेक्षा सनास जास्त जाण असल्याचं किसना समजलाच व तो हसला.
"बाईंची ही केवळ चित्र आहेत.जरी आपणास ती पसंत असतील तरी याची जादू केवळ महिना दोन महिने टिकेल.आपणास थिएटर सतत चालावं यासाठी चित्र नाही तर वर्षानुवर्षे टवटवीत राहणारी कलाकृती हवी.सनाचं तारुण्य आज आहे पण पन्नस वर्षांनी राहणार नाही.म्हणुन अशी कलाकृती हवी की जी चिरतरुण राहिल"
"पोरा हेच हवं मला.मग तशी कलाकृती चितार तू"पारोबाई काकुळतीला येऊन म्हणाल्या.
"बाईंजी तशी कलाकृती जन्माला येण्यासाठी मला निदान पंधरा दिवस लागतील"
"पोरा पंधरा दिवस काय महिना लागू दे पण तशीच कलाकृती बनव".
"बनवतो.पण कलाकृतीत आपणास काय अपेक्षित आहे ते तर कळू देत मला."किसना आता मूळ मुद्यावर बाईजीस आणत होता.
"पोरा माझी सना हिच माझ्या थिएटरची ओळख असावी "
"ते तर येईलच.पण सनाची कोणती खासियत तुम्हास सेंट्रलाईज करायचीय?"किसनानं बाईजीस अंभगाच्या मुळ चरणावर आणलं.
"पोरा अर्थातच माझी ढोलकी हिच माझ्या बारीची व माझी ओळख आहे तशीच सनाची ढोलकी हिच थिएटरची जान राहिल."
"म्हणजे कलाकृतीत सनाकडं ढोलकी असावी.पण बाईजी कलाकृतीतली सना जिवंत होण्यासाठी मला तिचं ढोलकी वादन व त्यावेळचे तिचे हावभाव वादनातली विशेषता जितकी जास्त कळेल तितकी कलाकृती जिवंत येईल"
"व्हय पोरा आक्सी खरंय तुझं.पण तु सनासोबत सात आठ महिन्यांपासून आहेस.तू तर सनाला जाणतोसच व तिचं वादनही तू ऐकलंय व पाहिलंय तिला वाजवतांना!"
बाईजी पण ते निर्हेतुक होतं.आता कलाकृती चितारण्यासाठी त्या लूक नं,अॅंगलनं नवीन ऐकावं लागेल.त्यासाठी आठ दहा दिवस तरी निसर्गरम्य ठिकाणी एकांतात मला सनाचं वादन पाहतच कलाकृती चितारावी लागेल."
"पोरा चांगली कलाकृती साकारण्यासाठी तु सांगशील तसं कर पण हुबेहुब जमव"पारोबाई इथंच फसली.
पुढचे पंधरा दिवस किसनाला गाडी व ड्रायव्हर देत सनाला पाठवण्यात आलं.सनाला मात्र जी गोष्ट सुरुवातीस नाकारत होती त्या गोष्टीस आईनं स्वत:हुन तयार व्हावं याचं कोडं उलगडेना.निघण्याआधी आईला सनानं तसं विचारलं ही.
"सना त्यावेळेस तुला मी सावध रहायला सांगितलं होतं कारण याचं वाजवणं ऐकण्यासाठी.आता तु याचं वाजवणं ऐकलंय ,शिकलीही असशील.त्यामुळं तु आता तुझं वाजवणं याला ऐकवलं तरी हरकत नाही.कारण मी मनात वेगळं योजलं आहे.हा एक हिरा आहे व आपल्या थिएटरला हा हवाय.याला ओढ."
