HAUNTED COLLEGE
Written By : Abhishek Shelar#MBKG_summer
भाग 1 लिंक
https://marathighoststories.blogspot.com/2021/04/haunted-college-1.html
भाग 2 लिंक
https://marathighoststories.blogspot.com/2021/04/haunted-college-part-2.html
भाग 3 :-
या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्याने त्याचे काम चालूच ठेवले. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, थोडासा विरंगुळा म्हणून त्याने त्याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल काढला व त्यावर थोडावेळ टाईमपास करून तो पुन्हा आपल्या कामाला लागला. ग्रुपमधील बाकीचे सर्वजण Ground Floor वरील हॉलमध्ये आपापले काम करत होते.
काहीवेळाने शिवमला अमितचा कॉल आला, “शिवम झाले का तुझे काम?? आणि तिथे सर्व ठीक आहेना??” अमितने विचारले. त्यावर शिवम त्याला म्हणाला, “नाही रे !! मला वेळ लागेल अजून माझे drawing पूर्ण करायला, आणि इकडचं म्हणशील तर अजूनतरी मला काही विचित्र जाणवले नाहीय. मी म्हटलं होत ना की तो तुमचा भास होता.” त्यावर अमित म्हणाला, “Ok भाई !! भासच असेल आमचा, पण तू आता खाली ये आणि तुझे उरलेले काम कर तेवढीच तुला आमची Company.”
परंतु अमितचे ऐकेल तर तो शिवम कसला, “मी येईन रे माझं काम पूर्ण झाले की, तुम्ही करा तुमचं काम आणि काही लागलंच तर मी कॉल करेनच” असे बोलून शिवमने कॉल cut केला. तो मोबाईल पुन्हा चार्जिंगला लावणार इतक्यात तिथे सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्या वर्गाचे दार वाजू लागले. ते पाहून शिवम हसतच म्हणाला, “Ohh !! तर हेच आहे का ते भूत?? अमित नी राहुलपण ना काहीही stories create करतात” असे म्हणून त्याने तो दरवाजा घट्ट पकडला. थोड्याच वेळात वारा थांबला तसा तो दरवाजाही स्थिर झाला.
शिवम पुन्हा त्याचे काम करतच होता, इतक्यात त्याला कोणीतरी जोरात श्वासोछवास करत असल्याचा आवाज येऊ लागला. जणू एखादा हिंस्त्र प्राणीच जोरजोरात श्वास घेत आहे असा आवाज होता तो... आवाज जिन्याच्या दिशेनेच येत होता, परंतु अंधार असल्याने शिवमला तेथील काहीच दिसत नव्हते. त्याने सर्व Lights चालू केल्या, तसा तो आवाज थांबला. एखादा प्राणीच असेल असा विचार करून तो पुन्हा त्याच्या कामाला लागला.
एव्हाना रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. शिवमचे Drawing जवळजवळ पूर्णच होत आले होते, इतक्यात त्याच्या डोक्यावरील Light चमकू लागली व थोड्याच वेळात बंद झाली. त्याने बाकीच्या Lights चालू करण्याचा प्रयत्न केला पण काय आश्चर्य... त्यातील एकही Light आता चालू होत नव्हती. आता मात्र पूर्ण Floor वर भयाण अंधार पसरला होता. इतक्यात त्या अंधारातुन कोणीतरी चालत असल्याचा आवाज त्याला येऊ लागला. “कोण आहे??” शिवमने विचारले. परंतु समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. “अमित? राहुल? Are You There?? मला तुमच्यासारखा घाबरट समजताय का?? शिवम हसतच बोलत होता. त्याने त्याचा चार्जिंगला असलेला मोबाईल काढला व त्याची टॉर्च चालू करून समोर पाहिले तर काय.... समोर कोणीच नव्हते. आता तोच आवाज जिन्याकडून येऊ लागला, तसा तो धावतच जिन्याकडे गेला पण तिथेही त्याला कोणीच दिसले नाही. “हा काय प्रकार आहे?? आवाज तर येतोय पण टॉर्च मारल्यावर कोणीच कसे दिसत नाही?? शिवम स्वतःशीच बोलत होता. वातावरणातील गूढता वाढतच चालली होती. तोच त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. नीट ऐकले असता तो आवाज त्याच वर्गातून येत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
शिवम त्या वर्गाच्या दिशेने पावले टाकू लागला. जसजसा तो वर्गाजवळ जात होता तसा तो आवाज त्याला स्पष्टपणे ऐकू येऊ लागला... एखाद्या स्त्री किंवा मुलीचा आवाज होता तो, परंतु तिचे रडणे सामान्य व्यक्तीसारखे नव्हते. त्या रडण्यात खूप वेदना होत्या... विव्हळणे होते. “कोण आहे आत??” शिवमने दरवाजा ठोकतच विचारले. परंतु तिचे रडणे थांबले नाही. त्याला काय करावे काहीच सुचत नव्हते. काहीवेळ आजूबाजूला नजर फिरवली असता त्याचे लक्ष त्या दरवाज्याच्या वरच्या बाजूस गेले. त्या दरवाज्याला वरच्या बाजूने एक चौकोनी आकाराची पारदर्शक काच होती. थोडावेळ विचार करून त्याने त्याचा Desk सरकवून त्या दरवाज्यासमोर आणला व त्यावर उभे राहून मोबाईलच्या टॉर्चच्या साहाय्याने तो वर्गात पाहू लागला. परंतु मोबाईलची टॉर्च इतकी powerful नसल्याने त्याला समोरच सर्व अंधुक दिसत होते.... इतक्यात त्याला काहीतरी सुचले व तो खाली उतरला आणि त्याच्या बॅगेतुन आणलेली बॅटरी बाहेर काढली.
