अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -12
अलवणी
लेखक : अनिकेत समुद्र
भाग १२
“आकाश… आपण जाउ यात का इथुन? मला भिती वाटते आहे…”, शाल्मली म्हणाली.
पण आकाशचे तिच्याकडे लक्षच नव्हते. दरवाज्यापाशी उभे असलेले रामुकाका, आकाश आणि जयंत अंधारलेल्या तळघरात डोळे फाडुन काही दिसते आहे का पहाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु काळोख एवढा होता की दोन फुटांवर जरी कोणी उभं असलं तरी दिसण्याची शक्यता नव्हती.
रामुकाकांनी हातातली बॅटरी चालु केली आणि एकवार मागे वळुन बघीतले.
“मला काही झालं तर हे दार पुन्हा पहील्यासारखं घट्ट लावुन घ्या आणि इथुन निघुन जा, पुढे जे काही होईल ते देवाच्या हाती..”, असं म्हणुन त्यांनी तळघरात पहीलं पाऊल टाकलं. तळघराच्या पायर्या बर्फासारख्या थंड होत्या. रामुकाकांच्या अंगावरुन एक शिरशीरी येऊन गेली. त्यांनी दोन क्षण वाट पाहीली पण काही झालं नाही. रामुकाकांनी दुसरा पाय टाकला आणि मग एक एक करत पायर्या उतरून खाली जाऊ लागले.
बॅटरीचा प्रकाश काही इंच पुढंपर्यंत जाऊन अंधारात लुप्त होत होता. रामुकाकांच्या दृष्टीने फक्त तेवढे काही इंचाचेच जग होते, बाकी सगळा अंधार. त्या अंधारात कोण होते, काय होते, काय करत होते ह्याची यत्कींचीतही कल्पना कोणाला नव्हती.
नारायण धारप ह्यांनी त्यांच्या एका कथेत ह्या परीस्थीतीचे फार छान वर्णन केले आहे. ते म्हणतात, “शेवाळ्याने भरलेल्या पाण्यात जेंव्हा तुम्ही उतरुन पुढे पुढे जाऊ लागता तेंव्हा काय होते? पाय टाकला की शेवाळे तात्पुर्ते बाजुला होते आणि पाणि दिसु लागते, परंतु जसजसे तुम्ही पुढे जाऊ लागता, तसं तसे ते बाजुला झालेले शेवाळे पुन्हा एकत्र होते, पाण्याला आच्छादुन टाकते…. तुमच्या मागे तुमचा मार्ग बंद झालेला असतो…………………….“
रामुकाकांचे तसेच झाले होते, दिव्याचा प्रकाश पुढे गेल्यावर, क्षणभरापुर्वी दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या त्या पायर्या पुन्हा अंधारात बुडुन जात होत्या.
साधारणपणे २५-३० पायर्या उतरल्यावर सपाट जमीन लागली. आतमध्ये भयानक हाडं गोठवणारी थंडी होती. रामुकाकांनी नकळत एका हाताने गळ्यातली रुद्राक्षाची माळ घट्ट पकडली.
तोंडाने सतत देवाचे नामःस्मरण चालु होते -
ॐ गोविंदाय नमः॥। ॐ विष्णवे नमः॥। ॐ मधुसूदनाय नमः॥।
ॐ त्रिविक्रमाय नमः॥। ॐ वामनाय नमः॥। ॐ श्रीधराय नमः॥।
ॐ उपेंद्राय नमः॥। ॐ हरये नमः॥। श्री कृष्णाय नमः॥
तळघरात विचीत्र शांतता होती, जणु काही सारा आसमंत ’आता काय होणार?’ ह्याची वाट पहात चिडीचूप बसुन होता. रामुकाकांना त्यांच्या छातीचे ठोके स्पष्ट ऐकु येत होते.
थोडे अंतर आत गेल्यावर रामुकाकांना डाव्या हाताला ती छोटी खोली दिसली जेथे काही दिवस त्र्यंबकलालने स्वतःला बंद करुन घेतले होते. रामुकाका सावकाश चालत त्या खोलीपाशी गेले आणि बंद खोलीचे दार सावकाश आत ढकलेले. दार उघडेच होते.. पुन्हा एकदा तो विकृत किर्र… आवाज करत दार उघडले गेले. त्या विस्तीर्ण तळघरात दरवाज्याचा उघडण्याचा तो आवाज घुमुन राहीला.
रामुकाकांनी खोलीच्या अंतःर्भागात बॅटरीचा प्रकाश टाकला. खोली मोकळीच होती. एकदा खात्री झाल्यावर रामुकाकांनी बॅटरीचा प्रकाश भिंतींवर आणि खोलीच्या छताकडे टाकला, परंतु सुदैवाने तेथे कोणीच नव्हते.
रामुकाका खोलीत शिरले आणि अत्यंत घाणेरड्या वासाचा भपकारा त्यांच्या नाकात शिरला. रामुकाकांच्या एका हातात बॅटरी होती आणि दुसर्या हाताने रुद्राक्षाची माळ घट्ट पकडली होती त्यामुळे त्यांना नाक झाकणे शक्यच नव्हते. रामुकाका त्या वासाची पर्वा न करता दोन पावलं टाकुन अजुन आतमध्ये आले.
