पिशाच्च - भाग 03
पिशाच्च- भाग 3
(मागील भागाची लिंक-https://marathighoststories.blogspot.com/2019/06/02-02-httpsmarathighoststories.html
त्याने माझ्यावर झेप घेतली....माझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी....
............... आणि त्याचवेळी मी झोपेतून किंचाळत उठलो. भीतीने माझा थरकाप उडाला होता. चांदलेकरही गडबडून गेले. त्यांनी पटकन लाईट लावली. मी अजून थरथरत होतो. ... हे स्वप्न होतं ? माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणारा त्यांचा चेहरा पाहून मला त्यांना काय सांगावे तेच सुचेना! मी एक आवंढा गिळला,घशाला कोरड पडली होती. तोपर्यंत चांदलेकरांनी पाण्याचा ग्लास समोर धरला. पाणी पिल्यावर जर बरं वाटलं.

"स्वप्न....भयानक स्वप्न.....!"
माझी एवढीच प्रतिक्रिया.
चांदलेकर काहीच बोलले काहीच नाहीत फक्त माझ्या पाठीवर प्रेमाने थोपटत राहिले.
काही क्षणांनी मी नॉर्मल झालो. घड्याळात अडीच वाजल्याचे दिसत होते , म्हणजे अजून बरीच रात्र बाकी होती.आम्ही पुन्हा अंग टाकले. आता झोप लागणं कठीण होतं.एक अनामिक भीती मनाला छळू लागली. डोळे मिटले की चित्र विचित्र आकार दिसू लागायचे !

सकाळी उशिरा जाग आली.अंग जरा ठणकत होते.वातावरणात एक प्रकारची उदासी जाणवत होती. चांदलेकर अगोदरच उठलेले होते. मी जागा झाल्याचे दिसताच चांदलेकर प्रसन्न मुद्रेने म्हणाले,
"गुड मॉर्निंग"
चांदलेकरांचा उत्साही चेहरा बघून मला बरे वाटले.
"गुड मॉर्निंग" मी.
"घे आवरून लवकर ,चहा घेऊ एकत्र"
मी पुढच्या अर्ध्या तासात रेडी झालो. चहाचे दोन कप तयार होते.व्हरांड्यात मस्त खुर्ची टाकून बसलो.उठल्यावर जाणवणारी उदासी आता बिलकुल जाणवत नव्हती.मस्त थंड हवा सुटली होती. सगळा मानसिक खेळ! आजचा माझा पहिला दिवस होता पोस्टात,त्याविषयी मी विचार करत होतो.
"मग रात्री झोप नाही लागली वाटतं!"
जवळ खुर्ची टाकत चांदलेकर म्हणाले.
मी बळेच हसलो.खर म्हणजे रात्रीच्या प्रकारानंतर जागरणाने माझे डोकं दुखत होते. अंगही जरा दुखत होते.पण आज पहिला दिवस असल्याने मला तसे जाणवू द्यायचे नव्हते.मला रात्री परसातील ती जाणीव आठवली.
मी बळेच हसलो.खर म्हणजे रात्रीच्या प्रकारानंतर जागरणाने माझे डोकं दुखत होते. अंगही जरा दुखत होते.पण आज पहिला दिवस असल्याने मला तसे जाणवू द्यायचे नव्हते.मला रात्री परसातील ती जाणीव आठवली.
"चांदलेकर काल परसात काय झाले की तुम्ही मला हाताला धरून आत ओढत न्यावे?"
शेवटी मी विषयाला हात घातला.
