अंतर्मनाची शक्ती...
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि. ०६.०४.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
प्रकाशन:- दि. ०६.०४.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या अंतर्मनाची शक्ती जगवण्याचा आणि आपले तेजोवलाय मजबूत करण्याचा एक छोटासा प्रयोग सांगणार आहे, ह्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचा ऑरा मजबूत करून नकारात्मक शक्तींपासून निश्चितच स्वतःचे रक्षण करू शकता. नकारात्मक शक्ती म्हणजे भूत प्रेत हेच असतात असे काहीच नाही. नकारात्मक शक्ती ह्या कुठल्याही असू शकतात जसे एखाद्याने अतिशय रागाने तुमच्या बद्दल काढलेले उद्गार हेही नकारात्मक शक्तीचे रूप घेऊ शकतात त्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते. दरवेळी अध्यात्माचा विषय आला की लोक त्याला अंधश्रद्धेच लेबल लावतात परंतु काही गोष्टी काही प्रमाणात विज्ञानानेही मान्य केल्या आहेत तसेच नकारात्मक गोष्टींचे अस्तित्व मानले आहे फरक इतकाच की देव धर्म मानणारे लोक त्याला भूत प्रेत हे नाव देतात आणि ते न मानणारे लोक त्याला नकारात्मक ऊर्जा असे म्हणतात. तीच नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून घालवण्यासाठी मी नेहमीच ह्या प्रयोगाचा वापर करतो जो मी खूप वर्षांच्या साधनेतून आणि अनुभवातून अस्तित्वात आणला आहे. अर्थात आशा प्रकारचे कित्येक प्रयोग इतर लोक ही करत असतीलच त्यामुळे मी असेही म्हणत नाही की ह्याचा शोध मी लावला आहे. कारण ह्या पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व अध्यात्मिक गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी शोधून काढल्या आणि लिहून ठेवल्या आणि आपण सामान्य माणसांनी फक्त त्यांचा अभ्यास करून स्वतःचे ठोकताळे बनविले. तसाच अभ्यास करून मीही, ही क्रिया शोधून काढली आहे. वरवर साध्या दिसणाऱ्या ह्या साधनेला मी उच्चकोटीची साधना म्हणण्याचे कारण म्हणजे ती आपल्या आतर्मनाशी निगडित आहे आणि अंतर्मन हे दैवी मन असते, अंतर्मनात गेलेली गोष्ट सहज फलद्रुप होऊ शकते, म्हणून ही साधना योग्य अभ्यासाअंती खालीलप्रमाणे करावी ही विनंती.
1. रात्री झोपण्याच्या वेळी एकदम रिल्याक्स होऊन शांत बिछान्यावर पडायचं आणि डोळे मिटून खोल खोल स्वास घेत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा.
2. नंतर डोळ्यासमोर सप्तरंगाचे गोल वर्तुळ आणायचा प्रयत्न करायचा, त्याचा क्रम १. तांबडे २. नारंगी ३. पिवळा ४. हिरवा ५. निळा ६. जांभळा , ह्याच क्रमाने एक एक वर्तुळ ज्याचा कलर एकदम तेजस्वी आहे अशी कल्पना करायची,
3. ही कलर ची वर्तुळ आपल्या बंद डोळ्यांसमोर कमीत कमी 15 सेकंद टिकली पाहिजेत, हे करत असताना तुम्हाला खूप झोप येऊ शकते परंतु झोपायचे नाही,
4. सुरवातीचे काही दिवस तुम्ही 2ऱ्या ते 3ऱ्या वर्तुळाच्या इकडे पोहोचण्या आधीच तुम्हाला झोप येईल, समजा असे झाले तर हीच क्रिया परत पहिल्या पासून करायची. तुम्ही शेवटपर्यंत कलर पाहू शकलात तरच तुम्ही ह्या पूर्ण क्रियेत ४०% यशस्वी झालात असे समजायचे.
5. समजा तुम्ही सर्व वर्तुळ पाहण्यात यशस्वी झालात तर मनात एक अशी कल्पना करायची की तुमच्या समोर एक सोनेरी रंगाची किंवा तुम्हाला जो रंग आवडतो त्या रंगाची आणि खोल जमिनीत जाणारी एक गुफा तयार झाली आहे.
6. तुम्ही त्या गुफेचे नीट निरीक्षण करायचे, त्या गुफेत काय काय आहे, तिच्या पायऱ्या कशा आहेत, त्या गुफेचा रंग कुठला आहे.
7. गुफेचा रंग इत्यादी हा तुमच्या आवडीच्या वस्तूंची सुशोभीत करण्याचा प्रयत्न करायचा. ही गुफा म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून तुमच्या बहिरमनातून अंतर्मनात जाणारा रस्ता आहे.
