खेकडे (काल्पनिक भयकथा)
आजची ही गोष्ट आहे कोकणातील संगमेश्वर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या 'बाव नदीची'
मोठे आणि विशाल पात्र असलेली ही नदी भरपूर प्रसिद्द आहे...
जे अस्सल कोकणी असतील त्यांना या नदीची महती माहीत असेलच... सदर कहाणीतील घटना ही सत्यघटना आहे जी मी माझ्या जवळच्या व्यक्ती कडून ऐकली आहे. फक्त कथेतील पात्रांची नावे बदलली आहेत.! कथा वाचून अस्वस्थ वाटेल. त्याहून अधिक मला लिहिताना वाटले! ज्यांना भयकथा आवडत नाहीत त्यांनी कृपया ही गोष्ट वाचू नये!

कोकण म्हंटल की पहिल्यांदा मनात विचार येतो ते..
मन मोहुन घेणारी हिरवळ
तिथल्या कडक देवदेवता
आणि जोडीला होय महाराजाचा गजर!!
मनात गुपिते घेवून बसलेल्या हिरव्या गर्द झाडीतील लपलेली वनश्री...
खळखळता खोल समुद्र
भरपूर मासे...
नारळाची झाडे...

पावसाळ्यात लाल पाणी अंगावर घेवून दुथडी भरून वाहणारी बाव नदी...खुप जुनी आहे म्हणतात. कितीतरी गावे तिच्या काठावर वसलेली आहेत.
अस म्हणतात ही नदी कधी पूर्ण आटत नाही. एरवी सगळ्यांसाठी जीवनदायी ठरणारी ही नदी पावसाळ्यात मात्र रौद्र रूप धारण करत तिच्या प्रवाहात येणाऱ्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करते. तिच्यात सामावनारा क्वचितच जिवंत परत येत असे. असे कित्येक बळी तिने घेतले होते. त्याला गणतीच नाही.
दरवर्षी एक दोन लोक नदीत जीवानीशी गेल्याच्या घटना होतच असतात...

तर एका गावात असाच एक चार-पाच मुलांचा ग्रुप होता. वयानुसार येणाऱ्या साहसाच्या धाडसाच्या सगळ्या भावना त्यांच्यात होत्या. गावात कोणतेही संकट आले तर हे पाच जण मदतीसाठी आधी धावून जायचे. झालेला प्रोब्लेम सोडवायला त्यांना अनेकदा यश ही मिळालेले म्हणून त्याचा त्यांना एक प्रकारचा गर्व देखील झालेला की आपण सगळ नीट करू शकतो असा.
बाव नदी बद्दलच्या वदंता सर्वश्रुत होत्या आणि त्यात बरेचसे तथ्य ही असल्याने सगळ्यांनी त्या साठी काही नियम ही बनवले होते जेणे करून अजुन पुढील होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील.
जसे टळटळीत 12 किंवा 3 च्या उन्हात नदीवर जाणे टाळने..पावसाळ्यात एकटे दुकटे पोहायला जाणे...पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना नदीत चुकीच्या जागी पोहायला उतरने... सूर्यास्तानंतर नदीवर जाणे.. इ अनेक छोट्या गोष्टी होत्या ज्याला काही शास्त्रीय कारणे होती तर काही गोष्टी फक्त समाधानासाठी होत्या.
गुरु, अभय, सत्या, धर्मा आणि वल्लभ असा हा पाच मुलांचा धाडसी ग्रुप होता. अशीच एकदा त्यांच्यात भुतांबद्दल चर्चा रंगलेली. बोलता बोलता त्यांचा विषय बाव नदीवर येवून पोहोचला.
भूताशी सामना न झाल्याने साहजिकच त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. बाव नदी बद्दल पसरलेल्या अफवा दूर करण्यासाठी काहीतरी उपाय करण्याचे ते ठरवतात.

