तिढा भाग ८
-सचिन पाटील
अनपेक्षित घडल्यावर प्रतिक्रिया दोन प्रकारात उमटतात.
पहिली सावधपणाची आणि बचावात्मक असते.
दुसरी मात्र आक्रमणस्वरूपात आणि बरीचशी आक्रस्ताळेपणाने समोर येते.
दीक्षितांनी दुसरा मार्ग निवडला होता.
त्यांचा संयम सुटला होता.
ते त्यांच्या जागी योग्य होते. पण मी तरी कुठे चुकलो होतो ?

मला वाटत होतं त्यापेक्षा दीक्षितांचा आवाज बराच मोठा होता. वाईट बाब म्हणजे क्षणभरापूर्वी अस्खलित मंत्रोच्चार करणारी त्यांची जीभ अर्वाच्य शब्द उच्चारत होती.
कितीही उच्च कोटीचे संस्कार झाले तरी मानवातील पशुतत्व कायम राहते.. आणि अशा बाक्या प्रसंगात ते उफाळून येते.
दीक्षितांचे वंदनीय पायही शेवटी मातीचेच होते तर !
खरं तर त्यांच्यासारख्या विद्वान पुरुषाने संयम ठेवायला हवा होता. असं वागणं त्यांना मुळीच शोभत नव्हतं.
पण त्यांना तरी किती दोष द्यायचा ?
त्या विहिरीतून बाहेर आलेली ती... त्यांच्या ठोकताळ्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान होती. तिने दीक्षितांच्या प्रभावातून स्मिताला कधीच बाहेर ओढले होते.
त्या दोघी... अमानुषपणाच्या दुष्ट पण प्रचंड ताकदीच्या तत्वाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या..
एक मूळ रूपात तर दुसरी मानव रूपात !
वृत्ती मात्र सारखीच... पशुतुल्य.. विवेक गमावलेली !
आता त्या दोघी दीक्षितांकडे रोखून बघत होत्या. त्यांची ती हिंस्त्र नजर कोणाचेही काळीज गोठवण्यासाठी पुरेशी होती. दीक्षितांच्या जागी कोणी दुसरा असता तर हृदय बंद पडून केव्हाच मेला असता.
पण ते शेवटी दीक्षित होते. असा सामना त्यांना नवा नव्हता. म्हणून आताही ते त्या दोघींकडे दुर्लक्ष करून माझ्या पारिपत्याच्या प्रयत्नात गुंतले होते.

