संगीत.. - एक सुरमयी भयकथा- Music - Ek Surmayi Bhaykatha
लेखक : कुमार
रजत, एक मोठा संगीतकार होता त्याने संगीत दिलेली गाणी खुप श्रवणीय आणि हिट होत होती म्हणून एक तरुण मुलगा त्याचा कडे आपली गाणी आणि संगीत घेऊन त्याचा कडे गेला.
" सर, नमस्कार मी मोहित आपले खुप नाव ऐकले होते, तुम्ही मला भेटायला वेळ दिला त्यासाठी खरचं मी आपला आभारी आहे". रजत त्याचे बोलणे ऐकून म्हणाला.
" हे बघ माझ्याकडे वेळ नाही जास्त तू जे काही ते पटकन बोल " त्याचे चिडणे पाहून मोहित थोडा घाबरला आणि घाबरत म्हणाला
" माझा कडे काही स्वतः लिहिलेली गाणी आणि संगीत आहे तुम्ही एकदा पहिले असते तर बरे झाले असते" मोहित घाबरत म्हणाला. त्यावर रजत हसला आणि म्हणाला
" अरे मी तर नवीन संगीत आणि कलाकार याना संधी देत असतो तू एक काम कर उद्या मला ह्या पत्यावर येऊन भेट तिकडे पण तुझे गाणी आणि संगीत दोन्ही पाहू" आणि त्याला एक कार्ड देऊन सकाळी १० वाजता येण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे मोहित सकाळी दहा वाजता आला आणि त्याने आपली गाणी आणि संगीत दोन्ही रजत ला ऐकवले काहीसे तोंड वाकडे करत रजत म्हणाला
" मित्रा ह्यात दम नाही आहे, म्हणजे तुझी गाणी आणि संगीत जुळून येत नाही काही तरी कमी वाटते आहे, एक काम कर तू तुझी संगीत आणि गाण्याची वही इकडे ठेऊन जा मी पाहतो माझे अजून काही मित्र आहेत त्यांना आवडली तर तुझा नंबर देतो."
मोहित चा विश्वास नव्हता पण नाईलाज म्ह्णून त्याने आपली गाणे आणि संगीताची वही तिकडे ठेवली. मोहित ची परिस्तिथी बेताची होती तो कामावर जात असे पण आवड म्हणून त्याच्या बाबानी त्याला संगीत शिकवणी लावली होती सोबत त्याला कविता करण्याची आवड होती. मोहित रजत ला भेटून आता पंधरा दिवसाच्या वर झाले होते. न राहवून मोहित ने रजत ला कॉल केला तर कॉल रजत ने उचला
" हॅलो" रजत म्हणाला. तसे मोहित ने आपले नाव आणि ओळख सांगितली. पण रजत ने त्याला "अजून तुझे काम झाले नाही झाले कि कळवतो" असे सांगितले. मोहित ला काहीच समजत नव्हते काय करावे पण त्याने वाट पाहण्याचे ठरवले.
साधारण एक महिना झाला आणि केश कर्तनालयात मोहित गेला तिकडे त्याचा कानावर ओळखीचे संगीत सूर आणि गाणे पडले. तसे त्याने आश्चर्याने दुकानदाराला विचारले.
"हे..... हे .... कोणाचे गाणं आहे", दुकानदाराने जे सांगितले ते ऐकून मोहित च्या पाय खालची जमीन सरकली. त्याला तो दुकानदार म्हणाला हे गाणे रजत याचे आहे त्याचा नवीन संगीताचा अल्बम आला आहे आणि त्यातील गाणी खुप छान आहे आणि संगीत पण त्याचे आहे आणि ते पण खुपच छान आहे मार्केट मध्ये आता सर्व ठिकाणी हेच गाणी वाजत आहेत.
मोहित आता रागाने लाल झाला होता तो तिकडून तडक निघाला आणि रजत च्या घरी पोहोचला.