गुरु- "मग कधी जायच नदीवर?"
अभय- " दिवसा ढवल्या जावून काय उपयोग नाय... रात्रीच जावूया!"
सत्या- "मला तर नको वाटतय रात्रीच.. अस पण
घरचे सोडणार नाय"
घरचे सोडणार नाय"
धर्मा- "तू कधी पासुन घरच्यांच ऐकायला लागलास .. "
वल्लभ- मला पण धर्माच म्हणंन पटतय..
आपण न सांगता गेलो आणी काय झाल
तर? घरच्याना कळणार पण नाही.
लोक तर दिवसाचे जायला घाबरतात
नदीवर . ..
आपण न सांगता गेलो आणी काय झाल
तर? घरच्याना कळणार पण नाही.
लोक तर दिवसाचे जायला घाबरतात
नदीवर . ..
गुरु- "अरे येड्या तीच भीती तर घालवायची आहे
आपल्याला. लोक नदीत बुडतात ते काळजी
घेत नाहीत नीट म्हणून.. पवायला येत नाय
आणि
फुकटचा शाहानपना दाखवायचा की जीव
जाणारच ना?"
आपल्याला. लोक नदीत बुडतात ते काळजी
घेत नाहीत नीट म्हणून.. पवायला येत नाय
आणि
फुकटचा शाहानपना दाखवायचा की जीव
जाणारच ना?"
अभय- त्यात आपल्या सगळ्यांना पवायला येतय ना..
मग कुठ आडतय?
मग कुठ आडतय?
धर्मा- ठरल तर मग. आज रात्री नदीवर जायच
किरव्या पकडायला.
किरव्या पकडायला.
सगळे तयार झालेले, शंका फक्त गुरु आणि वल्लभच्या मनात निर्माण झालेली...
दोघे ही मनापासून प्रार्थना करायला लागलेले की सगळे नदीवरुन सुखरूप घरी आले म्हणजे मिळवले.

****************
सगळ्यांची रात्रीची जेवण होतात. जरा वेळ पारावर बसतो म्हणत सगळे घराबाहेर पडतात. रात्रीचे 10.30 वाजले असतात. त्या दिवशी ग्रहण सुरु झालेल असत. चंद्र ही लालभडक दिसायला लागतो. चेष्टा मस्करी करत सगळे नदीच्या पुलावर जमतात.
सगळे पुलावर थांबून एक नजर नदीच्या प्रवाहाकडे फिरवतात. नदीचे पाणी रात्रीच्या उजेडात कुठे लाल तर कुठे काळपट दिसत असते. खळखळ आवाज करत नदी वाहात असते. नदीवर लावलेल्या दोन लाईटच्या खांबांचा पिवळसर क्षीण उजेड पुलापर्यंतच पसरला होता...
दूरदूर पर्यन्त चिटपाखरू ही दिसत नव्हते. वातावरण एकदम शांत आणि गूढ बनलेले. वल्लभला असे वाटत होते की उगीच आलो आज. त्याचे अंतर्मन त्याला सांगत होते मागे फिर मागे फिर! पण त्याकडे दुर्लक्ष करत तो गप्पांमध्ये सामील झाला.

पावसाळा संपूण थंडी सुरु झालेली. कोपर्यातील कोपर्यातील झुडपांची एक वाट पकडून ते पाच ही जण बॅटरीच्या प्रकाशात खाली उतरु लागतात. काही ठिकाणी नदीच्या काठावर काही झुडप पाण्यावर झुकलेली मधुनच ती वाऱ्याने थरथरायची... आणि अचानक लक्ष गेल की भीती वाटायची..
धर्मा सगळ्यात पुढे होता,
त्याच्या डोक्यात विचार येत होते,
'साल हिकड दिवसाच कोण फिरायला येत नाय आन आमी स्वतःहुन एवढ रात्रीच मरायला आलोय..
चालता चालता त्याची नजर पाण्याकडे गेली..'

पाण्यातुंन आवाज येत होता...
कोणतरी लाडिक आवाजात त्याला हाक मारत होत,
धर्माsssss.... ऐ धssssर्मा..... धर्मूss.....
आलास तू....

त्याला वाटल बाकीच्याना पण हाक ऐकू गेली असेल म्हणून तो अचानक थबकुंन मागे बघायला लागला...
त्याच्या अशा मध्येच थांबण्याने त्याच्या मागे येणारा गुरु त्यावर आदळला... त्यांमुळे दोघांच्या ही हातातील बॅटऱ्या खाली गवतात पडल्या...

त्यांच्या बॅटरी चालू होत्या म्हणून बाकीच्यानी त्यांच्या बॅटरी लावल्या नव्हत्या...
"चक् चक् काय धर्मा पुढ बघुन चाल की थांबतोस कशाला...?"

गुरु अंधारात बॅटरी शोधत धर्माला म्हणाला..
धर्माच्या तोंडावर बॅटरीचा झोत फिरवत अभय दात काढत म्हणाला "धर्माला त्याचा बापुस दिसला म्हणून थांबला तो ..!!"
यावर सगळे त्याच्या सोबत हसण्यात सामील झाले.

"काही नाही काही नाही" करत धर्मा पुढे चालायला लागला.
पण सत्याच्या चाणाक्ष नजरेतून त्याचे बदललेले भाव सुटले नव्हते... काहीतरी झाल होत नक्की...