त्यांना माझ्या या प्रश्नाची अपेक्षा नव्हती.ते स्तब्ध झाले.थोडा विचार करून गंभीरपणे म्हणाले,
त्यांना माझ्या या प्रश्नाची अपेक्षा नव्हती.ते स्तब्ध झाले.थोडा विचार करून गंभीरपणे म्हणाले,
"काही गोष्टी ह्या माहीत न करून घेण्यातच आपला फायदा असतो जयदीप, म्हणतात ना 'अज्ञानात सुख असते ' ते अगदी बरोबर आहे.योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन तुला !"
त्यांच्या आवाजात नाराजी होती.मला काही कळेना! मी कदाचित त्यांना दुखावलं असेल. आमचे संभाषण थांबले.ते शांतपणे चहा पिऊ लागले.एक विचित्र शांतता पसरली.एक अवघडलेपण आले.आता काय बोलावे ? हा विचार करत असताना त्यांनीच हसत हसत विषय बदलला.
"तू खूप घाबरलेला होता रात्री, खूप भयानक स्वप्न पाहिलं वाटतं! "
रात्रीचा तो प्रसंग अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता.चांदलरकरांचे ते भयानक रूप...बापरे!
मी काही बोललो नाही, नुसता हसलो.
मी काही बोललो नाही, नुसता हसलो.
दहा वाजता आम्ही पोस्टात आलो. शाळेच्या मागे पोस्टाचे कार्यालय होते.कार्यालय काही खूप मोठे नव्हते. सगळं गाव चांदलेकरांना ओळखत होते.लोकांच्या बोलण्या वागण्यावरून त्यांना गावात चांगला मान असावा हे दिसत होते. कामे करण्यात वेळ चालला होता. दुपारनंतर मात्र माझी तब्येत बिघडली.अचानक थंडी वाजून आली, अंगही गरम झाले. चांदलेकरांच्याही ते लक्षात आले असावे कारण लंच ब्रेकनंतर ते माझ्या जवळ आले.
"मला तुझी तब्येत काही ठीक वाटत नाही जयदीप!मी बघतो उरलेली कामे ! तू घरी जाऊन आराम कर!"
माझ्याकडे घराची चावी देत ते म्हणाले.
मलाही खरच आरामाची गरज होती. मी फारसे आढेवेढे न घेता लगेच घरी जाण्यास तयार झालो.मला झोपेची नितांत आवश्यकता होती.
मलाही खरच आरामाची गरज होती. मी फारसे आढेवेढे न घेता लगेच घरी जाण्यास तयार झालो.मला झोपेची नितांत आवश्यकता होती.
घराजवळ आलो त्यावेळी तीन वाजून गेले होते.
घर जराशा उंचवट्यावर निर्जनच जागीच होते.त्या बाजूला अजिबातच वस्ती नव्हती. परसाच्या मागे उतार थेट नदीपर्यंत जात होता. रात्री दिसले नाही पण आता नदीचे पात्र चांगलेच रुंद वाटत होते.पलीकडे जंगल दिसत होते.घराबाहेर थोडा वेळ थांबून मी घराचे निरीक्षण केले.
एकदम शुकशुकाट होता तिथे. मी कडी उघडून आत शिरलो त्याचवेळी मागे परसात मला पावले वाजलेली भासली. मी दुर्लक्ष केले,दार लावले नि अंथरुणावर पडलो.
दहा पंधरा मिनिटे झाली असतील तोच कुजबुजत्या आवाजात कोणीतरी मला हाक मारतय असे भासू लागले.

