उतारा...
(का ओलांडू नये...)
(का ओलांडू नये...)
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि. १८.०६.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
आज मी तुमच्यासाठी जी कथा घेऊन आलोय ती एक सत्यघटना असून अगदी कालपरवाच माझ्या एका ओळखीच्या माणसाने मला सांगितली आहे जी त्याच्या एका मावशीेच्या बाबतीत घडलेली आहे. हा प्रसंग तिच्यावर साधारणतः २ वर्षांपूर्वी गुदरला होता. पुढील कथा तिच्याच शब्दांत....
आम्ही गेल्या ३० वर्षांपासून जोगेश्वरी, मुंबई येथे राहतो. गेल्या ३० वर्षांत सर्वकाही सुरळीत पणे चालू होते. मुले मोठी झाली, चांगले शिक्षण घेतले आणि चांगल्या जॉबला पण लागली. आईवडिलांच्या दृष्टीने ह्याहून चांगले सुख आणि समाधान ते काय असते. असेच सुखासमाधानाचे जीवन आम्ही जगत असताना कोणाची नजर लागली कोण जाणे पण माझे सर्व आयुष्यच उध्वस्त व्हायची वेळ आली होती, मी जवळपास मृत्युच्याच जबड्यातून बाहेर आले असे म्हटले तरी चालणार आहे. नेहमीप्रमाणे रुटीन चालू होते. एक दिवस मला काही कामनिमित्त मेट्रोने जायचे होते, म्हणून मी त्यादिशेने निघाले. तिकडे जाताना एकेठिकाणी हायवेला (मुंबई राहादरीमुळे जवळपास सर्वच रस्ते हायवे सारखेच असतात) लागूनच तीन रस्ते बनत होते. गावाच्या ठिकाणी तीन रस्ते, चार रस्ते ह्यांना खूपच महत्व असते, कारण अशा जागा म्हणजे काही लोकांचे हक्काचे ठिकाण असते, त्या ठिकाणी नेहमीच काही न काही ओवाळून टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूंन काळजीपूर्वक किंवा खाली बघूनच चालावे लागते. अर्थात आशा ओवाळून टाकलेल्या वस्तूंना किती महत्व असते हे त्या दिवसापर्यंत तरी मला खरोखरच माहीत नव्हते, परंतु गावात सहसा असे ओवळलेले स्मशानात किंवा पाण्याच्या ठिकाणीच टाकण्याची प्रथा असते जिथे सहसा कोणी जात नाही आणि त्यामुळे त्याचा त्रास इतर कोणाला होऊ नये अशी त्यामागची भावनाही असावी. परंतु मुंबईत जागा कमी असल्याने किंवा खूप रहदारी असल्याने आशा गोष्टी टाकण्याचे धाडस सहसा कोणी करताना दिसत नाही. परंतु म्हणतात ना की आपली जोडी भोगावी, म्हणजे आपले प्रारब्ध जर का आपल्याला भोगावेच लागणार असेल तर मग ते कधीना कधी समोर येऊन उभे ठाकतेच आणि अगदी तसेच माझ्याबाबतीत झाले.
त्यादिवशी खरेतर मी दुसऱ्या रस्त्याने जाणार होते परंतु मेट्रोचा प्रवास कधीच न केल्याने ह्यावेळी आपण मेट्रोने जावे अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. म्हणून त्या रस्त्याने सहसा कधीच न जाणारी मी आज त्या रस्त्याने जायला निघाली होती. अर्थात हे पण माझ्या सोबत होतेच. रस्त्यावरून चालत असताना मी चटकन रस्ता ओलांडला आणि त्या तीन रस्त्याच्या सिग्नलला पोहोचले आणि तिकडून रस्ता क्रॉस करणार इतक्यातच कुठून कोण जाणे परंतु एक बाई अगदीच अचानक हातात केळीचे पान घेऊन माझ्यासमोर अली आणि तिने ते पान अगदी माझ्या पुढ्यातच ठेवले, तिच्या आशा अचानक समोर येण्याने मला काही कळायची उसंत न मिळता मी क्षणभर तिथेच थांबण्याव्यतिरिक्त चुकून त्या वस्तूला ओलांडून गेले आणि रस्ता ओलांडला. खरेतर मला त्यावेळी कळलेच नाही की मी कसेकाय त्या वस्तूला ओलांडून गेले, परंतु मुंबईचे जीवन खूपच फास्ट असल्याने कोणालाच ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, आणि कदाचित माझेही तसेच झाले असावे. तरीही कुठेतरी मनाच्या खोल गाभाऱ्यात म्हटले तरी चालेल पण मला माझ्या त्या कृतीने चुकचुकल्या सारखे झाले आणि म्हणून मी मागे वळून पाहिले असता मला असे दिसले की ती बाईही कुठेतरी लोकांच्या गर्दीत दिसेनासी झाली होती आणि ती वस्तू म्हणजे केळीच्या पानावर दोन मुदी भात, त्यावर हळद, कुंकू, अबीर, गुलाल, नारळ, सुया टोचलेले लिंबू आशा बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या दिसून येत होत्या. माझ्या जिभेवर मी च असे केले. परंतु त्यावेळी मला थांबायला वेळ नसल्याने माझ्या रस्त्याला लागले आणि इच्छित ठिकाणी पोहोचल्यानंतर तो प्रसंग विसरूनही गेले होते.
