विळखा - भाग 2 (अंतिम भाग)
आजीे पुढे सांगू लागल्या...त्या जे काही सांगत होत्या ते चित्र माझ्या डोळ्या समोर उभे राहत होते ... " सुरेश सकाळ होण्याची वाट बघत होता .. आणि एकदाची सकाळ झाली.. आता चांगलच उजाडलं होतं.. अनिता पण उठली .पटकन ती बाथरूम मध्ये गेली ..अंघोळ वगैरे करून ती सरळ स्वपाक घरात गेली .. सुरेश उठून तयार झाला .. अनिता कडे जाण्याची त्याची हिम्मत होत नव्हती .. तरी पण हिम्मत करून तो स्वयंपाक घरात गेला .. अनिता आणि तिची सासू नाष्ट्या ची तयारी करत होते .. सुरेश ने अनिताकडे पाहिले ती पाठमोरी होती .. व्यवस्थित साडी नेसलेली ... केसांची वेणी घातलेली.. तिचे केस बघून सुरेशला काल रात्रीची केस मोकळे सोडलेली अनिता आठवली .. त्याच्या डोळ्यासमोर तिचे काल चे रूप उभे राहिले .. अचानक अनिता वळाली ..तिने सुरेश कडे पाहिले.. सुरेश एकदम दचकला..जरासा मागे सरकला.. अनिता त्याला म्हणाली .. काय झालं? तुमचा चेहरा एवढा पंधरा का झालाय ? "" काही नाही .. दे डब्बा लवकर .. उशीर होतोय " असे म्हणून सुरेश तिथून निघाला. आज त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं.. सारखं त्याला काल रात्रीच आठवत होतं.. काय करावं .. विचार करून करून बेजार झाला तो. सुरेशला गजूची ची आठवण झाली.. सगळी कामे सोडून तो गजूकडे गेला. गजू दुपारचं जेवायला घरी आला होता. सुरेशला दुपारचं घरी बघून त्याला थोडा आश्चर्य वाटलं .. कारण सुरेश दुपारचं कधी सहसा जात नसे.. आज तो आलाय म्हणजे काहीतरी खास आहे .. गजूने सुरेशला चहापाणी दिले .. सुरेशचा गंभीर चिंताग्रस्त चेहरा गजूच्या नजरेतून सुटला नव्हता.. तरी पण त्याने सुरेशला विचारले .. काय झालं .. सगळं ठीक आहे ना ? का भांडण बिंडंन झालंय? .. काय बोलावं सुरेश ला काही सुचत नव्हते .. कसं सांगू ? काय सांगू ? .. हळू हळू सुरेश ने रात्री घडलेला प्रसंग गजूला सांगितला. गजूचा विश्वासच बसेना .. असं काही तरी सुरेश सांगेन याची त्याला स्वप्नात पण कल्पना नव्हती.. आता चक्कर येण्याची वेळ गजूची होती .. घडलेला प्रकार ऐकून त्यालाच घाम फुटला तर सुरेशची काय अवस्था झाली असेन. बराच वेळ विचार करून सुरेश गजूला म्हणाला " गजू काय आहे हे सगळं ? आता काय करू मी ?" खूप रडला सुरेश . गजू ने सुरेशला शांत केले आणि म्हणाला," मी सांगतो ते नीट ,, पाहिले मनाची हिम्मत सोडू नकोस. कोणाला ह्यातलं काहीही सांगू नकोस. सुरेश तू जे सांगतोय त्यावरून असं कळतंय कि वाहिनी जे काही करत होती ती चेटूक विद्या आहे.."" चेटूक विद्या? नुसतं कानावर शब्द पडला तरी सुरेशच्या मनात धस्स झाल. गजू म्हणाला " पण एक शंका आहे मित्रा.. अनिता ला नुसतीच चेटूक विद्या येती कि ...??? "" कि .. काय गजू ? " कसं बोलावं काही समजेना गजूला .. तरी पण मित्रा साठी त्याने विचारलेच .. " सुरेश अनिताला फक्त चेटूक विद्या येती कि ती स्वतः चेटकीण आहे .. हे आपल्याला कळालं पाहिजे .. म्हणजे पुढे काय करायचे ते ठरवूयात ?" "ते कसं कळणार ?" गजू म्हणाला " माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं कि चेटकिणीला तिचे केस खूप प्रिय असतात .. म्हणून ती कोणालाहि त्यांना हात लावू देत नाही .. सुरेश तू आता एक काम कर .. अनिता जवळ जेव्हा जाशील तेव्हा तिच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न कर .. थोडे तिचे केस ओढ आणि बघ काय होत ते ..आणि हो .. अनितावर बारीक नजर ठेव .. पण तिला कुठला हि संशय येऊ देऊ नकोस .. सावध राहा " त्यांना आता कळले कि अनिता का देवपूजा वगैरे करत नाही ते.