ती बॅटरी घेऊन तो पुन्हा एकदा त्या Desk वर उभा राहिला व वर्गात पाहू लागला. त्या बॅटरीचा उजेड वर्गातील समोरच्या भिंतीपर्यंत नीट पोहोचत होता. तसे त्याने डाव्या कोपऱ्यापासून पाहावयास चालू केले व हळूहळू करत फोकस उजव्या कोपऱ्यापर्यंत आणला, परंतु त्याला काहीच दिसले नाही. अचानक त्याची नजर वर्गातील एका पंख्यावर पडली... तो पंखा फिरत असल्याचे त्याला दिसले. आश्चर्यचकित होऊन त्याने बॅटरीचा फोकस त्या पंख्याच्या दिशेने मारला व समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.... त्या पंख्याच्या समोरील भिंतीवर गळफास लावलेल्या व्यक्तीसारखी सावली दिसत होती. नीट पाहिले असता ती सावली एखाद्या स्त्री किंवा मुलीचीच असल्याचे त्याच्या लक्षात आले. ते भयंकर दृश्य पाहून शिवमचे हातपाय सुन्न पडले... भीतीने दरदरून घाम फुटला. अचानकच त्याची टॉर्च बंद पडली आणि कानठळी बसेल इतक्या जोरात एक कणकर्कश किंकाळी त्याच्या कानावर आली. इथे अजून थांबलो तर आपले काही खरं नाही हे त्याला कळून चुकले होते.... तशी शरीरातील सारी शक्ती एकवटून तो तिथून पळू लागला. सर्व Lights बंद असल्याने पूर्ण Floor वर अंधार पसरला होता व त्यामुळे वातावरण अजून भयाण वाटत होते. खालच्या सर्व Floors वर देखील काळोखच होता. अंदाजेच जिने उतरत, धडपडत तो पळत होता. काहीवेळाने कसाबसा धापा टाकत तो Ground Floor वरील त्याच्या Colleagues पर्यंत येऊन पोहोचला.
शिवमचा घाबरलेला व घामाघूम झालेला चेहरा पाहून अमितला कळून चुकले की त्याच्यासोबत नेमके काय घडले आहे. त्याला बघून ग्रुपमधील सर्व धावतच त्याच्याकडे आले. राहुलने सर्वप्रथम त्याला पाणी दिले. “शिवम मी म्हटलं होत ना तुला नको विषाची परीक्षा घेऊस पण तू ऐकला नाहीस” अमित थोडे चिडूनच बोलला. “अमित Sorry यार, but you both were right. त्या वर्गात एक भयानक आत्मा आहे.” धापा टाकतच शिवम बोलत होता. त्या सर्वांचा आवाज ऐकून कॉलेजचे Security काका तिथे आले. शिवमभोवती जमलेला घोळका पाहून त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. सर्वप्रथम काही झालेच नाही असे दाखवणाऱ्या शिवमने नंतर घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तसे ते चिडूनच म्हणाले “तुला कोणी सांगितलेला नसता आगावपणा करायला?? मुर्खा वाचलास तू आज. मी वेढा आहे म्हणून संध्याकाळी 6.30 नंतर त्या Floor ला कोणाला जाऊ देत नाही का?? माझी नजर चुकवून तू तिथे गेलासच कसा??” “I am so sorry काका, पण मला वाटलं हे सर्व खोटं सांगतायत आणि भूत-प्रेत या गोष्टींवर माझा विश्वास कधीच नव्हता.” शिवम त्यांना बोलला. “पण त्या Floor वर नेमके काय घडले आहे?? ती कोणाची आत्मा आहे?? तुम्हाला काही माहित आहे का काका??” अमित त्यांना विचारत होता. तसे प्रथम नकार देत शेवटी सांगण्यास ते तयार झाले आणि म्हणाले, “ठीक आहे सांगतो !! परंतु तुम्ही हे कोणाला सांगणार नसाल तरच.” सर्वांनी त्यांना कोणालाही न सांगण्याचे वचन दिले तसे ते सांगू लागले.....