संध्याकाळी मी घरी परतले परंतु ती संध्याकाळ इतर संध्याकाळीं सारखी वाटत नव्हती. आज दिवसभरात माझे डोके खूपच दुःखत होते, आणि आता घरी आल्यावर देखील ते खूपच जड झाल्यासारखे वाटत होते. मी येऊन कडक कोरा चहा घेतला, कोरा चहा घेतल्यावर माझ्या डोकेदुखीला लगेच अराम पडत असे. परंतु आज असे काहीच घडले नाही आणि ते अजूनच दुखू लागले होते. म्हणूंन मग मी शेवटी नईलाजानेच सरिडॉन नावाची पेनकिलर गोळी घेतली आणि डोक्याला जरासा बाम लावून डोळे मिटून पडून डोकेदुखी थांबायची वाट पाहत राहिले. ह्यांच्या आणि मुलांच्या येण्याचीही वेळ झाली होती, तोपर्यंत मला उठून त्यांच्यासाठी काहीतरी खायला इत्यादी करायचे होते. मी कितीवेळ झोपले होते माहीत नाही परंतु डोके दुखायचे थांबायचे नावच घेत नव्हते. आज त्या पेनकिलर गोळीनेही त्यांच्यापुढे हात टेकले होते. खूप असह्य झाल्यामुळे मी तशीच पडून राहिले. माझ्यात उठायचे त्राणच शिल्लक राहिले नव्हते, तसेच आता संपूर्ण अंग दुखायला लागून एक प्रकारे ग्लानी सारखीच अवस्था अली होती. किती वाजले असतील कोण जाणे पण अचानक मला जाग आली असता असे दिसले की हे आणि मुले माझ्या बाजूला कोंडाळे करून बसले आहेत, त्यांच्यापैकी माझी मुलगी माझ्या कपाळावर मिठाची पट्टी ठेवत आहे, मी उठण्याचा प्रयत्न केला तर ह्यांनी मला उठू दिले नाही आणि म्हणाले थांब पडून रहा, तुला ताप आला आहे, आज तू विश्रांती घे आम्ही सर्व आटोपतो, डॉक्टर येतीलच इतक्यात. मला खूप आश्चर्य वाटले, करण खरोखरच मला ताप आला होता, माझे अंग खुपच दुःखत होते आणि तापाने फनफणले होते. मी तशीच पडून मनात विचार करू लागले की, मला किती मायेची माणसे लाभली आहेत. विचार करता करता मला परत झोप आली आणि एक स्वप्न पडले की मी एक निर्जन ठिकाणाहून जात आहे आणि माझ्या मागे कोणीतरी लागले आहे, मी सारखी मागे मागे वळून पाहते परंतु कोणीच दिसत नाही पण चित्रविचित्र आवाज मात्र येत आहेत आणि एक क्षणाला ते जे काही विचित्र होते ते एकदमच माझ्या जवळ येऊन ठेपले आणि मला पकडणार तितक्यात मी किंचाळले आणि मला जाग आली तर मी पाहिले की मी घरीच होते आणि डॉक्टर मला तपासत होते.