अवकाशाच्या पोकळीत, जेथे हवा नाही, पाणी नाही, गुरुत्वाकर्षण नाही.. आणि सगळ्यात मुख्य जेथे जिवन नाही तेथे कसे वातावरण असेल? तसेच वातावरण खोलीच्या आतमध्ये होते, रामुकाकांची कसोटी लागत होती, त्यांच्या छातीवर प्रचंड दडपण आले होते, त्यांना श्वास घ्यायला स्वच्छ हवा मिळत नव्हती. परंतु रामुकाकांचा निर्धार पक्का होता. रामुकाकांनी बॅटरीचा प्रकाश सावकाश खोलीतुन फिरवायला सुरुवात केली. जमीनीवर एका ठिकाणी त्यांना नखांचे अनेक ओरखडे दिसले. कोणीतरी असहाय्य पणे, उद्वीगतेने आपला संताप, आपली बेचैनी त्या जमीनीवर उतरवली होती. रामुकाकांचा शोध सुरु होता आणि त्यांना खोलीच्या दुसर्या कोपर्यात जे अपेक्षीत होतं ते दिसले. रामुकाकांच्या चेहर्यावर एक विजयी हास्य पसरले.
रामुकाका ’त्या’ दिशेने जाऊ लागले आणि खोलीतला गारवा अचानकपणे वाढला तसा रामुकाका सावधं झाले. त्यांच्या अंतःर्मनाने त्यांना धोक्याची सुचना द्यायला सुरुवात केली. खोलीत नक्कीच कोणीतरी आले होते. रामुकाकांनी माघारी वळवुन पाहीले, पण बॅटरीच्या प्रकाश झोतात त्यांना कोणीच दिसले नाही. रामुकाकांनी पुन्हा एकदा बॅटरीचा प्रकाश भिंतीवरुन छताकडे न्हेला आणि त्यांना ’ती’ नजरेस पडली.
छताला हाताचे तळवे आणि गुडघे टेकवुन उलटी होऊन नेत्रा रामुकाकांकडे तुच्छतेने बघत होती. तिच्या डोळ्यांतुन संताप, तिरस्कार आग ओकत होता.
“काय रे म्हातार्या, मला शोधतो काय?”, दात विचकत नेत्रा म्हणाली
रामुकाका काहीच बोलले नाहीत. खरं तर त्यांची भितीनी वाच्चता बंद झाली होती. हातापायातली शक्ती गेली होती. परंतु रामुकाका तरीही धीर एकटवुन तिच्याकडे बघत उभे होते.
“अरं जगायचंस नव्ह का थोड्यावेळ, काय घाई एवढी मरायची?”, छद्म्मीपणे हसत नेत्रा म्हणाली.
“सटवे, तुला काय वाटलं, चार-दोन फालतु जादुचे प्रयोग तु करुन दाखवलेस म्हणजे आम्ही तुला घाबरु होय? तुला यमसदनी पाठीवल्याशिवाय हा म्हातारा मरणार नाय…”, उसन्या अवसानाने रामुकाका म्हणाले.
“अस्सं! तु मारनार व्हयं मला???”, असं म्हणुन नेत्रा सात मजली हसली. तिच हासणं सर्व तळघरात दुमदुमले. नेत्रा भिंतीवरुन हळु हळु सरकत खाली येऊ लागली. रामुकाकांचे हात-पाय गोठले होते, परंतु सर्व शक्ती एकटवुन त्यांनी आपल्या खिश्यातुन एक तांबडे पुस्तक बाहेर काढले आणि ते नेत्राच्या समोर धरले.
ते पुस्तक पहाताच नेत्रा क्षणभर जागच्या जागी थांबली आणि मग भराभर दोन-चार पावलं मागे सरकली.
“का गं भडवे, घाबरलीस नव्हं? बापाला घाबरलीस का नाय? अं? कळलं न हे काय आहे? गरुड-पुराण..! ऐकले असशीलच तु नाही का?????”, रामुकाका म्हणाले.
हातात धरलेल्या त्या पुस्तकाने त्यांच्या अंगात चांगलाच जोश संचारला होता.
नेत्रा जळफळत, डोळे विस्फारुन तिथे उभी होती.
“एक पाऊल पुढे येशील तर तुझी राख होईल इथंच..”, रामुकाका ते पुस्तक पुढं धरत म्हणाले… “आन तु रे त्र्यंबकलाल, तिथं दबा धरुन काय करशील.. तुला कळत नाय, माझ्या हातात काय आहे ते?? चलं ये इथं समोर माझ्या…”
रामुकाका खोलीच्या दुसर्या कोपर्यात बघुन बोलत होते.
त्याचबरोबर भिंतीचा तो काळा, अंधारलेला कोपरा सजीव झाला आणि तो अंधार हळु हळु पुढे सरकत नेत्राच्या खाली जाऊन उभा राहीला.
“हरामखोर!”, रामुकाक ओरडले..”स्वतःच्या बायका पोरांना सोडुन ह्या सटवीच्या मागे लागला तु.. अन ति मेल्यावरपण तिला जिता ठेवलास.? हे हे.. पिंड.. इथं लपवुन ठेवलं होतंस व्हय??”, खोलीच्या त्या कोपर्यात त्या गोलाकार, जळमट लागलेल्या भाताच्या गोळ्यांकडे बोटं दाखवत रामुकाका म्हणाले.
तो अंधार रागाने थरथरत होता, संतापाच्या ज्वाळा त्यातुन बाहेर पडुन रामुकाकांना गिळंकृत करु पहात होत्या.
रामुकाकांना कल्पना होती ते फार काळ ह्या दोघांना थोपवुन ठेवु शकणार नाहीत. दोघांपैकी कोणीही बेफाम होऊन पुढे सरसावले असते तरी परीस्थीती हाताबाहेर जाऊ शकली असती.
रामुकाका सावकाश मागे न वळता मागे सरकु लागले.
नेत्रा आणि त्र्यंबकलालच्या नजरा रामुकाकांकडे लागल्या होत्या.
रामुकाका मागे मागे सरकत दारापाशी आले आणि अचानक त्यांचा पाय एका लाकडी पाटात अडकला. अडखळुन ते खाली कोसळले. त्यांच्या हातातले ते पुस्तक दुर फेकले गेले. केवळ तो एक क्षण आणि त्याचवेळी त्या अंधाराने रामुकाकांकडे झेप घेतली.