गजूशी बोलून सुरेश घरी आला .. अनिता काहीतरी काम करण्यात व्यस्त होती .. आता तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता.. नेहमीप्रमाणे सगळे जेवले आणि झोपायला गेले .. अनिता जशी रूम मध्ये आली तसं सुरेशला थोडी भीती वाटली .. पण ती एकदम नॉर्मल वागत असल्यामुळे त्याला हिम्मत येयला लागली. अनिता सुरेश जवळ येऊन बसली .. आणि दोघे गप्पा मारू लागले .. बोलता बोलता सुरेशने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला .. अनिता सुरेशकडे बघून गोड हसली .. सुरेश तिला म्हणाला .. आज काय छान दिसतीये तू .. हे ऐकून अनिता थोडी लाजली .. सुरेश तिची स्तुती करू लागला ,, आणि हळू हळू त्याचा हात तिच्याकडे न्हेत न्हेत तिच्या केसांना स्पर्श करू लागला .. अजून तरी अनिता काहीच बोलली नाही ...त्याने हिम्मत करून त्याचा हात अनिताच्या डोक्याच्या मागील बाजूस ठेवला ..आणि हातची बोटे केसांन मध्ये फिरवू लागला ... सुरेशचा हाताचा स्पर्श केसांन मध्ये होताच .. अनिता एकदम मागे सरकली .. आणि तिने सुरेशचा हात केसांन मधून मानेला झटका देऊन काढून टाकला ..." काय करताय हे ..? आज झोप नाही आली वाटत ? " अनिता ने सुरेशला झटका देताच सुरेश मनातून थोडा घाबरला .. परत हिम्मत करून तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागला .. पण अनिता प्रत्येक वेळी त्याला काहींना काही कारण देऊन हात लावू देईना .. सुरेश पण जिद्दीला पेटला .. आणि परत प्रयत्न करू लागला .. आता मात्र अनिताचा पारा चढला.. ती सुरेशला चिडून म्हणाली .. " माझ्या केसांन हात नाही लावायचा हं.. मला नाही आवडत " तिचे हे शब्द ऐकून सुरेश गारच झाला. त्याला कळून चुकले कि अनिता हि चेटकीण आहे ते. त्याने दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार सांगितला. पुढे काही दिवस तो अनिताच्या केसांन हात लावण्याचा सारखी संधी शोधू लागला पण ती काही त्याला हात लावू देईना. अधून मधून अनिताची चेटूक पूजा पण चालू असायची .. सुरेश डोळ्यात तेल घालून आता सगळं बघू लागला .. जे काही घडे ते तो गजूला सांगू लागला.