"जयदीप...जयदीप..."
माझ्या नावाने हाका ऐकून मला आश्चर्य वाटले.
आवाज नक्की परासातून येत होता. हा भास मुळीच नव्हता! मी तडक उठलो नि खाडकन परसाचे दार उघडले.
रात्री भेसूर वाटणारी ती करवंदीच्या जाळी ,त्याच्या जरा अलीकडे विहीर आणि विहिरीच्या काठावर.... तो बसलेला होता...नक्की तोच होता....त्याच्या अवतारावरून मी लगेच ओळखले.
कालचा वेडा होता तो !
हाताच्या ईशाऱ्याने मला त्याच्याकडे बोलावत होता.

"रघु...?"
त्याच्या जवळ जात मी बोललो.
..................
..................
काहीच प्रतिक्रिया आली नाही.हाक तर त्यानेच मारली होती. आता तो माझ्याकडे नुसता एकटक पाहत होता.मी त्याच्या जवळ गेलो पण थोडे अंतर राखून ठेवले होते. हा तर त्याच्या गावी वेड्याच्या इस्पितळात होता मग इथे कसा?आणि याला माझे नाव कसे माहीत?
"तुला माझे नाव कसे माहीत?" मी शंका बोलून दाखविली.
"रात्री ऐकले मी ! "
मी विचारात पडलो,त्याचवेळेस तो पुढे म्हणला,
"तू हातपाय धुवायला विहिरीपाशी आला त्या वेळेस मी पलीकडे लपलो होतो."
"पण...."
माझे बोलणे अर्धवट राहिले.त्याच्या डोळ्यात ती वेडाची झाक पुन्हा दिसू लागली.तो एकदम बोलू लागला,
"पळून जा इथून , तो चांदलेकर आता पिशाच्च झाला आहे, अघोरी कला त्याला साध्य आहेत,काळ्या शक्तींचा उपासक आहे तो! मला ज्यावेळी त्याच्या या कामाचा सुगावा लागला त्यावेळी त्याने मला त्यात सामील करून घ्यायला पाहिले पण मी विरोध करताच त्याने त्याची अघोरी विद्या माझ्यावर वापरली. वशिकरणाने माझ्या मेंदूवर ताबा मिळवला नि माझ्या हातून ती अघोरी कृत्य करवली.त्यातून जाग्या झालेल्या काळ्या शक्तींनी आता त्याच्या शरीराचा पूर्ण ताबा घेतला आहे. मी कसाबसा त्याच्या तावडीतून सुटलो पण माझी ही अवस्था झाली. तुझी सुद्धा अशीच अवस्था होणार आहे. इथून पळ....लवकर पळ.... तुझ्याकडे वेळ कमी आहे."
घाईघाईत एवढे बोलून तो जाऊ लागला आणि अचानक ब्रेक लागावा तसा थांबला,मागे वळून मान तिरपी करून माझ्याकडे रोखून पाहिले.त्याची ती नजर पाहून मी शहारलो. काय सांगत होती त्याची ती नजर? मला सावध करत होता की घाबरवत होता? मला नीट सांगता आले नसते पण माझ्या पायाखालची वाळू सरकली होती.कोणावर विश्वास ठेवावा? ह्या वेड्यावर की चांदलेकरांवर?
भूत,प्रेत,पिशाच्च असल्या प्रकारावर माझा विश्वास नव्हता....आतापर्यंत तरी....इथून पुढे काही सांगता येत नाही.
तो निघून कधी गेला मला कळलेच नाही.
मी कितीतरी वेळ तसाच उभा होतो. अंगातून गरम वाफा निघू लागल्या नि मला एकदम हुडहुडी भरून आली.सुन्न मनाने घरात आलो.धाडदिशी अंग टाकून दिले.अंगात त्राणच शिल्लक नव्हते.
चांदलेकर आणि पिशाच्च.माझे डोके गरगरायला लागले. मी विचार करू लागलो. काल परसात मला काय झाले होते? मला आठवत का नव्हते? चांदलेकरही उत्तर टाळत होते. रात्री पडलेले ते भयानक स्वप्न! चांदलेकरांचा तो अभद्र चेहरा! आणि मला त्यांनी खोटं का सांगितले की रघुला त्याच्या गावाकडे सोडून आलो आहे. आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्यांनी कोणती तरी दुष्ट शक्तीची उपासना करून तिला जागृत केले होते.काय साध्य करायचे आहे त्यांना? मला रघुची दया येऊ लागली.बिचाऱ्यावर काय परिस्थिती ओढवली.चांदलेकरांची आता भीतीच वाटू लागली .त्यांच्यापासून मला धोका होता का? हा मुख्य प्रश्न होता. मला त्यांना जाब विचारायला हवा...की नको...!या गोंधळात मला डोळा लागला.
मी जागा झालो त्यावेळी चांदलेकर दार वाजवत होते. सहा वाजत आले होते.मी दार उघडले.हसत चांदलेकर आत आले.मला आता ते हसणे दुष्टपणाचे वाटत होते.

" आता कसे वाटतेय?"तत्यांनी चौकशी केली.
"ठिकाय..."
परसाचे उघडे दार पाहून थबकले, म्हणाले,
"मागचे दार उघडे ठेवत जाऊ नकोस ,जंगलातून प्राणी येतात इकडे कधीकधी !"
मी मनात विचार केला की तुमच्यासारखा क्रूर प्राणी असताना ते काय करणार बिचारे!
"चांदलेकर,रघु आला होता!"
त्यांना अनपेक्षित धक्का बसला. नजरेत अनोळखी भाव काही क्षण तरळले.
"हे कसं शक्यंय ?"
"का शक्य नाही? तुम्ही खोटं बोललात माझ्याशी! रघु वेडा नाही ,तुम्ही त्याला वेड बनविलं ! तुमची काळी कृत्य झाकण्यासाठी!"
मी एकदम सगळा राग काढला.चांदलेकर क्षणभर थांबले, नंतर एक दीर्घ उसासा टाकला,
"तुझं चिढणे बरोबर आहे जयदीप! पण मी तुझ्याशी खोटं बोललो नाही !हवं तर अर्धवट सत्य म्हण पण रघु तुला भेटणं शक्यच नाही!"
"का शक्य नाही, चांदलेकर...का?"
"कारण मी रघुला त्याच्या गावी सोडून आलो त्यानंतर चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तो आता जिवंत नाही."
सगळं जग मझ्याभोवती फिरायला लागले.
मग मला भेटला तो कोण होता????
क्रमशः
(ही कल्पनिक कथा आहे, केवळ मनोरंजन हाच हेतू आहे. ह्या भागला खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व...पुढील भाग लवकरच टाकतो...आणि हो comments लिहायला विसरू नका....धन्यवाद! )
श्री.आनंद निकम,
पुणे २४
पुणे २४
No comments:
Post a Comment