आपला मृत्यु अटळ आहे हे समजुन रामुकाकांनी डोळे घट्ट मिटुन घेतले आणि त्याचवेळी त्यांच्या कानावर त्र्यंबकलालची वेदनेने भरलेली किंकाळी ऐकु आली. रामुकाकांनी डोळे उघडुन बघीतले. भिंतीच्या कोपर्यात त्र्यंबकलाला थरथरत उभा होता, रामुकाकांनी मागे वळुन दाराकडे पाहीले. दारात जयंता मिठाचा पुडा घेऊन उभा होता…
“रामुकाका, चला, उठा लवकर…”, असं म्हणुन त्याने रामुकाकांना हात धरुन उठवले आणि त्यांना धरुन जणु ओढत ओढतच तो तळघरातुन बाहेर पडण्याच्या जिन्याकडे धावला………………………
…. “रामुकाका चला लवकर बाहेर..”, रामुकाकांना ओढत ओढतच जयंता पायर्यांवरुन तळघराच्या बाहेर यायला निघाला.
दोघांनीही मागे काय होते आहे, मागुन कुणी येते आहे का? हे पहाण्यासाठी एक क्षणही नाही दवडला. पण त्यांना माहीत होते मागुन कोणीतरी लडखडत, तडफडत, लंगडत त्यांच्या मागे मागे येत होते.
दोघेही तळघराच्या बाहेर आले. दाराबाहेर शाल्मली आणि आकाश वाट पहात उभेच होते. जयंता आणि रामुकाका बाहेर आल्यावर चौघांनीही मिळुन ते तळघराचे दार जोरात ढकलले आणि बाहेरुन त्याला ती भलीमोठ्ठी कडी घालुन टाकली.
त्यांच्यामागावर जे कोणी येत होते ते एव्हाना दरवाज्यापाशी येऊन थडकले होते.
जयंताने क्षणाचाही विलंब न करता त्या पुड्यातुन एक मुठभर मिठ घेतले आणि दरवाज्याबाहेर त्याची एक रेघ ओढली.
“किती काळ? किती दिवस? का किती तास? हे मिठ त्यांना रोखु शकेल ते माहीत नाही, पण निदान सध्यातरी आपण काही वेळापुरते सुरक्षीत आहोत.”, जयंता म्हणाला.
रामुकाका आणि जयंताच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते.
शाल्मलीने स्वयंपाकघरातुन पाण्याने भरलेला लोटा रामुकाकांच्या हातात दिला आणि म्हणाली, “तुम्हाला जाऊन बराच वेळ झाला, तुम्हाला आम्ही खुप हाका पण मारल्या, पण काहीच उत्तर आले नाही म्हणुन जयंता….”
रामुकाकांनी घटाघटा पित पाण्याचे घोट घश्याखाली उतरवले आणि मग ते म्हणाले, “चला तिकडच्या खोलीत चला, आपल्याला आता घाई करायला हवी” असं म्हणत भराभर चालत रामुकाका खोलीकडे निघाले आणि त्यांच्या पाठोपाठ जयंता, आकाश आणि शाल्मली सुध्दा.

“रामुकाका खाली, तळघरात काय झालं सांगा ना!”, नंतर जेंव्हा सर्वजण खोलीत बसले होते तेंव्हा शाल्मलीने विचारले. जयंता त्यावेळी खोलीच्या बाहेर तशीच एक मिठाची रेघ ओढण्यात मग्न होता.
तो काम संपवुन आतमध्ये आला तेंव्हा रामुकाकांनी खाली, तळघरात घडलेला वृत्तांत सांगायला सुरुवात केली.
“रामुकाका, तुम्ही उगाचच जिवावर बेतणारा धोका पत्करलात..”, रामुकाकंचे बोलणं झाल्यावर शाल्मली म्हणाली
“हम्म.. पण निदान आपल्याला काही उत्तरं तरी मिळाली. त्र्यंबकलालनेच नेत्राला जिवंत ठेवले, तिच्या आत्म्याला मुक्ती मिळु दिली नाही. कदाचीत हेच ते कारण असावं ज्यामुळे नेत्राने त्र्यिंबकलालला मारले नसावे. त्यानंतरच्या ह्या इतक्या काळात नेत्रा आता अधीक शक्तीमान झाली आहे, तिच्यावर झालेल्या अत्याचारांचा प्रत्येकावर बदला घेत सुटली आहे.”
रामुकाका पुढे काही बोलणार तोच दुरुन जोर जोरात ’खड्ड..खड्ड’ असा आवाज ऐकु आला. दारावर कोणीतरी जोरजोरात धडका मारतं होतं, जणू काही पिंजर्यात अडकलेले एखादं हिंस्त्र श्वापद…
“बरं आता काय करायचं? आपल्याला जे पहायचं होतं ते पाहीलं, आपण त्यांच्या विरोधात लढू शकत नाही हे ही अलिखीतपणे जाणलं. मग इथं थांबायचं कश्याला? चला इथुन निघुन जाउ यात, ते बाहेर यायच्या आत…”, आकाश म्हणाला.
“नाही, तसं केलं तर शाल्मलीच्या जिवाला धोका आहे..”, रामुकाका म्हणाले…
“शाल्मलीच्या?? पण का?”, जयंता आणि आकाश दोघंही एकदमचं म्हणाले.
रामुकाकांनी खोलीच्या कोपर्यात अंग चोरुन बसलेल्या आपल्या मांजराला जवळ बोलावले. मांजराला मांडीवर घेउन कुरुवाळले, त्याच्या पाठीवर थोपटले आणि मग ते मांजर त्यांनी जयंताकडे दिले.
जयंताने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे बघीतले. रामुकाकांनी नजरेनेच त्याला आपण जसे केले होते तसे करायला सांगीतले.