तू.. भेकड पुरुषा.. तुला मी आधीच ओळखायला हवे होते. चुकून पुरुष जातीत तुझा जन्म झाला. तुझ्यापेक्षा लहान बालक बरे ! तुझ्यावर विश्वास ठेवला, हे काम करायला तू योग्य ठरशील असा समज बाळगला ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली. स्त्रैण माणसांकडून कधीच पराक्रमाची अपेक्षा बाळगायची नसते हे मी विसरलो. पण तुला असा मोकळा सोडणार नाही. आधी तुला संपवतो मग या दोघींचा समाचार घेतो.... ते अखंड बडबडत होते.
मी फक्त ऐकत होतो.
असा संतापही कधी अनुभवायला मिळतो ?
अतिवेगाने मंत्रोच्चार करीत दीक्षितांनी दोन्ही हातांच्या पंजात हळदीने माखलेल्या दोऱ्याची क्रिया केली. सुताची ती लगड.. क्षणात पोलादासारखी ताठ झाली.
आता वातावरण बदलले होते. हवेत उष्मा निर्माण होऊ लागला होता. दीक्षितांनी काहीतरी दिव्य प्रयोग केला होता नक्की !
त्या दोघीना जागेवरून पुढे सरकणेही अवघड झाले. त्यांच्या घशातून चित्रविचित्र आवाज बाहेर येऊ लागले.
स्थलस्तम्भन.... त्यांच्या आजूबाजूचा अवकाश प्रतिकात्मक क्रिया करून दीक्षितांनी गोठवला होता. तो काळ, ती वेळ आणि ती जागा दीक्षितांनी सुताच्या चौकटीत बंदिस्त केली होती.
निश्चितच ते महान साधक होते....
आता त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.
तू.. खरं तर तुझ्यासारख्या क्षुद्र जीवावर मंत्रप्रभाव टाकणे हा माझ्या विद्येचा अवमान ठरेल ! पण तुझा गुन्हा दुर्लक्षित करण्याजोगा नाही. तुला या विश्वासघाताची शिक्षा भोगावीच लागेल !
दीक्षित... थांबा !.. मी अंगातली सर्व शक्ती एकवटून किंचाळलो.
दीक्षित जागीच थबकले..
मी विश्वासघात केलाय म्हणता आणि तुम्ही ? तुम्ही तरी काय निराळे केलेत ! आपल्याकडे विश्वासाने येणाऱ्या माणसांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेणे याला तुमच्या पंडिती भाषेत काही वेगळा शब्द आहे का ?... मी सुनावले.
दीक्षितांच्या नाकपुड्या थरथरू लागल्या. त्यांचे डोळे आग ओकू लागले.
मी.. कुणाचा विश्वासघात केला मी ?.. त्यांनी विचारले.
स्मिताच्या वडिलांचा... त्यांनी स्मिताची कुंडली तुम्हाला दाखवली. तेव्हा माझ्याशी संबंध आल्यावर तिच्यातल्या सैतानी ताकदीला रान मोकळे होईल ही जाणीव होऊनही तुम्ही वेळीच आजसारखा प्रयोग करून तिला मुक्त करू शकत होते. पण तुम्ही तसे जाणूनबुजून केले नाही.. कारण काय ?... मी अंमळ थांबलो.
तुच ते कारण सांग मूर्ख माणसा ? दीक्षित गरजले.
कारण... कमलाकर दीक्षित.. तुम्हाला त्या हिंस्त्र तत्वाच्या क्रूरतेचा पडताळा घ्यायचा होता. नव्हे.. ती ताकद तुम्हाला स्वतःच्या नियंत्रणात आणायची होती. त्यासाठी स्मिता माझ्या जीवनात येणे गरजेचे होते आणि ते अटळही होते. त्याशिवाय तुम्हाला आजसारखी संधी मिळणार नव्हती. आताही तुम्ही स्मिताला नष्ट करून ती त्या विहिरीतल्या अमानुष शक्तीला स्वतःच्या हुकमाची गुलाम करण्यासाठीच हा खटाटोप करत आहात !..
दीक्षित.. स्वतःच्या सामर्थ्याचा असा दुरुपयोग करताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती. कुठलाही विद्याभ्यास हा मानव कल्याणासाठी करायचा असतो हे विसरून तुम्ही सात बळी जाईपर्यंत प्रेक्षक बनून या नरमेधाचा विकृत आनंद लुटत बसलात ? सांगा हे खोटे आहे का !..
दीक्षितांच्या चेहऱ्यावर आता कमालीचे छद्मी हास्य पसरले..
माझ्या अपेक्षेपेक्षा तू बराच हुशार दिसतोस..तुला हे कसे, कधी कळले ? त्यांनी विचारले.
नीच, पाजी माणूस !
दीक्षित... मला भेकड म्हणून तुम्ही हिणवलेत. पण एक सांगू, भेकड माणसे कोणत्याही गोष्टीवर तातडीने प्रतिक्रिया देत नाहीत. ती प्रत्येक गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त खोलात जाऊन विचार करतात. अशा मनांचा थांग लागणे कठीण असते. विशेषतः तुच्यासारख्या स्वार्थी आणि धूर्त लोकांना ! तुम्ही स्व:सामर्थ्याच्या कैफात नेहमीच दुसऱ्याला तुच्छ लेखतात...
तुमच्याकडे मी पोहोचलो.. तुम्ही दिशाबंधनाचा प्रयोग करून माझ्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तुमचे विचार माझ्या नेणिवेत कोरण्याचा तुमचा डाव होता. पण त्याचवेळी मी तुमच्या कृत्याचा, त्यामागच्या हेतूचा स्वतंत्रपणे विचार करत होतो. तिथेच तुम्ही फसलात..
तुम्ही दिलेली ती पूड...स्मिताला पुरती निकामी करणारी आहे असा अंदाज मी बांधला होता. त्यामुळे तिचा अत्यल्प वापर मी स्मितावर केलाय. म्हणून तुमच्या प्रयोगाच्या फलनिष्पत्तीपूर्वीच ती भानावर आली... तिला मी असा नष्ट होऊ देणार नाही. कशीही असली तरी माझा जीव गुंतलाय तिच्यात !..मी रडवेला झालो होतो.
त्या गोठलेल्या जगतातून स्मिता आणि विहिरीतली ती, दोघीही माझ्याकडे स्तब्ध होऊन बघत होती. स्मिताच्या डोळ्यातून अश्रुधारा बरसत होत्या.
अस्स..शाब्बास रे प्रेमवीरा ! मग तुझ्या डोळ्यांदेखत तुझ्या प्रियेचा अंत होतांना बघ. मग ही बया माझ्या ताब्यात घेऊन मी संहारक शक्तीचा स्वामी होईल... ते ही तू बघशील. कारण आता मी तुला मारणार नाही पण मरणातून अधिक वाईट शिक्षा देईल.. म्हणून त्यांनी कसलेसे भस्म माझ्यावर फेकले.
निरुपद्रवी भासणाऱ्या त्या राखेने परिणाम साधला..
माझे सर्वांग लुळे पडले. लोळागोळा होऊन मी खाली कोसळलो. मी पाहू शकत होतो. ऐकू शकत होतो. इतर सर्व अवयव निष्प्राण झाले होते.
ही मरणाहून भयंकर शिक्षा ! दुर्दैव म्हणजे मी उघड्या डोळ्यांनी स्मिताचा मृत्यू बघणार होतो.
दीक्षितांनी आता समोरचा जाळ खूप म्हणजे खूपच वाढवला. जणू एखादी चिता पेटवली होती.
चिता... माझ्या स्वप्नांची आणि स्मिताची राखरांगोळी करणारी !
सर्व काही संपल्यात जमा होते. माझ्याकडे कण्हण्याशिवाय काहीच नव्हते.

