लेखिका-नंदिनी पाटील काल्पनिक
नमस्कार वाचकहो ! या भुतांच्या पवित्र स्मशानभुमीवर एक कथा पोस्ट करतेय. खरतर जिथे देव असतो ती जागा ती भुमी पवित्र असते.पण इथे तर चक्क भुतांची भुमीच पवित्र आहे.या ग्रुपला ज्यांनी हे नाव दिलय त्यांना माझा सलाम.अफलातुन नाव आहे..चला तुम्हाला माझी कथा आवडेल अशी अपेक्षा करुन मी कथेला सुरवात करते ....
एका मोठ्या कुटुंबात नलु लग्न होऊन नांदायला आली.घरात चार चुलत सासवा .त्यांची पोर.त्यात सख्खी सासुही वांड निघाली.घरात सतत माणसांची ये जा.नलु गरीब घरची हुशार आणि देखणी मुलगी.घराच घरपण जपणारी.पण ती आली अन सगळ्या सासवांनी स्वैपाकघरातुन काढता पाय घेतला..इतकच नव्हे तर सतत काम सांगुन तिचा जाचही चालु केला.रांधन उष्टी काढन यातच नलुचा नवा संसार विरघळुन गेला.नवरा तसा चांगला होता .तिला समजुन घेणारा ..तिला साथ देणारा ..पण तो ही तिच काम संपवु शकत नव्हता. काम पुढे कि मी पुढे यात नलुचा जिव आंबुन जायचा..तिला नेहमी वाटायच आपण निवांत झोपलेलो असताना कुणीतरी आपली सगळी काम पटापट उरकुन टाकावीत.पण कसच काय .रोजच कामाच मरण तिला चुकत नव्हत.सगळी काम आवरुन झोपायला तिला रात्रीचे बारा वाजायचे.
नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजता ती परसदारी भांडी घासुन संपवत असताना तिला सतत जाणवु लागल आपल्यामागे कुणीतरी आहे.जे आपल्याला पाहतय अन हसतय . हा भास तिला रोजच होऊ लागला .तिला कधी कधी पांढरी आकृती आसपास असल्याच जाणवु लागल.कधी काळी भुत या शब्दालाही घाबरणारी नलु आता जिवाला कंटाळलेली .त्यामुळे तिला आता कशाचीच भिती उरली नव्हती. आपल्याभोवती वावरणारी अदृष्य शक्ती ही भुत आहे .हे तिला कळल होत.पण बिचारीला भुताकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. तिला घाबरवु पाहणार भुतही शेवटी वैतागल.काही करुन हिला घाबरवायचच .अन ही जर घाबरली नाही तर आपण परत एकदा मरुन जायच अस त्या भुताने ठरवल.
नेहमीप्रमाणे नलु रात्री भांडी घासत होती,आज खुप काम पडल्यामुळे ती कामावर अन स्वतःवर पण चिडलेली.त्यात ती रात्र भर अमावस्येची होती. इकडे भुतान जस ठरवलेल तस नलुनेही ठरवल की आज आपण आपला सगळा राग त्या भुतावर काढायचा. मग मेलो तरी बेहत्तर.
नलु भांड्यांचा ढीग घासत भुताची वाटच पहात होती .अचानक ते भुत नलुच्या समोर आल.ती एक स्त्री होती. लांबलचक पांढरे केस.जणु सुतरफेणीच,आत राहुन राहुन कंटाळलेले डोळे ब्बुबळातुन बाहेर येऊन हवा खात होते.दातांच्या जागी नुसते दोन सुळेच.जे आम्ही अजुनही जिवंत आहोत असे भिती दाखवुन सांगत होते, श्वास घेणे सोडणे यासारखे काहीच काम नसल्यामुळे निराश होऊन फुगुन बसलेले बसके नाक..अंगात मेल्यानंतरही निरम्याची जाहिरात करणारी पांढरीशुभ्र साडी..(टीप..जाहिरातवाले मेलेल्या जिवालाही सोडत नाहीत ) नक्की आपल्याला कुठे जायचय हे न कळल्यामुळे उलटे फिरलेले पाय..आणि जिवंतपणी मारलेला सेंट जणु आता कुजलाय आणि त्याचा उग्र सेंट तयार झालाय असा उग्र वास .अस एकंदरीत भुतीणीच रुप दिसत होत..आपल्या जिवंत सासवांनाच भुत माननारी नलु अशा भुताला घाबरणारी नव्हतीच मुळात....
