पिशाच्च - भाग 02
पिशाच्च - भाग 02
(मागील भाग वाचण्यासाठी लिंक)
https://marathighoststories.blogspot.com/2019/06/01_27.html

मी लक्षपूर्वक चांदलेकरांचे बोलणे ऐकू लागलो...
"रघु तीन महिन्यांपूर्वी खारवडी पोस्टात जॉईन झाला होता जयदीप...तुझ्याआधी!"
चांदलेकरांनी उसासा टाकत सुरुवात केली.
मी शहारलो.
चांदलेकरांनी उसासा टाकत सुरुवात केली.
मी शहारलो.
"मीच त्याला इथे जॉईन करून घेतले. अतिशय उत्साही,बडबड्या होता. त्याला पाहून मलाही खूप आनंद झाला. नोकरीत नवीनच असल्याने नाईलाजाने त्याने ही आडवळणी असणारी पोस्टिंग स्वीकारली असावी!तो काही जास्त दिवस टिकणार नाही,अशी माझी धारणा होती. पण लहान गाव पाहून तो खुश झाला कारण इथे कामाचा जास्त लोड नसणार नि भरपूर रिकामा वेळ मिळणार होता.रघु कामाला चांगला होता पण त्याला एक वाईट खोड होती. ती म्हणजे त्याला अघोरी गोष्टींची आवड होती. त्यासंबंधीची अनेक पुस्तके त्याने गोळा केली होती.इथे रिकामा वेळ भरपूर असल्याने त्याच्या या आवडीला खतपाणी मिळाले. रात्र रात्र ती पुस्तके वाचण्यात तो मग्न असायचा. मलाही काही काही सांगायचा.त्याचे हे वेड फक्त पुस्तके वाचण्यावर थांबले असते तर बरं झालं असतं ! पण दिवसेंदिवस हे वेड वाढत गेले! आता तो या अघोरी सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे लागला.
सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केले. तरुण सळसळते रक्त आहे, सुधरेल असे वाटले पण हळूहळू त्याचे कामावरील लक्ष कमी झाले.पहिल्या सारखे नीट काम करेना. सतत बेचैन राहू लागला, बोलणंही कमी झाले होते.पुढे पुढे तर रात्री अपरात्री उठून कुठे तरी जायच! मी त्याला खूपदा हटकले पण काही उपयोग झाला नाही. तेवढया पुरती मान डोलवायचा पण वागण्यात काही फरक पडला नाही.
एकदा मला म्हणला की 'आता मागे फिरणे शक्य नाही,तो जागा होतोय!'
हळूहळू पोस्टात यायचेही त्याने सोडून दिले.तब्येत खराब असल्याचे कारण द्यायचा.घरीच बसून रहायचा.कधी कधी मागच्या परसातल्या विहिरीच्या काठी एकटक नजर लावून बसायचा कितीतरी . वेगळ्याच विश्वात असायचा ! कितीही विचारले तरी काही सांगायचा नाही. महिनाभरात तर त्याने खाणेपिणे, अंघोळ या गोष्टीच सोडून दिल्या. दिवसरात्र परसात जाऊन बसायला लागला,काहीतरी पुटपुटायचा. पोस्टातील काम मी संभाळायचो पण मला आता त्याची काळजी वाटू लागली होती. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता.काहीतरी अनिष्ट घडतेय याची मला जाणीव होत होती. माझा भूत,प्रेत,बाधा असल्या भाकड गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता! मागच्या अमावस्येपर्यंत तरी नव्हता जयदीप! "

चांदलेकरांनी रोखून माझ्याकडे पाहिले नि एक मोठा पॉज घेतला. रात्रीची ती सुनसान वेळ! मिट्ट काळोख,झोपी गेलेले गाव नि गावाबाहेरील हे एकांतातील घर आणि व्हरांड्यातील हा मिणमिणता बल्ब! घामाचा एक थेंब माझ्या पाठीवरून खाली सरकल्याची जाणीव मला झाली.
" तो कुणाची तरी वाट पाहत होता. त्याने कुणाला तरी जागे केले होते.काहीतरी भयानक! त्या दिवशी अमावस्या होती.रघु सकाळपासून जास्तच अस्वस्थ झाला होता.मला काहीतरी सांगायचे असावे पण तो घाबरत होता.त्याच्या मनाची तयारी होत नसावी कदाचित.त्या रात्री मला अचानक जाग आली,शेजारी रघु नव्हता. उठून मागे परसात गेलो तर रघु विहिरीच्या काठावर त्याच्याच तंद्रीत गोल गोल फिरतोय! नजर मात्र त्या करवंदीच्या जाळीकडे होती. भान हरपून तो तिकडे पाहत होता. तो तिकडे काय पाहतो म्हणून मी जरा जवळ गेलो ! माझ्या छातीत धस्स झाले! तिथे एक छोटा चक्रवात तयार होत होता.आणि त्याला हळूहळू मानवी रूप येत होते. ते पाहून मी जोरात किंचाळलो. त्यासरशी 'ते' एकदम माझ्यातून आरपार निघून गेले. एक हवेचा झोत अंगावरून गेल्यासारखा वाटला पण तो स्पर्श अनैसर्गिक होता. मी रघुला खाली घेतले. रघु काही भानावर नव्हता. दुसऱ्या दिवशी ताबडतोब मी त्याला त्याच्या गावी सोडून आलो.त्यांनी त्याला वेड्याच्या इस्पितळात भरती केले. डिपार्टमेंटला त्याचा अहवाल कळवून त्याची रजा मंजूर करून घेतली. "
चांदलेकरांनी खोल श्वास घेतला.
मी आता खरच हादरलो होतो! प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटले होते. दुपारचा तो प्रसंग, मगाशी झालेली ती जाणीव! खरच काहीच सुचेना! काही क्षण तसाच बसून राहिलो. त्याचवेळी चांदलेकरांनी पुढचा बॉम्ब टाकला.