जयंताने रामुकाकांसारखेच त्या मांजराला गोंजारले आणि ते मांजर आकाशकडे दिले. आकाशने सुध्दा तसेच केले आणि मांजर शाल्मलीच्या समोर धरले. शाल्मली त्या मांजराला घेणार तोच त्या मांजराने आपले दात बाहेर काढले आणि “म्याऊ…” असा कर्णकर्कश्श आवाज काढला आणि फिस्सकारत तेथुन निघुन गेली.
सर्वांनी पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे पाहीले
“नेत्राचा काही अंश अजुनही शाल्मलीच्या शरीरात आहे.. जर आपण तिला इथुन न्हेण्याचा प्रयत्न केला तर…”, रामुकाका अचानक बोलायचे थांबले
“तर काय रामुकाका?”, आकाशने विचारले
परंतु रामुकाका शाल्मलीकडे निरखुन पहात होते.
शाल्मली एव्हाना स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती. तिच्या नजरेत झालेला बदल रामुकाकांनी अचुक हेरला होता.
“साल्या.. म्हातार्या.. लै चालु आहे हा तु…”, शाल्मली म्हणाली.
जयंता आणि आकाश चमकुन शाल्मलीकडे बघु लागले.
शाल्मली उठुन उभी राहीली, मग तिने दोन्ही हात बाजुला करुन स्वतःभोवतीच एक आनंदाने गिरकी मारली आणि मग समोरच्या बेडवर जाऊन बसली.
बराच वेळ शाल्मली स्वतःची नख निरखून बघण्यात मग्न होती. मग सावकाशपणे तिच्या चेहर्यावरचे हास्य मावळले आणि त्या जागी एक छद्मी, क्रुर हास्य उमटले.
तिने मान मागे वळवुन कोपर्यात बसलेल्या मांजराकडे पाहीले. शाल्मलीच्या नजरेला एक विलक्षण धार आली होती. मांजराची अस्वस्थपणे चुळबुळ सुरु झाली. ते कोपर्यातुन दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु जणु काही त्याच्या जाण्यावर कोणीतरी मर्यादा घातल्या होत्या. ते मांजर कोपर्यातच जागच्या जागी फेर्या मारु लागले.
क्षणाक्षणाला त्याच्या चालण्याच्या कक्षा लहान होत गेल्या, ते मांजर भिंतीच्या एका कोपर्यात दबले गेले आणि मग सुरु झाली एक असहाय्य तडफड. चारही पाय झाडत ते मांजर सुटकेचा प्रयत्न करु लागले. ते ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण घश्यातुन आवाजच फुटत नव्हता, जणु काही त्याचा घसा कुणीतरी दाबुन धरला होता. मग हळु हळु त्या मांजराची तडफड बंद झाली आणि ते कोपर्यात हातपाय ताठ करुन मलुल होऊन पडले.
ते मांजर मृत्यु पावले आहे हे कोणी वेगळ सांगायची गरज नव्हती.
शाल्मलीने मान वाकडी करुन पुन्हा एकदा सर्वांकडे पाहीले आणि ती स्वतःशीच खदाखदा हसु लागली.

शाल्मली स्वतःशीच हसण्यात मग्न होती तेंव्हा जयंताने हळुच तो मिठाचा पुडा स्वतःकडे सरकवला आणि त्यातले मुठभर मिठ घेऊन शाल्मलिच्या अंगावर भिरकावले.
अंगावर गरम तप्त पाणी पडावं तसं शाल्मलीने क्षणभर अंग झटकले, तिचा क्रुर चेहरा अधीकच क्रुर झाला.
“अबे..साले.. ते मिठ बिठ मला नको घाबरवुस.. ते त्या लंगड्या त्र्यिंबकलालसाठी ठिक आहे..” असं म्हणुन शाल्मली जागेवरुन उठली, जयंताच्या जवळ आली आणि तिने खाड्कन जयंत्याच्या मुस्काटात लावुन दिली.
शाल्मली नाजुक असली तरीही त्या कानफाटात विलक्षण जोर होता. जयंताच्या हातातला मिठाचा पुडा दुर भिरकावला गेला आणि जयंता जागच्या जागी मागे पडला.
शाल्मलीच्या हातावर, तोंडावर त्या मिठाने भाजल्यासारखे काळे डाग पडले होते, केस विजेचा धक्का बसावा तसे कडक होऊन विखुरले गेले होते आणि तिची ती भेसूर नजर तिचा चेहरा अजूनच विद्रूप बनवत होती.
शाल्मली पुन्हा बेड वर जाऊन बसली तिने पाय गुडघ्यात वाकवून पोटाशी ओढून घेतले आणि त्यावर दोन्ही हातांची घडी घालून ती सर्वांकडे बघत होती. रामुकाका, जयंता, आकाश ह्यांना काय करावे तेच सुचत नव्हते.
शाल्मालीने एक हात आपल्या केसांतून फिरवला आणि म्हणाली, “कित्ती छान वाटते आहे, बर्याच दिवसांनी असे केस, नाहीतर इतके दिवस तेच ते आपल टक्कल…..” मग अचानक बोलता बोलता थांबली आणि तिने रागाने सर्वांकडे पहिले व पुढे म्हणाली..”तुम्ही सगळे मरणार…. कुत्र्याच्या मौतीने मरणार.”
आकाश पुन्हा आपल्या खोलीत परतला. शाल्मलीचा नुकताच डोळा लागला होता, तर मोहीत ’मिकी माऊसचे’ जिग्सॉ-पझल जोडण्यात मग्न होता.