तब्बल 5 वर्षांपूर्वीची घटना आहे...... हार्दिक नावाचा एक मुलगा BMS ला शिकत होता. त्याच्याकडे पैशांची काहीच कमी नव्हती परंतु सर्व पैसा तो व्यसन, जुगार आणि इतर अय्याशी करण्यातच घालवत असे. त्याचे वडील गावातील एक बडी हस्ती होती. त्याच्याच वर्गात प्रांजली नावाची एक मुलगी होती. दिसायला देखणी तसेच तिचा स्वभाव देखील साधा आणि सरळ होता. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. तिला खूप शिकून आपल्या घरची परिस्थिती अजून सुधारायची होती, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
काहीच दिवसात हार्दिकला ती आवडू लागली, परंतु तिच्या मैत्रिणींकडून तिला हार्दिकच्या सवयीबद्दल माहित पडल्याने ती त्याला दुर्लक्षितच करायची. असेच एके दिवशी दारू पिऊन त्याने रस्त्यात सर्वांसमोर तिचा हात पकडला, तेव्हा तिने जोरदार कानाखाली वाजवून त्याचा पाणउतारा केला. हार्दिकचा स्वभाव खुनशी असल्याने त्याने तो राग मनात ठेवला.
त्याच्याच वर्गात करिश्मा नावाची एक मुलगी होती जी त्या दोघांचीही Best Friend होती. एके दिवशी हार्दिकने तिला प्रांजलीशी वर्गात एकदा शेवटचे बोलायचे आहे असे सांगितले. त्याप्रमाणे करिष्माने सर्व Lectures झाल्यानंतर प्रांजलीला थांबवून ठेवले. थोड्याच वेळात हार्दिक तेथे आला व प्रांजलीसमोर होकारासाठी विनवण्या करू लागला. करिश्माला घरून कॉल आला व नेटवर्क नसल्याने ती बोलण्यासाठी वर्गाबाहेर गेली. बराच वेळ विनवण्या करून देखील प्रांजलीने हार्दिकचे काहीच ऐकले नाही, उलट पुन्हा ती त्याला खूप काही बोलली. मागच्या वेळचा राग मनात ठेवून आलेल्या हार्दिकने रागातच तिचा गळा दाबला व ती ओरडू नये म्हणून तिचे तोंडही दाबून ठेवले. प्रांजलीने त्याला प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु हार्दिकच्या रागासमोर तिचे काहीच चालले नाही व थोड्याच वेळात तिने प्राण सोडला.
हार्दिक भानावर येईपर्यंत त्याच्या हातून खूप मोठी चूक घडून गेली होती. इतक्यात करिश्मा तिथे आली व समोरचे दृश्य पाहून हादरली. हार्दिकने तिला याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझे प्रेमप्रकरण तुझ्या घरी सांगेन अशी धमकी दिली. नाईलाजाने तिने त्याला होकार दिला व नंतर तिच्याच मदतीने त्याने ओढणीच्या साहाय्याने प्रांजलीचे प्रेत पंख्याला लटकवले, जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्याच आहे असे भासेल.
ही घटना मला माझ्या आधी येथे ड्युटीवर असलेल्या Security ने सांगितली होती. त्यालाही त्या नराधमाने कोणासमोर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आणि अशाप्रकारे त्या संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तिचे प्रेत तसेच त्या वर्गात लटकत होते. पुढे पोलीस केस झाली..... हार्दिक पकडला सुद्धा गेला, परंतु त्याचे वडील गावातील बडी हस्ती असल्याने तसेच त्यांचे नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी हे प्रकरण मिटवले.
या घटनेनंतर मलाही रात्रीच्या वेळी Round ला असताना त्या Floor वर असे अनुभव आले आहेत. त्यामुळेच Lectures संपल्यानंतर लगेचच मी त्या Floor वरील सर्व वर्ग बंद करतो व कोणालाही ते वर्ग वापरू देत नाही.
शिवम तू नक्कीच आज कोणत्यातरी दैवी शक्तीमुळे वाचला आहेस..... इतक्यात शिवमला आठवले की काल तो मारुतीच्या मंदिरात गेला होता व तेथील पुजाऱ्याने त्याच्या हातात एक पवित्र धागा बांधला होता. त्याने मनोमन हनुमंताचे आभार मानले व ते सर्वजण काकांचा निरोप घेऊन घरी जाण्यास निघाले.
दुसऱ्या दिवशी त्यांचा Festival पार पडला, परंतु या घटनेनंतर कोणीही त्या Floor वर रात्रीचे जाण्याचे धाडस केले नाही.
असे म्हणतात की आजही त्या Floor वर तिचे अस्तित्व जाणवते.
~~~~~समाप्त~~

No comments:
Post a Comment