"जयदीप,मगाशी परसात विहिरीजवळ तू रघुसारखीच नजर लावून पाहत होता ... आणि...आणि... आज अमावस्या आहे!"
सगळे जग मझ्याभोवती फिरते आहे असे मला वाटायला लागले. रघुच्या जागी माझी नेमणूक,मला झालेली ती जाणीव, रघुसारखे ट्रान्स मध्ये माझे जाणे!सगळंच विचित्र नि भीतीदायक होतं.आणि दुपारचा तो वेडा!
"पण ...पण ...दुपारी रस्त्यात एक वेडा मला दिसला चांदलेकर! तो रघु तर नसावा ना ?"
"हे कसं शक्यंय, रघु तर इस्पितळात आहे ! इथे कसा येईल?"
चांदलेकर चमकून म्हणले.
त्यांचेही बरोबर होते म्हणा,तो वेडा दुसराच कोणीतरी असेल! मी अजूनही माझ्याच विचारचक्रात होतो.

"चल आत ,खूप रात्र झालीय! तूही दमला असशील!"
चांदलेकर जागेवरून उठले. मीही उठून त्यांच्यामागे गेलो.अंथरुणावर पडलो तरी डोक्यातील विचारचक्र थांबेना. नंतर केंव्हातरी झोप लागून गेली.
मध्यरात्री कशाच्या तरी आवाजाने मला जाग आली. अंधार इतका मजला होता की डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही.काही क्षण मला सुचेना की मी कोठे आहे? पण लगेच भान आले. लाईट गेली असावी बहुधा, मी मनाशी विचार केला.
जाग कशाने आली?
मी चाहूल घेऊ लागलो.शेजारी हाताने चाचपडून पाहिले. चांदलेकर जाग्यावर नव्हते. घरच्या मागच्या भागातून आवाज येत होता.
कशाचा आवाज?
मी अंदाज बांधू लागलो. काहीतरी लोखंडी वस्तू कशावर तरी घासत होती. मी उठून बसलो. आवाज येणं अजून चालूच होतं.

"चांदलेकर..."
मी हळूच आवाज दिला.
प्रतिसाद शून्य. पण 'तो' आवाज थांबला.
चांदलेकर कदाचित लघवीला वगैरे गेले असतील, येतील लगेच म्हणून 5 मिनिटं तसेच वाट बघत बसलो. तेवढ्यात परसात गुरकण्याचा आवाज आला. मी हिम्मत एकवटून उठलो.स्वयंपाक खोलीत आलो .लाईटचे बटन शोधून दाबले पण काहीच उपयोग झाला नाही. वीज गेली असावी.परसात उघडणारे दार तिथेच होते. दाराला कडी होती. शांतता इतकी होती की माझ्याच श्वासांचा आवाज मला येत होता. थोड्या वेळ तसाच दाराजवळ उभा राहून कानोसा घेतला.
कडी काढावी की नाही! बाहेर कसलीच चाहूल लागत नव्हती. कसली तरी अभद्र जाणीव मनाला सतावत होती. काय करावे?मला हा ताण असह्य होत होता.शेवटी मी कडी काढायचा निर्णय घेतला.
कडीला हात घातला आणि हळूच कडी काढली.माझा श्वासोश्वास जोराने चालू होता.
केवढ्याने दचकलो मी!
कडीचाच आवाज तो!
हळूच दार ढकलले आणि एकदम थंडगार वाऱ्याचा झोत माझ्या अंगावर आदळला! सर्रकन काटाच आला ! आता मी परसात उभा होतो. शांतता अंगावर येत होती.विहिरीजवळ जाण्या चे धाडस होत नव्हते. थोडा वेळ तसाच थांबलो.चांदलेकर यावेळी कुठे गेले असावेत? किती वाजलेत कुणास ठाऊक! काही वेळ तसाच उभा होतो.
स्वयंपाकघरात काहीतरी वाजले. मी पटकन आत घुसलो. काय भयंकर कुबट वास सुटला होता! मघाशी बिलकुल वास येत नव्हता.अंधार असल्याने काहीच दिसत नव्हते. मात्र स्वयंपाकघरच्या त्या कोपऱ्यात हालचाल जाणवत होती. कोणीतरी दबा धरून बसले असावे. एखाद्या प्राण्याच्या गुरगुरण्याचा दबका आवाज येत होता. माझ्यावर झेप घेण्याच्या तयारीत 'ते' असावं. माझे हातपाय गळाले आणि तेवढ्यात लख्खन लाईट आली.(मी मघाशी बटन दबलेले होते)
मी समोरचे दृश्य पहिले नि मुळापासून हादरून गेलो.समोर एक पाठमोरी व्यक्ती(?) होती. एखादया प्राण्याप्रमाणे ती समोरच्या मांसावर आधाशासारखी तुटून पडली होती. अचानक लाईट लागल्याने रागाने ती माझ्याकडे वळली.
बापरे...! ते दृश्य मी जन्मात विसरणार नाही! लालभडक आग ओकणारे डोळे, तोंडातून बाहेर आलेले सुळे आणि त्यावरून ओघळणारे रक्त.
आणि आणि महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला मी ओळखत होतो!
"चांदलेकर तुम्ही......" मी जोरात किनचळलो पण
माझे शब्द अर्धवट राहिले. त्याने माझ्यावर झेप घेतली....माझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी....

क्रमशः
(ही कल्पनिक कथा आहे, केवळ मनोरंजन हाच हेतू आहे.पुढील भाग लवकरच...)

श्री.आनंद निकम,
पुणे २४
पुणे २४
No comments:
Post a Comment