आकाशने खोलीत एकवार सर्वत्र नजर टाकली. आदल्या रात्री घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. शाल्मलीचा तो भेसुर चेहेरा आठवुन आकाशच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. आकाशने घट्ट डोळे मिटुन घेतले आणि आपल्या कुलदैवतेचा फोटो डोळ्यासमोर आणला, मनोभावे हात जोडले आणि काही क्षण तो शांत चित्ताने तेथेच उभा राहीला.
सर्व वाईट विचार, वाईट आठवणी, भिती एक एक करत कमी होत गेले. आकाशला प्रसन्न वाटु लागले तसे त्याने डोळे उघडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तो आपल्या शोधकार्याला लागला.
जयंता वरच्या बेडरुममध्ये गेला. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावून घेतल्याने खोलीत अंधार पसरला होता. जयंताने सावधानतेने खोलीत प्रवेश केला. त्याची नजर खोलीच्या अंतरंगात लागलेली होती. चाचपडत त्याने बटनांच्या दिशेने हात न्हेला आणि अचानक त्याला असे जाणवले कि त्याचा हात कोणीतरी घट्ट पकडला आहे. जयंताने झटका देऊन हात काढून घेतला.
तो भास होता का खरंच कोणी त्याचा हात धरला होता ह्यावर त्याचे एकमत होईना. जयंता थोड्यावेळ तेथेच अंदाज घेत उभा राहिला. परंतु खोलीतून कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. धडधडत्या अंतकरणाने जयंता खोलीच्या आत गेला आणि त्याने दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात खोलीचे अंतरंग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले.
जयंताने खोलीतून सर्वत्र नजर फिरवली. त्याच्या नजरेस दिसेल असे तेरी कोणीही त्या खोलीत नव्हते. जयंताने भिंतींच्या टोकाला असलेल्या कोपर्यांकडे बघितले. भिंतीच्या कोपर्यात मोडी लिपीमध्ये लिहीलेली ती अक्षरं खोलीत येणार्याचे लक्ष वेधुन घेत होती. जयंताने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि फारसा वेळ न दवडता तो सुध्दा आपल्या शोधकामात बुडुन गेला.
खोलीचे कोनाडे, कपाट, बेडखाली, पडद्यांच्या मागे, टेबलाचे खण, जयंताने सर्व काही पालथे घातले परंतु महत्वाचे असे काही हाती लागले नाही.
निराश होऊन जयंता मागे वळला आणि त्याच्या छातीत एकदम धस्स झाले, केवळ काही फुटांवर नेत्रा उभी होती. तिची जळजळीत, क्रोधीत नजर जयंताच्या नजरेचा वेध घेत होती.
जयंताला दरदरून घाम फुटला. नेत्रा त्याच्या आणि दरवाजाच्या मध्ये उभी असल्याने बाहेर पडायला कुठूनच मार्ग नव्हता.
नेत्राचे ओठ एकाबाजूने वर सरकले आणि एक कुचकट हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले. मग सावकाश पावला टाकत ती जयंताच्या दिशेने येऊ लागली. ओरडण्यासाठी जयंताने तोंड उघडले, परंतु त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. त्याची भीतीनी वाचा बसली होती.
प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे जयंता जस-जशी नेत्रा जवळ येऊ लागली तस-तसा मागे सरकू लागला.
शेवटी मागे सरकत सरकत तो भिंतीला येऊन टेकला. नेत्रा त्याच्या अगदी जवळ आली होती. तिने आपला उजवा हात पुढे केला आणि एखाद्या मरतुकड्या पक्ष्याची पकडावी तशी त्याची गळा-मान हातात धरली. तिच्या हाताच्या त्या थंडगार, निर्जीव स्पर्शाने जयंतच्या अंगावर एक काटा येऊन गेला. नेत्राने आपल्या हाताची पकड हळू हळू वाढवत न्हेली. जयंताला गळा आवळला जात असल्याची जाणीव होत होती, पण तो काहीच करू शकत नव्हता. हळू हळू त्याला श्वास घेणे अवघड होऊ लागले.
“पुनिंदा असा खोडसाळ पणा करू नगस..”, अत्यंत हळू परंतु तितकाच भेदक असा नेत्राचा आवाज जयंतच्या कानावर पडला…”नै तर तुम्हास्नी मराया मी पुर्निमेची पन वाट पहाणार नै.. जा सांग तुझ्या त्या म्हातार्याला..” असा म्हणून तिने आपला हाताची पकड ढिल्ली केली.
बोलताना नेत्राच्या ओठांमधून सापासारखी एक काळी जीभ आतबाहेर करत होती, जणू सैतानाचे दुसरे रूपच …
नेत्राने हात काढून घेताच जयंता खाली कोसळला तेंव्हा त्याला जाणीव झाली कि तो जमिनीपासून काही फूट वर उचलला गेला होता.
खाली पडल्यावर तो डोळे घट्ट बंद करून काही वेळ बसून राहिला. जेंव्हा त्याने डोळे उघडले तेंव्हा नेत्रा तेथून निघून गेली होती.

अलवणी लेखक : अनिकेत समुद्र - भाग -13
अलवणी
लेखक : अनिकेत समुद्र
भाग १३
शाल्मली पुन्हा बेडवरून खाली उतरली आणि त्या मेलेल्या मांजराजवळ गेली. खाली वाकून तिने ते मांजर एका हातांनी उचलले आणि सावकाश त्याला आपल्या गालावरून, कपाळावरून, डोक्यावरून घासत फिरवले जणू ते एखादे सौफ्ट-टोय होते. मग तिने ते मांजर तळहातावर ठेवले आणि अचानक त्याच्या पोटाचा एक दाताने लचका तोडला. रक्ताची एक चीळकांडी तिच्या चेहर्यावर उडाली. पण शाल्मालीला त्याची परवा नव्हती. तिने तो तुकडा चावून चावून खाल्ला, मग अजून एक, आणि मग अजून एक तुकडा.