आता गुरु पुढे आलेला... मजेत बॅटरीचा प्रकाश तो इकडे तिकडे फिरवत होता... पण त्याला जरा पण कल्पना नव्हती त्यांच्या सगळ्यांसोबत आता काय होणार होते ते... सगळे जवळपास नदी जवळ पोहोचलेच होते. तेवढ्यात सगळ्यांना करवंदाच्या जाळी जवळ खुसफूस ऐकायला आली... तसे सगळे जागीच थांबले.. सगळ्यांच्या बॅटर्यांचा प्रकाश एकत्रित येवून त्या झुडपा जवळ थांबला... थोड का होईना पण सगळेच घाबरले.. हे पाहुन वल्लभने जवळचा एक दगड उचलून त्या जाळीत भिरकावला तस त्यातून एक सशाचे पिल्लू बाहेर धावत आले.. त्याचे गुंजा सारखे झालेले लाल डोळे एकदा सगळ्यांवर रोखून दुसऱ्या दिशेने तो पळून गेला..
तसा सुटकेचा निःश्वास टाकून सगळे काठावर पोहोचले. काठावर खुप गारवा होता.
वातावरण गंभीर झालेले. त्यात थोडा मोकळेपना आणण्यासाठी धर्मा पैंट थोडी वर फोल्ड करून
धपकन् पाण्यात उतरला आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायला लागला. तसे सगळे हसायला लागले आणि एक एक करत पाण्यात उतरले. येताना त्यांनी सोबत किरव्या पकडायच साहित्य आणलेल होत. गुरु आणि वल्लभ किरव्या पकडायला माहीर होते. दगडात फटित हात घालत ते किरव्या शोधू लागले. आणि काय आश्चर्य!! दोघांनाही लगेच किरव्या भेटल्या... आनंदात ते दोघे पाण्यातच थय थय करून नाचले... बाकी तिघानी पण यावर खुश होत टाळ्या वाजवल्या. तसा सगळ्यांना अजुन हुरूप आला.
सगळे मन लावून किरव्या पकडायला लागलेले. आणि सगळ्यांना किरव्या पटापट मिळत होत्या. वेळ चालला होता पण आनंदाच्या भरात त्यांना त्याचे भानच नव्हते. अधिक हाव ही नेहमीच घातक! त्यांची नदीवरुन परत जायची वेळ टळून गेली 12 वाजून गेले..

त्याना वाटत होत की फक्त ते पाचच जण आहेत तिथे. पण हीच मोठी चूक होती. त्या दिवशी चंद्र ग्रहण होत.
अस ग्रहण जे खुप वर्षातून एकदा येत. नद्या समुद्र या सगळ्यांवर ग्रहणाच वर्चस्व त्या दिवशी सगळ्यात जास्त असत. जमीनी पासून इतक्या दूर अंतरावर असूनही चंद्र समुद्रात भरती ओहोटी आणण्याची क्षमता ठेवतो.

रात्रीचे प्रहर उलगडत होते.. काहीतरी गूढ अतर्क्य अशा गोष्टींची सुरुवात झाली.. नदी जवळ असणारे सगळे प्रेत आत्मे त्यांचा हा खेळ बघत होते..
अपघातात मरुन करवंदाच्या जाळी जवळ बसलेला म्हातारा... नदीत बुडून मेलेले... आत्महत्या केलेले...
काहींचे खून करून तिथ आणून टाकलेले... काही बस पुलावरुन खाली कोसळून मेलेले... काही नदी काठच्या स्मशानात विधी पूर्वक अंतीमसंस्कार करून ही मुक्ती न मिळालेले अतृप्त वाईट आत्मे..

असे कितीतरी शेकडो आत्मे तिथ काठावर त्यांच्या कडे हिडिस पांढऱ्या नजरेने बघत थांबलेले... त्यात लहान मुले ही होती.. नवीन सावज मिळाल्याने शिकार्याच्या चेहऱ्यावर जसे भाव येतात तसे विखारी द्वेषाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आलेले...त्यातले काही रडत होते... त्यांना मुक्ति हवी होती..पण हा सर्व खेळ तर विधात्याचा होता!
जस जसा 12चा प्रहर उलटत होता तस तस त्या अभागी जीवांमध्ये वेगळीच चेतना येत होती. ती सगळी भुत त्या पाच जणांवर वार करून त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी आतुर झालेली.. आणि तो क्षण आला, जेव्हा चंद्राची सावली बरोबर नदीच्या मध्यभागी आली आणि सगळे आत्मे त्या 5 जणांवर हल्ला करायला पुढे सरसावले...