काही वेळ गेला...
दीक्षित आता अखेरच्या तयारीला लागले होते. एका पसरट ताटात त्यांनी कोरड्या कुंकवाचा सडा फेकला. त्या ताटाच्या तळाशी आता लालभडक पृष्ठभूमी तयार झाली होती. शेजारी टाकलेल्या पिशवीतून त्यांनी एक पुस्तक आणि विशिष्ट आकाराची काडी बाहेर काढली. पुस्तकात पाहून ते ताटात काहीतरी कोरु लागले.
त्यांच्या हाताच्या हालचालीवरून ते तांत्रिक स्वरूपाच्या आकृत्या रेखाटत होते हे नक्की !
तसं करताना होणारा ती कुरुकरू आवाज त्या दोघीना आणखी अस्वस्थ करत होता.
त्यांनी एकमेकांकडे पाहिले. दोघीनी जणू काहीतरी निश्चय केला.
काही क्षणात विहिरीतल्या तिची गगनभेदी किंकाळी बाहेर पडली.
क्षणभर दीक्षितसुद्धा भीतीने गारठले... पण क्षणभरच !
स्मिता मात्र शक्तिपात झाल्यासारखी खाली कोसळली. मी डोळे मिटले.
खेळ संपत आल्याची ती लक्षणे !