आकाशाने मोहिताचे डोळे झाकून त्याला जवळ घेतले.
अचानक शाल्मालीचे खाणे बंद झाले आणि ती तोंड वाकडे करून क्षणभर थांबली आणि मग तिला उलटी झाली.
“साल्या.. कधी कोंबडी, बकरा खायला घातला नाही कारे हिला? सगळे ओकून काढले बाहेर??”, अंगावर सांडलेली ओकारी हाताने झटकत शाल्मली आकाशला म्हणाली..
“नेत्रा, पण आम्ही काय पाप केले आहे? तुझ्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा आम्हाला का? शाल्मलीने तूझ काय बिघडवले होते? तिला हा त्रास का?”
रामुकाकानी पहिल्यांदाच शाल्मालीचा उल्लेख नेत्रा असा केला.
“तुमी सगळी मानव जात नाय का? कुणाला पण सोडणार नाय, मला फकस्त इथून बाहेर पडायचे होते, अडकून पडले होते इथ. तुमी आलात आणि मला बाहेर जायचा मार्ग मिळाला..”, नेत्रा म्हणाली
“पण मग शाल्मालीच का? आमच्यापैकी कोणी का नाही?”, आकाशाने विचारले
“तिच्या आत्म्याने मला तिच्या शरीरात प्रवेश करू दिला, तुमच्या नाही…”, नेत्रा म्हणाली
“पण का?”, आकाश
“कदाचित.. तिला मी अश्या गोष्टीचे आमिष दाखवले जे तिच्याकडे नवते. माझ्या प्रलोभनाला ती फसली..”, नेत्रा हसत म्हणाली..
“कसले आमिष?”, आकाश
“त्या दिशी नी का आपण मज्जा मारली बेड मध्ये.. तिला जमत नसेल तस.. म्या म्हणल मी तुला तो आनंद मिळवून द्येईन मग घुसले तिच्या शरीरात…”, नेत्रा सांगत होती.. “मला एक माध्यम हवे होते इथून बाहेर पडायला, ते मिळाले, आता एकेकाला संपवणार, जो भेटेल त्याला मारणार, सोडणार नाय कुणाला..” अस म्हणून तिने एक विजयी चित्कार केला.
तिच्या त्या आवाजाने रामुकाका, जयंता आणि आकाशाच्या अंगाचा थरकाप उडाला.
“मग वाट कसली बघते आहेस.. आम्ही तुझ्या समोरच आहोत.. ये मार आम्हाला आणि मोकळे कर एकदाचे..”, रामुकाका म्हणाले.
“थोड दिस थांब रे म्हातारड्या..पूर्णिमा तर येउन्द्ये कि…त्या रात्री आपल्याला लई शक्ती असते माहीती आहे नवं?.. चंद्रमा झाकोळला नी जात ना ह्या अलवनी मुळे.. चारच दिस.. आन मग ती रात्र येणार…” असं म्हणून पुन्हा एकदा नेत्रा भेसूर खदा खदा हसली..
शाल्मालीच्या चेहऱ्यावर लागलेले रक्त आता वाळून त्याचे पोपडे बनले होते आणि ते गालाला चिकटून बसले होते. तिने केलेल्या उलटीचा घाणेरडा वास खोलीत भरून राहिला होता.
“इथून हिला घेऊन जायचा प्रयत्न करू नका, तिच्या शरीराचा आणि आत्म्याचा ताबा हाय माझ्याकडे…” असा दात विचकत नेत्रा म्हणाली आणि मग खोलीच्या कोपर्यात गुडगे पोटाशी घेऊन बसून राहिली.
रात्रभर शाल्मली जागी होती आणि त्या तिघांकडे नजर ठेऊन होती. सकाळी कधी तरी ती जमिनीवर आडवी झाली. बहुदा नेत्रा तिच्या शरीरातून बाहेर पडली आणि शाल्मली झोपेच्या आहारी गेली.

“बाबा.. आईला काय झालं?”, आकाशला हलवतं मोहीत विचारत होता.
आकाशने डोळे उघडुन बघीतले. शाल्मली गुडघ्यात डोकं खुपसुन हमसुन हमसुन रडत होती.
आकाश तिच्या शेजारी जावुन बसला.
आकाशला पाहुन शाल्मलीला अजुन भरुन आलं.
“आकाश!.. हे .. हे काय झालं आहे सगळं?? हे रक्त कसलं लागलं आहे माझ्या अंगाला..?? आणि ही उलटी कधी केली मी??? मला काहीच का आठवत नाहीये??”, शाल्मलीने विचारले
“शमु.. डोन्ट वरी काही नाही झालंय.. जा तु फ्रेश होऊन ये, बरं वाटेल”, शाल्मलीच्या डोक्यावरुन हात फिरवत आकाश म्हणाला.
एव्हाना रामुकाका आणि जयंता सुध्दा उठले होते आणि ते शाल्मलीच्या शेजारी उभे होते.
“हे बघ बेटा..”, रामुकाका म्हणाले, “काही गोष्टी अश्या असतात ज्या माहीत नसलेल्याच बर्या असतात. अज्ञानात सुख असते म्हणतात ना!, तसंच काहीसं.. तुला काहीही होणार नाही, आम्ही आहोत ना इथं…”
“पण रामुकाका….”
“काही गोष्टी घडतात आपल्याला जा आपल्याला क्लेश देऊन जातात, संकटात टाकतात, पण तेंव्हाच तर आपली कसोटी पणाला लागते ना! तेंव्हाच आपण मनापासुन त्या परमेश्वराची आराधना करतो. आणि जेंव्हा आपण त्या संकटातुन बाहेर पडतो तेंव्हाच तर आपला देव ह्या संज्ञेवर विश्वास बसतो हो कि नाही?”, रामुकाका म्हणाले.