आजी मला जसे सांगत होत्या तसं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते .. आता पुढे काय ? ह्यातून बाहेर कसं पडायचं. विचार करून करून डोके फुटायची वेळ आली, शिवाय जीवाची भीती पण होतीच. काय करावं काहीच समजेना. एक दिवस गजू कामा निमित्त बाहेर गावी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि थेट सुरेश कडे गेला. त्याला आपल्या घरी घेऊन आला आणि म्हणाला " सुऱ्या मित्रा .. काल मी एका मांत्रिकाला भेटलो होतो .. त्याच्या कडून कळाले कि चिटकीणीला तिचे केस खूपच प्रिय असतात... जर का तू तिचे केस मिळवले तर ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल .. फक्त तिचे थोडेसे केस आपल्या ताब्यात घे आणि तिला सापडणार नाहीत असे लपव... मग बघ तुझं नशीब कसं फळफळत ते.." सुरेश म्हणाला " मला काही नको .. मला फक्त ह्यातून सुटायचंय " पण गजू काही ऐकेना " सुरेश वाईटात पण चांगलं होतं म्हणतात ना .. तसंच आहे हे.. हे बघ आपण आपली दोन चार कामे तिच्या कडून करून घेऊ आणि मग देऊ सोडून .. आणि मी आहे ना .. तू कशाला घाबरतोय.. जर तिला काही वाईट करायचे असते तर तिने ते केव्हाच केले असते " गजू ने सुरेशला कसाबसा तयार केलाच.
सुरेश आता अनिताशी गोड गोड वागू लागला आणि तिचे केस मिळविण्याचे प्रयत्न करू लागला.. पण काही केल्या ती तिचे केस त्याच्या हातात पडू देईना. काय करावं आता? एके दिवशी सुरेश आणि गजू ने एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी गजू आणि त्याचे अजून दोन मित्र सुरेशच्या घरी सकाळी सकाळीच गेले. सुरेश हि पहाटे लवकर उठला .. अनिताला लवकर आवरता येणार नाही असे कामे सांगू लागला . अनिताची घाई आणि चिडचिड होयला लागली .. ती नीट तय्यार नव्हती झाली ..त्यात गजू आणि त्याचे दोन मित्र अचानक नाश्त्यासाठी दारात हजर.. अनिता पटापट कामे करू लागली . सर्वांना नाष्ट्याचे आणून दिले.. खाऊन झाल्यावर सर्वांसाठी चहा आणला .. सर्व जण गप्पा मारत चहा पीत होते.. गजूने मोठ्या हुशारीने अनिताला बोलण्यात गुंतवले होते.. अनिता खुर्चीवर बसून चहा घेत होती .. तिला बोलण्यात गुंतलेली पाहून सुरेश हळूच उठला .. हातात चहाचा कप बशी होतीच .. हळूच तो अनिताच्या थोडा जवळून मागे गेला .. आणि चालता चालता त्याने अचानक हातातून चहाचे कप निसटल्यासारखे (मुद्दाम) केले .. आणि तो चहा अनिताच्या डोक्यावर सांडला. केसांनवर चहा सांडताच अनिता एकदम चिडली .. डोळे मोठे करून ती सुरेशवर खेकसली " काय अक्कल आहे कि नाही . सगळा चहा माझ्यावर सांडलास.. डोळे फुटलेत काय तुझे.. मूर्ख .." अनिता रागाने लाल झाली होती. ती सुरेशला त्याच्या मित्रांसमोर बोलतीये याचं पण तिला भान नाही राहिलं. " ओह ! चुकून झालं .. जा जा लवकर केस धुऊन ये " ती तशीच चिडचिड करत बाथरूम मध्ये गेली. बऱ्याच वेळानी अनिता केस धुऊन बाहेर