आत्मा -bhay katha,bhutachi gosht
सत्यघटना आमच्या एरियात घडलेली, तीन जिवलग मित्र होते इतके की कधी पण पहा यांना एकमेकांशीवाय कधीच एकटे दिसत नसत व त्यांचे पान ही हालत नसे ,कधी ही बघा हे त्रिकुट एकत्र असायच, तुम्ही तिघे एकाच मुलीच्या प्रेमात पडलात तर कोण दोघ आपली कुर्बानी देईल एका साठी अस म्हणून आमच्या चाळीतिल बायका त्यांना हिणवत आणि हे सुधा मि मि मि करून त्यांना उत्तर देत.अशी मैत्री मि आज पर्यन्त पाहिली नव्हती आणि पुढे पहाणार पण नाही.तिघाना पत्ते आणि क्यारम खेळण्याच भारी छंद, पट्ठे एकाच कपातुन चहा प्यायचे, एकाच ताटात जेवायचे,जर कोणी या पैकि कोणाला पण नडत तर बाकीचे दोघे त्याचा चांगला समाचार घेत,एकाच वर्गात एकाच शाळा कॉलेजात शिकुन ही मूल मोठी झाली आता नोकरी साठी वेगळे होण्याची वेळ आली होती पण एकमेकांना क्षणभर वेगळ होउ न देणारी ही मुले ह्यावर सुद्धा त्यांनी एक उपाय शोधून काढला त्यांनी मिळून भुर्जी पाव ची गाडी सुरु केली,पोरांच्या बोलघेवडया स्वभावा मुळे आणि मेहनती ने धनदयास चांगली बरकत आली होती, मैत्री साठी जीव टाकतील तर कोणाचा जीव ही घेतिल अशी ही पोर सर्वांच्या आवडीची होती चाळीत तिघे ही मोठयानचा मान राखनारे कोणाचेही मदतीला धाउन जाणारे असल्याने चाळीतिल लोकांना त्यांचा आधार होता,सगळ गुण्यागोविंदा ने दिस सरत होते पण का कुणास ठाउक बिचार्यांच्या मैत्रिला कुणाची तरी नज़र लागली आणि त्या तिघान पैकी एकाचा दुर्धर आजाराने मृत्यु झाला, सर्वत्र एरियात शोककळा पसरली बाकीचे दोघ तर ह्या धककयाने सावरत नव्हती दोघांनी एकाच खोलीत स्वतः ला कोडुंन ठेवले होते तेही तब्बल पाच दिवस पण सहाव्या दिवशी ही दोघ एकदम हसत खेळत बाहेर आली जस की काहीच झाल नाही ह्या अविर्भवात. सगळे आ वाचून त्या दोघां कड़े पहात होते आणि हे दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आले पण त्यातील एकाचा अजुन एक हाथ अधान्तरी होता जस की त्याने ही कोणाच्या खांद्यावर हाथ ठेवला आहे असे पहाणार्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होते आणि हे दोघे कुणा तिसऱ्या व्यक्तिशी बोलत बोलत बाहेर आले पुन्हा सर्वंशी नॉर्मली पहिल्या सारखे वागत होते, पत्ते खेळताना तीन जनात वाटले जाउ लागले,क्यारम खेळत असताना चार जण लागतात त्यापैकि है दोघ आणि फक्त एक जन घेत,परत पहिल्या प्रमाणे एक कप चहा, एक च जेवनाच ताट पण आता ह्या दोघांबरोबर एक अदृश्य शक्ति वास करत होती
प्रथम वाडकर
क्रमशः

No comments:
Post a Comment