#अघोर भाग 13
लेखक कनिश्क हिवरेकर...विश्वासने गाडी गावाच्या मार्गाने घेतली जंगलाचा काहीस अंतर पार करून गेल्यावरच त्यांना गावातील कंदिलाचे प्रकाश खिडक्यामध्ये टीमटीम करताना दिसून येऊ लागले... “गावात आल्यावर अगदीच एक वेगळ निराळ वातावरण वाटत. अस वाटत जसे कि माणसात आलो आहोत आपण...नाहीतर त्या वाड्यात अगदी...” संध्या बोलताना अचानक थांबली... “त्या वाड्यात अगदी ?” जयदेव उद्गारला... “ नाही काही नाही...आपण सध्या त्यापासून दूर आलोय...त्याचा विषय आत्ताच नको...त्या बाबतीत जयदेव मी तुला सर्वकाही सांगेन...” विश्वास, गाडी चालवत जयदेवला म्हणाला... “ अर्थातच , नंतर मी ऐकून घेईन..आणि काही गोष्टी योग्य वेळी आणि योग्य स्थितीतच समजल्या पाहिजेत...विश्वास मी जेव्हा वाड्याच्या जवळ जवळ आलो होतो तेव्हा कुणीतरी माझ पाठलाग करत होत अस वाटल मला...”
“पाठलाग ? कोण ?तू पाहिलस त्याला ?” विश्वास म्हणाला “नाही मला अंधारात तो काही दिसला नाही पण.... ; विश्वास ?”
“काय जयदेवा ?” “या गावातले कंदील काय विजेवर चालतात का ?” जयदेव गाडीच्या साईड मिरर मध्ये पाहत विश्वासला म्हणाला... “ नाही तर...असे का विचारतोयस ?” “कारण मागे आपण ज्या ज्या घराजवळून पास होतोय...त्या त्या घरातले दिवे , कंदील एकलगत विझतायत...”
“काय !?” विश्वास उद्गारला...तसे त्याने रियर व्युव्ह मिरर मध्ये पाहिले तर त्याला हि तेच दिसून आले...त्यांची गाडी ज्या ज्या घरापासून पास होत होती ते ते घर आपोआप अंधारात बुडत जात होत. अस वाटत होत काळोख स्वतःच चाल करून पुढे पुढे सरकत आहे कि अस म्हणायला हव त्यांच्या पाठीमागे येत आहे... “ what is happening ?” जयदेव म्हणाला... “ सर्व गाव सामसूम दिसतोय ! आणि...आणि विश्वास...” जयदेव पुढे काही म्हणणार होताच कि तोच विश्वासने गाडीचा गियर वाढवला आणि वेगाने गाडी पळवायला सुरुवात केली....जयदेव विश्वास दोघांनीही एकमेकांकडे पाहिले जयदेवाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला हि त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसेना झाला कि जशी जशी यांच्या गाडीची गती वाढली होती तसे तसे मागे एकेक घरातील दिवे झपाझप विझायला सुरु झाले होते...बघता बघता त्या काळोखाचा वेग हि वाढला अवशेच्या त्या भयान सैतानी अंधाराने आपला जबडा वासला होता कुठल्याहि क्षणी तो या चौघांना गिळणार होताच...विश्वासने गाडी आणखी जोरात पळवली आता मात्र काळोख भसभस करत त्यांच्याहि पुढ्यात येऊ लागला...बाजूच्या घरातील खिडक्यातील दिवे विझू लागले...काळोखाच वादळच जणू चहू बाजूनी त्यांना घेरायला आल होत. जयदेवाने समोर पाहिलं आणि म्हणाला... “विश्वास लवकर गाडी त्या समोरच्या दरवाज्याजवळ घे....” जयदेव उद्गारला... तसे विश्वासने गाडी पळवली आणि जयदेवने सांगितलेल्या आणि बोटांनी दर्शवलेल्या त्या प्रकाशित दरवाज्याच्या अगदी पायरीजवळ आणली...आणि काहीअंतरावरच कच्चकन ब्रेक दाबले....गाडी थांबली गाडीमध्ये विश्वास संध्या जयदेव तिघांचेहि श्वास वाढले होते...गाडीजशी पायरीला लागली तसाच एक चमत्कार घडला...मृत्यूचा जबडा वासून आलेल ते काळोखाच वादळ तत्क्षणी जणू एका लहानश्या दिव्याच्या लवलवत्या ज्योतीने एका झपाट्यात भिरकावून दिले तसे तो काळोख क्षणभरात आलेल्या मार्गाने मागे सरत गेला...आणि गावतले दिवे , कंदीले परत उजळून निघाले...संध्याने इवलूश्या अनुला उराशी कवटाळून घेतल होत...जयदेवाने त्यांना जिथे आणले होते त्या जागेवर विश्वासने आणि संध्याने एकवेळ नजर टाकली..... आणि..... पाहिलं कि गाडी ....देवळाच्या पायरीस येऊन थांबली होती...