डॉक्टर म्हणाले की ह्यांना जरा अशक्तपणा आला आहे म्हणूंन असे सर्व होत असे, पण तसे घाबरण्यासारखे काहिच नाहीय म्हणून ह्यांना जरा थोडे दिवस आराम करू द्या म्हणजे सर्वकाही व्यवस्तीत होईल. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली होती त्यामुळे मला जरा जरा बरे वाटू लागले होते, त्यादिवशी घरातले सर्व काम ह्यांनी व माझ्या मुलांनीच केले, ह्यांनीच मला त्यांच्या हाताने भरवले. आता ह्या वयातही त्यांचे माझ्यावरचे प्रेम मला प्रकर्षाने जाणवत होते म्हणून ह्या त्रासाच्या क्षणीही मला खूप भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले असताना हे मला म्हणाले अग रडतेस काय, असे म्हणून ह्यांनी माझ्या मुलीला हाक मारली आणि म्हणाले की तूच जरा आता तुझ्या आईला समजावून सांगा आणि तिला व्यवस्तीत जेवू घाल, असे म्हणून ते निघून गेले, कदाचित त्यांच्याही डोळ्यांत पाणी आले असल्याने ते लपवण्यासाठी त्यांनी तसे केले असावे. मी जेवत असताना अचानक माझी मुलगी जोरात किंचाळली, तिचे तसे किंचाळणे ऐकून माझा मुलगा आणि हे परत आतमध्ये आले असता त्यांनाही ते बघून शॉक बसल्यासारखा झाला, मलातर कळतच नव्हते की ते असे विचित्र नजरेने माझ्याकडे का पहात आहेत, म्हणून मी खाली ताटाकडे पाहिले असता सर्व ताट रक्ताने भरून गेले होते, ते पाहून मला उलटी सारखे होऊ लागले, मी चटकन उठले आणि आरशाकडे धावले तर मला असे दिसले की माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या ऐवजी रक्ताची धार लागली होती आणि माझा पूर्ण चेहरा सुजून गोल झाला होता. ते पाहून मला खूप धक्का बसला आणि मी खालीच बसले.
माझी अशी परिस्तिथी पाहून ह्यांनी लगेच अंबुलन्स ला फोन केला आणि मला हॉस्पिटल ला हलवले. हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यावर मला सलाईन लावण्यात आले तसेच एक रक्ताची बोटल लावण्यात आली. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या आणि ते निघून गेले. त्यारात्री माझे हेच माझ्याजवळ थांबले होते. त्यांना थांबता यावे ह्यासाठी आम्ही स्पेशीयल रूम घेतली होती. मला खूपच ग्लानी आली होती म्हणूंन मी काहीच न बोलता डोळे मिटून पडूनच राहिले होते. रात्री परत मला असे जाणवले की कोणीतरी माझे पाय खेचत आहे, माझ्या छातीवर बसून मला मारत आहे आणि माझे केस ओढत आहे. तो सर्व त्रास खूपच असह्य होत होता. दुसऱ्यादिवशी सकाळी रिपोर्ट आले परंतु त्यात काहीच आढळून आले नाही, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. म्हणून डॉक्टर बोलले की ह्यांना शारीरिक आजार काहीच झाला नाहीय तर ह्यांनी खूप चिंता केल्यामुळे हे सर्व झाले होते. जर हे सर्व मानसिक चिंतेमुळे झाले होते तर मग ते काय होते जे रात्री घडले होते. माझ्यासाठी सर्वकाही अनिश्चितच होते. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज घेतला करण त्यांच्या मते मला काही झालेच नव्हते तर फक्त विश्रांतीची गरज होती. त्यांच्यामते अतिचिंतेमुळे ह्या सर्व गोष्टी घडू शकतात आणि रात्रीच्या प्रकाराबद्दल त्यांचे मत असे होते की तो माझा भास होता, परंतु खरच तो माझा भास नव्हता.