आली.. सुरेश पटकन तिच्या मागे खोलीत गेला. अनिता केस पुसत होती .. तिच्या लांब मोकळ्या केसांना बघून सुरेश जरा घाबरला. तो तिच्या जवळ गेला तर ती त्याला तिथून हाकलून देऊ लागली.. पण सुरेश कपाटात काहीतरी शोधण्याच्या बहाण्याने तिथेच थांबला. अनिता सुरेश कडे बघत होती ... तिला तिचे मोकळे केस घेऊन बाहेर हि जात येत नव्हते. थोडा वेळ थांबून तिने एक कंगवा घेतला व स्वतःचे केस विंचरू लागली.. हळू हळू तिचे केस वाळू लागले तसा तिला आनंद होयला लागला .. मस्त कुठलं तरी गाणं गुणगुणत ती केस विंचरत आरशा समोर उभी होती .. सुरेशच लक्ष होतंच तिच्याकडे .. तिने केसांची वेणी घातली. तेवढ्यात बाहेर असलेल्या गजू आणि त्याच्या मित्रांनी एकदम जोर जोरात अनिता आणि सुरेशला आवाज देऊ लागले " सुरेश बाहेर ये लवकर .. वहिनी पटकन या .. लगेच या .. हे बघा काय आहे ते ? " त्यांचा गोंधळ ऐकून अनिताने हाताला कंगवा तिथेच ठेवला आणि पटकन बाहेर आली .. " काय झालं .. काय झालं ? काय आहे .. ? " गजू समोरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाला " त्या .. त्या खोलीत अत्ता एक मोठं जनावर (साप) सळसळत जाणताना पाहिलं आम्ही ... काढा त्याला आधी बाहेर.." अनिता पटकन हातात एक दांडका घेऊन त्या खोलीकडे पाळली. इकडे सुरेशला ह्या अचानक झालेल्या गडबडीमुळे चांगली संधी मिळाली.. त्याने क्षणाचाही विलंब न करता पटकन अनिताने जो कंगवा वापरला होता तो घेतला.. झालेल्या गडबडीमुळे अनिताने तो कंगवा तिथेच ठेवला होता व ती बाहेर काय झालं ते पाहण्यास आली होती .. त्या कांगाव्याला अनिताचे काही केसांचा बुंचका अडकला होता ... सुरेशने पटकन तो बुंचका काढला आणि तो, गजू आणि त्याचे मित्र तिथून निसटले. घरापासून थोडे लांब गजूने एक गाडी आणून ठेवली होती .. सगळे पळतच गाडी जवळ पोचले ,, गाडीत बसले आणि तिथून पसार झाले.. गजू आणि सुरेशचा प्लॅन यशस्वी झाला होता. इकडे अनिता त्या खोलीत जनावर शोधत होती पण ते काही सापडत नव्हतं.. बाहेर हि एकदम शांतता झाली होती .. अनिताला कसला तरी संशय आला .. ती पटकन खोली बाहेर आली .. बघती तर काय गजू आणि त्याचे मित्र घरातून गायब!!! तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली .. ती पळतच वर खोलीत गेली .. धावत पळत ती त्या कंगव्यापाशी पोचली .. कंगवा हातात घेऊन बघते तर काय.... केसांचा बुंचका गायब ? ती घरभर हातात कंगवा घेऊन सुरेशला शोधू लागली .. पण सुरेश हि दिसेना .. ती बेभान होऊन शेताकडे पाळली .. सुरेश तिथे हि नव्हता.. अनिताला कळून चुकले कि सुरेशला तिचं खरं रूप कळालंय .. तोच तिचा केसांचा बुंचका घेऊन पाळलाय... ती वेडीपीसी होऊन सुरेशची वाट बघू लागली .. घरात आदळ आपट करू लागली .. चिडचिड करू लागली.. तिच्या केसांन शिवाय बेचैन झाली .. रागाच्या भरात तिने सुरेशच्या आई वडिलांना घराबाहेर काढलं.