“मला वाटत माझी शंका खरी ठरणार आहे...” जयदेव म्हणाला...तिघेही गाडीमधून खाली उतरले...विश्वास पुढे आला आणि त्याने त्या देवळाचा दरवाजा आतमध्ये ढकलला...मनोमन संध्याने देवाचे आभार मानले... दरवाजा उघडताच त्या देवळात पसरलेला अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळला त्या सुगंधाने यांना तीघानानी एक प्रसन्नता भेटली...परंतु आतमध्ये जाताच त्यांनी पाहिलं कि देवळाच्या देवाऱ्यासमोर गावातले लोक मांड्या घालून बसले होते सर्वांच्या माना मागेच वळून या तिघांना पाहत होत्या... विश्वास पुढे होता मागे संध्या अनुला घेऊन व तिच्या मागे जयदेव चालत येत होता लोकांच्या नजरांनी त्यांना विचित्र वाटू लागल होत...मंदिरात जागोजागी मशाली पेटलेल्या खांबावर स्तंभावर अडकवल्या होत्या...पिवळसर तांबस प्रकाशात त्यांचे चेहरे कुतूहलाने भरलेले आणखीनच गूढ दिसून येत होते....तसेच समोरच्या स्तंभांजवळून एका ओळखीच्या माणसाचा आवाज त्यांच्या कानी पडला... “तिथेच थांब....! एक पाउलदेखील पुढ टाकशील तर याद राख...गाठ या रंकाळ भगतशी हाय....” तो आवाज देवळाच्या चारीही भिंतीस धडकून देवळाच्या दरवाज्याततून वाऱ्यासारखा बाहेर पडला....विश्वास जयदेव संध्या तिघांच्याहि विस्फारलेल्या...नजरा समोर अगदी देवाऱ्याजवळ बसलेल्या एका मध्यमवयीन इसमावर पडल्या...त्याच्या हातांच दर्शनी बोट विश्वास संध्या आणि जयदेव तिघांच्याही दिशेने होत... “आम्ही !?” विश्वास उद्गारला... “ तू नाहीस....! जो त्या चौकटीच्या बाहेर उभा आहे... तुमच्या मागावर इथ पर्यंत आलाय....चालता हो इथला...नाहीतर याच देवाच्या उंबरठ्यावर तांडव मांडेल तुझा मी..” त्याच्या प्रत्येक धारदार भरदार आवाजाने तिथे असलेली एक न एक मशाल फडफडू लागली...
“लवकर आतमध्ये या तुम्ही....तिथे उभे राहू नका....लवकर...! घाई करा !” तिथे बसलेला तो इसम परत एकदा कडाडला.... त्याच्या जवळच ओसरीवर नाना सरपंच चटई टाकून बसले होते. त्यांनाहि कळत नव्हत हे कशाबद्दल आणि कुणाबद्दल एवढे तीव्र आणि उग्र झाले होते... “विश्वासराव लवकर आत या...चौकटी पासून ते म्हणतायत तसा करा..”