किसना व सना महाबळेश्वर, उटीला गेले.निवात डोंगरात, नदीकाठी, तलावाकाठी फिरत आधी त्यानं तिचं वादन ऐकलं.आताचं सनाचं वाजवणं मनापासून होतं.तिला खुलवण्यासाठी प्रसंगी तो ही वाजवू लागला.तो वाजवायला लागला की तिला हुरुप येई नी मग तिच्यातली खरी ढोलकी वादक बाहेर पडू लागली.मग किसना तासनतास तिचं वादन ऐकू लागला.तिला दाखवण्यासाठी तिच्या ढोलकीवादनाच्या मनमोहक अदा व छटा पाच मिनीटात चितारु लागल्या.व नाही जमत अजून म्हणत फाडू लागला.तिचं ढोलकी वादन न्याहाळून तिच्या वादनातील बारकावे शोधून आपल्या वादनाशी तुलना करून फरक शिकू लागला.तिच्या वादनाची खासियत म्हणजे तिचं नजाकतीचं मुलायम वाजवणं व त्यातील सुकुमार पदलालित्य करावयास भाग पाडणारं हळूवारं पण मंजुळतेनं ओतप्रोत सुरेल घुमारदार तबल्याप्रमाणं ढोलकीतून उठणारे बोल.ज्याचा वारसा तिला तिच्या आईकडनं मिळाला होता.आठ दिवस किसनानं तिला तेच करायला लावलं. हा पुरता कामातून गेलाय यानं ती आपल्या सौंदर्यावर अधिकच खुश होत अधिक जोमानं वाजवे. कारण सहा महिन्यात तिला राहुन राहुन वाटे की नितांत सुंदर मर्दुमकिनं वाजवणारा हा आपल्याकडं पाहतो पण व्यक्त होत नाही.यानं स्वत:हुन यावं व व्यक्त व्हावं असं तिला सारखं वाटे.आणि आता तर हा मुठीतच आलाय यानं तिलाही आनंदच झाला होता.किसनानं तिच्या ढोलकी वादनातील पुर्ण बारकावे समजून घेताच अवघ्या एका दिवसात तिचे आठ दहा चित्रे लिलया काढले जे तो पहिल्या दिवशी देऊ शकला असता.पण त्याला आपली कला राखणाऱ्या या मायलेकीकडनं काही बाबी शिकायच्या होत्या म्हणुन सनास मोकळ्या वातावरणात आणलं.चित्रं चितारताच सनाला त्यानं ती दाखवली.यात आपणच आहोत यावर तिचा विश्वासच बसेना.आणि जेव्हा आपणच आहोत यावर विश्र्वास बसला तेव्हा खरच आपण इतक्या नितांत सुंदर आहोत याची खात्री पटेना.ती पटवण्यासाठी सात आठ महिन्यांपासून राखलेला संयम तिला गमवावा लागला.
"किसना खरच मी या कलाकृतीत तू चितारली इतकी सुंदर आहे का?"त्याच पलटवार नजरेचं रूपातर आता खोल गहिऱ्या सागरात झालं होतं.
"कलाकृती आवडली नसेल तर तसं सांग"किसना प्रथमच खाली पाहत विचारता झाला.
"खरं सांगू!मला कलाकृती नाही आवडली पण..."
"पण काय?व का नाही आवडली?"
"जाऊ दे सांगेन कधी तरी नंतर" म्हणत सना किसनाकडं पाहू लागली.तिला आशा होती की किसना 'आताच सांग 'म्हणेल.
"ठिक आहे मी उद्या दुसरी कलाकृती चितारतो."
"किसना कलाकृतीत सुंदर चितारतो मग कधी तरी सुंदर असल्याचं निदान एका शब्दानं तरी सांगावं माणसानं"
आता किसनानं खाडकन मान वर केली व तो त्या गहिऱ्या सागरात खोल पाहू लागला.त्यात तुफान माजलय याची जाणीव होण्याआधीच त्या डोळ्यात अश्रू तरळू लागले व तिनं त्यास करकचून आवळत,"नाही सांगितलं ना अखेर मलाच सागावं लागलं."
किसनाला विश्वासच बसेना जे आपणास हवं होतं ते इतक्या लवकर व सहजा सहजी मिळत आहे. आणि मग त्यानंही प्रश्नाच्या व आश्चर्याच्या गुंथनकाल्यात न अडकता सनाच्या मिठीतच विसावत वरुन मिठी अधिक आवळली.