साधारण १५ - २० दिवसांनी सुरेश परत घरी आला ... अनिता सुरेशची वाट बघत रोज दारात उभी असायची.. सुरेशला बघताच ती एकदम आनंदून गेली .. सुरेश येताच ती त्याच्या साठी चहा पाणी आणि काहीतरी खायला घेऊन आली. सुरेशला आरामात बसलेला बघून ती त्याच्या जवळ गेली .. त्याला लाडी गोडी करू लागली .. व म्हणाली " तर तुम्हाला सगळं कळालं आहे आता ..." " कशा बद्दल बोलतेस तू अनिता ?" " तुम्ही ना .. खरंच इतके छुपेरुस्तम असाल ना मला माहीतच नव्हतं" " काय बोलतेस तू ? मला काहीच कळत नाहीये " " ठीक आहे .. मग सरळच विचारते आता .. माझे केस कुठे आहेत .. मला ते पाहिजे .. तुम्हाला कळालंय कि मी चेटकीण आहे ते .. द्या माझे केस परत .." तिचं असं स्पष्ट बोलणं सुरेशला अजिबात अपेक्षित नव्हतं.. तिचे मोठे झालेले डोळे , बदलेला आवाज आणि स्पष्ट बोलणे ऐकून सुरेशच्या मनात धस्स झालं.. काय करावं ते त्याला कळेना .. अनिता सारखी विचारात होती . सुरेश म्हणाला आधी सांग माझे आई बाबा कुठे आहेत ? " ती म्हणाली मीच रागात त्यांना घरा बाहेर काढलं " . " जा जाऊन घेऊन ये " " ठीक आहे " आणि ती तशीच घरा बाहेर पडली. बऱ्याच वेळाने ती परत आली .. सोबत सुरेशचे आई बाबा पण होते. रात्री अनिता खोलीत आली ..ती सारखी सुरेशकडे केसांची विचारणा करू लागली..पण तो काही सांगना.. सुरेश तिला म्हणाला खरं सांग कोण आहेस तू ? माझ्याशीच का लग्न केलंस ? काय उद्देश आहे तुझा ?.. अनिता म्हणाली मी एक चेटकीण आहे .. मला चेटूक विद्या प्राप्त आहे .. साक्षात सैतान मला प्रसन्न आहे .. मी त्याला खुश करण्यासाठी काहीही करू शकते ... त्याच्यासाठी मी माझ्या जन्म देत्या आई बापाचा पण बळी दिलाय .. तो सैतान माझ्यात संचारतो .. मला ताकतवर बनवतो ,,.. मला त्याला खुश करावं लागतं.. तुझं घर नदी जवळ आहे .. मी नेहमी इथे सैतानाला पुजायला येयची .. पण .. गावातल्या लोकांमुळे माझी पूजा नीट होत नसे .. मी कमजोर पडायला लागले .. तुझं घर माझ्या डोळ्यात बहरलं होत .. तुला कसाही करून मिळवायचाच ..म्हणजे मला माझी सैतानी कार्य करायला सोप्पं होईल .. हाच उद्देश घेऊन तुझ्याशी लग्न केलं.. " अनिताचे हे बोलणे ऐकून सुरेशला डबडबून घाम फुटला .. छातीची धडधड वाढली होती .. काय बोलावं ते कळेना .. तोच अनिता त्याला म्हणाली " मला माझे केस परत दे .. मी जाते निघून .. तुला आणि तुझं परिवाराला काहीही करणार नाही .. फक्त माझे केस दे परत .." सुरेशला आता अनिताची भीती वाटू लागली .. पण त्याला गजूचे बोलणे आठवले .. केसांसाठी चेटकीण काहीही करायला तयार असते .. हीच संधी आहे आर या पार .. सुरेश अनिताला म्हणाला .. तुझे केस ना ..देतो ना .. पण आधी एक काम कर माझं " " काय .. काय करावं लागेन मला ? " " सांगतो .. आधी माझ्या कडे खूप पैसे येऊ दे मग देतो तुझे केस .." ठीक आहे येईल तुझ्याकडे पैसा.. पण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते .. सैतानाला खुश करावं लागतं " .. " तुला काय करायचं ते कर .. मला पैसा पाहिजे बस्स .." " ठीक आहे .." असे म्हणून अनिता आपल्या कामाला लागली .. तिची सैतानी पूजा सुरु झाली .. सुरेश गजूला जे काही घडे ते सांगू लागला .. गजू आता सुरेशच्या घरी येत नसे.. एक दिवस सुरेशच्या शेतात काम चालू असताना अचानक सुरेशला एक सोन्याने भरलेला हंडा सापडला .. सुरेश