याची सुरुवात झाली, गुरु पासून.. खेकडे पकडताना दगड उचलून उचलून त्याच्या हातात असलेला अभिमंत्रित केलेला रक्षाधागा पाण्यासोबत वाहुन गेला. तेच सत्या सोबत ही झाले...खेकड्यांनी भरलेली पिशवी काठावर ठेवताना कुठल्या तरी झुडपाला अडकून त्याच्या गळ्यातील हनुमानाचे लॉकेट ही अडकून तिथच पडले..
गुरुच्या शरीरापासून रक्षाधागा दूर होताच एका विवाहितेच्या आत्म्याने त्याच्या शरीरात प्रवेश केला.
जवळच खेकडयांनी गच्च भरलेली पिशवी त्याने नदीच्या पाण्यात पुन्हा ओतली...त्याला असे करताना बघून बाकीचे ओरडायला लागले....
पण गुरु एकदमच विचित्र हसत होता...
पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट ही होती कि पिशवी गच्च भरलेली असूनही त्यातून काहीच बाहेर पडत नव्हतं..
ते पाहून सगळ्यांचं ओरडण एकदमच बंद झालं..
काहीतरी अनाकलनीय प्रकार घडतोय हे सगळ्यांच्या लक्षात आले..

सत्या- " चला लवकर उशीर झाला घरी जावू आता. गुरुला घ्या आधी बाहेर."
असं म्हणत सत्या गुरु जवळ जावू लागला तोच त्याच बोलण ऐकून गुरुने त्याचे डॊळे गरा गरा फिरवले...त्याची बुबुळे वर जात पांढरी झाली..सत्या सोबत बाकीचे ही चरकले.... मोकळी झालेली पिशवी त्याच्या अंगावर फेकत गुरू जोरजोरात हसू लागला... आणि बाईच्या आवाजात बोलू लागला..
"खेकडे तर मेले सगळे!! आता तुमी पण मरणार सगळे.. आमच्या सारखे मग तुम्ही पण आमच्यात येणार... हीहीही ... "
वल्लभ - "गुरुssss सरबरित झालायस? काय
बडबडतोयस तू
हे?? "
बडबडतोयस तू
हे?? "
गुरु- "ए हाट!!! मी गुरु नाही मी भटाची सून आहे
कमळा...किरव्या पकडत होतात ना?
भास् झालेला तुम्हाला तो.... काही नाही
कोणत्याच पिशवीत.... हीहीही
आता बघा फक्त तुमच्या सोबत काय काय होतय
ते.. "
कमळा...किरव्या पकडत होतात ना?
भास् झालेला तुम्हाला तो.... काही नाही
कोणत्याच पिशवीत.... हीहीही
आता बघा फक्त तुमच्या सोबत काय काय होतय
ते.. "
(सगळे विचारात गुंतले....4 वर्षापूर्वी मूल होत नाही म्हणून सासरच्यांच्या त्रासाला कंटाळुन भटाच्या सुनेने नदीत उडी मारून जीव दिलेला )
तेवढ्यात गुरुने दोन्ही हातांचा जोर लावून पूर्ण ताकदीने स्वतःचीच मान उलट दिशेने मोडली...
कडकड मानेची हाडे मोडल्याचा आवाज आला..
चौघेही जीव खाऊन ओरडले गुरुssss....
पण तो पर्यंत खूप उशीर झालेला गुरुच शरीर पाण्यात पडून वहायला ही लागलं...सत्या काही हालचाल करणार इतक्यात अचानक नदीच्या पाण्याची
पातळी वाढली... समुद्रात जशा लाटा येतात तशा लाटा नदीत येवू लागल्या... कुणाचाच यावर विश्वास बसत नव्हता पण घडत होत ते खरंच होत...

सगळ्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचा मित्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला...आणि तेव्हाच तो प्रकार घडला.. नदीच्या पाण्यात एक उंचच उंच पारदर्शी भिंत तयार झाली आणि त्यात पाण्यात पडून मेलेल्या सगळ्या आत्म्याचे आक्रंदन सुरू होते..सगळे हृदयाचा थरकाप होईल असे भयंकर किंचाळत होते..
त्या पाण्याने एका सैतानाचा राक्षसी चेहरा धारण केला .. आणि या चौघांकडे त्यांना गिळंकृत करण्यासाठी आपला जबडा उघडून पुढे येवू लागला... मानवी मनाला सहन न होणाऱ्या अतर्क्य गोष्टी घडत होत्या...

