नमस्कार वाचक वर्ग मी अनुप देशमाने आपल्या समोर घेऊन येत आहे नवीन भयकथा , खूप दिवसा पासून माझी एक कथा हाक ही अर्धवट राहिली आहे त्या कथेच्या हाकेला कोणी हाक देईना वाटत आहे पण काळजी नसावी ती ही कथा मी लवकरच पूर्ण करणार आहे......
कथा - #नशा
लेखक - #अनुप_देशमाने 💖💖
लेखक - #अनुप_देशमाने 💖💖
सुट्टीचे दिवस होते, पाऊस पण रिमझिम पडत होता, ह्या बरसणार्या पावसाला साथ देण्यास हवेच्या थंड लहरी ही अंगाला स्पर्श करत होत्या, कधी पावसाची सर मोठी तर कधी लहान होत होती, त्या पावसामुळे जमीन प्रफुल्लित होऊन पावसाचे स्वागत करत होती, ह्या अशा वातावरणात काहींना भजी खाऊ वाटत होती, तर काहींना प्रेम सुचत होते तर काहीजण तर शायर होऊन शायरी करत होते, हा पाऊस म्हणजे हवा हवासा वाटणारा होऊन जातो, असच मग काही मित्र मंडळी जमा होतात टवाळकी करत सायंकाळचे 7 वाजत आले होते, चेष्टा मस्करी करत त्यांचे संभाषण चालू असते तेवढ्यात त्यांना कळते की अरे आपला मित्र गोट्या याचा तर उद्या वाढदिवस आहे आणि आपण सर्वांनी मिळून रात्री केक कापुया, चला मग तडक प्रस्थान गोट्या कडे करूया आता म्हणत ते सर्व आपली बाईक काढून गोट्या कडे निघाले...
"गोट्या ये गोट्या, गोटू ये माझा गोटू, गोटू राम ओह गोटू मालक बाहेर या की" अशी लाडिक आणि चेष्टेने ते हाक देऊ लागले.... गोट्या काही आला नाही पण गोट्या चा बाप धापा टाकत बाहेर आला, गोट्याचा बाप दिसताच सर्व जण पटापट गाडीवर बसले, गाडी चालू करणार इतक्यात गोट्याचा बापाने हाक दिली, ते सर्व थांबले....
गोट्या चा बाप : अरे काही तरी शरम करा रे, 27 28 वर्षाचे झाले तुम्ही सर्व, लग्न केले तर 2 लेकरांचे बाप होचाल तुम्ही सर्व, पण अजून लहान मुलां सारख वागत आहात तुम्ही, काहीतरी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा रे फुक***नो....
बापाचा पारा जास्त च चढला आहे दिसताच सर्वांनी बाईक ला किक मारायला चालू केली पण त्यातील एक जण भयानक नंबरी त्याच नाव मुन्ना त्याने गोट्याचा बापाला बोलला...
मुन्ना : काका तुम्ही खरंच ग्रेट आहात, आज पर्यंत आमच्या आई बापाने एवढं सांगितले तरी आम्हाला कळलं नाही पण तुम्ही आमची व्यथा ओळखली बघा (रडण्याची अकटिंग करत) तुमच्या मुळे आज आमचे डोळे उघडले, जातो आम्ही आता परत नाही येत आणि तेव्हाच येऊ जेव्हा काहीतरी बनून दाखवू (खोटा हुंदका घेत)
गोट्याचा बाप : मुंन्या तू तर म्होरक्या आहेस ह्या गृप चा, पोरींना छेडणे, बायकांची टिंगल करणे, पाणी भरायला येणाऱ्या बायकांकडे लक्ष ठेवणे, दारू पिणे, मोठ्यांना उलट बोलणे, भांडण करणे एवढं येत तुम्हाला फक्त, अरे ह्या हि पुढे एक सुंदर जग आहे ते देखील बघा रे, हाथ जोडतो मी सुधारणा करा, आधी दारू सोडा तुम्ही सर्व आणि हो गोट्याला परत भेटू नका... निघा येथून लवकर आता...