घशातून होणाऱ्या विचित्र गुरगुरण्याचा आवाज बाहेर पडला तसे मी डोळे उघडले.
समोरचे चित्र पाहून माझे काळीज फाटते की काय असे वाटू लागले.
दीक्षितांची किडमिडीत मान दोन हात आवळत होते.
त्या नाजूक हातात इतके पाशवी सामर्थ्य कुठून आले असावे...
राणी कमालीच्या आसुरीपणाने दीक्षितांची मान मोडू पाहत होती.
तशा गोठलेल्या अवस्थेतही विहिरीतली ती विक्राळ हसत होती.
तिने इशारा केला तशी राणीने दीक्षितांच्या मानेवरील एका हाताची पकड सैल केली.
दुसऱ्या हाताने तिने सुताची ती ताणलेली चौकट, ते ताट, पुस्तक आणि दीक्षितांची पिशवी सरळ समोरच्या आगीत भिरकावून दिली.
दीक्षितांचे डोळे भयाने पांढरे पडले.
ती पावलापावलाने त्यांच्याकडे सरकू लागली होती.
दीक्षितांना मूर्च्छा आली.
तिने राणीकडे मोहरा वळवला. आता भेदरण्याची माझी पाळी होती.
पण तेव्हढ्यात अनपेक्षित घडले.
तिने राणीच्या कपाळाला स्पर्श केला.
दीक्षितांचा जीव घेऊ पाहणारा तो इवलासा जीव जमिनीवर कोसळला.
मी हातपाय हलवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. काही क्षण ते विश्वासच बसेना.
माझे सर्व अवयव पूर्वीसारखे कार्यरत झाले होते.
दीक्षितांनी टाकलेली सर्व बंधने गळून पडली होती. त्या माळरानावर आता भयाण वारा घोंगावत होता.
विहिरीतल्या तिच्या हातात दीक्षितांचा पाय होता.
ती सावकाश विहिरीच्या दिशेने सरकत होती.
एव्हाना शुद्धीवर आलेल्या दीक्षितांकडे मी पाहिले.
त्यांच्यात मदत मागण्याचेही त्राण उरले नव्हते.
हा प्रयोग कसा उलटला हे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यात सहजपणे वाचता येत होते.
दीक्षित.. मूर्ख ठरलात तुम्ही.. दुष्ट असली ती ऊर्जा होती. ती नियंत्रणात आणता येते पण सोबतच ती संक्रमितदेखील होऊ शकते हे विसरलात ! तिने ताकद पणाला लावून स्मितातले तत्व राणीच्या शरीरात संक्रमित केले... खेळ संपला होता.
दीक्षितांचे भविष्य आता स्पष्ट होते. त्यांना मरेपर्यंत त्या विहिरीत तिच्या नियंत्रणात राहावे लागेल... सरपटत !
तिला बोलावून ताब्यात घेण्याचा विचार करण्याची चूक त्यांनी केली होती.
त्याचे प्रायश्चित्त त्यांना घ्यावेच लागणार होते.
राहा आता काळ्या विहिरीत सरपटत ! !

पूर्वेकडे फटफटले...
स्मिताने दिलेल्या आवाजानंतर मला आणि राणीला जाग आली.
तिथे कोणी.. कोणीच नव्हते.
हे काय बाबा, कुठे आलो आपण ? राणीने विचारले.
कुठेच नाही बेटा, आपण किनई वाट चुकलो होतो अंधारात !
मला तर काहीच आठवत नाही ! स्मिता म्हणाली.
मी फक्त हसलो.. आमचा तिढा वाट चालू लागला.

.... काही दिवस उलटले असावेत.
राणी शाळेतून लवकर घरी आली.
आम्ही दोघांनी तिला एकदम विचारले,
काय झाले आज बाईसाहेबाना ?
काही नाही.. आमचे ते सर ! म्हणून ती स्फुंदून रडू लागली.
अग, नीट सांग. काय घडलं ते ?
मी आईला सांगेन, बाबा तुम्ही बाहेर जा ! ती रडतच होती.
काही वेळाने स्मिता बाहेर आली. तिने सांगितलेली गोष्ट सुन्न करणारी होती.
शाळेतला शिक्षक.. लहान मुलींशी असले चाळे ! शी.. मला किळस आली.
मी शाळेत जाऊन बघतो त्याला ! सात्विक संतापाने मी बोललो.
राहू द्या तुम्ही ! काही गरज नाही,.. स्मिता म्हणाली.
मी काहीसा चिडून आत गेलो... राणीकडे पाहिले.
स्मिता तसं का बोलली असावी ते क्षणार्धात माझ्या लक्षात आले.

... राणीच्या चेहऱ्यावर गोंदण फुललं होतं.
समाप्त.
धन्यवाद !
धन्यवाद !
No comments:
Post a Comment