"रजत, रजत आहेस कुठे बाहेर निघ" चिडून मोहित म्हणाला. तसे रजत आला आणि मोहीतला समोर पाहून म्हणाला,
" तू आणि तुला कोणी आत सोडले" मोहित ने चिडून रजतची कॉलर पकडली,
" हरामखोर, चोर , माझ्या कविता माझी धून चोरुन ती तू स्वतःची म्हणून विकली लाज कशी वाटत नाही तुला?" त्याचा हात झिडकारत रजत म्हणाला.
"तुझ्या कविता तुझी धून कशावरून, तुझ्याकडे काही आहे का पुरावा हे सर्व तुझे आहे" रजत ने विचारले.
" अरे, हलकट माणसा, पुरावा काय पाहिजे माझी वही त्यादिवशी तुझ्याकडे सोडून गेलो होतो आणि तुला पुरावा पाहिजे, एवढा नीच असशील असे वाटले नव्हते" मोहित चिडून म्हणाला.
"नीच , हा हा हा " रजत हसला आणि म्हणाला, " माझ्या सारख मीच आहे आणि मी लय नीच आहे, तू पहिला नाहीस तुझा सारखे अनेक आहेत जे संगीतकार बनायला आले होते त्याचा धून गाणी वापरून मी आज एवढा मोठा झालो आहे त्यानी माझे काही केले नाही तू काय करणार जा हवे ते कर मला फरक पडत नाही" एवढे बोलून रजत हसू लागला.
मोहित बिचारा निराश झाला आणि तिकडून निघाला. रस्त्याने त्याला त्याची गाणी ऐकू येत होती त्याचे संगीत त्याची कविता हे सर्व ऐकू येत होते पण हे सर्व त्याचे असून सुद्धा त्यावर त्याचा हक्क नव्हता. त्याने केलेली सर्व मेहनत वाया गेली होती, ज्याची तो वाट पाहत होता ती संधी आता नव्हती त्याने केलेली मेहनत सफल झाली होती पण त्याला त्याचे नाव लागले नव्हते. तो निराश झाला होता आणि विचारांच्या तंद्री मध्ये चालत असताना अचानक मागून येणाऱ्या ट्रक ने त्याला धडक दिली आणि मोहित जागेवरच गेला.
साधारण पाच महिन्यानंतर एका समारंभात सर्वोत्तम गाणे आणि संगीत ह्यासाठी रजत ला पुरस्कार देण्यात आला. रजत त्या दिवशी खुप खुश होता आणि त्या मध्ये त्याने जरा जास्त नशा केली होती. गाडी मध्ये तीच त्याची प्रसिद्ध झालेली गाणी लावली होती. रात्रीचे साधारण अडीज वाजले होते. गाडी चालवत असताना अचानक रेडिओ मध्ये खर्रखर्र ऐकू येऊ लागली थोडे गाणे आणि थोडी खर्र खर्र होऊ लागली. अचानक ते गाणे कोणी तरी गात आहे असे वाटू लागले पण तो आवाज रजतच्या गायकाचा नव्हता ते गाणे सुरु असताना मधेच कोणी तरी हसताना ऐकू आले.
" काय रजत, कसे वाटत आहे दुसऱ्याचे श्रेय घेऊन हा?, हे तुला पण माहित आहे कि हा मान तुझा नाही तर हा मान माझा आहे आणि तू हे सर्व स्वतःचा नावावर घेतले आहे ह्या पारितोषिकाचा मानकरी तू नाही आहेस ह्याचा मानकरी मी आहे हे तू जगाला सांग मी तुझा जीव सोडून देतो आणि जर तू असे नाही केले तर तू मरणार आणि हे तुला खोटे वाटत असेल तर एकदा तुझ्या कारच्या मागच्या सीट वर पहा" एवढे बोलून पुन्हा तेच गाणे सुरु होते. घाबरत घाबरत तो आपल्या मागच्या सीट वर पाहतो तर तिकडे मोहित बसलेला होता.त्याची कवटी फुटली होती, एकाबाजूला जबडा तुटून लोमकळत होता रक्त काळे पडले होते, त्याचा एक डोळा बाहेर आला होता आणि कपडे रक्तानं माखले होते. त्याचे असे रूप पाहून रजत जोरात किंचाळला आणि गाडीला करकचून ब्रेक मारला. रस्त्यावर पूर्ण शांतात होती. रातकिड्याचा आवाज येत होता, रजत ने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले पण मागे कोणी बसले नव्हते. कदाचित भ्रम झाला असेल असे समजून त्याने आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि
पुन्हा एकदा त्याने आपल्या कडे असलेल्या बॉटल मधून दारूचा घोट घेतला.