एकदम आनंदून गेला .. त्याला समजले कि हे सगळं अनिता मुळेच झालंय. सुरेश घरात नसताना अनिता घराची आणि सुरेशच्या वस्तूंची कसून तपासणी करायची .. तिला तिचे केस मिळवायचे होते .. पण काही केल्या ते तिला मिळत नव्हते .. सुरेशकडे पैसा आल्यामुळे त्याने घरात चांगल्या चांगल्या वस्तू आणायला सुरवात केली .. गजू ला हि तो महागडी वस्तू देऊ लागला .. अनिता सुरेश ला म्हणाली " तुझ्याकडे आता पैसा आलाय .. मग सांग आता माझे केस कुठे आहेत ते ?" सुरेश म्हणाला " सांगतो कि .. पण आधी माझे एक काम कर अजून .. गावातल्या सावकाराने मला खूप छळलंय .. त्याला जरा अद्दल घडूदे कि .." " बस्स .. इतकंच.. " दुसऱ्या दिवशी गावातल्या सावकाराचा नदी जवळ छिन्न विछिन्न अवस्थेत प्रेत सापडलं.." काही दिवसांनी सुरेशचे आई वडील एका अपघातात वारले .. सुरेश अनितावर चिडला त्याचे आई वडील कसे काय मेले म्हणून ? अनिता म्हणाली " मी आधीच सांगितले होते प्रत्येक गोष्टीची किंमत सैतानाला द्यावी लागेन म्हणून .. तू विसरलास .. मग त्याने त्याचेच घेतले भागवून ... सुरेश घाबरला .. तो नियमितपणे त्या सैतानाला खुश करायला बकरं कोंबडं देऊ लागला.. तसतशी त्याची कामे होऊ लागली .. अल्पविधीतच सुरेश खूप श्रीमंत झाला.. घरी गाडी , जमीन , पैसा , नौकर चाकर सगळं काही त्याला पाहिजे ते मिळायला लागलं.. सुरेशला कळाले कि हि आता काहीही करू शकते .. अनिता पण सुरेश सांगेन ते करू लागली ...
अनिताचे सारखे सुरेशकडे केसांचे मागणे सुरु असायचे .. पण तो काही ना तिच्याकडे मागत राहत.. अनिता सुरेश नसताना घरात केसांचा खूप शोध घेई पण तिला ते केस काही केल्या मिळत नसे .. कुठे ठेवले असतील त्याने माझे केस ? ती विचार करी .. पण आता काही पर्याय नव्हता त्याच ऐकण्यावाचून .. तो सांगेन ते गपचूप करत राहायची .. व ती त्याला विश्वास देऊ लागली मी आता तुला कधीच सोडून जाणार नाही .. तुला जे पाहिजे ते मिळून देईन .. तू फक्त माझी पूजा सफल करत जा .. बळी देत जा .. म्हणजे मी आणि माझा सैतान तुझी भरभराट करू ... सुरेश ला हि अनिता वर विश्वास बसू लागला .. त्याला खात्री पटली कि ती आता कुठेच जाणार नाही .. तिला आपल्याच घरात सैतान कार्य करायला सोप्पं आहे ... जर का ती इथेच राहिली तर मी अजून खूप खूप श्रीमंत होईन .. कोणीच माझे काहीही वाकडे करू शकणार नाही .." सुरेश तिच्या विळख्यात अडकत चालला होता.
गजू ने सुरेशला एकदा सांगितलं ... सुरेश बस्स कर आता .. खूप मिळवलंय .. काहीतरी विपरीत घडायच्या आत जाऊदे तिला .. पण सुरेशला अनिता वर विश्वास बसला होता .. उलट तोच गजूला म्हणाला कि तिला माझ्याच घरात राहायचंय.. ती मला कधीहि सोडून जाऊ इच्छित नाही .. गजूने ने सुरेश समोर हात टेकले ... गजू एकदा रात्री घरी जात होता .. अंधाऱ्या रस्त्यावर तो एकटाच चालला होता .. अचानक त्याच्या समोर अनिता येऊन थांबली .. गजू जाम घाबरला .. अनिता त्याला म्हणाली ... तू सांग माझे केस कुठे आहेत ते .. मी तुला पाहिजे ते देईन .. गजूला दरदरून घाम सुटला ..जिवाच्या आतंकाने तो तिथून पळाला .. दुसऱ्या दिवशीच सुरेशला झाला प्रकार सांगितला आणि त्याचा निरोप घेऊन गाव सोडून निघून गेला .. जाताना परत त्याने सुरेशला अनिताला सोडून दे म्हणून सांगू लागला .. सुरेशने उलट गजूचीच खिल्ली उडवली ... ... गजू निघून गेला ..
