रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 4)
रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 4)
नितीन काकड
नितीन काकड
.....मल्हार ने समर्थ ला काही योग क्रिया शिकवल्या कि ज्यातून तो स्वतः चा जीव वाचवू शकेल ,मल्हार ला पौर्णिमेच्या आधी सर्व तयारी करून ठेवायची होती ,म्हणजे ऐन वेळी कसली धावपळ त्याला नको होती ,आणि तसाही पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर पासूनच त्याची खरी कसोटी सुरु होणार होती ,त्याला सद्गुरूंची कृपादृष्टी लाभण्यासाठी 72 तास तलावात एका पायावर उभं राहून खडतर अशी तपस्या करावी लागणार होती ,त्यानंतरच त्याला अतर्क्यप्राय शक्त्या भेटणार होत्या त्याही फक्त ह्याच कामासाठी ,इकडे समर्थन देखील त्याच्या टीम ला सोबत घेऊन दिवसभर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली ,जर मंदिरात गेल्यावर काही धोका वाटलाच तर बाहेर कुठून पडता येईल याचेही त्याने अंदाज लावले , बाहेरून मंदिराचे रूप खूपच मोहक दिसत होते ,पण आतून ते तेवढेच रहस्यमयी झाले होते ,मंदिराच्या मागच्या बाजूला समर्थ ला मातीचा ढिगारा पडलेला दिसला जस काय कुणीतरी काहीतरी खोदत आहे आणि त्याची माती अशी बाहेर टाकत आहे ,समर्थ ने सर्वांना मंदिराच्या आत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता ,टीम मधले दोघे कुणीतरी संमोहित केल्याप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेशकर्ते झाले होते ,दैव बलवत्तर म्हणून कल्पना ला ते दोघे तिकडे जातांना दिसले आणि तिने सर्वांना सांगितले ,सर्वजण त्यांना पकडायला त्यांच्या मागे गेले ,पण अचानक तंद्री तुटल्यामुळे ते दोघे त्या स्थिती मधून बाहेर आले आणि लगेच मंदिरातून त्यांनी काढता पाय घेतला ,पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हां त्यांच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता जणू काही खूप भयंकर काहीतरी त्यांनी पाहिलं होतं ,मल्हारमुळेच ते दोघे सुखरूप बाहेर येऊ शकले होते ,मल्हार ला घरी बसल्या बसल्या धोक्याची जाणीव झाली होती म्हणून त्याने त्याच्या सामर्थ्याने त्यांचं संमोहन तोडलं आणि होणाऱ्या अनार्थपासून त्यांना वाचवलं ,सर्वजण घरी जाऊन पुढचा प्लॅन बनवत होते पैकी एकाला पाटलावर लक्ष ठेवण्याचं काम दिल्या गेलं होतं,बाकी सर्वजण ठरल्या प्रमाणे आप आपल्या कामाला लागले ,इकडे मंदिरात सुद्धा मोठा कट शिजत होता ,ह्या पौर्णिमेला "त्याला "पृथ्वीवर आणण्याचे त्याच्या भक्तांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होते ,"तो" पाताळात सूक्ष्म रुपात कैद होता ,त्याला त्याचं पूर्ण रूप तेव्हाच प्राप्त होणार होतं जेव्हा महादेवाच्या मूर्तीत लपवलेल्या त्या "महानागमणीतून" ज्याचं दर्शन शंभर वर्षातून फक्त एकदाच होतं ,त्या महाचंद्राचे किरणे परावर्तित होऊन त्याच्या अंगावर पडतील तेव्हा तो पूर्णत्वास येणार होता ,महानागमणीची शक्तीसुद्धा त्याला प्राप्त होणार होती , आणी मग तो अमर होणार होता , मग सुरु होणार होतं काळोखाचं साम्राज्य ,सुरु होणार होता दहशतीचा नंगा नाच ,त्यासाठी त्याचे सेवक सर्वोतोपरी प्रयत्न करत होते ,त्यांना फक्त पौर्णिमेची प्रतीक्षा होती ,कोणत्याही हालतीत त्याच्या सेवकांना हि संधी दवडायची नव्हती ,कारण एकदा का हि संधी हुकली कि पुन्हा शंभर वर्षा पर्यंत "त्याला" बाहेर आणण्याचे सर्व मार्ग बंद होणार होते कोणत्याही मार्गाद्वारे त्याला बाहेर आणता येणं शक्य नव्हतं ,पण तो कितीही शक्तिशाली असला तरी शंभो महादेवासमोर कस्पटासमानचं होता,तो डायरेक्ट मंदिरात पाऊल ठेऊच शकत नव्हता म्हणून त्याच्या भक्तांनी मंदिराच्या आतून बाहेर जाण्यासाठी एक भुयार करायला सुरुवात केली की जे मंदिर संपल्यानंतर लगेच संपेल, पण त्याची दिशा अश्याप्रकारे असेल की त्या महानागमानिवर त्या महाचंद्राचे