शाल्मलीने होकारार्थी मान हलवली.
“ह्या जगात चांगलं आहे तर वाईट असणारच, रात्र आहे तर दिवस असणारच, तसेच जर दानव आहे, जर त्याचा आपल्याशी सामना झालेला आहे तर मग देव सुध्दा आहे ह्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?”, रामुकाका
रामुकाकांच्या बोलण्याने सर्वांना पुन्हा एकदा हुरुप आला. शाल्मली उठुन बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली.
“रामुकाका, बोलण्यापुरते ठिक आहे, पण आता काय करायचं? प्रश्न दिवसेंदिवस बिकटच होत चालला आहे”, आकाश म्हणाला
रामुकाका हनुवटीवरुन हात फिरवत विचार करण्यात मग्न होते.
“मला वाटते आपण ह्या बंगल्यात काही शोध-शोध केली तर?”, बराच वेळ विचार केल्यावर रामुकाका म्हणाले.. “”म्हणजे मला तशी खात्री नाही, परंतु एखादा सुगावा, कसल्याही प्रकारची माहिती आपल्या उपयोगी पडेल. नेत्राचे दर्शन होणारे काही आपण पहिले नक्कीच नसणार. त्या काळी जी लोक इथ रहात होती त्यांनाही काही प्रसंगातून जावेल लागले असणारच. मग त्या वेळी, त्यांनी काय केले होते? अशी कुठली गोष्ट आहे, किंवा असे काय आहे कि ज्यामुळे नेत्रा अजूनही ह्या बंगल्यातच अडकून पडली आहे, असे काय आहे कि ज्यामुळे तिला इथून बाहेर पडता आलेले नाही?”
“हम्म विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी”, जयंता म्हणाला.
“चला तर मग शुभस्य शीघ्रम,,”, रामुकाका उठून उभे रहात म्हणाले.
शाल्मली त्याचवेळी बाथरूम मधून फ्रेश होऊन बाहेर येत होती. आकाशाने प्रश्नार्थक नजरेने रामुकाकांकडे बघितले.
रामुकाका म्हणाले, “तिला आराम करू देत, फार गरज आहे तिला त्याची. आज रात्री पुन्हा काय होईल आपल्याला माहित नाही..” असं म्हणून रामुकाका खोलीच्या बाहेर पडले. पाठोपाठ आकाशही बाहेर गेला
शाल्मली पहिल्यापेक्षा जरा बरी दिसत होती. आकाशाने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर एक चुंबन दिले व म्हणाला, “शमू, तू काळजी करू नकोस, जोवर मी आहे तोवर तुला काही होणार नाही. तू आराम कर, आम्ही आहोतच बाहेर. काही लागले तर हाक मार.” अस म्हणून आकाश सुध्दा खोलीच्या बाहेर पडला.

बाहेरच्या व्हारांड्यामध्ये रामुकाका, जयंता आणि आकाश खोल्यांचे वाटप करून घेत होते.
“जयंता, तु वरची खोली बघ, मी दिवाणखाना बघतो आणि आकाश तु ही बेडरुमच शोध. जेणेकरुन आपलं काम पण चालु राहील आणि तु शाल्मलीच्या जवळही रहाशील.”, रामुकाकांनी आपला प्लॅन सांगीतला ज्याला सगळ्यांनी अर्थातच संमती दर्शवली.
“प्रत्येक कपाट, खण, कोपरा काही म्हणजे काही सोडु नका. एखादी बारीकशी गोष्ट सुध्दा आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल…”
आपआपल्या मार्गाने जाताना जो तो एकमेकांना हेच सांगत होता.
अर्थात तळघर ह्या शोधमोहीमेतून वगळण्यात आले होते हे वेगळे सांगायची गरज नाही.
“जयंता, तु वरची खोली बघ, मी दिवाणखाना बघतो आणि आकाश तु ही बेडरुमच शोध. जेणेकरुन आपलं काम पण चालु राहील आणि तु शाल्मलीच्या जवळही रहाशील.”, रामुकाकांनी आपला प्लॅन सांगीतला ज्याला सगळ्यांनी अर्थातच संमती दर्शवली.
“प्रत्येक कपाट, खण, कोपरा काही म्हणजे काही सोडु नका. एखादी बारीकशी गोष्ट सुध्दा आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल…”
आपआपल्या मार्गाने जाताना जो तो एकमेकांना हेच सांगत होता.
अर्थात तळघर ह्या शोधमोहीमेतून वगळण्यात आले होते हे वेगळे सांगायची गरज नाही.
आकाश पुन्हा आपल्या खोलीत परतला. शाल्मलीचा नुकताच डोळा लागला होता, तर मोहीत ’मिकी माऊसचे’ जिग्सॉ-पझल जोडण्यात मग्न होता.
आकाशने खोलीत एकवार सर्वत्र नजर टाकली. आदल्या रात्री घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. शाल्मलीचा तो भेसुर चेहेरा आठवुन आकाशच्या अंगावर एक सरसरुन काटा आला. आकाशने घट्ट डोळे मिटुन घेतले आणि आपल्या कुलदैवतेचा फोटो डोळ्यासमोर आणला, मनोभावे हात जोडले आणि काही क्षण तो शांत चित्ताने तेथेच उभा राहीला.
सर्व वाईट विचार, वाईट आठवणी, भिती एक एक करत कमी होत गेले. आकाशला प्रसन्न वाटु लागले तसे त्याने डोळे उघडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तो आपल्या शोधकार्याला लागला.