दिवसा मागून दिवस जात होते .. सुरेशला आता पूर्ण खात्री झाली होती कि अनिता त्याला सोडून जाणार नाही .. अनिता पण त्याच्याशी खूप लाडीगोडीने वागत होती .. एक दिवस रात्री अनिता सुरेशला खूपच लाडीगोडी करू लागली .. त्याच्यासाठी खास दारू मटनची तयारी केली .. सुरेश दारू पिऊन मस्त झाला .. दोघेही जेवले .. रात्री अनिता सुरेश जवळ गेली आणि म्हणाली " आता पण खूप श्रीमंत झालोय .. आपल्याकडे सगळं काही आहे .. पण मला अजून तुमच्या साठी खूप काही करायचंय .. त्यासाठी आपल्यादोघात एकी पाहिजे .. तुम्ही माझी मदत करा मी तुमची करत जाईन..." सुरेश म्हणाला " हो नक्कीच .. बोल ना काय पाहिजे ते .. काय करू सांग कि .." अनिता म्हणाली कि " मग मला सांगा कि मी चेटकीण आहे ते तुम्हाला कसं कळालं ?" मग सुरेश ने तिला झाला प्रकार सांगितला .. त्याला आता दारू चांगलीच चढली होती तो बोलत चालला होता .. अनिता म्हणाली मग तुम्ही माझे केस घेऊन कुठे गेला होता ? " सुरेश ने सांगितले कि तो इथून गेल्यावर एका लांबच्या गावात एक वैद्य राहतो त्याच्या कडे गेला होता.... अनिता ने विचारले " कशाला ?" सुरेश म्हणाला कारण त्याला तिचे केस लपवायचे होते म्हणून .. अनिता आता खूपच लाडिक झाली.. ती सुरेशला म्हणाली कि " मग सांगा ना कुठे ठेवले ते केस ते ? .. पाहिजे तर ते तुम्हीच ठेवा .. मला नको आता ते कारण मला तुमच्या सोबतच राहायचं .. पण मला फक्त सांगा कि कुठे आणि कसे लपवले ते .. सांगा ना .. असं काय करताय .. मी काय सोडून जाणार आहे तुम्हाला आता ? .. मग सांगा बरं.." सुरेश तिच्या गोड गोड बोलण्याला भुलला.. तिच्या विळख्यात अडकला .. आणि त्याने सांगितले .. " मी त्या वैद्याकडे गेलो .. त्याने ते केस एका छोट्याशा पुडी मध्ये ठेवले... आणि ती पुडी त्याने माझ्या उजव्या पायाच्या मांडीत मागील बाजूस ठेवली .. व तो भाग शिवून टाकला " .. सुरेशच बोलणं संपत न संपत तोच अनिता ने गडगडाटी हास्य केलं.. खूप दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळाल्या सारखे भाव तिच्या चेहऱ्यावर आला .. तिला केसांचा पत्ता काळाला होता .. ती अघशासारखी सुरेश ची पॅन्ट फाडू लागली .. सुरेश घाबरला . तो अनिता ला ढकलू लागला.. पण ती आता सुरेश वर तुटून पडली .. आपली काही खैर नाही सुरेश कळून चुकले ... त्याची चूक त्याच्या लक्षात आली पण आता खूप उशीर झाला होता .. तो जिवाच्या आतंकाने दरवाजाकडे पळाला .. अनिता ने झपकन त्याच्यावर उडी घातली .. त्याचा एक पाय हातात धरून फरफटत त्याला आत खेचला .. जवळच असलेला एक स्टूल तिने उचला आणि कसला हि विचार न करता सुरेशच्या पाठीत जोरात मारला .. सुरेश उपडा पडला .. अनिताची नजर सुरेशच्या मांडीवर होती .. तिला आता दुसरं काहीच दिसत नव्हतं .. तोंडाने फक्त ती " माझे केस .. माझे केस .. मला मिळणार आता .. खूप तेरसवलं ह्या मूडद्याने... " असे म्हणत होती.. मधेच हसत होती .. सुरेश तिला समजण्याचा प्रत्यत्न करू लागला .. पण ती आता कसली ऐकतिये .. ती सुरेशच्या पायावर बसली .. जोरात तिने स्वतःची हाताची नखे सुरेशच्या मांडीत खुपसली .. सुरेश जिवाच्या आतंकाने ओरडू लागला.. दोन्ही हाताने तिने सुरेशची मांडी फार विचित्रपणे फाडली .. आणि त्या मासाच्या आणि रक्ताच्या थारोळ्यात अनिता ती पुडी शोधू लागली .. अखेर तिला ती केसांची पुडी सापडली .. ती तिने उघडून बघितली .. स्वतःचे केस पाहून खूप विचत्रपणे हसली .. तिने सुरेशच्या फाडलेल्या मांडीवर दोन्ही हात पुन्हा एकदा घुसवले.. तिचे हात आता अधिकच रक्ताने माखले होते .. दोन्ही हातांना लागलेलं रक्त पाहून तिला खूप हसायला यायला लागलं. तिने स्वतःचे केस मोकळे केले .. आणि ते रक्त केसांना लावायला लागली .. मधेच तिच्या हातावरून जे रक्त ओघळायचे ते ती चाटून घेयची .. तीचा रक्त उत्सव सुरु झाला होता.. सुरेश तिथे मरण यातना सोसत होता .. जोर जोरात ओरडत होता .. त्याच्या आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा होयला लागले .. अनिताच्या हे लक्षात येताच ती सुरेश जवळ गेली .. सुरेश तिला जीवदान देण्यासाठी विनवणी करू लागला ... अनिता त्याच काहीही ऐकत नव्हती .. तिने सुरेशचा तो जखमी पाय हातात घेतला .. सुरेशला तर आधीच अर्धामेला झाला होता .. सुरेश खाली पडलेला .. ती उभी .. आणि त्याचा पाय तिच्या हातात .. तिने कसला हि विचार न करता सुरेश चा पाय जोरात ओढला .. इतका कि त्याच्या पाय कंबरेपासून तुटून तिच्या हातात आला .. तो घेऊन ती पळतच वाड्याबाहेर आली .. आणि नदी कडे पाळली .. तीचा तो असला अवतार बघून ..हातात तो तुटलेला पाय बघून .. जमलेली सगळी लोकं तिथून पाळली .. अनिता नदी कडे पाळली आणि तिने पाण्यात उडी घेतली .. तशी ती दिशेनाशी झाली .. इकडे अर्थातच सुरेश मरण पावला होता ... नंतर कित्येक वेळेला तीचा आवाज त्या वाड्यात येत असे .. अमावास पौर्णिमेला तर खूप जणांनी तिथे उजेड हि पाहिला आहे... म्हणूनच काही जाणकार लोकांनी तिथे मांत्रिक बोलावून ते घर कायमचे बंद केले ... काही दिवसांनी गजू पण विचित्र अपघातात मेला हि बातमी कळाली.." आजी ने मोठा उसासा सोडला .. मी तर ऐकून थक्कच झालो .. असं खरंच घडू शकतं..? आज हि संध्याकाळ नंतर कोणीही त्यानदीवर अगर वाड्याजवळ जायची हिम्मत करत नाही ... आजीने माझ्याकडून तिकडे परत न जाण्याच आश्वासन घेतलं.. माझा भूतखोतांवर विश्वास आहे की नाही माहित नाही ..पण आजी ज्या पोटतिडकीने सांगत होत्या ते बघून असं वाटतं की विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी ।। समाप्त।।

No comments:
Post a Comment