“हं...ठीक आहे...” विश्वासने संध्याच्या हातास धरले आणि त्याच्या सोबतीलाच जयदेव होता तिघेही त्या आवारात येऊन पोहोचले...आजूबाजूला गावातले लोक अगदी गारठून बसले होते...काळ्या ढगाळ वातावरणाने गावात एक भयंकर गारठा आणला होता. “या विश्वासराव बसा इथे...” सरपंच उद्गारले..
सरपंचाजवळच विश्वास जयदेव आणि संध्या अनु स्थानपन्न झाले...जयदेव एकटक त्या इसमाकडेच पाहू लागला... “ कोण तुम्ही ? काय दिसले तुम्हाला ? कोणाला तुम्ही धमकावत होतात....” जयदेव उद्गारला.... “ काळ, अघोर...या उजेडाच्या प्रकाशाच्या विपरीत दिशेस राहणारा एक भयंकर उपद्रव होता तो...तुमच्या मागावर इथ पर्यंत आला होता...” तो इसम उद्गारला... “ हे कोण ?” विश्वासने सरपंचाकडे पाहिले आणि म्हणाला... “ मी रंकाळ भगत आहे...गाऱ्हाणे घालतो या देवाला...साकड घालतो याला...तुमच्या सगळ्याचं हित करायला...”
“आमच्या मागे तर कुणीच नव्हत..जे आम्हाला नाही दिसले ते तुम्हाला कसे ?”
“माझ्या आधी तर तुम्हीच सगळ पाहिलंय...हो कि नाही विश्वासराव...अगदी या पोरीच्या स्वप्नापासून ते बकुळाच्या मृत्यूपर्यंत सर्वकाही....” त्याने अस म्हणताच विश्वासला धक्काच बसला... “हे पहा आम्ही आधीच एका भ्रमात अडकलो आहोत...ते काय आहे अआम्हाला त्याची काही कल्पना नाहीये..”
“काळ आहे...तो..काळ...तुमच्या आयुष्याला लागलेलं एक ग्रहण आहे ते...एक असा अभेदी पीडाचा चक्रव्युव्ह आहे ज्यात तुम्ही शिरला आहात खरे...पण त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग कुठून हि नाहीये. तो जो कोणी आहे....त्याच एकेकाळी रूप हे जन्मदात्याच होत...या व्यतिरिक्त आणि यापलीकडे मी जास्त काही पाहू शकलो नाही तुमच्या बाबतीत...” बोलता बोलता सतत तो व्यक्ती इकडे तिकडे पाहत होता.
“तुम्ही अंध आहात...! दृष्टिहीन आहात !” जयदेव त्यांना पाहतच म्हणाला... “होय ! जयदेव...! नावाप्रमाणेच जय आहे आयुष्यात तुझ्या....एक कर्म तुलाही करायचं आहे...आयुष्याशी खेळ आहे हा...पण मित्रत्वाच नात आणि नशीब तुला इथ पर्यंत घेऊन आल आहे...!”
“मी समजवतो विश्वासराव...” नाना सरपंच म्हणाले... “ यांची लहानपणीच दृष्टी गेली...पण देवाचा कौल बघा कि...देवान यांना अश्या ताक्ती दिल्या कि...बंद नजरेन यांना अंधाराच सगळ साम्राज्य दिसून येत जसे कि...” तोच जयदेवने सरपंचाच वाक्य पूर्ण केले...सरपंच त्याच्याकडे पाहतच राहिले... “जसे कि पिशाच्च योनी...आणि अतृप्त आत्मा..”
“होय...! बरोबर बोललात...! म्हणजे तुम्हीच ते जयदेव आहात ज्यांनी ते विश्वासरावाच्या नावाने पत्र पाठवल”
“होय...तो मीच होतो...इथ यायचा माझा हेतू फक्त सखाराममामाच पत्र पोहोचवणे इतकाच होतो पण इथे आल्यावर मात्र...”