मुन्ना : आयुष्यात जर कोणाचं ऐकायचं असेल तर मी नेहमी तुमचं ऐकेल काका (मुळू मुळू रडत) तुमच्या सारखा बाप जर मला भेटला असता तर मी ह्या असल्या मित्रांच्या नादी देखील लागलो नसतो, माझा वाढदिवस मी घरच्या सोबत साजरा केला असता (मित्रा कडे बघून डोळा मारत), तुम्ही म्हणता तर जातो आम्ही परत नाही बोलणार गोट्याला , चला रे गोट्याला विसरून जा.....
गोट्याचा बाप त्याच्या बोलण्याचा विचार करू लागला डोके खाजवत त्याने मुन्ना आणि इतर मित्रांना थांबवले....कोणाचा वाढदिवस आहे रे आज????
मुन्ना खुश होऊन : जाऊ द्या ना काका कशाला उगी विचारता, पाऊस चालु आहे रात्रीचे 9 वाजत आले आहे...
गोट्याचा बाप : सांग रे मुन्ना...
मुन्ना : अहो गोट्याचा वाढदिवस आहे ना उद्या म्हणून विश करण्यास आलो होतो आम्ही... पण नाही करू शकलो विश वाईट वाटत आहे पण असू द्या तुमच्या शब्दला मान म्हणजे मान आम्ही निघतो...
गोट्याचा बापाने गोट्याला हाक तसा गोट्या पळत बाहेर आला.... बापाला पण त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटला, त्यांनी त्याला त्यांच्या सोबत जाण्यास परवानगी दिली...सगळे मग पावसात एका टपरी वर जमा झाले...
गोट्या : मुन्ना किती आगाव असशील रे तू, किती फेकत होतास, मी आत बसून एवढं हसत होतो की बस मला वाटलं आता माझ्या म्हाताऱ्याला घेऊन तू चंद्रावर जातो की काय, पण काही पण म्हण मानलं तुझ्या बोलण्याला, नादच नाय तुझा...
मुन्ना : अरे ते जाऊ द्या, आज बसायचं कुठं ते सांगा, पाटील चे शेत नको ना माझे घर नको, आणि बार मध्ये तर नकोच नको, अशी एक जागा काढा तेथे कोणी सहसा येत जात नसेल मग मस्त रात्री केक कापू आणि बाटल्या फोडू काय वाटतय तुम्हाला...
सगळे हो म्हणाले....पण स्थळ काही सुचेना गेले, त्यांचे हे बोलणे ऐकत उभा असलेला एक म्हातारा मधेच बोलला, मसनात जावा सगळे, लय बारा बुडाची पोर सगळी.....
मुन्ना : ये आजोबा love u तुझ्या मुळे आमचे फिक्स झाले , आता आम्ही स्मशानात दारू पिणार, ते पण रात्री 12 वाजता....दिग्या कडे पैसे द्या रे सर्वांनी आणि हो केक पण आना आज गोटू मालक का बडे हम वहा मनाऐंगे.... रात्रीचे 11 वाजले सगळे जण बाईक वर स्मशान भूमीत दाखल झाले... मोबाईल च्या उजेडात जागा शोधत होते, पाऊस जॅम तेम थांबला होता, शेवटी कसलीतरी जागा शोधून ते सगळे थांबले,
हरी : ये बाबांनो मला खूप भीती वाटत आहे रे चला घरी जाऊया
मुन्ना : अरे थांब आज मी हडळ बरोबर नाच करणार आहे, तिच्या तालात बघ तू...(सिगरेट चा झुरका घेत घेत)
हरी : मुन्ना भाऊ पण हे ठिकाण चांगला नाही चला उगी...
मुन्ना : ,अरे काय चला रे येथे कोणीच येणार नाही, आणि येथे राहणारे सर्व शांत झोपले आहेत कायमचे त्यामुळे शांत बस थोड्या वेळात केक कापू दारू पिऊ आणि घरी जाऊया....