घरी आल्यानंतर माझ्या त्रासात अजूनच वाढ झाली होती. हा सर्व त्रास सकाळी कमी असायचा परंतु रात्री खूपच वाढायचा. माझे डोळे खूप लाल लाल व्हायचे, सुजायचे, तोंड सुजायचं, कोणी ह्या गोष्टीवर विश्वास नाही करणार पण डोळ्यांतून रक्त वाहायच. ह्या सर्व प्रकारामुळे माझी तब्बेत खूपच खालावत चालली होती. आयुष्यात कधीच मांसाहार न करणारी मी मला चिकन, मासे, अंडी खायला पाहिजेत अशी मागणी करू लागले होते. आम्ही कितीतरी डॉक्टर केले, डोळ्यासाठी, सुजे साठी परंतु काहीच फरक पडत नव्हता. आता आजूबाजूच्या लोकांनाही ह्याची कुणकुण लागली होती. आजूबाजूचे लोक ह्यांना काही न काही सल्ले देऊन जात होते. सर्वानाच हा संशय होता की हे डॉक्टरी प्रकरण नाहीय तर करणी किंवा भूत बाधेचा प्रकार होता. परंतु मला आणि माझ्या ह्यांना भूत प्रेत असल्या प्रकारांवर अजिबातच विश्वास नसल्याने आम्ही त्यादृष्टीने कधी विचारच केला नव्हता. पण जसे प्रकरण हाताबाहेर जाऊ लागले होते तसतसे आमचा धीर सुटत चालला होता. अशातच एके दिवशी एका शेजारच्या काकांनी माझ्या ह्यांना असे सांगितले की एक माणूस उत्तर प्रदेश वरून इथे मुंबईत आला आहे, तो असल्या प्रकारांचा खूप जाणकार आहे, आज त्याच्या वास्तव्याचा इथला शेवटचा दिवस असल्याने तुम्ही त्वरित जाऊन त्याला भेटा. माझ्या ह्यांनी मला ह्या बद्दल सांगितले असाता मी त्याला प्रखर विरोध केला. तो विरोध करत असताना माझा आवाजही काहीसा बदलला होता. माझा तो रुद्रावतार बघून आता ह्यानाही असे वाटू लागले होते की नक्कीच काहीतरी वेगळे आहे आणि जे डॉक्टरांच्या अखत्यारीतील नाही. म्हणून शेवटी ह्यांनी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला.
तो खरच ह्यांचा महत्वाचा निर्णय ठरला, करण की ह्यांनी त्याला त्यादिवशी बोलावून आणले नसते तर कदाचित ही कथा सांगायला आज मी तुमच्यात नसतेच. हे त्या माणसाला भेटले तेव्हा त्याने क्षणभर डोळे मिटले आणि म्हणाला की अब बहोत देर हो चुकी है, मै कूछ नही कर सकता हु। ये कोई आम आत्मा नही है, बहोत ताकदवर है और पहेलेही तुम बहोत समय गवा चुके हो। अब वो उसको साथ लिकेही जयेगी। जब कोई आत्मा सौ लोगो के शरीर मेसे गुजरती है तो बहोत ताकदवर बन जाती है। और तुम्हारे औरंत का शरीर एकसो एक वा है। अब बचनेकी कोई गुंजाईश नाही है। त्याचे हे बोलणे ऐकून माझे हे त्याच्या पुढ्यात ओक्सबोक्शी रडायलाच लागले आणि म्हणाले की महाराज, पर हमारी उसमे क्या गलती थी। मेरी बिवी तो बहोत अच्छी औरत है। हमारे दो बच्चे है। उसदिन इसके सामने वो औरत अचानक से आगयी। लगता है उसने ये सब जानभुज के कीया था। त्यांचे असे रडणे ऐकून त्या माणसाला दया आली असावी म्हणून तो बोलला की मै करता हु मेरेसे जो कुछ भी होगा, बस आप अपने मन की तयारी कर लिजीए। इसमे आपको सबको बहोत तकलीफ उठानी पडेगी और बहेन को भी बहोत ही खतरा है। वोह आत्मा ऐसेही नही जायेगी। असे म्हणूंन तो ह्यांच्याबरोबर यायला तयार झाला. तो जसा तिकडून आमच्याकडे यायला निघाला तसे मला इकडे जास्तच त्रास होऊ लागला, आजूबाजूच्या बायका मला पकडायला होत्या. तो तिकडून निघाला तसं मला इकडे लगेच कळले, कारण माझ्या शरीरात तो आत्मा होता, त्यांच्याशी माझ्या सर्व चेतना जोडल्यागेल्यामुळे त्यांच्या सर्व हालचाली मला इकडे दिसू लागल्या होत्या अशी काहीतरी ताकद माझ्यात आली होती.
