दिपिका आस्वार
दत्तक (काल्पनिक कथा)
भाग २
साठ ते बासष्ट वयातला तो व्यक्ती.... शरीराने धडधाकट,, उंचापुरा,, पांढराशुभ्र सदरा आणि पायजमा घातलेला... चेहऱ्यावर वेगळीच चमक असलेला,,, हातात झोळी घेऊन त्यांच्या समोर उभा होता... त्यांच्यासाठी साक्षात देवच अवतरला होता,,, ते म्हणजे तात्या (वेदांतचे वडील) ... या ना तात्या,,, आत या... आम्ही तुमचीच वाट बघत होतो... त्यांना आत आणण्यासाठी दोघेही पुढे आले... तेच तात्यांनी त्यांना हातानेच थांबा म्हणून इशारा केला... तसे ते दोघे पण आहे त्याच ठिकाणी थांबले.. तात्यांनी उंबरऱ्यावर पाय ठेवला तसा झटकन मागे घेतला आणि काही तरी पुटपुटत पाय आत ठेवताच रुद्र मोठ्याने किंचाळत आत पळून गेला... वेदांत आणि वेदिका त्याला आणायला त्याच्या मागे पळाले... पण तो पर्यंत त्याने दार बंद करून घेतलं... तात्यांनी दोघांनाही आवाज देऊन बोलवून घेतले... ते दोघही रडका चेहरा घेऊन त्यांच्याकडे आले... सुनबाई जेवायला भेटेल का मला?? भूक लागली आहे... तात्यांच्या अशा बोलण्याने ते एकमेकांकडे बघत राहिले... हो... तुम्ही हात पाय धुवून या,,, तोपर्यंत मी जेवण आणते असे म्हणत ती किचनमध्ये गेली... तेच तिच्या पाठोपाठ वेदांतही गेला... दोघांच्याही मनात एकच प्रश्न घुटमळत होता,,, पण बोलून दाखवत नव्हते... तिने सकाळी केलेलं जेवण गरम करून तात्यांना दिलं... तात्या पाटावर न बसता खालीच बसले.. अस कधीच झालं नव्हतं.. वेदिकाने नजरेनेच वेदांतला खुणावले,,, पण वेदांतने खांदे उडवत माहीत नाही असं उत्तर दिलं... तुम्ही पण जेवून घ्या मामांसोबत,,, तिने वेदांतला ताट वाढायला घेतले... सुनबाई त्याला नको देऊ काही आणि तू पण नको जेवू... अस म्हणत तात्यांनी पहिला घास खाल्ला... आता मात्र दोघेही कोड्यात पडले... नेमकं चाललंय काय??? त्यांना काहीच कळत नव्हतं... मामा ही आता केलेली ताजी भाकर आहे,, ही घ्या... नाही,, नको मला... ती ठेव तिकडच... त्यांनी सकाळचीच भाकरी खाल्ली... आणि शेवटी एक घास असाच ठेवला.. जेवण झाल्यानंतर त्यांनी ठेवलेला घास उचलून बाहेर जाऊन तो घरावरून उतरवत लांब फेकला आणि दोन्ही हात जोडून नमस्कार केला.... तात्या अस का वागत आहेत समजत नाही... रुद्रला बघायचं सोडून हे काय करत बसलेत.... वेदांतच हे बोलणं ऐकून तात्यांनी किंचित हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.... पोरा मी तुझा बाप आहे... जे करतोय ते तुझ्याच साठी आहे.... अस म्हणत ते घरात गेले.... आता मात्र वेदांतला राहवलं नाही,, त्याने तात्यांना थांबवून विचारलेच... नक्की काय चाललंय...??? सांगा तरी... तात्या मांडी घालून खाली बसले... आणि त्यांनाही नजरेनेच खुणावून खाली बसायला सांगितलं... तात्यांनी त्यांच्या झोळीतून एक खूप जुना असलेला कोणाचा तरी फोटो,, नारळ,, तीन लिंब,, चंदन,, गुलाल आणि लागतील इतक्या टाचण्या बाहेर काढल्या.... वेदांतला देव्हाऱ्यातून हळद कुंकू आणायला सांगितले... हे सगळं सामान त्यांनी हळद कुंकूने बनवलेल्या रिंगणात ठेवून दिले... मामा तो फोटो कोणाचा आहे..??? वेदिकाने फोटोकडे बघत विचारले... कळेल थोडया वेळाने... त्यांनी दोघांनाही दार खिडक्या लावून घेण्यास सांगितले आणि मला ह्या घरात पूर्ण अंधार पाहिजे... तात्यांनी असे म्हणताच वेदांतने घरातल्या सगळ्या लाईट बंद केल्या...