झालं 12 वाजत आले होते सर्वांनी केक कापण्याची तयारी केली, केक कापला जोरात हॅपी बडे चा आवाज चौकडे घुमला, सगळे शांत झाले केक कापू लागले....,, एवढ्यात हरी ला भास झाला, घशात काहीतरी अडकले आहे अशा आवाजात हॅपी बडे कोणीतरी म्हणत आहे असे भास झाला, तरी त्याने दुर्लक्ष केले....आता केक कापून झाला होता, आता सर्व दारू साठी वाट बघत होते...बॅग मधून मुन्नाने दारूची मोठी बाटली काढली, वेफर्स, फरसाण काढून गाडीच्या एका सीट वरी ठेवले, रिकामे ग्लास काढून सर्वांचे समान पॅक भरू लागला... थंड वातावरणात सर्व जण बडे पार्टी चा आस्वाद घेऊ लागले, खूप वेळ झाल्या नंतर सर्वांना दारूची नशा चांगलीच चढली होती, आता ते मोठं मोठ्या आवाजात एकमेकांना शिवी गाळ करत होते....
मुन्ना : हऱ्या आई****ल्या चल पेग भर सर्वांचे, माजला आहेस तू आज काल....
हरी बिचारा सर्वांचे पेग भरू लागला, पेग भरत असताना हरीचा हाथ एका ग्लासला लागला आणि तो ग्लास जमिनीवर पडला, झालं मुन्ना ला निमित्त च पाहिजे होते भांडणाचे, तो हरी ला धक्का बुक्की करू लागला, दारू का सांडली बे म्हणून लाथ मारू लागला, हरी त्याच्या पाया पडू लागला माफी लागला.... कस बस सर्वांनी मुन्ना ला सावरले..
हरीने पडलेला ग्लास उचलून परत सीट वर ठेवला, ग्लास सीट वर ठेवताच सर्वांचे डोळे पांढरे झाले, जो तो दिसेल त्या दिशेने पळू लागले, कोणी धडपडत पळू लागले तर कोणी चिखलाचा विचार न करता पळू लागले.... कसे बसे सर्वांनी गावातील चौक गाठला.... एक मेकांकडे गँभीर नजरेने बघू लागले, कोणीच बोलेना कोणाला.... कारण भरलेला ग्लास खाली पडला होता त्यातील दारू सर्व सांडली होती, पण तो ग्लास जेव्हा उचलून ठेवण्यात आला होता तेव्हा त्या ग्लास मधील दारू होती ती तशीच होती.... म्हणून सर्व जण घाबरून पळून आले होते...
सकाळ होताच सर्व जण जमले, सर्व जण परत त्या स्मशानभूमी कडे निघाले... ज्या ठिकाणी त्यांनी दारू पिली होती त्या ठिकाणी पोहचले... तेथे जाताच त्यांच्या लक्षात आले की आपण जेथे दारू पिलो तेथे 3 दिवस पूर्वी प्रेत जाळन्यात आले होते, त्यांनी त्यांच्या बाईक घेतल्या आणि परत गावी पोहचले, गावी पोहताच त्यांना कळलं की ते प्रेत रमाबाई च होते जिला तिच्या नवऱ्याने दारू च्या नशेत जीवे मारले होते.... हे कळताच त्यांची दातखिळी बसली, आणि त्यांनी ठरवले की आज पासून दारु प्यायची नाही आणि कोणालाही पिऊ द्यायची नाही.... सर्वांनी मिळून गावातील दारु चे दुकाने बंद पाडली, गावातील आई बहिणीशी नीट वागू लागले.... एक वाईट वळणाला जाणाऱ्या टवाळकी मुलांना त्यांच्याच दारूने व्यसनमुक्ती दिली होती, ज्या रमाबाई चा जीव दारू च्या नशेमुळे हकनाक गेला होता , आज तिच्या नावाने गावात ह्या मुलांनी व्यसनमुक्ती केंद्र उभा केले.....
बाबांनो दारू पिऊ नका, कदाचित अशाच एखाद्या जीव गेलेल्या रमाबाई सारख्या आत्मा तुमची वाट बघत असेल🙏🙏
#समाप्त
No comments:
Post a Comment