तो जसजसा आमच्या घराच्या जवळजवळ येऊ लागला तसतसा माझा त्रास अजूनच वाढू लागला, माझे तोंड सुजून गोल झाले होते आणि माझ्या डोळ्यांतून परत रक्ताची धार लागली होती. आता माझा आवाज बदलून तो आता हिंदी मध्ये येत होता तर मधेच उर्दू, मधेच अजून कुठली भाषा असा येत होता. मलाच कळत नव्हते की मी नक्की कोण आहे आणि मला स्वतःला कुठली भाषा येते. तो आमच्या दरवाजाशी आला सोबत माझे हे पण होते, तो जसा आला तसा एक घाणीचा दर्प दरवाजातून बाहेर पडला तो उपस्तीत सर्वांच्या नाकाचा वेध घेऊन गेला, सर्वांनी आपापली नाके बंद केली, अत्यंत घाणेरडा असा तो वास होता. तो येऊन दाराशीच थांबला आणि त्याने त्याच्या झोळीतून एक काळ्या रंगाचा मोठा दोरा बाहेर काढला तसे मी अजूनच किंचाळू लागले. आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर तिथे जमली होती. कोणी म्हणत होते की हिला काही मानसिक आजार आहे. समजा होता मला मानसिक आजार पण मग हे डोळ्यांतून रक्त इत्यादी येणे हेपण मानसिक आजाराचे लक्षण होते का. त्याने तो दोरा दाराच्या एक बाजूला बांधला आणि त्याचे एक टोक दुसऱ्याबाजूला बांधत त्यानंतर दाराच्या पूर्ण चौकटिला बांधला आणि अशाप्रकारे एक सीमारेषा त्याने आखली. इकडे माझ्यात इतकं बळ आले होते की मी आता कोणालाच ऐकत नव्हते. एकाच वेळी चार माणसांना मी उडवून लावले होते, म्हणूंन सर्व मला घाबरून बाजूला झाले होते, माझी मुलं हे सर्व बघून खूप घाबरली होती आणि सारखी आई आई करून रडत होती. त्यानंतर त्याने झोळीतून काहीतरी पावडर बाहेर काढली आणि मंत्र म्हणत जोरात दरवाजावर फुकली आणि गृहप्रवेश केला आणि जोरजोरात मंत्र म्हणू लागला तसं माझ्यात असलेला तो अजूनच चवताळून मला त्रास देऊ लागला. मी स्वतःचेच केस ओढू लागले, थोबाडीत मारून घेऊ लागले, भिंतीवर डोकं आपटून घेऊ लागले आणि स्वतालाच त्रास करून घेऊ लागले. त्या माणसाने माझ्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाला खामोश! तशी मीही त्याच्याकडे रोखून पाहू लागले, खरतर मला असे करायचे नव्हते कारण मी हे करत नव्हते. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो, दोघांचेही डोळे लाल लाल झाले होते आणि दोघांचेही डोळे आग ओकत होते. मी त्याला काय काय शिव्या देऊ लागले, अशा शिव्या मी उभ्या आयुष्यात ऐकल्या नसतील, बोलायचे तर राहिले दूरच.
तो माझ्याकडे बघून म्हणाला कौन हे तू, क्यू इस बहेन को तकलीफ दे रहा है। तो हळू आवाजात बोलत होता परंतु त्याच्या आवाजात विलक्षण जरब होती. त्याचा तो दरडावणारा आवाज ऐकून मी किंवा माझ्यातला तो सौम्य आवाजात बोलू लागला, मै रानी हु, मे इसको लेके जायेगी, मे इसको छोडेगी नही असे म्हणूंन ती जोरजोरात हसू लागली तसे माझे रक्ताळलेले दात सर्वाना दिसून, सर्वांच्या अंगावरून सरसरून काटा गेला. तो माणूस परत म्हणाला, बकवास बंद कर कमीने, सच बता कौन है तू, नहीतो, असे म्हणूंन त्याने त्याच्या हातात असलेली मंतरलेली राई माझ्या अंगावर फेकली असता चर्रर्र चर्रर्र आवाज करीत ती राई माझ्या अंगावर लागताक्षणी पेटून उठली आणि त्याच्या चटक्यांनी माझ्या अंगावर चट्टे उठले, तसा माझ्या अंगातले ते विव्हळले आणि अजूनच शिव्या घालायला लागले, तसं तो माणूस परत ओरडला बता कौन हे तू वरना इससे भी ज्यादा तकलीफमे से गुजरना पडेगा असे म्हणून तो परत मंत्र पुटपुटू लागला तसे ते भाजलेले चट्टे परत जळू लागले. तस ते परत विव्हळू लागलं आणि बोलले मै नासीमा, मुझे उसने मारा, मग परत बोलला मै आफताब, मग परत मी दगडू, मग परत बोलला मै पांडुरंग, हे सर्व ऐकत असताना तो माणूस बोलला बकवास बंद कर और अब तू कौन है वो बता नहीतो, असे म्हणूंन त्याने त्याच्या झोळीत हात टाकला तसे माझ्यातले ते म्हणाले नही मुझे मत मारो, मुझे मत मारो, मै बताता हु, मुझे मत मारो, मेरी कोई गलती नही है, मुझे बताया गयाथा के तुमको पानी मे बहादेंगे और मुक्ती देंगे, इसलीये मैने बात मानी, पर मुझे फसाया, और मुझसे एक को खून की उलटी करके मरवाया, मे तो २०० सालो से मुक्ती की राह देख राहा हु, मुझे फसाके इस औरंत के पैर के नीचे डाल दिया। मेरी कोई गलती नही है, सब तुम इंसानोकी गलती है। अब मे इसको नही छोडुंगा। असे म्हणून मी परत रडू लागले.