“काय ??? कुणाच नाव घेतलत तुम्ही ? सखा ?” रंकाळ उद्गारला... “होय...! सखामामा...संध्याचे मामा”
“घाई करा ! तो घेऱ्यात अडकलाय...!त्याचा सापळा रचला गेलाय...कधीहि तो त्याच्या जाळ्यात अडकेल...आणि हो...सखाराम हा भूतकाळ आणि हा तुमचा चालू काळ यांच्यामधील असा एक दुवा आहे...ज्याच्या जबानीनेच तुम्हाला या चक्रव्यूहातून सुटण्याचा मार्ग मिळेल...रस्त्यात अनेक संकटे येतील...भीती हे त्याच खाद्य आहे...तो तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल रोखेल...तर्हे तर्हेचे मायावी खेळ करेल..पण हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे...नियतीने माझ्या या ताक्तींसहित काही मर्यादाहि दिल्या आहेत...ज्याचा त्याचा अंत हा रीतसर आहे...”
“म्हणजे तुम्ही या बाबतीत काहीही करू शकत नाहीत का आमची मदत ?”
“मी ? मी फक्त त्याचा एक दूत आहे...त्याची छाया तुमच्यावर आहे तो पाहतोय सर्व...आणि तो नेहमी तुमच्या सोबत असेल...हि लढाई तुमची आहे...मानवाची आहे...दैवासमोर सैतानाची शक्ती तेव्हा हि दुर्बल होती आणि आज हि आहे...जा..! सखाला वाचवा..! आणि त्या वाड्यातच दडलं आहे ते गुपित आणि सुटकेचा मार्ग...!”
“विश्वासराव ! आजपर्यंत यांच म्हणन कधी खोट ठरल नाही...घाई करायला पाहिजे तुम्ही...”
“ पण सखामामा आणि जखोबा दोघेही बकुळाला घेऊन गावा बाहेरील स्मशानी गेली आहेत....” विश्वास उद्गारला... “त्यांचा विधी केव्हाच उरकला आहे....!सखा परतीच्या मागावर अडलाय....त्याला वाचवल नाहीत तर मग...” रंकाळचे शब्द ओठांवर येताच थांबले... “नाहीतर काय मग ?” जयदेवने त्यास विचारणी केली तेव्हा रंकाळ म्हणाला... “नाहीतर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही...अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूची इच्छा हीच एक शेवटची इच्छा उरेल...परंतु मृत्यूदेखील मिळणार नाही फक्त आणि फक्त पिडा...!”
“विश्वास चलायला हव आपण....!” जयदेव म्हणाला.... तोच संध्या पाणावलेल्या डोळ्यांनी राग भरतच ओरडत जागेवरची उठून ताडकन उभी राहिली...डोळे पदराने पुसत ती म्हणाली... “बस्स..! काय चालवलय तुम्ही हे ? कुणासाठी करतोय हे आपण माझ्यासाठी ? तुम्ही माझा विचार नका करू पण आपल्या या मुलीचा तरी निदान विचार करायला हवा न...ती तापेने फणफणत आहे विश्वास...आणि तुला बस माझीच पडली आहे...आपल्या मुलीबद्दल काही नाही वाटत का ?”
“ संध्या अग...! तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी दोघीसाठीच मी हे करतोय न...चूक माझी आहे...मला मान्य आहे परंतु मला तुला गमवायच नाहीये...नाहीये मला तुला...”
“मला माफ कर विश्वास...! अनुच्या तब्ब्येती मुळे मी तुझ्यावरती चिडले...!” संध्याचे डोळे पाणावले...तसे विश्वासने तिला आणि अनु दोघींना आपल्या मिठीत घेतल... “आपण वाड्यावर गेल्यावर करू काहीतरी...तू तिथे थांब मी आणि जयदेव पाहतो काय करायचं ते...”