भुतीण लालभडक डोळे करत बुब्बळ फिरवत नलुकडे येऊ लागली..तिला वाटल नलु घाबरुन बेशुध्द पडेल .पण कसच काय ..नलुने रागाने भुतीणीकडे पाहिल अन काहितरी मनाशी ठरवुन म्हणाली...
"हे बघ ! तु कोण आहेस हे मला माहित नाही ! पण मी तुला आज ही भांडी घासायला लावणार म्हणजे लावणार! चल ये मुकाट्याने भांडी घास ये !"
ही घाबरायच सोडून मला भांडी घासाय काय बोलवते म्हणुन भुतिण खवळली.ती दात विचकत नलुला पकडायला आली.पण नलु जागची हलली नाही . भुतीणीने तिला घाबरयला जवळ जाऊन धरले .इतक्यात नलुने चपळाईने तिच्यापासुन स्वतःला वाचवत दुर पळाली.पण या झटापटीत नलुने त्या भुतीणीचे चारपाच केस उपटले.अन ते घेऊन ती सरळ देवघरात पळाली .जिथे भुतीण प्रवेश करु शकत नव्हती.नलुने ते केस देवघरात लपवले आणि ती निश्चितपणे बाहेर आली ..अजुनही ती भुतीण तिथे उभी होती .पण एका गुरलामाच्या अविर्भावात मान खाली घालुन.तिने नलुला आपले केस परत करण्याची विनंती केली.पण नलु हुशार होती.तिने आपल्या आजीकडुन ऐकल होत की भुताचा केस जर आपल्याला मिळाला तर भुत आपले गुलाम होते.यासाठीच तर नलुने भुतिणीशी पंगा घेतलेला.

नलुने तिला केस परत करण्यास नकार दिला .अन तिला आपली गुलाम होण्यास सांगितले.नलु सांगेल ते काम तिला आता करावे लागणार होते.नाईलाजाने भुतिण तयार झाली. पण तिने नलुला सांगितले जर नलुने तिला एक क्षणही कामाविना बसवले तर ती तिला मारुन टाकेल.नलुने होकार दिला .तिला वाटले आपण दिलेल भुतासारख काम या भुतिनीला संपता संपणार नाही.
झाल..भुतिणीच काम सुरु झाल.भुतिनच ती.. नलुने सांगितलेली कामे झटक्यात पुर्ण करु लागली.धुण भांडी स्वैपाक घर स्वच्छ करणे .दळप करणे सगळी काम पटापट व्हायला लागली .नलुला आता भुतिनिला काम सांगणे आणि मस्त आराम करणे याशिवाय काहिच काम नव्हत.सगळीच काम अगदी चोख वेळच्यावेळी होत असल्यामुळे नलुच्या सासवाना नलुला त्रास द्यायला कारण मिळत नव्हत.पण एवढ सुख मिळुनही नलुला एक चिंता सतावत होती.ही भुतिन तर सगळी काम भरभर उरकतेय.सगळी काम संपली की हिला कोणत काम देऊ मी ??
नको नको म्हणताना तो क्षण जवळ आलाच. आता भुतिनीला काम देण्यासारख नलुजवळ काहीही काम शिल्लक नव्हत.तिला तिच मरण डोळ्यासमोर दिसु लागल.इतक्यात मला काम दे म्हणत भुतिन समोर आली..नलु हुशार होती तिने भुतिनीला अंगणात एक उंच खांब रोवायला सांगितला.भुतिनीने चटकन खांब उभा केला.मग नलु म्हणाली..
"आता जोपर्यंत मी तुला दुसर काम देत नाही तोपर्यंत तु या खांबावर चढायच उतरायच ! आता हेच तुझ काम !"
हुशार नलुच्या जाळ्यात भुतिन पुरती अडकली .आता नलुला कोणताच त्रास नाही .ती मस्त आयुष्य जगतेय ,कारण भुतिन तिच सगळ काम करतेय.

नलुच जस भुत गुलाम झाल तसच तुमच आमचही होवो.फक्त भुताचा केस मिळाला पाहिजे
साठा उत्तराची भुता दक्षीणी कहाणी समाप्त
साठा उत्तराची भुता दक्षीणी कहाणी समाप्त
No comments:
Post a Comment