" साला, मेला तरी मोह जात नाही, काय तर म्हणे माझी गाणी माझी धून जिवंत असताना काही करू शकला काही नाही आणि आता काही करू पण शकत नाही. हा काय पाहिला नव्हता ना शेवट असणार ह्याचा सारख्या पोरांच्या जीवावर तर आम्ही आमचे दुकान चालवतो आणि हे आम्हाला घाबरावतात" एवढे बोलून रजत गाडी सुरु करतो थोडे लांब गेलेले असतो तेवढ्यात पुन्हा तीच खर्रखर्र ऐकू येते आणि सोबत तोच आवाज
" तुला काय वाटले तुझी नशा आहे म्हणून हे सर्व वाटत आहे तुझ्या शेजारी बघ " त्या रेडिओ मधून आवाज येतो तसे तो शेजारी पाहतो तर त्याच्या बाजूच्या सीटवर तसाच जसा त्याने मागे पहिला होता तसाच मोहित बसलेला दिसून येतो. त्याला पाहून त्याचा गाडीवरचा कंट्रोल सुटतो आणि गाडी जाऊन भिंतीला धडकते आणि त्यात रजत चा जागीच मृत्यू होतो.
एका रेडिओ स्टेशन वर फोन येतो आणि त्यात सांगितले जाते कि समारंभावरून परत येताना रजत ह्याचा अपघात झाला आहे आणि त्यात तो दगावला आहे. मरण्याच्या आधी त्याने सांगितले होते कि त्याची जेवढी गाणी धून हिट झाली आहेत ती त्याची स्वतःची नव्हती आणि ह्या बद्दल त्याला वाईट वाटत आहे, आज जे पारितोषिक त्याला मिळाले आहे ते गीत आणि धून मोहित ह्यांचा आहेत आणि त्याचा पुरावा हा रजत च्या ऑफिस मध्ये आहे. पुढे कोण बोलते आहे विचारे पर्यंत कॉल कट झाला आणि पुन्हा कॉल लावला तर तो नंबर अस्तित्वात नव्हता. पोलिसाना कळवले जाते आणि तपास सुरु होतो अपघाती निधन म्हणून तपास सुरु होतो त्याचा ऑफिस मध्ये अनेक नवीन गीतकार आणि संगीतकार ह्याचा नोट्स सापडत.
"शिंदे पहिले का? हा रजत दुसऱ्या कलाकारांच्या नोट्स घेऊन त्यावर स्वतःचे लेबल लावत होता "इन्स्पेक्टर म्हणाले.
त्या रेडिओ ला आलेल्या फोन बदल चौकशी केली तेव्हा समजले कि तो नंबर मोहित चा होता आणि त्याचा अपघात सहा महिन्या पूर्वी झाला होता आणि आता ज्या गाण्यासाठी त्याला बक्षिस दिले होते ते गाणे आणि धून हे मोहित चे होते जे रजत ने चोरले होते. रजत ला दिलेले बक्षीस आता मोहित च्या घरी देण्यात आले होते.
अश्या प्रकारे मोहित ने मरणानंतर पण आपला बदला घेतला....
समाप्त ...........
No comments:
Post a Comment