विश्वासने संध्याची समजूत काढली...आणि तिघांनीही त्या देवळाच्या चौकटी बाहेर पाउल टाकले...विश्वासने गाडी सुरु केली आणि...थेट आलेल्या रस्त्यानेच गाडी वाड्याच्या दिशेने न्यायला सुरुवात केली...जयदेवने खात्रीकरिता एकवेळ मागे वळून पाहिले...आता मात्र तशी काही आशंका नव्हती तशी काही हालचाल मागे त्याला दिसून येत नव्हती...गाडी आता जंगलाच्या मार्गाने लागली होती. बघता बघता...गाडीने अर्धे जंगल पार केलेच होते कि...रस्त्याच्या मधोमध येताच...अचानक गाडीच्या इंजिनमधून खट खट असा आवाज झाला...आणि गाडी तिथेच भर जंगलात बंद पडली... “इग्निशन देऊन पहा बर चालू होते का ते ?” जयदेव म्हणाला..तसे विश्वासने दोन तीन वेळा चावी फिरवून पाहिले परंतु गाडी मात्र काही चालू होईना झाली... “खाली उतरून पहायचं का ?” विश्वास जयदेवला पाहत म्हणाला... “ हं पण बाहेर काय असेल याची आपल्याला काहीएक कल्पना नाहीये विश्वास....”
“i know पण दुसरा मार्ग नाहीये...बाहेर निघावं लागणार आहे...इंजिन चेक कराव लागेल तरच कळेल काय प्रोब्लेम आहे तो. संध्या तू आतमध्येच राहा..मी आणि जयदेव बाहेर जाऊन इंजिन चेक करतो...”
विश्वासने संध्या आणि अनु दोघीनाही गाडीमध्येच ठेवले आणि हे दोघे बाहेर पडले... विश्वासने गाडीची हेडलाईट चालूच ठेवली होती...जेणेकरून प्रकाशात आजुबाजूच दिसेल...विश्वासने बोनेट उघडले आणि इंजिन तपासू लागला..त्याच्या जवळच जयदेव उभा होता...काही क्षण उलटून गेले परंतु इंजिनमध्ये झालेला बिघाड त्यांना काही सापडत नव्हता... “ नेमक काय झाल असेल ?” विश्वास एवढ म्हणाला होताच कि जवळच्या झाडातून पानांमध्ये सळसळ करत काहीतरी धावत गेल...तो आवाज जयदेवच्या कानावर पडला... “विश्वास...! गाडीमध्ये बस...लवकर...” जयदेव म्हणाला... “का ? काय झाले ?”
“विश्वास प्रश्न विचारायचा वेळ नाहीये हा लवकर बस गाडीत...आणि डायरेक्ट कर गाडी...” जयदेव म्हणाला...तसा विश्वास पटकन जाऊन गाडीमध्ये बसला...जयदेव त्याच्या खिडकी जवळ येत म्हणाला... “जो पर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत गाडी सुरु करू नकोस...इथ कुणीतरी आहे..जे...आहःssss....!!”
जयदेव खिडकीत उभा विश्वासला बोलण्यात गुंग होताच कि तोच त्याच्या डोक्यात मागून एक जोरदार फटका बसला आणि जयदेव तिथेच जागीच खाली कोसळला.. जयदेवने विश्वास सुरक्षित राहावा आतमध्ये यासाठी गाडी बाहेरून बंद केली होती आणि चावी आपल्या जवळ ठेवली होती.. बाहेर आपल्या मित्राला कुणीतरी घात केलाय हे पाहून विश्वास तळमळला....तो आणि संध्या दोघेही गाडीच्या काचावरती मारु लागले पण दरवाजा काही उघडायला तयार होत नव्हता न कि काच फुटायला....विश्वासने समोर पाहिले कि एक हडकुळासा व्यक्ती..एक डोळा त्याचा काना होता...त्याने हातात एक ओंडका आणला होता...विश्वासने त्याला बारकाईने पाहिले तेव्हा त्याला आठवले कि त्याने या माणसाला आधीहि पाहिल होत...तो माणूस नाथ्या होता....विश्वासने प्रथम गावात आल्यावर ज्याला पाहिले तो हाच होता...
