स्वप्न... पार्ट 1...- Kalpanik katha
काल्पनिक कथा by...Shraddha Bhat...©️
किर्रर्र अंधारात कानोसा घेत तो येत होता.. सतर्क आणि सावध पवित्रा होता त्याचा.. आजची रात्रच महत्वाची होती त्याच्या साठी... काहीसा खुरडतच तो त्या इमारती जवळ येऊन पोहचला..
जीर्ण, मोडकळीस आलेली ती मंझिल इमारत !! इमारतीत शिरून त्यानं वरती नजर टाकली.. किती जुनी झाली होती ती वास्तू... कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही.. गोल गोल जाणारे लाकडी जिने, मध्ये उभे राहून अगदी पार वरच्या मजल्यापर्यंत नजर जातं होती.
त्यानं एक खोल निःश्स्वास टाकला.
कसाबसा तो दुसऱ्या मजल्यावर पोहचला.. जिन्या शेजारी समोरासमोर दोन फ्लॅट होते.. म्हणजे असावेत.. धुळीने माखून त्याचे दरवाजे भयानक भासत होते..
एक दरवाजा कर्रर्रर्र करीत उघडला.. कोणीच नव्हतं तिथं पण तो आतमध्ये शिरला... आतमध्ये मिट्ट काळोख !!!पण त्या काळोखात काहीतरी हालचाल जाणवत होती... त्यानं हात पुढे केला.. काहीतरी कचकन हातात शिरलं आणि त्याच्याही नकळत त्याच्या हातातून रक्ताचा अभिषेक झाला.. त्याचा हात वेदनेने ठणकू लागला आणि त्याला जाग आली....
घामानं डबडबलेला अविनाश दचकून जागा झाला... रात्रीचे 3वाजले होते..

अविनाश उर्फ अवी कदम... वय अंदाजे 26वर्षे, nationalised bank employee, नुकतीच मुंबईला transfer झाली आणि तो ओळखीच्या एका मित्रा मार्फत या घरात शिफ्ट झाला..
खरं तर life enjoy करण्याचे दिवस होते त्याचे पण परिस्थिती तसं करू देत नव्हती.. घरी आई, वडील आणि दोन लहान भावंडांची जबाबदारी होती.. आणि उगाच उधळण करणं त्याच्या स्वभावात नव्हतं.. अगदी स्वस्तात मिळालं म्हणून त्यानं तो फ्लॅट घेतला होता. शहरापासून दूर असल्यामुळे तो घरी येई पर्यंत अगदी अंधारून यायचं.. पण नाईलाज होता... मागच्या महिन्यातली गोष्ट,
अविनाशला यायला उशीर झाला होता. आपल्याच नादात तो येत होता आणि एका ठिकाणी तो पाय घसरून पडला.. उठताना त्याचं सहज लक्ष गेलं.. तर तो एका रिंगणात पडला होता.. आजूबाजूला चार ठिकाणी लिंबू ठेवले होते आणि त्यावरच गुलाल आणि अभीर टाकलं होतं.. अविनाश ला ह्या गोष्टी वर अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे त्यानं आपले कपडे झटकले आणि तो रस्त्याने चालू लागला... मागे काहीतरी घुंघु असा आवाज आला म्हणून त्यानं वळून पाहिलं तर.. ते आखलेले रिंगण गर्र्गर फिरायला लागलं होतं.. अविनाश धावतच घरी पोहचला तो घामानं चिंब होऊनच.. आणि मग सुरु झाली भास -आभासाची एक नवी दुनिया..... !!!
त्या रात्री पासून अविनाशला चित्र -विचित्र स्वप्नं पडायला सुरुवात झाली... आधी आधी तर त्यानं ते अजिबात मनावर घेतलं नाही पण जसं जसे असले प्रकार वाढू लागले तसे त्याला काळजी वाटू लागली आणि हे सांगणार तरी कोणाला??? हळू हळू त्याची भीती खरी ठरत होती.. त्याला भास की आभास हेच कळेनासं झालं.. त्याचं ऑफिस मध्ये लक्ष लागेनासे झाले. तो घराबाहेर पडायला घाबरू लागला.. सतत त्याच्या मनावर कसलं तरी दडपण असल्या सारखं वाटू लागलं
आजही तसंच घडलं होतं.. तो झोपी जाताच एका विचित्र घरात त्यानं प्रवेश केला.. आजूबाजूला प्रेतांचा सडा पडला होता. सगळीकडे दुर्गंधी पसरली होती.. त्या घरात खूप गर्दी होती पण चेहरे नसून ते फक्त चित्र विचित्र आकार होते... वेगवेगळ्या आकारात असलेले ते जीव त्याच्या कडे बघून त्याच्या जवळ येत होते.. सगळयांनी त्याच्या भोवती फेर धरला होता... त्यांच्या लांबलचक जिभा त्याचा घास घेण्यासाठी जणू आतुर झाल्या होत्या. किती वेळ गेला कोणास ठाऊक !!!
अचानक वेगवेगळ्या मंत्राचे उच्चार यायला लागले.. वातावरण अधिक गूढ वाटू लागलं. सगळयांनी अविनाशला घट्ट पकडून ठेवलं होतं.. अविनाशचा चेहरा अभीर गुलालाने माखला गेला.
नाहीsssss.....अविने मान फिरवली पाहतो तो काय तो स्वतः च्या घरात बेड वर पडला होता.. त्याच्या अंगात सडकून ताप भरला होता आणि त्या ग्लानीतच तो काहीबाही बरळत होता... किती वेळ गेला कोणास ठाऊक?? बाहेर उजाडत आलं होतं.....

क्रमशः...
No comments:
Post a Comment