संध्याकाळची वेळ असल्याने घरात अंधाराचे साम्राज्य पसरले... तात्यांनी सांगितल्या प्रमाणे दोघेही शांत बसले होते... तात्या काही तरी करत होते... आजवर न ऐकलेले मंत्र दोघांच्या कानी पडत होते... तितक्यात रुद्रच्या खोलीतुन कोण तरी बाहेर आलं.. अंधार असल्याने फारस काही दिसत नव्हतं,,, पण एक काळी आकृती ठप ठप आवाज करत त्यांच्याच दिशेने येत होती.. आता मात्र वेदिकाने वेदांतचा हात घट्ट पकडला... खूप घाबरली ती.. त्या काळ्या सावलीला मंत्रांचा त्रास होत होता,,, म्हणून ती घरभर फिरत किंचाळत होती... हात-पाय आपटत होती,,, तर मधेच सगळ्यांच्या बाजूने गोल गोल फिरत होती... कधी गायब झाल्याचा भास होत होता... तर कधी भिंतीवर चढून सरपटत सरपटत खाली येत होती... तात्या मंत्र म्हणण्यात मग्न होते,,, पण हे दोघ घाबरून अंधारात काय घडतंय हे जाणून घेत होते.. मी त्याला घेऊनच जाणार... तो माझा आहे... फक्त माझा... अस म्हणत ती काळी सावली तात्यां जवळ येऊन उलटी उभी राहिली... अरे ये थेरड्या तू निघ इथून नाही तर,,, तुला पण मारून टाकीन... त्याच घोगऱ्या आवाजात ती भीती दाखवत होती... आता ती काळी सावली सरकत सरकत वेदिकाकडे आली... आधीच ती खूप घाबरली होती,, हूं... हू...हुउ... शश्शश... असे विचित्र आवाज करत,,, तोंडातुन चिकट पदार्थ सोडत वेदांतकडे गेली... तसा वेदांत खाडकन उभा राहिला.. आणि त्या सावलीचा गळा धरला... तात्यांनी विधी अर्धवट सोडून झोळीतून मेणबत्ती काढून पहिले ती पेटवली... तसा संपूर्ण खोलीत अंधुकसा प्रकाश पडला... त्या सावलीला बघताच वेदांतने पटकन हात मागे घेतला... तर वेदिका आ.... वासून त्या सावलीला बघत राहिली... ती सावली कोणा दुसऱ्याची नसून तो रुद्र होता... त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा चिघळल्या होत्या... त्यातून रक्त आणि पाणी निघत होत... मेलेलं जनावर सडावं तसं त्याच शरीर सडलेल होतं... घाण वास सुटलेला... तो वेदांतकडे बघून विक्षिप्तपणे हसून म्हणाला... तुच आहेस तो,,, माझा जीव... ये माझ्या जवळ.. आणि दोन्ही हात पसरवत त्याला मिठीत घेणार तेच,,, फटाका फोडावा तसा नारळ फोडून तात्यांनी ते पाणी दोघांवरही शिंपडलं... रुद्र जागच्या जागी खाली कोसळला आणि वेदांत भानावर आला... तात्यांनी लगेच त्या रिंगणात रुद्रला ठेवलं आणि अजून एक मोठं वर्तुळ आखलं... घरातल्या लाईट चालू केल्या... उजेडात रुद्रची ही अवस्था बघून वेदिकाने मोठ्याने हंबरडा फोडला... बाळा काय झालं तुला...?? उठ ना... ती त्याला हात लावणार तेच तात्यांनी तिला दूर होण्यास सांगितलं... पण आईच काळीज ते ऐकल तर ना.. तिने त्याला जवळ घेतलंच.. तसा त्याने वेदीकाचा गळा धरला... तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आले,, तात्यांनी त्या फोटोला लाथ मारली आणि रुद्र मागे फिरला.. थेरड्या हे सगळं तुझ्यापायी होतय... तू नास केला माझ्या घराचा... आता मी पण तुझं घर उध्वस्त करणार... अस म्हणत तो खाली कोसळला,,, तात्यांनी रुद्रला कुशीत घेतलं आणि रागाने उठून रुद्रच्या खोलीकडे बघत जोरात म्हणाले... तुझा शेवट होणार आज आणि तो मी करणार.... माझ्या लेकराला त्रास दिला तू.. आता मी तुला कायमची बांधून ठेवणार... तू सडत राहणार.... चांडाळने.... अस म्हणत एकधारी लिंबू हातात घेऊन त्यावर गुलाल टाकून दोन टाचण्या टोचल्या.... आणि रुद्रवर उतरवून त्याच्याच खोलीत फेकून दिले.... तसा रुद्र डोकं पाठीला टेकवत उठून बसला...
क्रमशः
No comments:
Post a Comment