त्याच रात्री त्यानं दुसरी फायनल कलाकृती काढली.व नारायणगावास परतले.
परतताच त्याला मिना अवचित भेटली.सोबत वयस्कर व्यक्ती होती.
"मिने तू?आणि इतक्या महिन्यानंतर ?इथे?"प्रश्नाची सरबत्तीच सुरु झाली."
मिनाच्या पापणकडा ओलावल्या.
"किसना हे गावच तर आमची पंढरी.कालच आलो इथं आम्ही आता यात्रांचा मोसम सुरू होईल.त्याची तयारी इथंनच सुरु होते.हे गणा काका.आमचे फड मालक."मिनानं सोबत असलेल्या व्यक्तीचा परिचय करुन दिला.
"नमस्कार बाबा" म्हणत कोणास ठाऊक पण तो रस्त्यातच पायावर झुकला.
त्याचे खांदे धरत उठवत" पोरा रस्त्यात असं कुणाच्या पायावर झुकू नये" म्हणत आशिर्वाद दिला.
"काका हा किसना.माझ्यासोबत मुंबई विद्यापीठात होता"मिना सांगु लागली पण 'किसना'ऐकताच गणाच्या काळजात एक जोराची कळ गेली.
"चल पोरी येतो मी,तू ये नंतर म्हणत गणा काका चालते झाले.
"अरे पण तू इकडं कसा?"मिनानं विचारताच ,
"ही सना आहे.हिचंच होर्डींग्ज बनवायचं काम होतं म्हणुन आलो होतो."
मिनानं सना कडं पाहिलं पण सना लहानपणापासुन सिमल्यालाच असल्यानं आतेबहिण असुनही तिनं ओळखण्याचा प्रश्नच नव्हता.सनानं स्मित हास्य करताच मिनानं ही स्मित हास्य केलं.
सनानं नजरेनं खुणावताच "चल मिने भेटूच आता.आहे अजुन इथं म्हणत किसना निघाला.मिना ही चालती झाली.
कलाकृती पाहुन पारोबाई थक्क झाल्या.त्यांनी नारायणगावात होर्डींग्ज लावुन ट्रक फिरवत जाहिरातीस सुरुवात केली.
ट्रक गणाच्या मुक्कामा जवळुन जातांना गणाच्या काळजात धस्स झालं.त्यांना मिनाचा 'किसना'हा शब्द आठवू लागला.माझा ही किसनाच होता.कुठं असेल तो.किती मोठा झाला असेल?माझी ढोलकीची थाप त्याला का ऐकू जात नसावी?येईल का तो?आता तर फड पुन्हा मोडायला आला.बारीचं थिएटर उभं राहतंय.तिची पोरगी येतेय मग .....?गणानं ढोलकी काढत वाजवायला सुरुवात केली.नेमकं त्याच वेळी किसना मिनाला भेटायला आला.ढोलकी ऐकून तो कोपऱ्यात उभा राहिला.त्याला स्वप्न,स्वप्नातला माणुस आठवला.अशीच ढोलकी,असाच पाठमोरा माणूस.तो किती तरी वेळ तसाच उभा होता.ढोलकी थांबताच मिना उतरल्या चेहऱ्यानं बाहेर आली.होर्डींग्ज पाहून सना कोण हे तिच्या व गणाच्या लक्षात आलं होत म्हणुन त्यांनी किसनाला जास्त काही नं विचारता."आता तुझं इथं येणं उचित नाही म्हणत परत पाठवलं.मिना रडतच माघारी फिरली.किसनास काहीच कळेना.
पुढचे दोन चार दिवस दुपारी सरावात सना व किसनाची ढोलकीची जुगलबंदी रंगू लागली.ती पाहुन, ऐकुन पारोबाईच्या थिएटर होऊ पाहणाऱ्या बारीत उत्साह संचारला.अख्खा गाव सरावाच्या ठिकाणी ढोलकीच्या स्वरांनी गोळा होऊ लागला.जुगलबंदीने व सनाच्या सौंदर्यानं घायाळ होऊ लागला.