पहिले किरण पडल्यानंतर ते परावर्तित होऊन बरोबर त्याच्या अंगावर पडेल ,म्हणजे त्याला मंदिरात पण यायचं काम पडणार नाही ,आणि त्याच काम पण होईल ,आणि त्यासाठीच त्याच्या भक्तांनी ह्या कामात जे जे अडथळे आणतील त्या सर्वांना गुंतवलं होतं ,गुरासारखे हाल केले होते त्या लोकांनी ह्या सर्वांचे ,कुणी नाही ऐकलं तर चाबकाचे फटके बसायचे ,4,4 दिवस उपाशी ठेवायचे,त्यामुळे मजबुरीनी ते लोकं हे काम करायचे ,इकडे सकाळी गावात एकच कल्लोळ माजला ,समर्थ च्या टीम मधल्या दोघाजनांचा घात झाला होता ,हे तेच दोघे होते जे मंदिराची पायरी चढून आत गेले होते ,दोघांनाही अतिशय निर्दयीपणे मारल्या गेलं होतं ,आणि बाजूच्या भिंतीवर रक्तने लिहिलं होतं की "आमच्या परवानगी शिवाय मंदिराची पायरी चढायची नाही" तुमची एक चूक तुमची शेवटची चूक ठरू शकते ह्यांच्यासारखी" , समोरचं ते दृश्य बघून समर्थ ,मल्हार आणि टीम हादरून गेले ,कुणी एवढं कसं क्रूर वागू शकतं ह्याचाच ते विचार करत होते,त्या दोघांच्या बॉडी कडे बघत पाटील कुत्सितपणे हसला आणि काहीतरी टिप्पनीं केली ,समर्थला आता राग अनावर झाला त्याने जाऊन पाटलाच्या दोन कानाखाली वाजवल्या ,"मला माहिती आहे ह्या सर्वांचा कर्ता धरता तूच आहेस हैवना ,फक्त दोन दिवस थांब ,नाही तुला कुत्रासारखं फरपटत आणून गावसमोर नागडा करून नाय मारला तर नाव नाय सांगणार ,अरे काय चूक होती ह्या गरिबांची ज्यांना तू एवढ्या निर्दयतेने मारलं ते ,"मल्हार समर्थ ला सावरत म्हणाला की ,"आपल्याकडे पक्का सबुत नाहीये त्यामुळे तू डायरेक्ट त्यांच्यावर आरोप करू शकत नाही ,योग्य वेळ आल्यावर सर्वांचे खरे चेहरे समोर येणार आहेत आणि ते खूप धक्कादायक असणार आहे ,त्यामुळे योग्य वेळेची वाट बघ ,
दोन मेंबर गेल्यामुळे बाकी लोक पण आता समर्थची साथ द्यायला नको म्हणत होते ,शेवटी स्वतः चा जीव तर सर्वांनाच प्यारा असतो ,समर्थ सर्वांना खूप समजावून सांगत होता की होणाऱ्या गोष्टी आपण नाही बदलू शकत पण जे भविष्यात होऊ नये त्यासाठी तर आपण नक्कीच काही तरी करू शकतो म्हणून,पौर्णिमेच्या दिवशी रात्री सर्वांना काय करायचं ,कसं करायचं ,आणि काही गरज पडली तर मला अंतरमनाने संदेश कसा पाठवायचा ,मंदिरात जाऊन कोण कोणती पोझिशन घेणार ,एकमेकांमध्ये संदेश वहन कसं करायचं ,बेसिक सेल्फ डिफेन्स पद्धती ,ह्या सर्व गोष्टी सांगून मल्हार आपल्या पुढच्या कामासाठी निघून गेला ,तपश्चर्या नंतर कराव्या लागणाऱ्या पूजेची त्याने आधीच तयारी करून ठेवली आणि ती रूम कुणालाही उघडू द्यायची नाही ,समर्थ ला अशी सक्त ताकिद देऊन तो मार्गस्थ झाला ,जाता जाता ,त्याला एक गोष्ट खटकली कि प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असणारे पुजारीबाबा आणि सरपंच ह्या वेळी अचानकपणे मधेच कुठे सटकले .(क्रमश : )
दोन मेंबर गेल्यामुळे बाकी लोक पण आता समर्थची साथ द्यायला नको म्हणत होते ,शेवटी स्वतः चा जीव तर सर्वांनाच प्यारा असतो ,समर्थ सर्वांना खूप समजावून सांगत होता की होणाऱ्या गोष्टी आपण नाही बदलू शकत पण जे भविष्यात होऊ नये त्यासाठी तर आपण नक्कीच काही तरी करू शकतो म्हणून,पौर्णिमेच्या दिवशी रात्री सर्वांना काय करायचं ,कसं करायचं ,आणि काही गरज पडली तर मला अंतरमनाने संदेश कसा पाठवायचा ,मंदिरात जाऊन कोण कोणती पोझिशन घेणार ,एकमेकांमध्ये संदेश वहन कसं करायचं ,बेसिक सेल्फ डिफेन्स पद्धती ,ह्या सर्व गोष्टी सांगून मल्हार आपल्या पुढच्या कामासाठी निघून गेला ,तपश्चर्या नंतर कराव्या लागणाऱ्या पूजेची त्याने आधीच तयारी करून ठेवली आणि ती रूम कुणालाही उघडू द्यायची नाही ,समर्थ ला अशी सक्त ताकिद देऊन तो मार्गस्थ झाला ,जाता जाता ,त्याला एक गोष्ट खटकली कि प्रत्येक गोष्टीत आपल्या सोबत असणारे पुजारीबाबा आणि सरपंच ह्या वेळी अचानकपणे मधेच कुठे सटकले .(क्रमश : )
No comments:
Post a Comment