दिपिका आस्वार....
दत्तक (काल्पनिक कथा)
भाग ३
तात्यांनी लगेच वेदांतला आणि वेदिकाला आपल्या मागे ओढले... हा... हा.... हा.... आधी स्वतःचा जीव वाचव थेरड्या मग त्यांना बघ... तात्यांनी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि चंदन काढून पेटवले,, घरभर सुंगधित वास पसरल्यामुळे कुबट वास नाहीसा झाला.. तिघांना पण प्रसन्न वाटत होते... पण त्या वासाने रुद्रचा जीव गुदमरत होता... तो स्वतःचाच गळा दाबून आई बाबांना आवाज देत होता... खोकून खोकून कधीही जीव जाईल अशी अवस्था झालेली.... आई मला श्वास घेता येत नाही... विझव ना ते... वेदिका पुन्हा चूक करणार तेच तात्यांनी तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं ... तशी ती मागे सरकली... मामा रुद्रला त्रास होतोय म्हणून मी,,, तिचं बोलणं पूर्ण न ऐकताच तात्या ओरडून म्हणाले... तो आपला रूद्र नाही,, ती चांडाळनी आहे... वेदांतने वेदीकाचा हात हातात घेऊन तिला नजरेनेच शांत केले... चंदनाच्या वासाने रुद्र खाली पडला आणि सरकत सरकतच त्याच्या खोलीत गेला,, हॉलमधून ते खोलीपर्यंत सगळीकडे रक्त पसरलं होतं... त्याला आणण्यासाठी वेदांतही गेला,,, पण तात्यांनी त्याला तसं करण्यास थांबवलं... जाऊ दे त्याला... मला तेच पाहिजे...
त्यांनी पूर्ण हॉलमध्ये गोमुत्र शिंपडल आणि पुन्हा एकदा विधी करण्याची तयारी केली.. पण ही विधी बारा वाजण्या आधीच उरकायची होती... त्यांच्याकडे खूप कमी वेळ होता... तात्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या दोघांनीही सगळी तयारी करून ठेवली,,, आता ते फक्त चंदन संपण्याची वाट बघत होते... तात्या वाट बघण्यापेक्षा विझवून टाका ना ते आणि विधीला सुरुवात करा... नाही,,, अस केलं तर तिला आत येण्याचा मार्ग मोकळा होईल जे मला होऊ द्यायचं नाही... म्हणजे,, ती कोण??? कोणाबद्दल बोलताय तुम्ही??? वेदिकाने खाली बसत विचारले... आणि तिचा रुद्रशी काय संबंध... वेदांतने ही अजून एक प्रश्न विचारला... तात्यांनी दोघांकडेही बघत सगळं सांगतो अस म्हणून तो फोटो हातात घेतला... एका लहान बाळाचा फोटो होता तो... पण खूप वर्ष जुना... धुरकट झालेला,, पांढरे ठिपके पडलेले त्यामुळे ते बाळ पण नीट दिसत नव्हतं... मामा बघू तो फोटो असे म्हणत वेदिकाने तो फोटो घेतला... दोघांनाही तो फोटो बघण्याची उत्सुकता लागलेली.. वेदांतने ही एक नजर टाकली... खरंच गोंडस होतं ते बाळ... न कळत तो फोटो तिच्या हातून खाली पडला... वेदांतने तो फोटो उचलला तसा रुद्र मोठं मोठ्याने ओरडायला लागला... दार खिडक्या लावलेली असून पण घरभर हवा सुटली.. वादळ यावं तसा आवाज येत होता,,, तात्यांनी लगेच तो फोटो त्याच्या हातून ओढून घेतला... तस सगळं काही शांत झालं... पुन्हा तीच शांतता... पोरा,,, तू नको लावू हात ह्या फोटोला.... त्या मागचं कारण पण तसच आहे... आता जे काही घडतंय ते फक्त तुझ्यासाठी होतय.. तसा दोघांनाही धक्का बसला... काय,,, माझ्यासाठी पण का?? आणि तो त्रास रुद्रला का होतोय... आता मात्र त्याला सगळं काही ऐकायचं होत... ऐक मग... मोठा श्वास घेऊन तात्या म्हणाले...
पहिले मी ज्या गावात राहत होतो तिथे एक जोडपं राहत होत,, शोभा आणि प्रल्हाद.... नऊ ते दहा वर्षे त्यांना मुलं बाळ झालं नाही... त्यामुळे गावातली लोकं पण त्यांना वाईट साईट बोलत होती... एक तर आधीच घरात अठरावे विश्व दारिद्र्य आणि त्यात लोकांची टोमणी... पार वैतागून गेले होते दोघ... पण एकदा प्रल्हाद खूप खुश दिसला... त्याने गावभर मिठाई वाटली.. तेव्हा आम्हांला कळलं की शोभाला दिवस गेले आहेत... खरंच देव पण खूप परीक्षा घेतो,, त्यांचं पण तेच झालं... महिने सरत गेले आणि बाळ जन्माला आलं... त्यांची परिस्तिथी पण बदलली.. पोराचा पायगुण चांगला हाय,,, अस अख्ख गाव म्हणत होतं... पण प्रल्हाद एकदा रात्रीच्या सुमारास हातात कंदील घेऊन माळरानाकड जाताना दिसला,, आम्ही विचारलं पण.... कुठं जात आहेस ह्या वक्ताला?? तर त्यानं तोंडातून एक शब्द पण काढला नाही... म्होरं निघुन गेला... आम्ही समदी आपापल्या घरला गेलो... दुसऱ्या दिवशी बघतोय तर तेच... पण आम्ही लक्ष न्हाय दिलं... गावातला एक जाणकार माणूस होता जयप्पा... तो म्हणाला ह्यो नेमका जातो तरी कुठं... वाईच बगून येऊ की.... म्हणून आम्ही सगळी जण त्याला समजणार नाय अस त्याच्या माग गेलो... आणि जे बघितलं त्याने काळीजचं हाललं...
प्रल्हादाने पिशवीतून थोडा भात,, मटणाचा रस्सा,, हळद कुंकू,, अगरबत्ती आणि रक्त असल्यासारख लाल रंगाचं काही तरी बाहेर काढलं... आणि ते सगळं त्या लाल पाण्यात बुडवलं.. नीट निरखून बघितलं तेव्हा समजलं,,, रक्तच होतं ते... त्या नंतर डाव्या हाताच्या बोटाचा अंगठा ठेचून तो त्या वर धरला.. रक्ताची धार लागली होती,,, तरी पण त्याने तशीच अगरबत्ती पेटवली आणि बाजूला लावली... सगळ्यात शेवटी त्याने डोक्याचे केस उपटून त्याच्यावर ठेवले.. उतारा होता तो कसला तरी... आणि दोन घासातच ते सगळं संपवून टाकलं... उलटी येत होतं होती तरी पण तो घशात कोंबतच राहिला... सगळं काही झाल्यावर तो माघारी यायला लागला,,, तेच जयप्पाचा पाय घसरून तो खाली पडला... आणि जे व्हायचं नव्हतं ते झालं...
क्रमशः
No comments:
Post a Comment