पारोबाईस सना व किसनाच्या उमलत्या प्रकरणाचा सुगंध जाणवू लागला.त्यांना तेच हवं होतं त्या खुश होऊ लागल्या.
अचानक मणचेकर सर नारायण घावरी या इसमास घेऊन नारायणगावास आले. नारायण घावरी हे टि. व्ही.मालिका व विविध शो ची निर्मिती करणाऱ्या संस्थेचे मालक होते.घावरी क्रिएशन म्हणुन संस्था होती.ते महाराष्ट्रातील लोककलावर आधारीत एक शोचं आयोजन करीत होते त्यात ढोलकी वादनावर एक थीम साॅंग तयार करणार होते.मणचेकर सर व त्यांचे संबंध चांगले असल्याने खास सरांनीच किसना व सनाच्या नावाची शिफारस केली होती व त्यांनाही पारोबाई व गणा सौंदळकर यांची ओळख होतीच.यांचीही भेट घेऊन काही लोककलेचे बाइट्स घेता आले तर पहावेत म्हणुन ते आले होते.घावरींनी पारोबाईची ,गणा सौंदनकरांची भेट घेतली व सना किसनाची जुगलबंदी ऐकली.जुगलबंदी ऐकुन ते इतके खुश झाले की आॅडिशन साठी दोघांना गोव्याला बोलावलं.पारोबाई मात्र थिएटरसाठी आल्या नाहीत.सना व किसनाचं जुगलबंदीचं थीम साॅंगचं शुटिंग झालं.व नंतर मग इतर भागांचे शुटिंग सुरू झालं.आठ दहा भाग तयार होताच.शो टि.व्ही.वर सुरू झाला.थीम साॅंग महाराष्ट्रातील घराघरात वाजू लागलं.लोक अक्षरश:वेडावुन थीमसाॅंगच्या ढोलकी वादनाची वाट पाहू लागले .दोन तीन भागातच घरा घरात थीम साँग व शो पोहोचला.टि आर .पी. वाढला.एका भागात गणा सौंदनकराचं वग ,सोंगाड्या व ढोलकीवादन यावर एक पुर्ण एपिसोड होणार होता.
फड व थिएटर सिझन सुरू होण्यास अवकाश होता.तो पावेतो सौंदनकरांचा एपिसोड आला.शो चा टि आर पी आणखी वाढला.त्याच वेळी घावरीचा अजित नावाचा मुलगा इग्लडहुन सिनेमा र्निमीती व नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊन परतला.त्याला निर्देशक म्हणुन लाॅंच करण्यासाठी व त्याचीही इच्छा होती म्हणुन नारायण घावरी एक तमाशापट करू इच्छीत होते.
भारतात परतताच त्याने महाराष्ट्रातील नामांकीत फडमालकाची भेट घेणं सुरू केलं.त्याच वेळी थीम साॅंगची प्रसिद्धी महाराष्ट्रात चरम सिमेला होती व गणा सौंदनकरांचा एपिसोड ही.याची दखल घेत वाहिनीच्या दुसऱ्या कार्यक्रमात सना व किसनाची मुलाखत आयोजीत केली.त्यात किसनाच्या परिचयात त्याची आई पार्वती व मामा दाखवण्यात आले.पार्वतीस कार्यक्रम पाहणाऱ्या पारोनं व गणानं ओळखताच मोठा भुकंप झाला.पारोच्या पायाखालची जमीन व डोक्यावरचं आभाळ निसटलं.'किसना 'गणा सौंदनकराचा मुलगा हे लक्षात येताच पारो भडकली.
गणाला मात्र आपल्या ढोलकीची साद अखेर ऐकू गेलीच यानं त्याला रडू कोसळंलं.आता चक्रे उलटी फिरणार.......अजितनं सनाला पाहिलं.तो पाहताच भुईसपाट झाला.तमाशापटाची नायिका हीच,त्यानं पक्कं ठरवलं.तर आता किसनाची ढोलकी कशी फोडायची याचा मार्ग पारोबाईस मिळाला.

क्रमश:.....
✒ वासुदेव पाटील.
No comments:
Post a Comment