8. त्या गुफेसरख्या दिसणाऱ्या रस्त्याला 21 पायऱ्या आहेत अशी कल्पना करायची, त्या पायऱ्यांचा कलर, त्या कशा आहेत त्यांचा स्पर्श, थंड की गरम सर्व कल्पना करायची.
9. त्यानंतर हळूहळू त्या पायऱ्यांवरून मनानेच उतारायला सुरवात करायच, आजूबाजूला पहायचे, जाणवायचे, अंदाज घ्यायचा. जेव्हा 21 पायऱ्या संपतील तेव्हा तुमच्या समोर एक दरवाजा दिसेल, तो दरवाजा कशापासून बनला आहे, त्याची कडी त्याची नक्षी कशी आहे ते बघायचे. त्यानंतर तो दरवाजा उघडायचा,
10. त्या दरवाजातून आत जायचे, तो दरवाजा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमचे अथांग पसरलेले अंतर्मन असेल.
11. आत गेल्यावर कल्पना करायची की आत खूप मोठा हिरवागार प्रदेश, खूप मोठा जलाशय, डोंगर इत्यदि पसरलेला आहे, मला हे आवडते म्हणून मी ही कल्पना करतो. तुम्ही इतरही काही करू शकता.
12. त्यानंतर तुम्ही त्या जलाशयातील पाण्यात स्वतःला झोकून द्यायचे आणि जरासे पोहायचे, बाहेर निघताना असा विचार करायचा की तुम्ही तुमच्या शरीरातील सर्व घाण, खराब विचार, रोग, सर्व काही जे खराब आहे ते त्या पाण्यात सोडले आहे आणि आता जे तुम्ही बाहेर आला आहात तो एक तेजस्वी, रोगमुक्त, विकारमुक्त देह आहे.
13. त्यानंतर एक खोल श्वास घेऊन तुमचे करंगळीचे बोट आणि अंगठा ह्यांची टोके एकमेकाला जोडून मनातल्या मनात श्रीराम असे म्हणायचे.
14. श्रीराम च्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही देवाचे नाव घेऊ शकता, परंतु माणसाचे घेऊ नये, नाव विकारयुक्त नसावे. त्यानंतर तिकडेच जमिनीवरच उभे राहून अशी कल्पना करायची की जमिनीतून काही अलौकिक किरणे किंवा शक्तीचे वहन तुमच्या पायाच्या तळव्यांतून प्रवेश करून ती सप्तचकरांतून जात डोक्यातून बाहेर पडून आकाशात जाते आणि तिचा वरती स्फोट सारखा होऊन सगळी कडे डोळे दिपवणारा प्रकाश पडतो आणि तुमचा ऑरा प्रकाशमान होतो.
15. त्यानंतर जसे तुम्ही गुफेत आलात तसेच बाहेर पडतात असे कल्पना करावी आणि बाहेर पडावे.
16. हे एक आवर्तन आहे हीच सेम क्रिया अलार्म लावून एकाच दिवसांत एक तासांच्या अंतराने 8 वेळा केली असता सिद्ध होते आणि हळूहळू तुम्ही अंतर्मनाच्या अलौकिक शक्तीचे सामर्थ्य अनुभवायला तयार होतात.
17. सुरवातीला ह्या क्रियेचे काही साइडइफेक्ट पण होऊ शकतात पण ते तेव्हाच होतात जेव्हा कलर च्या वर्तुळावर ध्यान करण्याची प्रक्रिया अर्धवट करून डायरेक्ट गुहेत उतरण्याची क्रिया केली जाते, ते परिणाम म्हणजे तीव्र डोकेदुखी होणे हे असतात, ह्याचे कारण म्हणजे अंतर्मनाच्या तीव्र शक्ती तुम्हाला झेपत नाही आणि म्हणूनच पहिली वर्तुळं पाहण्याची क्रिया महिनाभर करावी. त्यानंतर नंतरच्या गुफेच्या क्रियेत हात घालावा.
18. ही क्रिया अध्यात्मिक असल्याने पूर्ण समाजल्यानंतरच आणि आत्मसात केल्यानंतरच अमलात आणावी ही विनंती. ते सप्तरंगी वर्तुळं म्हणजेच आपली सप्तचक्रे होत. काही प्रश्न असल्यास आवर्जून विचारणे घाई करू नये.
धन्यवाद...
....अॅड. अंकुश सू. नवघरे.
धन्यवाद...
....अॅड. अंकुश सू. नवघरे.
No comments:
Post a Comment