कार्यालयातून तो 1 तास अगोदर सुट्टी घेत असे त्याला हेच कारण होते,,,,तो तिथून निघाला,, भीती तर खूप वाटत होती परंतु आई साठी सुद्धा जीव तळमळत होता आणि त्याची तीच तळमळ त्याला घराकडे घेऊन निघाली होती,,,
फक्त 17 वर्षांचा होता तो,,कोवळं वय होत,,वडिलांचे छत्र लहानपणीच हिरावले होते,,,मोठी बहीण असाध्य आजारात गेली होती,,,तो आणि आईच आता एकमेकांचे ध्यान ठेवत असत,,! एका कार्यालयात तो साफ सफाई चे काम करीत असे,,,
रसत्याने चलताना त्याची जी उलाघाल होत होती तीच घरि वाट पाहणाऱ्या त्याच्या आईची देखील होत होती,,,,साधारण 10 मिनिटे लागतात ते कब्रस्तान पार करायला,,,दुसरा मार्ग नव्हता,,सोबती नव्हता,,,तिथे रखवालदार होता परंतु थोड्याच दिवसापूर्वी त्याचे निधन झाले होते,,,,देवाचे नाव घेत घेत शेवटी तो कब्रस्तान च्या गेट पाशी आला!! गेट लोटले,,,इतक्या भयाण रात्रीत त्या गेट चा आवाज त्याचे काळीज चिरून गेला,,,पण त्याला दिसत होता तो फक्त त्याच्या आईचा चेहरा,,,,,आणि तीच हिम्मत त्याला थोडे थोडे पुढे नेऊ लागली,,, आपल्या इथली लोक ह्या कब्रस्तान बद्दल काय काय वाईट अनुभव सांगतात ते सारखे त्याच्या डोक्यात येत होते,,
अर्धा रास्ता त्याचा पार झाला होता,,,पण तितक्यात शांत झालेले वरून राजा विजेच्या कडकडाट सह पुन्हा कोसळू लागले!!!!!
आता थांबण्या शिवाय त्याला पर्याय नव्हता,,,पळत जावे तर रस्ता ठीक नव्हता,,,थोड्याच अंतरावर त्याला एक लिंबाचे मोठे झाड नजरेस पडले,,तिकडे तो चालू लागला,,झाडाचा आडोसा घेऊन,,दोन्ही हात छातीपुढे दाबून तो स्तब्ध उभा राहिला,,,थंडीने त्याचे दात कडकड वाजत होते,,नजरेसमोर फक्त आणि फक्त कबरीच कबरी होत्या,,,,त्याचे अश्रू कपाळावरून ओघळणार्या पाण्यासोबत वाहून जात होते,,,,त्याची हिम्मत आता तुटायला लागली होती,,,,,
आई चा चेहेरा आठवून आता तो रडायला लागला होता,,,,त्याच्या आईला चांगलेच माहीत होते की माझा मुलगा खूप भित्रा आहे,,,,
गुडग्यावर बसून तो आईच्या व्याकुळतेने रडत होता,,,,,,इतक्यात मागून त्याच्या नावाने हाक आली,,,,!!!!!
तो दचकला,,,,हा तर आईचा आवाज वाटतोय पण ती इतक्या पावसात कशी येऊ शकते,,,,??
म्हणून त्याने मागे पाहिले तर ती त्याची आईच होती,,,चिखलातून पळत जाऊन तो आईच्या गळ्यात पडला,,,,आई मला खूप भीती वाटली ग,,,,,,,सगळे संपल्यासारखे वाटत होते,,,पण आता तू आलीस,,,,,चल आपण जाऊ आता,,,,पावसाने देखील ओसरते घ्यायला सुरुवात केली होती,,,चिखल तुडवत दोघे माय लेकरं निघाली होती,,,तो एकटाच बडबड करत होता आई शांत होती,,,लेकराचा हात घट्ट पकडून चालत होती,,,त्यालाही वाटले की आईलाही भीती वाटत असणार,,हो बरोबर आहे ,,ह्या भयानक कब्रस्तानाची भीती तर सगळ्यांना वाटते,,,!!!!!
घर जवळ आले होते,,,दरवाजा आई उघडाच ठेऊन आली होती,,,आईचा हात सोडून तो पुढे गेला,,,समोरील दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली,,,,,!!!!!!! त्याची आई चुलीपाशी निपचित पडली होती,,,त्याने मागे वळून पाहिले,,
कोणीच नाही,,,,,तो गडबडून गेला,,,, पुढे होत आई जवळ बसला,,,तिच्या गालाला हात लावला तर ती थंड पडलेली,,,,आई त्याला सोडून गेली होती,,,,,,,,,,,,त्याने जोरात टाहो फोडला होता,,,आईला बिलगून तो आक्रसून रडत होता,,,दोन,,चार लोक तिथे आली होती,,,, त्यातला एक जण म्हणाला,,,,की त्या तुझी वाट पाहत बसल्या होत्या,,,,जीवाची तगमग चालली होती,,,आम्ही समजवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ,,,,,त्या ऐकत नाहीत म्हणून आम्ही निघून गेलो,,,
ती खिडकीत बसली आपल्या लेकराची वाट पाहत,,,,,खिडकीतून दोन इसम जाताना ते बोलत होते की कब्रस्तान पाशी कोणी तरी मृत्युमुखी पडले आहे,,,,,,तेच त्या आईने ऐकले होते,,,तिचा काळजाचा तुकडा,,,,,,माझ्या बाळाला तर काही झाले नाही,,,,
आणि मोठा श्वास घेत तिने जीव सोडला होता,,,,,,,
पण मरून सुद्धा आपल्या लेकराची काळजी तिला होती,,,आपल्या घाबरलेल्या पोराला ती मरून सुध्दा आणायला गेली होती,,,,,
आणि हे फक्त आईची लेकरा प्रती असणारी मायाच करू शकत होती,,,,,,,
हो,,,,ती आईच होती,,,,,,,,
No comments:
Post a Comment