जयंता वरच्या बेडरुममध्ये गेला. खोलीच्या खिडक्या बंद होत्या आणि पडदे लावून घेतल्याने खोलीत अंधार पसरला होता. जयंताने सावधानतेने खोलीत प्रवेश केला. त्याची नजर खोलीच्या अंतरंगात लागलेली होती. चाचपडत त्याने बटनांच्या दिशेने हात न्हेला आणि अचानक त्याला असे जाणवले कि त्याचा हात कोणीतरी घट्ट पकडला आहे. जयंताने झटका देऊन हात काढून घेतला.
तो भास होता का खरंच कोणी त्याचा हात धरला होता ह्यावर त्याचे एकमत होईना. जयंता थोड्यावेळ तेथेच अंदाज घेत उभा राहिला. परंतु खोलीतून कसल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. धडधडत्या अंतकरणाने जयंता खोलीच्या आत गेला आणि त्याने दिव्याचे बटन दाबले. क्षणार्धात खोलीचे अंतरंग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाले.
जयंताने खोलीतून सर्वत्र नजर फिरवली. त्याच्या नजरेस दिसेल असे तेरी कोणीही त्या खोलीत नव्हते. जयंताने भिंतींच्या टोकाला असलेल्या कोपर्यांकडे बघितले. भिंतीच्या कोपर्यात मोडी लिपीमध्ये लिहीलेली ती अक्षरं खोलीत येणार्याचे लक्ष वेधुन घेत होती. जयंताने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि फारसा वेळ न दवडता तो सुध्दा आपल्या शोधकामात बुडुन गेला.
खोलीचे कोनाडे, कपाट, बेडखाली, पडद्यांच्या मागे, टेबलाचे खण, जयंताने सर्व काही पालथे घातले परंतु महत्वाचे असे काही हाती लागले नाही.
निराश होऊन जयंता मागे वळला आणि त्याच्या छातीत एकदम धस्स झाले, केवळ काही फुटांवर नेत्रा उभी होती. तिची जळजळीत, क्रोधीत नजर जयंताच्या नजरेचा वेध घेत होती.
जयंताला दरदरून घाम फुटला. नेत्रा त्याच्या आणि दरवाजाच्या मध्ये उभी असल्याने बाहेर पडायला कुठूनच मार्ग नव्हता.
नेत्राचे ओठ एकाबाजूने वर सरकले आणि एक कुचकट हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले. मग सावकाश पावला टाकत ती जयंताच्या दिशेने येऊ लागली. ओरडण्यासाठी जयंताने तोंड उघडले, परंतु त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. त्याची भीतीनी वाचा बसली होती.
प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे जयंता जस-जशी नेत्रा जवळ येऊ लागली तस-तसा मागे सरकू लागला.
शेवटी मागे सरकत सरकत तो भिंतीला येऊन टेकला. नेत्रा त्याच्या अगदी जवळ आली होती. तिने आपला उजवा हात पुढे केला आणि एखाद्या मरतुकड्या पक्ष्याची पकडावी तशी त्याची गळा-मान हातात धरली. तिच्या हाताच्या त्या थंडगार, निर्जीव स्पर्शाने जयंतच्या अंगावर एक काटा येऊन गेला. नेत्राने आपल्या हाताची पकड हळू हळू वाढवत न्हेली. जयंताला गळा आवळला जात असल्याची जाणीव होत होती, पण तो काहीच करू शकत नव्हता. हळू हळू त्याला श्वास घेणे अवघड होऊ लागले.
“पुनिंदा असा खोडसाळ पणा करू नगस..”, अत्यंत हळू परंतु तितकाच भेदक असा नेत्राचा आवाज जयंतच्या कानावर पडला…”नै तर तुम्हास्नी मराया मी पुर्निमेची पन वाट पहाणार नै.. जा सांग तुझ्या त्या म्हातार्याला..” असा म्हणून तिने आपला हाताची पकड ढिल्ली केली.
बोलताना नेत्राच्या ओठांमधून सापासारखी एक काळी जीभ आतबाहेर करत होती, जणू सैतानाचे दुसरे रूपच …
नेत्राने हात काढून घेताच जयंता खाली कोसळला तेंव्हा त्याला जाणीव झाली कि तो जमिनीपासून काही फूट वर उचलला गेला होता.
खाली पडल्यावर तो डोळे घट्ट बंद करून काही वेळ बसून राहिला. जेंव्हा त्याने डोळे उघडले तेंव्हा नेत्रा तेथून निघून गेली होती.
जयंता सावकाश उठला आणि खोलीतला दिवा मालवून खाली, व्हरांड्यात येऊन बसला. थोड्या वेळानंतर रामुकाका आणि आकाश पण तेथे येऊन बसले…
“जयंता.. अरे गळ्याला काय झाल तुझ्या?”, जयंताच्या गळ्याकडे बोट दाखवत आकाश म्हणाला, तसे रामुकाका सुध्दा आश्चर्याने काय झाल ते पाहू लागले.
जयंताने वर, खोलीत घडलेली घटना त्याना ऐकवली.
“पण, काही सापडले का तुला तिथे?”, आकाशाने विचारले..
जयंताने काही न बोलता नकारार्थी मान हलवली.
“.. आणि रामुकाका तुम्हाला?”, आकाशाने रामुकाकाना विचारले.
रामुकाकानी सुध्दा काही न बोलता नकारार्थी मान हलवली.
“मलाही काहीच नाही सापडले…” असे म्हणून आकाश व्हरांड्यातच फतकल मारून खाली बसला.
सर्व जण सुन्न होऊन बसून राहिले होते. तीन दिवसांमधला एक दिवस त्यांचा वाया गेला होता. कुणाच्याही हाती काही लागले नव्हतेच, उलट नेत्राने दिलेल्या धमकीमुळे त्यांच्या जीवाला असलेला धोका कित्त्येक पटीने वाढला होता.
बराच वेळ शांततेत गेला. सर्वांची तंद्री भंगली ते खोलीच्या दाराच्या आवाजाने....

No comments:
Post a Comment