धर्मा सगळ्यात पुढे होता त्याला पळायचे ही भान राहिले नव्हते.. थिजल्या सारखा तो बघत थांबला होता... सत्याने त्याच्या दिशेने धावत येत त्याला काठावर ढकलले... आणि त्या पाणी रुपी सैतानाने नदीची सगळी दलदल, घाण हिरवट शेवाळे, विषारी वनस्पतींचा झालेला चिखल असा सगळा गाळ त्या तिघांच्या अंगावर ओकला... खवळत त्या तिघांना आपल्यासोबत घेत तो आकार नदीच्या पोटात सामावला..
धर्मा बधीर झाला होता...
ज्या झुडपावर तो पडला तिथंच त्याच्या हाताला सत्याचे हनुमानाचे लॉकेट मिळाले... त्याला काय करू हेच समजत नव्हते... लॉकेट घट्ट धरून तो काठावर उभा राहिला... अवघ्या काही मिनिटांत त्याचे चारही मित्र हे जग सोडून गेले...त्यांचा साहसीपणा आज त्यांच्याच जीवावर बेतला होता...
तो वाचल्यामुळे बाकी प्रेतात्मे त्यावर चिडलेले...
तो सुटला होता...पण मरता मरता ही सत्याने त्याची मैत्री निभावली...
इतका वेळ अदृश्य असणारे आत्मे आता समोर आले होते.. त्यांच्यातील ते एक एक ध्यान पाहून धर्माच्या हृदयाचं पाणी होत होतं... सगळे त्याच्या अंगावर धावून यायचा प्रयत्न करत होते पण लॉकेटमुळे कोणी त्याला स्पर्श करू शकत नव्हते....
कसातरी धडपडत तो पुलावर आला... त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती...त्या प्रेतातम्यांनी त्याच्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत सुरू ठेवला ... तो आता पुलाच्या कठड्यावर वाकला होता... मित्रांच्या आठवणीने त्याला रडायला येत होते... त्याची नजर खाली वळली.. खाली नदी नेहमीसारखीच वाहात होती...
मगाशी घडलेल्या क्रूर प्रकाराचा मागमूस ही तिथे दिसत नव्हता...
पण तिच्या आजुबाजूला मात्र माणसांची दाटी दिसत होती.. जशी जत्रेत दिसती तशी...फरक एवढाच होता की ही 'माणसे मेलेली' होती...
सगळ्यांचा रडण्या ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता...जणू सगळे त्याला त्यांच्या जवळ बोलवत होते.. "धर्मा उडी मार... खाली उडी मार..."
हा आवाज त्याच्या काना-मनात घुमू लागला..

त्याच्या मनाचा तोल ढळला...काहीतरी विचार करून धर्मा कठड्याच्या अजून पुढे झुकला आणि तत्कक्षणी त्याला विजेचा झटका बसल्या प्रमाणे तो कठड्यापासून दूर झाला...त्याच्या हातातील लॉकेट चमकून उठले होते... आणि त्यानेच त्याच्या मनाला नियंत्रणात आणले.. रडत ओरडत तो गावाकडे पळत सुटला...
कसातरी घराजवळ पोहोचून दरवाज्याजवळ कोसळला... कितीतरी दिवस तो शुद्धीत नव्हता...
गावात आकांत माजला होता एका एकी 4 मुले गावातून बेपत्ता झालेली... आणि धर्मा असा बेशुद्ध होता... एके रात्री त्याला अशीच जाग आली...
पण तो आता वेडा झाला होता...जबरदस्त मानसिक धक्का त्याला बसलेला... ग्लासातील पाणी बघूनही तो आरडाओरडा करायचा... झोपेतून तो उठला त्याला खिडकीबाहेर त्याचे चौघे मित्र गजाला धरून उभे राहिलेले दिसले... ते पूर्ण पाण्याने निथळत होते.. कुजट मांस सडल्यासारखा वास येत होता...
ते चौघे त्याला त्यांच्या जवळ बोलवत होते...

त्याने बाहेर येऊन मुख्य दरवाजा बंद केला...
आणि घराच्या आत आढयाखाली स्टूल घेऊन उभा राहीला... आढयाच्या बरोबर मध्ये पंख्यासाठी म्हणून ठेवलेलं एक मोठं खिळ्याच टोक बाहेरच्या बाजूनी आरपार ठेवलं होत... त्या कडे बघत धर्मा विचित्र हसला... आणि आपलं डोकं त्याने त्या खिळ्यात घुसवल....

आता ते चौघे मित्र कधी कधी पौर्णिमेला पुलाच्या कठड्यावर बसलेले दिसतात....
||समाप्त||
घटना काल्पनिक आहे की सत्य आहे
ReplyDelete