“हिहीइहsss...मालक आता जाम खुश होणार.....हीहीही...! मालकाच काम हलक केल म्या....मालक तिकड सख्याचा मुडदा पाडत्याल...अन मी एक एक करून तुमचा सगळ्यांचा..हीहीहsss....हा.
“कोण आहेस तू ? मला एकदा बाहेर काढ...मग मी बघतो तुझ...माझ्या मित्राच्या अंगाला पुन्हा हात लावशील तर याद राख तुझा जीव घेईन मी....” विश्वास ओरडला..
“अबाबा! न्हाय...न्हाय म्या हात नाय लावणार त्यांना....क्क्या....म्या तर...” एवढ बोलून नाथ्याने तिथेच पडलेला एक भला मोठा धोंडा उचलून घेतला...आणि बेशुद्ध पडलेल्या जयदेवच्या दिशेने येऊ लागला...
“ह्हीहीहीsss...मालक खुश होणार...माझ्यावर मालक खुश होणार....ह्येह्ये...” नाथ्याने धोंडा हातात घेऊन तो हवेत उचलला आणि जयदेवच्या अगदी डोक्यावर उगारला आणि....
“खच्च ...खटsss....” असा अक्षरशः कवटी फुटण्याचा आवाज आला...विश्वास आणि संध्या दोघांचेहि डोळे ते दृश्य पाहून विस्फारून गेले..परंतु आघात झाला होता जयदेववर नाही....तो झाला होता नाथ्याच्या कवटीवर...
***
आपला भयंकर अवतार घेऊन गोविंदपंत सखारामच्या अगदीच वाटेवर उभा होता तेच केशविरहीत कपाळ तोच लंबाकर चेहरा...माथ्याच्या मधून मानेवरून पाठीवर लटकणारी ती नागासारखी जट...त्या दाट भुवया ....आणि दाट मिश्या लालभडक डोळे आणि पांढरे बुभळ...शरीराचा अर्धा निम्मा भाग जणू आगीच्या चपाट्यात येऊन भाजून गेलेला...परंतु ती बस एक शरीराची प्रतीकृती होती...एक पोकळ शरीर...आणि भयंकर अतृप्त सैतानी आत्मांचा वास त्याच्यामध्ये....त्याच करड्या दरडनाऱ्या आवाजात त्याने बोलायला सुरुवात केली...
“सख्या ?? तुला ती चिता अजून हि आठवते न....ज्यावर तुला जिवंत झोपवला होता...तुला मुक्त करत होतो रे मी....सखा....तू तुझ्या बहिणीसारखा हुशार नव्हतास रे....तिने माझी गुलामगिरी स्वीकारली आणि तू....तू तिलाच माझ्यापासून दूर न्यायचा कट रचलास...हरामखोरा...!.”
“ चांडाळा...!...ती आता परत आलीये....सावित्रीची पोर परत आलीय....तुझा अंत निश्चित आहे....निश्चित आहे आता तुझा अंत...सैताना...! आजवर चारहि युगात तुझ्यासारख्या दानवाचा भयानक अंत झालाय...आता मी मेलो तरी बेहत्तर कारण तू हि आता नष्ट होणार आहेस....माझ कर्म संपल... पोरी मला माफ कर तुझी साथ अर्ध्यातच सोडून जातोय....” सखारामने मृत्यूला कवटाळण्यासाठी आपले अखेरचे डोळे मिटले...
गोविंदपंताच्या हुकुमावरून ते भयंकर उपद्रव त्यांच्या पायाखालून बाहेर निघाले आणि त्याने शेवटी सखारामचा घास केला...आणि त्या वीस वर्षापूर्वीच्या रहस्याचा देखील ज्याच्यात दडला होता...अघोराचा अंत.....
क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,
No comments:
Post a Comment