तो माणूस बोलला की इसमे इस बहेन की कोई गलती नाही है। ये बाल बच्चे वाली है। छोड दे इसको बदलेमे तुझे जो चाईए मे देने के लीये तय्यार हु, पर इसे बक्षदे, मे वादा करता हु, मै तुमको मुक्ती दिलाने की कोशीष करूंगा। असे सांगितल्यावर तो जरासा शांत झाला. मग जवळपास २१ दिवस अशा फर्माईशी चालल्या, रोज एक उतारा काढला जायचा, त्यात कधी दही भात, कधी कोंबडीचे मटन, कधी बकार्याचे मटण, कधी वरण भात, कधी गुलाबजामुन, कधी जिलेबी, कधी शेवया असे ना ना पदार्थ ठेवले जायचे, त्याचा उतारा माझ्यावरून उतारला जायचा आणि कुठेतरी पाण्यात, कधी तळ्यात, कधी गटारात जसे तो सांगेल तस सोडला जायचा, हे करताना कमालीची गुप्तता पाळली जायची, उतारा करताना कोणीही बोलले नाही पाहिजे, तो नेत असताना कोणी विचारले नाही पाहिजे, कोणी बघितले नाही पाहिजे असे एक ना अनेक नियम त्याला होते. म्हणून हे सर्व करताना शक्यतो रात्रीच केले जायचे. त्यासाठी पगार देऊन खास एक माणसाची नेमणूक केलेली होती. कधी कधी उतारे स्मशानात ठेवावे लागत असत. एकदा तो माणूस न आल्यामुळे माझ्या ह्यांना तो उतारा स्मशानात घेऊन जायची वेळ आली होती. तो घेऊन जात असताना खूप चित्रविचित्र, भीतीदायक आवाज येत होते, परंतु त्यामाणसाने सांगितल्या प्रमाणे सर्व केल्यामुळे काही संकट आले नाही. असे करता करता माझी तब्बेत हळूहळू सुधारत होती. शेवटच्या दिवशी तो माणूस आला आणि म्हणाला की आजचा शेवटचा विधी आपल्या सर्वांना समुद्राजवळील स्मशानात करायचा आहे तेव्हा मन घट्ट करा. स्मशानात गेल्यावर त्याने एक माणूस आरामात बसेल अशा ४ चौक्यांची स्थापना केली. त्यांच्या सर्वात आत हळदीची चौकी होती, त्यानंतर कुंकू, त्यानंतर अबीर, त्यानंतर बकार्याच्या रक्तात भिजवलेले तांदुळ आणि सर्वात बाहेर गंगाजल. त्या चौक्यांमध्ये माझ्या ह्यांना आणि उतारा नेऊन टाकणाऱ्या माणसाला बसवले होते आणि हातात काही वस्तू, जिवंत कोंबड्या दिल्या होत्या आणि बजावून सांगितले होते की काहीही झाले तरी ह्या चौकीच्या बाहेर यायचे नाही आणि शरीराचा कुठलाही भाग चुकून पण बाहेर येणार नाही ह्याची दक्षता घ्यायची तसेच जेव्हा मी सांगेन तेव्हाच ह्यातील एक एक वस्तू चौकीच्या बाहेर टाकायची होती. त्याने स्वतः समोर एक हवन कुंड पेटवले आणि समोर मला बसवले होते. मला दोन बायकांनी पकडून, बांधून ठेवले होते. हवन कुंडाच्या बाजूला एक धष्टपुष्ट बोकड बांधून ठेवला होता. त्याने मंत्र बोलून हवंनकुंडात काहीतरी टाकले तसे लगेच हवनकुंडात अग्नी प्रज्वलित झाला आणि हळू हळू धगधगु लागला. जसजसे हवनकुंडात आहुत्या पडत होत्या मला जास्तच त्रास होऊ लागला होता. मी किंचाळत होते, माझ्याबरोबर आजूबाजूच्या झाडीतून, परिसरातून चित्रविचित्र, किंचाळण्याचे, विव्हलण्याचे, कुत्रे रडण्याचे आणि विचित्र असे कानठळ्या बसवणारे आवाज वाढत होते. त्याने माझ्या ह्यांना इशारा केला तसे त्यांनी त्यांच्या जवळ असलेले कोंबडे चौकीच्या बाहेर टाकले असतात क्षणार्धात अज्ञात शक्तीने त्याच्या चिंध्या केल्या. आसमंतात रक्ताचे फवारे उडाले. असे करत करत शेवटची आहुती शिल्लक राहिली, ह्यावेळी त्याने बोकड सोडायचा इशारा दिला, तो बोकड त्या मदतनीस माणसाकडे दिला होता. बोकड बाहेर सोडण्याच्या गडबडीत चुकून त्या माणसाच्या पायाचा अंगठा त्या चौकीबाहेर आला आणि काही कळायच्या आताच त्याच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली, त्याच्या पायातून भळाभळा रक्त वाहत होते, त्या बोकडाबरोबर त्याच्या अंगठ्याचा पण बळी गेला होता. फक्त अंगठ्यावरच निभावलं होत नाहीत त्याचा जीव जाणार होता. हे असे का झाले हे आम्हाला नंतर कळले, ते झाले होते कारण त्या माणसाने त्याच्या अंगठ्याला काळा दोरा बांधला होता, आणि त्याचाच परिणाम की त्याचा फक्त अंगाठच गेला इतका काळ्या दोऱ्याचा महिमा असतो.
बोकडाचा बळी दिल्यानंतर माझा त्रास हळू हळू कमी कमी होऊ लागला होता. आता फक्त पूर्णाहुती बाकी राहिली होती. त्या माणसाने शेवटचे माझ्यात असलेल्या त्या शक्तीला विचारले की सांग तू तयार आहेस की नाही, त्यावर त्याने माझ्या माध्यमातून तयार असल्याचे सांगितल्यावर त्या माणसाने एक पिठाचा माणसाचा पुतळा बनवला, एक लहानशी तिरडी, मडके बनवले आणि एक लहान चिता बनवून माझे जरासे केस कापून त्या पुतळ्याला लपेटले आणि माझी एक जुनी साडी त्याला लपेटून चितेवर ठेऊन मंत्र तंत्राने त्याला अग्नी दिली, इकडे जसजसा पुतळा जळत होता तसतसा माझ्या शरीराचा दाह होत होता. शेवटी जसा पुतळा खाक झाला मला चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळले, मला ग्लानी सारखे झाले होते परंतु काय चाललेय ते कळत होते. त्यानंतर उरलेल्या पिठाचे १०८ पिंड तयार करून त्या सर्व पिंडांचे तर्पणयुक्त पिंडदान केले. ते होत असताना जेव्हा शेवटचे पिंड पाण्यात सोडले गेले तेव्हा दिलेल्या वचनाप्रमाणे त्या आत्म्याने त्याच्या जाण्याचा इशारा म्हणून जोरात पाण्याची एक लाट निर्माण करून जमिनिवरील सर्व पूजेचे समान, सर्व वस्तू समुद्रात वाहून नेले त्याच बरोबर आमचेही जणू स्नान घडवून आणले.
त्यानंतर मला एकदम हलके हलके वाटू लागले आणि पहाते तर काय माझ्या अंगावरचे सर्व डाग, व्रण सर्वकाही नाहीसे झाले होते, मी परत पहिल्यासारखी झाले होते.
समाप्त...
अंकुश सू. नवघरे...

No comments:
Post a Comment